स्वीडन

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
19 May 2022 - 3:36 am

स्वीडन नाटो मध्ये जाणार ह्या बातमीने स्वीडन देशाचे नाव खूप वेळा बातम्यांत आले. फिनलंड सुद्धा चर्चेत होता. कदाचित NOKIA मुळे भारतीयांना फिनलंड ची अगदी चांगली ओळख असेल. कारण नोकिया ११०० सारखे फोन १००% त्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. एकदा माझा नोकिया चुकून कपड्यासोबत वॉशिंग मशीन मध्ये पडला. दुसऱ्या दिवशी मी तांदळात ठेवला आणि २४ तासांनी तो मी नव्हेच प्रमाणे चालू झाला. कितीदा हा फोन खिशांतून पडला, मी किती वेळा फेकून मारला इत्यादी मला आठवत सुद्धा नाही. फिनिश लोक ह्या फोन प्रमाणेच चिवट आणि राकट आहेत. ह्या देशांतील सर्वच गोष्टी नोकिया प्रमाणेच अगदी भक्कम बनवलेल्या असतात. पण त्या मानाने स्वीडन आम्हाला जास्त ठाऊक नाही.

स्वीडन हा नॉर्डिक देशांपैकी एक. इतर नॉर्डिक देश म्हणजे फिनलंड, डेन्मार्क, आईसलॅंड आणि नॉर्वे. है देशाची एकूण लोकसंख्या एक कोटी आहे. म्हणजे श्री लंकेच्या किंवा मुंबईच्या अर्धी. GDP साधारण अर्धा ट्रिलियन म्हणजे मुंबईच्या दुप्पट.

स्वीडन नोबेल प्राईझ साठी खूप लोकप्रिय आहे. त्या शिवाय आता भारतात सुद्धा उपलब्ध असलेला IKEA हा ब्रँड इथलाच. पण भारतीयांना सर्वांत जास्त माहिती असलेला ब्रँड म्हणजे कदाचित वोल्वो असेल. त्याशिवाय spotify हे ऍप्प इथलेच. ABBA हा संगीताचा अजरामर बँड इथलाच. हल्ली दुर्दैवाने सर्वांत जास्त लोकप्रिय स्वीडिश व्यक्ती म्हणजे मतिमंद ग्रेटा ठाणबर्ग आहे. फोनच्या बाबतीत एके काली सोनी एरिक्सन लोकप्रिय होत्या त्यातील एरिक्सन हा ब्रँड स्वीडन मधला. सध्या आपल्या वोडाफोन आयडिया ला ५g साठी एरिक्सन मदत करत आहे. एके काळी भारतांत बोफोर्स प्रकरण गाजले होते. हि कंपनी तिथलीच.

आर्थिक गोष्टींत काही गोष्टी पायाभूत स्वरूपांत मोडतात उदाहरणार्थ शेती किंवा खनन तर काही गोष्टी ह्या उच्चतम पातळीवरच्या असतात उदाहरणार्थ जेट इंजिन निर्मिती किंवा स्पेस टेक. संपूर्ण अर्थक्षेत्राला आपण एका पिरॅमिड च्या स्वरूपांत पहिले तर सर्वांत खालच्या पातळीला निर्वाहा पुरती शेती, शारीरिक मजुरी इत्यादी येते तर सर्वांत वरच्या टोकाला आधुनिक बँकिंग, वैद्यकीय निर्मिती, विमान निर्मिती इत्यादी गोष्टी येतात. स्वीडन छोटा देश असला तरी एखाद दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून न राहता अनेक गोष्टीवर त्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. तेल, औषधे, फोन, मासे इत्यादी विविध प्रकारच्या गोष्टी स्वीडन निर्यात करतो. बहुतेक स्वीडिश कंपन्या इतर देशांत जास्त लोकांना रोजगार देतात कारण स्वीडन मधील उच्च राहणीमानामुळे तेथील मजूर त्यांना परवडत नाहीत.

पण स्वीडन ने लोकसंख्येच्या तुलनेत संरक्षण उद्योगांत नेत्रदीपक प्रगती केली आहे. साब, बोफोर्स सारख्या कंपन्या जगभरांत प्रसिद्ध तर आहेतच पण त्यांत सुद्धा स्वीडिश अभियंत्यांनी अत्त्यंत उच्च दर्जाचे काम केले आहे. साब चे विगगेन आणि ग्रीपेन लढाऊ विमाने प्रसिद्ध आहेत. दोन्ही विमाने फक्त ५०० मीटर च्या धावपट्टीवरून उडाण घेऊ शकतात आणि साधारण रस्त्यावर सुद्धा उतरू शकतात. ग्रीपेन ची खासियत म्हणजे ह्याला सर्व्हिस करण्यासाठी फक्त ६ लोकांची गरज भासते. त्यातील ५ जण चक्क अर्धप्रशिक्षित सैनिक असू शकतात. ह्याची किंमत सुद्धा तुलनेने बरीच कमी आहे आणि हे उडवण्यासाठी साधारण ८००० डॉलर्स प्रति तास खर्च येतो. राफेल साठी हाच खर्च ३०,००० पर्यंत असू शकतो. (अर्थांत दोन्ही विमानांची क्षमता सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहे).

