मोदींची कॉंग्रेस?

जानु's picture
जानु in काथ्याकूट
28 Feb 2021 - 8:09 pm
गाभा: 

भारतीय राजकारणाला मागील ७० वर्षात अनेक वेगवेगळी वळणे मिळाल्याचे अनेक राजकीय विश्लेषक सांगतात, त्यात मला एकच महत्वाचे वाटते ते म्हणजे जे पीं चे आंदोलन ज्याने ईंदिरा कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात जनचळवळ उभारली. कॉंग्रेस पक्षाचे राजकारण या आंदोलनाने निवडणुक जिंकायच्या अनुषंगाने अधिक धार्मिक तुष्टीकरणाचे झाले. असे माझे मत आहे. आजचा विषय हा फक्त राजकीय विचारसरणी बदल यावर आहे. पंडीत नेहरु पासुन हिंदु धर्माला दुर्लक्षण्याची जी सुरुवात झाली ती रामाच्या अस्तित्व नाकारण्याच्या लेखी दाव्यापर्यंत पोहोचली. २०१४ च्या निवडणुकी पासुन भारतीय जनमानस निवडणुकीसाठी बाहेर येऊन मतदान करतांना दिसली. हळुहळु समाज माध्यमांद्वारे लोकांमध्ये राजकीय मते आणि विचार मांडण्याचे प्रमाण वाढले. लोकांची मते टोकाची आणि अधिक स्पष्ट होतांना दिसत आहेत.
त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे मागील काही दिवसात झालेल्या घटना काही वेगळी दिशा देऊ शकतात का?
गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाल समाप्तीचे मोदींचे भाषण आणि त्याचा पुढील भाग म्हणजे जी २३ च्या नेत्यांनी जम्मु मध्ये घेतलेली बैठक.
सदर प्रकारचे दृष्य दिसण्यासाठी बराच काळ अगोदर मागे पार्श्वभागात घटना घडलेल्या असतील, तरच हे समोर दिसते. याची सुरुवात मोदींच्या कॉंग्रेसमुक्त भारत योजनेच्या भागाचा पुढील टप्पा किंवा त्याचे प्रत्यक्षीकरण म्हणता येईल का?
कॉंग्रेसमुक्त भारत म्हणजे भारतात कॉंग्रेस पक्षाचे नावच राहणार नाही हे मोदींना अपेक्षित असेल असे समजणे मला व्यक्तीश: पटत नाही. कॉंग्रेस पक्षाने आपल्या विचारसरणीने आणि आपल्या थोड्या लाभाकरिता सत्ता वापरणे आणि देश हितापेक्षा व्यक्तीहित पाहणे बंद करणे हा व्यवहार्य आणि अमलात येणारा उपाय असेल. असा मुद्दा इतकी वर्ष सत्ता आणि त्याचे लाभ मिळणारे लगेच मान्य करतील हे मानवी स्वभाव आणि चरित्राच्या विरोधात जाते. तेच गेल्या ७ वर्षात आपण पाहत आहोत. २०१४ ला भाजपाला सत्ता मिळाल्यानंतर जे सत्तेच्या परीघापासून लांब गेले, मिळणाऱ्या लाभापासून वंचित झाले त्यांनी हा बदल तत्कालीन असल्याची भावना करून घेतली. त्यात राजकीय व्यक्ती, नोकरशहा, उद्योगपती, विविध तथाकथित समाजसेवी होते. पण हळूहळू जसे मोदी शहा जोडगोळी काम करू लागली, २०१९ ची निवडणूक एकहाती पुन्हा जिंकली, यातील बऱ्याच लोकांनी आपली निष्ठा बदलून भाजपाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. नोकरशाही यात सगळ्यात शेवटी होती असे मला वाटते. ती सगळी सोयीची नाहीत म्हणून मोदींची मागील काही दिवसातील बाबू लोकांवरील ट्विटर संदेश पहा.
गांधी कुटुंबाच्या ताब्यात असलेली कॉंग्रेस ही देशहिताच्या बाबतीत पाहिजे तेवढी सक्षम नाही हे जनमानसात २०१९ च्या निवडणुकीने ठाम झाले. म्हणजे भाजपाने आपल्या काही निर्णयाने आम्ही कॉंग्रेसपेक्षा कितीतरी सरस आहोत हे सिद्ध करून दाखवले. लोकांशी आपण बोललो तर काही निर्णय कॉंग्रेस कधीच घेऊ शकली नसती हे सगळे मान्य करतात. त्यात भाजपा विरोधकही आहेत. याचा परिणाम कॉंग्रेसमधील नेत्यांवर होणार नाही असे नव्हते. ज्यांना आपल्या भविष्याची, राजकीय भवितव्याची काळजी होती त्यांनी आपला रस्ता शोधला. काहींनी लगेच तर काहींनी वेळ घेतला. शेवटी भारतात राजकारण हा व्यवसाय आहे. प्रत्येक पक्षासाठी कठीण कालखंड येतच असतो. पण त्यात आपली नौका पार पाडणारा नेता आवश्यक असतो. आताच्या काळात कॉंग्रेस पक्षाकडे याच घटकाची कमतरता आहे. या बाबतीत मी मोदींना नशीबवान मानतो. फार कमी नेत्यांच्या नशिबात असा विरोधी पक्ष आणि विरोधी नेता येतो. या कारणाने कॉंग्रेस पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झालेली होती. जयराम रमेश सारखे नेते धोक्याची घंटा वाजवीत होते. त्यांना अगोदर बाहेर फेकले गेले. कारण कॉंग्रेसने या अगोदर हीच पध्दत वापरून विरोध थंड केल्याचा यशस्वी भूतकाळ पाहिलेला होता. पण आता मोदी हा नेता आणि जनमानस बदलले आहे. हे थोड्या थोड्या काळानंतर अनेक नेते सांगत होते. सिब्बल सारखे कट्टर भाजप विरोधक जेव्हा खुल्या पध्द्तीने समोर आले तेव्हा मोदी शहा जोडगोळीचे प्राथमिक काम पूर्ण झाल्याचे दिसून आले. त्यांची काम करण्याची पध्दत पाहिली तर बुद्धीबळात जसे पहिल्यांदा राणीवर हल्ला केला जात नाही आणि अगोदर प्यादे आणि उंट, घोडे घेतले जातात तसे काम दिसते. त्यात अहमद पटेल सारखा कुटनितीज्ञ, कॉंग्रेसला बांधून ठेवणारा, नेते आणि गांधी यांच्यातील दुवा, मोठ्या नेत्यांना अडकवून ठेवणारा, आर्थिक बाजू साभाळून घेणारा नेता जाणे ही विघटनाला चालना देणारी घटना ठरली. गांधी कुटुंब त्यामुळे एकप्रकारे अंध झालेले दिसतील. त्यातच पक्षाचा निधी आटलाय. त्यात फार तर महाराष्ट्र सारख्या राज्यातुनही एकुण सरकारला मिळणार्‍या पक्षीय दानातील तीन भागातुन थोडा फार हिस्सा मिळत असणार.
सर्व नेते आपली विचारसरणी बदलतील आणि भाजपात येऊन कॉंग्रेसमुक्त भारत होईल असे कधीच शक्य नाही. पण भाजपला विरोध म्हणजे कोणत्याही बाबतीत विरोध हा मुद्दा सोडावा लागेल हे महत्वाचे. भारताच्या अंतर्गत बाबतीत, संरक्षण, घुसखोरी, भ्रष्टाचार, नागरिकता या बद्दल दुमत होण्याचे आणि शंका उपस्थित करून परदेशीय उपटसुंभांना अप्रत्यक्ष सोयीची भूमिका घेणे सोडावेच लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. या बाबतीत कॉंग्रेसपक्षाने भाजपाला मदत केली नसली तरी इतर छोट्या पक्षांनी यावर स्पष्ट भूमिका घेतलेली आपण पाहिली आहे. भले जनतेत जाऊन त्यांनी विरोध केला पण संसदेत भाजपाला मदत केली आहे. उदा. शेतकरी कायदा. सी ए ए. आता हे जी २३ चे नेते ज्यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या भवितव्याबद्दल बोलत आहेत त्यांचा विचार पुर्वीसारखा करुन त्यांना कॉंग्रेसविरोधी म्हणुन सोडुन देणे गांधी कुटुंबाला शक्य नाही. कारण त्या गटाला मोदी संरक्षण देतील आणि तो गट मोदींना आवश्यक जागी मदत करेल असे दिसते. त्याची चुणुक आझाद यांचे जम्मुतील भाषण एकुण येवु शकते. शेवटी आझाद, राज बब्बर, सिब्बल, मनीष तिवारी यांना भारत सोडुन दुसरीकडे राहणे शक्य नाही. जिना यहा मरना यहा. यापुढे गांधी कुटुंब दुहेरी कैचीत सापडणार काय?भाजप आणि राष्ट्रीय कॉंग्रेस. यातुन २०२४ च्या निवडणुकीची तयारी दिसुन येते. प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातुन तयारी धरत आहेत. त्यात गांधी उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय असा वाद लावुन प्रियंकाच्या मनसुब्यांना सुरुंग लावतांना दिसत आहेत. कारण अश्या वक्तव्याने भाजपला फायदा आणि होणारे नुकसान फक्त प्रियंकाला आहे. जी २३ चा गट पुढील काळात कसा वाढतो यावर बरेच आडाखे बदलु शकतात. आपल्या धोरणांना सोयीचा विरोधी पक्ष असणे, तो वाढवुन ठेवणे हे फार मोठे राजकारण असु शकते. पाहुया पुढे काय होते....

