अतिरंजित Sarcasm उर्फ Asterix: The Mansions of the Gods

शेर भाई's picture
शेर भाई in जनातलं, मनातलं
19 Jul 2022 - 8:43 pm

मा‍झ्या लहानपणी, म्हणजे तसा मी लहानच आहे अजून आणि तस ही मी २५ वर्षांनंतर वय मोजणं सोडून दिल, कारण देव साहेब म्हणून गेले आहेत कि “ Age is just a number.” तर मा‍झ्या लहानपणी जेव्हा आपल्याकडे उपग्रह वाहिन्याचं नुकताच आगमन झाल होत तेव्हा स्टार वाहिनीच स्टार मुव्हीज चानल नवीनच बाजारात आल तेव्हाची ही गोष्ट. स्टार मुव्हीज त्या काळातली माझ्या माहिती प्रमाणे भारतातील पहिली स-शुल्क वाहिनी होती. त्या वेळी तिथल्या सिनेमांना हिंदी सबटायटल्स असायची. तसेच त्या काळातले रात्री उशिरा लागणारे १८+ हा एक रम्य विषय आहे.

याच स्टार मुव्हीज वर मला पहिल्यांदा ते दोघ भेटले. Asterix & Obelix, रोमन – गौल्स (ब्रिटनी) आणि त्यांची युद्धे यांचा इतिहास मला खरं तर माहित नाही, पण या सिनेमातला अतिरंजित उपहास (Sarcasm) मला त्या वेळी आवडून गेला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनी हे दोघ Amazon Prime वर पुन्हा एकदा Asterix: The Mansions of the Gods मध्ये पुन्हा भेटले. त्या भेटीचा हा वृत्तांत.

हा चित्रपट २०१४ सालाचा आहे, पण जर तुम्ही कार्टून आहे, अस म्हणून सोडला असेल तर माझे ऐका आणि एकदा तरी वेळ काढून बघाच. या कथेतील पात्रांची नावे निवडताना कथाकाराने दाखवलेली कल्पकता भन्नाट आहे. उदाहरणार्थ गुलामांच्या म्होरक्याचे नाव “Give us a bonus”, टाऊनशिप लॉटरी जिंकलेल्या सर्वसामान्य माणसाचे नाव “Anonymous” वगैरे..........

तर या वेळेस रोमन सीझर गौल्सच्या ब्रिटनी जवळच्या जंगलात आपली Mansions of the Gods ही नवीन टाऊनशिप उभारायचे ठरवतो. सुरुवातीला गौल्स, रोमनांचा बऱ्यापैकी अटकाव करतात, पण जेव्हा त्यांना समजत कि वैतागलेले रोमन त्यांनी आणलेल्या गुलामांना ठार करणार आहेत तेव्हा ते त्या गुलामांची मदत करायचे ठरवतात. मदत काय तर, गौल्स आपले ताकद वाढवणारे सरबत या गुलामांना द्यायचे ठरवतात. पण होत भलतच, ते गुलाम गौल्सनी दिलेले सरबत वापरून एका दिवसात Mansions of the Gods टाऊनशिप पूर्ण करतात. अर्थात हे करण्याआधी रोमन लोकांबरोबर आपल्या नवीन शर्ती त्यांनी मान्य करून घेतलेल्या असतात. Mansions of the Gods मध्ये प्रत्येक गुलामच एक घर आणि आयुष्यभरासाठी गुलामीतून मुक्तता ही त्यापैकी एक अट असते. त्या प्रमाणे टाऊनशिप पूर्ण केल्यावर जेव्हा गुलाम आपली घर आणि गुलामीतून मुक्तता मागण्यासाठी रोमन लोकांकडे जातात, तेव्हा रोमन त्यांची ती मागणी कशा प्रकारे पूर्ण करतात हे चित्रपटात पाहणेच योग्य.

टाऊनशिप पूर्ण झाल्यावर तिथे सगळ्यात आधी घर मिळालेला सर्वसामान्य रोमन Anonymous पोहचतो, पण त्याला लॉटरीमध्ये मिळालेले स्वतःचे घर मिळायला जे पापड भाजावे लागतात ते पाहिल्यावर लॉटरीत लागणारी घरे सगळीकडे सारखीच असे जाणवते.

हा चित्रपट पाहताना फ्फार पूर्वी मुंबईपासून बरेच लांब (आता काही तासांवर?) असणाऱ्या कल्याण, बदलापूर आठवले तर आश्चर्य नाही. वाढत जाणारे शहरीकरणावर देखील यात एक भाष्य आहेच.

सगळी कथा सांगून येथे रसभंग करत नाही, पण एकदा नक्कीच पहावा असा हा उपहास आहे.

प्राईमवर येथे पाहायला मिळेल:
https://www.primevideo.com/detail/0O730MEG2VI389M5BTG93C9HTW/ref=atv_hm_...

कलासमीक्षा

प्रतिक्रिया

मी माझ्या वयाच्या २७व्य वर्षी सर्व प्रथम ऍस्टिरिक्स-ऑब्लिक्स ही कॉमिक्स वाचली. ह्या कॉमिक्स मधली प्रत्येक चित्र म्हणजे डोळ्यांना मेजवानीच आहे. प्रत्येक चित्रात बारकाईने पाहिल्यास एव्हढी विविधता दिसते की मन थक्क होऊन जाते. गावातील कोंबड्या, कुत्रे, बदके, डुक्करे, झाडे-वेली, विविध व्यक्ती त्यांच्या बायका ह्यांची चित्रे इतक्या सुंदरपणे त्याच बरोबर हसू येईल ईतक्या चांगल्या प्रकारे काढली आहेत. त्याच्या शिवाय युद्धाचे सीन, जखमी झालेले सैनिक, त्यांचे सरदार, जादूगार, रोमन सैनिकांची दाणादाण ही नक्कीच पाहण्यासारखी आहे. माझ्या संग्रहात जवळजवळ १५ कॉमिक्स होती. माझ्या मुलांसाठी देखील मी ऍस्टिरिक्स, ऑब्लिक्स, त्यांचा कुत्रा, केकाफोनिक्स, वगैरेची कट आउट्स घेतली होती जी त्याने खूप एन्जॉय केली.

आता त्यांचा सिनेमा नेटफ्लिक्सवर आहे म्हणता म्हणजे पाहणे भागच आहे.

सौन्दर्य's picture

19 Jul 2022 - 10:49 pm | सौन्दर्य

अमेझॉन प्राईमवर

चलत मुसाफिर's picture

20 Jul 2022 - 5:43 pm | चलत मुसाफिर

मूळ ॲस्टेरिक्स चित्रपुस्तके ही फ्रेंच भाषेत आहेत. पण त्यांचे इंग्रजी भाषांतर इतके बहारदार व विनोदपूर्ण प्रकारे करण्यात आले आहे की इंग्रजी आवृत्या अधिक लोकप्रिय झाल्या आहेत

टर्मीनेटर's picture

21 Jul 2022 - 2:57 pm | टर्मीनेटर

पण जर तुम्ही कार्टून आहे, अस म्हणून सोडला असेल तर माझे ऐका आणि एकदा तरी वेळ काढून बघाच.

लवकरच बघतो! मला ऍनिमेटेड चित्रपट आवडतात, 'Moana' हा माझा आत्तापर्यंतचा सर्वात आवडलेला ऍनिमेटेड चित्रपट. कसलं दर्जेदार ऍनिमेशन आहे राव!