श्रीमद् भगवद् गीता: यज्ञ आणि कृषी

Primary tabs

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
22 Sep 2021 - 9:07 am
गाभा: 

श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला श्रीमद् भगवद् गीतेचा उपदेश दिला होता. हा उपदेश फक्त अर्जुनासाठी नव्हे तर सर्वांसाठी होता. श्रीकृष्णाने गीतेत या मृत्यू लोकात कर्म करत कसे जगावे, याचे मार्गदर्शन केले आहे. गीतेत यज्ञ या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. जगाचा व्यापार सुचार रूपेण सुरु राहण्यासाठी, केलेले कर्म यज्ञ आहे. कृषी कर्महि यज्ञ आहे. यज्ञाने प्रसन्न होऊन भूमाता शेतकर्याला भरपूर अन्न प्रदान करते. काही महिन्यांपूर्वी पंजाबात कैन्सर वाढण्याचे कारण या विषयावर एक लेख वाचला होता. त्यात रासायनिक शेतीहि एक मुख्य कारण दिले होते. पंजाबच्या प्रसिद्ध कैन्सर रेलचे उदाहरणहि दिले होते. भगवद् गीता वाचताना तिसर्या अध्यायातील १२व्या श्लोकाने माझे लक्ष वेधले आणि तो लेख आठवला, श्रीकृष्ण म्हणतात:

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः ॥
३.१२

यज्ञाने प्रसन्न होऊन देवता तुम्हाला इच्छित भोग प्रदान करतात. पण देवांनी प्रदान केलेल्या भोगांत त्यांच्या हिस्सा न देणे हि चोरी आहे.

मनात प्रश्न येणारच शेतकरी भूमातेला काय परत करू शकतो. ती आपल्या सारखी जेवत नाही, अन्नातला तिचा हिस्सा तिला कसा देता येईल. उत्तर सौपे आहे, अन्नापासून निर्मित मनुष्य आणि जनावरांची विष्ठा खताच्या रूपाने भूमातेला परत करता येते. तसेच शेतीसाठी वापरलेले पाणीही पुन्हा तलाव, अडवा-जिरवा इत्यादी अनेक इत्यादी माध्यमाने तिला परत करता येते. प्रत्येक व्यवहार हा द्विपक्षीय असतो. एक पक्षीय व्यवहार म्हणजे चोरी. आपण पाहतोच आहे, शेतकरी पराली पुन्हा जमिनीला परत करण्याएवजी जाळून टाकतात, कारण शेत पुन्हा लवकर तैयार करायचे असते. अन्न निर्मित शेणखत आणि विष्ठा जमिनीला परत मिळत नाही. अधिक अन्नासाठी शेतकरी विषाक्त रासायनिक खतांचा वापर करतात, पण हि खते धरती माता प्रदत्त अन्न नाही.

देवांचा न्याय कठोर असतो, चोरांना क्षमा नाही. दरवर्षी अप्रिल, मई आणि ऑक्टोबर महिन्यात पंजाब हरियाणा सहित दिल्लीकरांचाहि भयंकर प्रदूषणमुळे दम घुटू लागतो. रासायनिक शेतीमुळे आज पंजाबच्या अधिकांश भागात जमिनीतले पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. पुढील काही वर्षांत बहुतेक आंघोळीलायकहि राहणार नाही. कुपित धरती विषाक्त अन्न प्रदान करू लागली आहे. दरवर्षी फक्त पंजाबात हजारो लोक कैन्सरग्रस्त होऊन मरतात. विषाक्त अन्न खाऊनहि कोट्यावधी लोक विभिन्न असाध्य रोगांनी ग्रस्त होत आहे. भारतात कैन्सर ने मरणाऱ्यांची संख्या दरवर्षी तीव्र गतीने वाढत आहे. असो. तात्पर्य एवढेच किमान कृषी विशेषज्ञांनी श्रीमद् भगवद् गीता वाचली पाहिजे. कर्म सिद्धांत समजला पाहिजे.

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

22 Sep 2021 - 10:26 am | गॉडजिला

देवांचा न्याय कठोर असतो, चोरांना क्षमा नाही.

एकदम बरोबर चुकीला माफी नाहीं.

किमान कृषी विशेषज्ञांनी श्रीमद् भगवद् गीता वाचली पाहिजे. कर्म सिद्धांत समजला पाहिजे.

हे तर सर्वांनीच करायला हवे. तुम्ही गीता वाचलीत म्हणूनच हा धागा लिहू शकलात. म्हणजे कर्माचा सिद्धांतही तुम्हाला समजला असेल तर तो काय आहे ते जरा इथे लिहाल का ?

