मनोनाट्य

Primary tabs

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
24 Dec 2021 - 4:37 pm

कशाला त्या सायकियाट्रिस्टच्या डोंबल्यावर पैसे घालायचे? घडा घडा बोलावं. धडाधडा काम करावीत. रिकाम मन सैतानाचे घर. रिकामटेकडेपणातून हे नसते उद्योग सुचतात. तो काय सांगणार? आम्ही जे सांगतो तेच ना! मित्रमंडळींशी, घरच्यांशी शेअर करा, बोला. कामात गुंतवून घ्या! पण फी देउन हेच ऐकल की बरं वाटत. आम्ही सांगितलं तर त्याची किंमत नाही. प्रत्येक गोष्टीवर शंका घेत बसले की मग नस्ते आजार मागे लागतात. हे होतय ते होतयं. लवंग खाल्ली कि उष्णता होती आन वेलची खाल्ली की सर्दी होते. आम्ही बघा! जातो का उठसुट डॉक्टर कडे? आपली रोगप्रतिकार शक्ती असतेच ना! एकदा औषध गोळ्या मागे लागल्या कि घेत बसा आयुष्यभर. हा डॉक्टर पटला नाही तर कि तो डॉक्टर. दुष्टचक्रात अडकायच. सगळे मेले लुटायलाच बसलेत. इथेतर बकरा स्वत:हून येतोय. त्या आरोग्य पुरवण्या वाचल्या की प्रत्येक रोग आपल्यालाच झाला आहे असे वाटायला लागते. मी नाही वाचतं हे असल काही! स्वत:चे फाजील लाड करायचे नाहीत. भरपुर पैसा कमवावा.भरपुर खर्च करावा. कशाला आंथरुण पाहून पाय पसरायचे? आंथरुण वाढवा ना! आनंदी जगावं. मौजमजा करावी. काही केमिकल लोच्या वगैरे नसतात. सायकियाट्रिस्ट लोकांनी पसरवलेल खूळ आहे.हे सगळे रिकमटेकड्या मनाचे खेळ आहेत. खाजवायला फुरसत नाही मिळाली की सगळं बरोबर होतय. हातावर पोट असणार्‍यांना होत का काही? झक्कत रोज काम कराव लागतं. त्यांना बर काही होत नाही? असल्या फालतू गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. ही सगळी नाटकं संपन्नतेची देणगी आहे. पैसा जास्त झाला की मग असले उद्योग सुचतात. आम्हा बायकांच बर असत. त्या निसर्गत:च चिवट असतात परिस्थितीशी तोंड द्यायला. घरचंही सांभाळायच शिवाय बाहेरचही पहायचं.मी शेवटपर्यंत काम करत राहणार. पैशापरी पैसा मिळतो शिवाय वेळही मजेत जातो. वेगवेगळी माणसे भेटतात आमच्या धंद्यात. तुमच्या त्या व्याखान, चर्चासत्र, वेबिनार यात काय ते पुस्तकी किडे सांगणार? नुसते अकॅडमिस्ट! व्यवहारात शून्य! असो! मला फालतू वेळ नाही. भरपूर कामे पडली आहेत.

जीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

राघव's picture

24 Dec 2021 - 4:53 pm | राघव

एखाद्या मोठ्या लेखातील एक भाग टाकला जावा असं झालंय..! :-)

चौथा कोनाडा's picture

24 Dec 2021 - 6:44 pm | चौथा कोनाडा

एकदम मस्त !
पटेश !

💖

कासव सिनेमात छोटा ओंकार मनोरुग्ण झालेल्या युवकाला हेच सांगतो !
या धाग्यातल्या बाईचं म्हणण, तेच ओंकारचं
खुप मस्त सीन आहे हा सिनेमातला.
कासव पाहिला नसेल तर जरूर बघा.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Dec 2021 - 8:16 pm | प्रकाश घाटपांडे

पाहिला दोनदा! उत्तम आहे. पुर्वी नात्यांच्या इकोसिस्टिममधे मानसिक अस्वास्थ्यावर प्राथमिक अवस्थेतच उपचार होउन जायचे. आता प्राथमिक उपचारासाठी सुद्धा मानसतज्ञांकडे जावे लागते अशी सामाजिक नातेसंबंध होउ लागले आहेत.

टर्मीनेटर's picture

24 Dec 2021 - 7:34 pm | टर्मीनेटर

घाटपांडे साहेब,
माझे (९५% जुळणारे) विचार कोणीतरी स्त्री व्यक्त करत आहे असे वाटले वाचून.
मस्तच! आवडले 👍

मदनबाण's picture

24 Dec 2021 - 10:47 pm | मदनबाण

काही केमिकल लोच्या वगैरे नसतात. सायकियाट्रिस्ट लोकांनी पसरवलेल खूळ आहे.हे सगळे रिकमटेकड्या मनाचे खेळ आहेत.
हे चुकीचे विचार आहेत. ज्या प्रमाणे शरीराला आजार होऊ शकतो त्याच प्रमाणे तो मनालाही होऊ शकतो. मग ते मन लहान मुलाचे असो, तरुण मुलगा / मुलगी किंवा वृद्ध व्यक्ती असो. ज्या प्रमाणे शरीराला आजार झाल्यावर डॉक्टरकडे जाताना लाज वाटत नाही किंवा येत नाही तेच मनाच्या डॉक्टर बाबतीत देखील आहे.
महत्वाचे काय... योग्य वेळी योग्य उपाचर घेउन व्याधी मुक्त होणे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अच्छा लगता है मुझे उन लोगों से बाते करना, जो मेरे कुछ भी नही लगते...पर फिर भी मेरे बहुत कुछ है |

