ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग १)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
3 Jul 2022 - 9:40 am

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.

https://www.loksatta.com/pune/shivsena-shivajirao-adhalrao-patil-uddhav-...

आज महाराष्ट्र विधानसभेच्या नवीन अध्यक्षांसाठी विधानसभेत निवडणूक होणार आहे व उद्या नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर निवडणूक होईल.

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

5 Jul 2022 - 9:24 pm | विवेकपटाईत
विवेकपटाईत's picture

5 Jul 2022 - 9:24 pm | विवेकपटाईत

राउतांची आज एक पत्रकार परिषद पाहिली
ते म्हणत होते की शिंदे गटाने शिवसेनेच्या नावावर मते मागितली ते निवडून आले. आता मात्र त्यानी सत्तेसाठी दगाबाजी केली.
राउतांची मुलाखत विनोदी असतेच. पण या वाक्याचे खास हसू आले.
२०१९ मधे सेनेने भाजपसोबत युतीच्या नावावर मते मागितली. आणि ते सत्तेसाठी राकॉं सोबत गेले. याला काय म्हणायचे मग

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2022 - 10:27 am | श्रीगुरुजी

१९८९ पासून २०१९ पर्यंत (२०१४ चा अपवाद ज्यात भाजपची गुप्त मदत होतीच) सर्व लोकसभा, विधानसभा, महापालिका वगैरे निवडणुकीत केवळ भाजपच्या मतांमुळे सेनेचे उमेदवार निवडून येत होते. २०१९ मध्ये सुद्धा सेना उमेदवारांच्या फलकांवर बाळ ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंऐवजी मोदी असायचे. तेव्हा तर फक्त मोदींमुळेच सेना जगली होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 10:57 am | अमरेंद्र बाहुबली

२०१४ चा अपवाद ज्यात भाजपची गुप्त मदत होतीच ख्या ख्या. काहीही विनोदी. म्हणे भाजपची मदत होती. शिवसेने विरोधात जवळपास प्रत्येक मतदारसंघात भाजपचा ऊमेदवार होता. मग स्वतचे ऊमेदवार सोडून भाजप सेनेचे ऊमेदवार जिंकवत बसेल का?? कैच्याकै. सेनेला हसक्यात घेणं महाग पडलं नी १०५ घेऊन घरी बसावं लागलं. भावनेच्या भरात वस्तूस्थिती विसरतात गुरूजी तुम्ही.
सर्व लोकसभा, विधानसभा, महापालिका वगैरे निवडणुकीत केवळ भाजपच्या मतांमुळे सेनेचे उमेदवार निवडून येत होते. खोटं. भाजपला कुणीही मतदान करायचं नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या सभांच्या जिवावर भाजपचे ऊमेदवार जिंकायचे. म्हणून तर युती करा म्हणून विनवण्या करायला अटल बिहारी ते अमीत शहा मातोश्रावर यायचे. सेनेचे नेते कधी कुणा भाजप नेत्याच्या घरी गेले नाहीच. पण भाजपचा प्रत्येक नेता मातोश्रीवर विनंत्या करत यायचा.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 11:50 am | अमरेंद्र बाहुबली

२०१९ मध्ये सुद्धा सेना उमेदवारांच्या फलकांवर बाळ ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंऐवजी मोदी असायचे

भाजप ऊमेदवारांनीही अनेक मुंबईतील मराठीबहूल भागात मोदींएवजी बाळासाहेबांचे फोटो वापरले होते. तुम्हाला फक्त मोदींचे दिसले.

क्लिंटन's picture

4 Jul 2022 - 11:52 am | क्लिंटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव महाराष्ट्र विधानसभेने संमत केला आहे. ठरावाच्या बाजूने १६४ मते मिळाली. काल विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी उध्दव ठाकरेंच्या गटाबरोबर असलेले मराठवाड्यातील आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटाच्या आमदारांबरोबर दिसले.

