ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग १)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
3 Jul 2022 - 9:40 am

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.

https://www.loksatta.com/pune/shivsena-shivajirao-adhalrao-patil-uddhav-...

आज महाराष्ट्र विधानसभेच्या नवीन अध्यक्षांसाठी विधानसभेत निवडणूक होणार आहे व उद्या नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर निवडणूक होईल.

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

5 Jul 2022 - 4:09 pm | जेम्स वांड

ताज्या घडामोडी धाग्यावरून संन्यास घेतला तेच उत्तम केले आम्ही असे वाटू लागले आहे मला तरी :)

किती ते वैयक्तिक होणे अन किती ते कोट परकोट लढवणे.

बाप रे !

मिसिंग चंद्रसूर्यकुमार ह्यांचे अभ्यासू प्रतिसाद....

भाजपाने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले असे दिसत आहे.
१. नुपुर शर्मा प्रकरण
२. पसामंदा मुस्लीमः मोदींनी हिंदु सोडुन इतरांना पक्षात आणण्यासाठी आवाहन केले आहे. आता भाजपा आता काँग्रेस होण्याच्या मार्गावर आहे. https://indianexpress.com/article/political-pulse/bjp-pasmanda-muslims-o...

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2022 - 11:42 pm | श्रीगुरुजी

बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही, मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही, विधानसभेत पाऊल ठेवू देणार नाही, ४० रेड्यांचा महाराष्ट्रात बळी देऊ वगैरे वल्गना केव्हाच हवेत विरल्या. परतलेल्या बंडखोर आमदारांचं त्यांच्या मतदारसंघात जोरदार स्वागत झालंय. त्यांचा कोणी केसही वाकडा करू शकला नाही. उद्धव ठाकरेंच्या बाजूने महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट उसळलीये वगैरे भ्रमाचे फुगे केव्हाच फुटले. उद्धव ठाकरेंच्या अधिपत्याखालील सेना आता शेकाप, मनसे, लाल निशाण गट, कम्युनिस्ट, जनता दल अशा पक्षांप्रमाणे अस्तित्वहीन झाली आहे. अर्थात महाराष्ट्राच्या हितासाठी हे फार पूर्वीच व्हायला हवे होते. निदान आता तरी होतंय हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणायचं.

कानडाऊ योगेशु's picture

6 Jul 2022 - 7:54 am | कानडाऊ योगेशु

अर्थात महाराष्ट्राच्या हितासाठी हे फार पूर्वीच व्हायला हवे होते. निदान आता तरी होतंय हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणायचं.

ह्याबद्दल साशंक आहे. मागे एकदा भुजबळ (छगनराव)साहेबांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना असणे महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे. हे विधान त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर व त्यावेळच्या शिवसेनाप्रमुखांवर टी.बाळु अश्या शेलक्या शब्दात टिका केल्यानंतर म्हटले होते. शिवसेनेचे विधायक कार्यात महत्व कमी असेल पण राक्षसी महत्वकांक्षा असलेल्या राष्ट्रीय पक्षांसाठी उपद्रव्यमूल्य फार आहे. दक्षिणेत आपापल्या राज्यांच्या ह्क्कासाठी भांडणारे पक्ष असताना महाराष्ट्रात ही तसा पक्ष असणे गरजेचे आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Jul 2022 - 8:32 am | श्रीगुरुजी

मागे एकदा भुजबळ (छगनराव)साहेबांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना असणे महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे.

मुळात भुजबळांचा इतिहास पाहिला तर ते जै म्हणतात त्याच्या विरूद्ध असणारेच महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे. ज्या पक्षाकडे कोणतेही आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, विकाससंबंधित धोरण नाही त्या पक्षाची महाराष्ट्राला अजिबात गरज नाही.

शिवसेनेचे विधायक कार्यात महत्व कमी असेल पण राक्षसी महत्वकांक्षा असलेल्या राष्ट्रीय पक्षांसाठी उपद्रव्यमूल्य फार आहे.

