कार्तिकी जिंकली!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
8 Feb 2009 - 9:38 pm

झी मराठी च्या सारेगमप स्पर्धेत कार्तिकी गायकवाड अंतिम विजेती ठरली.

कार्तिकीला मन:पूर्वक शुभेच्छा!! :)

संस्कृतीप्रतिसाद

प्रतिक्रिया

मिहिर's picture

8 Feb 2009 - 9:45 pm | मिहिर

हे खरे की मनाचे?
कारण अजून निकाल जाहीर व्हायचा आहे.
खरे असेल तर झी मराठीवर याक थू.

वर्षा म्हसकर-नायर's picture

8 Feb 2009 - 9:56 pm | वर्षा म्हसकर-नायर

अरे खरंच? अजुन इथे टि.व्ही. वर तर रिझल्ट डिक्लेअर नाही केला. छे काहीतरीच. आर्या हवी होती बाबा. हे काय नविनच?

आपला अभिजित's picture

8 Feb 2009 - 9:50 pm | आपला अभिजित

रिअलिटी शो डिफर्ड लाइव्ह दाखवले जातात.
मुंबईत कार्यक्रम संपला.

कार्तिकी जिंकली.

लिखाळ's picture

8 Feb 2009 - 9:51 pm | लिखाळ

ह्म्म ...
कार्तिकीचे अभिनंदन...
-- लिखाळ.

नितिन थत्ते's picture

8 Feb 2009 - 9:55 pm | नितिन थत्ते

ह्म्म म्हणजे काय हो?

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

लिखाळ's picture

8 Feb 2009 - 10:01 pm | लिखाळ

ह्म्म दोन गोष्टींसाठी..
१) आर्या आणि प्रथमेश हे इतरांच्या तुलनेत गुणी आहेत आणि त्यांपैकी एक जिंकावा असे माझे मत आणि इच्छा होती.
कार्तिकी गुणी आहेच त्यामुळे तेचे अभिनंदन केले.
२) अजून टिव्हीवर निकाल जाहिर झाले नाहित..त्या आधी बातमी कळाली.. आणि ती बातमी पक्की असल्याचा अभिजीत यांनी निर्वाळा दिला..त्याला अच्छा... हो का? असे लिहायच्या ऐवजी एकाच सामायिक ह्म्म मध्ये..दोन्ही साधले :)
-- लिखाळ.

मिहिर's picture

8 Feb 2009 - 9:56 pm | मिहिर

ही तर भंकसगिरी आणि प्रेक्षकांची फसवणूक आहे.
कार्तिकीचे उच्चार पण खूप वाईल्ड आहेत. मला वाटते झी मराठीने मुद्दामहून तिला जिंकवले असावे.
झी मराठी आणि सा रे ग म प ची माझ्या मनातील किंमत शून्य झाली आहे.

वर्षा म्हसकर-नायर's picture

8 Feb 2009 - 9:59 pm | वर्षा म्हसकर-नायर

कार्तिकी जिंकली? नाही ती वाईट नाही गात, छानच गाते, लहान पण आहे, तरीसुद्धा जनमत हे नक्कीच आर्याला होते.

आपला अभिजित's picture

8 Feb 2009 - 10:08 pm | आपला अभिजित

सारेगमप चा विरोधक नाही, पण पंखाही नाही.

एकतर हे रिअलिटी शो प्रेक्षकांना मूर्ख बनवण्यासाठीच बनवले जातात. सात रुपयांचा एक एसएमएस लोक अशा गाण्यांच्या, निव्वळ मनोरंजनपर कार्यक्रमांवर कसे काय फुकट घालवू शकतात? स्वतःसाठी हॉटेल, सिनेमा आदी खर्च करणं वेगळं आणि अशा एसएमएसवर पैसे फुकट घालवणं (म्हणजे च्यानेलच्या तुंबड्या भरणं) वेगळं.

लिटिल चंप्स सुरू झाल्यापासून तर काय कौतुकाचा कहरच झाला होता. एखाद्या मुलीनं एखादं गाणं वाईट म्हटलं, तरी तसं बोलणं म्हणजे महापाप!

मला वाटतं, सर्वाधिक पसंती असलेल्या स्पर्धकाला विजेता न करण्याची ट्रिक झी वाले दर वेळी करतात. अभिजित कोसंबीबाबत पक्षपात केला, सायली पानसेला पसंती असतानाही डावलली, आता आर्या/प्रथमेश!
असो.

प्रेक्षकांना पुढील सारेगमप साठी शुभेच्छा!

शाल्मली's picture

8 Feb 2009 - 10:17 pm | शाल्मली

५००% सहमत.
आर्या आणि प्रथमेश असताना कार्तिकी ला विजयी ठरवणे म्हणजे त्या दोघांचा अपमानच आहे.
असो..
सारेगमपचे पुढचे पर्वही येऊ घातलय प्रेक्षकांना मूर्ख बनवायला.. तेव्हा भरभरून एस एम एस करणार्‍यांनो- सावधान!

--(संतप्त) शाल्मली.

