कडू दुधी भोपळा कसा ओळखावा ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
14 Dec 2021 - 8:04 pm
गाभा: 

नेहमी बर्‍यापैकी वापरातल्या खाद्य पदार्थात (आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने) समस्या असू शकते याची सहसा कल्पना नसते. मागच्या वर्षाभरात मी अभ्यासलेले म्हणजे जायफळ, सुगंध आवडत असेल तर चंदना सोबत उगाळून पदार्थाच्या बाजूला ठेवावे पदार्थात टाकू नये.

असेच गेल्या दोनचार वर्षा पासून हलके हलके कानावर पडायला लागले ते कडू दुधी भोपळ्याबद्दल. दुधी भोपळा माझ्या विशेष आवडीचा नाही पण क्वचीत भाजी किंवा कोशिंबीर (रायता) या प्रकारात खाण्यात येत असतो. अलिकडे गुजराथी हांडवा प्रकारातूनही दुधी वापरला. मी कमी खात असलो तरी माझ्या वडीलांच्या अयुष्यभर सातत्याने दुधी खाण्यात राहीला त्यांना कधी समस्या आल्याचे पाहिले नसल्याने काही भ्रांती असेल असे समजून नजरे आड करण्याकडे कल होता पण या आठवड्यातून परिवारातून पुन्हा दुधी खाऊ नका असे निरोप आले म्हणून थोड्यावेळापुर्वी आंजावर अभ्यासले तर कडू दुधीभोपळा त्यातील Cucurbitacin या रसायनातील विशीष्ट घटक प्रमाणाबाहेर झाल्यास टॉक्झिक अनारोग्यकारक ठरू शकतो असे दिसते.

वृत्तांवरून गंभीर समस्या जास्तकरून दुधीच्या ज्यूस घेणार्‍यांना अधिक येत असण्याची शक्यता वाटते. समस्या खरे म्हणजे केवळ दुधीभोपळ्याबद्दल मर्यादीत नसून काकडी वर्गीय भाज्या ज्यात कारले ते टरबूज वर्गीय फळ(भाज्यांचा) समावेश असावा. इंग्रजी विकिपीडियातील Cucurbitacin लेखातील माहिती बरोबर असेल तर अगदी चांगल्या भाजीबियांची पेरणी केली तरी कडू भाजी सोबत मिश्र परागिकरण (क्रॉस पॉलीनेशन) झाले तरी चांगल्या काकडी वर्गीय पिकांचेही कडू पिकात रुपांतरण होऊ शकावे. अर्थात इतर कारणांबद्दलही शास्त्रीय अभ्यासाची गरज असावी.

तुर्तास आमच्या परिवार कडू दुधी भोपळ्याच्या भितीने ग्रस्त होण्याची बरीच शक्यता आहे पण या वर्गातील सगळ्याच भाज्या कशा टाळता येतील हा प्रश्न माझ्या डोक्यात घोळतो आहे. लाल भोपळा गेल्या दोन चार वर्षापासून आहारात समावेश केला आहे. कारले तसेही कडू असते त्याचे विषारी होण्या इतपत कडूपण कसे ओळखावे की कारले विषारीच असते अशा प्रश्नांची आधूनीक शास्त्रीय माहिती प्राप्त होण्याची गरज असावी.

कडू काकडी सहज लक्षात येते पण कडू नसलेला दुधीभोपळाही तसा बेचव प्रकार असल्याने दुधी भोपळा वापरण्याच्या आधी चव घेऊन बघीतले जाणे सहसा होत नाही पण मुलतः विकत घेतानाच न चिरलेला दुधी भोपळा कडू असल्याचे कळण्याच्या काही विश्वासार्ह युक्ती आयडीया आहेत का? किंवा दुधी भोपळा चिरल्यावर तो कसा तपासता येईल.

