मावळतीला

Pratham's picture
Pratham in जनातलं, मनातलं
29 Sep 2020 - 11:54 am

दिवस मावळतीकडे झुकताना सावल्या अदृश्य होऊ लागतात.मनात एक हुरहूर लागून राहते.ती हुरहूर आपल्याला नेमक्या शब्दांत व्यक्त करता येत नाही,हवीहवीशी तरीही नकोशी.एक वेगळीच भावना असते ती.चार भिंतीमध्ये बसून राहिले तर मन उदासीन होते तेच जर मोकळ्या हवेत गेले तर एकदम शांत वाटते,अस्तित्वाची जाणीव होते.सूर्य मावळतानाचे दृश्य खूप सुखद वाटते.सूर्य हळूहळू कलत असतो,आकाशात तांबड्या-केशरी रंगाची उधळण असते.एखाद्या तळ्या किनारी मावळतीचे दृश्य भलतेच सुंदर दिसते.पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते,आकाश लाल रंगात न्हाहून गेलेले असते,पक्षी दिवसभर अन्नासाठी भटकून परतताना दिसतात.झुंडीने ते एका संथ लयीत उडत असतात.पाण्याचा एकसारखा मधुर आवाज येत असतो.आकृत्या हळूहळू धूसर होऊ लागतात.चंद्र सूर्याच्या अदृश्य होण्याची वाट बघत असतो.रातकिड्यांचा आवाज येतो.वाऱ्याची एक झुळूक अंगाला शिरशिरी देऊन जाते.मोठे प्रसन्न व विलोभनीय दृश्य असते ते.

साहित्यिकजीवनमानप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

1 Oct 2020 - 12:49 pm | कंजूस

छान.

Pratham's picture

14 Oct 2020 - 11:17 pm | Pratham

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2020 - 7:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लिहिलं आहे. अजून लिहिते राहा. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

Pratham's picture

14 Oct 2020 - 11:17 pm | Pratham

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

6 Oct 2020 - 5:16 pm | चौथा कोनाडा

सुरेख लिहिलं आहे. जास्त लिहायला हवं होतं असं वाटतं !
(कुठल्या तरी पुस्तकातील परिच्छेद वाटतोय)
पुलेशु !

धन्यवाद,असे लेखन मी मारुती चितमपल्ली व व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकांतून वाचले आहे.

वाचल्याबद्दल धन्यवाद