शेतकरी आंदोलन कि हिंदू शीख वाद उकरणे ?

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
28 Dec 2020 - 10:59 am
गाभा: 

"बघा या आंदोलनामाचेगे कोण आहे आणि किती त्यामागे आयोजन आहे वैगरे" सांगणारी व्हॉट आप विद्यालयावरील एक अजून भिंतीला तुंबड्या लावणारी "पोस्ट"\म्हणून आलेल्या पोस्ट कडे सुरवातीला दुर्लक्ष केले... भाजपचं "आय टी सेल" मधून आलेली म्हणून अशी पोस्ट वाटली असे धरू .. परंतु खालील अनुभववरुन यात खरंच काही तरी "काळे बेरे" आहे असे मात्र आता वाटत आहे.
"कोणत्याही आंदोलनापथी काही तरी मूळ कारण असते/ दुख्ख असते " आणि ते तसेच या आंदोलनामागे खरंच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे धरले तरी यातून एक वेगळाच धोका आहे आणि हे मूळ आंदोलन "कोणीतरी " अपहृत केले आहे काय याबद्दल आता शंका नक्कीच येत आहे ...
खालील आरोप खरंच दुर्लक्ष करण्यासारखेच आहेत का ?
आंदोलनावर केला गेलेला एक गंभीर आरोप म्हणजे यामागे कोण आहे?
- दावे तर असणार : त्यात काही आश्चर्या वाटण्यासारखेच नाही आणि वावगं नाही, त्यांचे तत्वात कोणतेहि बाजाराचे खुलीकरने निषिद्ध आहे मग ते यात सहभागी असले तर नवल ते काय .
- भारताचं सीमेपलिकडले देश?
हा मात्र आरोप मला आता खरा वाटू लागलं आहे
शत्रू चा शत्रू तो मित्र या न्यायाने पाकिस्तान ( सेना आणि धार्मिक पाकिस्तानी दोन्ही ) भारताविरुद्ध ( म्हणजे ८०% हिंदू असलेल्या देशाविरुद्ध) खलिस्तानवाद्यांसारख्याना पाठिंबा देता असणार हा आरोप काही नवीन नाही .. याची रूपे खास करून कानडा आणि युनाइटेड किंग्डम मधील शीख खलिस्तानवादी कसे आहेत हे हि नवीन नाही परंतु यावेळी मात्र हे एक "हिंदू आणि शिखांच्यात " फूट पाडण्याचे कारस्थान आहे हे खरे वाटू लागलाय कारण कि कानडा आणियुके पासून दूर असलेल्या ऑस्ट्रेलिया सारखया छोटी देशात सुद्धा जे काही "आंदोलन" समर्थक आहेत त्याला एक प्रकारचे "शीख विरुद्ध हिंदू किंवा बाकी भारतीय " असे रूप दिसत आहे..
- बहुतेक आंदोलक शीख का? केरळ, बंगाली, मराठी आणि तामिळ लोक इथे आहेत कि? ते का नाही सहभागी ?
- खालसा एड सारख्या संस्थांचा सहभाग ( पहा हा विडिओ हर्षल स्वकुळ या मूळ भारतीय पत्रकार जी आता मेलबर्न येथे राहते आहे तो विडिओ https://www.youtube.com/watch?v=-t7TbWn7V7M )
- पाठिंबा आंदोलन कि फक्त मोदी आणि भाजप हटाव हि मुख्य भूमिका

कोणत्याही हिंदूला असावा तास मलाही शिखांबद्दल आदर आहे आणि तो राहीलच पण हे जे " भारत विरोधी / हिंदू विरोधी" चालू आहे ते बघून वाईट वाटते ...
समस्त भाजपविरुद्ध मिपाकरांना एक आवाहन भाजपला धोरणांवर विरोध जरूर करा पण हे जे काही घडतंय त्याकडे कानाडोळा करू नका ...

प्रतिक्रिया

एखादे जनावर मरायला टेकले तर सर्व छोटी श्वापदे आशेने लाळ गाळत गोळा होतात त्याचा प्रकारे काहीही छोटे मोठे बदल केले कि हि मंडळी आपल्या बिळांतून बाहेर येतात. हजारो वेळा आमरण उपोषण करणारे अण्णा हजारे सुद्धा इथे उडी मारणार आहेत असे मी आधीच इतर ठिकाणी लिहिले होते. आता म्हणे हे शेवटचे आमरण उपोषण असणार आहे म्हणे कारण ह्याच्या नंतर पुन्हा आमरण उपोषण ह्यांच्या आरोग्यास म्हणे मानवणार नाही. आधीच वय झाले आहे, ह्या आमरण उपोषणाच्या नादात जीव बीव जायचा !

दिल्लीत होणारे आंदोलन खरे तर शेतकरी आंदोलन नाहीच मुळी, निकृष्ट दर्जाचा माल अतिशय आळशी पणाने आणि इतर करदात्यांच्या पैश्यावर निर्माण करणाऱ्या आणि पाच पैसेही कर न देता तो माल सरकारच्या PDS सिस्टम मध्ये गल्लेलठ्ठ रेटवर विकणाऱ्या उन्मत्त गुंडांचा आहे. मुळांत MSP हे प्रकरण अतिशय मूर्खपणाचे आहे.

ह्यांत खलिस्तानी, पाकिस्तानी मंडळींचा १००% हात असेल. आता एकदा इथे हाणामारी वगैरे झाली कि ती न्यूस वापरून अनेक सरदार मंडळी मेक्सिको मधून अमेरिकेत प्रवेश करेल आणि निर्वासित म्हणून आश्रय मागेल.

मग अश्या प्रकारच्या कथा पुरावा म्हणून पेश केला जातो : https://www.theguardian.com/world/2020/feb/03/india-migrants-mexico-us-b...

ह्यांतील अनेक आश्रित शेवटी वेठबिगार म्हणून अमेरिकेत राबवले जातात : https://www.nbcbayarea.com/news/local/gilroy-liquor-store-owners-charged...

बाप्पू's picture

28 Dec 2020 - 1:00 pm | बाप्पू

राजेश 188 आणि प्राध्यापक डॉक्टर दिलीप बरुटे यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. !!!

रात्रीचे चांदणे's picture

28 Dec 2020 - 1:59 pm | रात्रीचे चांदणे

माझ्या माहितीतल्या सामान्य शेतकऱ्यांचा ह्या आंदोलनाला पाठिंबा दिसत नाही.
>>>>दिल्लीत होणारे आंदोलन खरे तर शेतकरी आंदोलन नाहीच मुळी, निकृष्ट दर्जाचा माल अतिशय आळशी पणाने आणि इतर करदात्यांच्या पैश्यावर निर्माण करणाऱ्या आणि पाच पैसेही कर न देता तो माल सरकारच्या PDS सिस्टम मध्ये गल्लेलठ्ठ रेटवर विकणाऱ्या उन्मत्त गुंडांचा आहे. मुळांत MSP हे प्रकरण अतिशय मूर्खपणाचे आहे.>>>>>>> पण ह्या असल्या कॉमेंट्स टाळता आल्या पाहिजे. आळशी शेतकऱ्यांना कर माफी मिळत असेल तर तुम्ही स्वतः आंदोलन करून अशी कर माफी बंद पाडा. प्रत्येक उद्योगधंद्याला काही प्रमाणात सवलती मिळतच असतात, तरी पण पोट दुखत असेल तर योग्य ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. आपण हे थोड्यावेळ समजू की हे आंदोलनाला पाकिस्तान, चीन, खालीस्थानी चा पाठिंबा आहे तर मग केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाही का नाही करत? उलट त्यांना चर्चेला बरोबर जेवणाचे आमंत्रण का देत आहे? ते पन कर दात्यांच्या पैशातून, म्हणजे आपल्या देशाचे शत्रू आपल्या राजधानी मध्ये आंदोलन घडवून आणून काही रस्ते बंद करतोय आणि केंद्र सरकार त्यांना जेवणाचे आमंत्रण देतेय एवढंच नाही तर त्यांच्या काही मागण्या पण मान्य करतय. पण आपले प्रामाणिक कर दाते मात्र पाकीस्तान, चीन आणि खलिस्तान वाद्यांनाच शहाणपणा शिकवत आहेत.

> आळशी शेतकऱ्यांना कर माफी मिळत असेल तर तुम्ही स्वतः आंदोलन करून अशी कर माफी बंद पाडा. प्रत्येक उद्योगधंद्याला काही प्रमाणात सवलती मिळतच असतात, तरी पण पोट दुखत असेल तर योग्य ठिकाणी आवाज उठवला पाहिजे.

जे कायदे सध्या सरकारने रद्द केले आहेत त्यामुळे हे होणारच आहे. त्यामुळे मला आंदोलन वगैरे करायची गरजच नाही.

थोड्याफार सवलती आणि शेतकऱ्यांना मिळणारी खिरापत ह्यांत प्रचंड फरक आहे. त्याशिवाय माहुतेक धंद्यांना मिळणारी सवलत हि काहीतरी उच्च दर्जाचा माल निर्माण करण्यासाठी असते. पंजाबातील शेतकऱ्यांना मिळणारी खिरापत किंवा MSP हे प्रकरण निकृष्ट दर्जाचा शेतमाल निर्माण करण्यासाठी आहे. फुकट वीज, फुकट पाणी आणि वरून MSP हि निव्वळ चोरी आहे. अश्या चोरांच्या गर्दीत देशविघातक संघटना घुसल्या नाही तरच आश्चर्य.

टीप: मी खलिस्तान चे १००% समर्थन करते. पाकिस्तानी पंजाबचे खलिस्तान निर्माण झाले पाहिजे. कॅनडा स्थित शीख बांधवानी अशी मागणी करावी आणि भारत सरकारने त्यांचे समर्थन करावे हि मागणी.

1) देश covid19 च्या छायेत असताना,उभा देश लॉक डाऊन मध्ये असताना शेती सारख्या महत्वाच्या क्षेत्र विषयी कायदे पास करून लगेच त्याची अमलबजावणसाठी प्रयत्न करायची सरकार ल कोणती घाई झाली होती.
2) तीन शेती विषयक कायदे आहेत
साठवणूक करण्यास परवानगी..
देशभर वितरण करण्यास परवानगी .
कॉर्पोरेट क्षेत्राला शेती मध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी,शेती करण्यास परवानगी.( कॉन्ट्रॅक्ट शेती मध्ये हे सर्व येते)
आणि उत्पादन किमती वर आधारित भाव शेतकऱ्यांना msp म्हणून देण्याची कोणतीच तरतूद कायद्यात न करणे.
ह्या तिन्ही एकत्रित कायद्याचा परिणाम असा होईल.
शेती कॉन्ट्रॅक्ट farming च्या आडून कॉर्पोरेट क्षेत्र करेल.
निघालेल उत्पादन हवं तेवढे दिवस आणि हवं तेवढा साठा केला जाईल.
आणि कृत्रिम तुटवडा निर्माण करून देशभर योग्य वेळी विक्री केली जाईल.
असे सर्व आक्षेप आहेत.
कॉन्ट्रॅक्ट farming साठी काय नियम आणि अटी आहेत ह्या विषयी सरकार नी काहीच सांगितले नाही.
लोकांचा आक्षेप आहे ,लोकांना भीती वाटतं आहे.
आंदोलन करणारे कथित खलिस्तानी,आहेत तर.
सरकार नी कायद्या ना स्थगिती देवून लोकसभेत ,राज्य सभेत परत ह्या विषयावर चर्चा केली पाहिजे होती.
आक्षेप नोंदवण्यास लोकांना सांगितले पाहिजे होते.
त्यांना आपली बाजू मांडण्याची रीतसर संधी दिली पाहिजे होती.
आणि लोकांना वाटणारी भीती दूर केली पाहिजे होती.
पण हे सर्व न करता हिवाळी अधिवेशन च रद्द केले.
खलिस्तानी आंदोलक म्हणून it cell शेतकऱ्यांना बदनाम करायला लागली.
ह्याचा सरळ अर्थ आहे सरकार ची नियत ठीक नाही.

शा वि कु's picture

28 Dec 2020 - 2:32 pm | शा वि कु

लोकांना वाटणारी भीती दूर केली पाहिजे होती.
पण हे सर्व न करता हिवाळी अधिवेशन च रद्द केले.
खलिस्तानी आंदोलक म्हणून it cell शेतकऱ्यांना बदनाम करायला लागली.

सहमत. हे नेहमीचेच आहे.

साहना's picture

29 Dec 2020 - 1:23 am | साहना

> शेती कॉन्ट्रॅक्ट farming च्या आडून कॉर्पोरेट क्षेत्र करेल.
निघालेल उत्पादन हवं तेवढे दिवस आणि हवं तेवढा साठा केला जाईल.

- मंडी मधील सरकारी दलाल हे (म्हणजे साठेबाजी) आधीपासूनच करत आहेत आणि हीच मंडळी इथे आंदोलक म्हणून दिसत आहे. ह्यांच्या पार्शवभागावर लत्ताप्रहार झाला आहे ह्याचा आनंदच आहे.

- भारतांत जिथे जिथे कॉर्पोरेट क्षेत्राने विस्तार केला आहे तिथे तिथे सरकारी बाबूपेक्षा कित्येक पटीने जास्त चांगली सुविधा कमी दरांत मिळत आहे. अगदी बिग बाजार मधील साखर पासून ते स्कोडाची ऑक्टेव्हिया पर्यंत सगळी कडे मुक्त बाजार व्यवस्थेने देशाचे भले झाले आहे. फक्त शेतकऱ्यांना ह्या पासून वचिंत ठेवणे हे नेहमीच "feudal" प्रकार आहे.

- भाजपचे IT सेल मूर्खांनी भरलेले आहेत. ह्यांना अक्कल असती तर खूप प्रभावी पणे त्यांनी कायद्याची माहिती जाणते पर्यंत नेली असती.

धनावडे's picture

3 Jan 2021 - 3:37 pm | धनावडे

साहेब आमच्या इथले शेतकरी बिगबास्केट ला स्ट्रॉंबेरी थेट विकून वाशी APMC पेक्षा जास्तच भाव मिळवत आहेत, अट फक्त एकच दर्जा, आणि खराब दर्जा मुळे माल परत पाठवला तरी एकाही शेतकऱ्यांची तक्रार नसते. शेतकऱ्यांना कळत आपल हित, कॉन्टॅक्ट शेतीत काही वाईट नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Dec 2020 - 8:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"कोणत्याही हिंदूला असावा तास मलाही शिखांबद्दल आदर आहे आणि तो राहीलच पण हे जे " भारत विरोधी / हिंदू विरोधी" चालू आहे ते बघून वाईट वाटते "
का बुवा असा विशेष आदर ? जमीनी विकुन कॅनडा/लंडनला/अमेरिकेला जाउन स्थायिक होतात म्हणून्? असो.
शीख लोक परदेशात जाउन सेटल झाले की त्यांच्या खलिस्तानी भावना उफाळून येतात हा अनुभव आहे. आपण ईतर भारतियांपेक्षा कसे वेगळे आहोत हे गोर्या माणसाना दाखवुन देण्यात अनेक समाज पुढे असतात त्यात शीख समाज आहे.

