बिल्डर आणि NOC

कोंबडा's picture
कोंबडा in काथ्याकूट
26 Dec 2020 - 9:39 am
गाभा: 

पुण्यात एके ठिकाणी रिसेल फ्लॅट बघायला गेलो. थोडेफार काम बाकी आहे. पण सर्व फ्लॅट मध्ये रहिवासी राहत आहेत.

प्रोसेस दरम्यान समजले की बिल्डरने प्रोजेक्ट फायनान्स SBI कडून घेतलेले आहे.

बिल्डरच्या NOC मध्ये SBI च्या कर्जाबाबत तसा उल्लेख आहे.

पण SBI NOC देत नाही. कारण बिल्डरच्या एका पार्टनरने back out केले आहे.

अशा ठिकाणी फ्लॅट घेणे सेफ राहिल का?
दुसरे,
समजा बिल्डर कर्ज भरू शकला नाही. तर तेथे अगोदरच फ्लॅट घेतलेल्या लोकांवर याचा काय परिणाम होईव?
याबाबत नक्की कसे कायदे आहेत.

फ्लॅट ची किंमत बरीच स्वस्त असल्याने द्विधा मनस्थिती आहे.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

26 Dec 2020 - 10:30 am | कंजूस

म्हणजे काय? बिल्डरला ( एक पार्टनर सोडून गेल्याने) flat विकता येत नाही? SBI ने काही अट टाकली असेल. अगोदरचे अग्रीमेंट void झाले?

सुबोध खरे's picture

26 Dec 2020 - 10:38 am | सुबोध खरे

सर्वोत्तम म्हणजे SBI कडून याच फ्लॅट साठी कर्ज घ्या. त्यांनी कर्ज दिलं तर तुम्हाला काही घेणं देणं नाही.( बँकांचे कायदे खाते अशा गोष्टी बघून घेतात).
किंवा
एच डी एफ सी कडून कर्ज घ्या. त्यांचे कायदे खाते एकदम कडक असते. जरा सुद्धा शंका असेल तर कर्ज मिळत नाही.

त्यांनी कर्ज दिले तर प्रश्न मिटला अन्यथा त्यात हात घालू नका.

घर मानसिक शांतता मिळण्यासाठी घेतो. मानसिक शांती नष्ट होणार असेल तर असा व्यवहार करू नये.

जिन्क्स's picture

26 Dec 2020 - 11:31 am | जिन्क्स

दोन्ही बँकांबद्दल सहमत.