कानडा राजा पंढरीचा ह्यातील कानडा ह्याचा अर्थ काय ?

साहना's picture
साहना in काथ्याकूट
16 Sep 2020 - 11:19 pm
गाभा: 

मला दोन वेगळे अर्थ सापडले

कानडा - ज्याला आपण समजू शकत नाही. विकी असा अर्थ देते पण शब्दाची व्युत्पत्ती देत नाही. इंग्रजीत ह्याला अन-फेथॉमेबल असे म्हटले जाऊ शकते पण कानडा हा शब्द अभंग सोडून इतर कुठेही वाचनात आलेला नाही.

कानडा - कन्नड प्रदेश. विठ्ठल हे दैवत कर्नाटक प्रांत आणि कृष्णदेवराय ह्यांच्या राज्याशी संबंध ठेवून असल्याने (?) विठ्ठलाला कन्नड प्रांताचा राजा असे संबोधित केले आहे.

पण गदिमा सारखे आधुनिक कवी कशाला कन्नड प्रांत आपल्या अभंगात लिहितील ?

कुणाला जास्त माहिती आहे का ?

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

17 Sep 2020 - 12:20 am | कानडाऊ योगेशु

ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे ना
कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु!
गदिमांनी हा संदर्भ वापरला असावा.

कोहंसोहं१०'s picture

17 Sep 2020 - 2:18 am | कोहंसोहं१०

इथे कानडा चा अर्थ कन्नड प्रदेशातला आहे. अशी समजूत आहे की विठ्ठल हा मूळचा तिथलाच. पुढे काही कारणामुळे (बहुतेक राजांमधील युद्धे, आक्रमण) तो पंढरपुरास आला. हे एकदा शंकर अभ्यंकर यान्च्या एका व्याख्यानात ऐकले होते.

हम्पीच्या विठ्ठल मंदिरातील ती मूर्ती आहे. आताचे मंदिर आहे तिथे खूप पूर्वीही छोटेसे मंदिर असावे. ते पुढे विजयनगरच्या काळात वाढवले असणार. तिथे आता मूर्ती नाही.सुलतानांच्या आक्रमणाच्या भीतीने विठुची मूर्ती इकडे दूर आणली.मूर्तीचा दगड हम्पीच्या देवळाशी समन्वय साधतो. टोपी आहे ती गुराखी मुलं कापडाची घालतात तशी आहे. गोपाळ( कृष्ण) गुराख्यांचा देव असू शकतो. हम्पी परिसरात देवळांच्या खांबांवर घोंगडीवाला काठी घेतलेला (कृष्ण) असे शिल्प आढळते. तिकडच्या विरळ भागात गुराखी असतील. त्यांची एक काठी धरण्याची पद्धत असते. हात कमरेवर ठेवून त्यात काठी आडवी धरायची. ( गुजरातकडचे गुराखी खांंद्यावर काठी आडवी धरून त्यावर हात ठेवतात.) तर मूर्तीला हेच रूप दिले असावे. आता जरी त्या हातात शेला ठेवतात तरी काठीच असावी.

पंढरपुराच्या जुन्या शंकराच्या देवळात ही मूर्ती बसवली गेली. रूप पालटवले तरी तळाकडची शिल्पे शिवालयाचीच आहेत.

पुन्हा एक प्रश्न पडतो की हीच मूळ मूर्ती आहे का? मूळ मूर्ती छोटी आणि अशीच असेल पण विटेशिवाय असावी. पायाखाली धोंडा असेल. सवय - उंचवट्यावर उभे राहून गुरांवर लक्ष ठेवणे.
तेराव्या शतकाच्या मध्यंतरात मूर्ती पंढरपुरात आणली असावी. त्यानंतळचा काळ गोरा कुंभार, ज्ञानेश्वर. ( गोरा कुंभाराच्या कथेत विटेचा उल्लेख आहे.) पंढरपुरातही धोका वाटल्याने ती लपवली गेली आणि नवीन मोठी केली गेली असणार. ती आताची.
असा का न डा विठ्ठल.

मी पण थोडीफार अशीच माहिती ऐकली आहे. मूर्ती नाही पण आज जी विठूमाउली पंढरपुरात आहे ती पूर्वी कर्नाटकातील हम्पी येथे मुक्कामी होती अशा अर्थाची.

चौकटराजा's picture

18 Sep 2020 - 8:19 pm | चौकटराजा

मी ही अशीच हकिगत ऐकली आहे ! ही देवता मुळात कर्नाटकातील आहे ! पुंड्लिकाला दर्शन देण्या साठी विठ्ठल आले व ते तेंव्हापासून विटेवर उभे आहेत असे काही !

हे थोडे कयास आहेत. वीट नंतर आली महाराष्ट्रात असं वाटतं.