माईसाहेब : मी भारतातील शिखांबद्दलच्या आदर बद्दल बोलत होतो ..त्यांचा इतिहास आणि भारतासाठी त्यांनी त्यांच्या संख्येच्या मानाने दिलेले बलिदान... आता पुढे परदेशात गेल्यावर ते कसे वागतात ( त्यातील काही) या बद्दलचे आपले विधान बरोबर आहे पण माझा एकूण शिखांबद्दल आदर असण्याचा आणि त्याचा काय संबंध? शीख / जैन / बुद्ध हे हिंदूंना त्यामानाने जवळचे हे सर्वश्रुत नाही का?
एकवेळ हिंदू आणि मूलमानात सलोखा नाही झाला तर त्याचे फार काही आस्चर्य आणि दुःख हि वाटणार नाही परंतु शिखांच्यात आणि हिंदूत हे नाही व्हायला पाहिजे असे वाटते .. त्यात गैर ते काय ? मागे आठवतंय शिवाजी मैदान मुंबई येथे काहीतरी संघाचा किंवा सेनेचा मेळावा होता त्यात एक छायाचित्र प्रदर्शन होते त्यात गुरु गोविंद साहेबांचा आणि गौतम बुद्धांचे पण छायाचित्र जरूर लावले होते ....त्यामागची भावना जी असले तीच भावना मी मांडतोय ...असो
राजेश:
"खलिस्तानी आंदोलक म्हणून it cell शेतकऱ्यांना बदनाम करायला लागली"
महाराज .. आपण नुसते आरोप ना करता या खालील मुद्य्यांची मुद्देसूद उत्तरे द्याल तर बरे होईल माझा मूळ धागा या कायद्याबद्दल नवह्ताच तर तो होता यातून निर्माण होणाऱ्या हिंदू शीख तेढी बद्दल ... असो ते आपल्या लक्षात आले नसावे
- prashna शेतकऱ्यांचा आहे तर मग देशातील इतर राज्यातील शेतकरी आणि त्यांचे भारताबाहेरील मित्र natewaik तेवढ्याच हिरीरीने रस्त्यावर का नाहीत ( खास करून आज मेलबर्न सारखया ठिकाणी अनेक पंजाबी ( बिगर शीख) आणि इतर राज्यातील लोक भरपूर असताना ?
- जगभरच्या या "समर्थन" मोर्चात पाट्या पंजाबीत का?
- फलकांवर शीख धर्माचे चिन्ह का?
- ८४ च्या शीख दंगलींचा उल्लेख का? ( swakul yancha video jara barkaine bagha )
- निळे पगडी घातलेलं "धार्मिक शीख" यात का ? निहाल आर्मी कि काय ते
- लंडन , नेऊ योरॉक सारखी शहरे जाऊदेत हो आणि अगदी मेलबर्न / सिडनी सारखाई प्रसिद्ध शहरे हि जाऊदेत .. जगाचं कपाऱ्यातील ऑस्ट्रेलियातील छोट्या गावातून सुद्धा इलेकट्रोनिक बोर्ड वॉर "इंडियन फार्मर्स//// वैग्रे पाट्या आणि त्यात इंग्रजी बरोबर पंजाबी madhye का lihile आहे
कोणिका असेना पण कोणीतरी जगभरचया शिखांना हे जणू आपले धर्मयुद्ध आहे असे भासवत आहे आणि हिंदू आणि शिखाच्यात फूट पडणे हा हि या मागचं हेतू आहे हे जर दिसत नसेल तर धन्य आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Dec 2020 - 9:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शीख लोक परदेशात जाउन सेटल झाले की त्यांच्या खलिस्तानी भावना उफाळून येतात हा अनुभव आहे.

भारतीय लोक परदेशात म्हणजे ऑष्ट्रोलिया वगैरे देशात जाऊन सेटल झाले की सध्याच्या सरकारबद्दल लिहिण्याच्या डू आयडींच्या भावना उफाळून येतात असे गडबडीत वाचले.

बाकी, चालू द्या....!

-दिलीप बिरुटे

प्राध्यापक महाशय आपण मूळ प्रश्नाबद्दल बोललात तर बरे होईल प्रत्येक जण भाजपचं आयटी सेल मधला आहे किंवा भारताबाहेर स्थायिक झालं म्हणजे तो आंधळं संघी असला पाहिजे वैग्रे नेहमीच पालुपद बास झालं
- एकतर या कायद्यात धोका कसा आहे ते मुद्देसूद पणे मांडा नाही तर मी जो मूळ विषय मांडलाय त्यातील मुद्यांवर बोला ( शेतकरी कि हिंदू शीख तणाव )
उद्या जर खरंच शिखांच्यात हिंदू विरोधी भावना तीव्र झाली तर ते हे बघणार नाहीत कि तुम्ही निधर्मी सर्वधर्मभावी लिबरल भारतीय आहेत कि पहाटे संघाचं शाखेवर जातंय.. त्यांचं साठी तुम्हीही काफीरच ठराल ( काफिर हा हा शब्द आपल्या इतर प्रेमळ धर्माचं अनुयायांकडून उसना घेतला आहे )

निदान गेला बाजार ( नो पन इंटेंडेड ) कृषी उत्पन्न बाजार समिती कशी काम करते , हमी भाव , त्यातील चांगले आणि वाईट असा एखादा संशोधन पर निबंध तरी लिहा हो
परदेशात गेल्यावर "कोणत्या भावना उफाळून येतात" ते आमचं आम्ही बघू

ह्याची 1 सविस्तर लिस्ट ध्या.
१) bjp सरकार ल विरोध करणे हे देश विरोधी हिंदू विरोधी कृती आहे का?
2) सर्व धर्माचा सन्मान राखून त्यांना संरक्षण देणे हे देश विरोधी ,हिंदू विरोधी कृती आहे का?
3) एकच धर्माला सरसकट देश विरोधी ,हिंदू विरोधी ठरवणे हे देशप्रेम आहे का?
4) भाषिक स्वयत्ता मागणे हे देश विरोधी कृती आहे का?
५) विविध भाषा देशात बोलल्या जात आहेत,देशात विविध संस्कृती आहेत त्यांनी स्वतःची भाषा सोडून स्वतःची संस्कृती सोडून, वैदिक संस्कृती पाळावी हे देशप्रेम आहे का? आणि हिंदी ची गुलामी करावी हे देश प्रेम आहे का?
हेच जर देशप्रेम असेल तर नको तो देश आणि नको त्या देशावर प्रेम अशी भावना लोकांत नक्कीच निर्माण होईल.

ह्याची 1 सविस्तर लिस्ट ध्या.
१) bjp सरकार ल विरोध करणे हे देश विरोधी हिंदू विरोधी कृती आहे का?

हिंसा करणे, संपत्तीची नासधूस करणे आणि आंदोलनाच्या आड चोरी करणे हे राष्ट्र विरोधी कृत्य आहे. त्याशिवाय आंदोलक मंडळी ह्या वादांत विनाकारण आपला धर्म घुसवत आहेत, सरकार किंवा भाजप पाठिराख्यांनी इथे धर्म आणला नाही. आंदोलक मंडळींनी आपल्या धर्माचा बाऊ केला आहे.

2) सर्व धर्माचा सन्मान राखून त्यांना संरक्षण देणे हे देश विरोधी ,हिंदू विरोधी कृती आहे का?

ह्याचा अर्थ काय ? संपत्तीची नासधूस करणार्यांना धर्म मग कोणताही असो सामान्य चोरांप्रमाणे वाचविले पाहिजे.

3) एकच धर्माला सरसकट देश विरोधी ,हिंदू विरोधी ठरवणे हे देशप्रेम आहे का?

हा कुठला धर्म आहे आणि असे कुणी ठरवले ? स्पष्ट करून सांगाल काय ?

4) भाषिक स्वयत्ता मागणे हे देश विरोधी कृती आहे का?

धर्म आणि साम्यवाद कमी होता काय म्हणून भाषा सुद्धा ह्या वादांत घुसवली जातेय ?

५) विविध भाषा देशात बोलल्या जात आहेत,देशात विविध संस्कृती आहेत त्यांनी स्वतःची भाषा सोडून स्वतःची संस्कृती सोडून, वैदिक संस्कृती पाळावी हे देशप्रेम आहे का? आणि हिंदी ची गुलामी करावी हे देश प्रेम आहे का?

इथे गुंड मधील लंबू आटा चा डायलॉग आठवतो : "खिसकेली है क्या ? "

> हेच जर देशप्रेम असेल तर नको तो देश आणि नको त्या देशावर प्रेम अशी भावना लोकांत नक्कीच निर्माण होईल.

आपली खरी गरळ इथे दिसून येते आहे. तुमच्या सारख्याना शेतकरी काय किंवा सामान्य माणूस काय ह्यांचे काहीही पडून गेलेले नाही. "देश " हि जी तुमची संकल्पना आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रचंड द्वेष आहे आणि वाट्टेल त्या विषयांची सरमिसळ करून देशांत गोंधळ घालणे आणि आग लावणे हा निर्लज्ज उद्योग आपला आहे. काही तरी शुल्लक कायद्याचा बाऊ करून जणू काही देशांत भुकमारी येणार आहे, सर्व पैसे अंबानी (ज्यांनी अजून शेती व्यवसायांत पाय सुद्धा ठेवला नाही) नेणार अश्या अफवा पसरवणे. दलालांच्या आंदोलनाला उगाच "शीख आंदोलन" म्हणून भासवणे, त्यांत मग भाषा धर्म आणि वेदिक संस्कृती इत्यादी घुसावणे हे फक्त रिकामटेकडे साम्यवादी लोक किंवा विदेशी शक्तींच्या तुकड्यावर शेपटी हलवणारे नालायक लोकच करू शकतात. इतर कुणाला इथे जास्त वेळ आहे ?

देश म्हणजे सरकार नव्हे आणि सरकार विरुद्ध कितीही भांडण उकरून काढणे हे देशप्रेमच आहे पण त्यासाठी सामान्य देशवासियांना वेठीस धरणे, APMC दलालांना हिरो करणे, खाज़गी संपत्तीची नासधूस करणे, देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या कॉर्पोरेट जगताला नुकसान पोचवणे म्हणजे आपल्या घराला आग लावण्यासारखे आहे. देशद्रोह आहे कि ठाऊक नाही पण मूर्खपणा जरूर आहे.

दुसऱ्या देशांत राहणाऱ्या माझ्या सारख्या व्यक्तींना ह्यामुळे विशेष फरक पडत नाही पण भारत देशांत कर्मभूमी असणाऱ्या लोकांनी इथे सतर्क राहणे आवश्यक आहे.

चौकस२१२'s picture

29 Dec 2020 - 5:50 am | चौकस२१२

साहना बरोबर सहमत अगदि मुद्यचे बोल्ने आहे

चौकस२१२'s picture

29 Dec 2020 - 6:13 am | चौकस२१२

१) bjp सरकार ल विरोध करणे हे देश विरोधी हिंदू विरोधी कृती आहे का?
- नाही परंतु २ वेळा ठणकावून लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकार वर प्रत्येकवेळी " हुमशाही " चे आरोप करणे हे मात्र देहविरोधी आणि देशाच्या लोकशाही विरोधी कृत्य आहे
2) सर्व धर्माचा सन्मान राखून त्यांना संरक्षण देणे हे देश विरोधी ,हिंदू विरोधी कृती आहे का?
"सर्व धर्माचा सन्मान राखून त्यांना संरक्षण देणे" हेच तर हिंदूंनी केलाय आणि त्याला "सहिष्णुता " असे म्हणतात ...एखाद्या पारश्याला विचारा राजेशभाऊ
3) एकच धर्माला सरसकट देश विरोधी ,हिंदू विरोधी ठरवणे हे देशप्रेम आहे का?
कोणत्या धर्माला ठरवल हो? सागा ना स्पष्ट ? अहो हिंदूंना पण हिंदुराष्ट्र्र नकोय पण हिंदूंचा अपमान ( काँग्रेस ने केलेले) हा थाबवा हेच म्हणणे आहे , भाजपावाले आता मुसलमानच नरसार होणार वैगरे कोणी उठवलं होता ? झाला ?
4) भाषिक स्वयत्ता मागणे हे देश विरोधी कृती आहे का?
नाही ...भाषवर प्रांतरचं तर आहेच कि... कोण म्हणतंय कि हे देश विरोधी आहे म्हणून ?पण भाषा स्वायत्त आणि मग त्यात धर्म आणणे ( गोव्यातील पूर्वी कोकणी मराठी वाद आठवा.) हे मात्र चुकीचे आणि देशविरोधी होऊ शकते
५) विविध भाषा देशात बोलल्या जात आहेत,देशात विविध संस्कृती आहेत त्यांनी स्वतःची भाषा सोडून स्वतःची संस्कृती सोडून, वैदिक संस्कृती पाळावी हे देशप्रेम आहे का? आणि हिंदी ची गुलामी करावी हे देश प्रेम आहे का?
देशाची ८०% जनता हिंदू आहे आणि त्याचा परिणाम अगदी सार्वजनिक चालीरीतींतून दिसणार आणि किती हि निधर्मी सरकार म्हणले तरी निदान संस्कृती या नावाखाली तरी अगदी सरकारी कार्यक्रमातून सुद्धा .. पचत नसेल तरी पचवा ... अमेरिकेचे अध्यक्ष आणि ऑस्ट्रेलिया चा पंतप्रधान जर निधर्मी देशात ख्रिसमस चा सॅन अधिरूत रित्या साजरा करतात तर भरतोय पंतप्रधानाने हिंदू संस्कृती जपली तर काय अधिकार आहे प्रश्न विचारायचा?
विठ्ठलीचॆ पूजा मुख्यमंत्री करतो / ते हे काँग्रेसी काळात का नाही हो खुपलं तेव्हा अशी पूजा हे धार्मिक कृत्य आहे याचाच साक्षत्कार भाजप सत्तेवर अळ्यावरचा लक्षात आलं का?
हिंदीची गुलामी? कशी काय? गेला बाजार मोदी आणि शाहूची मातृभाषा तर गुजराथी होती !
हेच जर देशप्रेम असेल तर नको तो देश आणि नको त्या देशावर प्रेम अशी भावना लोकांत नक्कीच निर्माण होईल.
बरे झालेत स्पष्ट केलेत ते .. आता तुम्हाला अर्बन नक्षल म्हणून म्हणाल्या सगळे मोकळे ... घाला धुडघूस

चौथा कोनाडा's picture

28 Dec 2020 - 10:48 pm | चौथा कोनाडा

माझ्या वाचण्यात आणि पाहण्यात जे आले आहे त्यावरून हात तथ्य वाटते.

शा वि कु's picture

29 Dec 2020 - 10:35 am | शा वि कु

"They are the last communists, they believe class is a total explanation."

संपूर्ण शीख लोकसंख्येचा आदर करणारे किंवा परदेशातील सगळी शीख मंडळी विशिष्ठ प्रकारे वागतात असं वाटणारे लोकं पक्के कम्युनिस्ट दिसतात :)

चौकस२१२'s picture

29 Dec 2020 - 12:11 pm | चौकस२१२

''सं वाटणारे लोकं पक्के कम्युनिस्ट दिसतात...."
या पावली चे नक्की म्हणणे काय आहे?