विधायक कार्यात, महाराष्ट्रासाठी हितकारक कार्यात सेनेचा सहभाग शून्य आहे आणि सेना ही राष्ट्रीय पक्षांऐवजी मराठी जनतेसाठीच उपद्रवकारक आहे.

दक्षिणेत आपापल्या राज्यांच्या ह्क्कासाठी भांडणारे पक्ष असताना महाराष्ट्रात ही तसा पक्ष असणे गरजेचे आहे.

असेल. पण सेना हा पक्ष त्या कसोटीवर उतरत नाही कारण या पक्षाने आजतागायत महाराष्ट्रासाठी काहीही केले नाही व तो महाराष्ट्रासाठी अहितकारक आहे. मनसेच्या स्थापनेनंतर काही काळ आशा वाटत होती. परंतु राज ठाकरेंनी इतक्या उलटसुलट कोलांट्या मारल्या की हा पक्ष मराठी जनतेच्या मनातून पूर्ण उतरला.

कानडाऊ योगेशु's picture

6 Jul 2022 - 10:06 am | कानडाऊ योगेशु

धाग्याची शंभरी भरली.:)

अगदी शिवसेनाच नाही पण कुठलाही एखादा पक्ष जो फक्त राज्यपातळीवर आहे व वेळप्रसंगी स्वार्थासाठी का होईना मराठी माणसाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा आहे असा पक्ष असायला हवा.
राष्ट्रीय पक्षातले राज्यपातळीवरचे नेते जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा आपला कणा विसरतात हा इतिहास आहे.
आणि जोपर्यंत राष्ट्र पातळीवर महाराष्ट्राचे प्रभावी व्यक्तिमत्व नाही तो पर्यंत तरी असा पक्ष असायला हवाच हवा. मोदी शहा कितीही राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत असे म्हटले तरी त्यांचे बरेचसे निर्णय हे गुजरात धार्जिणेच राहिले आहे.

श्रीगुरुजी's picture

6 Jul 2022 - 10:19 am | श्रीगुरुजी

अगदी शिवसेनाच नाही पण कुठलाही एखादा पक्ष जो फक्त राज्यपातळीवर आहे व वेळप्रसंगी स्वार्थासाठी का होईना मराठी माणसाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा आहे असा पक्ष असायला हवा.

+ १

अजूनपर्यंत तरी असा पक्ष महाराष्ट्रात जन्मलेला नाही. लवकरात लवकर असा पक्ष जन्मावा ही इच्छा आहे.

केरळ कम्युनिस्ट पक्षाचे मत्स्यव्यवसाय मंत्री असलेले चेरियन म्हणतात की, 'देशाची राज्यघटना जास्तीत जास्त लोकांना लुटण्यासाठी लिहिली गेली आहे'
चेरियन हे पिनरई विजयन यांच्या मंत्रिमंडळात संस्कृतीचे खाते ही सांभाळतात. चेंगन्नूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झाले आहेत.

सोमवारी पतनमतिट्टा येथे एका पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना चेरियान म्हणाले, “देशात एक सुंदर राज्यघटना लिहिली गेली आहे. जास्तीत जास्त लोकांची लूट व्हावी यासाठी राज्यघटना लिहिली गेली आहे असे मी म्हणेन. ब्रिटिशांनी जे तयार केले, ते भारतीयांनी लिहून ठेवले. गेल्या ७५ वर्षात त्याची अंमलबजावणी झाली आहे, मी म्हणेन की ही एक अशी घटना आहे जी देशातील जास्तीत जास्त लोकांचे शोषण सुनिश्चित करते.

राज्यपालांनी याची माहिती मागवल्यावर कम्युनिस्ट पक्षाची सीपीआय(एम) पॉलिटब्युरो लगेच मैदानात उतरली. सहसा पॉलिटब्युरो मैदानात येत नाहीत. पण कम्युनिस्ट पक्षाकडून विश्वरत्न भीमराव आंबेडकर लिखित राज्य घटनेला जाहिर विरोध हा मुद्दा महागात पडू शकतो लक्षात आल्यावर मोठ्या प्रमाणात आता त्यावर सारवासारवसासुरू केली गेली आहे. केरळात असे काही घडलेच नाही हे डिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन आता नक्कीच राबवले जाणार आहे.