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Feb 2021 - 8:34 pm | मुक्त विहारि

ह्यातील मोठा फरक म्हणजे, केंद्रीय पातळीवर, विशेषतः, पंतप्रधान पदासाठी, घराणेशाहीचा उमेदवार नाही.

मोदी, अमित शहा, योगी आणि तेजस्वी सुर्या, ही सध्याची लिस्ट आहे.

शिवाय, 2024 मध्ये खूप काही वेगळे घडणार नाही. कारण, राष्ट्रीय पातळीवर, कॉंग्रेस इतक्या कमी अवधीत, नेता तयार करू शकणार नाही.

उपयोजक's picture

1 Mar 2021 - 8:48 am | उपयोजक

काँग्रेसकडे महान नेता नाही? :(

'लखलखता ज्ञानसूर्य' , 'भगीरथाचा अवतार' राहूल गांधींना विसरलात? :)

ते अभिनय पण उत्तम करतात .....

https://youtu.be/j9HQfqvPa0A

शाम भागवत's picture

28 Feb 2021 - 8:38 pm | शाम भागवत

संयमीत भाषेत छान मांडलंय.

फार कमी नेत्यांच्या नशिबात असा विरोधी पक्ष आणि विरोधी नेता येतो.
+१

शशिकांत ओक's picture

28 Feb 2021 - 9:11 pm | शशिकांत ओक

कॉंग्रेसचे महत्वाचे २३ शिलेदार गांधी घराण्याला संघटनेतून दूर करतात का? जर तसे नसेल तर या लोकांना भवितव्य काय? दुसरा पर्यायी कॉंग्रेस पक्ष निर्माण करणे...? नवी संघटना उभी करायची तर प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ लागेल. २३ जणांना आपापल्या बळावर किती प्राथमिक सदस्य गोळा करण्याची ताकद आहे? किती राज्यात त्यांचा प्रभाव पडू शकतो? येत्या ५ राज्यातील निवडणूकीत इतक्या झटपट उमेदवार निवडून उभे करता येतील का?
यावर त्यांनी विचार केला असेल...

काही घराण्यांना कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही आणि कॉंग्रेसला पण त्यांच्या शिवाय पर्याय नाही ....

त्यामुळे, हे दोन्ही एकमेकांना धरूनच राहणार...

शिवाय, घराणेशाहीची पुजा करणारे, भारतात कमी नाहीत ...

दुर्दैवाने, ह्यात एक फॅक्टर मात्र सगळेच पक्ष विसरत आहेत आणि तो म्हणजे, MIM....

कॉंग्रेस आणि भाजपच्या लढाईत, MIM हळूहळू पण ठाम पाय रोवत आहे....

होय हे कष्टाचे आणि मेहनतीचे काम आहे. या नेत्यांकडून प्रत्यक्ष काम होणार नाही हीच शक्यता आहे. पण त्यांचे महत्व गांधी कुटुंबाला काँग्रेस कडून बाहेर काढले जाणे या सारखा न्याय होणार नाही. मग त्यांना त्यांच्या कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आता गांधी कुटुंबाला न्यायाच्या कटघऱ्यात आणले तर ते स्वतः ला शहीद म्हणवून घेतील आणि भारतीय जनता अजूनही बरीच बालीश आहे.

स्थानिक राजकीय पक्ष हे भारतातील काही महत्वाच्या राज्यात राष्ट्रीय पक्षांपेक्षा लोकप्रिय आहेत.
त्या मधील काही राज्य.
1) उत्तर प्रदेश.
समाजवादी पार्टी,बहुजन समाज पार्टी.
२) बिहार
नितीश कुमार ची पार्टी आणि लालू ची पार्टी.
३) दिल्ली
आप.
४) महाराष्ट्र .
शिवसेना, मनसे,राष्ट्रवादी.
५) तमिळ nadu
इथे तर राष्ट्रीय पक्ष नसल्या त जमा आहेत.
६) केरळ
कम्युनिस्ट.
७) बंगाल.
ममता दीदी.
८) पंजाब

अकाली दल.
९)ओडिशा
Biju janta दल
१०)हरयाणा
लोक दल.
११)जम्मू काश्मीर
नॅशनल कॉन्फरन्स.
१२)झारखंड
झारखंड मुक्ती मोर्चा.
ही काही उदाहरणे देशातील बहुसंख्य राज्यात प्रादेशिक पक्ष हे राष्ट्रीय पक्षांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत.
आणि हे प्रादेशिक पक्ष च bjp पुढे खूप मोठे आव्हान उभे करतील.
फक्त काँग्रेस कशी कमजोर आहे आणि त्या मुळे bjp ल कसे मोकळे रान मिळेल असा विचार एकतर्फी होईल.

कॉन्ग्रेस चा पाडाव लगेच नाही पण अटळ आहे ! मोदीना वा भाजपाला कितीही विरोधक असले तरी त्यात मतदार विरोधक कमी होत आहेत. जे आहेत ते कोणत्यातरी एका पूर्वग्रहाने प्रेरित असलेले आहेत. उदा. साम्यवादी वा समाजवादी लोक ! भाजपा ला अजूनही बामणाचा व व्यापार्यांचा पक्ष समजणारे लोक. बाकी सामान्य माणसाला स्वस्ताई .सोय यापलिकडे काही दिसत नसते. मोदीनी स्वस्ताई आणली का ... याचे उत्तर नाही असेच आहे . मग अशी स्वस्ताई आणणे हे लोकशाहीत प्रधान मन्त्राच्या हातात विशेष करून भारतातील प्रचन्ड अन्तर्विरोध लक्शात घेता आहे का याचे उत्तर देखील अजिबात नाही असेच आहे. विकास हवा का ? मग कराचे ओझे अपरिहार्य आहे हे अर्थशास्त्राच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचे पहिले वाक्य आहे ! मोदींच्या अशा नाड्या भारत देशातील अनेक प्रवाहानी आवळलेल्या आहेत. ते काहीसे हुकुमशहा सारखे वागत असले तरी ते प्रशासकीय पातळीवरच असे म्हणता येईल . समजा विकासासाठी पेट्रोल वरील करभार कमी करून ७० टक्की वाली आयकर स्लॅब निर्माण करणे अशी हुकूमशाही चाल ते खेळू शकतील का त्याला उत्तर नाही असेच आहे.

