पायनॅपल मँगो सालसा

Primary tabs

केडी's picture
केडी in पाककृती
3 Jun 2021 - 9:46 pm

Image1

खरतर उन्हाळा संपत आलाय पण सध्या हापूस ऐवजी इतर प्रकारच्या आंब्यांचा सिझन सुरू झाला आहे म्हणून ही झटपट होणारी आणि जराशी वेगळी म्हणून टाकतोय

मी ह्यात तोतापुरी, केसर आणि मालगोवा (मालगोबा) ,आंबे वापरले आहेत, ह्याने जरा वेगळी चव येते

अननसाच्या आणि आंब्याच्या फोडी करायच्या (सालं काढून). २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, १ टोमॅटो, बिया काढून त्याच्या फोडी आंब्याच्या फोडींच्या साईज प्रमाणे कापून, एक मध्यम कांदा चिरून.(मी थोडीशी कैरी पण बारीक चिरून घेतली, जरा दाताखाली आली की छान लागते).

हे सगळं मिक्स करून घ्यायचे, बारीक कोथिंबीर चिरून वरून भुरभुरायची. हे जरासं गार खायला मला आवडते म्हणून फ्रीज मध्ये ठेवायचे.
टीप:- पाणी सुटू नये म्हणून अगदी ऐन वेळेस ह्यात काळ मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा.

हा सालसा नुसताच खाल्ला तरी हरकत नाही, किंवा मग नाचो चिप्स सोबत डिप म्हणून.

एक पापड मस्तं तळुन त्यावर हे टाकून एक वेगळा मसाला पापड पण पुढल्या वेळी तुमच्या चकण्याला होईल!

image2

प्रतिक्रिया

अन्या बुद्धे's picture

3 Jun 2021 - 10:52 pm | अन्या बुद्धे

भारी आहे. एकदा तुमच्याकडे धाड घालून हातची चव घ्यायची आहे..

केडी's picture

5 Jun 2021 - 7:44 am | केडी

धन्यवाद, हो नक्की ....

राघवेंद्र's picture

3 Jun 2021 - 11:07 pm | राघवेंद्र

मस्त एकदम. करून पाहण्यात येईल

तुषार काळभोर's picture

4 Jun 2021 - 6:34 am | तुषार काळभोर

लई दिसांनी दिसलात.
आंबट तिखट गोड - एकदम हटके!

धन्यवाद! आता आलोच आहे तर जर लगे हात टाकून देतो अजून थोड्या रेसिपी...:-)

जुइ's picture

4 Jun 2021 - 7:12 am | जुइ

नक्की करणार.

सोत्रि's picture

4 Jun 2021 - 8:20 am | सोत्रि

झक्कास, ह्या विकांताला करण्यात येईल!

चला आता अननस शोधणे आले…

- (स्वयंघोषित मास्टर शेफ) सोकाजी

कंजूस's picture

5 Jun 2021 - 8:10 am | कंजूस

पण सालसा नाचाचा प्रकार असतो ना?
बेझल पाने घातली तर?

Bhakti's picture

5 Jun 2021 - 11:34 am | Bhakti

मस्तच!

अनिंद्य's picture

5 Jun 2021 - 9:02 pm | अनिंद्य

झकास !

गॉडजिला's picture

7 Jun 2021 - 11:53 am | गॉडजिला

सहज आणि सुटसुटीत