मैत्र's picture

9 Feb 2009 - 8:43 am | मैत्र

सायली आणि वैशालीची तुलना करता वैशाली अधिक उजवी होती यात शंका नाही.
दोघींनी एकच गाणं गायलं असेल तर वैशालीचा नैसर्गिक गोड आवाज, माधुर्य आणि खरा नम्रपणा या गोष्टी सायलीहून तिला पुढे नेणार्‍या होत्या. काही गाण्यांमध्ये सायलीचा जास्त किनरा टोकदार आवाज त्याला एक खरखरीत पणा किंवा विनाकारण जास्त वरच्या पट्टित किंवा ताणून गायल्यासारखा व्हायचा. वैशालीची सहजता विलक्षण होती.

टारझन's picture

8 Feb 2009 - 10:11 pm | टारझन

चला आता घरी आलो की हवा तो चॅणल पहायला भेटेल .. सुटलो एकदाचे :)

(स्पोर्ट्स प्रेमी) अंडर टेकर

आपला अभिजित's picture

8 Feb 2009 - 10:13 pm | आपला अभिजित

मस्त प्रतिक्रिया रे!

एकदम बेष्ट!!

सोज्वळ's picture

8 Feb 2009 - 10:12 pm | सोज्वळ

कार्तिकी ???? अरेच्चा .....!!
प्रथमेश, आर्यावर अन्याय ...... !!

कार्तिकीची चूक नाही.. झी मराठीची आहे ......कलेची कदर नाही, अन चालले स्पर्धा भरवायला ... कार्तिकीपेक्षा बाकीची ४ जण कधीही उच्च गातात ....
आणि सरतेशेवटी 'हा निर्णय जनतेचा' म्हणून पचवायला लावणार झी मराठी...!!

असो, खरे विजेते कोण ते येत्या ४-५ वर्षातच समजेल ......

अगोचर's picture

8 Feb 2009 - 10:20 pm | अगोचर

१ महा अंतिम फेरीत कदाचित कार्तिकीचे प्रदर्शन फारच चांगले झाले असेल.
२ आर्या किंवा प्रथमेश यांपैकी नक्की कोणाला विजेतेपद द्यायचे हे न ठरवता आल्यामुळे त्या दोघांनाही डावलुन कार्तिकी ला घोषित केले असेल.

"असो, खरे विजेते कोण ते येत्या ४-५ वर्षातच समजेल ......"

अगदी बरोबर

- अगोचर
(आंतरजालावरील चित्रपट्टीकांची वाट बघत आहे)

रामोजी's picture

8 Feb 2009 - 10:55 pm | रामोजी

आपल्या मनाप्रमाणे निकाल लागला नाही कि आश्चर्य वाटणारच. रियालिटी शो मधे गुणवत्ते चा विजय होतोच असे नाही. शाल्मली ने ३-४ बेस्ट पर्फोमन्स देउन ही ती अंतीम फेरीत पोचली नाही, रोहीत आणि कार्तीकी एक ही बेस्ट पर्फोमन्स न देता अंतीम फेरीत पोचले ह्यातच रियालिटी शो च्या मर्यादा स्पष्ट दिसतात. चिमुर्ड्या कार्तीकी ला मात्र हार्दीक शुभेच्छा!

शुभान्गी's picture

8 Feb 2009 - 10:55 pm | शुभान्गी

वाट्ले नव्हते कार्तिकीची निवड होइल......... आर्या किंवा प्रथमेशची निवड होईल...असे वाट्ले होते.....

आर्या, कार्तिकी, मुग्धा, प्रथमेश, रोहित हे पाचही जण खरेतर तोडीस तोड आहेत.
त्यामुळे खरंतर, 'अन्तिम विजेत्या'चा मान या पाचही जणांना विभागुन दिला असता, तर अधिक छान वाटले असते.
:)

कार्तिकी'च्या आवाजाचा वेगळा बाज आणि तो टिकवण्यासाठी तिने घेतलेली मेहेनत खरोखरच स्तुत्य आहे. परन्तु आर्या आणि प्रथमेशच्या आवाजाचा बाज आणि त्यातील ""माधुर्य"" केव्हाही उजवे ठरते.

कार्तिकीच्या आवाजात मोकळेपणा आणि रांगडेपणा आहे. पण "माधुर्या"च्या बाबतीत ती नक्कीच कुठेतरी कमी पडते, असे वाटते.

त्यामुळे हा किताब "आर्या" किन्वा "प्रथमेश" ला दिला गेला असता, तर अधिक सुखावह वाटले असते.

असो.

कार्तिकीने सर्वार्थाने घेतलेल्या मेहनतीला फळ मिळाले. त्याबद्दल तिचे आणि इतर सर्वांचेही हार्दिक अभिनंदन!

झी- मराठीला पुढील निकोप वाटचालीसाठी शुभेच्छा!
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

विकि's picture

8 Feb 2009 - 11:01 pm | विकि

कार्तिकी गायकवाड चे हार्दीक अभिनंदन.

कोदरकर's picture

8 Feb 2009 - 11:16 pm | कोदरकर

विजय असो... आळंदी सारख्या छोट्या गावाचे नाव पुन्हा एकदा झळकवल्या बद्दल कार्तिकी चे मनःपुर्वक अभिनंदन.
Underdogs चा विजय नेहमीच सुखावह असतो.. सर्वच जन छान गातात्..पण प्रथमेश हा अतिशय गुणी आहे....