आता याचा काँग्रेसच्या पाडावाशी काय संबंध ? तर घराणे शाही नाही , मोदीना स्वतः: चे झकपाक कपडे याखेरीज स्वार्थ नाही हे त्यांचे इमेज लोकांच्या डोळ्यांसमोर ठेवण्यात त्यांचा पक्ष यशस्वी झाला आहे. दलित व मुसलमान यांची एकी झाली तरी त्याचे नेतृत्व काँग्रेसी नेत्याकडे द्यायला कोणी तयार होईल का आता .... तर नक्कीच नाही !

मुक्त विहारि's picture

28 Feb 2021 - 11:06 pm | मुक्त विहारि

1. घराणेशाहीला मानणारी जनता

2. वेगवान नसलेले संदेशवहन

भाजपने पहिल्यापासूनच घराणेशाही केंद्रीय पातळीवर टाळली, बाजपेई, अडवाणी, जोशी, यांच्या कुटुंबातील कुणीही, केंद्रीय पातळीवर नाही.

आता संदेशवहन वेगवान झाले असल्याने, मुजफ्फरनगर, कानपूर, हैदराबाद येथे नक्की काय घडले? हे लगेच समजते.

Rajesh188's picture

28 Feb 2021 - 10:22 pm | Rajesh188

१९९० पासून आताच्या मोदी सरकार पर्यंत देशात एकाच पक्षाचे सरकार अस्तित्वात आले नाही.
आघाडी सरकार च सत्तेवर होती.
त्या मुळे पुढे सुद्धा एकाच पक्षाचे सरकार जावून आघाडी सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता खूप मोठी आहे.

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2021 - 11:05 pm | श्रीगुरुजी

उत्तम लेख!

प्रत्येक पक्षासाठी कठीण कालखंड येतच असतो. पण त्यात आपली नौका पार पाडणारा नेता आवश्यक असतो. आताच्या काळात कॉंग्रेस पक्षाकडे याच घटकाची कमतरता आहे. या बाबतीत मी मोदींना नशीबवान मानतो. फार कमी नेत्यांच्या नशिबात असा विरोधी पक्ष आणि विरोधी नेता येतो. या कारणाने कॉंग्रेस पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झालेली होती.

समर्पक निष्कर्ष! सत्ताबदल होण्यासाठी सत्ताधारी पक्षाने खूप चुका करणे व त्याचवेळी पूर्णपणे नवीन पर्याय उपलब्ध असणे आवश्यक असते. खूप चुका करूनही पर्यायी सक्षम विरोधी पक्ष व नेता नसल्याने बहुतेक वेळा तोच सत्ताधारी पक्ष परत निवडून येतो. अनेकदा समर्थ विरोधी पक्ष व चांगला नेता असूनही सत्ताधारी पक्षाविरूद्ध फारशी नाराजी नसेल तर सत्ताबदल होत नाही.

सध्या मोदी सरकारविरूद्ध फारशी नाराजी नाही. त्याचवेळी कॉंग्रेस अत्यंत दुर्बल झाला आहे. राहुलला लागोपाठ दोन निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी उमेदवार करूनही जनतेने नाकारले आहे. राहुल नेतेपदासाठी योग्य नाही हे अनेकदा दिसले आहे. आता मोदींविरूद्ध नाराजी वाढली तरी राहुल हा पर्याय समोर पुन्हा समोर आला तर जनता पुन्हा एकदा मोदींनाच सत्तेवर आणेल.

जर कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत यायचे असेल तर मोदींनी खूप गंभीर चुका केल्या पाहिजेत. तसेच मोदींच्या प्रत्येक चुकीला जनतेसमोर अधोरेखित करणारा पूर्ण नवीन नेता कॉंग्रेसकडे हवा. सध्या कॉंग्रेसकडे असा कोणताही नेता नाही. प्रियांका गांधींचा फारसा प्रभाव उत्तर प्रदेशात पडलेला नाही. अर्थात प्रियांका अजून देशपातळीवर राजकारणात उतरलेली नाही. प्रियांकाला योजनाबद्ध पद्धतीने देशपातळीवर आणले व प्रियांकाने गांधी, नेहरू, चले जाव चळवळ वगैरे सद्यस्थितीत पूर्ण निरूपयोगी असलेल्या विषयांवर न बोलता मोदींच्या चुका व देशासाठी आपल्याकडे व पक्षाकडे कोणत्या योजना आहेत हे जनतेला सांगण्यावर भर दिला तर कॉंग्रेसचे पुनरूज्जीवन होऊ शकेल. अन्यथा जनता पक्ष, डावे पक्ष या पक्षांप्रमाणे कॉंग्रेस फक्त व्हेंटिलेटरवर जिवंत राहील.

आणि

प्रियांका गांधी यांच्या आडनावा पासूनच, भाजपा गोंधळ घालायला सूरूवात करेल, शिवाय, राहूल गांधी आणि प्रियांका गांधी, ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत....

https://youtu.be/z6mrNySR8jQ

चौकटराजा's picture

1 Mar 2021 - 9:46 am | चौकटराजा

सध्या मोदी सरकारविरूद्ध फारशी नाराजी नाही असे पूर्ण खरे नाही पण बरेचसे खरे आहे !
मोदीना २०१९ मध्ये पाठिंबा देणार्या अनेकांचा भ्रमनिरास होत चालला आहे पण जे लोक राजकारण व अर्थकारण याचा सम्यक अभ्यास करतात यांनी मोदी यांच्य कडून अवास्तव अपेक्षा केलेल्याच नाहीत ! २०१४ साली मी म्हणजे मसीहा आहे असा आव त्यांनीच आणला होता ! भारत देशात राज्य करणे सोपे नाही हे एव्हाना उद्धव ठाकरे यांच्या सारख्याना कळून आलेले असेलच ! उद्या अगदी सीताराम येचुरी वा ओवेसी हे जरी प्रधानमंत्री झाले तरी त्याना मर्यादा असतीलच !

राज्य हातचे जावे अशी घोडचूक मोदी करणार नाहीत ! भाजपा ही भारत देशातील जबर ताकदवर शक्ती होणार नाही ! प्रादेशिक अस्मिता ही रहाणारच ! अगोदरच ५०० संस्थाने खालसा करून ही गोधडी शिवली गेली आहे हे आपण कसे विसरून चालेल ? काही ठिकाणी राज्यात आम्ही केंद्रात तुम्ही अशी तडजोड यापूढील काळात राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष यांना करावीच लागेल. यासाठी तर शरद पवार, यादव मंडळी , ममता ,द्रमुक हे एखादा एकसंध पक्ष काढण्याची शक्यता फार कमी कारण मग आपला अजेंडा यांना स्वतंत्रपणे राबविता येणारच नाही !

बाकी भा ज प हा हिंदु अजेंड्यावरच निवडून येतो याशी मी अजिबात सहमत नाही ! काही अंशी ते खरे आहे ! भाजप हा खाजगीकरणा चा खंदा समर्थक आहे त्यामुळे नवश्रीमंतांचा एक गट त्यापक्षामागे उभा आहे हेही कारण आहे !