जेम्स वांड's picture

25 Dec 2021 - 9:17 am | जेम्स वांड

मानसिक स्वास्थ्य हा "सेल्फ मेडिकेशन" किंवा गेलाबाजार "सेल्फ मेडिकेशन" करण्याचा विषय खचितच नाही, तुमची कुटुंबव्यवस्था न्यूक्लियर फॅमिली वगैरे मते मान्य केली तरीही असे त्रास झाल्यास अंगावर (का मनावर ?) काढण्यापेक्षा त्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स, कौनसेलर्स वगैरेंच्या मदतीने त्यावर मात करावी, त्यात लाज नाही सर्दी पडसे झाल्यावर जनरल प्रॅक्टिशनर पाहतो आपण तितकं सुलभ असतं ते. हे मी म्हणतोय कारण घरातील एकाचे मानसिक स्वास्थ्य खराब झाले अन दुर्लक्षित झाले तर बाकी कुटुंबियांना सुद्धा त्याचे इफेक्ट झेलावे लागतात ह्या पण बाबीचा विचार व्हावा.

(क्लिनिकल डिप्रेशन असणाऱ्या पेशंटची सुश्रुषा केलेला) वांडो

Bhakti's picture

25 Dec 2021 - 12:28 pm | Bhakti

+१
तज्ञांचा अनुभव ,त्यांचे पद्धती याचे मोल असते.काही दिवसांपूर्वी शिक्षण क्षेत्रातील समुपदेशन हे लेक्चर केलं.तेव्हा मुलांच्या अभ्यास, वागणं यासाठी योग्य उपाय मिळाले.
प्रश्न असा होता की पालक स्वतः मुलांना मारा पण शिकवा असं म्हणतात तेव्हा काय करायच?
तेव्हा पालकांनाच समुपदेशनाची गरज आहे हे तज्ञांकडून उत्तर मिळालं.
प्रत्येक अनुभवाचं खुप मोल असते, काही कमीपणा नाही त्यात.

कर्नलतपस्वी's picture

25 Dec 2021 - 10:39 am | कर्नलतपस्वी

पाच वर्षे वैद्यकीय स्नातक जेव्हां आणखी दोन वर्षे पुढे शिक्षण घेतो तेव्हा कुठं मनोरुग्ण तज्ञ बनतो.
एका मनोरुग्णामुळे पुर्ण संसार उद्वस्त होतो. आशा रुग्णांना त्याचे नातेवाईक एकतर लक्ष देत नाहीत किंवा मांत्रिक, गाणगापूर किवां तत्सम ठिकाणी घेऊन जातात. मनोरुग्ण म्हणजे विझलेली आग, राखेचा ढिग जर वेळीच इधंन, फुकंर घातली तर कदाचीत पुन्हा एकदा जीवन फूलेल.
समाज जागृती झाली पाहिजे.आशा रूग्णानां सामाजीक मदत मीळाली पाहीजे.

बुझा मन

तन तंदूर है मन अंगार
बिना अंगार के तंदूर बेगार
टुटा तन फिर से जुड जाये
मगर बुझे मन को कौन जगाये

बुझा मन जीवन अंधार
मझधार मे नैय्या बिन पतवार
बुझे मन मे एहसास जगाये
डुबते नैय्या को आधार दिलाये

तन चौखट मन इक शीशा
तन किताब मन इक भाषा
धुल भरे शिशे को साफ बनायें
बुझे मन की भाषा पढी जायैं

आओ राख के ढेर मे चिंगारी ढुंढे
बुझा मन फिर से सुलगाये
अंधेरे जीवन मे
आशा का दिपक जलाये
क्या पता़......
उजडा चमन फिर बस जाये।
कसरत
३-८-२०२१

प्रकाश घाटपांडे's picture

25 Dec 2021 - 12:06 pm | प्रकाश घाटपांडे

आजूबाजूला पहात ऐकत अनुभवत असलेल्या निरिक्षणांवर आधारित ही दिवाकरांच्या नाटयछटेच्या धर्तीवर सुचलेली मनोनाट्यछटा आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात जागृती करणारे अनेक लघुपट,चित्रपट,साहित्य आता वाढू लागले आहे. तरीही आपण स्वत:च्या मानसिक, मनोशारिरिक आरोग्याबद्दल उघडपणे फारसे बोलत नाही. मी अनेकदा पाहिलय की जेव्हा मी मानसिक आरोग्य, स्वेच्छामरण,मृत्युपत्र अशा विषयांवर गप्पा मारायला सुरवात केली कि लोक विषय बदलतात किंवा टाळायला सुरवात करतात. मानसिक आरोग्य क्षेत्रा काम करणार्‍या लोकांना मी माझी निरिक्षणे आवर्जून कळवत असतो.. मानसिक आरोग्यातील स्टिग्मा याविषयावर यापुर्वीची पोस्ट पहा.