चांदणचुरा

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
30 Nov 2021 - 10:40 pm

वाहावतो चांदणचुरा
तुझ्या उंबर्‍याशी
दाटतो गहिवर
मंद श्वासांशी||

चालतो अनवट वाटा
पैंजणांच्या लयीने
ऐकतो ह्रदयभाषा
नयनांच्या तीराने||

उधळतो चांदणफुले
गुंफलेल्या हातांनी
झेलतो चंद्रमरवा
गंधाळलेल्या मिठीने||

मिटते रात्र मंदफूल
गवाक्षी झुले वारा
पडते प्राजक्तभूल
रंगला चांदणचुरा||

-भक्ती

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Dec 2021 - 9:52 am | प्रचेतस

सुरेख कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Dec 2021 - 11:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कल्पना आणि रचना.

उधळतो चांदणफुले
गुंफलेल्या हातांनी
झेलतो चंद्रमरवा
गंधाळलेल्या मिठीने||

हे लै भारी..!

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

1 Dec 2021 - 7:10 pm | Bhakti

_/\_

चांदणे संदीप's picture

2 Dec 2021 - 1:56 am | चांदणे संदीप

चांदणचुरा आवडला.

सं - दी - प

तुषार काळभोर's picture

2 Dec 2021 - 12:06 pm | तुषार काळभोर

चांदणचुरा शब्द प्रचंड आवडला आहे.

कॉमी's picture

2 Dec 2021 - 12:37 pm | कॉमी

शब्द छान आहेत पण कवितेचा अर्थ समजत नाहीये.
(अर्थात मी कवितेच्या बाबतीत ढ असल्याने मला न समजणे हे गंभीरपणे घेण्याची गरज नाही.)

Bhakti's picture

2 Dec 2021 - 6:02 pm | Bhakti

सर्वाना _/\_
@कॉमी
चांदणचुरा हा मराठीतील अलवार शब्द आहे.बऱ्याच साहित्यात तुम्हांला वाचावयाला मिळेल.
अर्थ आधी कवितेचा भाव वा रस पाहायचा प्रीत भाव /शृंगार रस आहे.मग एक एक कडव्यातील मतितार्थ शोधायचा.सर्व कडवे मग जुळवायचे .एक अर्थ उलगडतो प्रत्येकासाठी तो थोडाफार कधी जास्त निराळा असतो.

वाहावतो चांदणचुरा
तुझ्या उंबर्याुशी
दाटतो गहिवर
मंद श्वासांशी||

इथे प्रेमिका त्यापाशी पोहचली आहे

चालतो अनवट वाटा
पैंजणांच्या लयीने
ऐकतो ह्रदयभाषा
नयनांच्या तीराने||

अनवट म्हणजे अनोळखी वाटा तिच्या पैंजण आवाजाने चालताना नजरेत नजर मिळवत प्रेमाची कबुली आहे.

उधळतो चांदणफुले
गुंफलेल्या हातांनी
झेलतो चंद्रमरवा
गंधाळलेल्या मिठीने||

चंद्रमरवा म्हणजे चंद्राच्या साक्षीने मरव्याच्या सुगंधाने चांदण्यांच्या फुलासारखी त्यांची प्रीत!

मिटते रात्र मंदफूल
गवाक्षी झुले वारा
पडते प्राजक्तभूल
रंगला चांदणचुरा||

आता रात्र मिटलेल्या फुलासारखी होऊन खिडकीपाशी जो वारा आहे त्याने खिडकीपर्यंत बहरलेले प्राजक्त फुले पहाटते चांदणचुरा होत रंगून जमिनीवर पडत आहेत.

धन्यवाद !!मराठीचा तास संपला 😉

कॉमी's picture

2 Dec 2021 - 8:49 pm | कॉमी

धन्यवाद समजावून सांगितल्याबद्दल. समजल्यावर आणखी जास्त आवडली !

