शत सर्व्हर शोधताना...

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
11 Dec 2008 - 7:55 am

काल मिसळपाव सेवादात्याच्या कामासाठी दिवसभर बंद होते. आहे तो सेवादाता(सर्व्हर) बदलून मोठ्या क्षमतेच्या सेवादात्याकडे आपले संकेतस्थळ हलवलेले आहे. मिसळपावचा सतत वाढणारा डेटाबेस बघता हे काम मिपा काही काळ विश्रांती अवस्थेत नेल्याशिवाय शक्य नव्हते. रात्री ९ पर्यंत काम होईल अशी अपेक्षा होती मात्र काही अनपेक्षीत अडचणींमुळे मिपा सुरू व्हायला १२:४१ वाजावे लागले. आता मिपा सुरळीत सुरू आहे.

गेले दोन तीन महिने मिपासाठी नवा सेवादाता शोधतांना अनेक बाबी जाणवल्या. त्यातील खास बाब म्हणजे मिपावर वाढत जाणारा सदस्यांचा आणि पाहूण्यांचा ओघ. त्यांना सेवा पुरवण्यासाठी आहे तो सेवादाता कमी पडत होता. नवा घेणे गरजेचे आहे मात्र सर्व्हरची प्रोसेसिंग पावर जास्त असलेला सर्व्हर शोधणे आवश्यक होते. कारण मिपासारखी संकेतस्थळे जागा कमीच व्यापतात, त्यांना बॅन्डविड्थ जास्त हवी असते. आणि ज्या कोअर वर मिपा आहे त्यासाठी प्रोसेसर जास्त क्षमतेचा हवा असतो. ह्या प्रोसेसरचा भाग सहसा शेअर्ड होस्टींगमध्ये कमी असतो. नवीन सर्व्हर शोधतांना अश्या ठराविक गरजा असतांना अनेक पर्याय समोर आले. त्यापैकी काही अंतीम निवडीत होते.
पैकी आता निवडलेला उत्तम आहेच मात्र हा सर्वोत्तम नाही. जस जसा मिपाचा युजरबेस वाढत जाईल तसतसा मिपाच्या क्षमता वाढवण्याची गरज भासत राहील.
यावेळी माझ्या मनात आलेली एक बाब म्हणजे मिसळपावने काही अंशी तरी स्वत:चा खर्च स्वतः उचलायला हवा. मी असं म्हटलेलं कदाचीत तात्यांना आवडणार नाही, मात्र हे खरं आहे की मिसळपावला आता खर्च वाढता आहे. तो केवळ एकट्याने करावा यात म्हणावे तसे लॉजीक दिसत नाही. मिसळपावची क्षमता वाढतेय, लोक येताहेत याचा आनंद व्हायला हवा आणि एवढे लोकप्रिय संकेतस्थळ काही प्रमाणात तरी स्वतःचा खर्च उचलण्याच्या लायक व्हावे असे मला वाटते. लोकांना त्रास न होता असे करण्याचे पर्याय आहेत.
उद्या कुठल्याच कारणाने मिपाचे नुकसान होऊ नये आणि मिपाचा सदस्य या नात्याने मिपा अधीकाधीक समृध्द व्हावं असं मला वाटतं. एकहाती तात्या हा डोलारा सांभाळू शकतात मात्र काही मार्गांनी याकार्यात मदत झाली तर बरंच होईल ना?
शेवटी काय घ्यायचा तो निर्णय तात्या घेतील, मी माझं मत मांडलेलं आहे.

मिसळपाव च्या नवीन सर्व्हरमुळे काही बदल जाणवतो का? अर्थात खरा कस एकाच वेळी प्रचंड प्रमाणात पाहूणे आल्यावरच लागेल :(
तुमच्या काही सुचना असतील तर येथे द्या अथवा सरपंचाना व्यक्तिगत निरोप पाठवा.

नीलकांत

हे ठिकाणधोरणमांडणीवावरप्रकटनविचारमतशिफारससल्ला

प्रतिक्रिया

अभिरत भिरभि-या's picture

11 Dec 2008 - 8:24 am | अभिरत भिरभि-या

आपण काल घेतलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद !
मिपा असेच बहरत राहो ही शुभेच्छा !!

विकास's picture

11 Dec 2008 - 8:25 am | विकास

तात्यांनी एकट्याने खर्च उचलण्याऐवजी किमान स्वेच्छेने का होईना पण वर्गणी गोळा करणे योग्य पर्याय वाटतो.

(वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल ;) )

सर्वांनी मिळून यावर नक्की "सक्रीय" विचार करावा असे वाटते. त्यात मी पण सहभागी आहे.

