शब्द

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
12 Oct 2020 - 8:27 pm

*शब्द*
शब्द देतात आनंद
दुःखही देतात शब्दच,
शब्दानेच मिळते वेदना
त्यावर मलम होती शब्दच !!

शब्दातून मिळते प्रेम
माया हि होतात शब्दच,
शब्दच नात्यांतला दुरावा,
नवी नाती जुळवतो शब्दच !!

ह्रदयातून यावा शब्द,
साखरमाखला गोड गोड,
भावनेने ओथंबलेला ,
काही नको त्यात तडजोड !!

कधी मुके होतात शब्द,
अन् बोलू लागतात डोळे,
भाव मनीचे याचे त्याला,
जातात समजून सगळे !!

झाडं वेली, डोंगर दरी
पक्षी बोलतात मधुर शब्द
मोहवणारं निसर्गाचं हरेक रूप.
तेथे मात्र सारंच निःशब्द !!
होई सारंच निःशब्द !!!

-©सौ वृंदा मोघे
15/1/2020

कविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

17 Oct 2020 - 2:07 pm | गणेशा

छान कविता

Jayagandha Bhatkhande's picture

30 Oct 2020 - 3:09 pm | Jayagandha Bhat...

शब्दा वाचून, कळले सारे....

चांदणे संदीप's picture

30 Oct 2020 - 3:23 pm | चांदणे संदीप

अवांतरः शब्दांवर बर्‍याच जणांनी लिहिलं आहे, बरेच जण लिहितात आणी लिहितही राहतील. बहुतेक दहावीत असताना मी एक अशीच शब्दांवर कविता लिहिलेली. बरेच दिवस मला स्वतःवर अभिमान वगैरे वाटायचा, अशासाठी की, मला वाटायचे मीच पहिला असेन ज्याने शब्दांवरच कविता केली. नंतर बर्‍याच रचना वाचनात आल्या. नव्याजुन्या वगैरे. तेव्हा तो अभिमानाचा फुगा फुस्स होऊन पडला खाली.

येनीवे, ही रचना छान झालीये.

सं - दी - प

VRINDA MOGHE's picture

30 Oct 2020 - 9:56 pm | VRINDA MOGHE

धन्यवाद