काल राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे हेच शिवसेना गटाचे नेते आहेत आणि ठाकरेंनी केलेली अजय चौधरींची गटनेतेपदावर केलेली नेमणूक अमान्य केली. तसेच शिंदे गटाचे भारत गोगावले हे शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षाचे प्रतोद आहेत असा निवाडा त्यांनी केला आहे. विधानसभा अध्यक्ष हे अशा प्रकारच्या तंट्यांमध्ये अतिशय महत्वाचे पद असते आणि अशावेळेस त्यांचा निवाडा शेवटचा असतो. आता विधानसभेने निवडलेला अध्यक्ष असल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांवर बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिशीला तसा काही अर्थ राहिलेला नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 11:54 am | अमरेंद्र बाहुबली

भाजपचे अणेक ऊनेदवार आयाच आहेत. घोटाळे माफ करत भाजपाय या टाईप अनेक शिरलेतसजे लोक भाजपच्या जिवावर नाही तर स्वबळावर आमदार झालेत. भाजपच्या पुशारक्या मारनार्या सेनाद्वेष्ट्यांनी पहावे. बबनराव पाचपुते, गणेश नाईक ते विधानसभा अध्यक्षही राषट्रवादीतून आलेत.
मूळ भाजपेयी कोण आहेत?? एखीदं प्रसिध्द नाव सांगावं जो महाराषट्रात कुठेही जाऊन लाखोंची सभा घेऊ शकतो.

सुबोध खरे's picture

4 Jul 2022 - 12:15 pm | सुबोध खरे

अर्मेदर्न बाहुलींब

जरा सूड लेकान कडे लक्श दया

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 12:26 pm | अमरेंद्र बाहुबली

हो हो. घाईत लिहीलं. शुध्द करून देतो.
भाजपचे अनेक ऊमेदवार आयात आहेत. घोटाळे माफ करतो भाजपात या टाईप अनेक शिरलेत. जे लोक भाजपच्या जिवावर नाही तर स्वबळावर आमदार झालेत. भाजपच्या पुशारक्या मारनार्या सेनाद्वेष्ट्यांनी पहावे. बबनराव पाचपुते, गणेश नाईक ते विधानसभा अध्यक्षही राषट्रवादीतून आलेत.
मूळ भाजपेयी कोण आहेत?? एखादं प्रसिध्द नाव सांगावं जो महाराष्ट्रात कुठेही जाऊन लाखोंची सभा घेऊ शकतो.

Nitin Palkar's picture

4 Jul 2022 - 1:04 pm | Nitin Palkar

मला अनुभव नव्हता, मला अनुभव नाही असं उद्धव ठाकरे अखेरच्या भाषणात म्हणाले. हे त्यांना खुर्चीत बसताना जाणवलं नाही का? अडीच वर्षांनी पायउतार व्हायची वेळ आली तेव्हा कसं काय लक्षात आल?

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 1:22 pm | अमरेंद्र बाहुबली

अनूभव नव्हता तरी त्यांनी ऊत्तम काम केले. कोरना काळात राज्यात भाजप सरकार असतं तर युपी सारखे नद्यांमध्ये प्रेतं फेकले असते.

रात्रीचे चांदणे's picture

4 Jul 2022 - 1:53 pm | रात्रीचे चांदणे

राजेश भाऊ मिपासोडून गेल्यापासून बहुबलीवर डबल ड्युटी करायची वेळी आलीय.

Nitin Palkar's picture

4 Jul 2022 - 2:52 pm | Nitin Palkar

वाझेंची नेमणूक, अर्णबला अटक, कंगनाचे घर पाडणे, केतकी चितळेला अटक मला एवढीच आठवतायत. म्हणायला पंढरपूर पर्यंत गाडी चालवणे हा एक विक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे...

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 3:01 pm | अमरेंद्र बाहुबली

अर्णबला अटक मराठी व्यापाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी.
कंगनाचे घर पाडणे अतिक्रमणात घर बांधणे कायद्याप्रमाणे चुकीचे आहे. भाजप पेक्षा कायदा मोठा.
केतकी चितळेला अटक हे चुकीचेच होते.
बाकी कोरोना काळात केलेली मदत आठवत नसेलच आपल्याला.

