मनाच्या कुपितले-निरोप

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
4 Feb 2009 - 9:23 pm

नमस्कार
मनाच्या कुपितले या सदरातला हा सहावा लेख
मनातले थोडेसे-माझ्या गेल्या लेखावर त्यातील लिखाण शैलीवर खुप साधक बाधक चर्चा झाली .या चर्चीतुन मी स्वतःला सुधारीन असे नकी सांगतो.यातुन एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे माझ्या लेखनाचे दोन प्रकार पडतात एक स्वतःसाठी केलेले आणि दुसरे जे लोकाना वाचायला आवडेल असे ! यापुढे मी लोकाना आवडेल असे लिखाण द्यायचा नकी प्रयत्न करीन पण आतापुरत्ये मला माफ करा हे लिखाण मी" स्वान्त सुखाय |" लिहिले आहे . काल परवा मला माझ्या एका दहावीच्या मित्राचा फोन आला होता त्यावेळी त्याने सांगीतले की आज आमचा निरोप समारंभ आहे (सेंड ऑफ्)आणि त्याचवेळी मला मागचे वर्ष आठवले यावेळी त्यादीवशी मी देखील एक भाशण केले होते मग का कुणास ठावुक मी आपोआप त्या भाषणाचे टिपण शोधु लागलो मला ते सापडले आणि मग मी त्यावेळी कसे भाषण केले होते ते आठवत आठवत ते पुन्हा लिहिले ते म्हणजे तुम्ही वाचाल तो लेख .साहजीकच तुम्हाला हे अतिक्रुत्रीम वाटेल वाटलेच पाहिजे तेव्हा हे लिखाण तुम्ही वाचायचे का नाही ते आत्तच ठरवा यातील कविता सोडल्यास बाकी लिखाण माझे असुन कविता ही माझे आवडते नाटक वाहतो ही दुर्वांची जुडी या नातकातेल ओळींचे बदल करुन तयार करण्यात आलेले आहे.आणि हे द्यायचे कारन एकच माझ्या मनाचे समाधान बाकी तुमच्या हाती..........

शाळेचा निरोप घेताना

Our ways may change but not our hearts, Our life may lend us apart but our memories will link us together.

हीच विचारधारा मनात रूजवत, सर्व गुरूजनांना सादर प्रणाम करून, विनायक पाचलग नामक. प्रायव्हेट हायस्कूल या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप देण्यास उभा आहे. आता इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे. प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्र, जुन्या स्मृतींना जागे करण्यात गुंग झालेली आहेत. खरंच ! किती अविस्मरणीय होता हा प्रवास ! याच मूर्ती शाळेत पाचव्या इयत्तेत माझ्यासारख्या मातीच्या गोळयाचे आगमन झाले. या मातीच्या गोळयाला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी ! सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी ! पाचवीपासून जशी माझी शारिरीक उंची वाढली तशी मानसिक उंचीही वाढली. माझ्या गुरूजनांनी फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही तर, जगात कसे वागायचे, कसे जगायचे हे देखील शिकवले. अवघ्या सहा वर्षात या सुरवंटांचे रूपांतर फुलपाखरात झाले.

सुरवंटांचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू.
नवे जग, नव आशा, शोध घेण्याची जबर मनिषा ।
याच शाळेने लावले वळण, त्यांवर चढू यशाची चढण ॥

हे वळण लावण्यासाठी, गुरूजनांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे, ममतेचे धडे गिरविले. आणि आज ती पाटी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज ! म्हणूनच, आमच्या जीवनाचा कटीपतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यांवर सद्विचारांचे घाव घातले. आणि त्या दगडाला ज्याच्या, त्याच्या गुणवैशिष्टयाप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरणच द्यायचं झालं तर नटराजाच्या मुर्तीलाही आकार मिळाला. शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही, तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडूही निर्माण केले.
माझ्या मनात आज रूंजी घालत आहेत ती शाळेतील व्याख्याने, नाटयवाचने, एकांकिका बसवणे, प्रदर्शनाचे तक्ते, वक्तृत्व स्पर्धा ते सत्कार. इतकेच काय, माझ्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणारे माझे गुरूजन. ते जिंकणे .............. ते हरणे ........ ! व्यक्तीमत्वाला पैलू पडले ते इथेच. कांहीच घडण ..... कांहीच बिघडणं .......... सारंच निरूपद्रवी आणि सर्वांत शेवटी तथास्तु म्हणून दिलेला आदर्श विद्यार्थीरूपी आशिर्वाद !