- सर्व शीखखांबद्दल सर्वसकट आदर असा आंधळेपणा मी करतोय असे अजिबात नाही .. लहानपणापासून जे संस्कार झाले त्यात एक सर्वसामान्य हिंदू म्हणून विस्तरित हिंदू समाजबद्दल कुतूहल आणि आदर आहे हे फक्त मांडले ... किंवा परदेशातील सगळी शीख मंडळी विशिष्ठ प्रकारे वागतात असा सरसकट पणा मी करीत नाहीये येथ बरेच भारत निष्ठ शीख पण आहेत परंतु त्याच बरोबर - येथील समर्थन मोर्चायतून जे दिसतंय / फलकातून जे दिसतंय त्यामुळे मी माझे विचार मांडले
अजून एक उद्धरण देतो , येथेतरी काही वर्षात आलेला अनुभव
- दुकानात भारतीय म्हणून एखाद्या शिखांशी विचारले कि तुम्ही कुठले तर उत्तर मूळ भारतातील असे ना येत आजकाल बरेचदा " पंजाबी शीख" असे येते आणि बरेचदा गाडीवर शीख धर्माचे चिन्ह आवर्जून असते.. त्यामानाने येथील हिंदू आपलं धर्म सगळीकडे दर्शवत हिंडताना तसे कमी दिसतात .. प्रत्येक हिंदूंचं गाडीवर ओम नसेल पण प्रत्येक शिखांच्या गाडीवर शीख शुभचिन्ह जरूर दिसते ... त्यात ताई पहिले तर वावगे काही नाही म्हणा ..पण मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते कि हे सगळे कुठंतरी कसे तरी करून शीख कसे वेगळे आणि हिंदू आणि त्याच्यात कसा वेगळे पणा दाखवयाचा निर्धार करून केलेले प्रयतत्न दिसतोय आणि या आंदोलनाचं माध्यमातून तो सरळ सरळ उघडपणे बाहेर आला आहे अर्थात हे मी प्रदेशातील परिस्थिती बद्दल बोलतोय...भारतात हे जाणवत नसेल कदाचित

कानडाऊ योगेशु's picture

29 Dec 2020 - 11:46 am | कानडाऊ योगेशु

ह्या मोर्चामुळे काँग्रेसला ८४ च्या दंगलीमुळे झालेली शीख विरोधी प्रतिमा सुधारण्याची संधी मिळाली आहे आणि काँग्रेस तिचा पुरेपुर वापर करतेय.प्रतिमा जरी सुधारली गेली नाही तरी बीजेपी ला पण शीखविरोधी दाखवले कि दोन्ही पक्ष ह्याबाबतीत तरी समान पातळीवर येतील.

अमृतसर पंजाब,हरियाणा मध्ये वाटले गेले आणि वेगळे पणाची बीजे रोवली गेली.
त्यांच्या हक्काचं शहर पण पंजाब ला मिळाले नाही.
अजुन पण कारणे आहेत.
एकाध्य समाज घटकांवर ठरवून अन्याय करायचा आणि तरी त्यांनी विरोध करायचा नाही अशी आशा ठेवायची ही हुकूम शाही वृती झाली.
हुकूम शाही वृत्ती सरकार च असेल तर विरोध पण सशस्त्र च होणार.
शेतकऱ्या ना कायदे अडचणी चे वाटत आहेत तर त्या वर चर्चा न करता त्यांचे म्हणणे ऐकून न घेता ते कायदे लादणे ही हुकूम शाही वृत्ती च आहे.
आणि तरी शेतकऱ्या नी विरोध करायचा नाही ही काही च्या काही अपेक्षा आहे.

> हुकूम शाही वृत्ती सरकार च असेल तर विरोध पण सशस्त्र च होणार.

खरा रंग इथे दिसून येतोय. आपण आता हिंसेचे समर्थन करत आहात. साष्टांग दंडवत.

एकुलता एक डॉन's picture

31 Dec 2020 - 5:32 am | एकुलता एक डॉन

आपण मागे एका धाग्यावर illegal बांधकामाचे समर्थन करत होता ,आपणास पण दंडवत

एकुलता एक डॉन's picture

31 Dec 2020 - 5:32 am | एकुलता एक डॉन

आपण मागे एका धाग्यावर illegal बांधकामाचे समर्थन करत होता ,आपणास पण दंडवत

रंगीला रतन's picture

29 Dec 2020 - 1:22 pm | रंगीला रतन

अमृतसर पंजाब,हरियाणा मध्ये वाटले गेले आणि वेगळे पणाची बीजे रोवली गेली.

ठोका तेज्जाला कायपण. भारताचा नकाशा तरी बघितलाय का तुम्ही कधी?किती फेकाफेकी कराल?चुकीची माहिती रेटून सांगायला तुम्ही पण शिक्षक आहात का?

मला चंदीगड लिहायचे होते.
अमृतसर चा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केल्या बद्द्ल क्षमस्व.

पंजाबातील ड्रग माफिया या सोकॉल्ड आंदोलनामागे आहेत. त्यांच्या फंडिंगच्या जीवावर शेतकरी आंदोलनाचा तमाशा चालू आहे. एका बाजूला असलेली पाकिस्तानची सीमा ज्यामार्गे अफगाणिस्तानातून ड्रग्स आयात केली जातात. ते ड्रग्स, हिमाचल प्रदेश, हरयाणा, राजस्थान आणि पूर्वीच्या जम्मू काश्मीर अशा पंजाबच्या सीमावर्ती राज्यांमधून भारतभर पुरवले जातात. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यापासून आणि सुशांत सिंग राजपुतच्या प्रकरणा नंतर ncb जास्तीच सक्रीय झाल्यावर या अवैध धंद्यावर गंडांतर आले. ड्रग माफियांमध्ये चलबिचल त्यावेळेपासून सुरु होती तिला या नव्या शेतकरी विधेयाकांचे निमित्त मिळाले. ISI, ब्रिटन आणि जगभरचे खलिस्तान समर्थक, कॅनडातील पंजाबी ड्रग माफिया व या अवैध धंद्यातून मलिदा मिळणारे भारतातील अनेक भ्रष्ट राजकारणी अशी अभद्र युती तयार झाली जी या सगळ्या प्रकरणामागे आहे. त्यांच्या सुरात सूर मिसळायला सद्य सरकारचे कट्टर विरोधक हिरीरीने पुढे आले. सरकारने अशा लोकांच्या दबावाला बळी पडू नये आणि बहुसंख्य शेतकऱ्यांच्या हितासाठी सदर विधेयाकांची अंमलबजावणी करावी.

(डाव्या विचारांचा नसलेला) प्रोफेसर.

Rajesh188's picture

29 Dec 2020 - 7:57 pm | Rajesh188

केंद्रात बहु मतातातील सरकार आहे.
5 वर्ष ते कोणाच्याच दबावाला बळी पडणार नाही.
पण 5 वर्ष नंतर सरकार चाच बळी दिला जाईल आणि दुसरे सरकार येईल

सुबोध खरे's picture

30 Dec 2020 - 9:33 am | सुबोध खरे

5 वर्ष नंतर सरकार चाच बळी दिला जाईल

आणि येणार कोण?

राहुल गांधी कि केजरीवाल कि ममता दीदी?

आमच्या लहानपणी लहान मुलांना दुर्री ते छक्की दिली जात असे आणि मोठे लोक एक्का ते अठ्ठी घेऊन खेळत असत.

त्यामुळे मुलांनी कितीही पिसले तरी एक्का येतच नसे.

अशीच स्थिती विरोधी पक्षांची आहे.

मराठीत याला एक ना धड भराभर चिंध्या म्हणतात.

बाकी ५ खासदार निवडून आणलेल्या पक्षाचे सर्वेसर्वा २२ खासदार निवडून आणलेल्या ममता दीदींना भाजपशी दोन हात कसे करायचे याचा सल्ला देतात हे पाहून करमणूक झाली.

आणि ते पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत आहेत

तसं आता वातावरण छान आहेच.

गाजरं खाऊन घ्या

५ वर्षानंतर सुद्धा मोदींचेच सरकार येण्याची दाट शक्यता आहे. (मी मोदी समर्थक नाही आहे असे नमूद करू इच्छिते).

पण सरकार कोणाचेही येवो, मुक्त बाजारव्यवस्थेची गोड फळे एकदा जनता चाखू लागली कि मग उलट साम्यवादी दळीद्रयाच्या दिशेने कोणताही गाढव जात नाही. एकदा का खाजगी बाजारपेठा जागो जागी उघडल्या कीं नंतर कुठलेही सरकार त्यांचे वाकडे करू शकणार नाही. ह्याची जाणीव ह्या दळभद्री दलाल मंडळींना सुद्धा आहे म्हणून ह्यांनी आता हिंसक स्वरूप घेतले आहे. हे सुद्धा हळू हळू थंड पडेल आणि पंजाबी शेतकरी सुद्धा खुल्या बाजारपेठांचा फायदा घेणाय अग्रेसर होईल. उपाशी पडतील ते दलाल लोक आणि त्यांच्या पैश्यावर लेख लिहिणारे विचार-जंत.

चौकस२१२'s picture

30 Dec 2020 - 6:12 am | चौकस२१२

राजेश ...."....दुसरे सरकार येईल"
येईल सुद्धा.. लोकशाही आहे ... आणि तो पर्यंत तरी सकारत्मक विरोध करा ...
ते असो... हा धागा काढला होता फक्त शेतकरी आंदोलनाचे धर्मयुद्ध.." या उपविषयवर.. आपला नेहमीच "या सरकारचे काय चुकले हे पालुपद"
निरीक्षण केलेल्या धाग्यातील मुद्यवर बोला ! किंवा शेती माल विपणन यवरेक सखोल अभ्यासात्मक धागा काढा.. आम्हाला हि केलेले कि "देशभरातील" शेतकरी ज्यवर पेटून उठलाय ते काय ते ? ... त्या आंदोलका सारखे.. मोदी शहा अदानी आणि अंबानी हे गुऱ्हाळ खूप झालं
आणि हो भारतभर राहिलेल्यांचाच याच्याशी काय संबंध कोणी म्हणत असेल तर २ गोष्टी
१) मी भारताबाहेरील शीख समुदायाचं वागण्याबद्दल लिहिले होतो .. दिल्ली किंवा नांदेड मधील शीख काय करीत आहेत या बद्दल नाही २) भारतीय शेतकऱ्यांना मदत चालूच आहे कि अनेक वर्षे अंदाजे ३०%किराणा भारतातूनच आणतो कि हो... ,आणि ते सुद्धा चांगली किंमत मोजून पार्ले जी पासून ते हिरव्या मिरचांपर्यंत ... आखाती देशात असेल तर ५०% असेल हेच प्रमाण
तेवहा ५ वर्षे वैग्रे नंतर च बघू सध्या काय जळतंय ते पहा

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Dec 2020 - 9:34 am | माईसाहेब कुरसूंदीकर

पंजाब्/हरयाणा वगळता ईतर राज्यांतील शेतकर्यांचा विरोध नाही ह्या बीलांना. स्वामीनाथन अय्यर ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे हे कायदे अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पण एका रात्रित परिस्थितीत फरक पडेल असे नाही. चांगले बदल हळूहळू होतात.
उद्योजकांना लहान शेतकर्यापर्यत पोचण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा लागतील

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2020 - 1:58 pm | श्रीगुरुजी

नवीन तीनही कृषी कायदे मागे घेण्यावर कृषी संघटना अडून बसल्या आहेत. त्यामुळे आजच्या चर्चेत फार काही निष्पन्न होण्याची शक्यता दिसत नाही.

जाता जाता . . . भटारखाने, खाण्यापिण्याची व फळांची रेलचेल, पाय चेपण्याची स्वयंचलित यंत्रे इ. असलेले आंदोलन पहिल्यांदाच पहात आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2020 - 2:02 pm | श्रीगुरुजी

मोफत वायफाय आणि १६ टन मोफत अननस!

https://m.lokmat.com/national/aap-government-install-wifi-hotspots-farme...

बाप्पू's picture

30 Dec 2020 - 2:13 pm | बाप्पू

आंदोलन नसून शिखांचे ( खलिस्तान वाल्यांचे ) वयक्तिक फ्रस्ट्रेशन आहे.
सर्व नेते आणि आंदोलक हे दाढीवालेच आहेत. (व्यवस्थित पहा , क्वचित एखादा बिगर दाढीवाला, पंजाबी नसलेला माणूस दिसेल.)

सरकार ने जास्त भाव देऊ नये.. यांचे फंडिंग संपले कि आपोआप निघून जातील. जसे शाहीन बाग वाले बिर्याणी संपल्यावर गेले तसे.

जाता जाता - या आंदोलनास शेतकरयांचे आंदोलन म्हणून संबोधने हा शेतकऱयांचा अपमान आहे. कुणालाही आंदोलन करण्यास विरोध नाही पण आंदोलनामागे फॅक्ट्स असाव्यात. उगागच... फक्त आम्हाला भीती वाटतेय म्हणून आंदोलन केले तर लोकं सपोर्ट करणार नाहीत.

एक दाढीवाले (मुसलमान ) लोकं देखील CAA NRC च्या वेळेस आम्हाला बाहेर काढतील या अनाठायी भीतीपोटी आंदोलन करत होते.. आणि आता देखील हे दुसरे दाढीवाले आम्हाला उद्योगपती लुबाडतील आणि भूमीहीन करतील या भीतीपोटी आंदोलन करतायेत.

बहुसंख्य शेतकरी आणि नॉन शेतकरी देखील या आंदोलनाकडे आता टाईमपास म्हणून पाहतायेत. जितके महत्व या डाव्या लोकांनी या आंदोलनास दिले त्यामुळे प्रत्येक घरात या कायद्यबद्दल माहिती समजली आणि बहुसंख्य लोकं आता शाहणे झालेत.

अवांतर - पूर्वी खांग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह बैल गाडी कि बैल असे काहीतरी होते त्यावेळी लोकांना इमोशनली ब्लॅकमेल केले जायचे कि बैल नसतील तर आपण खाणार काय?? त्यामुळे बैलावरच शिक्का मारा आणि निवडून दया.. त्यामुळे बरेच वर्षे भारतात "बैल" च राज्य करत होते.

सॅगी's picture

30 Dec 2020 - 2:25 pm | सॅगी

या आंदोलनाला शेतकरी आंदोलन म्हणण्यापेक्षा पिझ्झा पार्टी आंदोलन म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

"आंदोलन" हा शब्दही रेल्वे/रस्ते अडवले आहेत म्हणून, नाहीतर जे काही चालले आहे ते एखाद्या पार्टीपेक्षा कमी नाही.

यशवंत पाटील's picture

30 Dec 2020 - 3:13 pm | यशवंत पाटील

शेतकर्यांवर लईच चिडले आहेत मिपाकर
कुणी मिपाकर कधी कोणत्या आंदोलनात गेला होतात का
त्यांचे काय अनभव असतील ते वाचायला मिळतील का
तोवर काय सिरेस आहे काय नाही ते कळना झालय
कुणालाबी चुकीच ठरवाया जास्तीच काही लागत नाही बरोबर असल तर पटवाया मेहनत करावी लागतेय असला जमाना आलाय

शेतकर्यांवर लईच चिडले आहेत मिपाकर... नाही पाटील साहेब शेतकऱयांवर नाही तर या "आंदोलनामागे असलेल्या / उघड दिसणाऱ्या फुटीरतावादी / काहीही करू पण या सरकार ला विरोधच करू / मूळ प्रशांवर नीट बोलायचं नाही या वृत्तीवर चिडलेत मिपाकर
प्रत्येक वेळेला सरकार नि हे द्या ते द्या हेच का? कुठेतरी समतोल साध्याचया प्रयत्न केलं तर लगेच "भांडवशी अदानी अंबानी काढायचे ..जणू काही सध्याचे दलाल मार्क्स चे आजे आणि पणजे आहेत कि! सगळ्यास्नी समतोल वाटून देणारे उपकारी ..

या धाग्यात तर मी एक वेगळाच मुद्दा मांडला होता ( धार्मिक रंग ) तो तर राहिला बाजूलाच.
आणि अजूनही कोणी मूळ प्रश्न काय यावर बोलतच नाही
बघा तुम्हाला माहिती असेल तर सांगा
- शेतीमालाची विक्री कशी चालते ?
- बाजार भाव समिती कशी चालावी हा मूळ हेतू होता आणि प्रत्यक्षात काय होते ?
- नवीन कायद्याचे नक्की फायदे किंवा तोटे?
(एक भारताबाहेरील शेतीप्रधान देशातील रहिवासी)

पाटील साहेब.. तुमचा शेतकरी असण्याचा ego बाजूला ठेवा आणि स्पष्ट आणि मुद्देसूद काय ते बोला.