* चर्चेत कृपया आधूनिक शास्त्रीय किंवा स्व अनुभवाधारीतच माहिती देण्यावर कटाक्ष ठेवावा.
* निव्वळ ऐकीव माहिती शेअर करण्याचे टाळण्यासाठी अनेक आभार. आयुर्वेद धाग्याचा मुख्य विषय नाही त्यामुळे आयुर्वेद प्रतिसाद अगदीच आवश्यक असल्या शिवाय टाळण्यासाठी अनेक आभार
* शुद्ध लेखन चर्चा आणि अवांतर टाळण्यासाठी अनेक आभार.

प्रतिक्रिया

समस्त महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर यांना अश्याच कडू दुधीचा ज्यूस जीव घेणा ठरला होता.
त्यांची या अनुभवाची ती मुलाखत इथे पाहता येइल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Video

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2021 - 9:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार, आपली आठवण आलीच होती. बाय द वे, हल्ली अधुन मधुन दुधी भोपळा आरोग्यासाठी चांगला अशा गोष्टी वाचत असतो. वाट्सॅप युन्वरसीटीत सारखं या विषयावर दळण येत असतं. मला म्हणाल तर, दुधी भोपळा अजिबात आवडत नाही. दिसायला आकर्षक असलेल्या हा दुधीभोपळा प्रकार खाण्यासाठी अजिबात नीट नाही असे माझे व्यक्तीगत मत आहे. त्याला गुलाबजामुनाच्या पाकातून काढला तरी त्याची मूळ चव जाणारच नाही असे वाटते. आता मुद्द्याकडे वळतो, दुधी भोपळा ओळखायची एकच आयडिया म्हणजे त्याचा एक तुकडा कट करुन चाखूनच पाहावा लागतो. काकडी, खिरे ,(लहान काकडी), खायला लागले की पहिल्याच टेष्टमधे किती कडू आहे, हे लक्षात येते. दोडके हा प्रकार हा पण तसाच चव घेऊनच पाहावे लागते. या वर्गातील एकच कन्फर्म गोष्ट म्हणजे कारले, ते न पाहताही सांगता येतात कडूच असतात. बाकी, जे आवडीने खावे वाटत नाही ते ते सर्व आरोग्यासाठी चांगले असते असं माझं व्यक्तीगत मत आहे, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. बाकी, अजून काही आयडिया कळली तर कळवतो.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

15 Dec 2021 - 12:58 pm | आग्या१९९०

खिरे,दुधी भोपळा किंवा दोडक्यांचा टोकाकडील भाग चव बघण्यासाठी वापरू नये तो कडूच लागतो, मधल्या भागाची चव घेऊन बघावे. कडू लागल्यास वापरू नये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2021 - 1:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खिरे,दुधी भोपळा किंवा दोडक्यांचा टोकाकडील भाग चव बघण्यासाठी वापरू नये तो कडूच लागतो,

सहमत.

मधल्या भागाची चव घेऊन बघावे. कडू लागल्यास वापरू नये.

सहमत.

-दिलीप बिरुटे

सौन्दर्य's picture

16 Dec 2021 - 12:26 am | सौन्दर्य

ज्यांच्या घरी किंवा शेतात ह्या फळभाज्या उगवतात त्यांना चव घेऊन पाहता येईल. पण आमच्या सारखे जे बाजारातून भाजी आणतात त्यांनी हे कसं करायचं ? जर बाजारात काकडीचा किंवा दुधी भोपळ्याचा चवीसाठी तुकडा मोडला तरी तो विक्रेता तो तुमच्याच गळ्यात मारील. दुकानात ज्या प्रमाणाने काचेच्या वस्तूंखाली पाटी असते, "यु ब्रेक इट, यु बॉट इट', अगदी ह्याच धर्तीवर.

नुसत्या डोळ्यांनी, वासाने, स्पर्शाने कडू भोपळा ओळखता आला तर उत्तम.

जेम्स वांड's picture

16 Dec 2021 - 8:53 am | जेम्स वांड

माल फेकून द्यावा, नंतर लाखो रुपये आयसीयूत घालवल्यापेक्षा पाच पन्नास रुपयांचा दुधी फेकून देणेच शहाणपणाचे ठरावे, अर्थात आपापला वैयक्तिक निर्णय आहे तो.