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2021 - 10:33 am | श्रीगुरुजी

भाजप हा खाजगीकरणा चा खंदा समर्थक आहे त्यामुळे नवश्रीमंतांचा एक गट त्यापक्षामागे उभा आहे हेही कारण आहे !

हे बरोबर आहे. परंतु त्याचवेळी भाजपची आर्थिक धोरणे डाव्यांपेक्षाही डावी आहेत. विशेषतः मध्यमवर्गाला पिळून काढणे हे वाजपेयी व मोदी यांच्या कारकिर्दीतील समान सूत्र आहे. एकाचवेळी खाजगीकरण व उद्योगांना अनुकूल धोरणे आणि सातत्याने करवाढ करून मध्यमवर्गीय व श्रीमंतांना पिळून काढणे ही पूर्णपणे परस्परविरोधी धोरणे भाजप राबवित आहे.

चौकटराजा's picture

1 Mar 2021 - 7:10 pm | चौकटराजा

गुरुजी , मी वरच एका ठिकाणी म्हटले आहे की भारतीय पी एम च्या नाड्या आवळलेल्या असतात . राजकीय ,सामाजिक,,आर्थिक ,लष्करी अशा सर्व आघाड्यावर या पदाला लक्ष ठेवून स्वतः: चा पक्ष वाढवावा लागतो ! सबबी कितीही उजवा माणूस इथे बसला तरी त्याला काही " डावे " करावेच लागते ! मात्र जसजशी वैज्ञानिक प्रगती होत जाईल तसा विजय बुद्धीमंतांचा व भांडवल वाल्यांचा होत जाईल व साधारण पणे सर्व श्रमिक जर " डावे " असे धरले तर त्यांची गरजच समाजाला लागणार नाही ! अर्थात अशी वेळ यायला काही वर्षे जावी लागतील ! साहेबाला शिपाई एका मिनिटात बनविता येते शिपायाला साहेब बनविता येत नाही ! श्रम व बुद्धी यात बुद्धी जिंकणार ! भारत देशाचे म्हणाल तर ओ बी सी , दलित व मुसलमान व कम्युनिस्ट यांचा एक नेता व पक्ष बनला तर भा जपा ला पर्याय मिळेल . कांग्रेस हा आता पर्याय राहिलेला नाही !

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2021 - 8:41 pm | श्रीगुरुजी

सध्या केजरीवालांची लोकप्रियता वाढत आहे असे सर्वेक्षणांवरून दिसतंय. तृणमूल सलग तिसऱ्यांंदा बंगाल जिंकण्याची बरीच शक्यता आहे. २०२४ मध्ये हे दोघे मोदींविरूद्ध पर्यायी नेता म्हणून पुढे येतील.

चौकटराजा's picture

2 Mar 2021 - 10:13 am | चौकटराजा

ओवेसी , शरद पवार ,प्रकाश आंबेडकर , राज ठाकरे , उद्धव ठाकरे ,अखिलेश यादव,, द्रमुक वाले हे केजरीवाल यांच्या नेतृत्वात एक पक्ष स्थापन करतील ...... ?

श्रीगुरुजी's picture

2 Mar 2021 - 10:20 am | श्रीगुरुजी

एक पक्ष स्थापन करण्याची गरज नाही. युती करता येईल. जर कॉंग्रेसने ममताचे नेतृत्व मान्य केले तर तृणमूल हा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होऊन एक मोठा पर्याय निर्माण होऊ शकतो.

चौकटराजा's picture

2 Mar 2021 - 10:47 am | चौकटराजा

त्यासाठी युति या गोष्टीची व्याख्या निवडणूक कायद्यात होणे आवश्यक आहे ! सेनेला आता युती हवी असेल तर हिंदुत्व हा शब्द देखील प्रचारात कोन्ग्रेसे वापरू देणार नाही ! भा ज पा हा खरोखरच हिन्दुत्वावर निव्डून येत असेल त्याला काही अर्थिक कारणे नसतील तर सेनेला आता हिंदू मत मिळणारच नाहीत. अशा प्रकारच्या युती झाल्या तर मी तरी मत मोठ्या होउ शकणार्या राषट्रीय पक्षालाच देईन मग तो कोणी असो ! किमान समान कार्य़़क्रम ही एक भम्पक कल्पना आहे असे मी मानतो .कारण त्यातील बरीचशी कलमे भा ज पा देखील आपल्या जाहीरनाम्यात घालत असतोच ! पण ३/४ जागामुळेच जुनी दुखणी बरी करता येतात किमान समान कार्यक्रम म्हण्जे फक्त सलाईन आहे !!

चौकस२१२'s picture

3 Mar 2021 - 6:34 am | चौकस२१२

२०२४ मध्ये हे दोघे मोदींविरूद्ध पर्यायी नेता म्हणून पुढे येतील.
हो पण त्यामागे देशव्यापी पक्ष आणि त्याची वर्षानुवर्षची संघटना नसणार? (काँग्रेस किंवा भाजप किंवा कम्युनिस्ट )
म्हणजे त्यांच्या पण नाड्या अजूनच आवळलेल्या असणार
काँग्रेसनेच अंतर्गत लोकशाही स्वीकारून एक चांगला देशव्यापी विरोधी पक्ष आणि जमलं तर सत्ता यासाठी काही केला अन ते प्रयत्न यशस्वी झाले तर लोकशाहीच्या दृष्टीने चान्गले होईल.
ममता काय किंवा केजरीवाल हे पंतप्रधान म्हणून म्हणजे हे अमेरिकन पद्धतीकडे गेल्यासारखे होईल .. भारतात वेस्टमिनिस्टर पद्धतीची वयवसथा आहे

आणि असे दिसते कि " जगातील बहुतेक प्रस्थापित लोकशाहीत ( वेस्टमिनिस्टर आणि अमेरिकन पद्धत ) दोन तुल्यबळ पक्ष दिसतात एक मधय डावा आणि दोन मध्य उजवा ...

चौकस२१२'s picture

3 Mar 2021 - 5:28 am | चौकस२१२

काँग्रेस हा पर्याय होऊ शकतो जर
१) घराणेशाची बंद केली राष्ट्रीय पातळीवर तरी)
२० भाजपात गेलेलं काँग्रेस वासी परत आले
३) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेस ने पाठीचा कान आहे हे दाखवले आणि राडीचीच डाव खेळणे बंद केलं तर

ओ बी सी , दलित व मुसलमान व कम्युनिस्ट यांचा एक नेता व पक्ष बनला..
हं...... केवळ लोकसंख्येचं बळावर म्हणत असाल तर तर्क बरोबर वाटतो
पण म्हणजे जसा भाजप ब्राह्मण आणि व्यापारी यांचा तास हाही एक जाती धर्मावर आधारित पक्ष नाही का होणार?( खरा तर व्यापाराला जात नसते म्हणा पण धरून चालू कि सर्व वयापारी हे पिळवणूक करणारे ओपन कॅटायगिरीतील आहेत )

हे म्हणजे थोडं जनता पक्षाच्या भेळी सारखा होईल
खास करून कम्युनिस्ट आणि मुस्लिम यांचे कसे जुळणार .. कुठेतरी विस्फोट होणारच अर्हताःत कम्युनिस्टांनी जर फक्त सत्ता या साठी वहाबी लोकांच्या हट्टाला आंधळेपणाने पाठींबा डायल तर सोयीचे राजकरण म्हणून होईल म्हणा युती

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2021 - 10:34 am | श्रीगुरुजी

भाजप हा खाजगीकरणा चा खंदा समर्थक आहे त्यामुळे नवश्रीमंतांचा एक गट त्यापक्षामागे उभा आहे हेही कारण आहे !