उत्तर वझिरीस्तानमध्ये एका आत्मघातकी बॉम्बरने हल्ला करत आपली दुचाकी लष्करी ताफ्यावर घातली आणि त्यात किमान दहा पाकिस्तानी सैनिक जखमी झाले.

अजमेर पोलिसांनी अजमेर दर्गाह खादिम सलमान चिश्ती यांच्या विरोधात हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चिश्ती यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तो यात म्हणाला , “मी माझ्या वडिलांची शपथ घेतो, मी माझ्या आईची शपथ घेतो, मी तिला उघडपणे गोळ्या घालीन. मी माझ्या मुलांची शपथ घेतो, जो कोणी नुपूर शर्माचे शीर आणेल, मी हे घर त्याला देईन." (मुझे कसम है मेरी मां की मैं उसे सरेआम गोली मार देता, मेरे बच्चों की कसम मैं उसे गोली मार देता, और आज भी सीना ठोक कर कहता हूं जो भी नुपुर शर्मा की गर्दन लाएगा मैं उसे यह अपना घर दे जाऊंगा ओर रास्ते पर निकल जाऊंगा। यह वादा करता है सलमान।
) खादिम सलमान चिश्तीवर या आधी ही खून आणि खुनाचा प्रयत्न यासह १३ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

या आधी हिंदू कन्हैया लाल आणि उमेश कोल्हे यांची केवळ नुपूर शर्माला केवळ सोशल मीडियावर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे गळे कापले गेले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अजमेर पोलीस सलमान चिश्तीला त्याच्या घरातून ताब्यात घेताना दिसत आहेत. चिश्ती यांना घरातून बाहेर काढत असताना, पोलिसातील कोणीतरी म्हणाले, "व्हिडिओ रेकॉर्ड करताना तू नेमका कशावर होतास?" व्हिडीओ पुढे सलमान चिश्ती मी मद्यपान करत नाही असे म्हणताना ऐकू येत आहे. या क्षणी त्याच्या जवळचा एक पोलीस अधिकारी म्हणाला, 'म्हण तू नशेत होतास म्हणजे तुला वाचवणे सोपे जाईल.' भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. अशोक गेहलोत यांच्या हिंदू विरोधी चेहऱ्याचा पुरावा आहे असे ते म्हणाले.

याचा अजून एक भाग आहे. त्या दुसर्‍या व्हिडिओमध्ये आरोपी चिश्तीचे लोक आणि पोलिस कर्मचार्‍यांचा समूह स्वागत करताना दिसत आहे. पार्श्वभूमीत कोणीतरी म्हणते, “बेफिकर रहे, सब बात हो गई है” (निवांत रहा, सर्व व्यवस्था केली आहे).

एवढा उघड उघड हिंदुद्वेष अपेक्षित नव्हता. किती निर्लज्जपणा.
आता काँग्रेसबद्दलची उरली सुरली आपुलकी गळून पडली.
-
चित्रफीत दिल्याबद्दल तुमचे आभार, आणि ती काढणार्‍या माणसाचे आभार.

श्रीगुरुजी's picture

7 Jul 2022 - 2:14 pm | श्रीगुरुजी

राज्य पोलिस नेहमीच राज्य सरकारला अनुकूल असतात. महाराष्ट्रात सुद्धा कुरमुसेंना बेदम मारहाण करणारा आव्हाड, नौदल अधिकारी मदन शर्मा, किरीट सोमय्या, मोहीत कंबोज अशांना मारहाण करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी काहीच केले नाही. अत्यंत अर्वाच्य, प्रक्षोभक धमक्या देणारे राऊत, दीपाली सय्यद यांच्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले. परंतु राणे पितापुत्र, अर्णब गोस्वामी, कंगना, केतकी चितळे, निखिल भामरे, सदावर्ते अशांविरूद्ध अनेक पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करून घेऊन त्यांचा मनसोक्त छळ केला.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Jul 2022 - 4:11 pm | अमरेंद्र बाहुबली

एका कुप्रसिध्द गायीकेची तिकीटेही विकीयला लावली होती म्हणे महाराष्ट्र पोलिसांना.

