चालचलाऊ गीता -अध्याय २ (विडंबन)

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
3 Dec 2022 - 12:18 pm

म्हणे मग कृष्ण त्याला| काय अलिबागेहुनि आला?
डोस्क्यावरि तुझ्या मेल्या| वशाड शिरा पडो||  
उगा रडसी मुर्दयासाठी |वरी ज्ञान पाजळसी|
काय जास्त घेतलीसी| रात्रीची नवटाक||
अरे हे राजे लोक| टेम्परावरी आणि फेक |
जन्माचे घेति रिटेक| परमनंट नाही ||
नवी रूपे घेतॊ रोज| कधी बाळ्या कधी आज्जा |
आत्मुच्या भारी गमजा| पण तो बंधमुक्त ||
तोच जाण खरा कुल| कधी न हो दांडी गुल |
केले कुणी जरी फुल|तयासि येताजाता ||
तू म्हणे टपकवशील , जे मी निर्मियेल?
फुका काय बोलशील| काहीही हं अर्जुना||

सुप्रसिद्ध चालचलाऊ गीता लिहिणा-या श्री जे के उपाध्ये यांची क्षमा मागूनहा दुसरा अध्याय लिहिण्याचा प्रयत्न आहे. चुकल्यास, दोष आढळल्यास माफी.
यात कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. 
(जर संपादकाना यात काहीही गैर वाटले तर सरळ उडवून टाकावे ही विनंती)

कैच्याकैकविताकविता

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Dec 2022 - 2:39 pm | मुक्त विहारि

आवडले

सस्नेह's picture

3 Dec 2022 - 3:54 pm | सस्नेह

जरा छोटे वाटतेय काव्य.
द मामींचे पुनरागमन निमित्त स्वागत :)

विवेकपटाईत's picture

3 Dec 2022 - 4:55 pm | विवेकपटाईत

आवडले. माझेही.आजच्या राजकारणाला साजेशे
पाहुनी लाखोंची भीड
दुर्योधनाच्या सभेत
संभ्रमित अर्जुनाने विचारले
भगवंता माझा धर्म काय.
कृष्णाने हांडली मर्सिडीज
पोहोचला दुर्योधनाचा शिवरी.
भगवंत अर्जुनाला उपदेशी
पार्थ हाच आहे आजचा "युगधर्म".

विवेकपटाईत's picture

3 Dec 2022 - 4:56 pm | विवेकपटाईत

आवडले. माझेही.आजच्या राजकारणाला साजेशे
पाहुनी लाखोंची भीड
दुर्योधनाच्या सभेत
संभ्रमित अर्जुनाने विचारले
भगवंता माझा धर्म काय.
कृष्णाने हांडली मर्सिडीज
पोहोचला दुर्योधनाचा शिवरी.
भगवंत अर्जुनाला उपदेशी
पार्थ हाच आहे आजचा "युगधर्म".

कर्नलतपस्वी's picture

3 Dec 2022 - 7:21 pm | कर्नलतपस्वी

धर्म, धर्मग्रंथ, परंपरा यांचे विडंबन करण्यापेक्षा त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघा. जे आजच्या काळात उपयोगी आहे ते घ्या.बाकी सोडून द्या.

विडंबन कशाचे,किती प्रमाणात करायचे याचे भान उपाध्ये सारख्या महान कविवर्याला असू नये याचेही वाईट वाटते.

भगवद्गीते सारख्या पवित्र व सर्वमान्य सार्वकालीक ग्रथांचे विडंबन आणी ते सुद्धा गीता जयंतीच्या दिवशी वाचायला मीळणे हा खुप मोठा दैवदुर्विलास वाटतो.

संगीतकार मनोहर कविश्वर यांनी लिहीलेल्या 'गीत गोविंद' मधील एक रचना वाचताना भगवद्गीतेतील प्रमुख श्लोक डोळ्यासमोर उभे राहतात. वापरलेले शब्द आणी गेयता मनाला स्पर्शून जातात.