मी किंवा इथे जे कोणी प्रतिसाद देतायेत ते शेतकऱ्यांना विरोध म्हणून नव्हे तर आंदोलनाच्या आड जे काही चाललेय त्यावर देतायेत. त्यामुळे उगाच शेतकरी शेतकरी S S S असा आकांडतांडव करू नका..

आणि ज्याला तुम्ही शेतकरी आंदोलन म्हणताय ते शेतकरी आंदोलन नसून शीख आंदोलन आहे आणि तो प्रश्न आता त्यांनी जातीय इगो चा बनवलाय.
आणि त्यातच खलिस्तान वाले, APMC दलाल कम्युनिटी वाले, खांग्रेस आणि इतर शेतकऱ्यांचे दुकान चालवणारे राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेतायेत.

सर्वच्या सर्व कायदे रद्द करा ही मागणी अवास्तव आणि सरकार (मोदी ) द्वेषातून आलेली आहे हे चड्डीत मुतणारे बाळ ही सांगू शकते.

यशवंत पाटील's picture

30 Dec 2020 - 10:15 pm | यशवंत पाटील

बाप्पुसाहेब अहो वस्कु नका अंगावर. नाय आवडल तर सोडुन द्या.
ईगो काय , आकांडतांडाव काय (मला तर भगवान शंकर आठवले बघा). आता तुमच्यावाणी लांबलचक लिहाया जमना.
जौंदे. तुमच अक्षाी समदं बरोबर. मंग तर झालं?
आता ते मुदीशेठ अन ते शेतकरी मिपा वाचतील तर ते एक बर हुईल.
रामराम. वळख ठिवा.

धुम्रपानाला विरोध करणार्यांनी आधी स्वतः धूम्रपान करावे असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? आंदोलनाला विरोध करण्यासाठी आधी लोकांना आंदोलनाचा अनुभव असायला पाहिजे कि आंदोलनाची कारणे काय आणि टीका काय हे जास्त महत्वाचे ?

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2020 - 3:31 pm | श्रीगुरुजी

जिओचे मनोरे तोडणे, खाण्यापिण्याची चंगळ, पाय दाबायची यंत्रे, इंदिरा को ठोका;अब मोदी को भी ठोकेंगे अशा घोषणा . . . असे आंदोलन असते का?

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2020 - 3:33 pm | श्रीगुरुजी

जिओचे मनोरे तोडणे, खाण्यापिण्याची चंगळ, पाय दाबायची यंत्रे, इंदिरा को ठोका;अब मोदी को भी ठोकेंगे अशा घोषणा, फक्त पंजाबमधल्या अत्यल्प शेतकऱ्यांचा समावेश . . . असे आंदोलन असते का?

Rajesh188's picture

30 Dec 2020 - 6:25 pm | Rajesh188

1) शेतकरी आंदोलनात खलिस्तान च्या घोषणा दिल्या गेल्या आणि ध्वज फडकावले गेले.
आणि हे आंदोलन फुटीरवादी लोक करत आहेत.
जग खूप पुढे गेलेले आहे पोलिस पेक्षा चोर जास्त हुशार असतात.
फुटीरवादी लोक आंदोलन उघड करत नाही त आणि घोषणा पण सर्व मीडिया समोर येवून देत नाहीत.गुप्तता हीच ताकत असते
सर्व कसे प्लॅन नुसार घडवून आणले जाते .
लष्करी कारवाई सारखी च अतिशय गुप्त पने योजना आखून ते यशस्वी केली जाते.
आंदोलन करून स्वतंत्र मिळवायचे आता दिवस नाहीत.
त्या मुळे आंदोलनात अतिरेकी सहभागी आहेत हा मुद्दाच हास्यास्पद आहे.
2) फक्त हरियाणा आणि पंजाब मध्येच आंदोलन होत आहे.

आंदोलन दिल्ली मध्ये होत आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे.
सर्व देशभर चक्का जाम करण्यापेक्षा फक्त दिल्लीत आंदोलन करून विरोधाची जाणीव सरकार ल करून देणे योग्य च आहे.
आणि तिथे अनेक राज्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी आहेत.
3) आंदोलनात दाढी वाले शीख आहेत.
का शीख लोकांना आंदोलन करता येणार नाही सरकारी निर्णय विरूद्ध जाता येणार नाही.
असे राज्य घटनेत लिहलेे आहे का?
4) हिंदू विरूद्ध शीख असे कधीच घडणार नाही.
हिंदू धर्मीय हे काय BJP चे अंकित नाहीत. त्या मुळे bjp ल वाटत म्हणून हिंदू शीख विरोधी होतील असे वाटत नाही.
5) शेती कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत असा प्रचार फक्त bjp कडून च केला जातोय.
Bjp chya सर्व यंत्रणा त्या साठी वापरल्या जात आहेत.
G

प्रश्न ओढून ताणून बनवलेत .

पुढच्या वेळेस शुभेच्छा. !!!!

एपीएमसी सरकार बंद करणार नाही आणि नवीन कायद्या मुळे कंपन्या ह्या क्षेत्रात उतरल्या की शेतकऱ्यांना विकल्प मिळेल असा एक प्रचार केला जातो.
पण आता पण शेतकरी शेतकरी खुल्या बाजारात माल विकू शकतो.
नवीन कायद्या मुळे नवीन काही घडणार नाही.
कॉन्ट्रॅक्ट शेती ह्या कायद्या मुळे कंपन्या शेतकऱ्या चा माल कॉन्ट्रॅक्ट केल्या शिवाय विकत घेणार नाहीत .
आणि कॉन्ट्रॅक्ट कसे करायचे ,काय नियम आणि अटी टाकायच्या हे कंपन्याच ठरवू शकतात.
विक्री चे जाळ एकदा कंपन्यांनी निर्माण केले की दुसरे कोणी विक्री व्यवसायात टिकून च राहू शकत नाही जे लहान लहान भाजी विक्रेते आहेत ते.
ह्या वाक्याला आधार म्हणून आपण ओला आणि उबर मुळे टॅक्सी चालक कसे बाजूला फेकले गेले ह्याचे उदाहरण घेवू शकतो.
काही व्यक्ती च हातात शेती माल विक्री व्यवसाय गेला की स्पर्धा होवूच शकत नाही तर
Monopoly होईल..
सर्वच क्षेत्रात एक हाती सत्ता असू नये त्या मुळे रोजगाराच्या Sandhya कमी होतातच आणि शोषण होण्याची शक्यता वाढते.
गृह उद्योग ,सुट्टे भाग निर्मिती,किराणा दुकान,लहान सहान जे व्यवसाय आहेत त्या मध्ये मोठ्या कंपन्यांना संधी देणे म्हणजे शोषण वाढवणे असाच अर्थ आहे.
आता शेती करणारे आणि शेतमाल विक्री करणारे हे दोन्ही व्यवसाय समाजातील खूप मोठा वर्ग करतो .
हे असेच चालावे.
कंपन्यांनी हवं तर प्रक्रिया उद्योगात त्यांचे योगदान द्यावे पण शेती करणे आणि शेतमाल विक्री करणे हे उद्योग कॉर्पोरेट क्षेत्र करू लागले तर खूप मोठी लोकसंख्या परावलंबी होईल.
आणि ग्राहकांच्या हिताचे पण ते असणार नाही.

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2020 - 11:48 pm | टवाळ कार्टा

ह्या वाक्याला आधार म्हणून आपण ओला आणि उबर मुळे टॅक्सी चालक कसे बाजूला फेकले गेले ह्याचे उदाहरण घेवू शकतो.

ओला/उबरमुळे रिक्शा आणि टॅक्सीवाल्यांचा माज लै कमी झालीय
बाकी चालूदे

जशी ऑनलाईन शॉपिंग ऍप मुळे मोबाईल विक्रेत्यांची झाली.
मोबाईल कोणी दुकानातून खरेदी च करत नाही दुकाने बंद पडली.
जशी अवस्था टीव्ही केबल चालक लोकांची झाली इंटरनेट वर टीव्ही दिसायला लागल्या वर केबल व्यवसाय बंद पडला.
आणि टीव्ही चॅनेल च मालक च मीडिया उद्योगाचे एकमेव लाभार्थी झाले.
इंटरनेट सेवा क्षेत्रात अशीच दोन तीन कंपन्यांची monopoly निर्माण झाली.
.
मध्ये एक बातमी वाचनात आली अमेझॉन नी उत्पादक लोकांना वेढीस धरायला suravat केली होती .
कारण विक्री व्यवसाय वर अमेझॉन चे वर्चस्व असल्या मुळे उत्पादक पण अमेझॉन वर च अवलंबून आहेत त्यांच्या ह्या majburi च फायदा घेवून उत्पादक कंपन्यांना वेठीस धरून त्यांचे स्वतःचा फायदा वाढवत होती अमेझॉन.
सरकार नी अँक्शन घेवून अमेझॉन वर करोडो रुपयाचा दंड लावला .
हे भारतात नाही अमेरिका की दुसऱ्या कोणत्या देशात घडले.
अलीबाबा पण अशीच गुण उधळू लागली होती वर्चस्व निर्माण झाल्या वर चीन सरकार नी पण अलीबाबा च्या मुसक्या आवळल्या.
हे भारतात घडू शकतं नाही भारतात कायदे हे श्रीमंत लोकांचे गुलाम आहेत.
त्या मुळे शेती क्षेत्रात सरकार शेतकऱ्या च्या बाजूने कधीच उभे राहणार नाही उद्या त्यांची पिळवणूक कॉर्पोरेट क्षेत्रा नी केली तरी.

सौंदाळा's picture

30 Dec 2020 - 10:13 pm | सौंदाळा

खरच खूपच वाईट दिवस आलेत. स्टेनलेस स्टील मुळे कल्हईवाले बेकार झाले. प्राण्यांच्या खेळावर बंदी आली आणि मदारी, दरवेशी बेकार झाले.
टॅक्सी, बस आल्या आणि आमचे कित्येक टांगेवाले बेकार झाले. आणि कॉम्पुटरमुळे तर विचारूच नका.
कालचक्र उलटे फिरवायला पाहिजे आता. टेक्नॉलॉजी, प्रगती, सुविधा गेल्या खड्ड्यात.

आधुनिक तंत्र आणि tech ह्याला विरोध नाही केला.
मी जी उदाहरणे दिली आहेत ती भले तंत्र ज्ञान चे परिणाम दाखवत असतील तरी मला वेगळेच सांगायचे आहे ते तुम्हाला पण समजले आहे.
एकच व्यक्ती,कंपनी ह्यांनी राजकीय समर्थन,आणि आर्थिक takat ह्याच्या जोरावर सर्व च व्यवसाय वर मालकी हक्क वाजवणे म्हणजे बाकी अनंत लोकांच्या धंधा,व्यवसाय करण्याचे हक्क वर आक्रमण करण्या सारखे आहे.
त्या मुळे अशी काही क्षेत्र ज्या वर खूप लोकांचा उदर निर्वाह अवलंबून आहे .
ती क्षेत्र मोठं मोठ्या कंपन्या आणि व्यक्ती ह्यांचा हातात कायद्या नीच न देणे हेच देश हिताचे आहे.
मायक्रोसॉफ्ट नी windows वर एकहाती स्वामित्व मिळवल्या नंतर कोणता एक part जी दुसरी कंपनी निर्माण करायची तो परत फुकट ग्राहकांना द्यायला survat करून त्या संबंधित कंपनीच्या हक्क वर गदा आणली होती.
तेव्हा पण मायक्रोसॉफ्ट ला खूप मोठा आर्थिक दंड भरावा लागला होता .
मी जी उदाहरणे देत आहे ती monopoly निर्माण झाल्यावर बाकी लोकांचा जगण्याचा हक्क कसा हिरावून घेतला जातो त्याची उदाहरणे आहेत.
कलयी, टांगेवला,हे असेल टोमणे तिथे लागू पडत नाहीत.
तो माझ्या युक्ती वादाचा प्रतिवाद ठरू शकत नाही.

takat आणि survat हे इंग्रजी शब्द आहेत हे माहिती नव्हतं.

सॅगी's picture

30 Dec 2020 - 11:07 pm | सॅगी

आम्ही विसरलोच होतो...सोयीस्कर आणि वाटेल तो अर्थ काढण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे.

ओला/उबरचेच उदाहरण घ्यायचे झाले तर त्याने अशा किती टॅक्सी/रिक्षा व्यवसायीकांवर गदा आणली?
गदा फक्त त्यांच्याच व्यवसायावर आली आहे जे आळशी आणि कामचुकार आहेत. ज्यांना जवळचे भाडे नाकारणे हा स्वत:चा हक्क वाटतो.
बाकीचे दोन्ही अ‍ॅपवर रजिस्टर करुन कमाई करतच आहेत आणि करतच राहतील.

बर मग मुक्त बाजारपेठ झाली आणि बजाज, पद्मिनी भिकेला लागली असे म्हणूया का?

श्रीगुरुजी's picture

31 Dec 2020 - 12:09 am | श्रीगुरुजी

मोबाईल कोणी दुकानातून खरेदी च करत नाही दुकाने बंद पडली. जशी अवस्था टीव्ही केबल चालक लोकांची झाली इंटरनेट वर टीव्ही दिसायला लागल्या वर केबल व्यवसाय बंद पडला.

मोबाईल दुकाने बंद पडली? केबल व्यवसाय बंद पडला?

आम्हाला कसे नाही दिसले? आम्ही आंधळे झालो की काय?

हे भारतात नाही अमेरिका की दुसऱ्या कोणत्या देशात घडले.

कोणत्या देशात?

अलीबाबा पण अशीच गुण उधळू लागली होती वर्चस्व निर्माण झाल्या वर चीन सरकार नी पण अलीबाबा च्या मुसक्या आवळल्या.

घोर अज्ञान!

हे नेहमीचे साम्यवादी छाती बडवणे आहे. ठीक माहिती स्वतःलाच ठाऊक नसते पण कुठेतरी काही तरी असे घडले असेल म्हणून उगाच अकलेचे तारे तोडायचे.

चांगले व्यवसाय चालू राहतात आणि जुनाट व्यवसाय बंद पडतात हा निसर्गाचा नियम आहे. प्रचंड प्रमाणात ऑनलाईन फोन स्वस्त किमतीत मिळू लागले ह्यामुळे भारतीय गरिबांचा प्रचंड फायदा झाला आहे आणि लोकांनी कोट्यवधी रुपये तर वाचवले आहेच पण कंपन्या ह्यावर व्यवस्थित कर वगैरे भरत आहेत. ज्यांनी दुकाने बंद झाली त्यांनी इतर काही व्यवसाय सुरु केला आहे त्यामुळे उगाच निकृष्ट व्यवसाय करून नंतर नुकसान होत आहे म्हणून सरकार कडे भीक मागण्यापेक्षा दुसरा व्यवसाय करणे कधीही हितकर. त्याशिवाय बालकामगार, खोटारडेपणा, कर बुडवेगिरी इत्यादी कमी होऊन हांगाच्या प्रकारचा रोजगार जास्त वाढला आहे आणि भारतीयांचा फायदा झाला आहे. समाजाला ज्या सेवेची गरज आहे तोच व्यवसाय लोकांनी करावा त्यामुळेच समाजाचे भले होते.