बोफोर्स ने सर्वप्रथम लेसर गायडेड क्षेपणास्त्रे बनवली (कहिच्या मते). त्याच्याआधी किंवा आता सुद्धा इन्फ्रा रेड क्षेपणास्त्रे जास्त वापरली जातात. ह्यांत कुठलीही गरम वस्तू शोधून क्षेपणास्त्र त्याचा आपोआप वेध घेते. पण त्यापासून बचाव करण्यासाठी विमानांना फ्लेर्स असतात. फ्लेर्स म्हणजे छोटी रॉकेट्स जी विविध दिशांनी जातात आणि ती गरम असल्याने क्षेपणास्त्र गोंधळून जाते. पण लेसर मध्ये हि समस्या येत नाही. ह्या याशिवाय स्वीडन ने कार्ल गुस्ताव सारखी रेकॉइल नसलेली रायफल सुद्धा बनवली आहे.

चित्रपटांची ज्यांना आवड आहे त्यांनी कदाचित गर्ल वित ड्रॅगन टॅटू चे नाव ऐकलेच असेल किंवा कदाचित पहिला सुद्धा असेल. ह्याचा इंग्रजी रिमेक डॅनियल क्रेग ला घेऊन केला गेला होता जो तितका चांगला नाही.

https://en.wikipedia.org/wiki/The_Girl_with_the_Dragon_Tattoo_(2009_film)

इतिहास

प्रतिक्रिया

निनाद's picture

19 May 2022 - 9:06 am | निनाद

स्वीडन महायुद्ध आणि शीतयुद्ध या दोन्हींमधून औपचारिकपणे तटस्थ होता. स्वीडन परराष्ट्र व्यवहारात तटस्थतेचे अधिकृत धोरण राखून आहे. मात्र जगाला लोकशाही विषयक अक्कल शिकवण्यात पुढे असणारा स्वीडन एक राजेशाही आहे! आजही राजा कार्ल XVI गुस्ताफ हे राज्याचे प्रमुख आहेत.
बहुतेक नॉर्डिक देश डाव्या लिबरलांनी जवळपास ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे त्यांची परिस्थिती दयनिय होत जाणार आहे. गेल्या काळात ओरेब्रोमध्ये हिंसक दंगली उसळल्या या त्याचे द्योतक आहेत.

असो,
पुर्वी म्हणजे ११ व्या शतकापूर्वी, स्वीडिश लोक मूर्तिपूजक होते! जुना नॉर्स धर्म बहुदेववादी होता, ज्यामध्ये विविध देव आणि देवतांवर विश्वास होता. अगदी भारतीयांसारखे हे लोक सुद्धा राक्षस, बटू, पर्या आणि भू-आत्म्यांसह इतर विविध पौराणिक वंशांचेही वास्तव्य मान्य होते. पण ११ व्या शतकात ख्रिश्चनीकरण झाले. हे राजे धर्मांतरित झाले कारण ख्रिश्चन राज्यकर्त्यांकडून पाठिंबा मिळत असे. हा पाठिंबा पैसा आणि लष्करी मदत म्हणून मिळत असे.

त्यासाठी या राजेलोकांनी आपला पुरातन धर्म जनतेला सोडायला लावला. त्यालाही सुमारे दोनशे वर्षे विरोध झालाच. पन साम दाम दंड भेद या द्वारे ख्रिश्चन राजवट येथे लादली गेली. ख्रिश्चन राज्यकर्त्यांनी दबाव आणून, या देशाचे कायदे बदलले. फक्त ख्रिश्चन धर्माची उपासना येथे लागू केली गेली. बाकी उपासना बेकायदेशीर ठरवल्या गेल्या. त्यानंतर त्याचा पद्धतशीर रित्या विध्वंस केला गेला. ख्रिस्ताआधी येथे काहीही नव्हते येथे उपासना पद्धतीच नव्हती ते ठसवले गेले.
अगदी आता आता पर्यंत येथे इतर देवतांची पूजा करण्यास कायदेशीर मनाई होती. पण नेमके स्काने(?) skane सारख्या ठिकाणी दगडात कोरलेले देवतांचे पुरावे अजूनही दिसतात. मग बुद्धीभ्दाचे थियर्‍या मांडण्याची चढाओढ सुरू होते.

अनिंद्य's picture

19 May 2022 - 11:01 am | अनिंद्य

स्वीडन जवळून बघायची संधी मलाही मिळाली होती काही वर्षांपूर्वी. माझी एक मैत्रीण तिथल्या नौकानयन इतिहासाची संशोधक आहे आणि तिचा भाऊ तिथल्या आद्यनिवासी लोकांच्या संस्कृतीचा डॉक्टरेट - प्राध्यापक.

कधी मूड लागला तर स्वीडनबद्दल लिहीन.

सुबोध खरे's picture

19 May 2022 - 11:17 am | सुबोध खरे

ग्रीपेन विमाने राफेल पेक्षा स्वस्त आहेत हि वस्तुस्थिती असली तरी स्वीडन ने पाकिस्तानला SAAB २००० AWACS विकली आहेत शिवाय स्वीडनने ERIEYE Erieye airborne early warning and control (AEW&C) system हि पण पाकिस्तानला विकलेली आहे ज्यामुळे पाकिस्तान ला विंग कमांडर अभिनंदन वर्तमानचे विमान पाडण्यात यश मिळाले. त्यांच्या ग्रीपेन या विमानांची डेटा लिंक प्रणाली पाकिस्तानला थोडी फार माहिती असण्याची बरीच शक्यता आहे.