हे बरोबर आहे. परंतु त्याचवेळी भाजपची आर्थिक धोरणे डाव्यांपेक्षाही डावी आहेत. विशेषतः मध्यमवर्गाला पिळून काढणे हे वाजपेयी व मोदी यांच्या कारकिर्दीतील समान सूत्र आहे. एकाचवेळी खाजगीकरण व उद्योगांना अनुकूल धोरणे आणि सातत्याने करवाढ करून मध्यमवर्गीय व श्रीमंतांना पिळून काढणे ही पूर्णपणे परस्परविरोधी धोरणे भाजप राबवित आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

1 Mar 2021 - 11:34 am | चंद्रसूर्यकुमार

परंतु त्याचवेळी भाजपची आर्थिक धोरणे डाव्यांपेक्षाही डावी आहेत.

आयुष्यमान भारत, उज्वला योजना वगैरे शेकडो योजना आहेत त्या डाव्याच आहेत. अनेकांना एखादा पक्ष राजकीय दृष्ट्या उजवा असला म्हणजे आर्थिक दृष्ट्या पण उजवाच असेल असे वाटत असते किंवा या दोन गोष्टींमध्ये फरक असतो हे लक्षात येत नाही. राष्ट्रवादाचे समर्थन करत असल्याने भाजप हा राजकीय दृष्ट्या नक्कीच उजवा पक्ष आहे पण या सगळ्या योजनांमधून सरकारचा अर्थकारणातील सहभाग वाढविला जात असल्याने आर्थिकदृष्ट्या डावा पक्ष आहे.

अमेरिकेत १९६९ ते १९८९ या वीस वर्षांमध्ये दोन मुळातले उजवे अध्यक्ष झाले. ते होते १९६९ ते १९७४ या काळात रिचर्ड निक्सन आणि १९८१ ते १९८९ या काळात रॉनाल्ड रेगन. निक्सन मुळातले उजवे असले तरी सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण डावी आर्थिक धोरणे अवलंबली होती. तर रेगन यांनी बरीच उजवी धोरणे अवलंबली. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर ते भारताचे रेगन होतील असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्षात मात्र ते भारताचे निक्सन होताना दिसले.

मला स्वतःला डावी आर्थिक धोरणे अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाहीत. तरीही कोणाही राज्यकर्त्याविषयी मत बनविताना नुसत्या एका गोष्टीवरून मत न बनवता तो नेता नक्की कोणते 'पॅकेज' देतो यावर मत बनवावे असे मला वाटते. आर्थिक धोरणे आवडली नाहीत तरी मोदींनीच भारतीय लष्करी सज्जता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे, ३७० सारखे कटकटीचे प्रश्न एका फटक्यात उडवले, नुसता पाकव्याप्त काश्मीरात नाही तर थेट वायव्य सरहद्द प्रांतात जाऊन आपली विमाने हल्ला करून परत आली आहेत, पुरोगामी विचारवंतांना अभिनंदन वर्तमानच्या सुटकेमागे इम्रानखानचा मोठेपणा दिसत असला तरी प्रत्यक्षात ते मोदी सरकारने दम भरल्यामुळे शक्य झाले हे अलीकडेच उघडकीला आले आहे. तसेच पूर्वी एकटा पाकिस्तान सांभाळणे जड जात होते तिथे एकाच वेळी पाकिस्तान आणि चीनलाही आपण सांभाळू शकतो हा आत्मविश्वास मोदींमुळे आला आहे हे पण नाकारता येणार नाही. तसेच तंत्रज्ञानाचा अवलंब करून सरकारी पैशाची बरीच गळती मोदींनी कमी केली आहे आणि मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर भर दिला जात आहे या जमेच्या बाजू आहेतच. जी.एस.टी हे पण नक्कीच चांगले धोरण आहे. सुरवातीच्या काळात अंमलबजावणीमध्ये अडचणी आल्या पण आता पूर्वीइतका त्रास राहिलेला नाही. त्यामुळे चलनबंदी वगैरे आर्थिक धोरणे आवडली नाहीत तरी एक पॅकेज म्हणून मोदी इतर कोणत्याही पर्यायापेक्षा कितीतरी जास्त चांगले आहेतच. फक्त अपेक्षा ही की निदान २०२२ किंवा २०२३ मध्ये तरी मोदी रेगन बनून मोठ्या प्रमाणावर करसवलती देतील.

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2021 - 11:42 am | श्रीगुरुजी

मोदींची राजकीय, लष्करी व आंतरराष्ट्रीय धोरणे उजवी आहेतच. त्यामुळे मी फक्त डाव्या आर्थिक धोरण़ाविषयीच लिहिले. वाजपेयींच्या काळात मध्यमवर्गीयांच्या अनेक करसवलतींना कात्री लागली. मोदींच्या काळात तर बहुसंख्य करसवलती बंद झाल्या आहेत.

ही प्रक्रिया फार पूर्वीच सुरू झालेली आहे. काँग्रेसच्या काळातच. शिवाय सरकारकडे उत्पन्नाची साधने मुळातच कमी असताना करसवलती द्याव्यात कशा? सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे आणता येत नाही. आताचे शेतकरी आंदोलन खरं सांगायचं तर शेतकऱ्यांना कराच्या रचनेत सामील करण्यासाठीच्या विरुद्ध असणारं आंदोलन आहे. कारण रिलायन्स ने जर शेतमाल खरेदी केला असता तर सरकारने त्यांना नक्किच कर लावला असता आणि मग तो शेतकऱ्यांना पण पास ऑन झाला असता. माझ्या मते सरकारच्या मनात कसलाही गोंधळ नाही. जर मोठ्या उद्योगांना करसवलती दिल्या नाहीत तर ते वाढू शकणार नाहीत आणि भारतातले सर्वात जास्त नोकऱ्या तेच निर्माण करणार आहेत.

मुक्त विहारि's picture

1 Mar 2021 - 1:27 pm | मुक्त विहारि

शेतकरी जर, कौटुंबिक 5 लाखाच्या वर, उत्पन्न घेत असेल तर, त्याने किमान 10% टॅक्स तरी भरला पाहिजे....

1951 ला पाहिलं जनरल इलेक्शन झाले आणि bjp ल खरी सत्ता 1998 ल मिळाली.
म्हणजे 47 वर्षांनी ते पण आघाडी चे सरकार.
बाबरी मशीद पडणे आणि त्या नंतर च दंगल ह्या मुळे च हिंदू एकजूट झाली आणि bjp सत्तेवर आली .
हेच त्या पाठी मागचे एकमेव कारण आहे.घराणे शाही मुळे काँग्रेस हरली नाही.
गैर कारभार मुळे काँग्रेस हरली नाही.
फक्त हिंदू चे राजकारण मुळे bjp जिंकली.
आता पण नरेंद्र मोदी निवडून असेल त्याचे कारण ते चांगले राज्य करते आहेत.
स्वार्थी नाहीत.
Bjp मध्ये घराणेशाही नाही.
ह्या मुळे नाही..
आता लोकांची मत अशी आहेत.
काश्मीर जाईल की राहील ते महत्वाचे नाही.
शेती विषयक कायदे आपल्या जमिनी हिरावून घेवू नयेत
भ्रष्ट कारभार असू किंवा नसो.
बँकेत असलेले आपलेच पैसे सुरक्षित आहेत की नाहीत.
आणि आता काही ही घडलं तरी हिंदू एकजूट होवून bjp ल पाठिंबा कधीच देणार नाही.
स्वच्छ कारभार ही bjp ची ताकत नाही तर हिंदू एकजूट हीच ताकत होती.
आता कोणत्या ही कारणाने अगदी love जिहाद,मुस्लिम दहशतवाद,पाकिस्तान,चीन अशा कोणत्या ही कारणाने हिंदू एकजूट होवून bjp ल जवळ करणार नाही.
हिंदू चेच रोज चे जीवन जगणे मुश्किल bjp मुळे झाले आहे.
किती भावनिक आव्हान केले तरी त्याचा फायदा bjp ल होणार नाही.