यश राज's picture

4 Jul 2022 - 3:17 pm | यश राज

अबा,

आघाडीच्या (स्वकर्तुत्वाने)पडलेल्या सरकार तर्फे त्यांची बाजू उचलून धरण्याची तुमची जिद्द वाखाणण्यासारखी आहे.

तरी पण तुम्ही सरकारने जी कामे(?) केली म्हणून बळे बळे सांगताहेत ते त्यावेळेस च्या मामुना त्यांच्या निरोपाच्या भाषणाच्या(फेसबुक लाईव्ह) वेळीस पण आठवली नाहीत..

एक गोष्ट मात्र आहे की त्यांची न केलेली काम बॉलिवूडच्या( टूलकिट गँग) भांड लोकांना दिसतात व तेसुद्धा असाचा उद्घोष करत असतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 3:27 pm | अमरेंद्र बाहुबली

आघाडीच्या (स्वकर्तुत्वाने)पडलेल्या ही ईडी, राज्यपाल, भाजपचा ह्यांच्या टीमवर्कचा अपमान समजला जाईल.
त्यांना कामे केली की नाही हे महाराषट्राला माहीतीय.

सुबोध खरे's picture

4 Jul 2022 - 8:11 pm | सुबोध खरे

झाली का रडारड सुरु?

चालू द्या.

कोणत्याही प्रतिसादाला तेच तेच भंपक प्रतिसाद देऊन तुम्ही चांगल्या चर्चेची वाट लावताय याचं काहीही सोयरसुतक नाही का?

एस आर बोम्मई केस वाचली का नाही? काही तरी अभ्यासपूर्ण वाचून लोकांच्या माहितीत भर घालायची सोडून आहे तेच तेच प्रतिसाद परत परत देत राहताय?

लोकांना तुंमच्या असल्या फालतू प्रतिसादांचा अक्षरशः उद्वेग आलाय. आणि ते अनेकवेळेस लोकांनी लिहूनही दाखवलंय पण तुमच्या ज्ञानात येत नाहीये कि जाणूनबुजून दुर्लक्ष करताय?

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 8:24 pm | अमरेंद्र बाहुबली

कोणत्याही प्रतिसादाला तेच तेच भंपक प्रतिसाद देऊन तुम्ही चांगल्या चर्चेची वाट लावताय तेच तेच प्रतिसाद कुठे दिले? तुम्ही खोटं लिहीत असाल तर ते मी दाखवून दिले.

आग्या१९९०'s picture

4 Jul 2022 - 3:56 pm | आग्या१९९०

कृषी वायदे बाजार आणि शरद पवार

एवढा अभ्यास केंद्र नेतृत्वाने केला तर ?

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 4:12 pm | अमरेंद्र बाहुबली

ते आमदार फोडणे, सरकार पाडणे, गुहाटीला नेणे ह्याचा अभ्यास करतात फक्त. हे काम पवारांनाच जमू शकते. काकाद्वेष्टांना हे कधी दिसनार नाही.

चौकस२१२'s picture

4 Jul 2022 - 4:15 pm | चौकस२१२

बहुबलि जर हे ऐक
https://www.youtube.com/watch?v=atxJXVhQiyc

हे सरकार पडणार. "ठराव जिंकला पण मने जिंकली नाहीत."- दीदी.
याची आकडेवारी कशी मिळते?
"चाळीस आमदारवाला मुमं कसा होतो? काळंबेरं आहे."- अजितदादा.
जनतेने हे कसं शोधायचं?

विजुभाऊ's picture

4 Jul 2022 - 5:59 pm | विजुभाऊ

बास झालं आता हे दळंण...
वैताग आलाय या सगळ्याचा.

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2022 - 6:33 pm | श्रीगुरुजी

ज्या पद्धतीने नवीन सरकार स्थापन होऊन नवीन सभापतींची निवड झाली, हे अत्यंत पक्षपाती पद्धतीने झाले आहे. यातून भाजपच्या हातात शेवटी खुळखुळाच आला. हे सर्व करण्याऐवजी अजून सव्वादोन वर्षे थांबून स्वबळावर २८८ जागा लढायला हव्या होत्या। या सर्व प्रकाराचा उबग आलाय. महाराष्ट्रात पुढील ५ वर्षे राष्ट्रपती राजवट हवी.

