अन्नोत्सव

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
12 Dec 2021 - 9:18 am

आमची सोसायटी म्हणजे एक छोटासा गाव. म्हणजे बघा कहाणीतल्या आटपाट नगरा सारखा. मुआँ करोना आला आणी गावात सन्नाटा करून गेला. बरेच दिवस गाव चिडीचूप्प,हळु हळू गावाला जाग येऊ लागली .

पुढाऱ्यांची मादियाळी जमा झाली. काहितरी करुयात म्हणत दवंडी आली. हाकारे पिटारे डांगारे कळवण्यात येते की आन्नोत्सव आयोजित होत आहे. जनमानसात आनंद पसरला. हौशे, गवशे आणी नवशे सगळ्याचीच गर्दी झाली. उत्तम आयोजन, गावातले गावकरी तृप्त झाले. सकाळी सकाळी सुर्यवंशींचा फेरा आला. अन्नोत्सवाचे भग्नावशेष बघून गत सध्यांकाळच्या वैभवशाली खुणा पुन्हा जागवू लागला.

पसरलेल्या खाणा खुणा
सांगुन जाती इतीहास जुना
किती एक आले गेले
खाऊन पिऊन तृप्त जाहले
खिशास कुणाच्या लागे गळती
कुणा खिशास येते भरती
खतं खेद नाही कुणा
स्वानंदास्तव येऊ पुन्हा

सकाळ झाली पशुपक्षांची झोप उडाली
वायुसंगे आले निमंत्रण
राखुनी आयोजकांचा मान
श्वान मार्जराची गर्दी जाहली

कोलाहल माजला
म्हणे लवकर आवरा एक दुजाला
आता येतील शस्त्रधारी (झाडूवाले)
उडवतील फैरी वर फैरी
उद्ध्वस्त करून जातील मजा सगळी
संपेल की हो भुभूक्षितांची मांदियाळी

अन्न उत्सव आयोजकांचे खव्वया तर्फे हार्दिक आभार

मुक्तकप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Dec 2021 - 5:09 pm | मुक्त विहारि

समजले नाही

कर्नलतपस्वी's picture

12 Dec 2021 - 5:34 pm | कर्नलतपस्वी

कालच आमच्या सोसायटीत फुड फेस्टिवल झाला. सध्यांकाळी सगळ कस टापटीप, झगमगाट होता. दुसर्‍या दिवशी कुत्री, माजंर कावळे उरलेल्या खरखकट्यावर ताव मारताना दिसले. त्याचे मुक्तक सकाळी माँर्नीगं वाँक करताना सुचले.

मुक्त विहारि's picture

12 Dec 2021 - 7:34 pm | मुक्त विहारि

हे तिघाडी सरकार असेच अजून काही वर्षे राहिले तर, जोडीला दारूच्या बाटल्या पण दिसतील ...