उकडलेले अंडे!

Primary tabs

लई भारी's picture
लई भारी in पाककृती
6 Apr 2021 - 9:50 am

हो, तुम्ही शीर्षक बरोबर वाचलेत. उकडलेल्या अंड्याच्या पाककृती(!) बद्दलच लिहितोय :-)
आता असा प्रश्न पडणे साहजिक आहे की एवढ्या साध्या गोष्टीची कृती कशाला लिहायला पाहिजे! आणि गूगलबाबाला विचारले तर चिक्कार रेसिपी आहेत.
तर, असो!

अंड्याचे बरेच प्रकार खूप आवडतातच. पण बहुतांश पदार्थ बाहेर जसे जमतात तसे घरी जमत नाहीत. सर्वांची आवडती 'बुर्जी'; कितीही प्रकारे करून बघितली तरी यष्टी स्टॅन्ड बाहेर मिळणाऱ्या टपरी वरची चव नाहीच येत. तीच गोष्ट 'poached egg' नावाच्या विंग्रजी प्रकारची. मला प्रचंड आवडतो पण घरी जमलंच नाही. माझ्या मते 'super fresh eggs' हे सोडून बाकीचा सगळा जुमला मी केला तरी पण नाही जमले! किंवा फुल्ल/हाफ फ्राय परतणे/प्लेट मध्ये घेणे. सांगा कुणाला माहित असेल तर यांच्या युक्त्या.

तर, उकडलेले अंडे आपण खात असतोच लहानपणापासून. मी तरी लहानपणी खाल्ले ते म्हणजे इतर काहीतरी गोष्टींसोबत उकडलेले म्हणजे बटाट्या सोबत वगैरे. त्यामुळे खूप उशिरा एक Quora पोस्ट वाचून कळले की अंडे नीट कसे उकडलेले असायला हवे. म्हणजे त्याचा पिवळा बलक कसा दिसायला पाहिजे. मग लक्षात आले की आतापर्यंत खात आलो त्या अंड्याचा पिवळा बलक पार काळपटलेला असायचा. मग सुरु झाले रेसिपि वाचणे. बहुधा त्या पोस्ट मध्ये असे लिहिले होते की शेफ किती भारी आहे याची ही जणू एक चाचणीच आहे आणि पाककौशल्यातील प्राथमिक गोष्ट आहे ही!
बरेच दिवस मी एक पद्धत वापरायचो ते म्हणजे, पाण्यात मीठ टाकून अंडी उकडायला ठेवल्यावर बरोबर १-२ मिनिटे उकळी आल्यानंतर गॅस बंद करून झाकण लावायचे आणि १५ मिनिटांनी अंडी बाहेर काढायची, मग थंड पाण्यात बुडवून सोलायची. यामुळे बरीच सुधारणा झाली. आता बलक पिवळाच दिसत होता आणि आधीइतका कोरडा होत नव्हता.
पण अजून काही पोस्ट्स वाचताना लक्षात आले की पाहिजे तेवढा creamy दिसत नाही आहे बलक; पूर्ण उकडल्या सारखाच दिसतोय. आणि creamy बलक करण्यासाठी कमी उकडल्यानंतर कवच नीट निघायचे नाही. मग अजून रेसिपी बघणे आले आणि साधारण एक गोष्ट कॉमन लक्षात आली, म्हणजे बरोबर ५-६ मिनिटे अंडी उकळत्या पाण्यात पाहिजेत. (अगदी पाणी आधी उकळून घेऊन मगच त्यात अंडी सोडावीत, त्यासाठी वेगळा चिमटा वगैरे घ्यावा हे काही केले नाही म्हणा). तर या पद्धतीने सुद्धा छान येतच होती पण 'picture perfect' नव्हती जमली!
आज मग तो युरेका क्षण आला :-)
एक गोष्ट मी दुर्लक्षिली होती म्हणजे उकळत्या पाण्यातून ६ मिनिटांनी अंडी काढल्यानंतर बर्फाच्या किंवा जास्त थंड पाण्यात टाकायची. मी दर वेळी आळस करून साधे पाणी घ्यायचो. आज थंड पाणी घेतले आणि दोन्ही गोष्टी साधल्या - कवच नीट निघाले आणि बलक पाहिजे तसा उकडला गेला!
(रेसिपी पेक्षा काथ्याकूट मध्ये जास्त शोभेल बहुधा :-) )

image

प्रतिक्रिया

दोन्ही अंडी एकत्रच उकडली असती तरी चाललं असतं!
:))