गॉडजिला's picture

22 Sep 2021 - 12:43 pm | गॉडजिला

उर्फ धागा लेखक कर्म योग म्हणजे नेमकं काय ते आजिबात जाणत नाही.

मला याचीच फार चिड येते जि गोश्ट आपल्याला नेमकी सविस्तर माहीत नाही ती थोरा मोठ्यानी अमुक ग्रंथात तमुक सांगितले म्हणत मिपाकरांवर सविस्तर का थोपली जाते… पुन्हा पुन्हा ?

विवेकपटाईत's picture

23 Sep 2021 - 10:02 am | विवेकपटाईत

कर्मयोग काय हे प्रत्येकाला चांगलेच माहित असते. तुम्हालाही माहित आहे. बाकी धाग्याचा विषय तुम्हाला कळला नाही त्यात माझा कसूर नाही. मी गीता आणि वेद यावर लिहणार. बाकी आजच्या परिस्थितीवर सत्य लिहले तर धागा उडविला जातो.

गॉडजिला's picture

23 Sep 2021 - 10:16 am | गॉडजिला

प्रत्येकाची बाजू नका मांडू फक्त तुमचे बोला... मी तुम्हाला कर्मसिध्दांत समग्र माहित नाही असे विधान केले आहे. जर तुम्हाला ते ज्ञान असेल तर कृपया सिध्दांत अवश्य लिहावा.

विवेकपटाईत's picture

23 Sep 2021 - 9:40 am | विवेकपटाईत

कर्म सिद्धांत हा प्रत्येकाला माहित असतो. सांगण्याची गरज नाही.

गॉडजिला's picture

23 Sep 2021 - 10:13 am | गॉडजिला

तुम्हाला सांगता येणार नाही.

कपिलमुनी's picture

22 Sep 2021 - 11:11 am | कपिलमुनी

>>पंजाबात कैन्सर वाढण्याचे कारण

१.हा लेख कुठल्या जर्नल मधे आला होता?

२. माझी दहा एकर शेती करायला द्यायची आहे, घेणार का?

मार्कस ऑरेलियस's picture

22 Sep 2021 - 8:52 pm | मार्कस ऑरेलियस
विवेकपटाईत's picture

23 Sep 2021 - 9:46 am | विवेकपटाईत

गुगल करा अनेक लेख सापडतील. बाकी जास्त रासायनिक कीटनाशक इत्यादीचे फळ सर्वात पहिले शेतात राबणार्यालाच भोगावे लागतात. बाकी शाळेत हेल्थी आणि जंक फूड वर क्लास संपल्यावर एक मुलगी शिक्षिकेला म्हणाली " मेम जन्क फूड आर यम्मी (पित्झा, बर्गर, केक, चाकलेट, सामोसा, मेग्गी), आय लाईक जंक फूड". हें असेच आहे.

कंजूस's picture

22 Sep 2021 - 11:18 am | कंजूस

किंवा सत्संग.

hrkorde's picture

22 Sep 2021 - 1:30 pm | hrkorde

शेतकरी रासायनिक खते वापरतो हे ओबवियसली दिसते म्हणून त्याच्यावर सगळे लादणे योग्य नव्हे.

शेती नसणारे लोकपण प्लास्टिक , थर्मोकोल वापरतात , अन्न , कागद , पाणी नास करतात , त्यामुळेदेखील तितकाच कारबन फूट प्रिंट वाढतो

विवेकपटाईत's picture

23 Sep 2021 - 9:49 am | विवेकपटाईत

मी स्वत: सर्व वस्तू शेविंग क्रीम शेम्म्पू, साबण इत्यादी ग्रीन टग असलेले वापरतो. फरशी साठी गोनायाल आणि भांड्यांसाठी राखेने बनलेले डीशवाश वापरतो. अंघोळ हि दहा लिटर पेक्षा कमी पाण्यात करतो. आपल्याला जमेल तेवढे करत राहिले पाहिजे.

शेतकरी रासायनिक खत आणि कीटक नाशक वापरतो पण ती पिकांसाठी असतात त्या मुळे पिकांस नुकसान होत नाही फायदा होतो.
माणूस डायरेक्ट औषध,लसी,रसायन वापरून बनवलेले खाद्य पदार्थ,रासायनिक पदार्थांचा वापर करून बनवलेली tooth pest, सौंदर्य प्रसाधने वापरतो.
ती सरळ माणूस स्वतः साठी वापरतो ती माणसावर किती पट जास्त अनिष्ट परिणाम करत असतील.
हा प्रश्न च कोणाला पडत नाही.
पण रासायनिक खत ते पण पिकांस दिली जातात माणसाला नाही.त्या वर मात्र आक्षेप असतो

hrkorde's picture

22 Sep 2021 - 7:06 pm | hrkorde

हेच लिहायचे होते.

प्रदूषणाला सर्वच लोक जबाबदार आहेत

विवेकपटाईत's picture

23 Sep 2021 - 10:02 am | विवेकपटाईत

मी स्वत: सर्व वस्तू शेविंग क्रीम शेम्म्पू, साबण इत्यादी ग्रीन टग असलेले वापरतो. फरशी साठी गोनायाल आणि भांड्यांसाठी राखेने बनलेले डीशवाश वापरतो. अंघोळ हि दहा लिटर पेक्षा कमी पाण्यात करतो. आपल्याला जमेल तेवढे करत राहिले पाहिजे.

तुमचे चरण लागल्यावर हा धागा पवित्र झाला.
आता गाडी खते via करोना via हिंदुत्व via भाजप प्रवास करत मोदी इथे येऊन थांबेल. चालुद्या.

असा प्रवास होईल मोदी सरकार कडे हा धागा कसा येईल त्यांचे आणि त्यांच्या पक्षाची त्या मध्ये काहीच भूमिका नाही.
भारतीय शेती नी जेव्हा कात टाकली तेव्हा काँग्रेस चे सरकार होते आणि सरकार नी जाहिरात करून,अनुदान देवून लोकांना पारंपरिक शेती पासून फारकत घ्यायला लावली आणि रासायनिक शेती कडे भारताची वाटचाल सुरू झाली ती संक्रमणाचा काळ मी बघितला आहे.
संकरित बियाणे,संकरित जनावरे, हे तेव्हा आके.
आता कोणत्याही पिकांचे ओरिजनल नैसर्गिक बियाणे अस्तित्वात च नाही.
आहेत ती सर्व संकरित .लाल शेंगदाणा आता शोधून पण कुठे मिळणार नाही.
जपानी भुईमूग ज्याला आमच्या कडे पसऱ्या म्हणायचे कारण तो जमिनीत पसरायचा वडाच्या झाडासारख .फांदी त्याला मुळ्या अशा पद्धतीने . .
तो आता अस्तित्वात च नाही.

विवेकपटाईत's picture

23 Sep 2021 - 9:52 am | विवेकपटाईत

केंसरचा संबंध हि तुम्ही हिंदुत्व आणि पंतप्रधानशी लावला. धन्य झालो. बाकी गेल्या वर्षी देशात केंसरने किती प्राण घेतले एकदा गुगल सर्च करून तपासून घ्या.

स्वधर्म's picture

22 Sep 2021 - 5:21 pm | स्वधर्म

माझे हे शेती स्चत: करण्याचे पहिलेच वर्ष होते. डाळिंबांच्या झाडांच्या मधल्या जागेत १४ जून रोजी भुईमूग पेरला होता. कालच पूर्ण शेंगा काढून त्या शहरात घरी घेऊन आलो. बर्याच अडचणी आल्या होत्या, पण अखेर पीक हाती आले. शेंगांना एकही दाणा रासायनिक खत घातले नाही कि, कीटकनाशक मारले नाही. बांधाकडेची एक रांग मुंगूस आणि खारींनी थोडी खाल्ली, पण तो त्यांचा वाटा आहेच. शेजारच्या लोकांनीही शेंगा पेरल्या होत्या, काहींनी थोडे खतही घातले होते, पण सगळे म्हणाले की आमच्या शेंगा चांगल्या भरल्या आणि एकंदर पीक समाधानकारक आले आहे. आता त्यातून वर्षभराची कुटुंबाची शेंगदाण्याची गरज भागेल अशी अपेक्षा आहे. जमले तर तेलही काढून घेण्याचा विचार आहे. वाळवून झाल्यावर किती नक्की शेंगदाणे हाती लागतात, ते कळेल. पण विषमुक्त अन्न खायला मिळेल, हे नक्की. डाळिंबाच्या बाबतीत मात्र गेले दोन वर्षे प्रयोग केले, पण बहुधा आमच्या भागात ती नीट येतील असे वाटत नाही. तसेच तोडा करणे, विकणे यासाठी जबाबदार माणूस मिळणे महाकठीण आहे. त्यामुळे ती बाग काढून पूर्ण क्षेत्रच हंगामी पिके घेऊन घरी विषमुक्त अन्न खाण्यासाठीच केवळ शेती करण्याचा विचार आहे. अर्थात आर्थिकदृष्ट्या हे किती परवडेल, ते माहित नाही, पण मी आशावादी आहे.

कंजूस's picture

22 Sep 2021 - 6:39 pm | कंजूस

तुमचा भाग कोणत्या पावसाच्या भागात येतो?
(४०-६०, ६०-८०,८०-१०० सेंमि.?)

hrkorde's picture

22 Sep 2021 - 7:04 pm | hrkorde

घरी विषमुक्त अन्न खाण्यासाठीच केवळ शेती करण्याचा विचार आहे.

अशक्य आहे

साधा चहा बनवायचा तर चहापूड , वेलदोडे , साखर , दूध इतके पदार्थ लागतात , बाकी अन्नाबद्दल तर विचारूच नका. सगळे कसे पिकवणार ?

स्वधर्म's picture

23 Sep 2021 - 7:00 pm | स्वधर्म

मी असे कुठे म्हणालो की घरातले प्रत्येक ग्रॅम अन्न सेंद्रीय असेल अन ते मीच उगवेन म्हणून? पण नगदी पीकाच्या नादाला न लागता आपल्याला खाण्यासाठी उगवावे एवढाच विचार आहे. तो प्रयत्न या वर्षी पहिल्यांदा केला आणि माझ्या मते सफल झाला, इतकेच शेअर करायचे होते.
बाकी गीता आणि सेंद्रीय शेती इत्यादीचा जो संबंध पटाईत सर लावत आहेत, त्याबद्दल माझा पास.

सुरिया's picture

22 Sep 2021 - 9:36 pm | सुरिया

अरे रे
ज्यांनी सांगितली गीता त्या यादव साहेबांनी स्वतः घराची डेअरी थोडे दिवस सांभाळली. वयात आले की पॉलिटिक्स मध्ये आले. त्यांचे बंधू नांगर घेऊन हिंडत पण नांगरणी साठी का हत्यार म्हणून माहीत नाही. पूर्णवेळ त्यांचे रेसलिंग क्लासेस असायचे म्हणे. ज्याला सांगितली गीता तो बिचारा लायफटाईम धनुक्ष सोडून काय केला नाही. ज्यांच्या समोर सांगितली गीता त्यांची अक्षाऊहिणी च्या संख्येत परालिसारखी चिता तिथेच जळाली. ज्याने फोचविली तोही लाईव्ह न्युज रिपोर्टर. टीका लिहिणारे भक्तीत रममाण. छापून विकून गब्बर झालेले लोक धर्मकार्यात नाहीतर परदेशात स्थायिक.
आता ह्या सगळ्यात शेतकरी कुठून आले?

विवेकपटाईत's picture

23 Sep 2021 - 9:54 am | विवेकपटाईत

भगवंताची टिंगल करून केंसर पासून मुक्ती मिळत असेल तर अवश्य करा, माझी ना नाही.

सुरिया's picture

23 Sep 2021 - 10:40 am | सुरिया

फक्त भगवंताची भक्ती करून कॅन्सर पासून मुक्ती मिळत असेल तर असे लेख अवश्य टाका, माझीही ना नाही.
किंवा एखाद्याने टिंगल केली म्हणून कॅन्सर झाला असे एखादे उदाहरण दिले तरी चालेल.
.
सध्या मात्र शेतीसाठी गीता हे समीकरण उदाहरणे देऊन स्पष्ट करा. उगी जनरल काहीतरी केले तर काहीतरी मिळते अशा अर्थाचे सर्वसमावेशक श्लोक टाकून गीतेला आणि पर्यायाने कृष्णाला बदनाम करु नका इतकीच विनंती.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Sep 2021 - 10:46 am | ज्ञानोबाचे पैजार

तो असा आहे की रासायनिक शेतीच्या ऐवजी सेंद्रिय शेतीला प्राधान्य मिळाले पाहिजे. तो कळला म्हणजे झाले.

सेंद्रिय शेतीचे अनेक फायदे देखिल आता समोर येत आहेत. पण मी शेतकरी नसल्याने मला या विषयावर वाद घालायचा अधिकार नाही हे मान्य आहे.

पण एकदा आमच्या एका शेतकरी मित्राने (जो स्वतः सेंद्रिय शेती करतो) आम्हाला दुधाचे दोन ग्लास प्यायला दिले आणि विचारले की कोणत्या ग्लासातले दुध आवडले.

मला जो ग्लास आवडला होता तो त्याच्या घरच्या गायीच्या दुधाचा होता आणि दुसरा बाजारात मिळणार्‍या दुध पिशवीचा.

तेव्हा पासुन त्याच्या कडे गेलो की एक ग्लास दुध मागून पितोच.

असेच एकदा त्याने घरचे भुइमुगाचे दाणे दिले होते ३-४ किलो. इतका चविष्ट भुईमुग मी तोपर्यंत कधी खाल्ला नव्हता.

पण बाजारात मिळणार्‍या सेंद्रिय असा शिक्का मारलेल्या वस्तुं मधे ती मजा नाही हे देखिल नमुद करतो.

पैजारबुवा,

hrkorde's picture

23 Sep 2021 - 1:58 pm | hrkorde

रसायने नव्हती तेंव्हा लोक सेंद्रिय शेतीच करत होते, मग त्यावर जर भागत होते तर मग शेतकरी रासायनिक शेतीच्या मागे का लागले ?

गॉडजिला's picture

23 Sep 2021 - 2:21 pm | गॉडजिला

दर्जा मधे तडजोड करून

1) प्रचार संकरित बियाणे वापरली तर भरघोस पीक येईल.
रासायनिक खत विषयी पण तोच प्रचार.
खरी स्थिती.
पारंपरिक बियाणे परत परत किती पण वर्ष वापरता येत असत .त्यांची उगवण क्षमता काय टिकून असे
संकरित बियाणे दरवर्षी नवीन विकत घ्यावे लागते..
शेतात निर्माण झालेले पेरता येत नाही..त्याची उगवण क्षमता, फुलण्या ची क्षमता नसते तसे genitic बदल केलेले असतात
कायम स्वरुपी बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्यांना गिऱ्हाईक मिळते.

Rajesh188's picture

23 Sep 2021 - 2:39 pm | Rajesh188

तात्पुरते फायदे देतात ,दीर्घ कालीन फायदा देत नाहीत.रासायनिक खतांमुळे जमिनी चा कसं कमी होतो.
पण आता स्थिती मध्ये आपण पोचलो आहोत की रासायनिक खत वापरणे majburi झालेली आहे.
शेणखत,गांडूळ खत दीर्घ काळ फायदा देतात ,आणि सर्वात महत्वाचे जमिनी च कसं वाढवतात.
पण परिणाम दिसायला काही वर्ष लागतात.
सर्वांच्या जीवनाची मॅगी झाली आहे सद्ध्या.
दोन मिनिटात तयार होणारी .पण कोणतेच पोषक तत्व नसणारी.

कपिलमुनी's picture

23 Sep 2021 - 3:25 pm | कपिलमुनी

स्वतःचे ऑफिस एसी वापरून किती प्रदूषण करते , आपण रोज कार बाईक मधून किती प्रदूषण करतो, आपल्या शहरात किती प्लास्टिक तयार ,वापर होतो ? आपण वापरत असलेल्या बॅग पासून लिपस्टिक पर्यंतच्या वस्तू मुळे होणारे प्रदूषण, 5% सोसायटी मध्ये सुद्धा चालू नसलेले कंपोस्ट प्रकल्प हे सगळं सोडायच आणि शेतकऱ्यांनी सेंद्रिय पिके घेतली पाहिजेत.

सेंद्रिय केळी खावा

तू लढ , मी फक्त बघतो

कपिलमुनी's picture

23 Sep 2021 - 6:42 pm | कपिलमुनी

कौरव पांडव कृष्णाचे ऐकून लढले आणि नंतर सर्वात स्ट्रॉंग कोण उरले??

यादव !
त्यामुळे फार गीता ऐकू नका ,

भारतात सगळी शेती सेंद्रिय असताना प्रति एकर उत्पादन का कमी होते ?
याचा शोध घ्या.

कॉमी's picture

23 Sep 2021 - 9:46 pm | कॉमी

"बादरायणी संबंध" साठी डिक्शनरी मध्ये हे उदारहरण चालावे.

विवेकपटाईत's picture

12 Oct 2021 - 10:44 am | विवेकपटाईत

प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद. लेखाचा शेतीबाबत गीतेत काय संगितले आहे, त्या बाबत माहिती देणे हा उद्देश्य होता. बाकी आपल्या देशात 90 टक्के रसायनिक शेती होते. त्यात ही त्यांच्या मारा वाजवी पेक्षा जास्त होतो. रसायनिक शेती असली तरी सेंद्रिय खत ही लागतात. पण जेवढी गरज असते तेवढी दिली जात नाही कारण आज शेतकर्‍यांजवळ/ गावांत जनावरे नाहीत किंवा जेवढे पाहिजे तेवढे नाही. अपशिष्ट खतांत बदलण्याची पर्याप्त व्यवस्था नाही.