सुबोध खरे's picture

4 Jul 2022 - 7:05 pm | सुबोध खरे

आपला प्रतिसाद वैफल्यग्रस्त आहे हे समजते.

१०६ आमदार ज्यानी युती साठी भरपूर कष्ट घेतले आणि निवडून आले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना सर्वात मोठा पक्ष असून सत्तेपासून लांब ठेवले गेले होते त्यांना किती वैफल्य आले असेल.

अजून अडीच वर्षे थांबायला लावून त्यांच्या सहनशक्तीचा अंत करण्यात काय हशील आहे? शेवटी हे आमदार वैफल्यग्रस्त होऊन दुसऱ्या पक्षात गेले तर त्याची जबाबदारी कुणी घ्यायची?

अडीच वर्षे विरोधी बाकावर बसलेले असताना सुद्धा १०६ आमदारापैकी एकही आमदार फुटला नाही हे भाजपचे आणि श्री फडणवीस यांचे संघटना कौशलय वादातीत आहे पण याबद्दल त्यांना कोणी शाबासकी द्यायला आलेले नाही.

म वि आ ची अभद्र युती कोणत्याही अनैतिक मार्गाने फोडली तरी सामान्य माणसाला त्याबद्दल कोणतेही सोयरसुतक असणार नाही हेही श्री फडणवीस जाणतात.

ज्या तऱ्हेने त्यांनी विधानपरिषद राज्यसभा निवडणूक लढल्या आणि आता टोकाच्या वैफल्यग्रस्त शिवसेना आमदारांना आपल्याकडे वळवून हि अभद्र युती तोडली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे.

स्वतःच्या तीर्थरुपाना वचन दिले म्हणून हिंदुत्वाच्या आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे या नावाखाली( श्री मनोहर जशी आणि श्री नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाहि ) स्वतःच्या सत्तालालसे साठी उद्धव ठाकरे यांनी अमंगल युती करून सामान्य शिवसैनिकाला हिंदुत्वाचे नाव घेण्याची लाज वाटेल अशा कृती केल्या त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. त्यासाठी अजून अडीच वर्षे थांबणे हा सामान्य शिवसैनिकाशी आणि महाराष्ट्रातील जनतेशी राजद्रोह ठरेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 7:54 pm | अमरेंद्र बाहुबली

म वि आ ची अभद्र युती कोणत्याही अनैतिक मार्गाने फोडली तरी सामान्य माणसाला त्याबद्दल कोणतेही सोयरसुतक असणार नाही हेही श्री फडणवीस जाणतात.
फडणवीस नेहमी फेल जातात. आता हे सुध्दा त्यांनी चुकीचेच जाणले. ईडी, सीबीआय, राज्यपाल ह्यांचा गैरवापर महाराष्ट्राच्या सामान्य जनतेने टीवीवर पाहीलाय. त्यामुळे येत्या निवडणूकीत भाजपला हाचे परिणाम दिसतीलच.
स्वतःच्या सत्तालालसे साठी उद्धव ठाकरे यांनी अमंगल युती आजीबात नाही. भाजपने २.५ वर्षांचा दिलेलला शब्द मोडला म्हणून त्यांनी युती तोडली. भाजपने शब्द पाळून सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रा बनले असते. मविआत देखील शिंदेच मामु बननार होते तसे पत्रही राज्यपालांना पाठवलं होतं. सत्तालालसे साठई पहाटे शपथ घेनारेही महाराष्ट्राने पाहीलंय.
सामान्य शिवसैनिकाला हिंदुत्वाचे नाव घेण्याची लाज वाटेल अशी लाज कुठल्याही सैनीकाला वाटत नाही. १०६ घरी बसवल्याच्या खदखदीतून सदर वाक्ये येतात.
त्यासाठी अजून अडीच वर्षे थांबणे हा सामान्य शिवसैनिकाशी आणि महाराष्ट्रातील जनतेशी राजद्रोह ठरेल. हास्यास्पद. सत्ता नसेल तर काॅंग्रेस राष्ट्रवादीचे मूळ लोकं पुन्हा पळतील ह्या भितीने येनकेन प्रकारे हे सरकार आणण्यात आलंय.