लई भारी's picture

6 Apr 2021 - 10:54 am | लई भारी

तुमचा प्रतिसाद कळला नाही :-)
पण दोन्ही एकत्रच उकडली आहेत!

काई नाई हो...दोन धागे निघालेत म्हणून म्हटलं. :)

लई भारी's picture

6 Apr 2021 - 11:00 am | लई भारी

अरे देवा! बघितलेच नव्हते. ,मी एकदाच पब्लिश केले होते. काय घोळ झाला काय माहित.
संपादक मंडळाला सांगतो दुसरा धागा उडवायला.

Bhakti's picture

6 Apr 2021 - 10:59 am | Bhakti

:-):-)

ashok dalvi's picture

26 Apr 2021 - 5:13 pm | ashok dalvi

समजल बर का ?

मला, जास्त वेळ उकडलेली अंडी आवडतात...

संजय पाटिल's picture

12 Apr 2021 - 1:29 pm | संजय पाटिल

मला पण जास्त उकडलेलीच अंडी आवडतात... बलक काळा पडला नसेल तर कच्चि वाटतात...
याउलट हाफ फ्राय मधे मात्र बलक जितका कच्चा तितकी भारी!!!

मराठी_माणूस's picture

6 Apr 2021 - 11:22 am | मराठी_माणूस

इमेज दिसत नाही.

राघव's picture

6 Apr 2021 - 12:03 pm | राघव

असेच म्हणतो. दिसत नाहीये.

लई भारी's picture

6 Apr 2021 - 12:37 pm | लई भारी

गूगल फोटो वापरले आहे. का दिसत नाही कळेना.
ही लिंक चालत असेल तर धागा संपादित करावा लागेल.

image

राघव's picture

6 Apr 2021 - 1:55 pm | राघव

हा फोटू दिसलाय! भारी! :-)

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Apr 2021 - 12:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

ही पाकृ अंडे घालून करता येईल का?

शाकाहारी लोकांनी अंड्या ऐवजी पनीर वापरले तर चालेल का?

(नम्र) पैजारबुवा,

लई भारी's picture

6 Apr 2021 - 12:38 pm | लई भारी

दंडवत घ्यावा :-)

ही पाकृ अंडे घालून करता येईल का?

अंडे घालून किती वेळ झालाय त्यावर आहे. म्हणजे थकवा गेला की पाकृ करता येईल.

विंजिनेर's picture

7 Apr 2021 - 3:28 am | विंजिनेर

अ फ ला तू न..

खादाड_बोका's picture

13 Apr 2021 - 1:24 am | खादाड_बोका

पैजारबुवा....पाण्यामध्ये काय पनीर उकडवणार काय?

गणेशा's picture

6 Apr 2021 - 1:51 pm | गणेशा

छान..

उत्तम युक्ती. असे पिवळ्या बलकाचे किंचित कच्चे राहिलेले आवडते. पण सॉफ्ट बोइल केले की कवच निघण्यात प्रोब्लेम येत असे. उपायाबद्दल धन्यवाद..

तिता's picture

12 Apr 2021 - 12:55 pm | तिता

असे उकडलेले अंडे खायला आवडते पण करता येत नव्हते. दोन वेळा केले आणि जमले. आता ही माझी हिट रेसिपी झाली आहे.