याशिवाय ग्रीपेन हे एक इंजिन असणारे विमान आहे तर राफेल २ इंजिने असलेले. युदधत दोन इंजिने नेहमीच जास्त उपयुक्त ठरतात. बाकी प्रत्येक बाबतीतच राफेल हे ग्रीपेनपेक्षा वरचढ आहे.

याशिवाय स्वीडनला जागतिक राजकारणात फ्रांस इतकी किंमत अजिबात नाही. फ्रान्स कडे युनोच्या सुरक्षा समितीत मध्ये व्हेटोची शक्ती आहे आणि युनो मध्ये राजकीय वजन सुद्धा आहे आणि ते त्यांनी अनेकदा भारताच्या बाजूने वापरलेले सुद्धा आहे.

हे वजन स्वीडन कडे नाही

त्यामुळे असे अब्जावधी रुपयांचे मेगा डील असेल तर त्यात केवळ किंमत हा एकच निकष लावला जात नाही.

पण

मतिमंद ग्रेटा ठाणबर्ग

हे खटकले. पर्यावरण , ग्लोबल वॉर्मिंग याबद्दल जनजागृती करणारी ग्रेटा मतिमंद ?ग्रेटा वा एकूणच पर्यावरणवाद्यांचे काही मुद्दे न पटणारे असू शकतील पण म्हणून त्यांची अशी अवहेलना करणे योग्य वाटत नाही.
असो.

sunil kachure's picture

19 May 2022 - 12:57 pm | sunil kachure

अशा कॉमेंट लेखात असल्या मुळे ह्या लेखाची ची किंमत झीरो झाली आहे.
अशा कॉमेंट टाळाव्यात.

कॉमी's picture

19 May 2022 - 7:13 pm | कॉमी

सहमत...

बाकी व्हायकिंग लोकांवरचा द नॉर्थमन नावाचा धांसू सिनेमा नुकताच पाहिला. हॅम्लेटच्या कथेचे मूळ असलेली नॉर्डीक कथा!

डाम्बिस बोका's picture

20 May 2022 - 8:45 pm | डाम्बिस बोका

माहिती आवडली, पण लेखापेक्षा चर्चेचे मुद्दे जास्ती आहेत.
"मतिमंद ग्रेटा ठाणबर्ग" हा उल्लेख खटकतो. आपण मताशी असहमत असू शकता, परंतु असा उल्लेख योग्य वाटलं नाही.

बाकी एवढा छोटासा देश असून त्यांची तंत्रज्ञानातील प्रगती वाखाण्याजोगी आहे.

जेम्स वांड's picture

19 May 2022 - 11:46 am | जेम्स वांड

फिनिश लोक ह्या फोन प्रमाणेच चिवट आणि राकट आहेत.

थोडं विषयांतर होईल इथे पण फिनिश लोकांच्या चिवटपणाचा ब्रँड अँबेसेडर म्हणाला तर एकच माणूस लक्षात येतो तो म्हणजे सिमो हाया

फिनिश लॅपलॅंड ट्राइब्ज पैकी एकात जन्मलेल्या सिमोला दुसऱ्या महायुद्धात रशियन सैनिक भययुक्त आदराने "व्हाईट डेथ" म्हणत असत, कारण सिमो एक स्नायपर रायफल एक्सपर्ट सैनिक होता, सहसा आपण जेव्हा स्नायपर किल्स आणि सुप्रसिद्ध स्नायपर सैनिक ह्यांच्याबद्दल बोलतो तेव्हा दुसऱ्या महायुद्धातीलच स्टॅलिनग्राडचा नायक असलेला वासिली झायतसेव्ह लोकांना माहिती असतो (एनिमी एट द गेट्स सिनेमामुळे) किंवा आधुनिक युद्धात अमेरिकन स्नायपर (पुन्हा सिनेमा) म्हणून सुप्रसिद्ध असलेला क्रिस कायल माहिती असतो, पण व्हाईट डेथ तितकासा माहिती नसतो, सिमोनं पूर्ण महायुद्धात जवळपास ५०० किल्स फक्त स्नायपर (मोसीन नागांत रशियन मेक रायफल वापरून) केल्याचे सांगितले जाते. ह्या सगळ्यात त्याला फक्त एकदा एका रशियन प्रतिस्पर्धी स्नायपरची एक गोळी गालाला चाटून गेली होती, ज्याच्यात त्याचा एकीकडचा जबडा जखमी होऊन चेहरा विद्रुप झाला होता. १९०५ साली जन्मलेला सिमो हा २००२ साली नैसर्गिक कारणाने वारला, त्याला रूकोल्हाती चर्च, साऊथ करेलिया, फिनलंड इथे पुरलेले आहे आणि त्याच्या ग्रेव्ह-स्टोन वर कोरलेली अक्षरे आहेत

Home - Religion - Fatherland

किंवा

घर - धर्म - पितृभूमी

.

नखशिखांत पांढऱ्या कॅमोफ्लाजमध्ये रंगलेला सिमो

.

