नवीन वर्ष आणि स्वयंसुधारणायोजना - तुमचा काय बेत??

Trump's picture
Trump in जनातलं, मनातलं
2 Jan 2022 - 12:19 pm

प्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.

नवीन वर्ष आणि स्वयंसुधारणायोजना आखणे, काही नवीन नाही.
सध्या माझा भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) वापर बराच वाढला आहे. त्यामुळे इतर शारीरिक आणि मानसिक त्रास सुरु झाले आहेत आणि होत आहेत.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी काही सुधारणा करणे आवश्यक आहे.
मी नवीन वर्षामध्ये भ्रमणध्वनीचा वापर कमी, म्हणजे ज्या कामांसाठी भ्रमणध्वनी लागतो अशीच कामांसाठी फक्त, करण्याचे ठरवले आहे.

----------------------------------

तुमची काय योजना आहे?

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Jan 2022 - 7:46 pm | मुक्त विहारि

मी पण मोबाईलचा वापर खूपच कमी केला आहे ...

मुक्त विहारि's picture

2 Jan 2022 - 8:02 pm | मुक्त विहारि

जितके होईल तितके स्वदेशी वस्तूच खरेदी करणार

लॉकडाउनपासून घरून काम सुरु असल्याने वाढलेला पोटाचा घेर (३६ इंच), ३० जून २०२२ पर्यंत पूर्ववत (३२ इंच) करण्याचा निश्चय केला आहे आणि त्यावर २ जानेवारी २०२२ (आज) पासून काम सुरु केले आहे.

मोबाईल चा वापर प्रचंड आहे, बोलण्यासाठी कमी, नेट साठी जास्त होतोय.. ना खेद ना खंत.
काही आठवड्यापासून रोज 16-17 तास intermittant fasting करतोय, कंबख्त वजनाच्या platua तोडला आणि उतार सुरु केलाय,2 किलो कमी झालंय.
साठी पार करून 2 महिने झाले, आव्हान म्हणून WA गीता परिवार गटावर,गीता अध्याय 12 आणि 15 वाचायचा सराव करून मोबाईल वर गीता गुंजन प्रमाणपत्र मिळवले.
त्या आधी 60km सायकल चालवून 61वा वाढदिवस साजरा केला.
आठवड्यातून 3 वेळा 5 किमी धावतो.
(आता जिम मध्ये थोडे वजनं उचलायला सुरवात केलीय..)
पायथॉन प्रोग्रॅमिन्ग शिकायला 2 वर्षांपासून सुरवात केली आहे, पुन्हा zoom क्लास वर शिकतोय, माझ्या youtube वर काही बाही video टाकत असतो, पायथॉन स्वतःला शिकवण्याचे पण video टाकलेत.
ब्लॉग लेखन सुरूच आहे.
Smule app वर duets गाणे सुरु करून वर्षात 387 duets गायलीत.
शेवगा कंत्राटी शेती दिड वर्षे केली,पण मित्रा चे करोना ने निधन झाल्याने, शेती बघणारे कोणी नसल्याने दोडून दिले...
हजारो ख्वाहिशें ऐसी,
की एकेक पर दम निकले

असे सुरु आहे.

ह्याचे अनुभव लिहाल का?

नगरी's picture

4 Jan 2022 - 5:45 am | नगरी

तुमची गाणी ऐकायला आवडेल

पायथॉन स्वतःला शिकवण्याचे पण video टाकलेत.

तुमच्या यु ट्यूब व्हिदिओ ची लिंक मिळेल का?

योगेश कोलेश्वर's picture

3 Jan 2022 - 2:53 pm | योगेश कोलेश्वर

दारू पिणे कमी करणार..रविवार to रविवार

तुषार नातू...

9850345785

दारू पिणे नक्कीच कमी होऊ शकते ...

योगेश कोलेश्वर's picture

3 Jan 2022 - 4:32 pm | योगेश कोलेश्वर

धन्यवाद सर..लागलीच तुषार नातू नशी संपर्क करतो

कंजूस's picture

4 Jan 2022 - 5:55 am | कंजूस

त्या सोडण्याचा बेत अजिबात करू नये. त्या वेळ आली की आपोआप सुटतील.