घोरपडे's picture

1 Mar 2021 - 11:45 am | घोरपडे

ज्या काँग्रेस च्या काळात सामान्य माणसाला कोणत्याही गोष्टीसाठी खेटा घालाव्या लागत होत्या ते काम .. मोदींनी दारापर्यंत आणून ठेवलंय, ६ वर्षा पासून भष्ट्राचाराचे नाव नाही .त्यामुळे भाजपने/मोदींनी जो विश्वास कमावला आहे त्य्यामुळे अजून तरी मोदींना आणि भाजप ला १५-२० वर्षे भेव नाही ..

Rajesh188's picture

1 Mar 2021 - 1:25 pm | Rajesh188

अर्ध्या हळकुंडाने पिवळे जर bjp वाले होत असतील तर त्यांनी हे कधीच विसरू नये 8 वेळा काँग्रेस नी bjp च्या आताच्या जागा न पेक्षा जास्त जागा लोकसभेत जिंकल्या होत्या .
Bjp che
बहु मता मधील एकपक्षीय सरकार हे फक्त आताचे एकमेव आहे .
अजुन दोन वर्ष पण पूर्ण झाली नाहीत.
नको तो आत्मविश्वास बाळगू नका.
गरिबाला लॉटरी लागली की त्याला स्वतःला खूप श्रीमंत झाल्या सारखे वाटते कारण कधी पैसे बघितलेले नसतात.
तसे bjp च झाले आहे.
कधीच त्यांच्या पक्षाला बहुमत मिळाला नाही आणि बाबर च्या कृपेने आता मिळाला आहे.
त्या मुळे डोळ्यावर पट्टी आहे.

Rajesh188's picture

1 Mar 2021 - 1:57 pm | Rajesh188

त्या मुळे त्या पक्षाचे समर्थक अपरिपक्व आहेत.खोलवर विचार ते करू शकत नाहीत.
Bjp ला जी सत्ता मिळाली आहे त्याचे एकमेव कारण भावनिक ( हिंदू हित वादी) आहे.
भावनिक प्रश्नावर जास्त वर्ष मत मिळत नाहीत.
उदाहरण मनसे.
सामान्य लोकांना
Gdp.
काश्मीर
पाकिस्तान
चीन
ह्याच्या शी काही देणे घेणे नसते.
सामान्य लोक त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या कमी होत आहेत की वाढत आहेत हेच परिणाम लावतात.
सर्वात महत्वाचे .
आर्थिक स्वलंबन.
वेटबिगारी आणि पिळवणूक करणाऱ्या नोकऱ्या रोजगार ह्या नावाखाली कोणालाच पसंत नसतात.
काँग्रेस ची पाळमुळ खोलवर का रुजली अखंड चाळीस पन्नास वर्ष काँग्रेस का सत्तेवर होती.
कधी विचार केला आहे का.
सहकारी दुग्ध व्यवसाय,सहकारी साखर कारखाने,सहकारी बँका,कमी खर्चात वीज आणि शेती ल पाणी.सहकारी सोसायटी ह्या सर्व माध्यम मधून सामान्य लोकांना फालतू नोकऱ्या करायची गरज लागत नव्हती आणि लोक स्वतःच्या पायावर उभी होती.
लोक नोकर नव्हते तर मालक होते.
एकाने वर तारे तोडले आहेत मोठ्या कंपन्या जास्त रोजगार देतात म्हणून त्यांना सवलत ध्या

एक साखर कारखाने जेवढं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करतो आणि तो साखर कारखाना उभा करण्याचा खर्च मलबार हील मधील फ्लॅट पेक्षा कमी आहे.
तेवढं रोजगार लाखो करोड चा प्रोजेक्ट निर्माण करू शकत नाही

भ्रष्ट कारभार आज पण आहे उलट वाढला आहे

पण ते जेव्हा धोकादायक कर्ज उद्योगपती ना देणार नाहीत.
बँका ह्या सरकारी च हव्यात अडचणी असतील तर त्या वर उपाय करा पण खासगी बँका बिलकुल नकोत.
नोकऱ्या ची गरज नाही त्या पेक्षा घरोघरी
कुटीर उद्योग सुरू झाले पाहिजे.
मोठे भांडवलदार नष्ट करा संपत्ती ची
एक अधिकारी शाही बिलकुल नको.
धार्मिक जातीय उन्माद नको.
लाच घेणे ,आर्थिक घोटाळा करणे ह्या प्रकाराला लगेच फाशी हीच शिक्षा.

सुबोध खरे's picture

2 Mar 2021 - 11:37 am | सुबोध खरे

घरोघरी
कुटीर उद्योग सुरू झाले पाहिजे.

सगळ्यांनी हातभट्टी लावायची का?

उत्पादन विकणार कोण आणि घेणार कोण?

या जगात शक्य असणाऱ्या मागण्या पूर्ण होतील. समाजवाद याच कारणाने संपला.

गेल्या 6 वर्षातील मोदींचे आर्थिक धोरणे पूर्णतः डावीकडे झुकणारी होती, पण आता ते reforms करू इच्छितात असे दिसतेय जी चांगली गोष्ट आहे. पण मला एकच चिंता आहे की मोदी सर्वाधिक महत्त्व निवडणुका जिंकण्याला देतात, अर्थात राजकारणात ते अयोग्य नाही पण जर नवीन आर्थिक सुधारणा राबवताना जर त्यांना असे वाटले की यामुळे लोकप्रियता कमी होईल आणि निवडणुका जिंकण्यास अडथळा येऊ शकतो तर ते लगे घूमजाव करू शकतात

चंद्रसूर्यकुमार's picture

2 Mar 2021 - 11:51 am | चंद्रसूर्यकुमार

एकूणच अनेक आव्हाने आहेत. काँग्रेसच्या राज्यात जे.एन.यु सारख्या माजलेल्या टोणग्यांना नॅशनल अ‍ॅडव्हायजरी काऊन्सिलमधून मिळालेला राजाश्रय, हिंदू दहशतवादाचे थोतांड माजवून चाललेली सरकारी पातळीवरील देशविघातक कारस्थाने, लष्करी सज्जतेकडे झालेले पूर्ण दुर्लक्ष, प्रचंड माजलेला भ्रष्टाचार वगैरे एकाहून एक अशी कित्येक आव्हाने असताना सगळ्यात महत्वाचे काय आणि कशाला प्राथमिकता द्यायला हवी हे ठरवायची वेळ होती. आम्ही चीनबरोबरच्या एल.ए.सी वर इन्फ्रास्ट्रक्चर बांधलेले नाही याची कबुली तत्कालीन संरक्षणमंत्री ए.के.अ‍ॅन्टनी यांनी लोकसभेतही दिली होती. अशी परिस्थिती असताना ते आव्हान सांभाळणे सगळ्यात महत्वाचे होते. काँग्रेस परत सत्तेवर आल्यास आर्थिक सुधारणा पण नाहीत आणि लष्करी सज्जता वगैरे पण नाही असेच होणार ही अगदी उघड गोष्ट आहे. तेव्हा काँग्रेस परत डोईजड व्हायला नको म्हणून जनतेला आपल्या बाजूने वळवून ठेवणे पण गरजेचे होते. त्यामुळे आर्थिक सुधारणांना बॅकसीट दिली गेली असे दिसते. शेवटी उजवे आर्थिक विचार हेच कोणत्याही अर्थव्यवस्थेला हितकर असले तरी त्याचे परिणाम दिसेपर्यंत विचारवंतांना बोंबा मारायला संधी मिळते आणि त्यातून दुसरे इंडिया शायनिंग व्हायची शक्यता असते.