सर्वसाक्षी's picture

8 Feb 2009 - 11:17 pm | सर्वसाक्षी

ज्या पद्धतिने अंतिम फेरी आधीच गारद झालेल्या कार्तिकीला परत आत आणली गेली आणि ज्या पद्धतिने तिला पुढे पुढे केले जात होते त्यावरुन तिलाच विजेतेपद बहाल केले जाणार हे अगदी स्पष्ट दिसुन आले होते.

हा कार्यक्रम एका खाजगी वाहिनीचा असल्याने ते कुणाला उत्तर देण्यास बांधील लागत नाहीत. मात्र हा निकाल गुणवत्तेवर आधारित नाही हे बहुतेकांचे मत दिसत आहे. अशा परिस्थितीत मला नवल वाटते ते तमाम परिक्षकांचे. सर्वजण बहुधा पैसा व प्रसिद्धी यासाठी वाहिनीला शरण गेले व त्यांनी सांगितलेला उमेदवार निवडला असे एकंदरीत चित्र असावे.

असो. जमेची बाजु अशी की वाहिनी आपल्या मर्जीनुसार वागत असली तरीही सर्वोत्कृष्ठ कोण ते जनतेला समजले व अन्यथा ज्या गुणी कलावंतांचे नावही आपल्याला माहित नव्हते ते कलाकार या कार्यक्रमामुळे उभ्या महाराष्ट्रासमोर आले व कौतुकास पात्र झाले. जर हा कर्यक्रम झाला नसता कुण्या एका आरवली नावाच्या खेड्यात प्रथमेश नावाचा अप्रतिम कलावंत राहतो हे कुणाला समजलेच नसते, त्याचे गाणे ऐकायला मिळणे दूरच. जरी वाहिनीने पारितोषिकाच्या बाबतीत मनमानी केली असली तरी खरे गुणवान कोण हे पुढील काळात समजेलच.

जाता जाता - या कार्यक्रमात अतुल परचुरे हे उगाच घुसडलेले पात्र वाटले किंबहुना प्रेक्षक गाणे ऐकायला उत्सुक असताना उगाच फालतु वेळ काढणारे वाटले.

विंजिनेर's picture

9 Feb 2009 - 4:31 am | विंजिनेर

कार्तिकीचे अभिनंदन. तिला आणि बाकीच्यांनासुद्धा पुढल्या वाटचाली निमित्त शुभेच्छा...

जाता जाता - या कार्यक्रमात अतुल परचुरे हे उगाच घुसडलेले पात्र वाटले किंबहुना प्रेक्षक गाणे ऐकायला उत्सुक असताना उगाच फालतु वेळ काढणारे वाटले.

बिचारे परचुरे सारेगमपच्या प्रत्येकच पर्वाच्या (महा-महा की काय त्या) अंतीम फेरीत घुसडल्यासारखे वाटतात. शुद्ध संगीतास्वाद हा मुळात झी-सारेगमपचा हेतू नाहीच. बाजारु करमणूकीचे एक "नाटक" म्हणून ह्या कार्यक्रमाकडे बघितले तर त्यात परचुरे हे संस्कृत नाटकातल्या विदुषकाचं(किंवा मराठीतल्या राम्यागड्याचं) काम करताना चपखल बसतात.

अविनाशकुलकर्णी's picture

8 Feb 2009 - 11:32 pm | अविनाशकुलकर्णी

निकाल कळायच्या आधि फुटला म्हणजे सेटिंग झाले होते.. चला SMS घराण्याच्या या गायक मुलिचे अभिनंदन........,

विसोबा खेचर's picture

8 Feb 2009 - 11:34 pm | विसोबा खेचर

कार्तिकीचे आणि सर्व लहानग्यांचे मन:पूर्वक अभिनंदन..

माझ्या मते ही केवळ सुरवात आहे, संगीताच्या दुनियेत त्या सर्वांना अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे...

धारवाड जिल्ह्यातील गदगसारख्या एखाद्या लहानश्ग्या खेड्यातून भारतरत्न किताबासाठी थेट राष्ट्रपतीभवनापर्यंत जाणारी ही वाट खूपच बिकट आहे एवढेच मला म्हणायचे आहे..!

मला संगीतातले फारसे काही कळत नाही परंतु आर्या आंबेकर ही सर्व स्पर्धकात थोडी अधिक उजवी असून तिला प्रथम बक्षिस मिळायला हवे होते असे माझे वैयक्तिक मत मी यापूर्वीही नोंदवले आहे, आताही नोंदवत आहे...

सदर स्पर्धेतील एसएमएस या प्रकाराचा मी पुन्हा एकदा तीव्र निषेध करत आहे...

तात्या.

चतुरंग's picture

9 Feb 2009 - 4:07 am | चतुरंग

बिकट वाट वहिवाट असावी धोपटमार्गा सोडू नको!

चतुरंग

चित्रा's picture

8 Feb 2009 - 11:37 pm | चित्रा

कार्तिकी आज नक्की अधिक चांगले गायली. खरे तर प्रथमेश मला अधिक आवडत असे, पहिल्यापासून. पण आज आजचे तिचे गाणे खूपच दमदार झाले असे वाटले.