कंजूस's picture

4 Jul 2022 - 8:30 pm | कंजूस

याबद्दल आजच्या पेप्रांत वाचलं की "असा काही शब्द भाजपने दिला नव्हता" असा खुलासा फडणवीस करत आहेत. खरं खोटं माहिती नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 9:17 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणवीस नेहमी खरं बोलतात. वेगळा विदर्भ झाल्याशीवाय लग्न करनार नाही. अशी घोषणा त्यांनी केली होती. राष्ट्रवादी बरोबर आपद धर्म, शाश्वत धर्म सांगून युती करनार नाही हे देखील ते बोलले होते.

कपिलमुनी's picture

5 Jul 2022 - 6:30 pm | कपिलमुनी

अडीच वर्षे मुख्यमंत्री पद आणि सत्तेत समान वाटा असे जाहीर केलेले व्हिडिओ वगैरे सर्व मिपावर दिले होते.
अर्थात भक्तानां ते पचले नाहीत.. मग कोलांट्या उड्या मारून झाल्या..

अजूनही कोणाला हवे असल्यास व्य नी करा..

सेना + राष्ट्रवादी = अनैसर्गिक युती

भाजप + राष्ट्रवादी ही युती विकासा साठी ?
भाजप + नॅशनल कॉन्फरन्स - मास्टर स्ट्रोक
भाजप ने केले की भारी म्हणायचे ही मजबुरी आहे..

४० पैसे का इमान !

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jul 2022 - 6:44 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
कुणी खरं पुराव्यासह दाखवत असेल तर त्याच्यावर वयक्तिक चिखलफेक करायची. मागील तीन दिवसात श्रिगुरूजी, सुबोध खरे आणी नितीव पालकर ह्या तीन लोकांनी माझ्यावर वयक्तिक घाणेरड्या भाषेत चिखलफेक केलीय.
डाॅ. खरे बोलले का महाविरास आघाडीच्या काळात पैसे देऊनही व्यापार्यांची कामे व्हायची नाहीत. असं कुठला व्यापारी बोलला? किंवा तुन्ही काही व्यापार करता का? नसाल तर कोणत्या आधारावर हे सांगताहात हे विचारल्यावर त्यांना पुन्हा त्या विषयात हात घातला नाही. मिपाचा वापर खोटं पसरवण्यीससाठी होतोय नी जो कुणी हे खोटं ऊघडं पाडेल त्याच्यावर खालच्या थराला जाऊन वयक्तीक निंदानालस्ती केली जातेय हे दर्शवून मी खाली बसतो.

सुबोध खरे's picture

6 Jul 2022 - 2:19 pm | सुबोध खरे

हायला तुम्ही डोक्यावर पडला आहात काय ?

कोण व्यापारी असं उघडपणे बोलून आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पडून घेईल?

केतकी चितळे चं उदाहरण डोळ्यासमोर असताना?

सरकारदरबारी पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत हे जगजाहीर आहे आणि इथे आपण हरिश्चंद्राचा अवतार धारण केलाय

चालू द्या

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2022 - 4:07 pm | अमरेंद्र बाहुबली

हायला तुम्ही डोक्यावर पडला आहात काय ?
ही प्रश्न स्वतला विचारा.
@संपादक- ही व्यक्ती दरवेळेस खालच्या भाषेत टिपण्णी करतेय.
कोण व्यापारी असं उघडपणे बोलून आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पडून घेईल? मग आघाडीच्या काळात पैसे देऊन काम व्हायचं नाही हे अगाध द्न्यान कुठे प्रापित झालं? की खोटं बोलून बदनामी करायचीय आघाडीची?
सरकारदरबारी पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत हे जगजाहीर आहे लाचलुचपत भागात तक्रार करा. पण थापा मारणे बंदं करा.