लई भारी's picture

13 Apr 2021 - 8:37 pm | लई भारी

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद :-)
नंतर काही वेळा अजून करून बघितली आणि दर वेळी तसाच रिजल्ट आला.

बाकी काही रेसिपी/ट्रिक्स असतील तर लिहा सगळ्यांनी.

मुक्त विहारि's picture

13 Apr 2021 - 9:02 pm | मुक्त विहारि

तुम्हाला पाठवली आहे...

तुम्हाला आवडली असेल तर, ती लिंक इथे देऊ शकता ...

लई भारी's picture

13 Apr 2021 - 9:47 pm | लई भारी

अर्थात आवडली :-) भारी लिहिलं होत तुम्ही.

https://misalpav.com/node/21640

ashok dalvi's picture

26 Apr 2021 - 5:08 pm | ashok dalvi

छान् ....

जेम्स वांड's picture

8 May 2021 - 10:50 am | जेम्स वांड

ही पाककलेच्या दुनियेत सगळ्यात व्हरस्टाईल अन अन्स्टेबल घटक पदार्थापैकी एक मानले जाते, गॉर्डन रामसे, रणवीर ब्रार वगैरे दादा शेफ पण कायम म्हणतात की ज्याला अंडे शिजवणे, टाईम टेक्सचर अन टेस्ट ह्या तीन टी ज वर मॅनेज करता आले तो बेस्ट कूक होऊ शकतो. आपण बेस्ट कूक नाही पण अंडी जमतात, काही टीप

१. अंडी उकडताना पाण्यात थोडे मीठ टाकावे, साल उत्तम उतरते

२. पाण्यात एखाद चमचा व्हिनेगर, लिंबू रस (आम्ल प्रवृत्तीकर असलेले रसायन) टाकल्यास पण सेम इफेक्ट दिसून येतो , व्हिनेगरचा वाढीव फायदा म्हणजे अंड्याचे पांढरे लवकर आळुन येते शिजते.
(पोच एग्ज उर्फ पाण्यात शिजवलेली अंडी बनवताना तर पाण्यात आवर्जून व्हिनेगर घालावेच).

लई भारी's picture

18 May 2021 - 8:10 pm | लई भारी

जरा उशिरा बघितला प्रतिसाद :-)
अंडी शिजवण्याबद्दल सहमत!
अलीकडे अजून एक प्रकार वाचला, अंडी उकडताना निमुळत्या मोठ्या भागाला टाचणीने एक छिद्र पाडायचे, मग आतली हवा निघून जाते आणि नीट उकडते म्हणे :-)

poached egg बनवायचा प्रयत्न फसला माझा. रेसिपी प्रमाणे व्हिनेगर घातले होते, पाण्याचा भोवरा पण केला होता पण पांढरा भाग सगळीकडे तरंगत होता :-(
अंडी अगदी फ्रेश हवीत ही अट कशी साधणार? स्थानिक दुकानातून आणलेली होती, त्याच्याकडे एक-दोन दिवसापेक्षा जास्त राहत नाहीत तशी.

अंडे पाण्यात टकण्या आधी एखाद्य वाटी मध्ये चहाची गाळणी ठेवून त्यात पिवळे बलक न फोडता टाकावे. अंड्याच्या पांढर्‍या भागातील पाणी खाली गळून जाऊन फक्त जाडसर भाग रहतो. तो poached egg बनवताना पाण्यात फार पसरत नाही (किंवा कमी पसरतो).

तुषार काळभोर's picture

21 May 2021 - 6:19 pm | तुषार काळभोर

उकडताना पिवळा बलक तसाच राहणे/ठेवणे, किंवा पिवळा बलक अर्धवट शिजणे, सनी साईड अप, हाफ फ्राय, या प्रकारात पिवळा बलक कच्चा असल्याने चव/वास बिघडत नाही का?
मी कधी ट्रायसुद्धा नाही केलं. पण बर्‍याच जणांंना हा ओलसर्/वाहता पिवळा बलक खूप आवडतो.