रशियन स्नायपरच्या प्रतिहल्ल्यात चेहरा विद्रुप झालेला उतारवयात असलेला सिमो

देशात सु. ९६,००० सरोवरे असून त्यांनी एकूण भूक्षेत्राच्यासु. ८.३% क्षेत्र व्यापले आहे. त्यांपैकी व्हेनर्न (क्षेत्रफळ ५,५४५ चौ. किमी.), व्हेटर्न (१,८९८ चौ. किमी.), मेलारन (१,१४० चौ. किमी.), येल्मरन (८७९ चौ. किमी.) ही देशातील प्रमुख सरोवरे असून ती सर्व जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. पर्वतीय प्रदेशातीलअनेक सरोवरे लांबट व अरुंद असून त्यांना फिंगर लेक असे संबोधले जाते. त्यांतून मोठ्या प्रमाणावर लाकडाच्या ओंडक्यांची वाहतूक केली जाते. सिल्यान हे अतिशय सुंदर सरोवर असून पर्यटनाच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध आहे. यत हा देशातील प्रसिद्ध कालवा असून त्याच्या साहाय्यानेपूर्व किनाऱ्यावरील स्टॉकहोम हे राजधानीचे शहर नैर्ऋत्य किनाऱ्यावरील यतेबॉर्य या शहराशी जोडले आहे. त्याशिवाय व्हेटर्न सरोवराच्या दक्षिण टोकाशी असलेले यन्चंपिंग शहर आणि मध्यवर्ती सखल भूमीतील अनेक शहरे या कालव्याने एकमेकांना जोडली आहेत. व्हेनर्न आणि व्हेटर्न ही दोन सरोवरेही या कालवाप्रणालीचे भाग आहेत. त्याशिवाय येल्मरन, स्ट्रॉमशॉल्म व ट्रॉलहेटन हे देशातील इतर महत्त्वाचे कालवे आहेत.

ही माहिती मराठी विश्वकोश मधून कॉपी पेस्ट केली आहे.
स्वीडन ह्या देशात विपुल खनिज संपत्ती पण आहे.पाण्याची कमतरता नाही.निसर्गाने भरभरून दिले आहे.
कमी लोकसंख्या आणि त्या मानाने खूप मोठे क्षेत्र फळ ह्या देशाचे आहे.

निसर्गाला किरकोळ समजणाऱ्या लोकं विषयी भयंकर तिरस्कार माझ्या मनात तरी आहे.
मानवी जीवन,आता जी काही आधुनिक साधन आहेत ती सर्व निसर्ग नी दिलेल्या खनिज पासून च निर्माण झाली आहेत.
पृथ्वी हे तापमान वाढले तर की होईल ह्यांची झलक मुंबई मध्ये आता च मिळत आहे 40ते045 डिग्री तापमान पण माणसाला सहन करणे अवघड जाते.
कडेलोट असा पहिला शिक्षेचा प्रकार होता.
तसा पृथ्वी लोट असा प्रकार असता तर निसर्गाच्या दुश्मन लोकांचा पृथ्वी लोट करावा असाच हिंसक विचार मनात आला असता.

निसर्गाला किरकोळ समजणाऱ्या लोकं विषयी भयंकर तिरस्कार माझ्या मनात तरी आहे.
मानवी जीवन,आता जी काही आधुनिक साधन आहेत ती सर्व निसर्ग नी दिलेल्या खनिज पासून च निर्माण झाली आहेत.
पृथ्वी हे तापमान वाढले तर की होईल ह्यांची झलक मुंबई मध्ये आता च मिळत आहे 40ते045 डिग्री तापमान पण माणसाला सहन करणे अवघड जाते.
कडेलोट असा पहिला शिक्षेचा प्रकार होता.
तसा पृथ्वी लोट असा प्रकार असता तर निसर्गाच्या दुश्मन लोकांचा पृथ्वी लोट करावा असाच हिंसक विचार मनात आला असता.

नगरी's picture

19 May 2022 - 5:48 pm | नगरी

छान आणि महितीपूर्ण लेख व प्रतिसादही.
ग्रेटा बद्दलही सहमत. त्यात कोणी दुःखी होण्याची काही गरज नाही.निसर्गाची किंमत आणि त्याबद्दलची तळतळ कोणत्याही विकसित देशात दिसत नाही, नुसतेच जागतिक परिषदा घेणे आणि शोक व्यक्त करणे पुरेसे नाही, आणि शिवाय ग्रेटासारख्या 'प्रायोजित कार्यक्रमाला' तर मुळीच किंमत दिली नाही पाहिजे

sunil kachure's picture

19 May 2022 - 7:17 pm | sunil kachure

जवळ जवळ सर्व विकसित देश आकाराने मोठे आहेत.लोकसंख्येच्या प्रमाणात,अगदी सिंगापूर पण सिटी country घेतला तरी.
तेथील नद्या आज पण स्वच्छ आहेत,समुद्र किनारे स्वच्छ आहेत.त्यांच्या मोठा भू भाग आहे.विविध जैव विविधता त्यांनी जपली आहे.अगदी चीन पण भारता पेक्षा मोठा आहे.त्यांनी त्यांची नैसर्गिक संपत्ती जपली आहे.
अमेझॉन सारखी मोठी जंगल अमेरिकेत आहेत,रशिया विषयी तर बोलायला च नको.ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड, व्हिएतनाम च प्रदेश,जपान सर्व देशात विपुल नैसर्गिक संपत्ती आहे.
भारतात गंगा,यमुना ह्या सारख्या महत्वाच्या नद्या गटार गंगा झाल्या आहेत.
देशातील बहुतेक सर्व नद्या प्रदूषित आहेत.
विकसित देश पर्यावरण ची काळजी घेत नाहीत हा साफ चुकीचा दावा आहे.

