आर्टिकल १५ चित्रपट आणि हाथरस

हस्तर's picture
हस्तर in काथ्याकूट
8 Oct 2020 - 12:26 am
गाभा: 

आर्टिकल १५ चित्रपट आणि हाथरस

आर्टिकल १५ चा रिव्यू माबो वर वाचला
त्यातले एक वाक्य परत टाकावेसे वाटते "यापुढे सिक्स पॅक वाले , 10 गुंडांना लोळवणारे , कुत्तों का झुंड कितना भी बड़ा हो उनके लिए एक शेर ही काफी होता है , आता माझी सटकली - असले नाटकी संवाद असलेले पोलीस पडद्यावर कधीही बघवणार नाहीत

यात मुख्य नायकाने कोणाला चापट पण मारलेली नाहीये..."

चित्रपट तूंनळी वर होता ,आता काढलाय तिथून
चित्रपटातून थोडा बदाऊ आणि उना प्रकरण का संदर्भ आहे असे वाचलेय
चित्रपट मध्ये एक सीन आहे पोलीस ऑफिसर सरळ पोस्ट मार्टेम वाल्या डॉक्टर ला सांगतो बलात्कार झाला नाही असे लिहा ते बघुन हाथ् रस आठवले

बरेच लोकांनी विरोध केला कि एका जातीवर डूख धरलाय पण हिरो पण त्याच जातीचा आहे

मुख्य म्हणे चित्रपट रिऍलिस्टिक आहे ,आपल्या हाताखालचे पासून वरिष्ठ सगळ्यांशी लढून हिरो न्याय मिळवतो

ह्यात झीशान अयुब चे पात्र चंद्रशेखर वर बेतलेले आहे ,त्याचा एन्काऊंटर का केला हे कलीअर नाही

उत्तरदायित्वास नकार :- हाथर्स मध्ये नेमके काय झाले हे पोलीस रिपोर्ट व शासन ठरवेल .मी फक्त योग योग दर्शवू इच्छितो मीडिया रिपोर्ट अनुसार

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Oct 2020 - 11:54 am | अमरेंद्र बाहुबली

छान आहे सिनेमा. ऊत्तर प्रदेशातील परिस्थीती ऊत्तमरित्या मांडलीय सिनेमांत.

चौथा कोनाडा's picture

9 Oct 2020 - 5:50 pm | चौथा कोनाडा

आरोपी + पोलिस,
पोलिस + राजकारणी
राजकारणी + गुंड
गुंड + समाजसेवक
समाजसेवक + वकिल
वकिल + तपास यंत्रणा
तपास यंत्रणा + गुप्तचर लोक
राजकिय पक्ष + तपास यंत्रणा
सत्ताधारी + आरोपी
टिव्ही चॅनेल्स + राजकारणी

अश्या विविध परम्युटेशन कोंम्बीनेशन वाल्या युत्या वेळोवेळी होत राहतात,
ज्या त्या वेळेच्या गरजेनुसार.
आपण भाबडे बाळबोधपणे पहात राहतो,
जे वाचतो, पाहतो त्यावर विश्वास ठेवतो,
कधी सगळ्यांचच खरं वाटतं,
कधी सगळ्यांचच खोटं वाटतं,
सुरुवातीला टाईमपास छान वाटतो,
नंतर उबग येतो, डोक्यात कोलाहल होतो
कारण आपण सामान्य असतो,
बघत राहण्या व्यतिरिक्त काहीच करु शकत नसतो !

त्यामुळं सुशांतसिंग काय हाथरस प्रकरण काय,
काय मत व्यक्त करणार ?

अर्धवटराव's picture

9 Oct 2020 - 9:43 pm | अर्धवटराव

+ जनता
पब्लीक या युत्यांपासुन अप्लिप्त नाहित. आपण त्यांचाच एक भाग आहोत.

चौथा कोनाडा's picture

10 Oct 2020 - 1:06 pm | चौथा कोनाडा

बरोबर. प्रत्येकजण कुणाला ना कुणाला ओरिएण्ट झालेला आहे.
पण कोलाहलातून अधुनमधुन वैराग्य स्वीकारून शांत राहणं बरं वाटतं, तेवढाच डिटोक्स !

(खरंतर आर्टिकल १५ सितानेमावर देखिल काहीतरी मत व्यक्त करता आलं असतं पण मी तो सिनेमा पाहिलेला नाहीय, पण कोलाहलाबाबत मत पटकनी व्यक्त झालं, आज काल अश्या विषयांवर (मोजले अपवाद सोडले तर) फार काही मतं व्यक्त होताना दिसत नाहीत, संस्थळे, टिव्ही चॅनल्स, यूट्युब, फेसबुक, व्हॉटसप सगळीकडेच प्रचारबा़जी आणि मतमतांतरे याचा मारा दिसून येतो)

शा वि कु's picture

10 Oct 2020 - 3:40 pm | शा वि कु

आर्टिकल १५ अगदी भयंकर सिनेमा आहे. थिएटर सोडून निघून जावे इतकी भीती वाटत होती काही ठिकाणी. पण सर्वांनी बघावा असा आहे.
सिनेमातल्या कथेचे सद्य घटनेच्या वार्तांकनाशी बरेच साम्य आहे.