टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
२१...२०...१९.......???
प्रेषक नाना चेंगट ( शुक्र, ०१/१८/२००८ - १६:०५) .
२१००० ला स्पर्श करुन कोसळण्यास सुरवात झालेला सेन्सेक्स १९००० च्या खाली जावुन पोहोचला.
अमेरीकी डावु जोन्स सुद्धा त्याच मार्गाने जात आहे.
अमेरीकन अर्थव्यवस्था रुळावर यावी म्हणुन बुश महाशय वैयक्तिक करात सुट वगैरे गोष्टी करत आहेत वाचा इथे
पेट्रोल, डिझेल, केरोसिन, एलपीजी च्या भाववाढीचे संकेत मिळत आहेत
सर्व्हिस टैक्स मधे होवु घातलेली वाढ... वाचा
का हो मंडळी, ती कोण काय तिचे नाव ... हां.. मंदी ..बरोब्बर मंदी.
मंदी येतीय की काय मार्केटात..?
(मंदीला जाम घाबरणारा) नाना
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

नाना
अरे कशाला घाबरवतो आम्हाला.... ?
--
(डिमॅट पण नसणारा)ध्रुव
अरे कशाला
अरे कशाला घाबरवतो आम्हाला.... ?
तुम्ही आम्ही सांगितले म्हणुन घाबरणार .....?
खरेच वाटेल कुणालाही:)
नाना
चढ-उतार!
हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तेव्हा शेयर बाजार ही त्याला अपवाद कसा असेल. आशा-निराशेचा हा खेळ असाच अनादि काळापासून सुरु आहे आणि तो अनंत काळापर्यंत सुरु राहणार आहे.
तेव्हा लगे रहो नानाभाय! डरना मना है!
लगे रहो
लगे रहो नानाभाय! डरना मना है!
अपन बिल्कुल डरता नही
साला दोन दिवसात शोर्ट करुन लय नोटा मोजल्या
(तेजीत लोन्ग तर मंदीत शोर्ट) नाना
पॉवर
रिलायंस पॉवर ६३ X over subscribe झाला असे नेटवर वाचले.
लोक स्वतःकडचे समभाग विकून पॉवर मधे गुंतवत असावेत,
जेणेकरून बाजार खाली उतरायला हातभारच लागतो आहे,
या शंकेस दुजोराच मिळाला आहे.
अनिल ने
अनिल ने डिलेफ च्या आयपीओ ला केले तेच आत्ता उलट होत आहे
चेक बाउन्स आयपीओ लिस्टींग अपेक्षेपेक्षा क्मी किम्तीत
चालाय्चेच
नाना
मंडळी ,
जरा आमाला बी समजेलसे बोला की राव. रिलायन्स पॉवर चा भाव आय पी ओ प्राईस पेक्षा कमी होणार का काय ??
जरा आमाला
जरा आमाला बी समजेलसे बोला की राव
भौ सगळ्याच गोसटी अशा समजु लाग्लया तर जिन लय अवगढ हुइल पघ
नाय आल लक्शात
सांगतो
अता ये पघ
त्या अमेरिकयत एपल नावाची यक कपनी हाय ... माहित हाञ नव तुमला.. हा तर त्या कपनीने टरविले नविन काञ तरी बाजारात आनायच
तर त्यो टीव का सटीव जोब जवा ते की नोट का कायस सागणार तवाच सिटी ग्रुपन १८ बिलियन रायट ओफ केले
आता हे येका टायमला कस जमवले (बिल्लुचा फौन गेला पंडितास)
अन बघ एपलचा शो फ्लोप गेला
लोक म्हनले बाबा नको पैसे खर्चायला
कळल का नाञ लेका अजुन
का तासगावला जावुन येतो...
खरा डॉन (बाकीचे क्लॉन)
आज बाजार कोसळला.
१८००० च्या खाली घसरला.
आता इथून पुढे काय? मोठे प्रश्नचिन्ह???????????????????????????
ये तो होना
ये तो होना हि था..................
अजुन किती
अजुन किती खाली जाणार?
अजुन किती?
पक्याभाऊ,
क्रुपया सेन्सेक्स पहाण्या ऐवजी, निफ्टिचा पी/ई पहा.
www.nseindia.com - indices - statistics पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, हा पी/ई त्याच्या सामान्य पातळीपेक्षा फार वर होता.
त्यामुळे तो खाली येणार हे निश्चित होते. सट्टेबाजांनी त्याला फार काळ वर ऱोखुन ठेवला होता.
आज तो त्याच्या सामान्य कक्षेच्या वरच्या टोकास आहे. निर्देशांकापेक्षा हा पी/ई आपल्याला जास्त वास्तविक चित्र दाखवतो.
वरिल संकेतस्थळावर ऐतिहासिक पी/ई पाहिल्यास कळेल कि १४ ते २२ ही निफ्टि पी/ई ची सशक्त कक्षा (Healthy Range) आहे.
आज पी/ई २२.३४ वर बंद झाला.
(वरिल संकेतस्थळावर ०१.०१.१९९९ पासुनची आकडेवारी उपलब्ध आहे - क्रुपया त्याचा आलेख काढा म्हणजे चित्र ज्यास्त स्पष्ट होईल).