म्हणून खालील गोष्टी क्षम्य का?

कुरमुसेंना बेदम मारहाण करणारा आव्हाड, नौदल अधिकारी मदन शर्मा, किरीट सोमय्या, मोहीत कंबोज अशांना मारहाण करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी काहीच केले नाही. अत्यंत अर्वाच्य, प्रक्षोभक धमक्या देणारे राऊत, दीपाली सय्यद यांच्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले. परंतु राणे पितापुत्र, अर्णब गोस्वामी, कंगना, केतकी चितळे, निखिल भामरे, सदावर्ते

चुकीच्या गोष्टींना चूक म्हणा की, त्यात कसला कमीपणा. सर्वच पक्ष चुका करतात, जिथे चुकतात तिथे मान्य करा की. तुम्ही म्हणजे पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे वागता. राजकारणी आहात का? असेल तर तस सांगा म्हणजे आम्ही आमच्या अपेक्षा बदलून टाकू.

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2022 - 7:40 am | श्रीगुरुजी

आम्ही अश्या अपेक्षा ठेवतच नाही. यांच्या भाषेतील तथाकथित गद्दारांना, यांच्या आवडत्या नेत्यांवर काढलेली व्यंगचित्रे किंवा उपहासात्मक काव्य प्रसिद्ध करणाऱ्यांच्या बाबतीत असेच केले पाहिजे, हे यांनी अनेकदा सांगितले आहे.

कंजूस's picture

6 Jul 2022 - 11:10 am | कंजूस

आठ दिवसांनी,
आणि सप्टेंबरात.

क्लिंटन's picture

6 Jul 2022 - 11:50 am | क्लिंटन

उदयपूरमध्ये कन्हैय्याने नुपूर शर्मांना समर्थन देणारी पोस्ट शेअर केली म्हणून त्याची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली ही घटना काही दिवसांपूर्वी घडली. मागच्या आठवड्यात अकोल्यातही तशीच घटना घडली. उदयपूरच्या घटनेविषयी टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी नुपूर शर्मांच्या 'बेलगाम बडबडीमुळे' पूर्ण देशात आगडोंब उसळला आहे म्हणून त्यांनी देशाची माफी मागावी असे म्हटले होते. एका अर्थी उदयपूरच्या घटनेला त्या न्यायाधीशांनी नुपूर शर्मांना जबाबदार ठरविले होते. त्याबद्दल माजी नोकरशहा, माजी न्यायाधीश वगैरे ११७ मान्यवर व्यक्तींनी खुले पत्र लिहून न्यायाधीशांच्या त्या टिप्पणीचा निषेध केला आहे.

याविषयी दोन गोष्टी लिहावाश्या वाटतात. पहिली म्हणजे कोणा मान्यवरांनी अशी सेन्सिबल भूमिका घेतली असे फार काळाने घडले असावे. अगदी पहिल्यांदाच अशा मान्यवरांनी अशी भूमिका घेतली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. नाहीतर मान्यवर म्हणजे रात्री दोन वाजता याकूब मेमनच्या फाशीविरोधात कोर्टात जाणारे, कसाबची फाशी रद्द करा, अफजल गुरू कसा स्वातंत्र्यसैनिक, जनेयुचा कन्हैय्याकुमार कसा तरूणाईचे आशास्थान वगैरे बकवास करणारे लोक असेच चित्र होते. ते सोडून जर मान्यवरांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याचे स्वागत आहे.

दुसरे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या त्या दोन न्यायाधीशांची टिप्पणी पूर्णपणे अमर्थनीय आहे. स्त्रियांवरील बलात्काराला 'लहान कपडे घालणे' हे कारण आहे अशाप्रकारचे ते विधान आहे. खरं तर याबद्दल त्या दोन न्यायाधीशांविरोधात संसदेत ताबडतोब महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे.