तेव्हा मला तरी वाटते की लष्करी सज्जता, पाकिस्तान-चीनला जरब बसविणे, कदाचित पीओके-बलुचिस्तान मुक्ती हे बाह्य मुद्दे तर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे वगैरे अंतर्गत मुद्दे पहिल्यांदा सोडवायला घेतले असावेत. या सगळ्यात नेहमीप्रमाणे मध्यमवर्गीय करदाता ही दूभती गाय असते त्यामुळे या सगळ्यासाठी पैसे उभे करायला आपणच असतो. त्यामुळे मध्यमवर्गीयांमध्ये नाराजी वाढणार हे गृहित धरून परत निवडणुक जिंकायला म्हणून गरीब वर्गाला आपल्याकडे वळवायला म्हणून विविध डाव्या योजना अंमलात आणल्या गेल्या असाव्यात असे मला तरी वाटते. काहीही झाले तरी मोदींना किती डोके थंड ठेऊन काम सांभाळावे लागत आहे याची कल्पना येते. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने खलिस्तानी वगैरे देशद्रोही तत्वांची पकड अजून किती घट्ट आहे हे पण सगळ्यांना समजलेच. अशा वेळी धसमुसळेपणाने काही न करता शांतपणे या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर त्यासाठी परत काँग्रेस आणि स्वयंघोषित पुरोगामी अजून काही वर्षे तरी सत्तेत येऊच शकणार नाहीत याची तरतूद करणेही गरजेचे होतेच. म्हणून ही सगळी डावी धोरणे अंमलात आणली असावीत असे मला वाटते.

जास्त कर भरायला मला पण आवडत नाही. किंबहुना मी ज्या आर्थिक विचारांना मानतो त्यात कर आकारणी म्हणजे सरकारी दरोडेखोरी असेच म्हटलेले आहे. पण जेव्हा मला समजते की मी दिलेल्या कराचा उपयोग माझ्या सैनिकांना बुलेटप्रूफ जाकिटे, हवाईदलासाठी राफेल विमाने, चिनूक हेलिकॉप्टर, एस-४०० प्रणाली वगैरे विकत घ्यायला होत आहे, देशात कुठेतरी हायवे बांधायला, कुठल्यातरी गावात पाणी न्यायला होत आहे तेव्हा त्याविषयी मी तरी फार तक्रार करणार नाही. बाकी काँग्रेसच्या राज्यातही कर कमी होते असे कुठे आहे? बाकी त्या कराचा उपयोग काँग्रेस राज्यात नक्की कशासाठी होत होता हे तर मी विचारत पण नाहीये.

बाकी थोडेफार शिकलेले लोक लगेच शंकाकुशंका उपस्थित करायला पुढे असतात हे अगदी मिपावरही दिसून येईलच. तेव्हा हा वर्ग व्होलाटाईल असतो आणि त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही तेव्हा आपले राजकारण आणि दीर्घकालीन देशहित या दोन्ही गोष्टींसाठी वेगळ्या समाजघटकाचे समर्थन मिळविणे भाग आहे असे मोदींना वाटले असावे. मग शिकलेले लोक किती का कुरकुरे ना. ही खेळी यशस्वी होईल की नाही याविषयी मला पण शंका होत्या पण २०१९ मध्ये त्याचे उत्तर मिळाले. पूर्वी सामान्य माणसाचा केंद्र सरकारच्या योजनांशी थेट संबंध फार यायचा नाही. पण विविध योजनांद्वारे सामान्य माणसांच्या खात्यात पैसे फार कुठे गळती न लागता जमा व्हायला लागले, रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली तेव्हा सामान्य माणसांना पण मोदींना दुसरी संधी द्यायला हवी हे समजू लागले. महाराष्ट्रातील कोणत्या तरी गावात त्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार होता आणि नव्वदी पार केलेल्या एका आजीबाई 'मला मोदीचे कमळ चिन्ह का दिसत नाही' म्हणून केंद्र अधिकार्‍यांना प्रश्न विचारत होत्या अशी एक बर्‍यापैकी प्रातिनिधिक बातमी पण वाचली होती. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की मतदारांपैकी बहुसंख्य असलेल्या या वर्गाला आपल्याकडे वळवणे भाग होते. बाकी फार शिकलेले, मोठ्या मोठ्या चर्चासत्रांत भाग घेणारे विचारवंत विद्वान वगैरे लोकांना काय बोलायचे ते बोलू दे.

माझ्या मिपावरील पूर्वजन्मात मी पण मिपावरील सुशिक्षित मोदीविरोधकांशी वाद घालायला जायचो. पण आता ते करत नाही. शेवटी सुशिक्षित वर्ग व्यापक हित लक्षात न घेता कायमच कुरकुरत राहणार असेच दिसते.

कायमच कुरकुरत राहणार असेच दिसते.

सहमत आहे

अगदी समर्पक आणि उत्तम लिहले आहे.

Rajesh188's picture

2 Mar 2021 - 9:03 pm | Rajesh188

मग ते विद्यालयीन,महा विद्यालयीन आणि त्या पुढचे कोणते ही असू ध्या त्याचा आणि राजकीय समज ,किंवा देश हित ह्याचा काही ही संबंध नसतो.

मराठी_माणूस's picture

2 Mar 2021 - 11:16 am | मराठी_माणूस

कुठल्याही पक्षाचे काही विशिष्ट तत्व असते हे गृहीतक सध्याच्या काळात तरी चुकीचे आहे असे वाटते.
प्रत्येकाची एकच मह्त्वकांक्षा , ती म्हणजे सत्ता आणि तिच्यामुळे मिळणारे फायदे. अथवा विरोधी तत्वे असलेल्या पक्षां मधे पक्षांतर झालेच नसते. वेग वेगळे पक्ष हे फक्त सामान्य लोक आणि त्यांचे कार्यकर्ते (शक्ती प्रदर्शान) ह्यांच्यासाठी.
कुठल्याही पक्षाच्या वरच्या स्तरातील नेत्यांचे कुठल्याही संकटात काहीही बिघडत नाही.
सत्तेतले व विरोधी, एकमेकांना अशा प्रसंगी सांभाळातच असतात.
त्रास हा फक्त सामान्य जनतेला असतो हे सामान्य जनतेला जेंव्हा उमगेल तो सुदीन. तोपर्यंत अशा चर्चा चालुच रहातील.

चौकटराजा's picture

2 Mar 2021 - 11:39 am | चौकटराजा

मी अशा गोष्टीना ६५ /३५ ची भागीदारी समजतो .आजही कम्युनिस्ट सोडता सर्व पक्ष एकाच माळेचे मणी आहेत असे मी मानतो . आपण दोघेही लढू . बुद्धीभेद करू . जिंकून येईल तो ६५ टकके फायदा घेईल .त्यानंतर मी बडबडल्यासारखे करीन मग लोकशाही बुडाली अशी बोंब करीन मग गप्प बसेन या गप्प बसण्याचे मला ३५ टक्के ! एरवी " राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो " किमान सामान कार्यक्रम " ? ते विरोधात आहेत म्हणजे विरोध करणे त्यांचे कामच आहे ! " मला संपविण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे ! माझ्याकडेही त्यांची फाईल आहे ! मी असे म्हटलेच नव्हते माझ्या बोलण्याचा विपर्यास केला ई ई ई लोकांच्या अंगावर फेकत राहायचे !

सॅगी's picture

2 Mar 2021 - 12:22 pm | सॅगी

माझ्याकडेही त्यांची फाईल आहे

आजकाल फाईलच्या जागी सीडी असते, प्रत्यक्षात मात्र साधी फ्लॉपी सुद्धा बाहेर पडत नाही ती गोष्ट वेगळी..