भारतीय बाजारांत आज हजारो फोन ची मॉडेल्स आहेतच पण अतिशय स्वस्त सुद्धा आहेत. ऍमेझॉन किंवा इतर कुणीही ह्यांत प्रचंड फायदा करून घेतला तर आनंदच आहे. फायदा म्हणजे त्यांना सरकारकडे भीक मागून MSP वगैरे मागण्याची गरज पडणार नाही.

केबल कम्पन्या वगैरे बंद पडल्या ह्यांत ग्राहकाचा फायदाच आहे. आज OTT कंपन्यांमुळे देशाचा प्रचंड फायदा झाला आहे. सर्व मनोरंजन अर्थव्यवस्था कपूर खान लोकांच्या तावडीतून सुटली आहे आणि छोट्या मोठ्या कलाकारांना सुद्धा आता वाव मिळतोय. महाराष्ट्रातील छोट्या शेहारांत सुद्धा रिकॉर्डिंग स्टुडिओ निर्माण झाले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था प्रसारण पाहून लक्षावधी रोजगाराच्या संध्या उपलब्ध झाल्या आहेत. आणि ह्यांत मोनोपॉली पद्धतीने लोकल गुंड आणि कोर्पोरेटरच्या आशीर्वादाने निकृष्ट सेवा देणारे केबल वाले तसेच सरकारी आशीर्वादाने १०० रुपयांत सामोसे विकून पैसे करणारे मल्टिप्लेक्सवाले आणि कपूर खान मंडळींचे नुकसान झाले तर सोने पे सुहागा.

> इंटरनेट सेवा क्षेत्रात अशीच दोन तीन कंपन्यांची monopoly निर्माण झाली.

दोन कंपन्यांची मोनोपॉली असत नाही. त्याशिवाय देशांत फारच कमी शहरे अशी आहेत जिथे तुम्हाला ३ पेक्षा कमी सर्विस प्रोव्हायडर आहेत. ह्याच्या आधी फक्त सरकारी bsnl नावाचा संपर्किय कँसर होता.

देशांत जर काही वेगाने सुधारले असेल तर त्यांत इंटरनेट सेवेचा नंबर सर्वांत वरचा आहे. त्याशिवाय ह्या सेवेने भारतीय गरिबांना प्रचंड फायदा झाला आहे. आता हे गरीब लोक पुस्तक विकत न घेता वाचू शकतात, मुलांना जगातील कुठलीही गोष्ट घरबसल्या दाखवू शकतात आणि कुठलीही माहिती वर्तमान पात्रांच्या दलालांना पैसे न देता मिळवू शकतात. ह्याच गोष्टीमुळे देशांतील गांधी परिवार नावाचा कँसर तसेच साम्यवादाचा STD गायब होऊ लागला आहे.

> उत्पादक कंपन्यांना वेठीस धरून त्यांचे स्वतःचा फायदा वाढवत होती अमेझॉन.

ह्याचा अर्थ काय ? अमॅझॉनवर अशी कुठली गोष्ट आहे जी प्रचंड महाग आहे पण आधी इतर ठिकाणी स्वस्त होती ?

>हे भारतात घडू शकतं नाही भारतात कायदे हे श्रीमंत लोकांचे गुलाम आहेत.

म्हणून सर्वाना भुकेकंगाल करून रस्त्यावर भीक मागायला बसवायचे का ? कायदे करण्याची जबाबदारी सरकारची आहे ती त्यांनी सुधारावी.

> त्या मुळे शेती क्षेत्रात सरकार शेतकऱ्या च्या बाजूने कधीच उभे राहणार नाही उद्या त्यांची पिळवणूक कॉर्पोरेट क्षेत्रा नी केली तरी.

आज भारतांत सगळीकडे कॉर्पोरेट क्षेत्राने लोकांचा हर प्रकारे फायदा करून दिला आहे. सरकारी व्यवस्था म्हणजे दळिद्री, कामचुकार आणि अत्यंत महाग असेच समीकरण आहे.

तसेच कॉर्पोरेट क्षेत्र म्हणजे काही परग्रहवासी नाही आहेत. मनुष्यच आहेत. त्यामुळे ह्या लोकांचे सुद्धा अधिकार आहेत. माझ्या प्राईव्हेट कंपनीने असे काय पाप केले म्हणून मला शेतमाल विकत घेता येत नाही ?

तात्पर्य :

आधुनिक अर्थव्यवस्थेने लोकांवरील बंधने शिथिल झाली आहेत. नेहमीच्या एलिट मंडळींचे धाबे म्हणून दणाणले आहे. आता गुमस्ता परवाने देणारे, केबलवाले, tv लायसन्स विकणारे, वर्तमानपत्रांचे संपादक (कुमार केतकर किंवा निखिल वाघळे छाप) ह्यां कुत्रे सुद्धा भीक घालत नाही. हि मंडळी आता जुनाट मूर्खपणाचे तर्क काढून एक अत्यंत चांगल्या सुधारणेला विरोध करत आहे.

अनन्त अवधुत's picture

31 Dec 2020 - 3:39 am | अनन्त अवधुत

.

प्रदीप's picture

31 Dec 2020 - 2:40 pm | प्रदीप

जशी अवस्था टीव्ही केबल चालक लोकांची झाली इंटरनेट वर टीव्ही दिसायला लागल्या वर केबल व्यवसाय बंद पडला.

ह्यावरून आठवले. सत्तरीच्या दशकांत मी ज्या कंपनीत काम करत होतो, तिने भारतीय चित्रपटांचे व्हिडीयो राईट्स विकत घेऊन ते कन्झ्युमर्ससाठी VHS, Betacam इत्यादींच्या माध्यमांतून विकणे सुरू केले. सुरूवातीस हे फक्त भारताबाहेरील बाजारपेठांसाठींपुरते मर्यादित होते. तेव्हा चित्रपट निर्मात्यांना, अधिक पैसा करण्याचा हा स्त्रोत (additional revenue stream)आवडला, व ते उत्साहाने ते हे राईट्स सदर कंपनीस (व तदनंतर तसाच व्यवसाय करणार्‍या इतर कंपन्यांना) विकू लागले. नंतर जेव्हा हे भारतांतही सुरू झाले, तेव्हा त्यांचे धाबे दणाणले, कारण त्यांना आता थिएटर रीलिजच्या धंद्याची काळजी वाटू लागली. कालांतराने ती भीति नाहीशी झाली. एका मोठ्या (मला वाटते. 'शहेनशहा') फिल्मचे थिएटर व व्हिडीयो रीलीजेस एकाच दिवशी झाले.

मग पुढे केबल टी. व्ही. भारतात आले, तेव्हा ह्या व्हिडीयोवाल्यांना त्यांच्या धंद्याची भीति वाटू लागली. अर्थात तंत्रज्ञानाचा रेटा असा आहे, की ते काही हा नवा झंझावात थांबवू शकले नाहीत.

आता, गेल्या काही वर्षांत तर केबल टी. व्ही, ला-- व खरे तर ब्रॉडकास्ट टेलीव्हिजनलाच, स्ट्रीमिंगमुळे धोका निर्माण झाला आहे. (ब्रॉडकास्ट टेलीव्हिजनच्या क्षेत्रांत मी स्वतः काम अगदी कालपर्यंत काम करीत होतो, तेव्हा ही भीति मला व माझ्या सहकार्‍यांना आहेच). पण हा तंत्रज्ञानाचा व काळाचा रेटा आहे. तो कुणीही थोपवू शकणार नाही.

आणि टीव्ही चॅनेल च मालक च मीडिया उद्योगाचे एकमेव लाभार्थी झाले.

काहीही! ग्राहकांना ह्या सगळ्याचा लाभ नाही झाला का? मी स्वतः एका अतिशय मोठ्या परदेशी मिडीया कंपनीत आतापर्यंत काम करत होतो. काळाची चाहूल घेऊन ह्या कंपनीलाही, त्या क्षेत्रांतील इतर सर्वच कंपन्यांप्रमाणे आपली धोरणे बदलावी लागली.

कसल्यातरी काल्पनिक व निराधार भीतिने, कुठल्याही विषयावर मते मांडण्याचे तुमचे कसब मात्र वाखाणण्यासारखे आहे.

सॅगी's picture

31 Dec 2020 - 3:13 pm | सॅगी

अति-अवांतर - लिनिअर/ब्रॉडकास्ट टेलीव्हिजन अजून काही काळ तरी तग धरेल असे मला वाटते, याचे कारण म्हणजे जुन्या पिढीतील लोक ज्यांना आगदुरचित्रवाणीकाठी (फायर टीव्ही स्टिक) किंवा तत्सम प्लॅटफॉर्म्स वापरता येत नाहीत, आणि गावच्या ठिकाणी अजून तारेचे (वायरलाईन) इंटरनेट पोहोचलेले नसल्यामुळे तिथे लिनिअर/ब्रॉडकास्ट टेलीव्हिजनला पर्याय नाही.

अर्थात, हे माझे वैयक्तीक मत.

प्रदीप's picture

31 Dec 2020 - 4:10 pm | प्रदीप

भारतापुरते बोलायचे तर हे बरोबर आहे, तुमच्याशी सहमत आहे.

पण मी भारतांतील मीडिया कंपनीत काम करत नव्हतो. भारताबाहेर, विशेषतः विकसित देशांत व जागांत, लिनीयर ब्रॉडकास्टिंगची फारतर ६ ~ ८ वर्षे उरली असावीत, असा अंदाज आहे.

आणि मुद्दा असा, हे असे होणार आहे, म्हणून जगांतील मोठ्या मीडिया कंपन्या गळे काढत बसल्या नाहीत, ना कुणीही स्ट्रींमिंगवर कसल्याही प्रकारची बंदी घालावी, अशी कुठल्याही सरकारकडे मागणी केली.

1.ई-मेल मुळे पत्र वव्यहार बंद होत आले , -- प्रिय राजेश , कळविण्यास आनंद होतो की, टिम्ब टिम्ब टिम्ब
टीव्ही मुळे तमाशा बंद पडला -- या रावजी बसा भावजी , तुमचं खाजवा कि डोकं , टिम्ब टिम्ब टिम्ब
मोबाईल मुळे घड्याळाची दुकाने बंद पडत आली - टिक टिक वाजते डोक्यात , काय पांचट लिरिक्स वाटतं एवढं ऐकूनच पुढचं कधी ऐकलं नाही,

2. काय म्हणता मोबाईल ची दुकाने बंद पडली ?? पण कधी न कधी ती चालूच झाली होती ना !!! त्याच्या आधी (मोबाईल यायच्या आधी) काय करायची हि जनता , मोबाईल यायची वाट बघत बसले होते का मुघले आजम च्या जमान्यापासून ?? का गोट्या खेळत होते ?? काही ना काही करतच असतील ना ??
वरतून ह्यांची फालतू गिरी माहिती आहे काय ?? तीन हजार रुपड्याचं डबडं पाच न सहा हजार रुपयाला चिपकावत होती , माहिती आहे ना आपल्याला !! मग मोबाईल amazon वरून घेतला म्हणून बिघडले कुठे , दलाली 90 टक्क्यांपर्यंत कमी झाली ,

हीच कथा घडाळ्याच्या दुकानात सेल टाकायला गेल्यावर होते , हलका टाकू कि भारी टाकू , हलका 60 ला भारी 120 ला , अरे घड्याळच 150 च तू 120 चं सेल टाक , अरे मूर्खा घडाळ्याचा सेलच 20, 30 रुपयाला मिळतो ,कितीही भारी बटन सेल घे , मग 90 , 100 कसले , ह्याला मजुरी म्हणत नाहीत ,
हीच कथा साहना यांनी पंजाब ते केरळ उदाहरण देऊन सांगितलंय
मग ह्यांची हि असली खदरावळ दुकानं बंद पडली , बिघडले कुठे ,

हे झाले ग्राहक ह्या बाजूने , माल स्वस्त पाहिजे हे ठीक , पण विक्रेता आणि उत्पादक ह्या बाजूने काय , ??
मोबाईल ला चार्जिंग कमी आहे , घोडेस्वार किंवा कबुतर पाठवतो

बाप्पू's picture

5 Jan 2021 - 4:57 pm | बाप्पू

हाहाहा..

मी माझ्या पोस्ट मध्ये बदलत्या तंत्र ज्ञान मुळे बदलेले व्यवसाय बद्द्ल लिहल आहे पण नवीन तंत्र ज्ञान ला विरोध केला नाही.
मी फक्त भीती व्यक्त केली आहे.
तंत्र ज्ञान बदलल्या मुळे जे बदल पाहिले झाले आहेत आणि आता जे होत आहेत ह्या मध्ये खूप फरक आहे.
आता कोणता ही मोठा व्यवसाय उद्योग असेल तर त्या उद्योगाशी,/ व्यवसाय शी संबंधित सर्वच काम एकच कंपनी करत आहे.
त्याचा परिणाम म्हणून विविध क्षेत्रातील उद्योग धंदे एकच व्यक्ती च्या नियंत्रणात येत आहेत.
पाहिले असे घडत नव्हते.
गाड्या निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील तर त्या गाडीचे परत त्या कंपनीने बनवू नयेत दुसऱ्या कंपन्यां ना ते बनवायला द्यावेत.
मोबाईल निर्मित करणाऱ्या कंपन्या असतील तर काही लहान सहान काम दुसऱ्या कंपन्यांना द्यावीत.
हेच फक्त मी मत व्यक्त केले आहे.
सर्वानाच रोजगार मिळायला हवा.
हा त्या मागे उध्येश आहे.
मीडिया कंपन्यांनी वितरण व्यवसाय (ott) पण स्वतःच्याच ताब्यात घेतला आहे त्या मुळे एक रोजगाराचे क्षेत्र कमी झाले.
असे च सर्व करायला लागले तर फक्त काही कंपन्या आणि सरकार हेच फक्त श्रीमंत होतील आणि जनता गरीब च राहील.

अर्धवटराव's picture

5 Jan 2021 - 10:01 pm | अर्धवटराव

आणि ति सर्वकालीन आहे.
एखादी अर्थव्यवस्था एस्टॅब्लीश होते. नवीन तंत्रज्ञानं, व्यवसाय संधी या अर्थ व्यवस्थेला धक्का देतात. जुन्या व्यवसाय पद्धती बाद होतात, नव्या तयार होतात.
हे ट्रान्झीशन किती सोप्या पद्धतीने होते हाच काय तो कळीचा मुद्दा उरतो. पण बदल अटळ आहेत.

इंदिरा गांधी च्या गरिबी हटाव च्या घोषणे वर असे उपहास नी म्हटले जायचे.
गरीब च हटवले तर गरिबी आपोआप हटेल.
तोच प्रकार आहे रिक्षा/टॅक्सी चालक बेशिस्त वागत आहेत म्हणून रिक्षा टॅक्सी चालक ही जमात च नष्ट करणे त्यांना मालकाचा नोकर करणे हा उपाय असू शकत नाही.
पण तेच केले गेले पण शिस्त नाही लावली त्यांना.
शेतकरी हा वर्ग च नष्ट करून शेती सुधारणा करायची आहे.
Method same.
शेतकरी आता जे जमिनी चे मालक आहेत त्यांना त्यांच्याच शेतात मजुरी वर राबवून.
त्यांना शेतमजूर करायचे आहे.

शेतकऱ्यांनी जमिनी विकायच्या का आणखीन करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. इथे सरकार किंवा तुम्हा आम्हाला काहीही मत असायचे कारण नाही. शेतकऱ्याला ज्यांत जास्त फायदा ते तो करेल. देश हा काही फक्त शेतकऱ्याचा नाही देश आम्हा सर्वांचा आहे. त्यामुळे हर प्रकारचा व्यवसाय आम्हा सर्वानाच करायचा नैसर्गिक अधिकार आहे. ह्यांत शेती आणि इतर व्यवसाय सुद्धा आले.

