मोरपिसे

बाजीगर's picture
बाजीगर in काथ्याकूट
26 Dec 2020 - 2:55 pm
गाभा: 

प्रोफेसर जमदग्नी विद्यार्थी / विद्यार्थीनीं बरोबर तळजाई टेकडीवर morning walkसाठी आले होते.

प्रोफेसर म्हणाले,
" हे हे हे हे जे मोरपिसारे तुम्ही पहाताहात व appreciate करत आहात हे तुमच्या साठी नाहीच मुळी..."

" मग कुणासाठी आहे?"
विद्यार्थीनी ने घाबरत विचारले.
कारण विचारशृंखला तुटली तर पुन्हा प्रो.जमदग्नींच्या संतापाचा स्फोट व्हायचा,

" पिसारा असतो तो मोरनी साठी"
"तुम्हाला लांडोर म्हणायचय का सर"

" कुठल्या गाढवाने हा unpoetic शब्द काढला,
इतकी सुंदर पिसांची पारख करणारीला मोरनी हा शब्द शोभतो..."

" मोरनी ला पिसं नसतात ना सर"
" येस... आणि म्हणूनचं तिला पिसांची कदर असते... आपण सर्वच अपूर्ण असतो नाही का?
म्हणूनच आपल्याला पूर्ण करणारीला अर्धांगिनी म्हणतात नाही का"

विद्यार्थीनी ने लाजून दुसरीकडे बघितले.
"सर मोरपिसा-याबद्दल तुम्ही काय सांगत होतात?"

" अरे हो ते राहीलचं ...निसर्ग...दूसरं काही नाही...निसर्ग"

" Thanks to निसर्ग हं..प्रोफेसर आज एकदाही भडकले नाहीत" विद्यार्थी पुटपुटले,
विद्यार्थीनी तोंडावर mask नीट करत, डोळ्यांनीच हसल्या.

"by the way, तुम्ही ही बायोलाॅजीची मोठी मोठी पुस्तकं वाचता...समजा मी एखाद्याचा अशिक्षीत बाप आहे आणि मी college मधे आलो आणि विचारलं, "पोरा त्या सर्व पुस्तकांत काय लिवलय,ते एका वाक्यात सांगशील का? तर तुम्ही काय म्हणाल?"

" बाबा, तुला नाही कळणार ,अवघड असतं ते असं म्हणेन"
एक विद्यार्थी म्हणाला.

"चूक" प्रोफेश्वर गरजले.
"जर तुम्हाला complex गोष्ट सोप्या शब्दात समजावता आली नाही,तर तुम्हाला ती कल्पना कळलेली नाही"
" जीव कसा जगेल आणि वंश कसा चालत राहील यासाठी निसर्गाने केलेल्या खटपटी,लटपटी, क्लृप्त्या आणि शरीरात सोडलेला गुप्त नकाशा म्हणजे जीवशास्त्र असं सांगीतलं तर त्या अडाणी बापाला नक्कीच कळेल कारण तो अडाणी असला तरी आंधळा नाहीये,निसर्ग त्याला दिसतोय शेतातून, रुतूंतून,पशूपक्ष्यांतून."

" आणि lemme confess that....fitness आणि immune power यावर पटणारी सोपी उपमा मी अजून शोधतोय पण सर्वाना समजेल आणि पटेल अशी उपमा मला अजून सापडलेली नाहीये.कारण बरेच fit दिसणारे व्यायाम करणारी ,तुमच्या भाषेत म्हणायचं तर डोले-शोले मसल दाखवणारी पैलवान मंडळी कोवीड-19 नी आजारी पडलीत,आणि किरकोळ वाटणारे सफाई कर्मचारी, नर्सेस रोज काम करताहेत, टिकून आहेत.

सध्या मी एवढंच म्हणेन की fitness हा खूप डिग्रीज लावणा-या so called सुशिक्षीत माणसासारखा असतो. आणि immune power ही शहाणपण wiseness सारखी असते. सुशिक्षीत wise असेलच असे नाही.
wise माणूस सुशिक्षीत असेलच असे नाही.
तुम्हाला काही सुचतयं का? fitness vurses immunity explain करायला ? "

" हा...तर मोर पिसारा उलगडतो तो मोरनी ला impress करायला, आणि बघा ती बघते पिसारा, निसर्गाने तिला डोळे दिलेत ते रंग पहायला....हे कशाला तर best genes असलेला वंश पूढे जाण्यासाठी...कारण सर्वोत्तम मोराला ती मेटींग करायला अलाऊ करते"

विद्यार्थीनी लाजून गेल्या, आपल्या bf पासून दूरदूर चालू लागल्या,
जर कुणी ,
"आता म्हणणं पटलं सर" बोललं असतं तर त्यांना मेल्याहून मेल्यासारखं वाटलं असतं.एक तणाव उत्पन्न झाला.