बाकी पन्नास रुपयेही खर्चायची तयारी नसेल तर हा बघा दुधी खालीलप्रमाणे दिसतो, नीट ओळखावा आणि मुळातच विकत घेऊ नये.

.

माहितगार's picture

16 Dec 2021 - 11:28 am | माहितगार

खरे आहे तोच काय तो मार्ग दिसतोय

माहितगार's picture

16 Dec 2021 - 11:22 am | माहितगार

प्रा. डॉ. सरांनी आमची आठवण करणे आणि आमचे हजर होणे, याच्या पेक्षा कोणता मोठा गुण हवा? तरीही सर स्वतःला नास्तिक का समजतात कोण जाणे :) वाचकहो लोक नको म्हटले तरी श्रद्धा जपतात म्हणून विनोदानी लिहिलेल्या ' बाकी, जे आवडीने खावे वाटत नाही ते ते सर्व आरोग्यासाठी चांगले असते असं माझं व्यक्तीगत मत आहे, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.' वाक्यातील खोच लक्षात घेऊन ह्या वाक्यात आधूनिक वैद्यकशास्त्राच्या मदतीने सुयोग्य बदल करुन घ्याल हे वेगळे सांगणे न लगे.

दुधी नावडती असली तरी 'चांगल्या' दुधीचा खमंग हंडवा, कधी मधी खीर आणि आणि मोहरीची पूड घातलेली कोशिंबीर बदल म्हणून आहारात येण्याची सु'रस' अनुभव निसटून जाऊ नये म्हणून इतर कुणी (प्राण्याने) खाऊन झाल्या नंतर दोन तासांनी खाल्लेला प्राणी व्यवस्थीत असेल याची खात्री करून मग चवीचा आस्वाद घेणे हा मुगली पर्याय सुद्धा असू शकतो .

बाकी मार्केटातन आणलेल्या काकडीवर्गीय भाज्या ज्यात दुधी, दोडकी, पडवळ सेंटर मध्ये कापून आतला छोटा तुकड्याची चव आवर्जून घेऊन पहाणे कडू असल्यास तत्काळ टाकून देणे हे सर्वात उत्तम हे आता पर्यंतच्या उत्तरांवरून जाणवते आहे.

स्वतःचा अनुभव सांगतो. ही कडवट चव इतकी जास्त असते की एक दोन घासही खाल्ले जात नाहीत. आम्ही घरी लावलेल्या भोपळ्याच्या वेलाबद्दल हा अनुभव आला. त्याची फुले तांदळाच्या पिठात बुडवून मोहोरी तेलात तळून पूर्व भारतात खातात. असेच एक कडू फुल खाताना एक घास मी मोठ्या मुश्किलीने गिळला, पण तीच चूक झाली. सतत उलट्या होऊन जवळजवळ दीड दिवस जुलाब झाले, मग थोडे बरे वाटले. थोडक्यात, पहिल्या घासाला तुम्हाला नक्कीच चव जाणवेल, न खाता थुंकून द्या ...

माहितगार's picture

16 Dec 2021 - 11:25 am | माहितगार

"थोडक्यात, पहिल्या घासाला तुम्हाला नक्कीच चव जाणवेल, न खाता थुंकून द्या ..."

सहमत

आग्या१९९०'s picture

16 Dec 2021 - 11:55 am | आग्या१९९०

वेलवर्गीय भाज्यांना कसदार जमीन,पाणी आणि सूर्यप्रकाश आवश्यक असते. ह्यांची पाने आणि खोड कडसर असल्याने प्राणी खात नाहीत. फळावर असताना रोपांना पाण्याचा ताण पडल्यास हा कडवटपणा फळात उतरतो. वेळच्या वेळी पाणी देणे हाच ह्यावर उपाय.

माहितगार's picture

16 Dec 2021 - 6:51 pm | माहितगार

फळावर असताना रोपांना पाण्याचा ताण पडल्यास हा कडवटपणा फळात उतरतो.

शास्त्रीय प्रयोगाधारीत शास्त्रीय आधार?

