इंटरनेट कॉल करणे भारतात कायदेशीर आहे का?

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in काथ्याकूट
28 Feb 2021 - 12:14 pm
गाभा: 

सध्या एका मनस्ताप देणार्या अनुभवातुन जात आहे.ज्या व्यक्तीच्या कृत्यामुळे मनस्ताप होतो आहे त्या व्यक्तिस कॉल करणे गरजेचे आहे पण त्या व्यक्तीने माझा फोन ब्लॉक केला आहे. थोडेसे गुगल सर्च केल्यावर एखाद्याने ब्लॉक केले असेल तरीही तुम्ही त्यास कॉल करु शकता त्यासाठी बरेच अ‍ॅप पण उपलब्ध आहे पण ह्या अ‍ॅपमधुन जाणार कॉल हा इंटरनेट टेलिफोनी अंतर्गत येतो आणि माझ्या अर्धवट माहीतीनुसार भारतात बहुदा ह्या प्रकारावर बंदी आहे. ह्याबाबत कुणी काही माहीती देऊ शकेल काय?
(ह्या मनस्ताप देणार्या अनुभवावर पुढे मागे एक लेख लिहिन.)

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Feb 2021 - 12:20 pm | मुक्त विहारि

बर्याच देशांत बंदी आहे...

भारतात पण, इंटरनेट काॅलिंगला बंदी असण्याची शक्यता आहे ...

माझ्या माहिती प्रमाणे एके काळी होती आता नाही. गूगल व्हॉईस द्वारे करा.

मराठी कथालेखक's picture

5 Mar 2021 - 12:24 am | मराठी कथालेखक

भारतातून आता हे बंद झालं

अमर विश्वास's picture

28 Feb 2021 - 1:32 pm | अमर विश्वास

Terminate VoIP calls to landline/PSTN lines within India is

in simple words

calling from Soft phone (Skype etc. or other Apps ) to another soft phone (Skype etc. or other Apps ) is allowed. thats why Skype / WhatsAPP etc work.

But calling from soft phone to landline / another mobile is not allowed. (this is allowed in europe & other countries)

hope this helps

योगी९००'s picture

28 Feb 2021 - 2:33 pm | योगी९००

दुसरा नंबर वापरून कॉल करता येणार नाही का?

म्हणजे घरातल्या इतरांचा किंवा जवळच्या मित्राचा फोन घेऊन त्याला कॉल करायचा किंवा त्याच्या घरातल्या इतर कोणाला फोन करून याला बोलवायचे किंवा त्यांना मेसेज द्यायचा ... हे शक्य नाही का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2021 - 7:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मित्राच्या किंवा जवळच्या नातेवाईकाच्या फोनवरुन फोन करा. पण, फोन करणा-याच्या मागे पिडा लागणार नसेल तर...!

-दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

28 Feb 2021 - 7:56 pm | कानडाऊ योगेशु

थोडे कॉम्प्लिकेटेड आहे प्रा.डॉ हा प्रकार. ह्या एकंदर अनुभवाबाबत लवकरच लिहिन. !

तुषार काळभोर's picture

28 Feb 2021 - 3:30 pm | तुषार काळभोर

भारतातून जनरेट होणाऱ्या आणि landline अथवा सेल्युलर नेटवर्क वर टर्मिनेट होणाऱ्या VoIP कॉल साठी DOT (दूरसंचार खाते - Department of Telecom) यांचा परवाना आवश्यक असतो.
त्याशिवाय VoIP कॉल करणे बेकायदेशीर आहे.

कदाचित अडाणी वाटेल असा प्रश्न.

तांत्रिकदृष्ट्या असे कॉल्स कुठल्या तरी प्रवेशद्वाराने या भारतीय लँडलाईन/ मोबाईल नेटवर्कमधे प्रवेश करत असणार. ते द्वार/ मार्ग मुळात खुले न ठेवणे हे शक्य नसेल का? बेकायदेशीर वगैरे ठरवण्याचा प्रश्न येतोच कशाला?

तुषार काळभोर's picture

28 Feb 2021 - 3:50 pm | तुषार काळभोर

ते द्वार/ मार्ग मुळात खुले न ठेवणे

कारण तो मार्ग खुला पण नियंत्रित ठेवणे ही गरज आहे.

सिस्को फोन वरून VoIP कॉल खूप कंपन्या करतात.
प्रत्येक (आंतरराष्ट्रीय) कॉल सेंटर याच तत्वावर चालतं.
त्यामुळे हा मार्ग खुला पण नियंत्रित ठेवावा लागतो.

तेच की. विशिष्ट कंपन्यांचे calls ऑथराइज होऊनच प्रविष्ट होत असतील ना? मग कोणीही कुठूनही कनेक्ट होऊ कसा शकतो?

तुषार काळभोर's picture

28 Feb 2021 - 4:03 pm | तुषार काळभोर

ते टेकनिकली माहिती नाही.

आमच्या कंपनीत VoIP सुरू केले, त्यावेळी ही प्रक्रिया केली होती. बाकी ते मॉनिटर कसं करतात आणि ब्लॉक कसं करतात, माहिती नाही. कदाचित दूरसंचार कंपन्या च्या माध्यमातून करत असतील. (जसे पॉर्न साईटस बॅन केल्या).
आणि बेकायदेशीर रित्या करणारे VPN वा तत्सम मार्ग वापरत असतील.

