टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
शेअर गुरूंच्या बुवाबाजीला फसू नका.
मंडळी शेयर बाजारात सद्या घडत असलेल्या चढ-उतारावर बरेच जण आपले मत व्यक्त करत असतात. ह्यात काही अभ्यासू तर काही नवशिके, काही ज्योतिषशास्त्राचा हवाला देणारे तर काही तांत्रिक विश्लेषक वगैरे वगैरे पद्धतीने बोलणारेही असतात, त्यातच झटपट फायदा करून देतो असे सांगणारे काही तथाकथित "सबसे तेज" तज्ञही असतात. अशा वेळी सामान्य गुंतवणुकदार पार गोंधळून जातो आणि नेमके करू नये ते करून आपले भांडवल घालवून बसतो. अशा लोकांनी हा लेख जरूर वाचावा.
स्वत: अभ्यास करावा आणि स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला प्रवृत्त व्हावे. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवावी. कुणी सल्ला दिला तरी त्याची स्वत: शहानिशा करून मग अंतिम निर्णय मात्र स्वत:चाच असावा.
ह्या बाबतीत इथल्या लोकांची मते जाणून घ्यायला आवडतील.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

स्वत:
स्वत: अभ्यास करावा आणि स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला प्रवृत्त व्हावे.
पण खुपदा काय होते मित्राने घेतले.
नातेवाइकांनी सांगितले म्हणुन लोक फसतात
हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तेव्हा शेयर बाजार ही त्याला अपवाद कसा असेल. आशा-निराशेचा हा खेळ असाच अनादि काळापासून सुरु आहे आणि तो अनंत काळापर्यंत सुरु राहणार आहे.
खरा डॉन (बाकीचे क्लॉन)
च्यामारी,ड
च्यामारी,डॉन्या.... प्रमोद काका 'शेयर' बद्दल बोलत आहेत. 'शेरो-शायरी' बद्दल नव्हे...
(शार्पशूटर) -इनोबा
"शेयर" काय
"शेयर" काय अन "शायरी" काय...
प्रेयर काय अन नामदेवाची पायरी काय ...
ब्रह्म सत्यं जगत मिथ्या....
माल जातो अन उरतो काथ्या...
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
खरा डॉन (बाकीचे क्लॉन)
वा! क्या बात है!
खडॉ काय बोललात?
ब्रह्म सत्यं जगत मिथ्या....
माल जातो अन उरतो काथ्या...
सहीऽऽऽऽऽऽऽऽऽ.
सहमत..
स्वत: अभ्यास करावा आणि स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला प्रवृत्त व्हावे. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवावी. कुणी सल्ला दिला तरी त्याची स्वत: शहानिशा करून मग अंतिम निर्णय मात्र स्वत:चाच असावा.
सहमत आहे...
तात्या.