पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा जिजामाता जयंती

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
28 Jan 2021 - 5:02 pm

पौष शुद्ध १५
अर्थात शाकंबरी पौर्णिमा

जिजामाता जयंती

मागे पुराणकाळी पृथ्वीवर अवर्षण पडले अन् समस्त मानव प्रजाती अन्नावाचून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली. मानवाची अन्नायाठी वणवण सूरू झाली. केवळ मानवच नाही तर सकल प्राणीमात्र अन्नावाचून तडफडू लागला अन् नष्टत्वाच्या फेऱ्यात सापडला.

अशा भयाण काळी साक्षात आदिशक्ती जगद्जननी भगवतीचे मातृहृदय तळमळून जागे झाले. आपल्या लेकरांचे दु:ख तिला पाहवेना, सोसवेना. त्याच्या दु:खावर फुंकर घालून ते शांत करण्यासाठी आवश्यकता होती अन्नाची त्यासाठी भगवतीनेच अवतार धारण केला. अन् आपल्या लेकरांवर कृपा केली.
ममत्वाने त्यांना खाण्यासाठी पालक, करडी, शेपू, हादगा, मेथी शेवगा, कोथिंबिर यासारख्या हजारो शांक अर्थात पालेभाज्या अन् फळभाज्यांचा निर्मिती तिने केली. प्रजा पोटभर खावून सुखावली. संतुष्टली.
त्यामुळे आदिशक्तीच्या या अवताराला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच त्यामुळे तिची शाकंबरी नावाने उपासना केली जाते शाकंबरी म्हणून विशेष पुजा केली जाते .

तो दिवस आजचा.

जसे पुराणकाळी आपल्या प्रजेच्या आस्मानी दु:खावर मातेने अवतार धारण करून मात केली.
तसेच कलियुगी आस्मानी बरोबरच सुलतानी संकट मराठराज्यावर कोसळले अन, जनतेच्या दु:खाला पारावार राहिला नाही. कोणी वाली राहिला नाही. अास्मानी संकटावरची पोटातली भूक कशीतरी भागवावी तर सुलतानी नजरेची वखवखलेली भूख मराठमोळ्या लेकीबाळींची अब्रू घेत होती. त्याला काहीही उपाय राहिला नव्हता. रयत केवळ आपल्या सुखोपभोगासाठी आहे तिची किंमत पायपोसासारखीच. असे वाटणाऱ्या सुलतानांना रयतेच्या दु:खावर फुंकर घालण्याची गरजच वाटत नव्हती. अशा सुलतानी अन् अस्मानी संकटात महाराष्ट्र राज्य असताना. जणू आदिशक्तीनेच पुन्हा अवतार धारण केला अन् हे मराठराज्य संकटातून बाहेर काढले.

जनतेच्या अन्नाची व्यवस्था करून अब्रूचीहि सांभाळणी केली.

ती मराठमोळी माता म्हणजे जिजामाता.

आईसाहेबांचा जन्म आजचा म्हणजे पौष शु|| १५चा.

त्यामुळे त्यांची आज जयंति. त्यांचे चरणी विनम्र अभिवादन !

© आशुतोष अनिलराव बडवे पाटील
पंढरपूर जिजामाता

इतिहास