आग्या१९९०'s picture

16 Dec 2021 - 9:04 pm | आग्या१९९०

शास्त्रीय प्रयोगाधारीत शास्त्रीय आधार?

माहीत नाही. निरीक्षण आणि अनुभवावरून. शेतात ज्या वेलवर्गीय रोपांना व्यवस्थित पाणी मिळत नाही किंवा बाष्पीभवन जास्त होते अशा रोपांची फळे तुलनेने कडवट असतात.

माहितगार's picture

16 Dec 2021 - 9:44 pm | माहितगार

..कि मी वर नोंदवलेला मिश्रपरागीकरणाचा परिणाम लक्षात येत नाही असेही काही होत असू शकत असेल?

मदनबाण's picture

16 Dec 2021 - 9:14 pm | मदनबाण

मागच्या वर्षाभरात मी अभ्यासलेले म्हणजे जायफळ, सुगंध आवडत असेल तर चंदना सोबत उगाळून पदार्थाच्या बाजूला ठेवावे पदार्थात टाकू नये.
असे का करावे ? वर्षभर नक्की काय अभ्यास केला ? अभ्यास हा चवी बद्धल होता की सुगंधा बद्धल ? का दोन्ही बद्धल ?
१०० दुधी घेतले तरी त्यात कडु निघण्याची शक्यता फार कमी ! मी इतके वर्ष खाल्ला परंतु अजुन एकदाही कडु दुधी आहारात आला नाही, पण काकड्या कडु अनेकदा आल्या आहेत. जनावरांनी वेलींना तोंड लावले की ते कडु होतात असं काहीस कारण मी ऐकल होत पण ते सत्य असावं अस वाटतं नाही !

चिरलेला दुधी भोपळा कडू असल्याचे कळण्याच्या काही विश्वासार्ह युक्ती आयडीया आहेत का?
6'th सेंन्स डेव्हलप करा ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Madhura Nagarilo... :- Pelli SandaD

माहितगार's picture

16 Dec 2021 - 9:42 pm | माहितगार

नक्की काय अभ्यास केला ? अभ्यास हा चवी बद्धल होता की सुगंधा बद्धल ? का दोन्ही बद्धल ?

त्यातील रासायनीक घटक आणि त्यांच्या मानवी आरोग्यावरील आधूनिक शास्त्रीय परिमाणांनी सुचवलेल्या परिमाणांबद्दल होता म्हणूनच जायफळाचा सुगंध घ्या, पोटात घेण्याचे टाळा हे उत्तम असे सुचवले आहे.

मदनबाण's picture

16 Dec 2021 - 10:13 pm | मदनबाण

त्यातील रासायनीक घटक आणि त्यांच्या मानवी आरोग्यावरील आधूनिक शास्त्रीय परिमाणांनी सुचवलेल्या परिमाणांबद्दल होता
ओक्के, पण प्रकृतीस कोणता अपाय होतो ? जायफळ हे अगदी सौम्य प्रमाणात उगाळुन पुरणपोळी,मसाला दूध आणि श्रीखंडात देखील वापरले जाते. याची चव आणि सुगंध दोन्ही या पदार्थां प्रती रसना वाढवतो.

पोटात घेण्याचे टाळा हे उत्तम असे सुचवले आहे.
ज्यांना अ‍ॅलर्जी वगरै असेल त्यांनी हे टाळावे असे बहुधा असावे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Madhura Nagarilo... :- Pelli SandaD

माहितगार's picture

16 Dec 2021 - 10:40 pm | माहितगार

toxic चा मराठी अनुवाद अगदीच शब्दशः वीषजन्य नाही केला तरी आरोग्यास जोखमीचा नक्कीच होत असावा. अ‍ॅलर्जी वीषजन्यता नसेल तरी होऊ शकते. toxicचा परिणाम सर्वांवर होत असावा.

एखाद दुसर्‍या ग्रॅम पर्यंतचे प्रमाण खपून जात असावे पण उत्साहाच्या भरात प्रमाण केव्हा ओलांडले जाईल हे सांगणे सोपे नसावे.

