विस्मरणात गेलेला कारागीर - लोहार

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
5 Mar 2021 - 3:52 am

मीत्रानों एकदा राजस्थान मधे ट्रेनिंग मधे असताना सीमावर्ती भागात गाडी घेऊन दुसर्‍या डिटँचमेन्टला भेट द्यायला चाललो होतो. गाडी मीच चालवत असताना अचानक जोरात खडखडाट झाला व गाडीचा दरवाजा दुर फेकला गेला. तसाच दरवाजा गाडीत टाकला आणी पुढे निघालो. थोड्याच अंतरावर एक छोटीशी वस्ती दिसली, म्हटलं बघाव काही मदत मीळतीय का?
दोन तीन बैलगाड्या, मोकळे आजुबाजुला नसलेले गवत चरत आसलेले बैल, चार सहा वेगवेगळ्या वयाची पोर. रस्त्याचे कडेला काही पुरूष लोखंडी शेतीची आवजार बनवत होते तर बायका तात्पुरती बनवलेल्या चुलीवर जेवण बनवत होत्या. दुर दूर वाळूच्या टेकड्या आणी नागमोडी वळणे घेत दिसेनासा काळा कुळकूळीत पसरलेला रस्ता.

गाडी थांबवली तर एक राकट, बलदंड पुरूष गाडीजवळ आला म्हणाला "खम्मा घणीं सा हुकूम ( जसं आपल राम राम) .आम्ही पण "घणीं खम्मा ",म्हणत खाली उतरलो. जवळच पडलेले मोढे (छोटे स्टूल) त्याने सरकवले आणी राजस्थानी मधे विचारले ,"काईं सेवा करू सा?"दरवाजा दाखवून विचारले जरा तात्पुरती जोडायची व्यवस्था करतो का?
तो आपला कामाला लागला. जवळच मोठ्या गालमीशा, मळकट धोतर आणी बाराबंदी, पगडी घालून बिडी ओढत म्हातारा बसला होता. विचारले पाणी मिळेल काय, त्यानं विचारले , "थारी जात कौन, म्हारी गडीया लोहार". मी तुटक्या फुटक्या राजस्थानी भाषेत म्हणालो,"बाब्बा म्हारी जात फौजी, जात वात मान्ये कोनी, तू पानी पिला,म्हने सब चोख्खा लागे". बाबा खुश झाला आणि गप्पा सुरू झाल्या.

दोस्तानों गडीया लोहार, ही भटकी जमात, यांचा संसार गाडीवर म्हणून गडीया लोहार. हे मुळचे मेवाड, महाराणा प्रताप यांच्या सैन्यातील. तलवारी, भाले आणी इतर शस्त्र अस्त्र बनवणारे ,घिसाडी म्हणजे तलवार, भाले घासून धार लावणारे.मेवाडशी यांचे इमान. परमं प्रतापी महाराणानां मोगलांच्या कडून पराभव पत्करावा लागल्यानंतर या गडीया लोहार जातीने शपथ घेतली, मेवाड, चित्तोड मोगलांन कडून हिसकावून घेऊ मगच तीथे घर बांधू. आजही हे लोक भटकत आहेत. प्रत्येक जातीचा, धर्माचा, प्रांताचा एखादा आसा मानबिंदू, गौरवास्पद इतीहास आसतो.

महाराष्ट्रात यांना घिसाडी म्हणतात.
लोहार समाजात लोहार, गाडी लोहार, पांचाळ, नालबंदी, घिसाडी ह्या पोटजाती आहेत. कोकणात मानवाचार्य लोहार, विदर्भात मनुपांचाळ, मराठवाड्यात मनुलोहार आशा पोट जाती, शाखा आहेत .

तर हा लोहार शेतकर्‍यांचा मीत्र. पावसाळा सुरू व्हायच्या आधी,विळे, टिकाव, कोयते ,खुरपी,फावडी,कुल्हाडी,
प्राण्यांच्या खुरांना ठोकायचे नाल,बैलगाडीच्या चाकाना लोखंडी धाव,पाण्याच्या मोटी, नांगराचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी या पारंपरिक औजारांची दुरूस्तीची लगबग सुरु व्हायची. बांधकामाची घमेली थापी, घरगुती कढया , चिमटे झारे वगैरे वापराच्या लोखंडी वस्तू ह्या पण पुर्वी लोहार बनवायचा.