शिक्षक दिनी मुख्याध्यापक होताना अवघ्या 3-31/2 तासात शिक्षकांचे कष्ट, त्यांचे प्रयत्न लक्षात आले आणि म्हणूनच ठरवलं की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची ही संधी ! नव्या क्षितिजांना साद घालताना जुन्या क्षितीजांना अभिवादन करणे, त्यांचे आशिर्वाद घेणे हीच आपली संस्कृती. म्हणूनच, या संस्कृतीचा पाईक असणारी मी ही काटयांप्रमाणे बोचणारी स्मृतीची फुले मनात साठवत शालेय विद्यार्थी म्हणून या स्टेजवरचे शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतश: अभिवादन करतो आणि स्पष्ट करतो कीं, या मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम माणुसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचा, सत्कार्याचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लीत करेल. या शाळेतून माझ्या व्यक्तीमत्वाचं, छोटया कुंडीतून मोठया जमिनीत लावण्यासाइी आणि म्हणूनच शेवटाला एवढेच म्हणेन,

बालपणीचे दिवस सुखाचे,
आठवती घडी घडी
आठवणींना आठवणींची,
वाहतो ही शब्दसुमनांची जुडी.
बालपणीचे सखे सोबती,
आठवणींना अजुन झोंबती.
कांही गुरूजन कांही सवंगडी,
या सर्वांनी विविध गुणांनी
जशी घडवली तशीच घडली,
आयुष्याची घडी.
आणि म्हणूनच,
वाहिली ही शब्दसुमनांची जुडी.
धन्यवाद !

अवांतर- बाकी म्हणले त्याप्रमाणे सा रे गम पावर टिका चालु झाली आहेच त्याचा उहापोह मी उद्या घेइन सध्या माझ्याकडे मटा सोडुन इतर पेपरमधील पत्रे मिळाली आहेत मटा मिळाले के लिहिन (वाचण्याची इच्छा नसल्यास खरडवहीतुन कळवावे विचार केला जाइल.)
अतिअवांतर्-आम्ही काय २४ तास लोकमत चॅनेल पाहत नाही वा त्याचे असे फॅन नाही जो साधक बाधक बुद्धी विसरेल मला सध्या आजचा सवाल आव॑डत नाही त्याविशयी त्यांच्या ब्लॉग्वर लिहायचा प्रयत्न करत आहे बघु काय होते ते.
आपला
विनायक

संस्कृतीवाङ्मयशिक्षणशुभेच्छा

प्रतिक्रिया

धनंजय's picture

4 Feb 2009 - 9:51 pm | धनंजय

स्वान्तसुखाय लिहिणे हासुद्धा उत्तम हेतू आहे.

तुमच्या शाळेनंतरचा प्रवास यशस्वी होवो.

एखादा तयारीचा गवई स्वान्तसुखायच रियाझ करतो, तरी आजूबाजूचे तल्लीन होतात. नवशिक्याचा स्वान्तसुखाय रियाझ ऐकून मात्र कधीकधी शेजारीपाजारी निष्ठुरपणे बोलतात. मग हळूहळू मागच्या वर्षी सुख देत होते, ते या वर्षी नवशिक्यालाच बेसुर वाटू लागते. कारण तोवर त्याच्या स्वान्तसुखाचा दर्जा, आणि गाणेही सुधारले असते. हा बदल चिवटपणे रियाझ केल्यामुळेच.

लिहिण्याचा सराव होईल, तसा स्वान्ताला सुख देईल त्याचा दर्जा उंचावत जाईल. तसे तुमचे लेखन बदलेल, किंवा तुमच्यासारखीच अभिरुची असलेले वाचक तुम्हाला भेटतील. मग तुम्हाला स्वतःला वाटणारे सुख बाकीच्यांतही वाटले जाईल. लेखनाचा सराव करण्याची ही तुमची धमक अशीच राहो, अशा शुभेच्छा.