हा पी/ई त्याच्या योग्य पातळिवर येई पर्यंत निर्देशांक खाली येऊ शकतो. अर्थात, कोणीही त्याचे भाकित करु शकत नाही.
जगातील यशस्वी व्यक्ती, आपात्तीतही मार्ग काढतात, कारण सुगीच्या काळात, ते दुष्काळाची तयारि करीत असतात.
बाजाराचा चढ-उतार, हे नित्याचेच ऊन पावसाचे खेळ आहेत. बाजार उच्चिचा होता तेव्हा ज्यानी नियोजन केले त्यांना बाजार १४००० वर गेला तरी चिंता करण्याचे कारण नाही.
संजय अभ्यंकर
साफ आपटला.
मुंबई शेयर बाजार साफ आपटला. सुचकांक १५५७६ वर बंद झालाय. सद्या बाजार तात्पुरता बंद ठेवलाय.कालच्यापेक्षा २०२९ ने खाली आलाय.
आता ह्यापुढे काय वाढून ठेवलेय???????????
काहीच कळत नाही
जाणकार आणि अनुभवी व्यक्ती काही सांगु शकतील का??
जर मागच्या दोन आठवड्याचा विचार केला तर २१००० वरुन १५००० म्हणजे जरा जास्तच आहे .
ह्या मागची कारण काय????
सर्किट ब्रेकर
गाडी घरंगाळायला लागल्यावं ते ब्रेक दाबत्यात. मंग ते सुझलॊन यवढ कस आपाटल? १०%पेक्षा जास्त चढ / उतार झाल्याव ब्रेक दाबला न्हाई व्हय. काय भानगड कळना. जानकार म्हंत्यात खरेदीची संधि.
प्रकाश घाटपांडे
१:५
तो स्प्लिट झाला आहे. १० रुपये फेस वॅल्युचा १ शेअर २ रु च्या ५ शेअर मध्ये. म्हणून २००० चा साधारण ४०० आला. बाकी काही नाही.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
काहीच कळत नाही
जानकार लोक अजुन माहिति देतिल काय
ये तो एक ना एक दिन होनाही था! :)
आम्हाला यात काही विशेष वाटलं नाही, ये तो एक ना एक दिन होनाही था!
मार्केट आवाच्यासव्वा वाढलं होतं ते एक ना एक दिवस असंच आपटणार होतं ते आपटलं! आता दाबून माल घ्या, बरेचसे समभाग आता चांगले खरेदीच्या भावाला आले आहेत..
आम्ही बाजाराने जेव्हा १६००० चा टप्पा ओलांडला तेव्हापासूनच चुपचाप मूग गिळून शांतपणे एका कोपर्यात हातात पैशे धरून बसलो होतो आणि १६००० ते २१००० हा तमाशा चुपचाप बघत होतो. आमचे बरेचसे मित्र, ओळखीचे लोक आम्हाला, 'तात्या, ह्याच्यात अमूक कमवले, त्याच्यात तमूक कमवले, काय तुम्ही असे गप्प बसून आहात?' अश्या हुशार्या आमच्याशी करत होते. आम्ही तेव्हा त्यांना इतकेच म्हणालो होतो की, 'बाबांनो, तुम्हीच कमवा. आमची अक्कल काम करत नाही!'
असो, हीच सगळी मंडळी गेल्या दोन दिवसात अक्षरश: उठली आहेत, रस्त्यावर यायची बाकी आहेत, याचे मात्र मनापासून वाईट वाटते!
असो...
आपला,
(अनुभवी) तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
आम्ही
आम्ही बाजाराने जेव्हा १६००० चा टप्पा ओलांडला तेव्हापासूनच चुपचाप मूग गिळून शांतपणे एका कोपर्यात हातात पैशे धरून बसलो होतो आणि १६००० ते २१००० हा तमाशा चुपचाप बघत होतो. आमचे बरेचसे मित्र, ओळखीचे लोक आम्हाला, 'तात्या, ह्याच्यात अमूक कमवले, त्याच्यात तमूक कमवले, काय तुम्ही असे गप्प बसून आहात?' अश्या हुशार्या आमच्याशी करत होते. आम्ही तेव्हा त्यांना इतकेच म्हणालो होतो की, 'बाबांनो, तुम्हीच कमवा. आमची अक्कल काम करत नाही!'
खरय तात्या
आम्ही आपले शोर्ट करत पै पै कमवित होतो, पण खरेदी नाही
आता बघु आज रात्री डाव काय करतो त्यावर कळेल उद्याचा थोडा अंदाज....
सगळी मंडळी गेल्या दोन दिवसात अक्षरश: उठली आहेत, रस्त्यावर यायची बाकी आहेत, याचे मात्र मनापासून वाईट वाटते!
खरय तात्या
मोहाने पार भले भले झोपले कायमचे
नाना
डाव जोन्स
डाव जोन्स फ्युचर सध्या ५०० ने खाली आहे
ओपनिंग ला यु एस झोपणार.....
http://biz.yahoo.com/ap/080122/wall_street.html
डाव जोन्स
न्हायी, यु. एस. झोपला न्हायी!