कुठले तरी जुनाट धंदेच चालू ठेवायचे होते आणि सरकारची तीच जबाबदारी असती तर ईस्ट इंडिया कंपनीलाच ठेवायचे होते देश चालवायला.

शेतकरी आता जे जमिनी चे मालक आहेत त्यांना त्यांच्याच शेतात मजुरी वर राबवून.
त्यांना शेतमजूर करायचे आहे.

असं झाल्याचे जगाच्या पाठीवर कुठे उदाहरणं आहे का?? Ki उगाच वेळ जात नाही म्हणून स्वतःच्या कल्पनाशक्तीचा परिचय देताय.??

आणि निसर्गाचा नियम आहे - sarvival of fittest.

जो कालसुसंगत आणि fit आहे तोच स्पर्धेत टिकून राहतो आणि त्यालाच टाकण्याचा अधिकार आहे.
वर तुम्ही जे ओला उबेर, इंटरनेट कंपन्या, केबल चालक हे जे काही बोललायत ना ते सर्व निव्वळ हास्यास्पद आहे. तुम्हाला पुन्हा 90 च्या दशकात जायचेय का??

मी लंगडा आहे तरी पण मला रेस मध्ये जिंकण्याची संधी दया.. सर्व धडधाकट सुद्धा लोकांनी आपला एक पाय वापरून च पळायचे असा नियम काढा...
इतके हास्यस्पद तुमचे लॉजिक आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2020 - 11:31 pm | श्रीगुरुजी

ओला/उबरचेच उदाहरण घ्यायचे झाले तर त्याने अशा किती टॅक्सी/रिक्षा व्यवसायीकांवर गदा आणली?

मुंबई वगळता महाराष्ट्रात कोठेही टॅक्सी सेवा नव्हती/नाही. तेथे फक्त त्रिआसनी व षष्टासनी रिक्षा होत्या/आहेत. ओला/उबेरने टॅक्सी व त्रिआसनी रिक्षा सेवा सुरू केली. परंतु त्यामुळे स्थानिक रिक्षाचालकांवर परीणाम झालेला नाही.

ह्या उलट गोव्याचे उदाहरण घ्या. इथे टॅक्सी माफिया मंडळींनी ओला उंबर ला प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे मागील ३ वर्षे सतत गोव्यांतील महत्वाचा पर्यटन उद्योग कमी तर झालाच उलट गोव्यांतील टॅक्सी चालक म्हणजे गुंड अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. मुंबई गोवा विमान तिकीट वास्को तो पणजी टॅक्सी पेक्षा जास्त स्वस्त आहे. टॅक्सी खटाऱ्या आहेत, मीटर हा प्रकार नाही, गोव्यांत टॅक्सी चालकांकडून २-३ मोठे गुन्हे घडतात. पोलीस सुद्धा ह्यांना घाबरतात.

ह्या शिवाय टॅक्सी चालक गरीब नसून बहुतेक टॅक्सीचे मालक लोकल गुंड किंवा राजकारणी आहेत आणि ड्रायव्हर बाबू बिहार UP मधील जवळ जवळ वेठबिगार कामगार आहे ज्यांना जनावरांप्रमाणे वागवले जाते.

चौकटराजा's picture

31 Dec 2020 - 10:21 am | चौकटराजा

गेल्या वीस वर्षात रिक्षा धंद्यावर परिणाम नक्कीच झालेला आहे पण भारताची लोकसंख्याच इतकी अफाट आहे की अजून हा परीणाम खूप उघडपणे जाणवत नाही. संगीत शिकणे ही अत्यावश्यक गरज आहे काय ? तरीही करोना काळात हजारो मुले ऑन लाईन संगीत शिकत आहेत ! अजून इतकी बेकारी आलेली नाही की एक बंद पडलेला धंदा दुसरे अनेक रोजगार एका रात्रीत बंद पाडेल ! निदान भारत हा देशात ते तूर्त शक्य नाही पण येत्या १० वर्षात ज्या वेगाने तांत्रिक बदल दिसतील त्यानुसार अनेक व्यवसाय नामशेष होतील असे मला वाटते कदाचित ते पाहायला आमच्या वयाचे कित्येक जण हयात ही नसतील !

चौकस२१२'s picture

31 Dec 2020 - 6:58 am | चौकस२१२

आंदोलन करून स्वतंत्र मिळवायचे आता दिवस नाहीत.
त्या मुळे आंदोलनात अतिरेकी सहभागी आहेत हा मुद्दाच हास्यास्पद आहे.

राजेश अजूनही तुम्हाला यात प्रामाणिक पणे चर्चा करायची आहे असे गृहीत धरून पुढचे लिहितो\
- भारतात जाणवत नसेल कदाचित पण इतर देशात तरी याला स्वरूप शीख विरुद्ध इतर असेच दिले गेलाय... ४ विडिओ पहा आणि मग बोला
- देशाच्या शेतकऱ्यांचा जर प्रश्न आहे तर पंजाबीत पाट्या का?
- ८४ चा उल्लेख का?
सरळ सरळ या आंदोलनाचे निमित्त करून शिखांच्यात आणि इतर हिंदू च्यात ( मग ते भाजपावाले असोत कि नसोत) फूट पाडणे हा हेतू आहे हे दिसतंय पण ते जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हीच आंधळे आहात असे खेदाने म्हणावे लागते
आणि यशवंतराव पाटील साहेब , तुम्ही पाटील आहेत कि शेतकरी आहात हे सगळे गौण आहे .. मुद्य्यांचा बोला .. बाकी गरमाईं ढंगाने लिहिलेत म्हणून वाचायला मज्जा वाटत असली तरी नुसते फुसके बार नका टाकू

शा वि कु's picture

31 Dec 2020 - 8:36 am | शा वि कु

८४ चा उल्लेख किरण खेर नी संसदेत केला होता, ती पण फुटीरतावादी आहे का ?

शिखांच्यात आणि हिंदूनमध्ये फूट पाडणे हे आंदोलनाचे ध्येय आहे का ? का काही नालायक आंदोलकांचा धोशा ? कि सोयीस्करपणे एक धागा पकडून सर्व आंदोलकांच्या नावावर खपवण्याची नेहमीची ट्रिक ?

पंजाबीत पाट्या का ?
-lol. मातृभाषेत पाट्या का लावल्या हा प्रश्न सुचून त्यात कन्स्पायरसी दिसते म्हणजे थोरच.

इतर देशात तरी याला स्वरूप शीख विरुद्ध इतर असेच दिले गेलाय...
- किती शिखांनी ? आंदोलकांच्या किती परदेशी समर्थकांनी ?

सरळ सरळ या आंदोलनाचे निमित्त करून शिखांच्यात आणि इतर हिंदू च्यात ( मग ते भाजपावाले असोत कि नसोत) फूट पाडणे हा हेतू आहे हे दिसतंय पण ते जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हीच आंधळे आहात असे खेदाने म्हणावे लागते
- तुम्हाला अतिंद्रिय चक्षू प्राप्त झालेत असं दिसतंय.

शिखांनी निळी पगडी घालणे आणि गाड्यांवर धार्मिक चिन्हे लावणे यात तुम्हाला काहीतरी स्पेशल वाटते. त्वाडा कुत्ता टॉम्मी, साड्डा कुत्ता कुत्ता ? आपल्या धार्मिकतेचे प्रदर्शन करणे ह्यात तुम्हाला कट्टरपणाचा वास येतो ?

शेतकरी आंदोलकांशी असहमत आहे, पण आयटी सेल चे नेहमीचे टेक्निक बघून वाईट वाटले.

बाप्पू's picture

31 Dec 2020 - 9:15 am | बाप्पू

@ शा. वि. कु.

मला उद्या GST विरुद्ध आंदोलन करायचेय पण सर्व आंदोलन कर्ते भगवी लुंगी , कपाळावर भस्म, हातात कमंडलू , गळ्यात रुद्राक्ष माळ घालून आलेत.

सोबत पाकिस्तान मुर्दाबाद, मुस्लिमांना हाकला आणि स्वतंत्र हिंदू देशाची मागणी करू लागले तर ते आंदोलन GST विरोधातले वाटेल का?? तिथेही तुम्ही तुमचे हेच लॉजिक वापरणार का??

शा वि कु's picture

31 Dec 2020 - 9:33 am | शा वि कु

समाजकंटक आंदोलन आहे की आंदोलनात काही समाजकंटक हे नक्कीच पाहीन.
(नाही, तुम्ही म्हणता अगदी तसंच नसलं तरी जवळपास अर्थाचे भाजपचे काही नेते म्हणतच असतात. त्याने ती भाजप पक्षाची ओळख होते का ?)

बाप्पू's picture

31 Dec 2020 - 9:45 am | बाप्पू

समाजकंटक आंदोलन आहे की आंदोलनात काही समाजकंटक हे नक्कीच पाहीन.

ओके. म्हणजे तुम्ही हे पाहता तर.. मग नेमके आत्ताच्या आंदोलनामध्ये तुम्ही काळा चष्मा घालून पाहताय का.. नाही म्हणजे तुम्हाला त्यात समाजकंटक असे काहीच कसे दिसत नाहीये?? आणि जे दिसतेय त्याला "धार्मिकतेचे प्रदर्शन " असे गोंडस नाव देतायेत.

शा वि कु's picture

31 Dec 2020 - 10:42 am | शा वि कु

मूळ आंदोलन आणि आंदोलकांच्या मागण्या खलिस्तान किंवा हिंदू शीख दिसत नाहीत. आंदोलकांची ऑफिशियल मागणी या बाबतीत नाही आहे. आंदोलकामध्ये शामिल असलेल्या खलिस्तानी समर्थक आणि हिंसक लोकांवर कायद्याप्रमाणे कारवाई व्हावीच.

पण त्याचा व्यत्यास सर्व आंदोलक हे खलिस्तानी आहेत/हिंदू विरोधी आहेत हे मला पटत नाही.

"सर्व आंदोलक हे खलिस्तानी आहेत/हिंदू विरोधी आहेत हे मला पटत नाही."
शा वि कु
असे म्हणलेले नाहीये .. मुद्दा फक्त हाच मांडला आहे कि याला उगाचच "शिखांवरील अन्याय आणि म्हणून खालसा / शीख चिन्ह हे आणले जातंय "

पण यात धर्म येतोच कुठे? सांगा?
जर आंदोलन शेतीविषयी आहे तर तिथे शीख धर्माचे चिन्ह का दिसते? परत सान्गतो भारतात हे जाणवत नसेल पण जगभरचं शीख संघटना यात भारतांबेहर जी काही निदर्शने करीत आहेत त्यात हे सगळे दिसते! का? काय संबंध? जणू काही हा कायदा शीख धर्मचया विरुद्ध हिंदू भाजपने काढलाय असे
अरे आहे ना कायद्या बद्दल प्रश्न आणि आहे ना याचा परिणाम पंजाबात तर काढा ना मोर्चे? जणू काही शीख धर्माचे धर्मयुद्ध असल्या सारखे का वागत?
तुम्ही कानडा आणि यूके मधील माथेफिरू शीख समाजाचे ( सर्व नाही काही मोजके) एक एक विधान बघा, दरवर्षी १५ ऑगस्ट ला निदर्शने ...इत्यदि

उद्या जर महाराष्ट्रातील शिक्षकांचा किंवा गवंड्यांचे आंदोलन असले तर त्यात "ओम" चिन्ह वापरयाला लागले तर तुम्ही म्हणाल ना कि "यात धर्माचा संबंध काय म्हणून?"
किंवा गोव्यात कोकणीच पाहिजे असे जर आंदोलन असेल तर त्यात येशू चा क्रॉस दिसला म्हणाल ना कि प्र्शन धर्माचा नाहीये .. का घुसडता वैग्रे

श्रीगुरुजी's picture

31 Dec 2020 - 9:39 am | श्रीगुरुजी

+ १

हे आंदोलन कृषी कायदेविरोधात असण्याऐवजी मोदींंविरोधातच दिसत आहे.

चौकस२१२'s picture

31 Dec 2020 - 11:31 am | चौकस२१२

पंजाबीत पाट्या का ?
-lol. मातृभाषेत पाट्या का लावल्या हा प्रश्न सुचून त्यात कन्स्पायरसी दिसते म्हणजे थोरच.

अहो शविकूं. पंजाबी शिखांची मातृभाषा आणि त्याची लिपी पंजाबी आहे हे काय आम्हला माहित नाही का...
मूळ धागा कशामुळे काढला ते परत एकदा समजावून सांगतो...
- "भारतभरचं" शेतकऱ्यांचे आंदोलन असे ऐकले आणि त्यात काही मागे वाटले नाही परंतु हळू हळू पाहायला लागल्यावर यात काही तरी वेगळे आईच असे वाटू लागलं ( आता तुम्ही मला भाजपचा आय ती सेल मधील म्हणून म्हणणार असाल तर म्हणा खुशाल )
एक कोपऱ्यातल्या देशातील ३-४ त्या क्रमांकाचं गावात सुद्धा आंदोलनाचे समर्थन करणारी पाटी केवळ इंग्रजीत नसून त्यात पंजाबी लिपीत का? कोणाला कळणार आहे येथे पंजाबी ? + कृपाण वैगरे जे शिखांचे चिन्ह आहे ते कशाला? काय संबंध शीख धर्माशी याचा?
म्हणजे अशी चिन्ह लावणे असे प्रयत्न ( आणि खास करून कॅनडा तील समजा तर याबद्दल प्रसिद्ध आहे ) हे जाणून बुजून केलं जात आहे असे वटयाला यात जागा आहे

मेलबर्न क्रिकेट च्या वेळेला निदर्शनात पंजाबी शिखच का? तुम्हाला माहिती आहे का मेलबर्न सारखया शहरात शिखांपेक्षा कितीतरी अधिक इतर भारतीय आहेत .. सरासरी त्यांचे पण शेतकरी नातेविकं असतीलच कि हो ? मग ते का नाही आले रस्त्यावर का तुमचा आणि रजेश अनि प्रोफेश्वर साहेबांचं हे म्हणणं आहे कि सगळे प्रदेशातील भारतीय भाजपचं आय ती सेल साठीच काम करतात ?
तसे असेल तर धन्य आहे

शा वि कु's picture

31 Dec 2020 - 3:02 pm | शा वि कु

तुम्हाला किंवा इतर कुठल्याही आयडीला आयटी सेल म्हणले नाही. पण आंदोलक केवळ मीसिंफॉर्मड, मिसगाईडेड नसून देश किंवा धर्म विरोधी आहेत हे दाखवण्याची जी भाजप आयटी सेल ची लगबग असते त्याबाबत बोललो होतो.

बाकी पंजाबी लिपिला 'गुरमुखी' म्हणतात.

दिलजीत दोसांज ने ट्विटर वर पडलेल्या पद्धतीमुळे परदेशात सुद्धा पंजाबात कायद्याविरुद्ध पाट्या लावत असावेत.

चौकस२१२'s picture

3 Jan 2021 - 8:34 am | चौकस२१२

"दिलजीत दोसांज ने ट्विटर वर पडलेल्या पद्धतीमुळे परदेशात सुद्धा पंजाबात कायद्याविरुद्ध पाट्या लावत असावेत."
हा संधर्भ काही काळाला नाही
परदेशात पंजाब पाट्या? या आंदोलनाच्या संधर्भात लावण्याची काहीच गरज नवहती धार्मिक चिन्ह तर अजिबात नाही ८४ चा उल्लेख ?! संबंध काय? पण मूळ हेतूच जर वेगळं असले तर मग?
हे सगळं नसत तर अशी हेतू बद्दल शंका घेतलीच गेली नसती

ऑस्ट्रेल्यात इंग्रजीत, फ्रांस मध्ये फ्रेंच मध्ये लावा ना पाट्या ...येथील लोकशाहीचया सीमेत करा जरूर आंदोलन .. कोण नाही म्हणताय?