नीधप's picture

9 Feb 2009 - 6:35 am | नीधप

मी नेहमी बघत नव्हते हा कार्यक्रम त्यामुळे आधीचे माहित नाही.
पण प्रथमेश लघाटे हा स्वरावर पकड असलेला मुलगा असला तरी त्याची शब्दफेक किंवा शब्द तोडण्याची पद्धत अजिबात आवडली नाही. शब्दांना महत्व नाही. महत्व केवळ स्वराला असा काहीसा कल दिसला त्याचा. नाही आवडलं.
रोहीत राउत चे हिंदी गाणे फर्मास झाले पण बाकी नॉट बॅड मधलीच
मुग्धा हिंदी गाताना काहीतरी घोळ झाला असे वाटले पण त्या पिल्लूला काहीही शोभून दिसतं.
आर्या ची स्वरांवरची पकड जबरदस्त आहे आणि आता ती मोठी व्हायला लागलेय त्यामुळे शब्दांच्यामागच्या भावनांनाही स्पर्श करते ती. ती छानच वाटली. आवाज गोडच आहे.
कार्तिकी चं शेवटचं गाणं फर्मासच म्हणायला हवं. पण दमदम मस्त कलंदर म्हणताना मात्र ओरडल्यासारखी म्हणत होती.
पण तिच्या आवाजाची जात वेगळी वाटली. आवडली.

आर्या यायला हवी होती असं वाटलं पण कदाचित असं असेल की आर्याची आईच तिची गुरू आहे, घरातच तिला ज्ञान मिळतंय आणि आर्या विजेती ठरली असती तरी तिला पुढच्या प्रवासासाठी फार काही मोठा फरक पडला असता असं नाही.
त्याउलट कार्तिकीला विजेती ठरल्याने मिळू शकणारा बूस्ट हा जास्त मोलाचा आणि कार्तिकी साठी उपयोगाचा आहे. त्यामुळे हे ठरवलं गेलं असावं.

ही आपली एक शक्यता इतकंच.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

केशवराव's picture

9 Feb 2009 - 6:46 am | केशवराव

' आर्याची आईच तिची गुरु आहे. . . . .'
म्हणजे काय? हा कुठला निकष ? मग कार्तिकीचेही बाबाच तिचे गुरु आहेत. एकुण झी मराठी वाल्यांनी रसिक प्रेक्षकांची उचलून मारली.

नीधप's picture

9 Feb 2009 - 7:26 pm | नीधप

अहो चिडताय काय इतकं?
मला आधीचं काही माहीतही नाही. जेवढं कळलं त्यावर मला ही एक शक्यता वाटली.
आणि मला नक्की काय म्हणायचंय हे विचारातही न घेता चिडताय कशाला?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

माझी दुनिया's picture

9 Feb 2009 - 7:46 am | माझी दुनिया

कार्तिकी ला विजयी ठरवण्याविषयी मतमतांतरे आहेत. तशी ती नेहमीच असतात. मला स्वतःला सुद्धा आर्या आणि प्रथमेश असताना कार्तिकी जिंकेल अशी अपेक्षाच नव्हती. पण ती जिंकावी अशी खूप इच्छा मात्र होती. किमानपक्षी इतक्या दिग्गज ज्युरींच्या एकमताने तिला ज्युरींचं बक्षिस तरी मिळावं अशी आशा होती. पण सगळ्या ज्युरींनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोख पाडली आणि कार्तिकी जिंकली.
मी अगदी पहिल्या भागाच्या पहिल्या गाण्यापासून हा कार्यक्रम बघते आहे. आर्या आणि प्रथमेश पहिल्यापासूनच व्यवस्थित गातात. मुग्धाला बाहुली म्हणून लोकांनी डोक्यावर चढवले होते, पण शेवटी तिच्या वयाच्या मर्यादेने गाण्यांची मुग्धागीते व्हायला लागली. रोहीत मला कधीच या स्पर्धेत फायनलला पोचण्यापर्यंत सुरेल वाटला नाही. त्यामुळे खरी स्पर्धा आर्या, प्रथमेश आणि कार्तिकी यांच्यात होती. यू टयूब वर या कार्यक्रमाचे पहिल्यापासूनचे सगळे विडियोज उपलब्ध आहेत. स्वतः झी मराठीने या मुलांच्या एम्पी३ डाउनलोड करण्याकरता उपलब्ध केल्या आहेत. मध्यतंरी मी कार्तिकी च्या काही काही गाण्याची एम्पी३ डाऊनलोड करून ऐकल्या आणि काय सांगू डोळे अक्षरशः पाझरायला लागले. सच्चा सूर , सच्चा सूर काय म्हणतात तो तिचा आहे की नाही मला माहीत नाही. पण ती सगळी गाणी काळजापर्यंत भिडली. ती फार मोठी गायिका होईल की नाही माहीत नाही पण श्रोत्यांच्या काळजाला हात घालण्याचं कसब तिच्याकडे आहे. बरं तिने गायलेली बहुतेक गाणी अप्रकशित होती, सांप्रदायिक होती. तरीही ही किमया तिने करून दाखविली. त्यामुळे तिचा विजय हा एक फ्लूक नव्हता.

आर्या विजेती ठरली असती तरी तिला पुढच्या प्रवासासाठी फार काही मोठा फरक पडला असता असं नाही.
त्याउलट कार्तिकीला विजेती ठरल्याने मिळू शकणारा बूस्ट हा जास्त मोलाचा आणि कार्तिकी साठी उपयोगाचा आहे.