Gk's picture

17 Sep 2020 - 9:37 am | Gk

हेच लिहिले आहे

चौथा कोनाडा's picture

17 Sep 2020 - 1:26 pm | चौथा कोनाडा

खालील दुव्यावर विठ्ठल कानडीच का या वर सविस्तर विष्ष्ण आहे विश्लेषण आहे

https://vishwakosh.marathi.gov.in/32633/

कंजूस's picture

17 Sep 2020 - 2:50 pm | कंजूस

आता पंढरपुरात गेल्यावर
"नमस्कारा, यावाग बन्दिद्दीरा? नीवू कुशला?
म्हणायचे.

मनो's picture

17 Sep 2020 - 10:45 pm | मनो

कानडा - कन्नड प्रदेश.

श्री. ग ह खरे यांनी एक सुरेख पुस्तक 'श्रीविठ्ठल आणि पंढरपूर' लिहिले आंहे त्यात सगळी माहिती सविस्तर दिलेली आहे.

विजुभाऊ's picture

18 Sep 2020 - 11:57 am | विजुभाऊ

कानडा हा शब्द कान्हा या शब्दाचे लडिवाळ रूप कानुडा याच्याशी साधर्म्य सांगतो

पर्सनाली मला तरी ही स्थळवाचक विशेषणे असतील असे वाटत नाही..

बाकी

कर्नाटक चा अर्थ काय?

Gk's picture

18 Sep 2020 - 1:59 pm | Gk

राम शेवालकरणी नाटके करणारा तो कर्नाटकू असा अर्थ दिला आहे
पण ते पटत नाही

कर्नाटकू , म्हणजे कर्नाटकशी संबमधीत

घाटी , कोकण्या , अलिबागवरून आलास का ? , इटलीची बाई , सदाशिव पेठी, मारवाडी , गावठी ही जशी संबोधन आहेत,

तसे कर्नाटकू

https://youtu.be/qwTwbobVPzA

मुळात कर्नाटक या शब्दाचा अर्थ काय?

पर्सनाली मला तरी ही स्थळवाचक विशेषणे असतील असे वाटत नाही..

बाकी

कर्नाटक चा अर्थ काय?

असे वाचण्यात आले आहे की श्रीकृष्णाचा मृत्यू त्याच्या वयाच्या १२५ व्या वर्षी द्वारकेतच झाला. तत्पूर्वी तो महाभारताच्या युद्धानंतर ३६ वर्षे द्वारकेला येऊन राज्य केले. मधला काही काळ तो कर्नाटक-पंढरपूरला येऊन गेला होता का ? विठ्ठलाच्या आरती उल्लेख असलेली राही (राही रुख्माई राणी या सकळा मधली राही ) कोण होती. ती पंढरपूरची वै होती का ? तिच्या बद्दल आणखी काय माहिती उपलब्ध आहे ?

अर्धवटराव's picture

18 Sep 2020 - 8:10 pm | अर्धवटराव

मिपावरच कुठल्यतरी धाग्यात राहि म्हणजे राधा असा उल्लेख वाचला होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2020 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावरील आमचं कोणता मानू मी विठठल ? हे लेखन आठवून गेले. (आमची लेखन जाहिरात)

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

18 Sep 2020 - 7:31 pm | मदनबाण

प्रा.डॉ. हा लेख उघडल्यावर तुमच्या लेखाचीच आठवण आली होती ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू

कंजूस's picture

19 Sep 2020 - 9:53 am | कंजूस

हा लेख उघडला आणि वाचला. पुन्हा सावकाश वाचेन आणि प्रतिसाद देतो. या निमित्ताने माढा आणि जुने पंढरपूर गाव येथे जाण्याचा विचार आहे.

स्कंद पुराण आणि पदमपुराणाशिवाय विष्णुपुराणांतर्गत तिसरे माहात्म्य डॉ ढेरे याना उपलब्ध झाले होते पण त्यात गूढ मंत्राचा श्लोक आहे कि नाही याबाबत ते खुलासा करत नाहीत. या माहात्म्याबद्दल संशय वाटण्याचे कारण म्हणजे ही माहात्म्ये लोकजीवनात मूर्ती प्रसिद्ध पावल्यानंतर लिहिली गेली असल्याचा संभव असून त्यांना प्राचीनत्व प्राप्त होण्यासाठी पुराणांचा साज चढविला गेला आहे. सत्यनारयणा पोथोला जसे ' स्कंदपुराणे रेवाखंडे' या शादप्रयोगाने प्राचीनत्व देण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून या माहात्म्यांची विश्वसनीयता व प्राचीनता कितपत मानायची याचा संशोधकांनी विचार केला पाहिजे. शिवाय पुराणांच्या प्रतीमध्ये एकवाक्यता
नाही. वेळोवेळी त्यात भर घालण्यात आलेली दिसते. त्यामुळं मूळ थी कोणती व त्य।त कसेकसे बदल होत गेले याचे संशोधनझाल्याशिवाय माहात्म्ये संशोधनाचे साधन होऊ शकणार नाहीत.