कानडाऊ योगेशु's picture

28 Feb 2021 - 7:54 pm | कानडाऊ योगेशु

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
इंटरनेट टेलिफोनी बद्दल गुगल केल्यावर असे समजले कि VoIP सर्विस प्रोवायडर्स चे गेट-वे भारताबाहेर असतील तर ह्या गोष्टीला परवानगी आहे.एकंदरीत बरीच गोंधळात टाकणारी माहीती आहे त्यामुळे असा प्रकार करणे टाळावेच असे मत झाले आहे.

स्वलिखित's picture

4 Mar 2021 - 7:42 pm | स्वलिखित

मनस्ताप देणार्‍या व्यक्तिने तुम्हला ब्लॉक केलय , आणि इतरानाही सांगु शकत नाही , पेट्रोल चा भाव परवडण्या ईतका जवळ असेल तर सरळ घरी जाऊन श्रीमुखात लगाऊन देणे हा सोपा पर्याय दिसतो, मना सज्जना बरं वाटेल ..

एक थप्पड़ फार महागात पडू शकते....

कानडाऊ योगेशु's picture

5 Mar 2021 - 7:03 pm | कानडाऊ योगेशु

बेंगलोर स्थित (कागदोपत्री असे दाखवणार्या) एका मूवर्स आणि पॅकर्स कंपनीने सामान स्थानांतरण करताना चुना लावलाय. आणि माझा नंबर ब्लॉक केलाय त्यामुळे त्याच्याशी पुन्हा संपर्क करण्याचे पर्याय हुडकत होतो. बेवसाईट अन्य फोन नंबर सर्व फेक आहेत. पोलिस केस करण्याचीही प्रक्रिया सुरु केली आहे.

स्वलिखित's picture

5 Mar 2021 - 8:35 pm | स्वलिखित

याचाही बराच फायदा होऊ शकतो,
सामानाची चोरी किंवा तोडफोड आणि तत्सम प्रकारात मोडत असेल तर रजिस्टर करायला काही हरकत नाही, किंबहुना अशा तोळ्या सक्रिय आहेत मार्केट मध्ये , अशा फ्रॉड कंपनीला सामान शिफ्ट करायला बोलावणे म्हणजे चोरीला आमंत्रण देण्यासारखे आहे,

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 8:45 pm | मुक्त विहारि

हा धंदा सुरू करायला हरकत नाही...

कारण, सचोटी आणि मेहनत करणारी मंडळी, ओळखीत आहेत..

कानडाऊ योगेशु's picture

6 Mar 2021 - 10:35 am | कानडाऊ योगेशु

पेमेंट गुगल पे द्वारे केले आहे.अगरवाल हा ह्या क्षेत्रातील एक आघाडीचा ब्रँड आहे आणि त्या नावाशी साधर्म्य दाखवणार्या बर्याच खोट्या कंपन्या मार्केट मध्ये आहेत. अशाच नामसाधर्म्य दाखवणार्या एका कंपनी च्या जाळ्यात आम्ही अडकलो.पुढेमागे ह्या अनुभवावरही एक सविस्त लेख लिहायचा विचार आहे.

मुक्त विहारि's picture

6 Mar 2021 - 10:43 am | मुक्त विहारि

पण नावे बदला, कायदेशीर बाबी टाळता येतील

आणि

असे बरेवाईट अनुभव नक्कीच सांगावेत, कारण, इतरांना ही माहिती उपयोगी पडते

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2021 - 2:35 pm | चौथा कोनाडा

बाप रे ... कायो, तुम्ही विचित्र संकटातच सापडलाय की !

बाहेर येण्यासाठी इष्टचिंतन !

तुर्रमखान's picture

5 Mar 2021 - 3:21 am | तुर्रमखान

आयपी फोन अ‍ॅप्स वापरून फोन करणारी बरीच मंडळी आहेत. सुरवातीला एकदाच रेजिस्टर करण्यासाठी एका फोनवर कोड पाठवतात नंतर तो फोन नंबर लिंक होवून प्रत्येकवेळी फोन करताना तो नंबर दुसर्‍याच्या कॉलर आयडीवर डिस्प्ले होतो. रेजिस्टर झाल्यावर त्या फोनची गरज नसते. असं करणं गुन्हा नसावा. तसं असेल तर दर महिन्याला किमान पाचेक लाख लोक्स जेलमध्ये जातील. तो सिम डीअ‍ॅक्टिवेट झाला तर कॉल करता येत नाही त्यामुळे प्रत्येक वेळी कॉल करताना तो आयपी फोन ज्या नंबरला लिंक आहे तो नंबर अ‍ॅक्टिव आहे का? हे तपासणारी यंत्रणा असावी. पण सिमकार्डाचा (नंबरचा) मालक बदलला तर काय होतं हे माहीत नाही.

समानाची अंदाजे किंमत कीती आणि कशाप्रकारचे समान म्हणत आहात तुम्ही ते स्पष्ट सांगाल काय?
कारण घर सामान असेल तर एव्हंढं कोणी लुटमार करत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

7 Mar 2021 - 7:13 pm | कानडाऊ योगेशु

पूर्ण घरसामान नाही पण काही महागड्या वस्तु आहेत. जसे कि एल.ई.डी टीवी फ्रिज वगैरे.सामानाची अंदाजे किंमत रू.६०००० पर्यंत जाईल.

जमल्यास पोलिसात ओळख काढा.
मग दुसऱ्या कोणाच्या तरी फोन वरून त्यांची सर्व्हिस पुन्हा बुक करा.
सामान घ्यायला आले की सरळ पोलिसात द्या. कदाचित काम होईलही.