सौन्दर्य's picture

19 May 2022 - 11:01 pm | सौन्दर्य

आपला भारत सर्व दृष्टीने आघाडीवर आहे, (उडदा माजी काळे गोरे, हे असायचेच) फक्त प्रचंड लोकसंख्या हा त्याला मिळालेला शाप आहे. लोकसंख्या आटोक्यात आणा (१०० कोटीच्या खाली) आपला देश पृथ्वीवरचा स्वर्ग बनेल.

जेम्स वांड's picture

20 May 2022 - 8:00 am | जेम्स वांड

डेमोग्राफीक डिव्हीडंट अन लारजेस्ट एव्हरेज यंग पॉप्युलेशन वगैरे ढकोसलेबाजीतून आपण लवकर बाहेर पडलेले बरे. आधी एआय/ एमएल, एनएलपी वगैरेत भयानक प्रगती होतेय, लवकरच ऑटोमेशन हा की वर्ड होईल (काही अंशी झालाच आहे) अश्यावेळी काही शे वर्षांनी कामं करायला मशिन्स अन माणसे फक्त युनिव्हर्सल बेसिक इन्कम वर राहणे कॉमन होऊ शकते, त्यात आपली पॉप्युलेशन जास्त त्यामुळे रिसोर्सेसवर भयानक स्ट्रेस यायची शक्यता असतेच, आज भरपूर असलेली तरुणाई उद्या म्हातारी होणार आहेच त्यासोबत पॉप्युलेशन ग्रोथ स्टेबिलायजेशन आले तर आपली अवस्था जर्मनीसारखी होऊ शकेल, त्यांच्याकडे तरी मूठभर लोकसंख्या आहे आपल्याला इतकी म्हातारी माणसे पोसणेबद्दल विचार करावाच लागणार, प्रत्येकाला काम देणे आपल्या व्यवस्थेत निव्वळ अशक्य आहे ते अजूनही जात दुष्कर होत जाणार अन ओव्हरऑल सामाजिक घडी अस्थिर व्हायला वेळ लागणार नाही

डाम्बिस बोका's picture

20 May 2022 - 8:52 pm | डाम्बिस बोका

अती प्रचंड लोकसंख्या भारतासाठी मारक आहे. कितीही प्रगती केली किंवा नैसर्गिक साधने असली तरी हि अती प्रचड लोकसंख्या त्याला गिळकृत करते.

"
आपला भारत सर्व दृष्टीने आघाडीवर आहे, (उडदा माजी काळे गोरे, हे असायचेच) फक्त प्रचंड लोकसंख्या हा त्याला मिळालेला शाप आहे. लोकसंख्या आटोक्यात आणा (१०० कोटीच्या खाली) आपला देश पृथ्वीवरचा स्वर्ग बनेल.
"

६० -७० कोटी लोकसंख्या झाली तर आपण जगातले सर्वात ताकतवान राष्ट्र होऊ

श्रीरंग_जोशी's picture

20 May 2022 - 10:28 pm | श्रीरंग_जोशी

प्रचंड लोकसंख्या हा शाप असणे या मताबाबत असहमत आहे.

आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या घनतेच्या जवळपास पावणेतीनपट घनता बांग्लादेशच्या लोकसंख्येची आहे. तरीदेखील त्यांनी दरडोई उत्पन्नात आपल्याला काही वर्षांपूर्वी मागे टाकले. अमेरिका (युएसए) देशाचे उदाहरण घेतले तरी वर्षभर सहजपणे राहण्याजोग्या भूभागावरच्या लोकसंख्येच्या घनतेचा विचार केल्यास भारताएवढी नसली तरी अमेरिकेच्याही लोकसंख्येची घनता बरीच आहे. अमेरिका व भारत यांच्या दरडोई उत्पन्नाची तुलनाही होऊ शकत नाही इतका मोठा फरक आहे. या बाबतीत अनेक गुंतागुंतीचे घटक असतात हे मान्य आहेच.

सतत लोकसंख्येच्या मुद्द्याचा बाऊ करण्यापेक्षा दर्जेदार शिक्षणाला व उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिल्यास आपणही आजवर ज्या वेगाने केली आहे त्यापेक्षा लक्षणीयरीत्या अधिक वेगाने प्रगती करु शकू. सार्वजनिक शिस्तीबाबत गांभीर्य नसणे हा देखील मोठा अडथळा आहे.

बाकी स्वीडनची थोडक्यात ओळख करुन देणारा लेख आवडला.                         