विमोह त्यागून कर्मफलांचा

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस
जाणून पुरुषार्था..... जाणून पुरुषार्था

शस्त्रत्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला
शस्त्रत्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला
कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला
घे शस्त्रा ते सुधीर होऊन घे शस्त्रा ते
घे शस्त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था
रक्षाया धर्मार्था

कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
जाणून पुरुषार्था
कर्तव्याच्या पुण्यपथांवर मोहांच्या फुलबागा
कर्तव्याच्या पुण्यपथांवर मोहांच्या फुलबागा
मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा
इह परलोकी अशांतीने तव
इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा
विक्रम झुकविल माथा
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
जाणून पुरुषार्था
कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा
कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा
क्षणभंगुर ही संसृती आहे खेळ ईश्वराचा
भाग्य चालते कर्मपदांनी
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था
जाण खऱ्या वेदार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
जाणून पुरुषार्था
रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवांत मी पांडवांत मी
कौरवांत मी पांडवांत मी अणुरेणूत भरलो
मीच घडवितो मीच मोडितो
मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था
उमज आता परमार्था

कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
जाणून पुरुषार्था
कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा
कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा
सर्व धर्म परि त्यजून येई
सर्व धर्म परि त्यजून येई शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या आ आ आ आ आ आ आ आ आ आ
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्माथा
सिद्ध करी धर्माथा
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
जाणून पुरुषार्था
विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
जाणून पुरुषार्था

https://youtu.be/8bKd9qb0OjQ

योगेश्वर सर्वांना सद्बुद्धी देओ.

नूतन सावंत's picture

4 Dec 2022 - 12:28 pm | नूतन सावंत

10001 % सहमत.

सस्नेह's picture

4 Dec 2022 - 5:47 pm | सस्नेह

हे काही विडंबन नाही. गीतेचाच अर्थ थोड्या टपोरी भाषेतून लिहिण्याचा प्रयत्न आहे असे मला वाटते. अर्थ नेहमी गंभीर आणि जड भाषेतच असावा असे नाही.
कृपया मूळ धागाही वाचावा ही विनंती.
बाकी इतरांच्या मताचा आदर आहे.

कर्नलतपस्वी's picture

4 Dec 2022 - 9:18 pm | कर्नलतपस्वी

कवीवर्य जनार्दन केशव उपाध्ये यांनी केलेले विडंबन याबद्दल सुद्धा खंत व्यक्त केली आहे. ते संपूर्ण विडंबन संग्रही आहे. कविवर्य जीवंत असते तर त्यानांही ठणकावून विचारले असते.

विडंबनालाही मर्यादा असाव्यात. किमान ज्याच्यावर श्रद्धा आहे,आस्था आहे,बहुसंख्य लोक देव मानतात त्याचे तरी विडंबन करू नये एवढीच माफक अपेक्षा.

नवटाक वापरलेला शब्द कुठल्या दृष्टिकोनातून भगवद्गीतेच्या विडंबना साठी उचित वाटतो.

छ. संभाजी महाराजांचे अनन्वित हाल झाले तरी धर्म नाही सोडला.

चार आणी सहा वर्षाची शिख गुरूची मुले औरंगजेबाने भिंतीत चिणून मारली.

माऊलींची ज्ञानेश्वरी लाखो वारकरी वाचतात त्यावर त्यांची श्रद्धा आहे.

इतर धर्मीय आपल्या धर्माचे ,देवी देवतांचा विडंबन अथवा आपमान जनक वक्तव्य कधीच करताना दिसत नाहीत. केल्यास 'सर तनसे जुदा' केलेले पाहीलेच आहे.

कुठेतरी श्रद्धा असावी,अभिमान असावा,अस्मिता जपावी नाहीतर धर्माचे पस्तीस तुकडे करण्यासाठी लोक तयारच बसले आहेत.

६८ झाले अजुन किती राहीले माहीती नाही.

कर चले हम विदा जांनो तन साथीयों
अब तुम्हारे हवाले वतन साथीयों

फक्त खंत व्यक्त करू शकतो.
थोबाडीत मारून साॅरी म्हणल्याने अपमानाची तीव्रता कमी होते असे जर वाटत असेल तर ते निर्विवाद चुकीचे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2022 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चाल चलाऊ गीता शिकवायला होते. हेही आवडले.

-दिलीप बिरुटे

चांदणे संदीप's picture

8 Dec 2022 - 11:20 am | चांदणे संदीप

चालचलाऊ गीतेच्या तुलनेत हे अगदीच फिके वाटले. अजून चांगले होऊ शकते.

सं - दी - प

रंगीला रतन's picture

17 Jun 2023 - 11:38 pm | रंगीला रतन

एक नंबर भाऊ :=)
अध्याय ३ येउद्यात लवकर.

एखाद्या काव्याचे गंमत म्हणून विडंबन केले, त्याचा आनंद घेतला तर काय बिघडते?

वगामधे कृष्ण पेंद्या गवळणी जी धमाल करतात त्यात दोन घटका विरंगुळा नाही मिळत का?

असं इतरांसारखं आमच्या भौना दुखवु नका रडत रहाण्यात काय हशील?

रंगीला रतन's picture

22 Jun 2023 - 11:47 pm | रंगीला रतन

+२२०६२०२३