आपल्या गावात मशिदी समोरच एक लोहाराचं "पाल" ,तात्पुरतं घर होतं. पुढे ताडपत्रीच पाल. मोठा भाता,पुढं भट्टी, रसरशीत निखारे आणि भट्टीला हवा देण्यासाठी भात्याला जोडलेली बांबू आणि साखळी.भट्टीच्या बाजुला ऐरण,मोठे लांब चिमटे, हातोडा ,घण,कानस आणि छिन्नी या सारखी अवजारं . भट्टीच्या तडतड उडणाऱ्या ठिणग्या, या सगळ्या पसार्‍यात घामाघूम झालेला लोहार जणू काळ्या कातळातली हालती डुलती मुर्ती. गरम केलेला लोखंडाचा तुकडा आणी त्याच्यावर एका पाठोपाठ एक घणाघाती यंत्रवत ठोके मारणारी, घामात निथळणारी लोहारीण, हे दृष्य दिनानाथ दलाल, नंदलाल बोस किवा राजा रवी वर्मा यांच्या पेंटींग सारखीच सशक्त जिवंत कलाकृती.
म्हणतात ना" सौ सुनकर की एक लोहार की ".

लोहार जसा शेतकर्‍यांचा मित्र तसाच आम्हा मुलांना पण तेवढाच जवळचा. मे महिन्याच्या सुट्टीत बाकी खेळात बरोबर भोवरा ( Top) हा एक प्रिय खेळ . लाकडाचा भोवरा आणी " जाळी" , खाडंग्यांच्या दुकानात घ्यायचा. लोहारा कडे जाऊन "खप्पड आरी ", बसवुन घ्यायची. या खेळाची एक विशेष शब्दावली, खप्पड आरी, जाळी, वरचा हात ,धप्पल. आरी मधे दोन प्रकार एक टोकदार आणी दुसरी खप्पड .सविस्तरपणे पुन्हा कधीतरी.

सध्या प्लास्टीकमध्ये हे उपलब्ध आहेत.तसेच ते 'फायबर' चे देखील असतात. भोवरा मैदानी, मर्दाना खेळ त्याची मजा आजच्या पिढीला काय कळणार.

आता नव्या पिढीतील लोक शहरात स्थलांतरित झाले. शहरातील ही पिढी फँब्रिकेशन, हार्डवेअर, फर्निचर, गँरेज व्यवसाय करतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हे पण आपली प्रगती करताना दिसतात .
।।कालाय तस्मै नमः।।

लेख स्वानुभव, आठवणी व वाचलेल्या माहिती वर आधारित आहे. सर्व सकंलक या लेखाचे सहभागी आहेत.

समाजलेख

प्रतिक्रिया

बाजीगर's picture

5 Mar 2021 - 4:21 am | बाजीगर

नमस्कार कर्नलसाहेब,
या अनूभवातून डूब दिलेला लेखाचं रांगडपण खूपचं लुभावनं आहे,शब्दचित्रचं उभं केलं डोळ्यासमोर.
( मी कास्टींग पण करुन टाकलं,रणबीर, दिपीका, माता-याचा रोल करारी डॅनी ला दिला, दिग्दर्शक संजयलीलाभंसाळी ,फौजी-विकीकौशल !!)

चटकन इतिहासाचा धांडोळा घेऊन आधूनिक काळात फॅब्रीकेशन पर्यंत आणलत. खूप छान लिहीलतं, वाह.

कर्नलतपस्वी's picture

5 Mar 2021 - 4:35 am | कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी's picture

5 Mar 2021 - 4:35 am | कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी's picture

5 Mar 2021 - 4:36 am | कर्नलतपस्वी
शेखरमोघे's picture

5 Mar 2021 - 4:55 am | शेखरमोघे

दिग्दर्शक संजयलीलाभंसाळी - म्हणजे लोहाराच्या घणाच्या तालावरचे नाच आलेच!

शेखरमोघे's picture

5 Mar 2021 - 4:59 am | शेखरमोघे

लेख आवडला - राजस्थान आणि गाव दोन्हीतल्या लोहारचे वर्णेन छानच झाले आहे.

आरी मधे दोन प्रकार एक टोकदार आणी दुसरी खप्पड:
खप्पड ही आरी दुसर्‍यान्च्या लाकडी भोवर्‍याच्या कपच्या उडवण्याकरता वापरायची आरी - बरोबर?

टर्मीनेटर's picture

5 Mar 2021 - 11:50 am | टर्मीनेटर

छान लेख! आवडला 👍

अनुप ढेरे's picture

5 Mar 2021 - 12:00 pm | अनुप ढेरे

लेख आवडाला!

लेख आवडला....

आता, फाइल्स, ग्राईंडिंग मशीन आणि लेथ मशीन आल्याने, लोहारकाम फारच सुखकर झाले आहे...