सौन्दर्य's picture

20 May 2022 - 11:20 pm | सौन्दर्य

माझ्या मते ह्या प्रचंड असलेल्या लोकसंख्येमुळे अनेक दुष्परिणाम आपण पाहतो/अनुभवतो आहोतच. भारतापुढे असलेला कोणताही प्रश्न घ्या त्याचा उगम ह्या न त्या प्रकारे लोकसंख्येशी निगडित आहे. तुम्हीं म्हटलेलं 'दर्जेदार शिक्षण' कोणाला व कसे मिळते ? १०% उच्च बुद्धिमत्ता असलेली मंडळी सोडली तर बाकीच्या लोकांना ते दर्जेदार शिक्षण मिळविण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. खुपश्या शैक्षणिक संस्थां शहरातच आहेत, त्यामुळे भौगोलिक अडथळे पार करावे लागतात. भरमसाठ ट्युशन फी अनेक गरीब पण होतकरू मुलांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित करते. ज्यांच्याकडे पुरेसा पैसा आहे त्यांना रिझर्वेशनच्या अडथळ्यामुळे इतर देशांचा आसरा घ्यावा लागतोय. आणि जर खोलात जाऊन विचार केलात तर तुम्हाला हे पटेल की ह्या मागचे मूळ कारण आपली अफाट लोकसंख्या आहे. ज्यावेळी एका सीटसाठी पाचशे/हजारावर अर्ज येतात त्यावेळी हे अर्ज देशातील प्रजेचेच आहेत हे सहज कळून येतं.

महागाई, भ्रष्टाचार, गुंडागर्दी, पोखरलेली सरकारी यंत्रणा, मूलभूत आरोग्य सेवेचा तुटवडा ह्यामागे अफाट लोकसंख्येचाच हात असतो असे मला वाटते. असो.

मूळ लेख स्वीडन विषयी आहे जो अतिशय माहितीपूर्ण आहे त्यामुळे त्याचाच आपण आस्वाद घेऊ या.

श्रीरंग_जोशी's picture

20 May 2022 - 11:38 pm | श्रीरंग_जोशी

हो, मूळ लेखावरचे अति-अवांतर टाळायलाच हवे.

बहुतांश भारतीयांप्रमाणे मी देखील प्रत्येक वेळी भारताच्या प्रचंड लोकसंख्येला दोष देऊन मोकळा व्हायचो. पण वर्षभर राहण्यासारखे हवामान असणार्‍या भूभागावरची लोकसंख्येची घनता हे परिमाण लावले असता भारताच्या घनतेएवढी किंवा भारताहून अधिक घनतेचे देशही अधिक वेगवान प्रगती करताना दिसतात. प्रचंड लोकसंख्या या एका मुद्द्याला दोष दिला की इतर सुधारणांना महत्त्व देण्याची अनेकांना गरजच वाटत नाही म्हणून हा उपप्रतिसादप्रपंच.

तर्कवादी's picture

23 May 2022 - 3:51 pm | तर्कवादी

सार्वजनिक शिस्तीबाबत गांभीर्य नसणे हा देखील मोठा अडथळा आहे.

मी लोकांना रस्त्यावर कचरा टाकताना बघतो (तेसुद्धा काही पावलांवरच महापालिकेची कचरापेटी असताना) किंवा नदीत निर्माल्य टाकू नये अशी स्पष्ट सुचना लिहिलेली असून आणि त्याकरिताच (चिंचवड- धनेश्वर पुल) उंच जाळी बसवलेली असूनही जाळीच्या वरुन निर्माल्य नदीतच फेकणारे महाभाग मी बघतो , सिग्नल मोडणारे, १०० मीटरवरुन यु टर्न करुन येण्याऐवजी विरुद्ध दिशेने २०० मीटर वाहन चालवणारे लोक बघतो तेव्हा यात लोकसंख्येचा संबंध काय हा प्रश्न पडतो. सार्वजनिक जीवनातल्या बेशिस्तीची उदाहरणे अनेक आहेत, अनेक प्रकारची आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आहेत फक्त अपवाद म्हणून नाहीयेत.. शिस्त पाळणारेच बहूधा अल्पसंख्याक असावेत :)
या बेशिस्तिचा लोकसंख्येशी खरेच संबंध आहे का ?

दर्जेदार शिक्षणाला व उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिल्यास आपणही आजवर ज्या वेगाने केली आहे त्यापेक्षा लक्षणीयरीत्या अधिक वेगाने प्रगती करु शकू

बरोबर आहे - दर्जेदार शिक्षण दूर राहिले. अनेक अर्धशिक्षित म्हणजे दहावी वा बारावी उत्तीर्ण असलेल्या लोकांनाही चार वाक्यं नीट लिहिता येत नाहीत...यात लोकसंख्येचा संबंध फारसा नसावा. शिक्षण - किंबहूना हाती घेतलेले कोणतेही काम पुर्ण गांभीर्याने कराय्ला हवे ही वृत्ती असायला हवी.. "चालतंय कसही" हा दृष्टीकोन मारक आहे. मुलांना परीक्षेत कॉपी करण्यास प्रोत्साहन देणारे, मदत करणारे पालक या देशाच्या प्रगतीचे शत्रु आहेत.

काड्यासारू आगलावे's picture

20 May 2022 - 10:48 pm | काड्यासारू आगलावे

असा प्रयत्न संजय गांधींनी खुप आधीच केला होता. त्यावेळी त्यांनी १ कोटी लोकांची नसबंदी केली होती (जनसंघींनी अफवा पसरवली होती की काहींची जबरजस्तीनेही केली होती). देशासाठी प्रत्यक्ष काम करनारे नेते होते संजय गांधी टेलिप्रांम्पटर वर वाचून भाषणं देण्याने देश ताकदवान होत नाही तर प्रत्यक्ष काम केल्याने होतो.