बरनाकीने ०.७५ रेट कट केली, राव!
आता पुढल्या मीटिंगला आणखी ०.५० करनार आशी अफवा हाये!
आमी एक केलं राव! इंटेल भरून घेतला!
आपला (मार्केटप्रेमी) पिवळा डांबिस
शेअर मार्केट आणि विनिमय दर
भारतातील शेअर मार्केट गडगडलं तसे प्रति डॉलर रुपयाचा दर वाढला! ३९ च्याही खाली आलेला हा दर आता ४० च्या दिशेने सरकत आहे!
आता कुणासाठी काय चांगलं आणि कुणासाठी काय वाईट आहे कसं ठरवायचं ?
(गोंधळलेला) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लंबी रेस का घोडा
बरेच दिवस स्टील अथॉरिटी (लंबी रेस का घोडा) वर लक्ष ठेवुन होतो, पण पठ्या वरवरच जात होता.
आज गावला. रु. १६८/- वर पकडला, पण घेइ पर्यंत रु. १७५/- ला पडला.
आज सर्वत्र समभाग दिसताहेत, पण पैशाचे सोंग आणता येत नाही (कॉस्मो फिल्म्स, विजया बँक, पुंज लॉईड, इ. शेअर ही शेअर, पर पैसा नही).
असो. उद्या परत धाड टाकू म्हणतो.
संजय अभ्यंकर
मंडळी
मंडळी कालच्या फेडच्या ०.७५ च्या रेट कट मुळे व शोर्ट कव्हरींग मुळे आज बाजार तेजाळला
परंतु युरोपीय बाजाराव मात्र याचा अनुकुल परिणाम न होता युरोपात कत्तल चालु आहे
अमेरीकी बाजार खालच्या पातळीवर उघडण्याचे संकेत आहेत
कदाचित उद्या पुन्हा बाजार खाली येवु शकतो
सावधानतेने व्यवहार करा
http://biz.yahoo.com/ap/080123/wall_street.html
मंदीच्या काळात ........
शेअरबाजारातील पैसा मालाच्या बाजारात येतो. सर्व जुनी येणी वसूल होतात. लोकांकडील पैसा लोक खरेदी करायला वापरतात. जास्त माल विकला जाऊन अर्थव्यवस्था सुधारते. सूज कमी होते. सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढते. हाहि एक फायदा आहे. असे माझे मागील 'हर्षद मेहता' तेजीनंतरच्या मंदीचे निरीक्षण आहे. मिपा वरील अर्थतज्ञांनी कृपया लिहावे.
आज बाजार
आज बाजार नरम आहे
याहु १००० लोकांना कमी करणार
नाना
बजार दियो..
बजार दियो!
बजारने तेजडियोकी धोत्ती खोली!
आपला,
(मारवाडी) तात्या.
टेक्निकल ऍनलिसिस
काल किरण जाधव 'प्रिसिजन टेक्निकल्स 'वाले यांचा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कोथ्रुड पुणे येथे जंगी कार्यक्रम होता. त्यांच्या मते परत तेजी येणार जरा दम धरा. अजुन दोन तीन महिने असेच सेन्स्सेक्स रेंगाळणार .१५००० च्या आसपास येउन परत २५+ क्रॉस होणार. यावेळि त्यांनी कुठलाही स्टॉक सुचित केला नाही. ते म्हणाले आम्ही २० ला स्टॉपलॉस लावला होता. त्यामुळे कमी नुकसान झाले.
प्रकाश घाटपांडे
आज बाजारातले ...
बैल जागे झाले वाटते..........
हे शॉर्ट कव्हरीन्ग आहे की प्री बजेट रॅलीची सुरुवात....
मार्केट २०० DMA ला जावून आले.
आता पुढे काय?
विद्याधर
चिंता वाढली..पर्यायी मार्गांचा शोध चालू.
मागच्या मंदीने तर वाट लावली हो अनेक लोकांची.....
आता आमचे काय होणार? आम्ही काहीही झाले तरी स्वदेशाला येणार असा पण करूनच आलो आहे. लोक म्हणतात "डावलरचा भाव नाही मिळणार चांगला, रहा तिकडेच." पण आम्ही आमच्या मताशी पक्केच. परत येणारच.
कदाचित तिकडे आल्यावर कंपनीने पार्श्वभागावर लत्ताप्रहार केला तर बाहेर पडून मिसळीची गाडी टाकू.
मंडळी मिसळ खायला येणार ना आमच्याकडे???
डॅनी मिसळवाले
पुण्याचे पेशवे
मंडळी मिसळ खायला येणार ना आमच्याकडे???
डॅनी मिसळवाले!
आपली सतत प्रगती व भरभराट होवो.
मग ती मिसळ पावच्या गाडी मुळे होवो अथवा आपल्या आवडीच्या इतर कुठल्याही व्यवसायाने होवो.
मात्र मिसळ पावची गाडी टाकल्यास कृपया त्याचा पता मि.प. वर द्यावा.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/