गणित सोडवायचं म्हटलं की माणसाला प्रश्न पडतो. मग तो स्वतःशीच म्हणतो, "अब्बा! कसं करायचं हे इतकं अवघड गणित?"
पण या प्रश्नातच त्या गणिताचे उत्तर दडलेले असते!
हा गणिती प्रश्न आणि त्याचे उत्तर म्हणजे -
अब्बा! कसं करायचं हे इतकं अवघड गणित?
अब्बा! कसं करायचं हे अवघड गणित?
अब्बा! कसं करायचं हे गणित?
अब्बा! कसं करायचं हे?
अब्बा! कसं करायचं?
अब्बा! कसं?
अब्बाकसं?
अबाकस
अॅबॅकस्
या रीतीने मग अॅबॅकस् या गणिते सोडविण्याच्या पद्धतीचा शोध लागला! ;-)
---
चला तर मग, राजकारण, अर्थकारण, शेअर बाजार, ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्म, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, भटकंती, पाककृती... यांतील पारंगत मिपाखरे कोट्या करण्यातही कमी नाहीत हे दाखवू या. आपापले असेच कोट्याधीश विचार (खरंतर अविचार) इथे मांडा!
सर्वोत्तम मिपाखरांचा इथे प्रतिष्ठित मिपाखरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, हार, तुरे वगैरे देऊन जाहीर सत्कार करण्यात येईल!
- कोट्याप्रेमी द्येस्मुक्राव्
प्रतिक्रिया
13 Nov 2024 - 10:25 pm | गवि
ब्रिटिश राज्य असताना एक गोरा साहेब प्रवासी रत्नागिरीत भ्रमंती करत होता. स्थानिकांशी खास परिचय व्हावा म्हणून काही दिवस त्याची राहण्याची सोय एका प्रतिष्ठित सुखवस्तू कुटुंबात करण्यात आली. एका सकाळी घरातल्या घरात इकडे तिकडे फिरताना तो एका लहानशा कोठीच्या खोलीत डोकावला. सोवळे मोडू नये म्हणून त्याला हात दाखवत दाराबाहेरच रोखून वत्सलाबाई रानडेआजी घाईघाईने आपल्या कैरीच्या मसाल्यात घोळवलेल्या फोडींवर कडकडीत करून नंतर गार केलेले तेल ओतू लागल्या. मग त्यांनी मिश्रण नीट मिसळले.
कुतूहलाने गोऱ्या साहेबाने मोडक्या तोडक्या मराठीत विचारले,"असा केल्यावर हे मँगो पिकंल काय?"
वत्सलाबाईंनी लगेच नाही नाही अशी आडवी मान हलवली.
परपुरूषाशी बोलणे प्रशस्त समजले जात नसल्याने त्या मनातच पुटपुटल्या, "गाढवच दिसतोय मेला. चिरून, फोडी करून, मसाला आणि तेल लावून आंबा कधी पिकतो होय?"
पण भारतीय मान हलविण्याच्या पद्धती पाश्चिमात्य लोकांना फारच गोंधळात टाकत असल्याने गोऱ्या साहेबाने त्याचा अर्थ हो हो असा घेतला आणि डायरीत नोंद केली.
तेव्हापासून इंग्रजीत लोणच्याला पिकल म्हणू लागले.
14 Nov 2024 - 1:28 pm | यश राज
भारिये !
14 Nov 2024 - 5:15 pm | टर्मीनेटर
हा हा हा... भारी किस्सा आहे गवि साहेब!
माझे आजोबा हयात होते तोपर्यंत चांदोबा, चंपक, ठक ठक, किशोर, फँटमची कॉमिक्स, रीडर्स डायजेस्ट, इलेक्ट्रॉनिक्स फॉर यु अशी पाक्षिके/मासिके आणि अनेक दिवाळी अंक लहानपणापासून बऱ्यापैकी मोठे होईपर्यंत नियमितपणे घरात वाचायला मिळत होते. त्यात एक फोर सीझन्स नावाचा मराठी दिवाळी अंकही असे, त्यात खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या कथेतला एक किस्सा ह्यानिमित्ताने आठवला.
