अवघे भरून आले..

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
6 Jan 2021 - 7:51 pm

सोडून सांजवेळी जाता कुणीतरी ते
घर मोकळेच होते.. अवघे भरून आले..

विसरावयास बसता आठव अचूक भिडतो
अवकाश पोकळीतील, अवघे भरून आले..

मायेस ओतणारी.. ती ऊब सांत्वणारी..
अवघे सरून गेले.. अवघे भरून आले..

होता मनात बहुदा तो शब्द ओळखीचा..
निरभ्र अभ्र सारे अवघे भरून आले..

--

त्या थोटकात पुन्हा हिरवाच कोंब होता..
नाविन्य पालवीतून अवघे भरून आले!

--
--
त्या संध्याकाळी अचानक काहीतरी निसटून गेल्याची भावना झाली.. ती हुरहुर अगदी टीपेची होती.. जशी आली तशीच गेली..! अत्यंत गहिरं आणि जड असं काहितरी मनाला भिडलं होतं हे मात्र खरं. डोळे मिटून थोडावेळ बसलो होतो. त्यावेळी मागे पाहिलेलं एक दृष्य डोळयांसमोर तरळून गेलं.. एका तोडलेल्या मोठ्या झाडाच्या उरलेल्या खोडातून, एका बाजुनं छोटीशी डहाळी पालवी घेऊन फुटली होती.. ते दृष्य आठवलं आणि मग मन जरा शांत झालं. त्या भावना शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न.

राघव

कविता

प्रतिक्रिया

Bhakti's picture

6 Jan 2021 - 10:31 pm | Bhakti

मायेस ओतणारी.. ती ऊब सांत्वणारी..
अवघे सरून गेले.. अवघे भरून आले..

प्रचेतस's picture

6 Jan 2021 - 10:35 pm | प्रचेतस

आहाsss
सुरेख

प्राची अश्विनी's picture

7 Jan 2021 - 11:08 am | प्राची अश्विनी

आहा! क्या बात!

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jan 2021 - 11:32 am | ज्ञानोबाचे पैजार

फारच सुरेख,
आवडली
पैजारबुवा,

राघव's picture

7 Jan 2021 - 12:04 pm | राघव

सगळ्यांना धन्यवाद! तुमचे प्रतिसाद बघून आनंद झाला.

मूकवाचक's picture

7 Jan 2021 - 1:54 pm | मूकवाचक

का कुणास ठाऊक, सारांश चित्रपटाचा शेवट आठवला हा धागा वाचल्यावर.

राघव's picture

7 Jan 2021 - 8:34 pm | राघव

ओह्ह..
सारांश बघीतला नाही अजून.. आता बघावा लागेल. अनुपम खेर चा ना?