आधी दोनतीनदा कविता वाचली अणि आवडली पण होती, तरी अर्थ उमगत नसल्याने प्रतिसादात काय लिहावे हे कळत नव्हते.
आज पुन्हा एकदा वाचून प्रतिसादात अर्थ दिलेला असल्याने 'कळले'. (आणि कवितेचा आनंद लुटण्यासाठी असे 'कळणे' आवश्यक नाही हेही कळले)
एक गंमत म्हणजे अर्थ म्हणून तुम्ही जी वाक्ये दिलेली आहेत, ती कुणी देऊन हा आशय कवितारूपात मांडा असे सांगितले तर तुमच्या कवितेसारखे काही सुचणे ही माझ्यासारख्यासाठी अगदी अशक्य कोटीतली गोष्ट आहे, हे जाणवल्यावर तर कवितेचे आणखीनच कौतुक वाटले. म्हणजे अगदी कुणी चांदणचुरा, उंबरा, गहिवर, मंद श्वास, अनवट वाटा, पैंजण, र्‍हदयभाषा, नयन, चांदणफुले, गंधाळलेली मिठी, गवाक्ष, प्रजक्तफूल .. वगैरे शब्द सुचवले तरिही.

चित्रगुप्त काका तुम्हाला हे शब्द आवडले आणि प्रतिसाद वाचून छान वाटलं आणि ही कविताप्रेम दिसावे तुमचा शब्दांविषयी प्रतिसाद आठवला,खरच शब्दसंपत्ती वृद्धिंगत होत आहे :)

बांवरे's picture

3 Dec 2021 - 2:50 am | बांवरे

वाहावतो चांदणचुरा
तुझ्या उंबर्‍याशी
वाटतो गहिवर
मंद श्वासांशी||

काय चित्र आहे !!! व्वा !!

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2021 - 9:33 pm | चौथा कोनाडा

व्वा, छान, सुरेख रचना !

विंजिनेर's picture

5 Dec 2021 - 1:34 am | विंजिनेर

सुंदर!
सहसा ह्या डिपार्टमेंटमध्ये मी डोकावत नाही पण ही कविता वाचल्यानंतर मुद्दाम लॉगीन करून प्रतिसाद द्यावासा वाटला!

Bhakti's picture

5 Dec 2021 - 8:59 pm | Bhakti

अरे वाह ! मस्तच :)

Bhakti's picture

5 Dec 2021 - 8:54 pm | Bhakti

सर्वांना _/\_

गणेशा's picture

7 Dec 2021 - 11:27 pm | गणेशा

भारी...

चंद्रमरवा हा शब्द मी पहिल्यांदाच पाहिला..

मला तर चंद्रमारवा लिहायचे आहे काय असे वाटले होते..

चांदणचुरा भारी आहे शब्द.. तो पण पहिल्यांदाच वाचला..

Bhakti's picture

8 Dec 2021 - 8:28 am | Bhakti

_/\_ अरे हो, मारवा हा संगीतातला राग आणि मरवा ही सुगंधी वनस्पती

मरवा,विकीपेडीया

तरी इथे नीट पाहता मरवाला शुद्ध मराठी शब्द मरूवा आहे तर :).

चांदणचुरा हा शब्द मराठी कवियत्री, नायिका स्पृहा जोशी ह्यांच्या
स्पृहा जोशी या चांदणचुरा संग्रहाला आहे.

मरुवा आमच्याकडे होती, देव तुळस म्हणत होतो वाटते मी त्याला..
उगाच कुठे ऐकलेले..

(देव बाभळ पण होती :-))

--

स्पृहा.. हाssय
मग चांदणचुरा पण हृदयात सुरा होऊन घुसला पार ..

मरुवा आमच्याकडे होती, देव तुळस म्हणत होतो वाटते मी

होय होय बरोबर !

(देव बाभळ पण होती :-))

हल्ली तर या बाभळीच्या हळदीरंग बहर जास्तच आवडतो :)
http://drvnshinde.blogspot.com/2020/10/blog-post.html?m=1
नवी माहिती ह्या बाभळी महाराष्ट्रभर उरळी कांचनातून आल्या आहेत तर!