तिनं चोरट्या नजरेनं आपल्या bf कडे बघीतलं,
अफसोस....त्याचं लक्ष नव्हतं, तो म्हणाला,

" excuse me sir, असं असेल तर मग Stefan Howking हा अपंग शास्त्रज्ञ जन्मालाच नसता, जन्मता तरी लवकर मेला असता सर "

ती घाबरली, सर ओरडून त्याचा अपमान झाला तर तिला आवडणार नव्हते.

" oh thats a good point !! मी यावर विचार केला नव्हता...असे प्रश्न तुम्ही उपस्थित करत जावा, really challenging qn...हं "

आता तिने अभिमानाने मैत्रिणीकडे पाहिलं,
मैत्रिणीने तुम्ही काय बुआ असं कौतुकाने पहात,खुणेनं responce दिला.

" well ... दूर्धर स्नायू decomposition आजाराने stefan howking ग्रस्त झाले, हळूहळू सर्वच अवयव निकामी होत गेले, ते जगले...rather जगवले गेले ते technlogy मुळे....पण तुमचा प्रश्न त्यांच्या जास्त विकसीत विचारशक्ती /मेंदू बाबत असावा...तर मी आताच विचार करतोय यावर......
असं समजा, एखादा आंधळा असेल तर तो कानांवर / वासावर जास्त एकाग्र करतो, दुसरा कुणी न बोलता ही आला तरी footsteps च्या आवाजाने, घामाच्या वासाने आंधळा परिचीत माणूस ओळखू शकतो आणि अपरीचीत व्यक्ती, प्राणी पक्षी यावर काही ठोकताळे मांडू शकतो, बरोबर असेलच असे नाही पण त्याची कल्पनाशक्ती विकसीत होते, stefan hawkings यांची देखील ग्रहगोलांविषयी, space विषयी कल्पनाशक्ती अफाट विकसीत झाली असावी, एका प्रकारे तुम्हीहा प्रश्न विचारुन माझाच point justify केलाय बर का.
निसर्ग...चिवटपणे survive होत असतो, एखाद्या अतिशय प्रतिकूल अशा दगडी इमारतीच्या भिंतीवर वाढणा-या पिंपळवृक्षासारखा."

"विशेषत: मुलींवर निसर्गाची एवढी जबाबदारी असते की मी असं वाचलयं की 12-13 वर्षाची मुलगी भूकंपातल्या पडझडीतही मरत नाही,एवढी चिवट असते, कारण निसर्ग वंश चालू ठेवण्याचं instrument म्हणून तिच्याकडून अपेक्षा ठेवतं असतो "

एकदाचं schollar मुलानं तिच्याकडे पाहिलं,
ती लाजरं हसली आणि ओठावर बोट ठेवून
"गप, आता आणखी काही विचारु नकोस" अशा अर्थी खूण केली.

त्यामुळे schollar ने,
" सर, विचारांची मोरपिसं कुणाला impress करायला फुलवताहेत ?"
हा प्रश्न विचारलाच नाही.
(काल्पनिक)

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

26 Dec 2020 - 8:06 pm | उपयोजक

"जर तुम्हाला complex गोष्ट सोप्या शब्दात समजावता आली नाही,तर तुम्हाला ती कल्पना कळलेली नाही"

पटलंय!

+१
हे वाक्य भिडलं!
आपल्याला स्वत:ला एखादी गोष्ट कितपत कळलीय, हे जाणून घ्यायला हा क्रायटेरिया वापरता येईल.

अवांतरः लेख आवडला.

बाजीगर's picture

27 Dec 2020 - 4:19 pm | बाजीगर

धन्यवाद उपयोजक जी.

अथांग आकाश's picture

28 Dec 2020 - 10:07 am | अथांग आकाश

हा हा हा ! छान लिहिलंय!! आवडलं!!!
.

बाजीगर's picture

28 Dec 2020 - 3:03 pm | बाजीगर

आभार तुषार काळभोर साहेब.
आणि आभार अथांग आकाश जी,
तुमचं अमीमेशन एकदन भाsssssssरी....वाह

" सर, विचारांची मोरपिसं कुणाला impress करायला फुलवताहेत ?"

स्कॉलरने हा प्रश्न विचारायलाच पाहिजे होता 😂
जोकींग अपार्ट, छान लिहिलंय! अवडलं.

सौंदाळा's picture

28 Dec 2020 - 7:12 pm | सौंदाळा

बराचसा सुसंगत पण थोडासा विस्कळीत वाटला.
एकंदरीत लेख मस्तच झालाय, आवडला.

हा हाहा.
तो प्रश्न विचारला आणि जमदग्नी भडकले तर...
thats जर-तर.