खरं तर याबद्दल त्या दोन न्यायाधीशांविरोधात संसदेत ताबडतोब महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे.

+१
पण तसे काही होणार नाही.

कपिलमुनी's picture

6 Jul 2022 - 1:15 pm | कपिलमुनी

अशी पत्रे मोदी विरोधी लिहिली की लिब्रांडू वगैरे... मग टिंगल टवाळी..

काय पलटी मारता राव.. मानला

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2022 - 1:22 pm | अमरेंद्र बाहुबली

हाहाहा.
तुम्ही अशी टिका कराल तर लगेच नितीन पालकर काका कुठल्यातरी नाटकातील प्रसंग सांगून तुमची बुध्दीमत्ता वगैरे काढतील.

सुबोध खरे's picture

6 Jul 2022 - 1:59 pm | सुबोध खरे

म्हणजे त्या न्यायाधीशांनी केलेली टिप्पणी तुम्हाला मान्य आहे असेच ना ?

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2022 - 4:09 pm | अमरेंद्र बाहुबली

कपीलमुनींची टिपण्णी पुन्हा वाचा. तरी समजलं नसेल तर त्याला मी जबाबदार नाही.

सुबोध खरे's picture

6 Jul 2022 - 8:02 pm | सुबोध खरे

तो प्रतिसाद तुमच्या साठी नव्हताच

तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका

निनाद's picture

7 Jul 2022 - 4:56 am | निनाद

मेवातमधील एका इस्लामी व्यक्तीने नूपूर शर्माची जीभ कापणाऱ्याला २ कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. देशातील जातीय तेढ आणि कन्हैया लालचा उदयपूरमध्ये इस्लामवाद्यांनी केलेला शिरच्छेद यासाठी नुपूर शर्माची 'मोकळी' जीभ जबाबदार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हंटल्यानंतर ही घटना घडली आहे.

याआधी जूनमध्ये भीमसेना प्रमुख नवाब सतपाल तन्वर यांनी नूपूर शर्माची जीभ आणणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या वक्तव्याबद्दल तिला शिक्षा देण्यापूर्वी तो तिला त्याच्यासमोर 'मुजरा' करायला लावेल, असेही तो म्हणाला होता आणि ती फाशीच्या शिक्षेस पात्र आहे. त्यानंतर धमक्यांमुळे तन्वरला अटक करण्यात आली.

जेम्स वांड's picture

7 Jul 2022 - 8:12 am | जेम्स वांड

मागच्या आठवड्यात अकोल्यातही तशीच घटना घडली

इथं तपशील चुकला आहे, ती घटना अकोल्यात नाही तर अमरावतीत घडली आहे, दोन्ही पूर्णपणे वेगळी शहरं आहेत.

अमरावतीत डॉ. उमेश कोल्हे ह्या पशुवैद्य असणाऱ्या व्यक्तीची हत्या झालेली आहे, सध्या हा तपास एन आय ए कडे वर्ग आहे

जेम्स वांड's picture

7 Jul 2022 - 8:13 am | जेम्स वांड

मागच्या आठवड्यात अकोल्यातही तशीच घटना घडली

इथं तपशील चुकला आहे, ती घटना अकोल्यात नाही तर अमरावतीत घडली आहे, दोन्ही पूर्णपणे वेगळी शहरं आहेत.

अमरावतीत डॉ. उमेश कोल्हे ह्या पशुवैद्य असणाऱ्या व्यक्तीची हत्या झालेली आहे, सध्या हा तपास एन आय ए कडे वर्ग आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2022 - 12:27 pm | अमरेंद्र बाहुबली

*मोठी बातमी । घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ*
*https://solapurviralnews2.com/?p=4866*
विकास सूसाट सूटलाय. आणी लोक विचारत होते आमदारांचा खर्च कोण करतंय.

सिलिंडर १४०० रुपयांपेक्षा कमी परवडत नाही. हळूहळू वाढवायची किंमत.

सिलिंडर १४०० रुपयांपेक्षा कमी परवडत नाही. हळूहळू वाढवायची किंमत.

