द सूटेबल बॉय..

Primary tabs

आजी's picture
आजी in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amद सूटेबल बॉय..

१. एक

"हॅलो."

"हॅलो, कोण बोलतंय?"

"मुग्धा, ओळखलं नाहीस?"

"कोण बोलतंय? नाव सांगा प्लीज."

"ओळख ना!"

"हे पाहा, तुम्ही जे कोणी असाल ते! आधी तुमचं नाव सांगा. तुमचा नंबर माझ्या मोबाइलवर आलाय. मी व्हेरिफाय करू शकते, तुम्ही कोण आहात ते! ठेवा फोन. यूसलेस! "

"अगं, किती चिडशील? आता नाव सांगितलंच पाहिजे. अग मुग्धा, मी समीर."

"कोण समीर?"

"समीर वैशंपायन. तुझा क्लासमेट. सर्वोदय स्कूल..... आता आणखी काही सांगायला हवं का?"

"ओहोहो.. समीर! ओळखलं नाही मी तुला! आवाज कमालीचा वेगळा वाटला. किती वर्षांनी भेटतोय आपण? आय मीन, बोलतोय आपण.."

"वीस वर्षांनी."

"या! निअर अबाउट वीस वर्षांनी. कुठून बोलतोयस?"

"इथे आलोय. रीगलमध्ये बसलोय आत्ता."

"तिथं उतरलायंस?"

"हं. ओळखलंस म्हणायचं. मला वाटलं आता तू मला पोलिसात देणार. अजूनही तसाच स्वभाव आहे तुझा! चिडका!म्हणे नंबर व्हेरिफाय करेन."

"आता खूप शांत झालेय रे. एखाद्या बाईला सरळ, स्मूथ करायचं असेल ना, तर तिचं लग्न लावून द्यावं. हा हा हा. घरी ये ना! भेटू या."

"भेटू या. पण घरी नको. रीगलमध्ये भेटू या. माझ्या रूममध्ये ये सरळ!"

"रीगलमध्ये का?"

"शाळा संपल्यानंतर ची आपली मैत्री रीगलमध्येच वाढली. आठवतंय ना?"

"आठवतंय."

" सग्गळं आठवतंय? अगदी सगळं सगळं? अं अं? हा हा हा."

"बंद करते फोन. अनूप यायची वेळ झाली. खायला करायला हवं काहीतरी."

"ओके. ओके. आदर्श माता. मग उद्या संध्याकाळी रीगलला! सहा वाजता. शार्प!"

"सहा वाजता नको. अनिरुद्ध ऑफिसातून यायची वेळ असते. आल्यावर मी नसले म्हणजे तो लगेच विचारेल ,'कुठं गेली होतीस' म्हणून."

"घाबरतेस नवऱ्याला?"

"नाही.प्राॅब्लेम काही नाही. जुन्या वर्गमित्राला भेटायला जातेय असं सांगितलं तरी चालेल. तो माइंड करणार नाही."

"फक्त जुना वर्गमित्र?"

"उद्या दुपारी बाराला भेटू. सकाळची कामंही आवरतात. कामवाली बाई पण येऊन जाते."

"ओके. ॲज यू विश. उद्या बारा वाजता. रीगलला. लंच."
"ओके. डन."

----++----+-----

२.दोन.

"मला वाटलंच होतं तू माझ्या आवडत्या पिंक कलरची साडी नेसशील म्हणून."

"ओह्. रियली? ठरवून नाही नेसले. जस्ट कोइन्सिडन्स."

"बरं बरं.. मीही तुझ्या आवडीचा निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलाय. हॅव यू नोटेड?"

"हं."

"आपण येत होतो त्यापेक्षा रीगल खूप बदललंय ना? एक्स्पान्शन केलंय. मेन्यू वाढला. रूम्स चकाचक."

"हं."

"काय घेणार? सूप, स्टार्टर्स? मेन्यू कार्ड बघ."

"खरं सांगू? लंच नको मला. तितकी भूक नाही. स्नॅक्स घेऊ काहीतरी."

"बियर घेशील? वाईन?"

"नको. मला आवडत नाही."

"मी घेतली तर?"

"घे ना. मला काही प्राॅब्लेम नाही."

"अनिरुद्ध घेतो?"

"ऑकेजनली."

"मग तू कंपनी देत नाहीस?"

"तो घरात घेत नाही. कधी, कुठं पार्टीला गेला तर घेतो. अनूप आता वाढत्या वयाचा आहे ना! त्यामुळं घरात नाही."

"हं. मग मीही घेत नाही आज. काय मागवू?"

"तूच ठरव. मला नाही जमत."

"हाॅटेलिंग करत नाहीस?"