सुबोध खरे's picture

19 May 2022 - 7:51 pm | सुबोध खरे

अमेझॉन सारखी मोठी जंगल अमेरिकेत आहेत

कुठल्या अमेरिकेत आहेत हो?

sunil kachure's picture

19 May 2022 - 8:02 pm | sunil kachure

The Americas, which are sometimes collectively called America,[4][5][6] are a landmass comprising the totality of North and South America.[7][8][9] The Americas make up most of the land in Earth's Western Hemisphere and comprise the New World.[4]

सुबोध खरे's picture

20 May 2022 - 10:24 am | सुबोध खरे

अमेझॉन सारखी मोठी जंगल अमेरिकेत आहेत,रशिया विषयी तर बोलायला च नको.ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड, व्हिएतनाम च प्रदेश,जपान सर्व देशात विपुल नैसर्गिक संपत्ती आहे.

कुठे उत्तर दक्षिण अमेरिका आणि कुठे व्हिएतनाम न्यूझीलंड आणि जपान

सर्वाना एकाच मापात तोलताय?

चालू द्या तुमचं टंकन

निनाद's picture

20 May 2022 - 5:47 am | निनाद

मतिमंद ग्रेटा ठाणबर्ग आहे एकदम भारी एका शब्दात या फालतू व्यक्तीची वासलात लावलीत!

चंद्रसूर्यकुमार's picture

20 May 2022 - 11:49 am | चंद्रसूर्यकुमार

मतिमंद ग्रेटा ठाणबर्ग आहे एकदम भारी एका शब्दात या फालतू व्यक्तीची वासलात लावलीत!

greta

sunil kachure's picture

20 May 2022 - 12:52 pm | sunil kachure

१९ वर्षाची मुलगी आहे.world economic forum मध्ये तिने स्पीच दिले आहे, कॅनडा,ब्रिटन अशा विविध देशांच्या पार्लमेंट मध्ये तिने speech दिले आहे
तिला ही संधी मिळाली आणि तिच्या मताची दखल घेणे जगातील l लोकांना गरजेचे वाटले.
तिला मतीमंद म्हणणे म्हणजे अती च झले.
विचार पटत नसतील तर तिचा प्रतिवाद करा.

मतीमंद मुली ल वर्ल्ड इकॉनॉमिक forum मध्ये speech द्यायला बोलावले म्हणजे बोलवणारे महा मती मंद असले पाहिजेत.

इरसाल's picture

20 May 2022 - 1:16 pm | इरसाल

मतीमंद मुली ल वर्ल्ड इकॉनॉमिक forum मध्ये speech द्यायला बोलावले म्हणजे बोलवणारे महा मती मंद असले पाहिजेत.
या हिशोबाने ते "सतत मोबाईलधारी तरुण तुर्क" जे पंतप्रधान बनणार आहेत त्याबद्दल काय म्हणाल.

sunil kachure's picture

21 May 2022 - 8:59 am | sunil kachure

तुमच्या प्रतिसाद वरून असे वाटत तुम्ही राहुलजी ना नेते मानतात त्यांच्या विषयी बोलत आहे.
पण मला नाही वाटत राहुल गांधी बुध्दीमान नाहीत असे.
राजकीय डावपेचात तरबेज नसतील,विविध drame त्यांना करता येत नाहीत . है पण मान्य.
त्यांना लोकांच्या भावना भडकवता येत नाहीत हे पण मान्य.
पण त्यांना देशाच्या समस्या माहीत आहेत.लोकशाही च गरज माहीत आहे.देशाच्या समस्या कशा सोडवल्या जातील ह्या बाबत ते निर्णय घेवू शकतात.
ते पंतप्रधान झाले तर निश्चित देशाला योग्य दिशेने घेवून जातील.

तर्कवादी's picture

20 May 2022 - 1:26 pm | तर्कवादी

विचार पटत नसतील तर तिचा प्रतिवाद करा.

सुनीलजी, मुद्देसूद आणि योग्य प्रतिसाद लिहिलात.
अशाच प्रकारे लिहित चला.
पण काही वेळा तुम्ही अधिक भावूक होवून किंवा थोडं घाई गडबडीने लिहिता तेव्हा मुद्दा बरोबर असूनही प्रतिसाद परिणामकारक होत नाही. ते टाळा असे मी सुचवेन.

चंद्रसूर्यकुमार's picture

20 May 2022 - 9:33 am | चंद्रसूर्यकुमार

स्वीडनवरील लेख आवडला. याबरोबरच त्या देशाच्या अर्थकारणावर थोडे अधिक (कदाचित स्वतंत्र लेखात) लिहिता येईल का?१९५० च्या दशकात फुकाच्या विचारवंती गोष्टींच्या मागे लागून स्वीडनमध्ये सरकारचे अर्थकारणातील स्थान खूप वाढले आणि त्यामुळे त्या देशाचा तोटा झाला यावर अनेक लेख ऑस्ट्रीयन बाजूकडून आले आहेत. अर्थातच स्वीडन हा काही समाजवादी देश नाही ,प्लॅन्ड अर्थव्यवस्था वगैरे तिथे नाही. पण अर्थकारणात सरकारचे स्थान तिथे खूप जास्त आहे हे पण खरे.