कपिलमुनी's picture

6 Jul 2022 - 1:13 pm | कपिलमुनी

पुण्यात सीएन्जी 85₹ झाला..
हॅपी राईड

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2022 - 1:24 pm | अमरेंद्र बाहुबली

पेट्रोल चे दर कमी करनार होते नवे मुख्यमंत्री. पण दिल्लीश्वरानी सीएनजी वाढवायला लावला.

आग्या१९९०'s picture

6 Jul 2022 - 5:35 pm | आग्या१९९०

मागील सरकारच्या विरुद्ध निर्णय घेणार हेच आता बघायला मिळणार. कांजूरमार्ग नको आरेच पाहिजे. त्यांनी CNG दर कमी केले,आम्ही वाढवणार. त्यांनी डिझेल पेट्रोलवरील टॅक्स कमी केले नाही आम्ही करणार. ते अडीच वर्ष एकत्र राहिले आम्ही ......???

विवेकपटाईत's picture

6 Jul 2022 - 8:45 pm | विवेकपटाईत

कांजूर मध्ये राज्य सरकार कडे जागाच नाही.अडीच वर्ष काम थांबवून हजारों कोटींचे नुकसान मात्र झाले. पर्यावरणाची अपरमित हानी झाली. केंद्राने कमी केलेले दर कमी न करणे म्हणजे ग्राहकांशी दगा.

आग्या१९९०'s picture

6 Jul 2022 - 3:06 pm | आग्या१९९०

४ जुलैला घरगुती गॅस ऑनलाइन पैसे भरून बुक केलेल्या गॅसची आज डिलिव्हरी घेताना ५० रुपये बिलात लावले व ते रोख मागितले. Invoice आज केले म्हणून आजचा दर लावला असे सांगितले. आता ५० रुपये वसूल करण्यासाठी रक्त आटवणे आले. पूर्वी महिन्याच्या १ आणि १५ तारखेला गॅसचे दर ठरवले जायचे आता सोरट काढून तारीख ठरवतात वाटतं. गॅस एजन्सीला नक्कीच दरवाढीची कल्पना असणार म्हणून त्यांनी आज invoice बनवले असणार. लुटारू सरकार जिंदाबाद.

राघव's picture

6 Jul 2022 - 8:29 pm | राघव

गॅस एजन्सीला नक्कीच दरवाढीची कल्पना असणार म्हणून त्यांनी आज invoice बनवले असणार. लुटारू सरकार जिंदाबाद.

मागे एकदा एका CNG वर चालणार्‍या रिक्षाच्या चालकाने जास्त पैसे लागण्याचे कारण "वो मोदीने पेट्रोल का रेट बढाया ना साब!" असे सांगीतले होते, ते आठवले! वड्याचं तेल वांग्यावर काढणे म्हणतात ते हेच बहुतेक! ;-)

आग्या१९९०'s picture

6 Jul 2022 - 10:04 pm | आग्या१९९०

रिक्षाचालकाने तुम्हाला receipts दिली होती का? मला गॅस एजन्सीने GST लावून invoice दिला आहे , बुकिंग आणि invoice तारखेसकट. काहीही उदाहरणे देऊ नका

तुम्ही सोंग घेतले झोपण्याचे म्हणून माझे उदाहरण चुकीचे ठरत नाही. त्यामुळे तुम्हाला समजावून सांगणे हा उद्देश नव्हताच. :-)
तुम्ही तुमचे चालू ठेवा, आम्ही आमचे चालू ठेवतो. हाय काय अन् नाय काय!

कंजूस's picture

7 Jul 2022 - 6:28 am | कंजूस

Gas agency ओर्डर बुक केल्यावर एक मेसेज पाठवते "पे ओनलाईन" अमुक Amazon/paytm ची लिंक. त्यावर मीही पैसे भरतो.
पण सध्या त्यांनी बंद केलंय.
ओफिसमधून सिलिंडर dispatch केल्यावर एक मेसेज येतो -pay ***.
ही invoice असते. दिलेल्या मालाचे बिल.