ब्रिटिश आमदानीत दुर्गभ्रमंती करताना वाट चुकल्याने रात्र रानात काढावी लागलेला एक गोरा साहेब सकाळी दुर्गम भागातल्या एका आदिवासी पाड्यावर पोचतो. तहानभुकेने व्याकुळ झालेला हा साहेब एका झोपडीच्या बाहेर बसलेल्या वृद्ध आदिवासी महिलेकडे काही खायला मिळेल का अशी विचारणा करतो. त्याने अनेकदा विचारणा करूनही त्याची इंग्रजी भाषा समजत नसल्याने ती म्हातारी बराच वेळ मक्ख चेहऱ्याने त्याच्याकडे नुसती बघतच बसल्याने हवालदिल झालेल्या त्या साहेबाला जगाच्या पाठीवर कुठल्याही भाषिकाला सहज समजू शकणाऱ्या खाणा-खुणांच्या भाषेत विचारणा करण्याची बुद्धी सुचते आणि ती फळालाही येते.
म्हातारी झोपडीत जाऊन तिने न्याहारीसाठी उरवून ठेवलेलया रात्रीच्या भाकऱ्यांपैकी एका 'कडक' भाकरीवर कुठल्याशा कंदमुळांपासून बनवलेल्या कोरड्या भाजीचा मोठा गोळा ठेऊन त्याला आणून देते. पोटात आग पडलेला तो साहेब अधाशासारखा भाजीचा गोळा मटकावून झाल्यावर भाकरीवर दोन-चार आणे ठेऊन ती म्हातारीच्या हाती सोपवत तिचे आभार मानून परतीच्या प्रवासाला लागतो.
मजल दरमजल करत मुक्कामी पोचल्यावर आपल्या डायरीत ह्या अनुभवाची नोंद करताना तो लिहितो, "इथले आदिवासी खूप गरीब असले तरी माणुसकीला चांगले आहेत. त्या म्हातारीने मला खायला दिलेली भाजी कसली होती ते कळले नाही पण ती खूप चविष्ट होती आणि ज्या प्लेट मध्ये मला ती देण्यात आली होती ती देखील अनोखी होती. माती किंवा कुठल्याही धातूपासून न बनवलेली अशी वेगळीच प्लेट मी प्रथमच पहिली. पण काही पैसे ठेऊन मी ती प्लेट परत केल्यावर ती बाई आनंदीत न होता उलट विचित्र नजरेने माझ्याकडे का पहात होती हे अनाकलनीय आहे"
14 Nov 2024 - 3:32 pm | टर्मीनेटर
अब्बा! कसं करायचं हे इतकं अवघड गणित?
अब्बा! कसं करायचं हे अवघड गणित?
अब्बा! कसं करायचं हे गणित?
अब्बा! कसं करायचं हे?
अब्बा! कसं करायचं?
अब्बा! कसं?
अब्बाकसं?
अबाकस
अॅबॅकस्
गणिती प्रश्नाचे उतरत्या भाजणीतले हे उत्तर वाचून 'धमाल' चित्रपटात चढत्या भाजणीत आपले 'पेट नेम' सांगणाऱ्या विनय आपटेंचा धमाल प्रसंग आठवला 😀
अय्यर...
वेणुगोपाल अय्यर...
मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
जयसूर्या लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
अट्टापटू जयसूर्या लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
श्रीपेरवर्धन अट्टापटू जयसूर्या लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
प्रभाकरन श्रीपेरवर्धन अट्टापटू जयसूर्या लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली एक्य परमपिल पेरंबदुर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर...
14 Nov 2024 - 6:49 pm | कर्नलतपस्वी
साष्टांग दंडवत.
लवकरच भर टाकायचा प्रयत्न करेन.
24 Nov 2024 - 5:49 pm | वामन देशमुख
विसाव्या शतकाच्या मध्यात घडलेल्या ज्यूविरोधी हत्याकांडांनी त्रासून गेलेल्यांनी आपल्या नेत्यांकडे, "मला आपल्या हक्काच्या मातृभूमीत प्लिज नेता? न्या हो." असा टाहो फोडला.
त्यातून मग -
मला नेता? न्या हो.
नेता? न्या हो.
नेता न्या हो
नेतान्याहो
नेतान्याहू
असे नेतृत्व उदयास आले.
24 Nov 2024 - 6:14 pm | कर्नलतपस्वी
बाचाबाची हा शब्द कसा बनला.
गुजराथी + मराठी
का
मराठी + मराठी