१०१% सहमत.

____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

केदार's picture

9 Feb 2009 - 2:02 am | केदार

मला सर्वच आवडतात. कार्तिकीचे अभिनंदन. तिच्या ग्रामिण उच्चारांमूळे ती बहुतेक शहरी लोकांना आवडायची नाही. आर्या, प्रथमेश, रोहित किंवा मुग्धा जिंकली असती तरी मला आनंदच झाला असता.

प्राजु's picture

9 Feb 2009 - 4:36 am | प्राजु

बाकी सर्वांना शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मराठी_माणूस's picture

9 Feb 2009 - 6:54 am | मराठी_माणूस

कर्तीकिचे अभिनंदन.
बर्‍याच मान्यवर परिक्षकांनी कार्तिकीमधे काहीतरी वेगळे आणि ओरिजनल आहे हे सांगीतले होती त्या मुळे झी चा काही हात आहे हे म्हणणे पुर्ण पटत नाही.

मैत्र's picture

9 Feb 2009 - 8:38 am | मैत्र

कार्तिकी चांगली गातेच त्याबद्दल शंका नाही. आणि हे वेगळं भूत आहे अनेक मोठ्या परीक्षकांनी सांगितलं आहे.
पण त्याच सर्वांनी प्रथमेश बद्दल काढलेले उदगार खूप मोठे आहेत.
हृदयनाथांनी त्यांची महत्त्वाची गाणी ज्या प्रकारे आर्याकडून गाऊन घेतली किंवा प्रथमेश बद्दल त्यांनी, सुरेश वाडकर, आशा खाडिलकर, संजीव अभ्यंकर (कालच सूरत पियाकी झाल्यावर) जे काही सांगितलं आहे त्याचा विचार करता कार्तिकी ला त्याच्या पुढे नेणं आश्चर्य कारक वाटतं.
कार्तिकीचं नाव सांगितल्यावर प्रेक्षकात असलेल्या नामवंत लोकांच्या चेहर्‍यावरचं आश्चर्य लपत नव्हतं.

भाग्यश्री's picture

9 Feb 2009 - 7:20 am | भाग्यश्री

कार्तिकी मला नेहेमीच आवडते. उच्चार अशुद्ध असुनही! कारण ते सुधारायला ती मेहनत घेताना दिसते. आणि तिचं गाणं तर मला खूप आवडायचं! पर्फॉर्मन्स मधे रोहीत आणि गाण्याच्या बाबतीत आर्या/प्रथमेशच्या तोडीने गायची..
विशेष कौतुक म्हणजे, ज्युनिअर गटातून येऊन सगळ्या मोठ्यांना हरवलं ते !

तिला नक्कीच मोठी संधी दिली झी ने असे माझे मत आहे.

http://bhagyashreee.blogspot.com/

बाकरवडी's picture

9 Feb 2009 - 7:36 am | बाकरवडी

कार्तिकिचे अभिनंदन.
:)

मी SMS केलेच नाहीत, त्यामुळे कोणी का जिंकेना आम्हाला सुख- दु:ख सारखच !

छान गाणी ऐकायला मिळाली ना बास !

--अस्सल पुणेकर
बाकरवडी :)

वल्लरी's picture

9 Feb 2009 - 8:17 am | वल्लरी

कार्तिकीचे आणि सर्वच लिटील चॅम्सचे अभिनंदन.... :)
मला आर्या किंवा प्रथमेश जिंकेल असे वाटत होते पण असो..सगळेच छान गातात.....

---वल्लरी

मैत्र's picture

9 Feb 2009 - 8:33 am | मैत्र

अगदी हेच मनात होतं.
कार्तिकी गुणी आहेच आणि त्यामुळेच ती इथपर्यंत पोचली आहे आणि अनेक गाणी तिने चांगली म्हटली आहेत.
पण आर्या व प्रथमेश असताना ती जिंकणं हे पूर्णतः अनाकलनीय आहे.
सूर या दृष्टीने प्रथमेश हा सर्वोत्कृष्ट आहे. आणि सूर, आवाज आणि विविधता यामुळे आर्या खूपच पुढे आहे.
कार्तिकीचे उच्चार हा तिला मागे टाकणारा मुद्दा नाही तर आर्याची तयारी आणि अतिशय नेमकं समतोल गाणं हा आर्याला पुढे आणणारा आधार आहे. जर ती इतकी ग्रेट असती तर बाहेर पडून कॉलबॅक मध्ये परत का यावं लागावं?
ती चांगलीच गाते आणि कालही ती दमादम मस्त कलंदर जबरदस्त गायली. पण यात प्रथमेश किंवा आर्यावर अन्याय झाला असं वाटतं. शेवटी असं म्हणावं लागलं की हे तिघे असताना गोड बाहुली मुग्धा किंवा फक्त जोरकस फेक असलेला आणि अनेकदा सुराशी फारकत घेणारा रोहित एस एम एस च्या जोरावर जिंकले नाहीत हे आपलं नशीब.
पण इतका उत्तम कार्यक्रम होऊन असा शेवट करून झी आणि पल्लवी जोशीने खूपच निराशा केली.