"करते, पण अनिरुद्ध आणि अनूप जे मागवतात ते खाते."

"अनिरुद्ध डाॅमिनेटिंग आहे का गं?"

"डाॅमिनेटिंग नाही. पण मी त्याचं ऐकते. त्याला माझ्यापेक्षा जास्त कळतं असं माझ्या लक्षात आलंय."

"नोकरी करतेस?"

"लग्नानंतर एक वर्ष केली. पण अनूप झाल्यावर सोडली. त्याला सांभाळायला पाहिजे ना? सासूबाई किती दिवस राहणार?"

"आता पुन्हा कर ना!"

"खरं सांगू? मला नोकरीची गरज नाही. आम्ही वेल ऑफ आहोत. शिवाय अनूप आता मोठा होतोय. या वयात मुलं बिघडण्याची शक्यता असते. मी घरात लक्ष देणं महत्त्वाचं."

"वेळ कसा घालवतेस?"

"घरात काम नसतं फारसं. कामाला बाई आहे. पण नोकरांवर लक्ष ठेवावं लागतं. घरच्या जबाबदाऱ्या असतात. अनूपच्या अभ्यासावर लक्ष ठेवावं लागतं."

"तू घेतेस अभ्यास?"

"नाही. मला येत नाही तितकंसं. ट्यूशन्स आहेत."

"मग तू दिवसभर काय करतेस?"

"टीव्ही बघते. यू ट्यूब बघते. सिनेमे, सिरियल्स डाउनलोड करून बघते. दुपारी थोडी झोपते. संध्याकाळी...."

"आणि संध्याकाळी नटून थटून, अनिरुद्ध यायच्या वेळी त्याचं प्रसन्न चेहऱ्यानं, सुंदर दिसत स्वागत करतेस. त्याला एंटरटेन करतेस. त्याचं मन रिझवतेस. डिड आय गेस राइट?"

"समीर, तू माझी टिंगल करतोयस. यू आर गेटिंग टू पर्सनल नाऊ.."

"सॉरी. पण बहुतेक वेळा बायको हेच करते. म्हणून गंमत केली. तू पूर्वी स्वेटर्स विणायचीस."

"अजूनही विणते. स्वेटर विणण्यात मास्टर आहे मी."

"माझ्यासाठी विणशील, पूर्वी एकदा विणला होतास तसा?"

".... "

"सांग ना?"

"चल, मागव काहीतरी आता."

"ओके.. पण नुसते स्नॅक्स नकोत. जेवणाची वेळ आहे."

"मागव रे काहीही लवकर."

"वेटर! इधर आओ. दो फ्रेंच अनियन सूप पहेले. फिर बादमें पनीर बिर्यानी और व्हेज रायता. दो फ्राय पापड.."

"मुग्धा, ओके आहे ना ऑर्डर? तुझी आवड लक्षात आहे माझ्या."

"बऱ्याच गोष्टी लक्षात आहेत माझ्याही. तुझी जगावेगळी मतं, आपले मतभेद. 'मैं उडता पंछी! कुणाच्या हातात नाही लागणार' वगैरे वगैरे."

"समीर, लग्न केलंस?"

"नाही."

"का?"

"तुला तर माहीतच आहे, मला नाही आवडत! एकटंच राहायचं असं ठरवलं. मला दुसऱ्या कुणा माणसाच्या सहवासाची गरजच भासत नाही. माझा मी माझ्यावर खूश आहे. आय लव्ह मायसेल्फ. आय ॲम कम्प्लीट इन मायसेल्फ."

"ओह्! हा हा ! मी उगीचच समजतेय, माझ्यासाठी झुरतोयस म्हणून!"

"मुग्धा, मला हसू फुटतंय."

"तुझं हे हसू वरवरचं आहे बरं समीर! या हास्यामागं तुझी आसवं दडलीयत!"

"मुग्धा, डायलॉग मारू नकोस. आणि हसणं थांबव."

"नोकरी करतोस की तुझ्या डॅडचा बिझनेस सांभाळतोस?"

"डॅडचा बिझनेस. भरपूर पैसे कमावतो. चार गाड्या आहेत. फाॅरेन ट्रिप्स करतो. भल्यामोठ्या फ्लॅटमध्ये राहतो."

"तुला जसं आयुष्य हवं होतं तसंच जगतोयस तू! समीर नाव आहे तुझं. वाऱ्यासारखा आहेस तू. चंचल, प्रवाही, जाणवणारा, पण न दिसणारा."

"ओह ओह.. इज इट सो? थँक्स मुग्धा."

"एकटा असतोस, प्रेम जाऊ दे, निदान शरीराची गरज जाणवत नाही?"