आग्या१९९०'s picture

6 Jul 2022 - 5:59 pm | आग्या१९९०

८ नोव्हेबर २०१६ ला एका हरिश्चंद्राने नोटाबंदिमुळे सरकारी भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट होईल असे स्वप्न दाखवले होते. जे जागे झालेत त्यांना हे दाखवलेले स्वप्न खरे नव्हते ह्याचा साक्षात्कार झाला. सत्य लपत नाही.

सुबोध खरे's picture

6 Jul 2022 - 7:59 pm | सुबोध खरे

सरकारी भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट होईल असे स्वप्न दाखवले होते.

असे श्री मोदी एकदा तरी बोलले आहेत का हे दाखवता येईल का?

केवळ द्वेषापोटी वाटेल ते लिहू नका

आग्या१९९०'s picture

6 Jul 2022 - 10:54 pm | आग्या१९९०

मोदी हरिश्चंद्र कधी झाले ?

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2022 - 11:14 pm | अमरेंद्र बाहुबली

हहपुवा. :)

सुबोध खरे's picture

7 Jul 2022 - 9:35 am | सुबोध खरे

हायला

आपणच टुकार विनोद करायचा आणि आपणच हसायचं

वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुबोध खरे's picture

4 Jul 2022 - 7:13 pm | सुबोध खरे

राष्ट्रपती राजवट लावणं हा महाराष्टाच्या जनतेवर अन्याय होईल कारण एकट्या राज्यपालांना हे झेपणार नाही. सर्व अधिकार नोकरशाही कडे जातील आणि मग तर सामान्य माणसांचे गार्हाणे ऐकायला कोणीच राहणार नाही.

कारण नोकरशाही मूक, बधिर, उद्धट आणि अत्यंत स्वार्थी असते.

कोणताही निर्णय कितीही चुकीचा असला तरी त्यांचे काहीही वाकडे होत नाही किंवा दर पाच वर्षांनी त्यांना जनतेकडे जावे हि लागत नाही. कितीही अकार्यक्षम असला तरी आय ए एस अधिकारी संयुक्त सचिव ( जॉईंट सेक्रेटरी) पदापर्यंत जातोच आणि डोंगराएवढी चूक केली तरी जास्तीत जास्त त्याची बदली होते.

त्यामुळे राष्ट्रपती राजवट हा उपाय कितीही चांगला वाटलं तरी अत्यंत मर्यादित काळासाठीच वापरला गेला पाहिजे.

हीच स्थिती लष्करी राजवटीची असते. माणसे वैफल्यग्रस्त आणि निराश होऊन लष्कराकडे सत्ता द्या म्हणतात पण लष्कराकडे सत्ता देणे हा रोगापेक्षा इलाज भयंकर असतो.

निनाद's picture

7 Jul 2022 - 4:49 am | निनाद

कारण नोकरशाही मूक, बधिर, उद्धट आणि अत्यंत स्वार्थी असते.

कोणताही निर्णय कितीही चुकीचा असला तरी त्यांचे काहीही वाकडे होत नाही किंवा दर पाच वर्षांनी त्यांना जनतेकडे जावे हि लागत नाही. कितीही अकार्यक्षम असला तरी आय ए एस अधिकारी संयुक्त सचिव ( जॉईंट सेक्रेटरी) पदापर्यंत जातोच आणि डोंगराएवढी चूक केली तरी जास्तीत जास्त त्याची बदली होते.

अगदी सहमत आहे.
ही पद्धती आधी बदलली पाहिजे.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2022 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली

राष्ट्रपती राजवट लावणं हा महाराष्टाच्या जनतेवर अन्याय होईल कारण एकट्या राज्यपालांना हे झेपणार नाही. राज्यपालांचा निपक्षपातीपणा पाहीला तर रोगापेक्षा ईलाज भयंकर हे तुमचे वाक्य पटते.