)शिखांनी निळी पगडी घालणे आणि गाड्यांवर धार्मिक चिन्हे लावणे यात तुम्हाला काहीतरी स्पेशल वाटते. "

संपूर्ण संदर्भ बघितला नाहीत आपण.

मी म्हणले होते कि प्रत्येक भारतीय हिंदू परदेशात काही ओम लावून हिंडत नाही गाडीवर..kiwaa "मी मराठी" किंवा "मी गुजराथी" इत्यादी पण तेच बहुतेक शीख आपला धर्म असा दर्शवतात .. व्यापक दृष्टीने बघितले तर यात काही चुकीचे असे नसले तरी त्यातून आपण काही तरी वेगळे आहोत हे दाखवणे हे दूरदर्शी धोरण दिसते आणि अश्या लांबचं पल्ल्याच्या धोरणाचे दर्शन यात "शुद्ध शेतकरी" आंदोलनाला "शीख आंदोलन असे रूप देऊन उघडपणे दिसतंय ..

येथील हिंदू काय आपल्या धर्माबद्दल जागरूक नाही? पण बहुधार्मिक ऑस्ट्रेलियात उगाच त्याला असा धर्म / धर्मचिन्ह फार पुढे पुढे करायची जरुरी वाटत नाही
यात हिंदूंची समावेशक वृत्ती आहे ...एवढेच
असो एकूण हा धागा काढून चूक केली असे वाटतंय कारण भारतात हे कदाचित एवढे तीवरतेने जाणवले नसेल...
मिपावर अमेरिकेत आणि यूरोपात रहाणारे पण आहेत त्यांनी पण आपला अनुभव सांगावा
हे माझे निरीक्षण कदाचित चुकीचे असू शकेल

उद्या मुस्लिम शेतकरी कायद्या विरूद्ध आंदोलन करायला उतरला तर त्यांचा मुस्लिम पेहराव आणि उर्दू भाषेचा वापर करणारच.
ती त्यांची ओळख आहे.
तमिळ शेतकरी कायद्या विरूद्ध आंदोलनात उतरला तर लुंगी घालून आणि कपाळावर चंदन लावूनच उतरेल आणि तमिळ भाषेचा वापर करत असेल तर गैर काय.
आपल्या देशात विविधता आहे प्रतेक भाषिक,धार्मिक वेगळा आहे त्यांचे अलगपण न स्वीकारणे हे समजण्याच्या पलीकडे आहे.

बाप्पू's picture

31 Dec 2020 - 1:05 pm | बाप्पू

राजेश 188 अत्यंत सहमत. आता परत या वाक्यावरून u टर्न मारू नका.

पण मग माझा प्रश्न आहे कि आंदोलनात तुमचे ते मुस्लिम, तामिळ आणि इतर भाषिक लोकं का दिसत नाहीयेत. कि शेतकरी म्हणजे फक्त शीख लोकं च का??

श्रीगुरुजी's picture

31 Dec 2020 - 2:11 pm | श्रीगुरुजी

जे आंदोलनात दिसताहेत ते सुद्धा मुठभर आहेत.

महाराष्ट्रातून बच्चू कडू ५०-६० फटफट्यांवर समर्थकांना घेऊन आंदोलनात भाग घेण्यासाठी मध्यप्रदेशपर्यंत पोहोचला होता म्हणे. पण नंतर पुढे गेले का सहल संपवून परत आले त्याची बातमी नाही. पण बच्चू मागील २-३ आठवडे महाराष्ट्रातच दिसतोय. ८-१० नाशिकमधून दिवसांपूर्वी ४०-५० मोटारीतून काही जण दिल्लीकडे रवाना झाल्याचे बातम्यात सांगितले. ते पुढे कोठे गेले याची बातमी नाही. इतर सर्व राज्यातून आंदोलनास नगण्य पाठिंबा दिसलाय. भारत बंदचा ही पूर्ण फज्जा उडाला. १ दिवस उपोषण करण्याच्या आवाहनालाही शून्य प्रतिसाद मिळाला. भारतातील पाठिंब्याच्या तुलनेत भारताबाहेरच जास्त पाठिंबा दिसतोय. जिओचे मनोरे तोडणे यातून आंदोलकांचे वैफल्य व निराशा दिसते.

आंदोलनास अत्यंत नगण्य पाठिंबा आहे व आंदोलन पूर्ण अपयशी झाले आहे असेच दिसत आहे.

चौकस२१२'s picture

3 Jan 2021 - 8:26 am | चौकस२१२

राजेश तुमच्या हट्टी पणा ची हद्द झाली... मूळ मुद्दा अजूनही कळलेला दिसत नाहीये
चला तुमचा तर्क वापरू
१) ठीक आधी आंदोलनास पंजाबात सुरवात झाली कारण भारतीय शेती प्रधान राज्यपैके एक खूप महत्वाचे राज्य,,,बरोबर?
२) वरील कारणामुळे त्यात शीख समाज जास्त असणार? बरोबर आणि त्याअनुषंगाने पाट्या गुरुमुखीतून असणार .. बरोबर
आता हे सांगा ..
येथे शीख धर्माचा संबंध काय? ८४ ची शीखांविरुद्धची हिंसा याचा संबंध काय? ( माझे आधीचे वक्त्यव्य वाचा ...जर उद्या कर्नाटकातील गवंड्यांचा संप सुरु झाला तर त्यात "ओम" असण्याची गरज काय? किंवा उत्तर प्रदेशातील शिक्षकांचे आंदोलन असले तर लोकसंख्येप्रमाणे त्यात मुसलमान शिक्षक असणार पण त्यांनी जर त्यात ७८६ वैगरे आणले तर त्याचा संबंध धर्माशी जोडला जातो .. कारण नसताना .. आणि मग हे प्रश्न उपस्थित होतात

आता जरा याचा भारताबाहेरील संदर्भ बघू ( मी ज्या कारणाने हा धागा काढला तो मूळ मुद्दा?)

काही शिखांचा हे धोरण आहे कि भारतात आमच्यावर अन्याय होत आहे आणि जिथे जमेल तिथे भारताबाहेर याचा गाजावाजा करणे..
आपण आपला गाव, शहर , राज्य आणि देश हे सोडून बाहेर काय चाललंय या कडे जरा बघा मग तुम्हाला कळेल कि आझ्यासारखा भारतीय वंशाचा माणूस भारताबाहेर हे जेव्हा बघतो तेव्हा त्यात त्याला हे विनाकरण धर्म आणणे का खुपू लागते ..

"आपल्या देशात विविधता आहे प्रतेक भाषिक,धार्मिक वेगळा आहे त्यांचे अलगपण न स्वीकारणे हे समजण्याच्या पलीकडे आहे."

अहो कोण नाही समजावून घेत आहे .?.. याचा शेतकरी कायदयाचा संबंध काय ?

आता तुम्हाला हे व्यापक पद्धतीने बघाय्चेहक नसले आणि नुसती भाजप विरुद्ध आरडाओरड करायची तर मग बोलयन्यात काही अर्थ नाही

हा कायदा / बदल अन्याकाकारक आहे वैग्रे तुमचे मत कळले आहे सर्वांना ... त्यासाठी "हा कायदा कसा चुकीचा आहे" हा वेगळं धागा काढा हवे तर ..
मी फक्त हे बघण्यासाठी हा धागा काढला होता कि हे इतर परदेशातील मिपाकरानं जाणवले आहे का? का मी अगदीच तर्कविसंगत बोलतोय ...

चौकस२१२'s picture

7 Jan 2022 - 8:34 pm | चौकस२१२

पंजाबीत पाट्या का ?
-lol. मातृभाषेत पाट्या का लावल्या हा प्रश्न सुचून त्यात कन्स्पायरसी दिसते म्हणजे थोरच.

मी ऑस्ट्रेल्यात म्हणतोय .. येथे इंग्रजीत बसलाय पाहिजेत जेणे करून येथील लोकां हि काय भानगड आहे ते समजेल , येथे गुरुमुखी चा संबंध काय
इतर देशात तरी याला स्वरूप शीख विरुद्ध इतर असेच दिले गेलाय...
- किती शिखांनी ? आंदोलकांच्या किती परदेशी समर्थकांनी ?
जगभर बघा जी लोक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला भारत विरोधी असतात ते बहुतेक शीख
येथे दिवाळी कार्यक्रम ( तो सुद्धा सरकारचहय खर्चने केलं तेवहा त्या सांस्कृतिक कार्यक्रमात ( )बहुल हिंदू हि जमात कशाला ?
जरी हे मान्य केले कि बहुसंख्यांक परदेशी शीख भारताचं बरोबर आणि फारच थोडे फुटीरतावादी आहेत तर हे जे "भारताचं बरोबर" असलेलं गप्प का होते ?
आपल्या धार्मिकतेचे प्रदर्शन करणे ह्यात तुम्हाला कट्टरपणाचा वास येतो ?
एरवी करायला काहीच हरकत नाही पण या आंदोलनात धर्माचा काय संबंध ?
आयटी सेल चे नेहमीचे टेक्निक बघून वाईट वाटले.
प्रतेय्क जण काही आय टी सेल चा भाग नाही... दरवेळी काही लिहिले कि आय टी सेल!
जे दिसल ( येथील दिवाळी कार्यक्रमात फक्त शिखानची विरोधी भूमिका )

अनेक भारतीय हिंदू प्रमाणे शिखांबद्दल प्रचंड आदर आहे पण हे सगळे बघून त्यांचा आंधळेपणा कळला

गोंधळी's picture

31 Dec 2020 - 9:51 am | गोंधळी

योग्य मुद्दे मांडले आहेत.

1) हे आंदोलन शेती विषयक कायद्या विरूद्ध नसून मोदी विरुद्ध आहे.

कायदे सरकार नी केले आहेत तर त्या कायद्या विषयी भाष्य पण सरकारी प्रतिनिधी नीच करावे.
त्याचे चांगले वाईट परिणाम सरकारी अधिकारी किंवा मंत्री ह्यांनीच करावे.
पण की दिसत आहे.
भारतीय जनता पक्ष ची यंत्रणा त्या कायद्याच्या समर्थनात उतरली आहे.
भारतीय जनता पक्षाचे it cell नेसायच डोक्याला गुंडाळून आंदोलन करताना बदनाम करतं आहे.
सरकार गोड बोलत आहे तर पक्ष खालच्या पातळीवर उतरला आहे.

भारतीय जनता पार्टीनेच कायदे केल्याने त्यांचीच यंत्रणा उतरणार नाही तर ट्रम्प येऊन प्रचार करणार आहे काय ?

> कायदे सरकार नी केले आहेत तर त्या कायद्या विषयी भाष्य पण सरकारी प्रतिनिधी नीच करावे.

मूर्खपणाचा तर्क आहे. कायद्याचे पालन लोकांनी करायचे असल्याने ह्यावर भाष्य करण्याचा अधिकार १००% लोकांना आहे. त्याशिवाय APMC सारखा दळभद्री सोविएत प्रकारचा कायदा जावा म्हणून कित्येक लोकांनी मागील ३० वर्षांपासून कंठशोष केला आहे. सरकारी कायदा त्याचाच परिणाम आहे.

> भारतीय जनता पक्षाचे it cell नेसायच डोक्याला गुंडाळून आंदोलन करताना बदनाम करतं आहे.

मिपावरील सदस्य जे इथे कायद्याच्या समर्थानात लिहीत आहेत ते IT सेल वाले आहेत का ?

टीप: आंदोलनाचे मूळ मुद्दे पूर्णपणे निरर्थक आहेत, तर्कशून्य आहेत आणि आर्थिक तर्काच्या दृष्टीने निव्वळ थोतांड आहेत हे आधीच मी तसेच अनेक मिपा करानी विस्तृत पणे लिहून सिद्ध केले आहे. ह्या उलट तुम्ही एकही तर्कशून्य मुद्दा मांडलेला नाही. तुमचा खाजगी मालमत्ता आणि खाजगी व्यवसायांना असेलला विरोध हा तुमच्या डाव्या बुध्दीभ्रष्टतेचा परिणाम आहे असे वाटते, अर्थात त्याला काहीही उपाय नाही. त्यांत तर्क शून्य आहे.

डावी बुद्धिभ्रष्टता ह्याने भारतीयांचे प्रचंड प्रमाणात नुकसान करून अक्षरशः कोट्यवधी लोकांना भुकेकंगाल करून ठेवले आहे. हि डावी विचारसरणी देशासाठी ब्रिटिश सरकारपेक्षा जास्त धोकादायी ठरली आहे त्यामुळे अश्या विचारसरणी विरुद्ध प्रत्येक भारतीयाने वाट्टेल त्या मार्गाने लढा हा पुकारलाच पाहिजे. दिल्ली मधील आंदोलन हे अश्याच डाव्या बुद्धिभ्रष्टतेचा परिणाम आहे आणि सरकारांत मोदी असो किंवा राहुल इतर भारतीय जनतेने बाह्या सरसावून ह्यांच्या पेकाटात जोरदार लत्ता प्रहार हा केलाच पाहिजे.

सुबोध खरे's picture

31 Dec 2020 - 12:12 pm | सुबोध खरे

भारतीय जनता पक्ष ची यंत्रणा त्या कायद्याच्या समर्थनात उतरली आहे.

भारतीय जनता पक्षाचे it cell नेसायच डोक्याला गुंडाळून आंदोलन करताना बदनाम करतं आहे.

आणि त्या कायद्याच्या विरोधात लिब्रान्डु, आपटार्ड आणि कम्युनिस्ट उतरले आहेत असे तुम्ही म्हणता आहात का?

किंवा

तुम्ही कायद्याच्या विरोधात बोलता आहात म्हणजेच तुम्ही या पैकीच एक आहात असा अर्थ निघतोय

प्रसाद_१९८२'s picture

31 Dec 2020 - 2:17 pm | प्रसाद_१९८२

पण हे आंदोलक बाबा रामदेव यांना विरोध का करत आहेत ?

अर्धवटराव's picture

1 Jan 2021 - 2:24 am | अर्धवटराव

कृषी कायद्यांना विरोध करणारे आणि या आंदोलनाला विरोध करणारे, दोन्ही कंपू दीडशहाण्या विद्वानांनी ओसंडून वाहात आहेत. बिजेपी ची आय टी सेल नेहेमीप्रमाणे 'विस्त्रुत' आणि 'तर्कशुद्ध' फेकाफेकी करायला लागली आहे, आणि आंदोलन समर्थकांच्या समाजमाध्यमातल्या पोस्ट वाचल्या तर सरदार लोकांवर निघणारे विनोद सत्यदर्शी असतात का अशी शंका वाटावी इतके 'लॉजीकल' सादरीकरण दिसतय.

मग आम्हि, दोन्हि बाजुच्या, त्यातल्या त्यात बॅलेन्स्ड लोकांच्या प्रतिक्रीया वाचल्या, ऐकल्या. आणि आंदोलनामागे काहि तर्क नसुन सरकारप्रती अविश्वास आणि भविष्याची भिती हेच कारण दिसुन आलं.
हे कारण दुर्लक्ष्य करावं असं क्षुल्लक अजीबात नाहि. या आंदोलनाबाबतीत म्हणुन नाहि, पण इन जनरल... लोकांना सरकार आणि न्याय व्यवस्थेबद्दल विश्वास, आपुलकी, आत्मियता न वाटणे हि बाब अत्यंत चिंताजनल आहे. सरकारचे काहि निर्णय चुकु शकतात, पण त्यांची नियत साफ आहे/होती हि भावना लोप पावली आहे का? :( न्याय व्यवस्था आपल्यावर अन्याय होऊ देणार नाहि हा विश्वास उडाला आहे का? अशा परिस्थीतीत जनता स्वतःला अनाथ समजते... पुढे अनेक समस्या त्यातनं निर्माण होऊ शकतात.