"माझी एक मैत्रीण आहे. पण फक्त तेवढंच. नो इमोशनल इन्व्हाॅल्वमेंट."

"वा! बराच पुढे गेलायंस की!"

"थँक्स. हे मी काॅम्प्लिमेंट म्हणून घेतो. मी एकटा मजेत सुखात आहे."

"माझी आठवण कधी येते?"

"हो. येते मुग्धा!' वो जब याद आए बहोत याद आये!"

"समीर, अं.... आपलं लग्न झालं असतं तर?"

"तर माझाही अनिरुद्ध झाला असता आणि तू मुग्धा समीर वैशंपायन. माझ्यासाठी पिठलं भाकरी करणारी!"

"हसू नकोस समीर! तुझ्या हसण्यानं तुझ्या वेगळ्या जगात न राहणाऱ्या सगळ्यांचीच टिंगल करतोयस तू."

"येतंय मला हसू."

"मीही सुखात आहे समीर. नवरा चांगला आहे माझा. मुलगाही हुशार आहे. एका चाकोरीत पण स्थिर आणि शाश्वत आयुष्य आहे माझं. आय ॲम हॅपी विथ माय लाइफ."

"तू कुणाही बरोबर सुखातच राहिली असतीस मुग्धा, आदर्श भारतीय मुलीसारखी."

"माझा मोबाइल नंबर तुला कसा मिळाला?"

"दीपूनं दिला."

"ओह्"

"आपली ऑर्डर आली बघ. जेवू या. रोजच्या स्वयंपाकातून तुला चेंज."

------+---+++------------

३. तीन.

"आज उशीर झाला तुम्हांला ऑफिसातून यायला?"

"हो. काम होतं. अगं, दुपारी तुला दोनदा फोन केला. तू उचलला नाहीस."

"हो. मी जरा कामात होते. फोनकडे लक्ष नव्हतं. कशाला फोन करत होतात?"

"हेच, उशीर होईल म्हणून कळवायला."

"चहा करते."

"कुठं गेली होतीस? कशात बिझी होतीस?"

"एक जुना वर्गमित्र भेटला. काल त्याचा फोन आला. आज जेवायला जाऊ या, गप्पा मारू या म्हणाला. रीगलमध्ये जेवायला गेलो होतो."

"काल रात्री बोलली नाहीस."

"तुम्ही दमला होतात आणि मीही विसरले."

"समीर वैशंपायन का?"

"तुम्हाला कसं कळलं?"

"आपल्या लग्नाच्या आधी मला तुझ्या आणि त्याच्याबद्दल माहिती कळली होती. खरंच! लग्न का केलं नाही तुम्ही दोघांनी?"

"काही फारसं मोठं कारण नाही. तो माझ्यासाठी सूटेबल नाही हे कळलं मला. त्याच्यात 'नवरा मटेरिअल'नाहीये. तो मित्र म्हणूनच ठीक आहे, हे माझ्या लक्षात आलं. गंमत. टाइमपास. तसं नको होतं मला. तुम्ही चांगले वाटलात. मग तुमच्याशी लग्न केलं. तुमच्यात 'नवरा मटेरिअल' आहे. कुठल्याही मुलीला हेच हवं असतं. सुरक्षितता, प्रेम, निष्ठा, एक उबदार घर. हे सगळं तुम्ही मला देऊ शकाल याची खातरी पटली. यू आर माय सूटेबल बाॅय."

"कधी पश्चात्ताप झाला नाही ना?"

"अजिबात नाही. नो प्रॉब्लेम. छान चाललंय आपलं."

"थँक्स.. टाक चहा दोघांचाही.."

---------++--------------

प्रतिक्रिया

Format छान आहे. सर्व पात्रे वास्तवातली वाटतात. कोणाचीच बाजू शंभर टक्के आदर्श नाही हे वैशिष्ट्य आवडले.

Shrinidhi's picture

20 Nov 2020 - 5:03 pm | Shrinidhi

छान कथा

तुषार काळभोर's picture

21 Nov 2020 - 7:46 am | तुषार काळभोर

कोणाचीच बाजू शंभर टक्के आदर्श नाही हे वैशिष्ट्य आवडले.

Cuty's picture

15 Nov 2020 - 4:46 pm | Cuty

भावनांचा फार फाफटपसारा न मांडता अगदी मोजक्या शब्दात नेमका आशय व्यक्त करण्याचं कसब वाखाणण्याजोगं!!

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 5:52 pm | टर्मीनेटर

@आजी

'द सूटेबल बॉय..'

ही तुमची कथा आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

श्रीरंग_जोशी's picture

15 Nov 2020 - 10:08 pm | श्रीरंग_जोशी

कथा आवडली. पात्रांमधले थेट संवाद आवडले.