भडकमकर मास्तर's picture

11 Dec 2008 - 8:39 am | भडकमकर मास्तर

वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल
फेक आय्डी आणि नको असलेली नावे घालवायचा उत्तम उपाय... किती प्रॅक्टिकल आहे कल्पना नाही....नीलकांतने सुचवलेली गोष्ट पटते... तात्यांचे मत काही बदलले आहे का बघूयात...
______सर्वानुमते वर्गणीचे जे काही ठरेल ते मान्य आहे....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

11 Dec 2008 - 8:27 am | विसोबा खेचर

च्यामारी,

"मिपा सार्वजनिक वाचनालय आणि लेखनालयाची" वर्गणी सुरू करावी की काय? :)

तात्या.

विकास's picture

11 Dec 2008 - 8:36 am | विकास

तात्यांच्या अवांतराला अजून थोडे अवांतरः (क्षमस्व!)

मिपा वर्गणी, वापराप्रमाणे विविध दरात ठेवता येईलः

  • लेख लिहीणारे,
  • चर्चा चालू करणारे
  • चर्चेत वाद घालणारे
  • चर्चेत पुन्हा पुन्हा वाद घालणारे
  • कविता करणारे
  • विडंबने करणारे
  • मिपावरील कवितांची विडंबने करणारे
  • एका पेक्षा अधिक आयडी वापरणारे
  • चर्चेत अवांतर लिहीणारे (हा धागा सोडून :-) )
  • शुद्ध मराठीत, माहीतीपूर्ण पण वाचकांच्या अलगद डोक्यावरून जाईल असे लिहणारे
  • धर्म, निधर्म, राजकारण, समाजकारण, साम्यकारण (नवीनच शब्द आहे) यावरून एकमेकांना व्हर्चुअली चावणारे

आणि सगळ्यात शेवटी महत्वाचे

  • कुठल्यातरी नटीचा फोटू स्वतःबरोबर चिकटवणारे!

हे असेच काहीसे वाटलेले दर ठरवण्यासाठीचे विभाग आहेत, त्यात कोणाला जर साम्य वाटले तरी तो निव्वळ योगायोग समजावा. ;)

सखाराम_गटणे™'s picture

11 Dec 2008 - 8:54 am | सखाराम_गटणे™

>>कुठल्यातरी नटीचा फोटू

फोटोमुळे बैंडविडथ जास्त लागते ना.

:)) महत्वाचे म्हणजे सर्वात जास्त वर्गणी गांधीवादी लेखाचे गुर्‍हाळ चालविणार्‍यांना ठेवा, वाचकांना सहन करण्याचा किती ताप होतो?

सहज's picture

11 Dec 2008 - 8:29 am | सहज

बहुमताने जे काही ठरेल ते मान्य.

विकासराव म्हणतात तसे जितके आय डी तितकी जास्त वर्गणी. :-)

यशोधरा's picture

11 Dec 2008 - 8:31 am | यशोधरा

सर्वमताने ठरेल ते मान्य.

मनस्वी's picture

11 Dec 2008 - 10:21 am | मनस्वी

सहमत.

आरती's picture

11 Dec 2008 - 10:25 am | आरती

हेच म्हणते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2008 - 11:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वमताने ठरेल ते मान्य.

शितल's picture

11 Dec 2008 - 11:08 pm | शितल

सहमत. :)

सखाराम_गटणे™'s picture

11 Dec 2008 - 8:35 am | सखाराम_गटणे™

एड सेन्स सारख्याच अजुन जाहीराती देणार्‍या कंपण्या आहेत, त्याची सेवा वापरु शकता.
मी काही मदत करु शकेन

नीलकांत's picture

11 Dec 2008 - 8:40 am | नीलकांत

मिसळपाव वाचण्यासाठी बंधण लादने योग्य होणार नाही असं मला वाटत. याशिवायही अनेक पर्याय आहेत की ! कुणावरच कसलेच बंधन यायला नको. स्वेच्छा ठिक आहे.

याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल. याचे काही फायदे व काही तोटे आहेत. याविषयावर सुध्दा तुमचे मत द्यावे.

नीलकांत

घाटावरचे भट's picture

11 Dec 2008 - 8:48 am | घाटावरचे भट

हे चालू शकेल. शिवाय वर्गणीचा पर्याय आहेच.

