कोविड योद्धा - अथर्व

विटेकर's picture
विटेकर in जनातलं, मनातलं
21 Sep 2020 - 5:07 pm

दि २३ ऑगस्ट ला माझा मोठा मुलगा ( वय २४ ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोविद केयर सेंटर मध्ये सेवेसाठी म्हणून दाखल झाला. घरात गणपती बसले होते पण त्याने ठरविल्याप्रमाणे तिथे जायचे ठरविले आणि बाप्पाना सांगून तो गरवारे कॉलेज पुणे येथील सेंटरमध्ये दाखल झाला. त्यापुर्वी ही त्याने स्क्रीनिंगचे काम केले होते पण आता थेट पॉझिटिव्ह लोकांच्याबरोबर काम करायचे होते. त्याला नव्हता पण आम्हाला थोडा ताण आला होता.

दि ३० ऑगस्ट पर्यंत त्याने एक आठवडा काम केले ,त्यानंतर विलगीकरण असे ठरले होते पण स्वयंसेवकांची कमतरता म्हणून तो पुढच्या बॅच मध्येही सामील झाला .. दुर्दैवाने मंगळवारी , त्याच्या बरोबर काम करणाऱ्या एका योद्ध्याला त्रास झाला आणि सर्वाना काम थांबवून विलग कक्षात जावे लागले. शनिवारी दि. ५ तारखेला अथर्व - माझा मुलगाही पॉझिटिव्ह निघाला .. त्या कालावधीत त्याला कोणतीही लक्षणे नव्हती पण पुढील १० दिवस काम करता येणार नाही असे लक्षात आले. त्यापुढील विलगीकरण संपवून रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर तो या बुधवारी रात्री १६ सप्टेंबरला रात्री घरी आला,अधिक काळजी म्हणून त्याला निगेटिव्ह रिपोर्ट असताना देखील घरीच विलगीकरण केले होते.

या कामासंदर्भात फिकर. कॉम या संस्थेने त्याची मुलाखत घेतली आणि त्याअनुषंगाने पालक म्हणून आमचीही मुलाखत घेतली. ती सोबत जोडली आहे. अथर्व , श्रुती अथवा अन्य स्वयंसेवकांनी यांनी काय केले, हा मोठेपणा सांगण्याचा उद्देश नसून काम करणाऱ्या स्वयंसेवकांची नितांत आवश्यकता आहे .. अधिकाअधिक सक्षम तरुणांनी पुढे यावे म्हणून हे आपल्यासमोर मांडण्याचा हा प्रपंच !

संकट मोठे आहे .. आपण सारे उभे राहू तरच यातून आपला समाज उभा राहणार आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे .. तुमचाही हात लागावा अशी प्रार्थना आहे.

https://youtu.be/R1Ap2onBwCU

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

अथर्व आणि पालक म्हणून तुम्हा दोघांचे खूप अभिनन्दन आणि शुभेच्छा !
सतत सामजिक उपक्रम करत रहाणे हे तुमचे व्यसन उत्तरोत्तर वाढत राहो, इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळत राहील.

आम्हीही सध्या अश्याच काहीश्या मनस्थितीतून जात आहोत.
नुकतीच डॉक्टर झालेली आमची कन्या प्रशिक्षण काळात गेले अडीच महिने न थांबता कोविड-१९ विभागात काम करत आहे.

माहितगार's picture

21 Sep 2020 - 7:06 pm | माहितगार

शब्दात न मावण्या पलिकडे कौतुकास्पद, प्रेरणादायी, स्तुत्य आणि अभिनंदनीय.

सुबोध खरे's picture

21 Sep 2020 - 7:17 pm | सुबोध खरे

कौतुकास्पद, प्रेरणादायी, स्तुत्य आणि अभिनंदनीय.
+१००

डॅनी ओशन's picture

21 Sep 2020 - 7:31 pm | डॅनी ओशन

.

विरकर आणि खेडूत अभिमानास्पद आहे.
.
आम्ही काहीच करत नाही.

कुमार१'s picture

21 Sep 2020 - 8:02 pm | कुमार१

अभिनन्दन आणि शुभेच्छा !

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Sep 2020 - 9:51 pm | अनिरुद्ध.वैद्य

अभिनंदन!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Sep 2020 - 2:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

अथर्व, श्रुती आणि खेडूतकाकांच्या कन्येचे कौतुक वाटले.

येणारी पिढी म्हणजे फक्त "यो" लोक्स, सतत मोबाईल इन्टरनेट, व्हॉट्सप, ट्विटर मधे रंगलेले अशी एक कल्पना होत चालली होती. त्या कल्पनेला या मुलाखतीने सुखद तडा गेला.

येणारी पिढी जर अशी असेल तर आपल्या देशाचे भविष्य उज्वल आहे.

पैजारबुवा,

सुचिता१'s picture

22 Sep 2020 - 11:16 pm | सुचिता१

अभिनंदन!! खूप खूप शुभेच्छा!!!

मार्गी's picture

23 Sep 2020 - 12:58 pm | मार्गी

ओहहह!!!! ग्रेट!!! अभिनंदन आणि अशा सर्व योद्ध्यांना सॅल्यूट!