मुड

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
5 Jan 2009 - 7:21 pm

नमस्कार,
मुडी मिपाकर,
मस्त पैकी मुड मध्ये येऊन, मी "मुड" बद्दल लिहित आहे. :)

तर मुडी मिपाकरहो, या "मुड"चा महिमा अघाध आहे. जेव्हा पासुन आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणिव यायला लागते तेव्हा पासुन हा "मुड" आपल्या मध्ये शिरतो, तो आपला इहलोकी प्रवास संपल्यावरच तो जातो. :)

लहान बाळ कधी खुप छान हसुन बोलक्या डोळ्यांतुन आपल्याशी हु, हु करत असते. काही तरी बोलत असते, स्वत:च्या विश्वात हरवुन स्वारी खेळत असते. तर कधी आपण त्याच्या ओळखीचे असलो तरी आपल्याकडे काही न बोलता गप पहात बसते. आपल्या कडे फारसे लक्ष न देता स्वत:च्या विचारात गढुन गेल्या सारखा चेहरा करून बसते. उत्तर एकच बाळासाहेबांचा "मुड" दुसरे काय :)

आता "मुड" कसा बनतो आणी कसा बिघडु शकतो ह्याला काही ठराविक कारण नाही, कधी कधी सकाळी उठल्या पासुनच आपल्याला खुप प्रसन्न वाटते, आणि चेह-यावर आनंदाची छटा उमटते, आणी कधी कधी उगाच सकाळ पासुन दिवसच उदास वाटतो, काही करूच नये असे ही वाटते. :(

तर असा हा तुमचा- आमचा सर्वाचा "मुड" कळत नकळत बनणे आणि बिघडणे हे आपल्या स्वत:च्या हातात आहे का ? "मुड" म्हणजे काय तर मनाची एक अवस्था, ज्यावर आपले वागणे, बोलणे क्कचित अवलंबुन असते. तर हा मुड कधी आपल्याला अगदी जगातील आपणच सुखी जीव आहोत, तर कधी आपल्या एवढा दु:खी कोणीच नसेल असे वाटायला भाग पाडतो.

आपल्या नेहमीच्या संपर्कात येणा-या लोकांच्या वागण्या, बोलण्यावरही आपला मुड बनत किंवा बिघडत असतो असा माझा अंदाज आहे. कधी कधी खुप एकटे, उदास वाटत असताना जर आपल्या जिवा- भावाच्या मित्र मैत्रीणी बरोबर बोलणे झाले तर मनाला उभारी येऊन मुड अगदी छान होतो. तर कधी मंदिरात गेलो आणी नेमकी देवाची आरती सुरू असेल तर मनाला एक प्रकारचे समाधान मिळते, प्रवासात जर खिडकी शेजारची सीट मिळाली तरी स्वत:वरच खुश होतो, तर कधी ट्राफिक न लागता पटापट ग्रीन सिग्नल मिळाले तरी, तर कधी मुलाचे गोड गोड बोल ऐकल्यावर तर कधी टपो-या मोग-याचा फुलांचा गजरा दिसला तरी मनाला आनंद मिळतो, अशा बारिक सारिक वाटणा-या गोष्टी देखिल आपला मुड बनवितात.

नेहमी सकाळी कशीबशी अंघोळ करून, स्वत:ला शर्ट पॆन्ट मध्ये कोंबत, अग, माझा टिफिन तयार आहे का, अग माझा सेल फोन शोधायला मदत कर ना, अशा प्रश्नांची बायकोच्या कानाला सवय झाली असताना, जर ऒफिसला जायचे असताना देखिल सकाळी सकाळी नवरा मस्त पैकी स्वत:चे केस विंचरत, शीळ घालत असेल तर, बायकोच्या चेह-यावर अलगत स्मित हस्य उमटते आणि अरे वा, आज स्वारी खुश दिसत आहे, काही विशेष ? हा प्रश्न नव-याला विचारतेच . :)

उत्तरा देखत नव-या कडुनही एक प्रेमळ हास्य मिळाल्यास बायकोचा दिवसभराचा मुड बनुन जातो. :)

कधी घर ते ऒफीस असा प्रवास विनाअडथळा होतो, रिसेप्शनिस्ट ही मस्त पैकी स्माईल देते, आणि काम ही अगदी मनाप्रमाणे होत जाते,स्वारी स्वत:च स्वत:वर खुश होते, त्यात मित्र मंडळी भेटली मनसोक्त गप्पा झाल्या, आणि रात्री जेवताना ताटात आवडणारेच पदार्थ आले, दिवस कसा अगदी छान गेला असे वाटते. :)

तेच जर सकाळीच शुल्लक गोष्टीवरून वाद झाला किंवा, अगदी हवी असलेली वस्तु शोधण्यात वेळ गेला तरी बारिक सारीक गोष्टीवरून चिडचिड होते, मग ऒफिस मध्ये कामात पुर्णत: लक्ष न लागणे, स्वत:ची स्वत: वर चिडचिड असे अनेक गोष्टीची साखळीच तयार असते. कधी कधी तर एखाद्या व्यक्तीला पाहिले तरी किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलल्यावर देखिल मुड इतका खराब होतो की, त्या व्यक्तीशी बोलुन झाल्या नंतर जो/जी कोणी पहिला समोर येणार तीच्यावर थोडातरी राग निघतोच. राग काढलेल्या व्यक्ती कडुन ऐकुन घ्यावे लागते" स्वत:चा मुड खराब असेल तर निदान माझा तरी करू नको. "