चौकटराजा's picture

2 Mar 2021 - 12:52 pm | चौकटराजा

कदाचित सी डी नसतेच किंवा असली तर ३५ टक्के देऊन ती फॉरमॅट केली जाते !!

सुक्या's picture

3 Mar 2021 - 12:05 am | सुक्या

गंमत म्हणजे ... ५० वर्षापुर्वी चालनारे हे टोटके आजही हे निर्लज्ज लोक वापरतात. ह्यांना कोण सांगणार की बाबारे आता तो काळ राहीला नाही. लोक शहाणे झाले आहेत.

ग्रामीण भागातील लोकांना.
जमिनी साठी पाणी,वीज, शेतमाल ल भाव,खतांच्या किमती,बाकी शेती आधारित व्यवसाय ह्या साठी अनुकूल वातावरण निर्माण करणारे सरकार हवे असते.
गरीब लोकांना रेशन वर अन्न धान्य मिळावे,पाणी,वीज ,फुकट मिळावी जेणे करून त्यांच्या तुटपुंज्या कमीत घर चालावे.
विद्यार्थी.
ह्यांना त्यांच्या आवडीच्या कॉलेज मध्ये सहज प्रवेश मिळावा ,शिक्षणाचा खर्च जास्त नसावा,आणि नोकऱ्या उपलब्ध असाव्यात अशी स्थिती निर्माण करणारे सरकार हवे असते.
१) मध्यम वर्
इन्कम टॅक्स ची मर्यादा वाढावी,ह्यांना चैनी च्या वस्तू खरेदी करण्यासाठी कमी व्याजात कर्ज मिळावे.
जीवन आवश्यक वस्तू ह्यांना पण स्वस्त हव्या असतात(दूध,भाज्या,पाणी,वीज,टॅक्स)
पण चैनी च्या वस्तू किती ही महाग असतील तरी त्यांची तक्रार नसते फक्त कर्ज कमी व्याजात मिळावे.
२) उच्च मध्यम वर्ग.
ह्यांचे आणि निवडणुकीचा काही संबंध नसतो हे मतदान पण करत नाहीत.
हे सोडून बाकी सर्व लोक अशिक्षित आहेत त्यांना काही कळत नाही.
सरकार,सरकारी अधिकारी,आणि एकंदरीत सर्व च लोक ह्यांच्या दृष्टी नी मूर्ख लोक असतात.
पण उंटावरून शेळ्या हकण्यात सर्वात पुढे हा वर्ग असतो.
स्वतः कोणत्याच उपक्रमात ह्यांचा सक्रिय सहभाग नसतो .
फक्त सल्ले देणे हेच ह्यांचे काम .
सर्व समाज पासून स्वतः ला वेगळे समजणार हा वर्ग.
उच्च वर्गीय.
ह्यांची मात्र ठाम मत असतात,सरकार कोणते असावे ह्या विषयी हे जागरूक असतात.
फुकट जमिनी,सोयीच्या सरकारी निर्णय,कायदे ह्यांची अडचण बनू नये म्हणून पळवाट देणारे सरकार हे सर्व ह्यांना हवं असते.
सक्रिय राजकारणात दिसत नसले तरी हे राजकारणात प्रभाव ठेवून असतात.
प्रतेक वर्गाच्या अपेक्षा पूर्ण करणे म्हणजे एकाच प्रकारची पॉलिसी सरकार ल राबवता yet नाही.
भांडवल शाही फोफवेल असे निर्णय उच्च वर्गाला हवा असतो आणि त्यांना नाराज करणे शक्य नसते.
पण जे मत देणार वर्ग असतो त्यांना समाजवादी निर्णय हवे असतात.
त्या लोकांना पण खुश ठेवायचे असते.
बाकी चीन,पाकिस्तान,कोणती विमान घेतली.स्वदेशी,असल्या कोणत्या च गोष्टी शी कोणाला देणे घेणे नसते.

चौकस२१२'s picture

3 Mar 2021 - 5:20 am | चौकस२१२

चला राजेशभाऊ कामाला लागा
भाजप गेली खड्यात
संध्यच्या परिस्थितीत काँग्रेस काय करू शकेल आणि त्यांनी काय करावे यावर एक मुद्देसूद लेख लिहा .. पण २ अटि
१) तो लेख काँगेस चे जुने गोडवे (सहकारक्षेत्र उभं केलं) वैगरे हे उगल्याचा नाही आणि
२) स्थानिक पक्ष हेच कसे पर्याय हि टेप लावयायःची नाही कारण तसे जर तुमचे म्हणणे असेल तर तुम्ही काँग्रेस संपली असे मान्य करताय असे सिद्ध होईल !)

सुक्या's picture

3 Mar 2021 - 5:59 am | सुक्या

राजेश भौ सर्वज्ञ आहेत. मुद्देसूद एक काय दहा लेख लिहितील. परंतु बाकी धाग्यांवर (बाष्कळ) ज्ञान वाटण्यात बिज्जी आहेत.
तेव्हा थोडी कळ काढा. (म्हणजे बघा कुठपर्णंत सहन करता येते ते).
बाकी भाजप खडड्यात गेली तर राजेश भौ काय लिवतील ?

गेल्या ६५ वर्षातल्या काँग्रेस च्या करामती
१) सहकारी बँका -- लोकांचा टॅक्स चा पैसे गुंतून शेतकऱ्यांना आणि सामान्य लोकांना लुबाडले -- आज एकही बँक फायद्यात नाही . आज बऱ्याचस्या सहकारी बँका धूळ खात पडल्यात
२) दूध संघ - डेअरी ची लॉबी वाढवून शेतकऱ्याची फसवणूक आणि टाळू वरचे लोणी खालले -- आता शेतकऱ्यांनी सहकारी दूध सन्घत दुध घलने फारच कमी केले आहे .. उलट अमूल मध्ये दूध घातले तर आठवड्याला आणि खात्यात पैसे मिळतात .
३) मार्केट यार्ड -- इथे शेतकार्याचा मालावर १० प्रकाचे टॅक्स लागतात..आणि SEZ मधील कंपन्यांना ० टॅक्स आहे .. तसेच SEZ बिल्डर ला १० वर्षे कोणताही टॅक्स नाही ..
एकूणच काय तर ६५ वर्षे शेतकऱ्याची कशी पिळवणूक करून देशोधडीला लावले ...हे आता शेतकऱ्याला कळायला लागले आहे .. काही राजकरण्याचे पैसे घेऊन स्तुती करणारे सोडले तर -- काँग्रेस आणि विशेष करून NCP बद्दल शेतकर्यामद्धे खूप राग आहे .
मी स्वतः सेवा क्षेत्रात असून शेती पण करतो ..

लागू होत नाही...

आजोबांनी संघटन करतांना, भरपूर खस्ता खाल्लेल्या असतात.

मुलगा, त्याची फळे उपभोगतो आणि नातू उधळून लावतो.

अमुल, हे वेगळे उदाहरण आहे.हा एक अपवाद आहे...

वडसाड मधून दूध संकलन करून, रोज रेल्वेने, आणंदला जाते,हे मी वलसाडला रहात असतांना बघीतलेले आहे.

अतार, नामक वलसाड मधल्या खेडेगावाची आर्थिक प्रगती केवळ, अमुल मुळे झाली.
-------------------

एक साखर कारखाने जेवढं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करतो आणि तो साखर कारखाना उभा करण्याचा खर्च मलबार हील मधील फ्लॅट पेक्षा कमी आहे.

हा विनोद असावा. असेल तर ठीक आहे. नाहीतर तुम्ही साखर कारखाने नीट बघावेत !