सर टोबी's picture

7 Jul 2022 - 10:16 am | सर टोबी

चाटूगिरीची महत्तम मर्यादा. काँग्रेसच्या गरीबी हटाव घोषणेची खिल्ली उडवताना धवल क्रांती, हरीत क्रांती, तेल बियांचं उत्पन्न वाढविणे या गोष्टी आणि त्यांचं यश लक्षात नाही घ्यायचं. सरसकट गरीब माणूस दिसताच कामा नये असा पोरकट हट्ट धरायचा. आणि ना खाऊंगा न खाने दूंगा याचं यश काय असं विचारलं तर सरकारी भ्रष्टाचार कमी करण्याबद्दल मोदी कधी बोलले होते असा प्रश्न विचारायचा. वा रे वा!

सर टोबी's picture

7 Jul 2022 - 10:17 am | सर टोबी

चाटूगिरीची महत्तम मर्यादा. काँग्रेसच्या गरीबी हटाव घोषणेची खिल्ली उडवताना धवल क्रांती, हरीत क्रांती, तेल बियांचं उत्पन्न वाढविणे या गोष्टी आणि त्यांचं यश लक्षात नाही घ्यायचं. सरसकट गरीब माणूस दिसताच कामा नये असा पोरकट हट्ट धरायचा. आणि ना खाऊंगा न खाने दूंगा याचं यश काय असं विचारलं तर सरकारी भ्रष्टाचार कमी करण्याबद्दल मोदी कधी बोलले होते असा प्रश्न विचारायचा. वा रे वा!

सुबोध खरे's picture

7 Jul 2022 - 10:45 am | सुबोध खरे

चाटूगिरी वगैरे जरा बाजूला ठेवा

सरकारी भ्रष्टाचार कमी करण्याबद्दल मोदी कधी बोलले होते

सरकारी भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट होईल

यात काही मूलभूत फरक आहे का?

भ्रष्टाचार जगातून संपूर्णपणे कधीही नष्ट होणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे.

धाग्यावर महत्त्वाच्या बातम्या, निरिक्षणं, विश्लेषणं अक्षरशः शोधावी लागताहेत. क्लिंटन, निनाद तुमचे खरंच मनापासून कौतुक. केवढा तो अभ्यास आणि सगळ्या गोंधळातही अलिप्तपणे माहिती मांडण्याची हातोटी. _/\_

बाकी तेच ते वाद अन् भांडणे.. मला कधी कधी दाट शंका येते की येथे राजकीय पक्षांचे अधिकृत कार्यकर्ते भांडताहेत का काय..!! :-)

जाता-जाता:
धाग्याचे नाव "ताज्या उखाळ्या पाखाळ्या" असे ठेवावेसे वाटले! ;-)

निनाद's picture

8 Jul 2022 - 5:52 am | निनाद

नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद राघव जी!

कपिलमुनी's picture

8 Jul 2022 - 7:54 am | कपिलमुनी

मोदी नी तर सत्तेत येण्यापूर्वी जे अकलेचे तारे तोडले होते ते नेट वर बघण्यासारखे आहेत...

आता मात्र एकही भक्ताड त्याबद्दल बोलत नाही.. अळी मिळी गुप चीळी

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 10:07 am | अमरेंद्र बाहुबली

त्यानी ते अकलेचे तारे राष्ट्रहीतासाठी तोडले होते असा भक्तात समज असावा.

सुबोध खरे's picture

8 Jul 2022 - 9:39 am | सुबोध खरे

भक्ताड?

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2022 - 10:03 am | श्रीगुरुजी

मिपावर अनेक मोदीद्वेष्टे वारंवार अकलेचे तारे तोडत असतात. त्यातलाच हा एक प्रकार.

कपिलमुनी's picture

8 Jul 2022 - 10:40 am | कपिलमुनी

पेत्ताड ला कशी दारू ची नशा असते तसे भक्ताड ..
लिंब्रांडू वगैरे म्हणतात की नई ? अगदी तसेच्च

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 10:56 am | अमरेंद्र बाहुबली

पेत्ताड ला कशी दारू ची नशा असते तसे भक्ताड :)