असे म्हणतात की अति हुशार, संशोधक, कलाकार मंडळी खुप मुडी असतात, एकदा मुड लागला की एका झोक्यात एखादे काम हाता वेगळे केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, एखाद्या चित्रकाराने एकदा मुड लागल्यावर कुंचल्यात रंग भरत भरत दिवस - रात्र उभे राहुन मना सारखे चित्र तयार होई पर्यत ब्रश हाता वेगळा न करणे, तसेच संगितकार देखिल एका बैठकीत एखाद्या गाण्याला चाल लावुनच दम घेततात असे हे मुड छान लागला तर दिवस रात्रीची तमा न करता पुर्ण पणे त्या कामात झोकुन देतात.

मी तर म्हणेन की मुडी पणा सर्वांच्यात कमी जास्त प्रमाणात असतोच.

तर बास आता, माझा "मुड" वर लिहायचा एवढाच मुड असल्याने मी एवढेच लिहिले आहे, मुड संपला. ;)

जीवनमानमत

प्रतिक्रिया

गीत's picture

5 Jan 2009 - 7:29 pm | गीत

खुप छान लिहिले आहे.

संदीप चित्रे's picture

5 Jan 2009 - 7:33 pm | संदीप चित्रे

वेगळ्याच विषयावर लिहिल्याबद्दल अभिनंदन, शितल.
मूड' हा एक खरंच इन्टरेस्टींग प्रकार आहे.
एखादा दिवस असा येतो की सारं सारं व्यर्थ वाटू लागतं आणि.....
एखादा दिवस असतो की आजूबाजूचा सारा निसर्ग आपल्यासाठीच रंग उधळतोय इतका आनंद होतो :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

अविनाशकुलकर्णी's picture

5 Jan 2009 - 7:37 pm | अविनाशकुलकर्णी

मुड होता म्हणुन मुड वाचला..मुड होता म्हणुन आवडला...मुड आहे म्हणुन चांगल लिहिल असे म्हणतो..... मुड गेला तर...............गेला उडत

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Jan 2009 - 8:15 pm | ब्रिटिश टिंग्या

छान आहे!

- (मुडी) टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

प्राजु's picture

5 Jan 2009 - 8:25 pm | प्राजु

फक्त एक काम कर..
ते मुड असं न लिहिता 'मूड' असं लिही. हे मुड म्हणजे बाहे मुड दाए मुड... असं वाटतं आहे.
लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

6 Jan 2009 - 10:32 am | पिवळा डांबिस

खरं आहे....
प्राजुआजीशी सहमत आहे.....
लेख उत्तम, पण "मुड" मुळे आम्हांला मुडीची करंजी आठवली....

मुडीच्या करंजीच्या आठवणीने विव्हळ,
पिडां
(बाकी तात्या शुद्धलेखनाविषयी काहीही म्हणो, अशुद्धलेखनामुळे अर्थ बदलला तर दाताखाली साखरेच्या स्फटिकाऐवजी मिठाचा दाणा रगडल्यासारखे वाटते खरे!!!!)
राग नसावा....

सहज's picture

5 Jan 2009 - 8:34 pm | सहज

मूड , मुडदा, मुड्दूस, मुडी, मुडपणे

असा मुड पासुन सुरु होणारे शब्द पहायचा मूड :-)

विनायक प्रभू's picture

5 Jan 2009 - 8:38 pm | विनायक प्रभू

बाकी हुशारांचे माहित नाही. पण चित्रकाराबद्दल विधान पटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2009 - 8:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त मुडमधील मस्त लेखन ! :)

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 12:25 am | विसोबा खेचर

मस्त मुडमधील मस्त लेखन !

हेच बोल्तो..!

शाल्मली's picture

5 Jan 2009 - 9:01 pm | शाल्मली

शितल,
मस्त स्फुट. एकदम मूडात लिहिलय..
खरयं.. आपल्या दिवसभराच्या अनेक गोष्टी आपल्या मूडवरती अवलंबून असतात हे पटले.
--शाल्मली.