हे म्हणजे अटी तटीची मॅच होऊन जेव्हा चांगली खेळणारी टीम जिंकणं अपेक्षित होतं तेव्हा डकवर्थ लुइस नियमाने दुसर्‍या टीमला विजयी घोषित करण्यात आलं. (डकवर्थ लुइस नियमाची मोजणी आजवर कधीही समजली किंवा पटली नाहीये. लारा प्रभृतींनी त्यावर बरीच टीका केली आहे पण अजून तरी काही बदल झालेला नाही.)

आपला अभिजित's picture

9 Feb 2009 - 1:38 pm | आपला अभिजित

मैत्र,
दोघींनी एकच गाणं गायलं असेल तर वैशालीचा नैसर्गिक गोड आवाज, माधुर्य आणि खरा नम्रपणा या गोष्टी सायलीहून तिला पुढे नेणार्‍या होत्या.
मी ती स्पर्धा पूर्ण पाहिली नाही.
पण एक स्वैर अंदाज म्हणून सायलीची अलका याज्ञिकशी आणि वैशालीची कविता क्रुष्णमूर्तीशी तुलना करता येइल??

रामोजी,
आपल्या मनाप्रमाणे निकाल लागला नाही कि आश्चर्य वाटणारच. रियालिटी शो मधे गुणवत्ते चा विजय होतोच असे नाही.

हे बरीक खरे हो!

सर्वसाक्षी,
ज्या पद्धतिने अंतिम फेरी आधीच गारद झालेल्या कार्तिकीला परत आत आणली गेली आणि ज्या पद्धतिने तिला पुढे पुढे केले जात होते त्यावरुन तिलाच विजेतेपद बहाल केले जाणार हे अगदी स्पष्ट दिसुन आले होते.

अगदी बरोबर.
अभिजित कोसंबीच्या बाबतीतही त्यांनी हेच केलं होतं आणि मग सर्वांना समान न्याय, कुणावर अन्याय नको वगैरे आव आणला होता. भलते खोटारडे असतात हे च्यानेल वाले!

अविनाश कुलकर्णी,
निकाल कळायच्या आधि फुटला म्हणजे सेटिंग झाले होते..

निकाल वेळेवरच जाहीर झाला. कार्यक्रम मुंबईत खुल्या सभाग्रुहात होता. तो दहा वाजल्यानंतर चालविता येत नाही. टीव्हीवर `लाइव्ह' म्हणून जरी दाखवत असले, तरी तो अर्ध्या-एक तासाच्या फरकाने आपल्याला दिसत असतो. टीव्हीवरची प्रेक्षकांच्या प्रश्नांचा सहभाग असलेली लाइव्ह मुलाखतही १०/१५ मिनिटांच्या फरकाने आपल्याला दिसते. मुंबईत कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्यक्ष टीव्हीवर तो २ तासांनी संपला. जाहिराती व इतर अडथळ्यांमुळे. एवढाच फरक. निकाल फुटला बिटला नाही!

नी,
आर्या यायला हवी होती असं वाटलं पण कदाचित असं असेल की आर्याची आईच तिची गुरू आहे, घरातच तिला ज्ञान मिळतंय आणि आर्या विजेती ठरली असती तरी तिला पुढच्या प्रवासासाठी फार काही मोठा फरक पडला असता असं नाही.
त्याउलट कार्तिकीला विजेती ठरल्याने मिळू शकणारा बूस्ट हा जास्त मोलाचा आणि कार्तिकी साठी उपयोगाचा आहे. त्यामुळे हे ठरवलं गेलं असावं.
ही आपली एक शक्यता इतकंच.

अगदी योग्य. आळंदीची, साध्या घरातली, म्हणून तिला झुकतं माप मिळालं, असं वाटलं. निर्दयी संगीतबाजाराचा न्याय म्हणून ते योग्य असलं, तरी आर्या/प्रथमेश तिच्याहून उजवे असतील, (आहेत की नाही, ते मला कळत नाही!) तर तो त्यांच्यावर अन्यायच!

बाकी, एसएमएस बाबत आपले मायबाप प्रेक्षक किती काळ मूर्ख बनणार आहेत, कुणास ठाऊक! त्यांचा हिशेबही च्यानेवाले सांगत नाहीत, आणि तो मागायचाही कुणाला अधिकार नाही!! उलट, निर्लज्जपणे या निरागस पोरांनाही लोकांना भावनिक बिवनिक आवाहन करायला लावायला हे तयार!
स्पर्धा आधी संपते, विजेताही जाहीर होतो, तरीही टीव्हीवरून निवेदक किंवा स्पर्धक प्रेक्षकांना एसएमएस पाठवण्यासाठी आवाहन करीत राहतात, हा प्रकार तर सर्वात संतापजनक! अशा वेळी प्रेक्षकांच्या माहितीसाठी, `प्रत्यक्षात स्पर्धा संपली आहे. टीव्हीवरचा कार्यक्रम मात्र सुरू आहे. एसएमएसचे आवाहन केले जात असले, तरी पाठवू नयेत' अशी पट्टी खाली झळकाविता येणे शक्य आहे...
पण लक्षात कोण घेतो??

असो.

मैत्र's picture

9 Feb 2009 - 1:51 pm | मैत्र

मीही ते पर्व पूर्ण पाहिलं नाहीये. युट्युब वर दोघींची बरीच गाणी आहेत. वैशालीचा आवाज कविता कृष्णमूर्ती पेक्षा जास्त मधुर आहे. कविता अत्यंत अप्रतिम गाते पण जास्त सानुनासिक आणि किनरा (shrill) आवाज आहे. वैशालीचा बरोबर उलट आहे.
अगदी मोकळा आणि गोड आवाज आहे.

महेंद्र's picture

9 Feb 2009 - 2:07 pm | महेंद्र

मला एक कळत नाही, केवळ कार्तिकी ला जिंकवुन आणलं झी ने असा सुर दिसतोय बर्‍याच पोस्ट मधुन. तिने जिंकण्यात झी चा फायदा कोणता?

माझ्या मते जजेस जरा पार्शिअल दिसत होते. बर्‍याच वेळा रोहित ला बेस्ट पर्फॉरमर चं प्राइझ दिलं गेलं- जेंव्हा त्याचा परफॉरम् न्स अगदी सामान्य होता.

जे काही झालं ते जजेस च्या मुळे, जर १०० टक्के एस एम एस वर अवलंबुन राहिले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं!
महेंद्र

कार्तिकी ला विजयी ठरवण्याविषयी मतमतांतरे आहेत. तशी ती नेहमीच असतात. मला स्वतःला सुद्धा आर्या आणि प्रथमेश असताना कार्तिकी जिंकेल अशी अपेक्षाच नव्हती. पण ती जिंकावी अशी खूप इच्छा मात्र होती. किमानपक्षी इतक्या दिग्गज ज्युरींच्या एकमताने तिला ज्युरींचं बक्षिस तरी मिळावं अशी आशा होती. पण सगळ्या ज्युरींनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोख पाडली आणि कार्तिकी जिंकली........ब्राव्हो
मला वाट्ते कि लोकान्ना ती (कार्तिकी) न आवड्ण्याचे एक कारण म्हणजे तीचे दिसणे असू शकते..कारण इतरान्च्या तुलनेत ती क्युट दिसत नाही ..त्यामुळेच लोकान्ना ती काय आणि कसे गाते याकडे लक्श दिले नसेल...

केदार केसकर's picture

9 Feb 2009 - 4:55 pm | केदार केसकर

कोणीही जिंकाव बापडं. पण एक काल रात्री बघितलेली मजा सांगतो. रात्री साधारण १०:३० च्या सुमारास मी esakal वर गेलो होतो. असचं सहज. कारण खर सांगायच तर अशा शो मधे तथ्य खरच असत यावर माझा विश्वास नाही म्हणुन मी शो पहात नव्हतो. आणि शॉकींग म्हणजे १०:३० वाजता कार्तिकी जिंकली अशी न्यूज दिसत होती esakal वर. मी चट्कन टी.वी लावून पाहीला तर त्यानंतर ३० ते ४० मिनिटांनी कार्यक्रम संपला.

कुठेतरी काहीतरी गोची आहे हे नक्की. पुन्हा ८-९ वर्षांची मुलं इतकं उत्तम बोलु शकतात हे सुद्धा अविश्वसनीय. प्रश्न ठरलेले आणि उत्तरं सुद्धा! आता राहीला गाण्याचा मुद्दा. सगळी मुले खूप जास्त talented आहेत हे निर्विवाद.

(पण शो इतका deferred live दाखवत असतील यावर विश्वास न बसलेला) केदार

आपला अभिजित's picture

9 Feb 2009 - 7:08 pm | आपला अभिजित

अरे दादा, वर एवढी सविस्तर प्रतिक्रिया लिहिलेय, तरीही तुझं तेच पुन्हा!!!

हे कार्यक्रम डिफर्ड लाइव्हच होतात...!!! टीव्हीवर मधे मधे जाहिराती दाखवतात, त्या वेळेत तिथे प्रत्यक्ष स्टेजवर काय करावं असं मत आहे तुमचं??

झी चा दोन वर्षांपूर्वी झालेला एक हिंदी सारेगमप अंतिम फेरीचा कार्यक्रम पाहिला होता प्रत्यक्ष. तिथेही १० ला निकाल लागूनही १२ पर्यंत टीव्हीवर एसएमएस पाठवण्याचं आवाहन सुरू होतं. आता बोला!!

केदार केसकर's picture

10 Feb 2009 - 12:26 pm | केदार केसकर

मग मात्र हे मजेशीरच आहे. मी सुद्धा स्वतः टीवी कार्यक्रमांमधे participate kelel aahe अभिजित. पण आपण सारेगमप सारख्या कार्यक्रमांना reality show म्हणतो ना. यात भले काही नसलं तरी reality हवीच. चल तु जे म्हणतोयस deffered live बद्दल ते पटलं. पण माझे बाकीचे प्रश्न खोटे कसे ठरतील. जाउ दे. आपल्या सगळ्यांना खोट्या गोष्टींची इतकी सवय झाली आहे की सगळ खरं वाटत.