ऋषिकेश's picture

11 Dec 2008 - 10:12 am | ऋषिकेश

यापेक्षा केवळ वाचनमात्र राहण्यासाठीही फक्त कॅपचा ठेवला तरी फरक पडेल असे वाटाते
म्हणजे
केवळ वाचक ज्याला सभासदत्व नको आहे: तो फक्त कॅपचा टाकून प्रवेश करेल
आणि
ज्याला लॉगिन करायचं आहे तो आधी कॅपचा टाकून प्रवेश करेल तेव्हा नेहेमीचं मिसळपाव उघडेल मग हवंतर नेहेमीप्रमाणे लॉगिन डीटेल्स देईल

यामुळे , मशीन जनरेटेड हिटसहि थांबतील आणि तात्यांना जी मुक्तता अपेक्षीत आहे (प्रत्येकाला वाचनाची मुभा असण्याची जी मला स्तुत्य वाटते) ती ही सांभाळली जाईल

माझ्यामते आनंदयात्रीने असेच कुठेसे म्हटल्याचे आठवते. असल्यास द्वीरुक्तीबद्दल क्षमस्व

बाकी नीलकांतशी सहमत आहे. तात्यां साईट चालवण्यास समर्थ असले तरी इतरांनी / साईटने स्वतः आर्थिक भार उचलावा.

-(गोंधळलेला) ऋषिकेश

झकासराव's picture

11 Dec 2008 - 9:52 am | झकासराव

याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल>>>>>>>>>.
चिकटुन राहण्यार्‍या पाहुण्या वाचकाना येण्याची नोंद हा उपाय योग्य राहील.
ते त्या निमित्ताने सदस्यत्व घेतील किंवा आधीच सदस्यत्व असेल तर लॉग इन करतील. जेणेकरुन मशीन जनरेटेड हिट्स वर थोडा तरी कंट्रोल येइल.
पण आल्या आल्या लगेच येण्याची नोंद करण बंधनकारक करण हा उपाय तितकासा बरोबर राहणार नाही. सदस्यत्व घ्यायच्या आधी कोणी येवुन नुसतच वाचत बसेल किंवा साइटचा अंदाज घेत असेल (आपल्याला आवडेल का? किंवा इथे काय काय चांगल आहे ) तर अशा लोकाना हा प्रकार त्रासदायक वाटण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठराविक टाइम लिमिट देता येइल का??
अजुन एक , मध्ये राजे (जैनाच कार्ट) यानी डेडिकेटेड सर्वर घ्या अशी कल्पना मांडली होती. त्याचा खर्च किते येतो?? स्वेच्छेने वर्गणी देणार्‍या मित्रांकडून असा सर्वर घेता यैल का?
अवांतर : मला संगणकाच काडीइतक देखील ज्ञान नाही. वर लिहिलेल तुम्हा लोकांचच वाचुन जे सुचल ते लिहिलय.
अतिअवांतर : आपल्यावर हिटसचा हल्ला करणार्‍या शत्रुवर आपण प्रतिहल्ला का करु नये??? त्यासाठी काहि खर्च येत असेल तर आधी त्याची वर्गणी द्यायला मी तयार आहे. ;)

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनंत छंदी's picture

11 Dec 2008 - 10:12 am | अनंत छंदी

आपण आपणाला जी शक्य असेल ती मदत मिपाला करावी , खाते नं. दिल्यास आपण आपली मदत त्यावर जमा करू शकू. अर्थात तात्यांचे काय मत आहे ते पहावे, शेवटी ते म्हणतील ते अंतीम!

मुक्तसुनीत's picture

11 Dec 2008 - 10:29 am | मुक्तसुनीत

मिपावर होणार्‍या हल्ल्यांच्या आणि एकूणच वाढलेल्या वैध ट्रॅफिकच्या संदर्भातली एकूण परिस्थिती पहाता मेम्बरशिपचे बंधन असणे योग्य वाटायला लागले आहे.
"कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! :-( अर्थात तसे करणे अपरिहार्य असेल तर करावे लागेलच !

वर्गणी मात्र जरूर द्यायला आवडेल !

आनंदयात्री's picture

11 Dec 2008 - 12:00 pm | आनंदयात्री

>>"कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल !

काय त्रास होईल ??
५०-१०० पाने वाचल्यावर एकदा कॅपचा किंवा वर्ड व्हेरिफिकेशन करावे लागले तर फारसा त्रास होईल असे वाटत नाही. या कॅपचामुळे जर ही बँडविड्थ दरोडेखोरी थांबली तर मोठे सर्व्हर घ्यायची किंवा हजारो रुपये खर्च करायची अजिबात गरज पडणार नाही हे मागे व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या दुरदेशींच्या हिट्स अन बँडविड्थ युसेजच्या तक्त्यांवरुन कळतेच आहे.

तरीही जर पैसे गोळा करण्याचा निर्णय झालाच तर मी प्रिमियम सदस्यत्व घेईन असा विचार आहे.