रेवती's picture

5 Jan 2009 - 9:03 pm | रेवती

लिहीले आहेस. मूडप्रमाणेच उतरले आहे.
मी मूडी आहे असं सगळेजण म्हणतात, पण मला हुषार मात्र कोणीच म्हणत नाहीत.:(

रेवती

भाग्यश्री's picture

5 Jan 2009 - 10:32 pm | भाग्यश्री

अग रेवती! माझा किबोर्ड आलाय का तुझ्याकडे !?!? अगदी माझ्याच तोंडातले.. सॉरी, हातातले वाक्य लिहीलेस तू!!
मीही प्रचंड मुडी आहे.. हुषार आहे असं मीच समजते.. :D

शीतल तू कधी कधी नाही, बर्‍याचदा असले भन्नाट विषयांवर लिहीतेस ना.. असं वाटतं, हे तर आपल्या पण डोक्यात होतं.. अर्थात इतकं लिहीता आलं नसतं आपल्याला...
मस्त लिहीलायस लेख..
अजुन येऊदे !

http://bhagyashreee.blogspot.com/

शंकरराव's picture

5 Jan 2009 - 9:20 pm | शंकरराव

मूड ला जवळ्चा मराठी शब्द 'लहर' असावा ?
लेख आवडला, शेवटी मूड फॅक्टर हा मनाशी संबंधित आहे, मन स्वछ असले तर सर्व कसे... ऑल्वेज इन गूड मूड

अवलिया's picture

5 Jan 2009 - 10:41 pm | अवलिया

लय भारी... एकदम मूडच बदलला :)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

अगदी नेहेमीच्या अनुभवातले. सकाळचा आपला मूड आपला दिवस कसा जाईल हे ठरवतो आणि सकाळ कशी असेल हे आदल्या रात्रीच्या मूडवर ठरते. असे हे रहाटगाडगे आहे.
तुमच्या आवडीच्या विषयात तुमचा मूड बदलण्याची शक्ती असते (म्हणजे तशी ती तुमची स्वतःचीच शक्ती असते फक्त आवडीच्या विषयात मन गुंतले की ती तुमच्या मनाचा ताबा घेते आणि मूड बनतो.)
(खुद के साथ बातां : मी मूडी आहे की नाही माहीत नाही पण मला बरं वाटावं म्हणून लोक मला हुषार म्हणतात! ;) )

चतुरंग

अनिल हटेला's picture

6 Jan 2009 - 8:03 am | अनिल हटेला

सकाळी -सकाळी मूडमध्ये येउन लेख वाचला...
आणी मस्त मूड बनून गेला...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

यशोधरा's picture

6 Jan 2009 - 9:48 am | यशोधरा

झकास जमलाय गं लेख शीतल!

आनंदयात्री's picture

6 Jan 2009 - 10:09 am | आनंदयात्री

फस्क्लास्स मुड जमुन आला लेख वाचुन !

-
(मुडमुडके देखनेवाला)

आंद्या मुडदुस

मनस्वी's picture

6 Jan 2009 - 4:55 pm | मनस्वी

'के व ळ अ प्र ति म'
मस्त लिहिलंएस शितल. मूडायन आवडले.
अवांतर : जाउदे.. अवांतर लिहायचा मूड नाहीये आत्ता.

जयवी's picture

6 Jan 2009 - 4:39 pm | जयवी

शितल........एकदम मूड मधे येऊन लिहिलंस गं......मस्त मूड बनला :)

मॅन्ड्रेक's picture

6 Jan 2009 - 5:41 pm | मॅन्ड्रेक

खरच आनन्द झाला वाचुन.
बहारदार.

पर्नल नेने मराठे's picture

7 Jan 2009 - 1:01 am | पर्नल नेने मराठे

सुन्दर...............
चुचु

शितल's picture

7 Jan 2009 - 1:44 am | शितल

"मुड" वाचकांचे आणि "मुड" आवडल्याचे कळविल्या बद्दल मुडी मिपाकरांचे आभार. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Jan 2009 - 8:49 am | llपुण्याचे पेशवेll

छान लिहीले आहेस शितल. पण इतके दिवस प्रतिक्रिया द्यायचा मूडच नव्हता. म्हनून आज देत आहे प्रतिक्रिया. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984

प्रभाकर पेठकर's picture

7 Jan 2009 - 4:09 pm | प्रभाकर पेठकर

सकाळी सकाळी नवरा मस्त पैकी स्वत:चे केस विंचरत, .....
हम्म! हे सुख कित्येक वर्षांपुर्वीच हरपले.... छे: सगळा मूडच बिघडला.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

मदनबाण's picture

7 Jan 2009 - 5:12 pm | मदनबाण

आज अपना मुड एकदम सॉलिड है क्या..और ये लिख्खा भी एकदम्मम...सॉल्लिड्ड्ड्ड्ड....हय्य्य्य्य... :)

(हॉलो मॅन)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

समिधा's picture

26 Jan 2009 - 11:34 pm | समिधा

तर बास आता, माझा "मुड" वर लिहायचा एवढाच मुड असल्याने मी एवढेच लिहिले आहे, मुड संपला
हे वाक्य आवडले, मला तर सगळे तु खुप मूडी आहे असं म्हणतात.
आणि तुझा लेख वाचुन आज सकाळीच खुप मस्त मूड आलाय.
;;)

स्वाती राजेश's picture

27 Jan 2009 - 12:27 am | स्वाती राजेश

शीतल, मस्त लिहिला आहेस लेख...:)
अगदी चांगल्या मूडमधे

दशानन's picture

27 Jan 2009 - 10:03 am | दशानन

ज ब रा !

मुडाची पार... मुडा पर्यंत खेचली आहे.. आवडलं !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !