सध्या मी काय पाहतोय ? भाग ७

Primary tabs

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
19 Jun 2021 - 11:16 pm

जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्‍यांदा आणि बर्‍याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही. हा चित्रपट अत्यंत महागड्या १० चित्रपटांमध्ये ९व्या स्थानावर आहे.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र गल्ला जमवु शकला नाही... पण जसे मला वाटते, तसेच या चित्रपटाच्या जगभरातील चाहत्यांना देखील वाटते की याचा सिक्वल यावा... मी त्या दिवसाची नक्कीच वाट पाहिन जेव्हा हे घडुन येवुन या चित्रपटाचा सिक्वल तयार करुन पूर्ण होइल...
विशेष :- Lynn Collins [ कथेतील नाव :- Dejah Thoris ] तिच्या अनोख्या वेषभुषेत अत्यंत सुंदर दिसली आहे. :)
मी इतकचं सागतो... या संपूर्ण चित्रपटाचा प्रवास हा Ock, Ohem, Ocktie, Wies Barsoom आणि Ock, Ohem, Ocktie, Wies Jasoom या दोन जादुई शब्दांच्या मधला आहे,बाकी तुम्ही या संपूर्ण प्रवासाचा नक्कीच अनुभव घ्यावा असाच तो आहे. :)

खरंतर मी मागच्या भागात गॉडजिलाला म्हणालो होतो...तू फाल्गुनी पाठक चे जे गाणे दिले आहेस त्यातील वद्यां वरुन मला मी पाहिलेला एक सुंदर चित्रपट आठवला ! पुढच्या भागाची सुरुवात बहुतेक त्यानेच करीन. पण मला त्या चित्रपटा पेक्षा हा आधी द्यावा वाटल्याने, याने या भागाची सुरुवात केलेली आहे.
-
--
---
या धाग्यात प्रतिसाद देणार्‍यांना माझी विनंती आहे की प्रतिसादात व्हिडियो देताना width="360" ठेवा म्हणजे धागा उघडण्यास जड होणार नाही.

आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ६

मदनबाण.....

कलाचित्रपटप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

20 Jun 2021 - 8:13 am | मदनबाण

गीतकार, लेखक आणि उत्तम वक्ता मनोज शुक्ला हे मनोज मुंतशिर या टोपण नावाने सगळ्या रचना करतात... त्यांचे श्याम नारायण पाण्डेय कृत हल्दीघाटी चे ६ भाग मी पाहिले / ऐकल्यावर मनोज मुंतशिर यांचे प्रेरणादायी व्यक्तीमत्व अजुन अधिक जाणुन घेण्यासाठी त्यांची दोन भागात असलेली मुलाखत पाहिली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswami

चौथा कोनाडा's picture

21 Jun 2021 - 5:24 pm | चौथा कोनाडा

खिळवून ठेवणारेई अप्रतिम मुलाखत आहे ही !

💯

पाहिली नसेल तर नक्की पहा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswami

आपल्या मनातिल विचार सतत प्रतिमांचे रुप धारण करुन आपल्या शरीराच्या आस्पास ते द्रुक्श्राव्य स्वरुपात प्रकट होउ लागले तर काय होइल ? अर्थातच एक मनोरंजक मसालापट कारण कोणीच स्वताचे विचार लपवु शकणार नाही..

एखाद्या सुरेख संकल्पनेची पुरेपुर माती करुन कथानकाची वाट लावणे म्हणजे काय हे समजुन घ्यायचे असेल तर केऑस वॉचिंग अवश्य बघा...

कुमार१'s picture

20 Jun 2021 - 6:37 pm | कुमार१

शेरनी हा प्राईम वरचा हिंदी चित्रपट छान आहे.

विद्या बालन, नीरज काबी, विजयराज इत्यादी.
जंगल खाते, वाघ पकडणे, वाघाची शिकार, सरकारी खाक्या, बाबू व खाबूगिरी आणि नेत्यांची अरेरावी हे सर्व चांगल्या पद्धतीने दाखवले आहे.

हा चित्रपट चांगला म्हणणे अवघड जागचे दुखणे आहे कारण चांगला म्हणावा तर करप्ट सिस्टीम मूकपणे स्वीकारली आहे असे म्हणणे भाग पडतं वाईट म्हणावा तर त्यात चूक काहीच दाखवलेले नसल्याने वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणे होईल

मुक्त विहारि's picture

20 Jun 2021 - 7:58 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

मदनबाण's picture

20 Jun 2021 - 8:08 pm | मदनबाण

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत्
अर्थात :- ‘‘जो पुरूष धर्म का नाश करता है, उसी का नाश धर्म कर देता है, और जो धर्म की रक्षा करता है, उसकी धर्म भी रक्षा करता है । इसलिए मारा हुआ धर्म कभी हमको न मार डाले, इस भय से धर्म का हनन अर्थात् त्याग कभी न करना चाहिए ।’’

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.” :- Arnab Goswami

मुक्त विहारि's picture

20 Jun 2021 - 9:17 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

ह्या ओळी जिथून आहेत तिथे धर्माचा त्याग म्हणजे नक्की कधी होतो काही दिलयं का ? स्वतःबद्दल तपासायला म्हणून विचारतो.

गॉडजिला's picture

20 Jun 2021 - 9:59 pm | गॉडजिला

व सध्या कलियुग असल्याने कुमार विश्वास यांनी असे काही विधान करण्यापुर्वी किमान इतिहास तरी वाचायला हवा होता असं म्हणावेसे वाटते...

आज मदनमोहनजी यांचा जन्म दिन !तेरे लिये हे गाणं न आवडणारा निराळाच असेल.या गाण्यामुळे मदन मोहन आणि लता मंगेशकर या द्वयीचे अफलातून सूत्र मला समजले.त्या आधी चित्रहार, रविवारीचे ब्लॅक अँड व्हाइट गाणी नंतर रेडिओ यावर त्यांची गाणी ऐकायचे पण जादू वीर झारा नंतर चढत गेली.

लग जा गले
https://youtu.be/TFr6G5zveS8
आपकी नजरो ने समझा
https://youtu.be/8txT8UGTCto
ज्यूक बाक्स
https://youtu.be/I8tVaKhVuBo

हल्लीच सहकुटुंब मेरा साया आणि आनंद पाहिला. दोन्ही चित्रपट फार सुंदर आहेत हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही.

आनंद चित्रपटच्या शेवटच्या ३०-४० मिनीटात माझ्या डोळ्यात पाणी आले...
-
--
---
जरासे वेगळ...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Believer... :- Imagine Dragons

निळूभाऊ फुले या प्रतिभावंत कलाकाराला मला आणि माझ्या वडिलांना भेटता आले याचा विशेष आनंद आहे. माझे तिर्थरुप कॉलेज मध्ये असताना त्यांच्या सगळ्या मित्रां बरोबर ते रविंद्र नाट्य मंदिर मध्ये सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहलेले नाटक पहावयास गेले होते, नाटक संपल्यावर मागच्या बाजुने जाउन त्यांनी निळूभाऊं बरोबर हास्तांदोलन केले होते, तर मी लहान असताना मामाच्या घरी गेल्यावर कोल्हापूरच्या शालिनी सिनेटोन मध्ये अनेकवेळा जात असे. त्यावेळी मी निळूभाऊंची स्वाक्षरी घेतल्याचे स्मरते.
बाकी वरती तेंडुलकरांचे नाव घेतले आहे त्यावरुन मला वडिलांनी गप्पा मारताना सांगितले की रमेश तेंडुलकर [ सचिन तेंडुकर यांचे वडील ] त्यांना किर्ती कॉलेज मध्ये मराठी भाषा विभाग प्रमुख असताना [ रमेश तेंडुलकर ] त्यांच्या [ वडिलांच्या ] वर्गात प्राध्यापक म्हणुन होते...मर्ढेकर यांच्या एका कवितेतील दहा दहाची लोकल गाडी सोडित आली पोकळ श्वास ही त्यांची आवडती ओळ ते बर्‍याच वेळा म्हणायचे असे त्यांनी मला सांगितले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : -तैरना है तो समंदर में तैरो नालों में क्या रखा हैं,प्यार करना है तो देश से करो औरों में क्या रखा हैं !

बरेच वर्षे याबद्दल ऐकुन होतो अनेकदा टीव्हीवर लागला असता काही ना काही कारणाने हा चित्रपट मिसत होता...

पाहुन झाल्यावर आता वाटते की चित्रपट छान आहे वरवर परंतु अंडर द सरफेस सबस्टंस मिसींग आहे... ही कथा मंगळाऐवजी पृथ्वीची दाखवली असती तर जास्त रॉ फिल येउन कथानकात गुंतवणुक अजुन वाढली असती कारण मंगळाचा मुळ कथेशी कसलाच सिग्निफिकंस नाही... बरे परग्रहावरुन पृथ्वीवर आलेला सुपरमॅन इथे शक्तिशाली व सुपरहिरो ठरतो पण इथुन तिकडे गेलेला कार्टर पोटेन्शीअल असुनही सुपरहीरो व्यक्तीरेखा ठरत नाही अजुन बरेच डिटेलिंग मिसींग असल्याने चित्रपट एक पुर्णानुभव न ठरता चांदोबातील बालकथा ठरतो जी प्रौढांसाठी अपरिपक्व कथानक ठरते... आश्चर्य आहे की एखाद्या चित्रपट कथेचा टार्गेट ऑडियन्स लहान मुले असुनही याच्या निर्मीतीसाठी अवाढव्य खर्च केला गेला... इतका खर्च न करता हेच कथानक घेउन कमी बजेटमधे हा चित्रपट बनवला असता तर अपयशी असा शिक्का माथी आला नसता

बरेच वर्षे याबद्दल ऐकुन होतो अनेकदा टीव्हीवर लागला असता काही ना काही कारणाने हा चित्रपट मिसत होता...
मी पहिल्यांदा टिव्हीवर पाहिला होता बहुतेक... त्यावेळी तो डिज़्नी चा चित्रपट आहे हे देखील माहित नव्हते...

ही कथा मंगळाऐवजी पृथ्वीची दाखवली असती तर जास्त रॉ फिल येउन कथानकात गुंतवणुक अजुन वाढली असती कारण मंगळाचा मुळ कथेशी कसलाच सिग्निफिकंस नाही.
आपल्या ग्रहावर आपणच इतका धुडगूस घालतोय त्यात अधिकची भर कशाला ? :))) [ मला हल्कचा पहिला भाग प्रचंड आवडला होता. ] ही कथा मुख्यत्वे मंगळावरच्या राजकुमारीची आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. कार्टर तर सोनाच्या शोधात असतो आणि नंतर गुहेत छताला सोने लागलेले पाहत असताना अचानक झालेल्या घडामोडींमुळे तो मंगळावर अचानक पोहचतो.

परग्रहावरुन पृथ्वीवर आलेला सुपरमॅन इथे शक्तिशाली व सुपरहिरो ठरतो पण इथुन तिकडे गेलेला कार्टर पोटेन्शीअल असुनही सुपरहीरो व्यक्तीरेखा ठरत नाही अजुन बरेच डिटेलिंग मिसींग असल्याने चित्रपट एक पुर्णानुभव न ठरता चांदोबातील बालकथा ठरतो जी प्रौढांसाठी अपरिपक्व कथानक ठरते...
याचा अर्थ तुम्हाला चित्रपट नीट समजुन घेता आलेला नाही असे दिसते. ही कुठल्याही सुपरहिरोची कथा नाही. जॉन कार्टर हा तुमच्या / माझ्या सारखा पृथ्वीतलावरील सर्वसाधारण मनुष्यप्राणी आहे, फक्त अचानक मंगळावर पोहचल्याने तिथल्या गुरुत्वाकर्षणाच्या त्याचा शरिरावर जो प्रभाव होतो तो उंच उडी मारण्याची क्षमता दर्शवतो, यापलीकडे सुपरपावर अशी कोणतीच गोष्ट त्याच्यात नाही,कारण ते पात्र मुळातच सुपरपावर असलेले नाही.

आश्चर्य आहे की एखाद्या चित्रपट कथेचा टार्गेट ऑडियन्स लहान मुले असुनही याच्या निर्मीतीसाठी अवाढव्य खर्च केला गेला... इतका खर्च न करता हेच कथानक घेउन कमी बजेटमधे हा चित्रपट बनवला असता तर अपयशी असा शिक्का माथी आला नसता

इतका खर्च केला म्हणजे काहीतरी विचार करुनच केला असावा... बाकी लहानमुले कुठलेही चित्रपट बिनधास्त बघतात... इन्सेप्शन सारखा चित्रपट देखील. :)
आणि माझ्या सारखा प्रौढ देखील बिनदिक्त आजही टॉम अँड जेरी आणि अगदी छोटा भीम देखील आवडीने पाहतो... :)
नको तिथे उगाच चिकित्सा करत बसण्याचा माझा स्वभाव नसुन, जे आहे त्यातुन आनंद कसा मिळवता येइल अश्या दृष्टीकोनातुन मी पाहण्याचा नेहमी प्रयत्न करतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।

गॉडजिला's picture

29 Jun 2021 - 10:43 pm | गॉडजिला

आपल्या ग्रहावर आपणच इतका धुडगूस घालतोय त्यात अधिकची भर कशाला ? :))) [ मला हल्कचा पहिला भाग प्रचंड आवडला होता. ] ही कथा मुख्यत्वे मंगळावरच्या राजकुमारीची आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
मंगळ नाव घेतल्याने सायफायचा फिल तयार होतो जो या चित्रपटाचा अजिबात भाग नाही, प्रुथ्वी ऐवजी लॉर्ड ओफ द रिंग प्रमाणे फँटसी जगही तयार करता आले असते... मंगळ प्रकरणच अनावश्यक

कारण ते पात्र मुळातच सुपरपावर असलेले नाही.
अचांटा उंचिच्या अफाट लांबीच्या उड्या आख्या ग्रहावर फक्त एक माणुस मारु शकतो ही त्या ग्रहावरची सुपर पॉवरच आहे. एखादे पात्र बाहेरुन पृथ्वीवर येउन हे करु शकले असते जे कथानायक आहे तर सुपरहिरोच बनुन जाइल जेंव्हा विलनकडेही एक सुपर पॉवर आलेली आहे. इथेच डिस्नेचा गोंधळ उडाला त्याना कॅरक्टर काय आहे हेच समजले नाही आणि समजले हे गृहित धरले तर ते प्रेक्षकांना ठसवता आले नाही.

इतका खर्च केला म्हणजे काहीतरी विचार करुनच केला असावा...
नक्किच, जगातील अत्यंत खर्चीक अपयशी चित्रपटमधे स्थान मिळवणे हे ध्येय नक्किच नसणार... पण ते झाले कारण कथानकासोबत पात्रांचा पुरेसा व्यवस्थित विचार केला नाही.

गेम ऑफ थ्रोन्स मधील रेड वेडिंग कुठे अन मंगळाच्या राजकुमारीचे लग्न कुठे... बालचित्रपट प्रौढांसाठी म्हणुन बनवायचा यत्न केला की अशी फसगत तयार होते.

मी स्वतः अ‍ॅनिमेशन पटांचा चाहता आहे पण जॉन कार्टरच्या कथानकातील बालिशपणा तरीही उठुन दिसतो

मंगळ नाव घेतल्याने सायफायचा फिल तयार होतो जो या चित्रपटाचा अजिबात भाग नाही, प्रुथ्वी ऐवजी लॉर्ड ओफ द रिंग प्रमाणे फँटसी जगही तयार करता आले असते... मंगळ प्रकरणच अनावश्यक
कुठलाही चित्रपट बघण्याच्या आधीच त्यावर अनुमान तयार करणे योग्य नाही. वरती सांगितल्या प्रमाणे ही कथा मंगळावरच्या राजकुमारीची आहे आणि तिचे राज्य वाचवण्यासाठी ती जॉनची मदत घेउ इच्छिते. इथे तिची तजजोड,तीची बुद्धिमत्ता आणि शेवटी जॉन वरती तिचा जीव जडणे हा गाभा आहे.

अचांटा उंचिच्या अफाट लांबीच्या उड्या आख्या ग्रहावर फक्त एक माणुस मारु शकतो ही त्या ग्रहावरची सुपर पॉवरच आहे. एखादे पात्र बाहेरुन पृथ्वीवर येउन हे करु शकले असते जे कथानायक आहे तर सुपरहिरोच बनुन जाइल जेंव्हा विलनकडेही एक सुपर पॉवर आलेली आहे. इथेच डिस्नेचा गोंधळ उडाला त्याना कॅरक्टर काय आहे हेच समजले नाही आणि समजले हे गृहित धरले तर ते प्रेक्षकांना ठसवता आले नाही.
त्या ग्रहावरची असली तरी त्या व्यक्तीची नाही. डिस्नेचा अजिबात गोंधळ उडालेला नाही... तर हा चित्रपट मुळातच A Princess of Mars (1912) वर आणि Barsoom series of novels वर आधारीत आहे.

नक्किच, जगातील अत्यंत खर्चीक अपयशी चित्रपटमधे स्थान मिळवणे हे ध्येय नक्किच नसणार... पण ते झाले कारण कथानकासोबत पात्रांचा पुरेसा व्यवस्थित विचार केला नाही.
गेम ऑफ थ्रोन्स मधील रेड वेडिंग कुठे अन मंगळाच्या राजकुमारीचे लग्न कुठे... बालचित्रपट प्रौढांसाठी म्हणुन बनवायचा यत्न केला की अशी फसगत तयार होते.
मी स्वतः अ‍ॅनिमेशन पटांचा चाहता आहे पण जॉन कार्टरच्या कथानकातील बालिशपणा तरीही उठुन दिसतो

या चित्रपटाने अमेरिकेत पैसा कमावला नसला तरी रशियात हिट ठरल्याने त्यांचा बर्‍यापैकी पैसा वसुल झाला पण अपेक्षित नफा झाला नाही. तुम्ही मुळातच चित्रपटा विषयी पुर्वग्रह निर्माण करुन किवा कल्पना करुन तो पाहिला किंवा त्याची दुसर्‍या चित्रपटाशी तुलना केलीत तर आहे त्या चित्रपटाला अनुभवण्याचा आणि समजुन घेण्याचा आनंद आधीच गमावुन बसलेला असता. मग ते बालिश / अ‍ॅनिमेशनची तुलना करणे आलेच. कुठलाही पुर्वदृष्टीकोन न ठेवता चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करा येव्हढेच म्हणीन.
असो.. ते तुमचे व्यक्तीगत मत असल्याने चित्रपट काही दर्जाहीन ठरत नाही इतके मात्र ठळकपणे सांगु शकतो.
माझ्या मते जो चित्रपट तुम्हाला २:३० -३:०० तास बाहेरचे जग विसरायला लावु शकतो तो तुमच्यासाठी उत्तम चित्रपट असतो, मग तो कुठल्याही भाषेतील असो किंवा अगदी लो बजेटचा अन् अ‍ॅनिमेशन नसलेला देखील.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।

तुम्ही मुळातच चित्रपटा विषयी पुर्वग्रह निर्माण करुन किवा कल्पना करुन तो पाहिला किंवा त्याची दुसर्‍या चित्रपटाशी तुलना केलीत तर आहे त्या चित्रपटाला अनुभवण्याचा आणि समजुन घेण्याचा आनंद आधीच गमावुन बसलेला असता.
हा चित्रपट बघण्यापुर्वी याच्या स्टोरीबद्दल मला काहीच कल्पना न्हवती व टीवीवर याआधी एक दोन मिनीटे काही प्रसंग बघणे सोडले तर अन्य काहीच पाहिले न्हवते तेंव्हा हा चित्रपट मि संपुर्णपणे पुर्वग्रह न बघता बघितला पण सतत काहीतरी मिसींग आहे भट्टी व्यवस्थीत जमली नाही असेच वाटत राहील्याने त्यावर जरा विचार केल्यावर मला काही बाबी समोर आल्यासारख्या वाटल्या त्या मी इथे लिहल्या आहेत. आणि माझे मत फक्त चित्रपटाबाबत आहे पुस्तकांबाबत काही माहीत नाही...

चित्रपट काही दर्जाहीन ठरत नाही इतके मात्र ठळकपणे सांगु शकतो
अजिबात सांगु नका कारण चित्रपट दर्जाहिन आहे ही बाब मलाच मान्य नाही... चित्रपट काहीसा सबस्टंसहीन आहे हे नक्कि... एक ना धड व काहीसे भाराभर प्रकरण आहे. आपण चित्रपट एंजॉय केलात आनंद आहे. चित्रपट रशीयात पसंत केला गेला ? हरकत नाही पण तुर्त मी रशीयाला जाउन हा चित्रपट पाहु शकणार नसल्याने माझ्या चित्रपटावरील विधांनावर मी अजुनही ठाम आहे.

मदनबाण's picture

30 Jun 2021 - 8:56 am | मदनबाण

पास...
अवांतर :- तुमचे एकंदर [ विविध धाग्यांवरचे ] इतके प्रतिसाद वाचल्यावर मला मिपा वरच्या जुन्या आयडीची आठवण आली, त्या आयडीचे पहिले अक्षर टा आणि शेवटचे अक्षर न होते. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha

Bhakti's picture

30 Jun 2021 - 4:21 pm | Bhakti

किती गोड आहे.अल्लू अर्हा!
जुन्या अंजली गाण्याचा नवीन कायाकल्प मस्त कल्पना!

जेंव्हा मी अंजली चित्रपट बघितला होता. थिएटर बाहेर पडल्या पडल्या मी केसेट ऑर्डर केली जी मला मिळायला 3 महिने गेले आणि ते तीन माझ्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा होती मी रोज दुकानात चौकशी करत असे आली का अंजली ची हिंदी केसेट आली का आणि रोज दुकानदार मागवून देतो असे आश्वासन देत असे माझी चिकाटी बघून त्याला खरेच दया आली अन त्याने ती केसेट मला भेट म्हणून चक्क मोफत मिळवून दिली होती :)

आजही या चित्रपटातील समथिंग समथिंग, आयेगा आयेगा 1991, अंबर हमारा रस्ता , स्टारवोर्स, अंजली अंजली अंजली हि गाणी माझी म्युझिक सकट अक्षरश: तोंडपाठ आहेत...

त्यावेळी जेंव्हा प्रथम मी अंजली गाणे तमिळमध्ये ऐकले होते तेंव्हा मला कनाली कनाली कनाली असे उच्चार ऐकू येत असत

:) या चित्रपटातील गाणी माझ्या बालपणातील आनंदाचा अनमोल ठेवा आहेत

वरील व्हिडीओ निमित्ताने त्या आठवणींना उजाळा मिळाला शतश: धन्यवाद मदनबाण

मदनबाण's picture

30 Jun 2021 - 6:45 pm | मदनबाण

@ भक्ती / गॉडजिला

मला कधी लहर आली की मी हे गाणं ऐकतो... बालपणात ऐकलेली काही गाणी कायम स्मरणात राहतात त्यातलचं हे एक आहे. आज सहज सकाळी अंजलीच्या २ गाण्यांची आठवण आली तेव्हा हे व्हर्जन नजरेस पडलं. २ वेगळं गाणं पण अंजली शब्द असलेलं गाणं पुढच्या स्वाक्षारीत असेल. :)
हिंदी व्हर्जन इथे आहे :- https://www.youtube.com/watch?v=kEBpHsVisT0

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha

त्याने अंजलीच्या वडीलांची अत्यंत संवेदनशील भुमिका केली होती, काही वर्शांनी प्रभुदेवाचा हमसे है मुकबला बघितला त्यातही त्याने खुनशी भुमिका केली होती त्यावेळी मला धक्का बसला होता अख्या चित्रपटात त्याचे कधीतरी मनपरिवर्तन होउन तो नायकाचा मदतनिस ठरेल अशा अपेक्षेत मी होतो... :) नंतर स्मजले तो फार पॉप्युलर व्हिलन आहे

आठवणी आठवणी आणि आठवणी... अरे गॉडजिला रघुवरन चे नाव घेउन तु मला टोटल रिकॉल करायला लावलास... मी चक्क रघुवरनला विसरुन गेलो होतो !
शिवा चित्रपटामुळे तो माझ्या डिप मेमरी लक्षात राहिला होता... डिप मेमरी रिकॉल केल्यावर शिवा आठवला... त्याचे शिवा मधले संवाद आणि त्याची ते संवाद बोलण्याची लकब आणि चेहर्‍यावरचा निर्घृण अभिनय ! बाब्बो... ओव्हर कॉन्फिडन्स नही रेहना चाहिये ! हा पोटात चाकु भोसकल्यावर म्हंटला गेलेला डायलॉग विसरण्यासारखा नाहीच. आत्ताच त्याचा दुसरा डायलॉग ऐकला... वो मौत इतनी भयानक होनी चाहिए की, आइंदा इस शहर में कोई भी आदमी भवानी के खिलाफ सोचते हुए भी डरना चाहिए. तसेच या चित्रपटातील संपूर्ण संगीत लक्षात ठेवण्या सारखेच आहे.

आता शिवा हिंदीत शोधायला हवा [ तेलगु मधे उपलब्ध आहे.] आणि टोटल रिकॉल देखील पहायला हवा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha

गॉडजिला's picture

30 Jun 2021 - 8:59 pm | गॉडजिला

शिवा तुनळीवर हिंदीत आहे,

टोटल रिकॉल अरनॉल्डचा-शेरोन स्टोनचा मस्त आहे हा हि चांगला आहे, यात केट बिकिन्सल च्या हालचाली बघणे(अगदी एक्षनसुद्धा) हा माझ्यासाठी आनंदाचा भाग असतो. कोलीन फेरल छानच

मदनबाण's picture

30 Jun 2021 - 9:28 pm | मदनबाण

शिवा तुनळीवर हिंदीत आहे,
लिंक प्लीज, कारण मला सापडला नाही !

टोटल रिकॉल अरनॉल्डचा-शेरोन स्टोनचा मस्त आहे हा हि चांगला आहे
अरनॉल्डचा पाहिला आहे पण ज्याचा ट्रेलर दिला आहे तो नाही पाहिला अजुन.

यात केट बिकिन्सल च्या हालचाली बघणे(अगदी एक्षनसुद्धा) हा माझ्यासाठी आनंदाचा भाग असतो. कोलीन फेरल छानच
ओह्ह, मग तर पहायलाच हवा ! असेच शेरोन स्टोन म्हंटले की केवळ Basic Instinct आठवतो.

याच बरोबर लक्षात येते ते बाथरुम क्लब सीन पुढील अमेझिंग साउंड ट्रॅक !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha

काही वर्षांपुर्वी बघितला होता खरे :(

Ujjwal's picture

29 Jun 2021 - 11:07 pm | Ujjwal

जे.के. सिमन्स (जे जोनाह जेम्सन, व्हीपलॅश मधला कठोर शिक्षक) ने एका प्रमुख पात्राला आवाज दिला आहे.
ओम्नी-मॅन सुपरमॅन सारखाच परग्रहवासी असणारा सुपरहिरो असतो. त्याचा हाफ-एलिय मुलगा, मार्क, १८ वर्षांचा होता होता त्याच्यातसुद्धा त्या शक्ती आहेत दिसू लागते. मार्कचा वडिलांसारखा सुपरहिरो बनण्याचा प्रवास दाखवला आहे.

खूप मनोरंजक आणि एका मागून एक सगळे भाग पाहावे वाटणारी मालिका आहे. दुसऱ्या सिजनच्या प्रतीक्षेत. आजपर्यंतच्या अनुभवाप्रमाणे प्रौढांसाठी असणारे कार्टून हा प्रकार जबरदस्त कथा घेऊन असतो. कार्टून असल्यामुळे भन्नाट,अकल्पित दाखवणे शक्य असते.

आवडते प्रौढ कार्टून्स-
रिक अँड मॉर्टी
इन्व्हिन्सीबल
बोजॅक होर्समन
अधूनमधून फॅमिली गाय

Bhakti's picture

30 Jun 2021 - 10:30 pm | Bhakti

या ड्रगनवाल्यांनी वेड लावलं आहे.शब्द तर मस्तच पण ही जी काही नाचली आहे , अप्रतिम:)
https://youtu.be/I-QfPUz1es8

Bhakti's picture

1 Jul 2021 - 9:35 am | Bhakti

मजेशीर
हेन्री ८ हा ब्रिटिश राजा आहे वाटत आणि त्यांचा इतिहासाच्या अभ्यासात समावेश आहे वाटत.
तर कशा पद्धतीने इतिहास मजेशीर शिकावा हे दाखविले आहे.
https://www.facebook.com/1143803202301544/posts/4944268288921664/?app=fbl

आत्ताच तंत्र विद्येची ओळख या वरती आलेल्या धाग्यात माझाच प्रतिसाद मी परत वाचला. तो वाचुन जे विचार आणि आठवणी मनात आल्या त्या इथे लिहत आहे.
यात गांजा आणि भांगेचा उल्लेख मी केलेला आहे, या दोन पदार्थां पैकी भांगेचे सेवन मी केलेले आहे. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की भांग प्यायल्यावर माणुस जे करतो ते करतच राहतो... म्हणजे जर हसु लागला तर भांगेच्या प्रभावामुळे तो हसत राहतो, रडत असेल तर रडतच राहतो.असेच जर ध्यान लावले तर तो ध्यानाच्या अवस्थेत जातो. या पद्धतीने शॉर्टकट न घेता हे साध्य करणं याला अर्थातच अधिक महत्व आहे.
एकंदर ध्यान / मन एकाग्र करणे याला अनन्य साधारण महत्व आहे. आपण आपल्या जगात अशी उदाहरणे ऐकली आहेत, वाचली आहेत आणि पाहिलेली देखील आहेत.
उदा. द्यायचे झाले तर द्रोणांचा अर्जुनाला प्रश्न आणि अर्जुनाने पक्षाचा डोळा हे त्या प्रश्नाला दिलेले उत्तर, विवेकानंदांच्या वाचनाच्या वेगा बद्धल आणि ते स्मराणात ठेवण्या बद्धल कथा आहेच.
आता अश्या व्यक्तीबद्धल मी सांगतो ज्याच्यामुळे मला एकाग्रता किती उच्च दर्जाची असु शकते ते प्रत्यक्ष पहावयास मिळाले.
तो काळ होता जेव्हा व्हिसीआर बाजारात आला होता आणि त्यावर चालणार्‍या व्हिडियो कॅसेटचा... लोकांना चित्रपटगृहात न जाता घरीच चित्रपट पाहण्याचा पर्याय मिळाला होता. तेव्हा व्हिसीआर तासाच्या दराने भाड्याने वापरायला मिळायचा तर व्हिडियो कॅसेटच्या लॅब्ररीत जाउन आपल्याला हवा तो चित्रपट पहायचे आणि त्याची कॅसेट घ्यायची.
अश्या पद्धतीने मला आणि माझ्या मित्रांना चित्रपट पहायला आवडु लागले होते, कोणाचे घर जरा रिकामे असेल त्यांच्या घरी टिव्हीला व्हिसीआर जोडुन चित्रपट पाहिला जात असे. हे सगळे एकमेकांनी साठवलेले पैसे एकत्र करुन केले जात असे. त्यावेळी ब्रुस ली आणि जॅकी चॅन या दोघांची क्रेझ होती... आर्मर ऑफ गॉड [ जॅकी चॅन ]
एंटर द ड्रॅगन [ ब्रुस ली ] असे आणि अनेक चित्रपट आम्ही मित्रांनी त्याकाळी पाहिले. माझ्यावर ब्रुस ली चा प्रभाव जॅकी चॅन पेक्षा अधिक पडला ! जॅकी अ‍ॅक्शन कॉमेडी या प्रकारात जास्त होता, मात्र ब्रुस ली मात्र मला फाइट आणि बॉडी कंट्रोल याच्यामुळे अधिक आवडला.
जॅकी चॅन चे तत्वज्ञान आहे की नाही ते मला ठावूक नाही, परंतु ब्रुस ली चे मात्र आहे. तसेच तो फाईट मारातान जो चित्कार भरायचा त्याचा मी फुलस्पीड पंखा आहे. :)
ब्रुस ली ची एकाग्रता आणि मास्टरी खाली दिलेल्या काही व्हिडियोतुन तुम्हाला अनुभवता येइल :-

"Be Water, My Friend.
Empty your mind.
Be formless, shapeless, like water.
You put water into a cup, it becomes the cup.
You put water into a bottle, it becomes the bottle.
You put it into a teapot, it becomes the teapot.
Now water can flow or it can crash.
Be water, my friend."

:- Bruce Lee

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahman

मदनबाण's picture

2 Jul 2021 - 6:39 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master

मदनबाण's picture

2 Jul 2021 - 7:44 pm | मदनबाण

@मुक्त विहारि
काही दिवसांपूर्वी मी मिपावर बंगाल हिंसा आणि त्यातील अशांती दुतांच्या बलात्कारी कृत्या बद्धल प्रतिसाद दिला होता. अगदी देण्याची इच्छा नसताना देखील ५० वर्ष वय असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्यावर ती जो विलाप करत असल्याचा व्हिडियो दिला होता... आता तर हे ही उघड झाले आहे की ज्या हिंदूंना परत यायचे आहे त्यांना सागितले जात आहे की १५ दिवसाठी तुमच्या बायकोला आमच्याकडे पाठवा,मग या किंवा पैशाची मागणी होत आहे. हिंदू स्त्रियांचे / लहान मुलींचे कपडे फाडुन बलात्कार करण्यात आले तसेच त्यांची नग्न करुनच धिंड / मिरवणुक काढण्यात आली आणि त्यांना तसेच नग्नपणे नाचण्यास देखील सांगण्यात आले.
आधी काश्मिर आता बंगाल. केंद्रशासन आणि संपूर्ण हिंदूस्थानातील हिंदू समाज तसाच अफुच्या नशेत धुत्त पडलाय...
महाराष्ट्रात असे घडुन जेव्हा मराठी हिंदू लोकांच्या बायकांना उचलुन नेतील तेव्हा बहुतेक हिंदूंना हिंदूत्वाच्या व्याख्येची गरज पडणार नाही असे दिसते !
आझाद मैदानात त्याचा डेमो दिला गेला आहे, खाकी वस्त्रातील महिला पोलिसांच्या आंगावर हात घालुन दाखवुन झाले आहे... आपण फक्त व्याख्या शोधत बसायचे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master

मदनबाण's picture

3 Jul 2021 - 8:04 am | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )

मदनबाण's picture

3 Jul 2021 - 1:11 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )

Ujjwal's picture

5 Jul 2021 - 11:11 pm | Ujjwal

या लघुपटामागची कथित पार्श्वभूमी अशी आहे की सत्यजित रे यांनी व्हिएतनाम युद्धाचा प्रतीकात्मक निषेध म्हणून हा लघुपट तयार केला. बंगल्यातील मुलगा म्हणजे अमेरिका आणि झोपडीतील मुलगा म्हणजे व्हिएतनाम असं काहीसं चित्र रंगवण्यात आलं. अमेरिकेच्या लोकांमध्ये असणारे श्रीमंतीचा माज, दादागिरी करण्याची खोड इ. गुण (?) अत्यंत प्रभावीपणे बंगल्यातील मुलाच्या रूपात मांडण्यात आले आहेत. सर्व प्रकारच्या सुविधा आणि अत्याधुनिक शस्त्रे असूनही व्हिएतनामच्या पारंपरिक गनिमी काव्यापुढे अमेरिका हे युद्ध जिंकू शकली नाही (अर्थात हि नंतरची घटना). १२ मिनिटात एकही संवाद नसूनही आपले म्हणणे अत्यंत प्रभावीपणे मांडण्याच्या हातोटीचं कौतुक करावं तेवढं कमी.

मदनबाण's picture

5 Jul 2021 - 11:27 pm | मदनबाण

@ Ujjwal
तुम्ही हा लघुपट इथे दिल्या बद्धल धन्यवाद. _/\_

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।

मदनबाण's picture

6 Jul 2021 - 6:35 pm | मदनबाण

@ Ujjwal
लघुपटामागची ही कथित पार्श्वभूमी माहित नव्हती.
-
--
---
आज Teri Mitti Female Version पाहताना बाजुलाच जो व्हिडियो दिसला आणि तो पाहिल्यावर इथे द्यावासा वाटला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Teri Mitti Female Version - Kesari | Arko feat. Parineeti Chopra | Akshay Kumar | Manoj Muntashir

मदनबाण's picture

10 Jul 2021 - 8:29 am | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.Albert Einstein

मग ते आपले असो कि दुसर्‍याचे ...

जे उत्तम आहे ते स्विकारावेच लागेल मग ते आपले असो कि दुसर्‍याचे ...
जे आपलेच आहे, ते आपल्यालाच ठावूक नाही. ते ज्ञान जे आपण जगाला दिले आणि आज आपल्यालाच त्याचा गंध नाही. ते परत आपल्याला समजावे हे या व्हिडियो बनवण्या मागे किंवा ते इथे देण्या मागचा हेतू आहे. आपला गौरवशाली इतिहास पुसला गेला असल्याने तो परत शोधुन त्याचे ज्ञान आपल्याला परत मिळवावे लागेल हे देखील वरील व्हिडियोतुन सुचित होते. आपल्याकडे उत्तमच होते आणि जगाला ते आपण मुक्त हस्ताने दिलेले आहे याचा देखील बोध आपणाला होतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.Albert Einstein

हा गैरसमज निर्माण होऊ न देणे जास्त संतुलितपणा असेल...

आपलाच का कोणाचाच इतिहास अथवा भविष्य फक्त गौरवशाली असू शकत नाही... तसेही भान वर्तमानाचे जास्त आवश्यक आहे

गॉडजिला's picture

10 Jul 2021 - 7:04 pm | गॉडजिला

आपले ज्ञान आता आधुनिक पाश्चात्यांच्या पध्द्तीवापरून (युट्युब) समोर येत असेल तर ती चांगली बाब आहे कारण हे करताना आपले परके उणे दुणे करण्यापेक्षा ज्यांचे जे चांगले आहे त्याचा वापर दिसून येतो

हा गैरसमज निर्माण होऊ न देणे जास्त संतुलितपणा असेल...
तो असंतुलित आहे म्हणुन गैरसमज आहे आणि आपला मूळ इतिहास शोधणे आणि त्या शोधात तो गौरवशाली आहे यात कोणता वाद अत्ता तरी दिसत नाही.
आपल्याला तुर्की आक्रमकांचा मुघल म्हणुन गैरवशाली इतिहास शिकवण्यात आला आणि हे प्रयत्न इंग्रजांनी आणि नंतर सत्तेत आलेल्या काळ्या इंग्रजांनी [ काळे इंग्रज यासाठी कारण हिंदूंच्या राजांचा वैभशाली इतिहास हा गाळला गेला आणि आक्रमकांचे गुणगान सुरु ठेवले. ] हिंदूंना त्यांच्याच देशात दुयम्म वाटावे अशी मानसिकता निर्माण होण्यासाठीच तो बदलला गेला हे सत्य आपण नाकारु शकत नाही. ते चित्रपटा पासुन जाहिराती पर्यंत सर्वत्र केले गेले.
कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई
शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी॥

हे सत्य आहे म्हणजे गैरसमज नव्हे,नक्कीच हिंदू राजांनी सद्गुण विक्रुती बाळगली आणि त्याची फळे देखील त्यांना आणि त्यांच्या प्रजेला [हिदूंना ] भोगावी लागली.

आपलाच का कोणाचाच इतिहास अथवा भविष्य फक्त गौरवशाली असू शकत नाही... तसेही भान वर्तमानाचे जास्त आवश्यक आहे
रामाचा इतिहास गैरवशालीच नसता तर आजही पुरुष हा मर्यदापुरुषत्तम असावा हा गुण ओळखला किंवा गणला गेला नसता.
जे सत्य आहे ते अमान्य करणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण ठरत नाही, वर्तमानाचे भान असायलाच हवे पण ते भान असताना आपला "खरा" इतिहास माहित असणे हे अत्यावश्यक ठरते.त्या शिवाय तुमचे वर्तमान आणि भविष्य प्रकाशमान होउ शकत नाही. फ्रेंच लोकांसाठी नेपोलियनचा इतिहास गैरवशाली आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदूंसाठी गैरवशाली आहे. तेव्हा कोणाचाच इतिहास गैरवशाली असु शकत नाही आणि भविष्य गैरवशाली असू शकत नाही हे विधान पूर्णपणे चूकीचे आहे. कधीही कोणतेही युद्ध न हरलेला बाजीराव पेशवा पराक्रमयी गैरवशाली जागतिक इतिहास निर्माण करत असतो. [ मी कुठेतरी ऐकले होते / वाचले होते की पालखेडच्या लढाईचे मॉडेल अमेरिकन मिलेटरी मध्ये शिकवले जाते. ]

आपले ज्ञान आता आधुनिक पाश्चात्यांच्या पध्द्तीवापरून (युट्युब) समोर येत असेल तर ती चांगली बाब आहे कारण हे करताना आपले परके उणे दुणे करण्यापेक्षा ज्यांचे जे चांगले आहे त्याचा वापर दिसून येतो
हे विधान मान्य आहे.याच बरोबरा आपला खरा इतिहास गौरवशाली देखील होता हे याच माध्यमातुन मांडले गेले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.Albert Einstein

गॉडजिला's picture

10 Jul 2021 - 9:58 pm | गॉडजिला

रामाचा इतिहास गैरवशालीच नसता तर आजही पुरुष हा मर्यदापुरुषत्तम असावा हा गुण ओळखला किंवा गणला गेला नसता.

इतिहास आणि भविष्य...
उत्तररामायण रामकथेमधून गाळले जाते ते का बरे. रामाबाबत त्याच्या पोटच्या पोरांनी काय म्हटले ते किती लोक तपासतात ?

बाकी इतिहासावर बोलायला गेले की पुराण सुरु करायचे पुराणावर बोलायला सुरुवात केली इतिहासाच्या तक्रारी सांगायांच्या अन काहीच नाही मिळाले की तुम्ही फलाना फलाना गटाचे कोकलत सूंबाल्या ठोकायच्या म्हणजे थोडक्यात काय तर सविस्तर चर्चा नाकारायची यातूनच महान संस्कृत्या झाकोळल्या जातात याचे मात्र दुःख कोणालाच नाही :(

तेव्हा कोणाचाच इतिहास गैरवशाली असु शकत नाही आणि भविष्य गैरवशाली असू शकत नाही हे विधान पूर्णपणे चूकीचे आहे.

पुन्हा सिलेक्टिव्ह रीडिंग माझ्या वाक्यातून फक्त शब्द सोयिस्करपणे गाळला...

जसे च्या तसे वाचत नाही उत्तरात लिहु शकत नाही... आणि वर शेकडो हजारो वर्षापूर्वीचा इतिहास तुम्ही समजून घेता / सांगता / चर्चेला घेता हा विरोधाभास न्हवे तर काय आहे ?

ध चा मा करतच चर्चा होणार असतील तर भारत पारतंत्र्यात कधी गेलाच न्हवता हे देखील गौरवपूर्वक सिद्ध करता येईल की...

मदनबाण's picture

10 Jul 2021 - 10:59 pm | मदनबाण

तुम्ही फलाना फलाना गटाचे कोकलत सूंबाल्या ठोकायच्या म्हणजे थोडक्यात काय तर सविस्तर चर्चा नाकारायची यातूनच महान संस्कृत्या झाकोळल्या जातात याचे मात्र दुःख कोणालाच नाही :
ह्म्म्म... सविस्तर चर्चा योग्य वाक्य प्रयोग करुन व्हायला हव्या ना ?

पुन्हा सिलेक्टिव्ह रीडिंग माझ्या वाक्यातून फक्त शब्द सोयिस्करपणे गाळला...
मी सिलेक्टिव्ह रिडिंग केलेले नाही.

तेव्हा कोणाचाच इतिहास पूर्णपणे गैरवशाली असु शकत नाही आणि भविष्य गैरवशाली असू शकत नाही हे विधान पूर्णपणे चूकीचे आहे.
हा ठळक शब्दाचा वापर फार महत्वाचा आहे.

तसेच भविष्य फक्त गौरवशाली असू शकत नाही हे विधान चुकीचे आहे कारण भविष्यात काय घडणार आहे याचा केवळ अंदाज आपण वर्तवु शकतो, परंतु इतिहासात कुठल्या काळात काय घडले ते तुम्हाला अभ्यासता येउ शकते. शिवरायांच्या काळ गौरवशाली होताच, नसता तर काय झाले असते त्याचा श्लोक / ओवी वरती दिलेलीच आहे. कोणतेही साम्राज्य रातोरात उभे राहत नसते तसेच त्याचा रातोरात अस्त देखील होत नसतो, परंतु याचा जो पीक पिरियड [ गोल्डन पिरियड ] असतो तो गौरवशाली म्हणुनच गणाला जातो.
मी नंतर प्रतिसादात, नक्कीच हिंदू राजांनी सद्गुण विक्रुती बाळगली आणि त्याची फळे देखील त्यांना आणि त्यांच्या प्रजेला [हिदूंना ] भोगावी लागली.हे वाक्य लिहले आहे, ते आपण सिलेक्टिव्हली वाचायचे टाळले का ?

ध चा मा करतच चर्चा होणार असतील तर भारत पारतंत्र्यात कधी गेलाच न्हवता हे देखील गौरवपूर्वक सिद्ध करता येईल की...
ध चा मा करण्याची मुळीच इच्छा नाही, जिथे तुमचे मत मला पटले आहे तिथे हे विधान मान्य आहे. असे लिहलेले आहे.
असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.Albert Einstein

गॉडजिला's picture

11 Jul 2021 - 4:17 pm | गॉडजिला

आपलाच का कोणाचाच इतिहास अथवा भविष्य फक्त गौरवशाली असू शकत नाही...

हे सोडुन बाकि तुमचे तुम्ही ठरवा...

मदनबाण's picture

10 Jul 2021 - 9:17 pm | मदनबाण

मागच्या वर्षी माझे लक्ष भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या शोधावर गेली होती, ती बातमी खाली देत आहे.
Archaeological Survey of India discovers 9th century sandstone Shiva linga in Vietnam
याच बरोबर २०१७ मधली पण २०२० मध्येच माझ्या वाचनात आलेली दुसरी बातमी :-
Ancient Crystal Shiv Lingam at Candi Sukuh Temple, Central Java. 14th Century or older.
Ancient Siva Lingam in Bronze & Glass at Candi Sukuh, Indonesia
या सगळ्या पेक्षा आकाराने अगदी वेगळ्या असलेल्या शिवलिंगाची बातमी / माहिती माझ्या वाचनात आली होती. [ ही शंकराची सर्वात प्राचीन प्रतिमा असल्याचे म्हंटले जाते.]
Gudimallam Lingam

प्रविण मोहन यांचा देवळांची शोध घेण्याची कला मला विशेष भावली आहे, बर्‍याच काळा पासुन मी त्यांच्या या प्रयत्नपूर्वक चाललेल्या अविरत परिश्रमावर लक्ष ठेवून आहे.
आज सकाळी प्रविण मोहन यांचा यूट्युब चॅनवल चक्कर टाकली असता, हा वल्ली व्हिएतनाम मध्ये देखील जाउन पोहचला असे मला दिसले. त्यांची निरिक्षण शक्ती अतुलनिय आहे हे त्यांच्या अनेक व्हिडियोतुन समोर आलेले आहे. त्यांचे २ व्हिडियो इथे देउन जातो. [ त्यांचा चॅनल म्हणजे खजिना आहे हे माझे व्यक्तिगत मत आहे. ]
हंपी मधले विठ्ठल मंदीर.

अंकोरवाट मधील १०८ शिवलिंगे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.Albert Einstein

अंकोर वाटची माहिती चांगली आहे.

मदनबाण's picture

10 Jul 2021 - 11:56 pm | मदनबाण

आत्ता माझे आवडते व्यक्तिमत्व मेजर जनल जी.डी.बक्षी यांना ऐकतो आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.Albert Einstein

मदनबाण's picture

11 Jul 2021 - 11:28 am | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen Chawla

गुल्लू दादा's picture

12 Jul 2021 - 10:32 am | गुल्लू दादा

सध्या मी गुलाम अलीची ही गझल ऐकतोय...4-5 वेळा झाली ऐकून पण मन रिक्तच आहे अजून.

https://youtu.be/qDZ6oqW6JCM

जेम्स वांड's picture

12 Jul 2021 - 1:09 pm | जेम्स वांड

लेविसन वूड्स ह्या ब्रिटिश भटक्याचा

"फ्रॉम रशिया टू इराण : द वाईल्ड फ्रंटीयर"

हा अप्रतिम कार्यक्रम पाहतोय, डिस्कव्हरी प्लस ऍपवर,

च्यायला अफाट माणूस आहे, पायी-लिफ्ट घेत वगैरे राशियातून सुरू करतो ते पूर्ण दक्षिण रशिया, डागेस्तान, अझरबैजान, जॉर्जिया, अर्मेनिया अन इराण फिरलाय, अप्रतिम नरेशन आणि अतिशय अप्रतिम कॅमेरावर्क आहे. निव्वळ अफाट. बाकी सदरहू भागाचे निसर्गसौंदर्य, संस्कृती वगैरे पण साद्यांत घेतला आहे धांडोळा.

रात्रीचे चांदणे's picture

12 Jul 2021 - 5:04 pm | रात्रीचे चांदणे

लेविसन वूड्सच्याच walking the nyle आणि walking the Himalayas ह्या documentaries पण बघण्या सारख्या आहेत.

गुल्लू दादा's picture

12 Jul 2021 - 7:07 pm | गुल्लू दादा

रात्रीचे चांदणे कुठे मिळेल पाहायला आणि you tube वर असेल तर लिंक दिली तर बरे होईल धन्यवाद.

रात्रीचे चांदणे's picture

12 Jul 2021 - 9:16 pm | रात्रीचे चांदणे

Discovery+ aap वरती लेविसन च्या सगळ्या documentaries मिळूण जातील. Youtube वरती उपलब्ध नाहीत. माझ्याकडे walking the Himalayas आणि walking the nile आहेत पण कुठून मिळाल्या ते आत्ता आठवत नाही.

३० जून ला समांतरचा दुसरा सिझन रिलीज झाला आहे. :)

पाहण्याची सोय :-
Samantar Season 2 Episode 1

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Ik Vaari Aa Full Song | Raabta | Sushant Singh Rajput & Kriti Sanon | Pritam Arijit Singh Amitabh B

सवडीने अवश्य पहिल्या जाईल

गॉडजिला's picture

20 Jul 2021 - 10:04 pm | गॉडजिला

असं कथान अजुन एके ठिकाणी पाहिलं होतं त्यामुळे वैयक्तीक पातळीवर विरस झाला पण सर्व कलाकारांची कामे उत्तम होती त्यामुळे मजा आली हे नक्कि...

बाकी स्पॉयलरचा मोह आवडतो पण इथे कोणी धागा काढला तर कथानकाची फिलॉसॉपी, काही अनुत्तरीत पण सोपे प्रश्न याअवर विचारमैथुन अवश्य करु

चौथा कोनाडा's picture

29 Jul 2021 - 1:24 pm | चौथा कोनाडा

एकंदरीत चांगली आहे समांतर !
ऋतू-२ हा ऋतू -१ इतका भारी झाला नसला तरी बर्‍यापैकी चांगला वाटला !

मदनबाण's picture

29 Jul 2021 - 8:22 pm | मदनबाण

ऋतू-२ हा ऋतू -१ इतका भारी झाला नसला तरी बर्‍यापैकी चांगला वाटला !
हेच म्हणतो...
माझा आवडाता खवा-मावाच गेला यातुन ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front

Bhakti's picture

16 Jul 2021 - 11:00 am | Bhakti

जुन्नर पर्यटनविकास व्हायला पाहिजे.
https://www.facebook.com/MaharashtraTourismOfficial/videos/329163572212529/

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]

Bhakti's picture

17 Jul 2021 - 9:44 am | Bhakti

कुमारी आशा सुरेश यांना ऐकतांना सुंदर वाटते.तेव्हा समजले याला केरळमधील सोपान संगीतम् म्हणतात.ते वाद्य विशेष आहे.
https://www.facebook.com/243026622996117/posts/836610690304371/

मदनबाण's picture

17 Jul 2021 - 11:37 am | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]

माझे आवडते अभिनयाचे, कलेचे बादशाह... यांच्या बद्धल जितक बोलावं आणि पहावे तितकं कमीच आहे. या दोन्ही मुलाखती आणि मेहमुद यांनी गायलेलं गाणं मी फार काळापूर्वी पाहिले आहेत आणि आज इथे द्याव्याश्या वाटले.

मेहमुद यांची अगदी छोटीसी मुलाखत :-

Mehmood On Amitabh Bachchan | Exclusive | Bollywood Unseen Moments |

मेहमुद यांनी गायलेले गाणं...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]

मदनबाण's picture

17 Jul 2021 - 8:00 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]

यूट्युबर इकडे तिकडे सर्च करताना मला दिगेंद्र कुमार यांचा भाषणाचा व्हिडियो दिसला, पण त्याने माझे काही समाधान झाले नाही. मग अजुन शोध घेतल्यावर मला त्यांचा अजुन एक व्हिडियो दिसला आणि तो मला फार आवडला... त्यांच्या राजस्थानी लहेज्यातील बोलणे आणि त्यातही विनोदी बोलीतुन संभाषण करणारा हा महारथी कारगिल युद्धावर जेव्हा बोलतो तेव्हा ते ऐकत रहावेसे वाटते. त्यांची पाकिस्ताबाबत केलेली विधाने मला विशेष आवडलेली आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]

Bhakti's picture

18 Jul 2021 - 11:25 am | Bhakti

The Tomorrow War सिनेमा पाहिला.बरा आहे.शेवटचा ट्विस्ट आवडला.पिता-मुलीची भविष्यातील भेट पाहून Interstellar आठवतं राहिला.
आता तुफान पाहायचा आहे.

पाहात नाही ऐकतोय... स्पॉटीफाय वर मोफत ऑदभुत कथा

डिटेक्टीव भास्कर बोस अन इन्स्पेक्टर बिकेश दास जोडगोळीची विनोदी हलक्याफुलक्या पण रहस्यमय कथांची पॉडकास्ट. यात कथानकांची निवड , सादरीकरणमुल्ये इतकी अप्रतिम आहे की ऐकायला मस्त मजा येते... भारतात कोणी इतक्या विवीध परीस्थितीना हात घालुन रहस्यकथा सध्याच्या काळात नक्किच कोणी सादर केलेल्या नाहीत... सुरुवातील एक दोन कथांनंतर तोच तोच पणा येइल वाटले होते पण कथासुत्र आणी कथेतील पात्रांची केमीस्ट्री यामुळे भास्करच्या भास्करीयतवर आपण जाम फिदा आहोत...

मोबाइल अन डेस्क्टॉप दोन्हीवर उपलब्ध्द

https://open.spotify.com/playlist/1KFvjXZPpcIxXKwj1I2OlO

गुल्लू दादा's picture

22 Jul 2021 - 5:23 pm | गुल्लू दादा

मस्त आहेत. 7-8 ऐकल्या. सगळ्या ऐकणारे हळूहळू. सगळ्या ऐकल्यावरच रिप्लाय देणार होतो पण आधीच देतोय आता.

गॉडजिला's picture

22 Jul 2021 - 8:00 pm | गॉडजिला

काही काळाने भास्कर बोस व बिकेशदा यांनी मोठ्या पडद्यावर एंट्री केली तर मला आजिबात आश्चर्य वाटणार नाही.

गुल्लू दादा's picture

22 Jul 2021 - 6:01 pm | गुल्लू दादा

'मि. मीट मी सून' नावाचं पात्र विशेष आवडलं.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - विठ्ठलाच्या पायी थरारली विट

Bhakti's picture

22 Jul 2021 - 6:50 pm | Bhakti

मलंग
https://youtu.be/2Yok6LCjSAc
गेल्या वर्षापासून मै मलंग या गाण्याने भुरळ घातलीच होती.सिनेमा काल पाहिला.शेवटची कलाटणी जबरदस्त होती.

मदनबाण's picture

23 Jul 2021 - 9:45 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : -

ि ि...
ि, !!!
मदनबाण's picture

26 Jul 2021 - 11:22 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : -

!

पण चित्रपट सुमार निघाला. तसेही नेट्फ्लिक्स फार लो बजेट चित्रपट निर्माण करते... एकुणच नेटफ्लिक्स ओरिजनल म्हणजे खोदा पहाड निकला चुहा प्रकरण झालेले आहे. म्हणजे कॅमेरा प्रकाश योजना उत्तम असते पण चित्रपटात पुरेसा दम नसतो

फार सुरेख अ‍ॅक्षनपटाची माती केली आहे जॉल्टमधे

वरती दिलेला डॉ. जमनादास यांचा उपासावरचा प्रदिर्घ व्हिडियो पाहुन झाल्यावर तो व्हिडियो मला फार प्रेरणादायी वाटल्याने इथे शेअर केला, पण नुसते प्रेरणादायी वाटुन काय उपयोग ? ते आचरणात आणुण पाहणे म्हहत्वाचे ! मी खादाडी प्रेमी असल्याने मी कोणतेच उपवास करत नाही, ज्या दिवशी उपवास असते तेव्हा देखील उपवासाची खादाडी असतेच. तेव्हा या आधी कधीही न केलेला प्रयास मी पहिल्यांदाच केला. शनिवार पासुन मी केवळ पाणी आणि ताक यावर असुन आज या पद्धतीने मला स्वतःलाच आजमावुन पाहताना ५ दिवस पूर्ण होतील. :) अजुन किती दिवस हा प्रयोग सुरु ठेवायचा असे काही ठरवले नसल्याने अधिक काही सागुंही शकत नाही. :)
युट्यूबवर १ विक वॉटर फास्ट पासुन ४० डेज पर्यंतचे व्हिडयोज पाहुन झालेत, एका पठ्ठ्याने तर त्याचे हे सगळे दिवस घरभर कॅमेरे लावुन २४*७ लाईव्ह स्ट्रीम देखील केलेले आहे.

जाता जाता :- माझ्या घरच्यांना देखील अजुन विश्वास बसला नाही की जो व्यक्ती कधीही उपवास करत नाही तो गेले ५ दिवस जेवण खाण्या शिवाय राहु कसा शकतो ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा

Ujjwal's picture

31 Jul 2021 - 10:47 am | Ujjwal