जर माझे मत विचारात घेतले जाणार असेल तर पैसे मंदिरातल्या देणगीसमान गोळा केले जावेत (गुप्तदान), मी देणगी दिली आहे की नाही किंवा दिलीच असेल तर किती दिली आहे याची माहिती व्यवस्थापनालाही नसावी.

-
आपलाच

आनंदयात्री

(सदस्य-खरडफळा संपादक)
मिसळपाव डॉट कॉम

मिपा सर्वर वरचा ताण आणि खर्च या दोन गोष्टी स्वतंत्र पणे बघितल्या पाहिजेत.

१) मिपा सर्वर वर ताण कमी करण्यासाठी -
मिपाचा पूर्ण वापर करण्यासाठी सदस्य बनणे आवश्यक करावे.
त्यासाठी येण्याची नोंद करणे बंधनकारक करणे हा एक चांगला उपाय आहे.

नवीन येणार्‍या पाहुण्यांसाठी (जे सदस्य नाहीत) दर्शनी पानाचा 'पूर्व परिक्षण' हा पर्याय देता येइल. यात
- नविन लेख/प्रतिसाद/सदस्यसंख्या वगैरे आकडेवारी,
- ४-५ लेखांचे भाग जेणे करुन त्यांना संस्थळाचे स्वरुप वगैरे समजून येइल,

२) संस्थळ उत्तरोत्तर खर्चाच्या बाबतीत स्व्ययंपूर्ण व्हावे यासाठी -
या बाबतीत मिपाचे मालक या नात्याने तात्या अभ्यंकर यांचे विचार महत्वाचे आहेत.
तरीही एक सुचवणी -
पहिल्या प्रयत्नात - स्वेच्छा वर्गणी सुरु करावी. एक 'क्रिटिकल मास' जमे पर्यंत स्वेच्छा वर्गणी आणि नंतर वर्गणी चालु करावी. वर्गणी आत्ता लगेच चालु केल्यास वाचक संख्या कमी होउ शकते. (असे मला वाटते.) अर्थात याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. खर्च/वार्षिक वर्गणी देणारी संभाव्य सभासद संख्या यात मेळ येण्यासाठी लागणारे आकडे माझ्या जवळ नाहीत पण या दिशेने विचार करता येउ शकतो. तसेच, वर्गणी देणे/हिशोब वगैरे साठी जे कष्ट/गुंतवणूक/सोयी-सुविधा मालकांना कराव्या लागतील त्याची जुळणी करायचाही विचार करायला लागेल.

जाहिरातीतून उत्पन्न वाढवता येइल हे खरेच, पण प्रथम इतर उपाय करुन बघावेत. जाहिरात विरहीत संस्थळ हाही एक महत्वाचा मुद्दा पुढे महत्वाचा ठरु शकतो.

- अभिजीत

सुनील's picture

11 Dec 2008 - 1:39 pm | सुनील

सहमत. सर्व सुचना रास्त वाटतात.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

11 Dec 2008 - 11:02 am | विसोबा खेचर

सर्वंच्या सूचनांवर आदरपूर्वक विचार केला जाईल...

सध्या मी स्वत:च खूप कामाच्या गडबडीत आहे त्यामुळे निवांतपणे विचार करायला टाईमच भेटत नाही..

तात्या.

सर्किट's picture

11 Dec 2008 - 11:07 am | सर्किट (not verified)

तात्या,

तुझा पेपॅल किंवा गूगल चेकाऊट चा नंबर कळव.

-- सर्किट

विसोबा खेचर's picture

11 Dec 2008 - 11:15 am | विसोबा खेचर

बहोत बहोत मेहेरबानी मालिक! :)

वेळ पडल्यास अगदी नक्की कळवेन...

(कृतज्ञ) तात्या.

अभिज्ञ's picture

11 Dec 2008 - 11:09 am | अभिज्ञ

फेक आय डि बाबत.
वरिल काहि सुचनांबरोबरच फेक आय डि टाळण्याकरिता,
मिपावर नवीन सभासद होण्याकरिता, सद्य कुठल्याहि ३-५ सदस्यांचा पाठिंबा असावा.
मिपावर येउन कुणि धुडगुस घालत असेल तर त्या सदस्यत्वाला पाठिंबा देणारे ५ सदस्य जबाबदार राहतील.
ह्याचा मुळ उद्देश मिपावर आपल्या माहितीमधील मंडळी यावीत असाच आहे.
स्पॅम आयडि टाळण्याकरिता गुगल मेल करिताहि सुरुवातीलाअसाच प्रकार करण्यात आला होता.