मदनबाण's picture

16 Dec 2021 - 10:49 pm | मदनबाण

toxicचा परिणाम सर्वांवर होत असावा.
ज्यांना रात्री शांत झोप येत नाही, त्यांनी जायफळ उगाळुन ते दुधात घालुन घेतल्यास त्याचा लाभ मिळतो असे ऐकुन आहे, म्हणजे हा औषधी गुणधर्म म्हणता येइल. प्रमाणाच्या बाहेर काहीही केल तर त्याचा त्रास होणारच. श्रीखंड खाल्यांनंतर अनेकांना फार झोप येते याचं बर्‍याच वेळा कारण हे त्यातील जायफळ असते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Madhura Nagarilo... :- Pelli SandaD

जेम्स वांड's picture

17 Dec 2021 - 9:56 am | जेम्स वांड

Toxic - विषाक्त

आग्या१९९०'s picture

16 Dec 2021 - 10:13 pm | आग्या१९९०

जनावरांनी वेलींना तोंड लावले की ते कडु होतात असं काहीस कारण मी ऐकल होत पण ते सत्य असावं अस वाटतं नाही !
फळावर असताना रोपांना पाण्याचा ताण पडल्यास हा कडवटपणा फळात उतरतो.
ह्यामुळे पानांचा कडवटपणा कमी झाल्याने जनावरे पाने खात असावीत.

कंजूस's picture

17 Dec 2021 - 7:20 am | कंजूस

फक्त दुधी ठेवतात त्यांच्याकडे चांगले खाण्यायोग्य दुदीच असतात. ते घ्यावेत. दुधी हिरवा ( म्हणजे वाढत असणारि ) कडू असू शकतो. त्याचा टोकाकडचा भाग हिरवा/पोपटी असतो. ) या वेळी आतल्या बिया कोवळ्या असतात. हा कडू असू शकतो.

आणखी वाढ झाली की टोकाकडचा पोपटी भाग पांढूरका होतो. एकूण फळावरची पोपटी झाक गेलेली असते. आतल्या बिया जरा मोठ्या पण टणक नसतात. अशी फळे भाजीसाठी तोडतात. तेव्हा कधीकधी एखादे फळ वरीलप्रमाणे असते.

केवळ वर्णनावरुन नेमके लक्षात येत नाही. आपल्या सवडीने, चांगल्या निघालेल्या आणि साशंकीत अशा दोन्ही दुधींचे फोटो टाकण्याची विनंती.

कंजूस's picture

17 Dec 2021 - 1:38 pm | कंजूस

हे वेलावरून दुधी वेचून तोडून विकायला आणतात ते भाराभर तोडणी करत नाहीत. जे चांगले काढणीला आले तेच तोडतात. ते डोळे मिटून घ्यावेत.

(( फोटोमध्ये रंगाचा सूक्ष्म फरक येत नाही. ताजेपणाही येत नाही. ))

जेम्स वांड's picture

24 Dec 2021 - 9:30 am | जेम्स वांड

काढणीला आलेलेच असतात की हो, ते का कच्चे तोडत नाही कोणी, बेसिकली तयारच असतात ते दुधी पण, मग ते स्थानिक भाजीवाला तोडो का अजून कोणी. त्यातून कसे कडू नॉन कडू सेप्रेशन करणार ?

कंजूस's picture

24 Dec 2021 - 8:52 pm | कंजूस

सापडले फोटो. यामध्ये कळेल तयार झालेले आणि कच्चे दुधी कोणते.
पहिला

दुसरा

पहिल्यात मोठमोठे दुधी दिसत आहेत वेलावर पण ते अजून तयाल व्हायचे आहेत. ( उजवीकडचा पुढचा ओके आहे.)

कंजूस's picture

24 Dec 2021 - 8:56 pm | कंजूस

कार्यक्रमात एकदा एक शेतकरी दाखवत होता दुधीची शेती. त्यातला एखादा वेल असा असतो म्हणाला की त्यावर कडू भोपळेच लागतात. तो वेल औषधासाठी राखून ठेवतो. लिंक सापडणे शक्य नाही.