गोरगावलेकर's picture

5 Mar 2021 - 1:41 pm | गोरगावलेकर

या मालिकेतले दोन्ही लेख आवडले.
अजून येऊद्या.

तुषार काळभोर's picture

5 Mar 2021 - 1:48 pm | तुषार काळभोर

राजस्थानी संवाद वाचून तिथलं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहिलं.

कर्नलतपस्वी's picture

5 Mar 2021 - 5:16 pm | कर्नलतपस्वी

धन्यवाद

सौंदाळा's picture

5 Mar 2021 - 5:51 pm | सौंदाळा

लेख तर आवडलाच पण सुरुवात जास्त आवडली

Rajesh188's picture

5 Mar 2021 - 9:28 pm | Rajesh188

लेख आवडला

हा आमचा इतिहास. आमचे भाट आणि त्यांच्या पोथ्या आमचा इतिहास तिथपर्यंत नेतात. आम्ही स्वत: लहानपणी बैलगाड्या तयार करणे, दुरुस्ती सुटी काळात करायचो. आजोबा वारले आणि त्यानंतर नातेवाईकांनी व्यवसाय बदल करत वेल्डिंग, किचन ट्रॉली इत्यादी सुरू केले. धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

6 Mar 2021 - 10:29 am | मुक्त विहारि

कारागिरीचे कसब तसेच ठेवले फक्त वस्तूंचे स्वरूप बदलले...

तुमच्या प्रतिसादा बद्दल मनापासून धन्यवाद....

विचार करायला लावणारा आहे .....

कर्नलतपस्वी's picture

6 Mar 2021 - 8:38 pm | कर्नलतपस्वी

धन्यवाद, राजस्थान माझे सेकंड होम, मारवाड मेवात, हाडौती, शेखावटी इत्यादी भाग जवळून पहायला मिळाला. मातीशी इमान राखणारे, जिवाला जीव देणारे. मराठ्यांसारखाच अभिमानास्पद इतीहासत स्थान आसणारी साधी माणसे.

गामा पैलवान's picture

9 Mar 2021 - 10:16 pm | गामा पैलवान

नमस्कार कर्नलतपस्वी!

हडौतीचा उल्लेख वाचून स्मृती चाळवली. हडौती भाषेवर मराठीचा प्रभाव आहे असं ऐकून होतो. तसा संदर्भ सापडला खरा (प्रश्न क्रमांक १४) : https://samanyagyanedu.in/rajasthan-ki-bhasha-or-boliya-quiz-01/

गडिया लोहार म्हणजे वरील संवाद हडौती भाषेतला वाटतो. मात्र याबाबत चूकभूल देणेघेणे.

तुमचा आठवणी आवडल्या. जमल्यास आजून लिहा.

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

9 Mar 2021 - 10:34 pm | कपिलमुनी

मराठ्यांसारखाच अभिमानास्पद इतीहासत स्थान आसणारी
मराठा इतिहास आणि राजपूत इतिहास यात फार फरक आहे. 2-3 अपवाद वगळता राजपूत इतिहास हा मुघलांना अंकित आहे, त्यासाठी मुलींची लग्न करून देणे ,स्वकियांना दगा देणे या कॉमन गोष्टी राजपूत करत.

असो हा तुमच्या लेखाचा विषय नाही.त्यामुळे इथेच थांबतो

सारखे भोवरे हरवायचे आणि नवीन भोवरे बनवून घेणे म्हणजे पैसे खर्च करावे लागत.
मग चांगले लाकूड तोडून आणायचे आणि त्या मध्ये चूक ठोकायची आणि कुऱ्हाडी नी आकार द्यायचा .
बर्या पैकी जमायचं ते.

कर्नलतपस्वी's picture

6 Mar 2021 - 8:39 pm | कर्नलतपस्वी

वाचकांचे मनःपुर्वक धन्यवाद

सोत्रि's picture

7 Mar 2021 - 5:59 am | सोत्रि

सुंदर लेख!

- (संगणक कारागीर) सोकाजी

चौथा कोनाडा's picture

9 Mar 2021 - 8:55 pm | चौथा कोनाडा

मस्त !
सुरेख शब्दचित्र !
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
आमचा देखील लोहाराशी संबंध भोवरा आणि इतर वे़ळी घरातील भांड्यांची किरकोळ दुरुस्ती या पलीकेडे गेला नाही.

आता सगळं कारखानीकरण झालं आणी असे कसबी कलाकार अस्तंगत होऊ लागले.
माझी पिढी तर पुस्तकी ज्ञानवालीच म्हणावी लागेल.

स्वराजित's picture

10 Mar 2021 - 1:47 pm | स्वराजित

लेख आवडला