अभिज्ञ.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2008 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार

वर्गणी प्रमुख म्हणुन मी आज स्वतःला मि.पा. ला अर्पण करत आहे ;) वर्गणी गोळा करणे व त्याची योग्य ती 'विल्हेवाट' लावणे हे काम मी स्वखुशीने करिन ;)
आपलाच
हिंदु ह्रुदय राजकुमार
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

आनंदयात्री's picture

11 Dec 2008 - 12:08 pm | आनंदयात्री

तुझ्याकडे जी वर्गणी जमा होणार ती ... रिकामा बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या परवाचा ब्रेड, नासकी अंडी !
ये लवकर आमच्या बिल्डिंगची कचरी पैसे वाढवुन पाहिजे असे म्हणुन सोडुन गेलिये !!

विनायक प्रभू's picture

11 Dec 2008 - 12:24 pm | विनायक प्रभू

तात्याबा,निलकांत,
क्षमता वाढवल्याबद्दल अभिनंदन.
अवांतरः आणखी कसल्या कसल्या क्षमता वाढवु शकता ह्याचा विचार व्हावा.

दवबिन्दु's picture

11 Dec 2008 - 12:28 pm | दवबिन्दु

माकडांसारखं मोठे दगड नाही उचलता येनार पन खारुताईचा वाटा नक्की ऊचलु. काय ती खंडनी नक्की देउ.

दत्ता काळे's picture

11 Dec 2008 - 2:49 pm | दत्ता काळे

जे ठरेल ते मान्य.

लिखाळ's picture

11 Dec 2008 - 8:36 pm | लिखाळ

कार्यक्षमता वाढवण्यात यशस्वी झाल्याबद्दल आपले अभिनंदन आणि विश्रांतीनंतर कार्यक्षम मिपा लवकर सुरु केल्याबद्दल आभार. :)

नव्या रचनेमुळे मिपा बरेच जलद झाले आहे. पान उघडायला जो वेळ लागायचा तो सुद्धा कमी झाला आहे.

मिपाच्या आर्थिक बाबीमध्ये जो निर्णय सर्वांना मान्य तो मला ही मान्य.
--(शुभेच्छुक) लिखाळ.

सर्वसाक्षी's picture

11 Dec 2008 - 10:56 pm | सर्वसाक्षी

पावत्या फाड.

चांगुलपणाचा अतिरेक वाइटच रे. काहीतरी चांगले द्यावे हा तुझा अट्टाहास वाखाणण्यासारखा आहे, पण ते फुकट द्यावे असे का? अरे रस्त्याच्या कडेला टपरीवर कटिंग मारला तरी पैसे पडतात आणि पिणारे आनंदाने देतात. मग इथे कोण नाही म्हणेल?

तू , मालक आम्ही भाडेकरू. सगळे मजा करू

शितल's picture

11 Dec 2008 - 11:14 pm | शितल

पण आता मिपा चांगले स्पीड देत आहे असे निदान मला तरी जाणवले आहे. :)

संदीप चित्रे's picture

11 Dec 2008 - 11:21 pm | संदीप चित्रे

बघता स्वेच्छेने वर्गणीतून खर्च उचलण्यात काही अडचण येऊ नये.

१ - पहिल्यापेक्षा मिपाचा पान उघडायचा वेग जवळजवळ दुपटीने वाढलाय (साधारण २ ते ३ सेकंदात पान येतेच).
२ - दुहेरी प्रतिसाद यायचे प्रमाण जवळजवळ नगण्य झालेले दिसते.
३ - लेखातील चित्रे पहिल्यापेक्षा जलद उघडतात.
एकूण झालेला बदल फायदेशीर दिसतोय असे वाटते.

वर्गणीबाबत सर्वांच्या बरोबर आहे.
(शक्यतो जाहिराती टाळता आल्या तर बरे असे वाटते. साईटचा आपलेपणा जाऊन थोडे बाजारु स्वरूप येते असे माझे मत पण कदाचित काळाच्या कसोटीवर काय जास्त व्यवहारी आहे ते बघावे लागेल!)

चतुरंग

प्राजु's picture

12 Dec 2008 - 12:08 am | प्राजु

चतुरंग यांच्याशी पूर्णपणे सहमत होते..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

12 Dec 2008 - 12:07 am | विसोबा खेचर

सगळ्यांच्या मदतीच्या हाताबद्दल धन्यवाद...

वार्षिक वर्गणी, स्वेच्छा मदत इत्यादी पर्याय बरे आहेत.. अगदीच कडकी लागली किंवा खर्च मज गरीबाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला तर विनासंकोच मदत मागीन..

आपला,
(कृतज्ञ) तात्या.