प्रचेतस's picture

16 Nov 2020 - 7:08 am | प्रचेतस

लेखनाची शैली खूपच सुंदर.
अतिशय आवडले लेखन.

निनाद's picture

16 Nov 2020 - 7:38 am | निनाद

सुंदर लिहिले आहे. खूप छान.

मित्रहो's picture

20 Nov 2020 - 12:30 pm | मित्रहो

फक्त पात्रांच्या बोलण्यातून कथा मांडण्याचा फॉर्मॅट खूप आवडला. संवाद प्रभावी वाटले. कथा छान आहे.

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2020 - 5:18 pm | टवाळ कार्टा

मस्तय

सतिश गावडे's picture

21 Nov 2020 - 5:55 pm | सतिश गावडे

मस्त हलकं फुलकं लेखन. सर्व पात्रे खरी वाटली.

बबन ताम्बे's picture

21 Nov 2020 - 8:13 pm | बबन ताम्बे

पात्रांच्या संवादातून कथा पुढे पुढे सरकते. खूपच छान कथा.

सौंदाळा's picture

21 Nov 2020 - 8:35 pm | सौंदाळा

आजी, मस्त कथा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Nov 2020 - 2:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

फारच आवडली,
पैजारबुवा,

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

23 Nov 2020 - 5:02 pm | सौ मृदुला धनंजय...

छान कथा

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2020 - 5:48 pm | चौथा कोनाडा

व्वा, किती समजूतदार माणसं आहेत, मुग्धा, समीर आणि अनिरुद्ध !
कथा आवडली. थेट संवादचा फॉरमॅट मस्तच !

+१

सुबोध खरे's picture

25 Nov 2020 - 6:58 pm | सुबोध खरे

समीर सारखी माणसं असतात.

एक आमचा वर्गमित्र आहे त्याचे सुरुवातीपासूनच असे म्हणणे होते कि मी एकाच स्त्रीशी जुळवून घेऊ शकत नाही किंवा तिच्या बरोबर संपूर्ण आयुष्य घालवने मला रुचत नाही.

त्याने यामुळेच लग्न केले नाही.( थोडक्यात नवरा टाईप मटेरियल नाही) तो अतिशय हुशार आहे. गेली कित्येक वर्षे कॅनडात स्थायिक आहे.

रुपी's picture

26 Nov 2020 - 10:54 am | रुपी

छान कथा! आवडली :)

आजी's picture

7 Dec 2020 - 8:23 pm | आजी

गवि-कथेचा फाॅरमॅट आवडला"हे वाचून बरं वाटलं.मला लिहिताना थोडी शंका होती.नुसतेच डायलॉग.वाचकांना आवडतंय की नाही , कुणास ठाऊक!

Shrinidhi-अभिप्रायासाठी धन्यवाद.

पैलवान-कुणाचीच बाजू शंभर टक्के आदर्श नाही,हे कथेचे वैशिष्ट्य आवडलं,हे वाचून बरं वाटलं.

Cuty-कथेत भावनांचा फापटपसारा नाही"हे आवडलं ... याबद्दल धन्यवाद.

टर्मीनेटर-माझ्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्यात तुम्ही,त्या आवश्यक आहेत.

श्रीरंग जोशी-तुम्हांला पात्रांमधले थेट संवाद आवडले ,हे वाचून समाधान वाटले.

प्रचेतस-"शैली खूप सुंदर". याबद्दल धन्यवाद.

निनाद-सुंदर लिखाण, याबद्दल थॅंक्स.

मित्रहो- धन्यवाद.
टवाळ कार्टा-थॅंक्यू.

सतीश गावडे-"सर्व पात्रे खरी वाटतात.हलकं फुलकं लेखन."अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

बबन ताम्बे-थॅंक्यू ताम्बेजी.

सौंदाळा-धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार-आभारी आहे.

सौ.मृदुला धनंजय-थॅंक्यू.

चौथा कोनाडा-कथेतली माणसं समजूतदार आहेत.हा तुमचा अभिप्राय मनाला आनंद देऊन गेला.

सुबोध खरे-तुमचं म्हणणं खरं आहे.समीरसारखी माणसं असतात.माझ्याही माहितीत आहेत.

रुपी-कथा आवडली?.वा! आभारी आहे.

मिसळपाव चा दिवाळी अंक तुम्ही सर्वांनी वाचलात.माझ्या कथेला भरभरून प्रतिसाद दिलात. त्याबद्दल आभार. इतर कामामुळे उत्तरं द्यायला उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. तुमचा प्रतिसाद हेच माझं टाॅनिक आहे.