डॉ. ढेरे यांच्या मते आद्य विठ्ठलमूर्ती चे अनन्य साधारण वैशिष्ठ्य म्हणजे त्यावर कोरलेला नाममंत्र कूटलोक होय परंतू आपण हे पाहिले आहे को, ही दोनही माहात्म्ये ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीय वाटत माहीत. त्यापेक्षाही अधिक विश्वसनीय मूर्तीचे लक्षण. म्हणजे संतानी वर्णंत केलेले विठ्ठलमूतिचे स्वरूप हे होय. विठलाच्या मूर्तीवर जर मंत्राक्षरमाला असती तर संतानी त्याचा उल्ळेख केला असता. विठ्ठलाचे नित्य दर्शन घणारे, पंढरपूरात स्थायिक असणारे, व मूर्तीचे संपूर्ण दर्शन होण्याची सहजशक्यता असलेल्या, संताच्या वर्णनात मंत्राक्षरमालेचा लवमात्र उल्लेख नाही. यांने स्पष्टीकरण करण्याचे उत्तरदायित्व डॉ. ढेरे यांना मुळीच टाळता येणार नाही. भक्‍त- सम्राट नामदेव महाराज, संत जनाबाई, शिवकल्याण यासारच्या पंढरपुरवासीय व नित्य दक्षंन घेणार्‍या संतांच्या वर्णनात मंत्राक्षर मालेचा उल्लेख नसणे हे आश्चर्य कारक वाटते. त्यामुळ अश्या तर्‍हेची मंत्राक्षरमाला या प्राचीन मूर्तीवर नसावी असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. आद्यमूर्तीच्या वर्णनात संतांचे शब्द
विश्‍वसनीय का? ज्यांच्या विश्‍वसनीयतेबद्दल शंका आहे अशा माहात्म्याची वणंने प्रमाण मानावयाची याच्याबद्दल फारसा संदेह बाळगण्याचे कारण नाही. संतांची वर्णने अधिकृत समजावयास कोणतीच हरकत वाटत नाही. अर्थात ज्यांना प्राचीन मूर्तीच्या अनन्य साधारण वेशिष्ठ्याचा डोलारा उभा करावयाचा आहे
त्यांना मात्र ही वर्णने नि:संशय अडचणीत टाकणारी आहेत.

आपल्या सिद्धांताला अन्य रचनांची पृष्टी म्हणन जी इतर साधने 'विठ्ठलसहस्रनाम स्तोत्र' ' विठठल अष्टोत्तर शतनाम स्तोत्र' डॉ. ढेरे घेतात त्या साधनांच्या प्राचीनतेबद्दल ते स्वतः साशंक आहेत आणि त्यांचे कारणही ते मान्य करतात. अशा कृतींचा “ रचना हेतूच मळी पावित्र्य व प्राचीनता वाढवून सांगण्याचा असतो आणि त्यासाठी त्यांचा कर्ता आपले नांव पुसून टाकोत असतो.” डॉ. ढेरे यांचा हा मुद्दा अगदी बरोबर आहे

Gk's picture

19 Sep 2020 - 2:17 pm | Gk

सोनावणीच्या कादंबरीतही हाच प्रश्न आहे.

कुणी स्वतच्याच नावाचा जय असा मंत्र स्वतःच्याच छातीवर कोण कोरेल ?
विठ्ठल जर विष्णूचाच अवतार तर त्याच्याच छातीवर विषणवे नमो असे कुणी का लिहावे ?

महासंग्राम's picture

19 Sep 2020 - 2:26 pm | महासंग्राम

कादंबरी वाचली नसल्याने आपल्याला काय म्हणायचे आहे नेमकं कळलं नाही

पण विठ्ठल हा विष्णूचाच अवतार आहे हे नक्की

धन्यवाद या दुव्याबद्दल!!

माहितगार's picture

19 Sep 2020 - 8:12 am | माहितगार

कन्नड- एटीमॉलॉजीकल डिक्श्ननरीचा एल पिडीएफ दुवा आंतरजालावर आहे,- एटीमॉलॉजीकल लिहिले असले तरी व्युत्पत्तींची खुपशी चर्चा त्यात दिसत नाही संस्कृतोद्भव आणि संस्कृतेतर शब्द समजण्यात उपयोग होत असावा. त्यातही कर्नाटक आणि कन्नड या शब्दांची व्युत्पत्तीचर्चा मला दिसली नाही पण माझ्या नजरेतून सुटली असल्यास जिज्ञासूंनी पुन्हा तपासून पहावे. कानडी ची लेखन परंपरा मराठीच्या आधी पासूनची असूनही कन्नड शब्दाच्या व्युत्पत्तीची चर्चा कमी का हे माहित पडत नाही.

* http://www.aa.tufs.ac.jp/~tjun/data/kandic/kannada-english_dictionary.pdf

बाकी संबंधीत विषयावर पंढरपूर या स्थलनामाची चर्चा करणारा आमचाही एक धागा आहे त्याची या निमीत्ताने जाहीरात.