खरे साहेब तुमचे म्हणणे बरोबर आहे पण अशाच प्रकारचे तुणतुणे काही दिवसांपूर्वी मुक्तविहारी नावाचे गृहस्थ वाजवत असत, तेव्हा तुमच्यापैकी कोणीच एक अवाक्षर पण काढले नाही

सुबोध खरे's picture

5 Jul 2022 - 9:31 am | सुबोध खरे

अशाच प्रकारचे तुणतुणे

चूक आहे

मुक्तविहारी दुसऱ्यांच्या चर्चांमध्ये वितुष्ट आणत नसत.

स्वतः भाजपचे समर्थन करणारे असंख्य दुवे टाकत असत. त्याला उत्तर देणं कि न देणे/ दुर्लक्ष करणे हे तुमच्या हातात असते.

इथे मी श्री गुरुजींना प्रतिसाद दिला होता त्यात यांनी आवश्यक नसताना लगेच तोंड घातलं.

बरं नाक खुपसायचं असलं तरी त्यामागे काही अभ्यास असावा, काही नवीन माहिती असावी, लोकांना काही कायद्याच्या प्रक्रियेची, नोकरशाही च्या कामकाजाच्या पद्धतीची माहिती मिळावी, घटनेच्या मूलभूत तत्वांची तोंडओळख असावी.

यातलं काहीही नाही नुसता पोकळ शब्दांचा बुडबुडा. संयत

दोन लोक चर्चा करत असतील तर त्यांच्या मध्येच तुम्ही तोंड खुपसून चर्चेचाच विचका करू नये इतकी साधी समज असू नये?

शाम भागवत's picture

5 Jul 2022 - 10:24 am | शाम भागवत

मला वाटते मुवी यांनी त्यांची पध्दत बदललेली आहे.

साधारण दीड-दोन आठवड्यांपूर्वी मी डेन्मार्क विषयी व्हिडियो पाहिला होता... आज डेन्मार्क मधल्या एका मॉल मध्ये गोळीबार झाल्याची बातमी वाचली !
अधिक माहिती घेतल्यावर लक्षात आले की हा तोच Field’s मॉल आहे जिथे जाऊन मी कधी काळी माझा पहिला कॅमेरा विकत घेतला होता. या मॉल मध्ये येण्यासाठी मी मेट्रो धरली होती जी ड्रायव्हरलेस होती.
मी पाहिलेले २ व्हिडियो इथे देत आहे :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Abhir Gulal Udhalit Rang with lyrics | अभिर गुलाल उधळीत रंग | PT. Jitendra Abhisheki

आसाम येथील सिलचरमध्ये बराक नदीच्या तटबंदीचे नुकसान करणाऱ्या मिठू हुसेन लस्कर आणि काबुल खान यांना अटक झाली आहे. काबुल खानने उघडपणे ही तटबंदी फोडली त्यामुळे पाणी शहरात घुसले. या फुटीचा व्हिडिओही त्याने शूट केला होता.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यापूर्वी म्हटले होते की, पूर ही मानवनिर्मित आपत्ती होती.

अवघड आहे ! काय करावं ह्या जनावरांचं.

लाज उधोजींची गेली पण चमचे मात्र इथे फडणवीस ह्यांना कसे उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले इत्यादी विषयावरून भाजप मंडळींना शिव्या देत आहेत.

शिवसेना हा पक्ष आता शिंदे ह्यांचा आहे. त्यांनी अजून उधोजींना कारवाई करून पक्षातून हाकलून कसे लावले नाही ह्याचेच आश्चर्य वाटते. उधोजी आणि बाळ पेंग्विन ह्यांना सतरंज्या उचलण्याचे काम सुद्धा आता मिळणार नाही.

> निकलना ख़ुल्द से आदम का सुनते आए हैं लेकिन
> बहुत बे-आबरू हो कर तिरे कूचे से हम निकले

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jul 2022 - 1:00 pm | अमरेंद्र बाहुबली

एकनाथ शिंदे बोल त असताना फडणवीसांनी माईक ओढून घेतला.
https://www.bbc.com/marathi/india-62047549?fbclid=IwAR2oy7qFljXVhr9OA0PC...