मदनबाण's picture

16 Dec 2021 - 9:29 pm | मदनबाण

मरवा ही सुगंधी वनस्पती
सुगंधी वनस्पतीचा वापर केल्याने सुगंधी कविता म्हणावे काय ? ;)

गणपतीच्या काळात मरवा,पाचु आणि दवणा गणपतीला आणि गौरींना वाहण्यासाठी बाजारात उपलब्ध असतात. यातील दवण्याचे अत्तर माझ्याकडे आहे. काही काळा पुर्वी युट्युबवर अत्तरां विषयी शोध घेताना मला एका अत्तर उत्पादक ब्रँड बद्धल कळले, त्यांच्या मालकाशी बोललो आणि त्यांच्याकडुन चंदन बेस असलेली काही अत्तरे घेतली. नंतर त्यांच्याकडे दवण्याच्या अत्तरा बद्धल विचारणा केली तेव्हा त्यानीं त्यांच्याकडे ते उपलब्ध नसताना आणि ते त्या प्रकारचे अत्तर विकत नसताना देखील मला दवण्यचे सँपल पाठवले. हा अत्तर निर्माता हिंदूस्थानातील दर्जेदार अत्तरे उत्पादित करणार्‍यां पैकी एक आहे.
दवण्याचा गंध मधाळ आणि मादक आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Madhura Nagarilo... :- Pelli SandaD

Bhakti's picture

17 Dec 2021 - 8:36 am | Bhakti

वाह!!
मस्त माहिती.

जेम्स वांड's picture

8 Dec 2021 - 9:03 am | जेम्स वांड

आम्ही लै गावठी मनुष्य आहोत, गद्य अन पद्य पैकी आम्ही गद्य मनुष्य पडतो पद्य कधी झेपलेच नाही, पण हे जे काही लिहिलं आहे ते तुफान आवडलं. शब्दसंयोजन, संकल्पना आणि बांधणी आवडली. अजून लिहित्या राहा, मस्त लेखन आहे तुमचे.

Bhakti's picture

8 Dec 2021 - 9:30 am | Bhakti

व्हय व्हय _/\_

श्वेता व्यास's picture

8 Dec 2021 - 10:34 am | श्वेता व्यास

मोहवून टाकणारी कविता आहे, खूप म्हणजे खूपच आवडली.

Bhakti's picture

8 Dec 2021 - 5:08 pm | Bhakti

सर्वांना _/\_

श्रीगणेशा's picture

9 Dec 2021 - 11:04 pm | श्रीगणेशा

वाटतो गहिवर
मंद श्वासांशी||

खूप छान! पूर्ण कविता सुरेख पण या दोन ओळी खूप आवडल्या.

Bhakti's picture

10 Dec 2021 - 9:21 am | Bhakti

_/\_
खरं तर तो दाटतो गहिवर असं लिहिलं होतं ,पण auto करेक्ट वाटतो झाला 😉

चांदणे संदीप's picture

10 Dec 2021 - 7:34 pm | चांदणे संदीप
Bhakti's picture

11 Dec 2021 - 8:48 am | Bhakti

आणि
पैंजणांच्या वतीने ऐवजी लयीने पाहिजे होतं ,तेही वतीने auto करेक्ट झालं :-) संपादनाची विनंती केली आहे.

चांदणे संदीप's picture

10 Dec 2021 - 7:35 pm | चांदणे संदीप
चांदणे संदीप's picture

10 Dec 2021 - 7:35 pm | चांदणे संदीप

आगं भक्त्ये, दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचे गंगाधर गाडगीळ फार पूर्वीच सांगून गेलेत.
हल्लीच्या या आटोकरेक्टाने समजणार्‍या कवितेलाही दुर्बोध करण्याचे पवित्र कर्तव्य हाती घेऊन नवकवींचे काम सोपे केले आहे, असे 'ह्यांचे' म्हणणे.
--- बाईसाहेब फुरसुंगीकर.

हो की बाईसाहेब,जितके मस्त आटोकरेक्ट तितकी सहजता नवकवींना .. 😅

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

11 Dec 2021 - 4:49 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान आहे कविता.

Bhakti's picture

11 Dec 2021 - 5:11 pm | Bhakti

सर्वांना _/\_