नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

कशाला हवी ही दुकानं?

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
22 Dec 2020 - 7:19 pm

अक्षरशः १०-१५ वर्षे या वेगवेगळ्या दुकानांतून फिरून मला असे वाटते ,,ते असीम्य ,अदृश्य शक्ती असतांना ह्या दुकानांची गरज ती काय.
अगदी अडाणी ,अशिक्षित लोकांना भोंदुच्या दुकानापाशी पाहिले की आपण अस्वथ होतो.मग नकळत वडीलधारी यांच्या मानाखातर सहस्त्रनामी जप करणाऱ्यांच्या दुकानात आपणही गेलोच होतो की...किंवा जातोच की.बुरखा ओढलेला असतो मनातल्या मनात तो दिसत नाही.सरळ उठून निसर्गात जाव वाटत.बर सामान्यांना नाही उमजत तर शहरातील प्रतिष्ठीत,शिक्षित अन्नदानाचे गोंडस नाव घेऊन,देणग्या उधळत या दुकानांना चालूच ठेवतात.बर अन्नदान कोणाला तर आपल्याच जनाला ...मग वृधाश्रम ,अनाथाश्रम का नाही दिसत ?
सामान्यांन नंतर सो ..सोफास्तीकेटेड यांचे दुकाने म्हणजे अगदीच जगमान्य प्रकारातील.आधी काहीतरी नवे म्हणून पाहायला अनुभवायला आपण जातो पण एक नंतर पुढची पायरी अधिक छान असे म्हणत म्हणत पुढे जातो..पण हे सर्व ज्ञान फुकट नाही..त्यासाठी पैसा मोजावा लागतो.मग तुम्हीपण कोणाला तरी फुकट तुमच्या दुकानातल ज्ञान वाटायला लागता वा या साखळी व्यापाराचे भाग होता.दुसऱ्याची शकले वाटत राहणे म्हणजे हिप्नोटीझिम सारखाच प्रकार वाटतो.
कठीण काळ असतो तेव्हा ह्या दुकानातले सांगतात ,तो वरचा पाहून घेईल.तेव्हा अदृश्य शक्तीच साथ देणार असते तर ..कशाला ही दुकाने..ह ...मूर्त्यांचे अवडंबर झाले तर या शक्तीचा अवमान होऊ शकतो.संतानी कधी अट्टहास एला नाही,ते मार्गक्रमण करत होते.लोक त्यांना जोडले गेले. आपले शक्तिस्थान मनातच पूजावे..
..काही अवघड काळात सेल्फ हिलिंग करावे .ते नाही जमल्यास जवळचे असतातच ना..आणि तेही नाही जमले तर मानसोपचार तज्ञाकडे जाणे हाही उपाय आहेच ना..अमका तमका दुकानवाला असे म्हणतो म्हणून अस स्वत:ला फसवण्याच पाप आहे.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

22 Dec 2020 - 9:19 pm | आनन्दा

तुम्ही पण टाका एक दुकान..
हा का ना का

चौथा कोनाडा's picture

23 Dec 2020 - 1:40 pm | चौथा कोनाडा

भारी आयडिया आहे.

प्राण जाय पर शान ना जाये या सिनेमात भरत जाधवची बायको रवीना टंडन असेच "लक्ष्मीदेवी" या नावाने दुकान उघडते, बर्‍याच समस्या सुटतात.
धमाल गोंधळी सिनेमा आहे.

https://www.youtube.com/watch?v=r7bc4Zaufm4

Rajesh188's picture

23 Dec 2020 - 1:55 am | Rajesh188

आणि चिंता वाटत असेल जगाची तर स्वतःचे आयुष्य संसार,नोकरी सोडून फक्त समाज सेवे साठी वाहून घ्या.
फक्त उंटा वरून शेळ्या haku नका

गामा पैलवान's picture

23 Dec 2020 - 2:30 am | गामा पैलवान

Bhakti,

तेही नाही जमले तर मानसोपचार तज्ञाकडे जाणे हाही उपाय आहेच ना.

मानसोपचार हे ही एक प्रकारचं दुकानच आहे.

आ.न.,
-गा.पै.

काल टीव्हीवर कोकरे महाराज आणि त्यांच्या सातशे गायींची बातमी पहिली. खरं चांगलं काम करत आहेत, तूर्तास त्यांना मदत करणार आहे..

सोत्रि's picture

23 Dec 2020 - 10:15 am | सोत्रि

दुर्दैवाने दुकानातल्या मालापेक्षा दुकानातल्या झगमटाला महत्व दिले जाऊन दुकानांचे मॅाल्स झाल्याचं दिसतं हे वास्तव आहे.

काही अवघड काळात सेल्फ हिलिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे कळण्यासाठी आणि शिकण्यासाठी दुकान हवंच!

- (दर्जेदार माल असणारं दुकान शोधावं ह्या मताचा) सोकाजी

Bhakti's picture

23 Dec 2020 - 11:46 am | Bhakti

मला माझ्या या प्रश्नाचे उत्तर मिळालंय... कदाचित कोणाला हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर मिळो.
एक लिहायचं राहिले.योगायोग म्हणत जगणं जेवढ छान आहे,तो प्रकार या दुकानांच ग्राहक होत पुढे जाण्यात नाही.

याची वाट पाहात असतात.
.
.
त्यांना पुढच्या फळीवर झोपायचं असतं.