TRP साठी खोट्याच खरं आणि खर्‍याचं खोट करतात यावर १००% विश्वास असलेला (केदार)

नम्रता राणे's picture

9 Feb 2009 - 5:08 pm | नम्रता राणे

अनपेक्षीत निकाल! तरीही कार्तिकीचे अभिनंदन!!!!
आर्या किंवा प्रथमेशच..
अगदी अवधुत व वैशालीचेही चेहरे या अनपेक्षीत निकालाने वेगळेच वाटले..
असो.. आर्या, प्रथमेश बाळांनो ऑल द बेस्ट रे....

विनायक पाचलग's picture

9 Feb 2009 - 7:57 pm | विनायक पाचलग

बाकी काहिही असो आम्हाला कर्तिकी चे वइजयी होणे पटलेले नाही
याला कारणे खुप आहेत जे वर उध्रुत केलेली आहेत
त्यामुळे पुन्हा सांगणे आयोग्य पण महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी निकाल सांगतानाचे वेगळेपण यावेळी निकाल सांगीतल्यावर ५ मिनिटात कार्यकम संपवला जे कधी गह्डत नाही
याशिवाय कोणत्याही ज्युरीने आपले मत व्यक्त केलेले नाही
अवधुत आणि वैशाली आनंदी वाटत नव्हते या सर्वामुळे शंका गडद होते
आणि हो कार्तिकीला फायदा होइल म्हणाल तर कार्यक्रमाचा मुळ उद्देश जरी तो असला तरे स्पर्धेचा हा पहिला आणि लिखि वा अलिखित नियम असतो की सर्वओत्क्रुष्ट तो जिंकावा ते इथे धुळीला निळाले.
आणी हो आज लोकमतात असे आले आहे की शेवटच्या तीन तासात १५ लाख मते आली आणि आज नितिन वैद्यानी एकुण मते जाहीर करण्यास नकार दीलेला आहे याला काय म्हणायचे
आणी हो जसा या स्पर्धा जिंकण्याचा आर्या वर परिणाम होणार नाही तसा तिच्यावर पण होणार नाही कराण अगोदरच ती प्रसिद्ध झाली होती व तिचे वडील देखील तिच्या पाठीशी आहेत आणि हो उचाराबाबत म्हणाल तर ग्रामीण ग्रामीन म्हणुन खपवुन घेवु हो पण जेव्हा एखाद्या शास्त्रीय गाण्यात येतात तेव्हा ते मान्य करता येत नाहीत
प्रथमेश -५१ नी
आर्या-सर्वात जास्त गुण
कार्तिकी-कॉलबॅकमध्ये परत तेही तीन मुली न आल्याने
बाकी तिच्यात जे चांङले गुण आहेत ते वढत जावोत याच सदीछा
अभीजीत्ला १०० १०० एस एम एस करणारा मी यावेळी स्वतःवर नियंत्रण ठेवुन कही एस एम एस केला नाही ते खुप चांगले झाले
आणि हो सध्या मिपाची अनेक माध्यमे दखल घेतात तेव्हा कोणताहीवाद तयार न करता आपणाला एक सांगायच एआहे की तुम्हा सर्वांचा मायबाप हा प्रेक्षक आहे
तेव्हा त्याना किमत देत जावा आणी महत्वाची गोष्ट जनता ज्याला डोक्याअर घेते त्याला क्ष्णात खालीदेखील फेकते
आणि सारे गमप ने आम्हाला खुप चांङले कर्यक्रम आणि आनंद दीला यात वाद नाही पण त्यानी अन्याय्ही खुप वेळा केला अगदी शमिका बाहेर पडन्यापासुन आणि शाल्मली बाहेर पडल्यानंतर ते कालपर्यंत आता काय होइल त्या सा रे ग म प चे ते देव जाणे
कदाचीत असा काही अनपेक्षित निकाल लागणार हे माहित असेल म्हणुनच या सार्‍यांची विविध ठिकाणी प्रसिद्धी करुन त्यांच्या पंचप्राण पणाला अधीक मोठेपण दीलेले असावे असे वाटत आहे
याशिवाय सोलापुर मधील एका व्रुत्तपत्रात रोहित बद्दल बातमी आली असताना आत्तपर्यंत त्याला जास्त मते आहेत असा उल्लेख आहे तोकोणत्या अर्थाने का या अंतीम फेरीतील मत संख्या बाहे र समजत होती या सर्व आणि अशा अनेक ज्ञात अज्ञात प्रश्नांची उत्तरे मला एक सामान्य नागरीक म्हणुन हवी आहेत यात कोणावरही व्यक्तीगत राग वा लोभ नाही
बाकी रसिक सुज्ञ आहेत च
आपला
(येथुन पुढे ते सा रे ग म प बघायचे आहे का नाही ते ठरवताना गोंधळात पडलेला एक सच्चा गानप्रेमी)विनायक
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

येडा खवीस's picture

10 Feb 2009 - 6:45 pm | येडा खवीस

माझ्यामते ह्या स्पर्धा केवळ खेड्यापाड्यातही बरेच टेलेंट आहे हे दाखविण्यासाठीच भरवल्या जातात असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांना मुख्य प्रवाहात घेण्यासाठी राजकिय पक्षांप्रमाणे करण्यात येणार्या चाळ्यांसारखा हा प्रकार आहे. पण बाय द वे कार्तिकीचे अभिनंदन, तिच्या आनंदावर विरजण नको!!!

पण अर्थातच निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित आहे

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com