अलीकडच्या काळात, विशेषतः २०१६ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांच्या वेळेस बर्नी सँडर्सने स्वीडन, डेन्मार्क वगैरे देश कसे समाजवादी आहेत असा प्रचार केला होता. नंतरच्या काळात डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी स्वतः 'आपला देश समाजवादी नाही' हे अमेरिकेतील एका व्याख्यानात जाहीरपणे सांगितले होते.

कॉमी's picture

21 May 2022 - 12:01 pm | कॉमी

मेडिकेअर फॉर ऑल, मिनिमम वेज इत्यादी गोष्टींना रिपब्लिकन पक्षाकडून सोशालिस्ट नावाखाली रंगवण्याचे प्रयत्न होतात, आणि बरणी सँडर्सचं "समाजवादी" असणं सुद्धा कल्याणकारी राज्यापुरत मर्यादित आहे हे तुम्ही मान्य कराल अशी आशा आहे. त्यामुळे बरणी ने स्वतःच्या पॉलिसीचा समर्थनार्थ नॉर्डीक देशांचा आधार घेणे चुकीचे नाही.

sunil kachure's picture

20 May 2022 - 11:01 am | sunil kachure

१) स्वीडन मध्ये २५ टक्के रोजगार हा पब्लिक सेक्टर मध्ये आहे असे Google सांगते.
२) त्यांची बहुतेक जंगल खासगी मालकीची आहेत हे वाचून धक्काच बसला.
३) स्वीडन ची अर्थ व्यवस्था फ्री trade वर जास्त अवलंबून आहे. बाहेरील जगात गडबड झाली आणि देशांनी बंधन टाकली तर स्वीडन रसातळाला जाईल.
४)अभियांत्रिकी ,ऑटोमेशन थोडक्यात नवीन तंत्र ज्ञान ह्या वर जास्त अवलंबून आहे.
प्रतेक गोष्ट तिथे होते नाही.प्रतेक क्षेत्रात ते पुढे नाहीत.
थोडक्यात स्वलंबी नाहीत.
५)महागाई खूप आहे.
तुलना केली तर.
भारत दुसऱ्या देशांवर कमी प्रमाणात अवलंबून,
भारताचे स्वतःचे असे मार्केट आहे.
प्रतेक गोष्ट भारतात होते.
जगात काही ही गडबड झाली किंवा भारतावर बंधन टाकली गेली तरी भारत थोडा हलेल.पण रसातळाला जाणार नाही.
अनेक मंदी काळात हे दिसून आले आहे.
युरोपियन देश म्हणजे सर्व गोड गोड च असे नाही.
स्वयं रोजगार हे भारतात जितके उपलब्ध आहेत तितके ह्या प्रगत देशात नसावेत असा माझा आपला एक अंदाज आहे.
कोणाची तरी नोकरी करणे हाच एकमेव पर्याय तेथील जनतेकडे असावा.
सर्वांगीण विकास साठी स्वयं रोजगार,आणि लहानलहान उद्योग हे खूप गरजेचे आहेत.
चीन पण ह्याच्या कडे लक्ष देतो.
फक्त मोठमोठ्या कंपन्या असणे म्हणजे विकास नक्कीच नाही.

गामा पैलवान's picture

20 May 2022 - 6:57 pm | गामा पैलवान

साहना,

लेख आवडला. माहितीपूर्ण आहे. आज स्वीडन म्हंटलं की मला कोकण रेलवे आठवते. कारण की बोगदे खोदाईची यंत्रं स्वीडिश होती. मला आठवतं त्याप्रमाणे सदर आस्थापनाचे लोकं स्वीडनहून कोकणात येऊन काम कसं चालतं ते पाहून गेले होते. त्यावेळेस अशा अवघड ठिकाणी रेलवे बांधता येते याबद्दल आश्चर्यमिश्रित कौतुक प्रकट केलं होतं.

एक इंग्रजी लेख सापडला : https://www.sida.se/en/publications/swedish-contribution-to-the-konkan-r...

आ.न.,
-गा.पै.

सौंदाळा's picture

20 May 2022 - 8:39 pm | सौंदाळा

स्वीडन म्हटले की पिंपरी चिंचवडमधील अ‍ॅट्लास कॉप्को, अल्फा लव्हाल आणि सँडविक या एका ओळीत असलेल्या ३ स्वीडीश कंपन्या डोळ्यासमोर येतात. १९५५-६० च्या दरम्यान चालू झालेल्या या कंपन्यानी या भागातील अनेकांना रोजगार मिळाले. याभागाचे नाव पण स्वीनगर असे ठेवले होते. कंपनीच्या पत्त्यामधे तरी तसेच असायचे आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन सेवानगर झाले. आता तर हे नाव फक्त पत्त्यापुरते राहिले आहे. असो
स्वीडनशी आमचा संबंध येवढाच.
शिवाय दर वर्षी वर्ल्ड सॅटिसफॅक्शन इंडेक्स मधे स्वीडन आणि आजूबाजुचे नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क वगैरे देश टॉपला असतात हे वाचून तेथील नागरीकांचा हेवा वाटतो.