हस्तर परीक्षण action चित्रपट ,मारधाडीत पैसे वसूल

हस्तर's picture
हस्तर in काथ्याकूट
18 Oct 2021 - 4:08 am
गाभा: 

हस्तर परीक्षण action चित्रपट ,मारधाडीत पैसे वसूल
तसे इथे साधारण दाक्षिणात्य चित्रपटांचे परीक्षण लिहिले जात नाही पण नुकताच बेबी आणि बेल बॉटम चा हँगओव्हर आहे
दोन्ही मध्ये बरेच चित्रपट फक्त उत्कंठा वाढवण्यासाठी खेचले आहे व फाईट सीन कमी आहे तसेच मुख्य अधिकारी किंवा त्याचे सेनीअर ढोबळ चुका करताना दाखवले आहे
हा चित्रपट दोन्ही कमी भरून काढतो
इस्तंबूल ,लंडन लाहोर सगळीकड़े हिरो जातो
तसेच आजकाल चित्रपटांमध्ये हॅकर हे पात्र येते आणि डोईजड ठरते पण इथे नायक बुद्धीच्या जोरावर त्यांना पण भारी पडतो
२-३ ढोबळ चुका किंवा योगायोग आहेत पण दूरलक्ष करता येते
नेते मंडळींची मुले सैन्यात जात नाही असे आपण नेहमी ऐकतो पण इथे मुख्यमंत्रयांचा मुलगा सैन्यात असतो
दिसायला ३० चा असला तरी १८ सारखे प्रेमात पडतो पण
बाकी action दृश्य चांगली आहेत
भरपूर प्रमाणात खिळवून ठेवतो
शेवट बघताना बेबी आणि बेल बोटम दोन्हीची आठवण येते ,पण हा वरचढ वाटलं
दोन्ही नायिका मात्र खूपच सुंदर आहेत

का बघू नये
गाणे नेहमी सारखे विनाकारण घुसडून ठेवलेली आहेत
विनोद निर्मित खूपच बालिश आहे

प्रतिक्रिया

रावसाहेब चिंगभूतकर's picture

18 Oct 2021 - 8:27 am | रावसाहेब चिंगभूतकर

ते ठीक आहे, पण हे परीक्षण नक्की कुठल्या चित्रपटांचे आहे?

22 ऑक्टोबरपासून थेटरं उघडणार म्हणे

खरे का ??

नीलस्वप्निल's picture

19 Oct 2021 - 3:51 pm | नीलस्वप्निल

पाहिला हा चित्रपट .... बेबी आणि तत्सम चित्रपटाची सरमिसळ आहे.... तमन्ना नेहमीप्रमाणे सुन्दर ... :)

चौथा कोनाडा's picture

19 Oct 2021 - 5:22 pm | चौथा कोनाडा

आजकाल हिंदी आणि दक्षिणी सिनेमांच्या ( हिंदी पट्ट्यासाठी ध्वनीअंकित सिनेमे ) कल्पनांची एवढी सरमिसळ असते की बघताना हे आधी बघितलंय अशी भावना होऊन सिनेमा बघण्यातला रस कमी होतो. किती टिपिकल असतात हे सिनेमे, मुलांच्या ९ ते १४ वर्षे वयोगटांच्या प्रेक्षकांसाठी !

ते ठीक आहे, पण हे परीक्षण नक्की कुठल्या चित्रपटांचे आहे?

पिक्चरचं नाव लॉर्ड व्होल्डेमॉर्ट आहे का?

कुणीच नाव घेईना!

तुम्ही लेखाचे नाव लिहीताना

हस्तर परीक्षण action चित्रपट ,मारधाडीत पैसे वसूल

असे का देता?
तुमचे नाव आणि लेखाचे नाव यात - : असे काहीच विरामचिन्ह देत नाही.
उद्या एखादा लेख "हस्तर उद्धव ठाकरे " असा
किंवा हस्तर जुलाबाच्या गोड गोळ्या असा लिहीलात तर कसे वाटेल बघा.
लेखकाचे नाव शीर्षकात द्यायचा , तेही लेखाच्या मथळ्याच्या अगोदर द्यायचा इतका अट्टाहास कशासाठी

अनन्त अवधुत's picture

24 Oct 2021 - 12:52 pm | अनन्त अवधुत

अगदी, नाव सुद्धा गायब आहे चित्रपटाचे.

सिनेमाचे नाव बहुतेक " हस्तर " असे असावे ;)

हस्तर's picture

27 Oct 2021 - 9:58 am | हस्तर

चिट्र्पताचे नाव action आहे