> पण त्यांची नियत साफ आहे/होती हि भावना लोप पावली आहे का? :( न्याय व्यवस्था आपल्यावर अन्याय होऊ देणार नाहि हा विश्वास उडाला आहे का?

हे प्रश्न २०२०मध्ये कुणालाही पडत असेल तर त्यांनी आपले डोके तपासून घेण्याची गरज आहे. सरकारी नियत हि कधीच साफ नसते, नव्हती आणि भविष्यांत सुद्धा असणार नाही. "Eternal vigilance is the price of freedom" हे थॉमस जेफरसन चे वाक्य ह्याच संदर्भांत आहे. कोर्ट ह्या विषयावर तर बोलणे सुद्धा मूर्खपणाचे ठरेल, "शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये" हि म्हण आता किमान ५० वर्षे तरी जुनी झाली आहे.

पण त्याच बरोबर फक्त पंजाबी शेतकऱ्यांना का बरे सरकारवर इतका अविश्वास वाटत असेल ?

अर्धवटराव's picture

3 Jan 2021 - 11:24 pm | अर्धवटराव

२०२० मधे लोकशाही पद्धतीने चालणारी राज्यव्यवस्था लोकार्थीच असावी हि अपेक्षा म्हणजे डोकं खराब असायचे लक्षण असावे काय? सरकारी नियत कधिच साफ नसली तरी आधुनीक राज्यव्यवस्थेत लोक-कल्याणासाठी आवष्यक त्या प्रक्रिया अंतर्भूत असल्यामुळे लोकांचे जीवनमान आणि किमान हितसंबंधांची यांच्य सुरक्षेची हमी अपेक्षीत नाहि काय? नसल्यास आपण आणखी एका लाल क्रांती टाईप व्यवस्थेकडे लोटल्या जातोय, हे डोकं ठिकाणावर ठेऊन देखील कळात नाहि काय?

कोर्ट कचेर्‍यांचे अनुभव कितीही वाईट असले तरी तिच व्यवस्था अधिकाधीक निर्दोष करण्याचे प्रयत्न करणे या पलिकडे काय केल्या जाऊ शकते? सरकार कडुन अपेक्षा करु नये, कोर्टाची पायरी चढु नये.. या व्यवस्था आहेत तशाच राहातील हे गुपचुप मान्य करुन फ्रस्टेशनमधे जगत राहायचं?

पंजाबी शेतकर्‍यांना अविश्वास वाटायची कारणं मला तरी कळली नाहित. पण तो खरच फक्त अविश्वास असेल तर हे आंदोलन फार काहि चालणार नाहि. अन्य काहि कारण असतील तर एव्हाना गृहमंत्रालयाने योग्य ठिकाणी दट्ट्या लावणं सुरु केलच असेल.

Rajesh188's picture

4 Jan 2021 - 12:48 am | Rajesh188

जो इथे bjp चे paid samarthak active आहेत.
त्यांना मानधन मिळणे हेच महत्वाचे आहे.
आम्ही bjp चे paid पाठीराखे नाही असा भास निर्माण करायचा सरकारी चुकीच्या निर्णयाचा निषेध करायचा नाही .
आणि सरकारी निर्णय कसे बरोबर आहेत ह्याचा प्रचार करायचा हेच ह्यांचे काम आहे.
कंगना प्रकरणात हीच ट्रिक वापरत होती ही लोक

कंगना मुंबई ला pok म्हणाली ह्याचा निषेध ह्यांनी केला नाही .
आणि कंगना च्या मताशी सहमत नाही असे डबल ढोलकी मत व्यक्त केले.
आणि कंगना साठी रस्तावर येवून बे अक्कल असल्याचा पुरावा पण दिला.
ह्यांना वाटत आम्हीच हुशार आहोत पण हे किती डोळे मिटून दूध पीत असेल तरी दुनिया ह्यांना चोरून दूध पिताना बघत च असते.

सॅगी's picture

4 Jan 2021 - 9:18 am | सॅगी

तुमच्या सारख्या अंधविरोधकांनी कोविड काळात कोणतेही पाडकाम करायला मनाई केली होती तो आदेश धाब्यावर बसवुन हे तोडकाम केले यावर काहीही प्रतिक्रीया दिली नाही, मुंबईतील इतर अवैध बांधकामे अजूनही ताठ मानेने उभी आहेत त्या बद्दल एक चकार शब्द तुमच्या तोंडातून निघत नाही, या सगळ्या दुतोंडीपणालाही "डबल ढोलकी"च म्हणतात बरं का...

ह्यांना वाटत आम्हीच हुशार आहोत पण हे किती डोळे मिटून दूध पीत असेल

असेच तुम्हालाही वाटते, पण तुम्हीही कितीही डोळे मिटून दूध पिलेत तरी दुनीयेला तुमची फसवेगिरी माहीत झाल्याशिवाय राहत नाही.

> २०२० मधे लोकशाही पद्धतीने चालणारी राज्यव्यवस्था लोकार्थीच असावी हि अपेक्षा म्हणजे डोकं खराब असायचे लक्षण असावे काय?

लोकशाही हि लोकार्थी पद्धतीनेच चालायला पाहिजे ह्यांत काहीही तर्क नाही. ज्याच्या हातांत लाठी असेल तो म्हशी सुद्धा आपल्याच म्हणेल. आणि लाठी तुम्ही लोकशाही पद्धतीने देतात कि कुणी इमर्जन्सी लावून घेतील ह्यावर ते अवलंबून नाही.

आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे. "लाल क्रांती" असायला पाहिजे असेही नाही. उदाहरणार्थ नवीन कायदे अत्त्यंत चांगले आहेत. शेवटी सरकारच्या हातातील काठी जितकी छोटी तितक्या आपल्या म्हशी आमच्या गोठ्यांत आम्ही ठेवू शकतो.

> तिच व्यवस्था अधिकाधीक निर्दोष करण्याचे प्रयत्न करणे या पलिकडे काय केल्या जाऊ शकते?

म्हणून तर लोक आंदोलन करतात.
सरकार आणि न्यायालय न्याय देवू शकत नाहीत म्हणून तर लोकांना रस्त्यावर यावं लागते.
आणि आंदोलन करणाऱ्या लोकांच्या भावना समजून घेतल्या नाहीत तर त्या शांतता पूर्ण विरोध चे रूपांतर हिंसक आंदोलनात होते.
बंदुकीच्या गोळीने सरकार ला जागं येते.
तरी सुद्धा सरकार सशस्त्र फौजेचा वापर करून लोकांना दबावू लागले की फुटीरवादी वृत्ती वाढीस लागते.
खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत.
त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही.
देश द्रोही तर सरकार आणि त्याला जबाबदार असलेली इतर लोक आहेत.

अनन्त अवधुत's picture

1 Jan 2021 - 9:22 am | अनन्त अवधुत

तरी सुद्धा सरकार सशस्त्र फौजेचा वापर करून लोकांना दबावू लागले की फुटीरवादी वृत्ती वाढीस लागते.
खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत. त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही.

विदा तर तुमच्याकडे नसेलच. पण किमान आपण कसले (अप्रत्यक्ष) समर्थन करतोय ह्याचा सारासार विचार करावा.

तुम्ही फारच अपेक्षा करताय असं वाटत नाही तुम्हाला? ☺️

अनन्त अवधुत's picture

4 Jan 2021 - 2:56 am | अनन्त अवधुत

:) २०२० वर्ष होते ते, म्हणून अपेक्षा केल्या. २०२० मध्ये काहीपण घडणे शक्य होते.

सुबोध खरे's picture

1 Jan 2021 - 12:08 pm | सुबोध खरे

खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत.
त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही.
देश द्रोही तर सरकार आणि त्याला जबाबदार असलेली इतर लोक आहेत.

बरेच लोक मूर्ख असतात.

पण काही जण ते ते अट्टाहासाने परत परत सिद्ध करत असतात

चौकस२१२'s picture

3 Jan 2021 - 8:43 am | चौकस२१२

रजेश १८८ " खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत.
त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही."

धन्यवाद
एकदा हे हि स्पष्ट केलात हे बरे झाले ..
आपली तर आता बोलतीच बंद ..
दि एन्ड

Naxall वाद संपवायचा असेल तर आदिवासी लोकांवर होणारे अन्याय धांबवा,त्यांच्या प्रदेशात होणारी खुस खोरी थांबवा.
राज्यात जनतेत देश प्रेम निर्माण करायचे असेल तर.
छ्त्रपती चा आदर्श घ्या.
जनतेवर बिलकुल अन्याय झाला नाही पाहिजे .
आणि अन्याय करणारा किती ही मोठा असेल तरी त्याला शिक्षा ही होणारच हा विश्वास ध्या.
छत्रपती नी स्वतःच्या मुलाला पण दरबारात हजर करून न्याय निवडा केला होता.त्या वेळेस त्यांनी नात बाजूला ठेवले होते.शेतकऱ्यांच्या भाजी च्या देठला पण हात लावू नका असा सक्त आदेश त्यांच्या फौजेला होता.
तेव्हा स्वराज वर संकट आली तेव्हा स्वतःच्या जीवाची पण पर्वा कोणी केली नाही.
एक कोणी चुकीचं काम काम करत असेल तर त्या एका व्यक्ती साठी सर्व समाजाला दोष देवू नका. जो आरोपी आहे गुन्हेगार आहे त्याला मात्र सोडू नका.
बाँबस्फोट,अतिरेकी हल्ले ह्या साठी पूर्ण मुस्लिम समाजाला दोषी ठरवण्याच्या वृत्ती मुळे एका मोठा समाजाचा भाग अलग पडतो.
आणि आतासुद्धा शेतकरी आंदोलन शीख लोक करत आहेत आणि कोणी खलिस्तान ची घोषणा दिली असेल पण पूर्ण शीख कसे देशद्रोही आहेत असाच प्रचार सुरू आहे .
ह्या असल्या वृत्ती मुळे शीख अजुन देशाच्या मुख्य प्रवाह पासून लांब जातील.
ह्याची जाणीव ह्या मुर्खांना नाही.
विरोध 1 व्यक्ती नी जरी केला तरी त्याच्या विरोधाचे कारण समजून घेणे सरकारी यंत्रणेचे काम आहे आणि त्याची शंका निरसन करणे हे कर्तव्यच आहे.
पंजाबी आणि हरियानी लोक विरोध करत आहे बाकी देश शांत आहे असल्या युक्ती वादाला काडी ची किंमत नाही.
त्या 2 राज्यातील लोकांना विश्वासात घेवून त्यांची मत जाणून सरकार नी घेतलीच पाहिजे. त.
पण त्यांनाच बदनाम करण्याचे वेड चाळ हे सरकार आणि सत्ता धारी पक्ष करत आहे.

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2021 - 2:11 pm | टवाळ कार्टा

धेडगुजरी मराठी

सॅगी's picture

2 Jan 2021 - 3:12 pm | सॅगी

अशी मराठी लिहून मराठीचे बारा वाजवणे काही खायचे काम नाही. त्यासाठी व्यासंग लागतो.

चौकस२१२'s picture

3 Jan 2021 - 10:12 am | चौकस२१२

" बाँबस्फोट,अतिरेकी हल्ले ह्या साठी पूर्ण मुस्लिम समाजाला दोषी ठरवण्याच्या वृत्ती मुळे एका मोठा समाजाचा भाग अलग पडतो."
हो बरोअबर असे करू नये हि वृत्ती अन्यायकारक ठरेल....१०० %

- ८४ साली दिल्ली काँग्रेस ती विसरली होती!
- ४८ साली महाराष्ट्रात ती गांधींच्या खुणांनंतर विसरली गेली होती!

आता मुस्लमानबद्दल बद्दल बोलाल तर .. हो अगदी त्यांच्यावर मुद्दामून अन्याय करण्याचा कोणाचा हेतू नाहीये परंतु सर्व जगभर त्यांचे वागणे ख्रिश्चनांशी ( श्रीलंकेतील ) मियांमार मधील बुद्धांशी ( अफगाणिस्तानातील बामियान चे बुद्ध आठवा) , , इराणमधील झोरॅष्ट्रियन लोकांशी कसे राहिले आहे ते जरा डोळे उघडे करून पहा आणि ते सुद्धा शतानुशतके आणि मग लोकांना या जमातीचा उबग आणि राग का आला आहे ते पहा ( मी मुद्डमून येथे हिंदूंशी आणि जु लोकांशी त्यांचे संबंध काय आहेत हे लिहिले नाही कारण हिंदू आणि जु दोघेही नालायक आहेतच त्यांनी पिढ्यान्पिढया मुस्लमानवर अन्याय केलं आहे हे गृहीतच धरू)

"....आणि कोणी खलिस्तान ची घोषणा दिली असेल पण पूर्ण शीख कसे देशद्रोही आहेत असाच प्रचार सुरू आहे ."

पूर्ण शीख जमातीला कोणीही एक माळेचे ठरवत नाहोये , त्यांचे प्रति असलेलं आदर हा सहजासहजी दूर होईल असे वाटत नाही...परंतु त्यात मूठभर असलेल्या शिखांचा ( कॅनडा वगरे स्थित) जो अप्रचार चालू आहे त्याचे कडे हिंदू म्हणून नाही एक भारतीय म्हणून तरी पहा

पण तुमचं सारखया अति टोकाच्या डाव्यान्न ते कधीच दिसणार नाही आणि दिसत असले तरी सोयीस्कर रित्या कानाडोळा कार्याचा आहे तुम्हाला.
झापड आपण लावली आहेत ...

.

पिनाक's picture

4 Jan 2021 - 1:24 am | पिनाक

ते डावे नाहीयेत हो. शांतताप्रिय समाजाचे आहेत. तिथे दिल्लीत कसं काही जण नमाज पढून मग शिखांचा फोटो धारण करतात, तीच यांची युक्ति इथे. या सारख्या लोकांसाठी तर लव्ह जिहाद चा कायदा आणावा लागला..

हे बघा, राजेश हा आयडी "सध्या बाटलेला" चिऊसैनिक आहे. त्यामुळे चिऊसेनेचा अजेंडा तो पुढे रेटत आहे.
त्याचे मिपावरचेच लेखन वाचलेत तर त्याच्या भूमिकेतील यु टर्न तुम्हाला कळेल.

सुबोध खरे's picture

1 Jan 2021 - 12:10 pm | सुबोध खरे

बरेच लोक मूर्ख असतात.

पण काही जण ते ते अट्टाहासाने परत परत सिद्ध करत असतात

सौंदाळा's picture

4 Jan 2021 - 9:40 am | सौंदाळा

Rajesh188 हा आयडी या आणि अन्य धाग्यांवर चिथावणीखोर आणि प्रक्षोभक वक्तव्ये करत आहे
१. खलिस्तान, काश्मिरी फुटीरवाद्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही.
२. जमिनीसाठी शेतकऱ्यांनी रक्तपाताची तयारी ठेवावी.
वगैरे वगैरे
त्यामुळे या आयडीला तत्काळ योग्य ती समज द्यावी अथवा योग्य ती कारवाई करावी अशी संपादक मंडळाला विनंती.