वेढा

rushikapse165's picture
rushikapse165 in जनातलं, मनातलं
12 Sep 2020 - 8:08 am

अंकिता. . . . . . . अमृता मोठ्याने किंचाळली.आवाज आला त्या दिशेने मी वळलो.बघितलं तर समोर तीन ते चार मुलींचा घोळका होता,त्या गलका करत होत्या,त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच तणाव दिसत होता,थोडं पुढं जाऊन बघितलं तर एक मुलगी खाली भिंतीच्या आधाराने खाली बसलेली होती,तिच्या चेहर्‍यावर अशक्तपणाचे लक्षण दिसत होते.ती होती अंकिता.माझी सर्वात चांगली मैत्रीण.इतर मुली तिला धीर देत होत्या,नेमकं काय झालं ते जाणून घेण्यासाठी मी तिथे गेलो,तश्या त्या सर्वच मला ओळखत होत्या.मी सरळ अंकिताच्या जवळ जाऊन बसलो,तिचे डोळे तसे अर्धवट झाकलेले होते,कोणीतरी आहे याची जाणीव तिला झाली,पण नेमकं कोण हे तिला अजून कळालं नव्हतं.
मी तिच्या कपाळावर माझ्या उजव्या हाताची चार बोटे ठेवली,ती तापाने फणफणत होती.मी अमृताकडे पाहिलं,तर तिला चक्कर आली हे कळालं.मी सहज अंकिता अशी तिला हाक मारली,त्या अवस्थेतही तिने मला ओळखल,ऋषी.ते ऐकून मी तसाच उभा राहिलो,माझ्यासोबत अनिकेत देखील होता,तिला दवाखान्यात नेणे गरजेचं होतं पण उभा राहण्याचं बळ तिच्यात नव्हतं.म्हणून मग मी तिला उचलून घेतलं,तिचा डावा हात माझ्या मानेवरून समोर आलेला होता,मी चालू लागलो,तसा त्या हाताचा विळखा अजूनच घट्ट होत होता,तिचं डोकं माझ्या ह्रदयावर टेकलं.तसा एका वेगळ्याच शक्तीचा संचार माझ्यात झाला.
मागची अठरा वर्षँ पुन्हा आठवू लागली,आमची अठरा वर्षांची मैत्री,ते शाळेतले दिवस,चौथीच्या इतिहासातला थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न,तेव्हा थोडक्यात म्हणजे थोडंसंच वाटायचं पण जेव्हा उत्तर बघितलं तर हे थोडक्यातच आहे म्हणून निखळ हसणारे आम्ही,अगदी सगळच काही पुन्हा डोळ्यांसमोर फिरु लागलं.किती आनंददायक होतं आमचं बालपण.अगदी कसलीच बंधन नाहीत,का कुठली अपेक्षा, चेहर्‍यावरती केवळ निरागस आनंद.पण बाल्यावस्था संपली अन आम्ही बांधलो गेलो ते वयाच्या बंधनात,जातिधर्माच्या बंधनात,ज्यांना राधा-कृष्णाची प्रेमकथा पटते पण एक मुलगा-एक मुलगी यांच प्रेम लफडं वाटत त्या समाजाच्या बंधनात.
या वयाच्या बंधनांमुळे मागची कित्येक दिवस आम्ही एकमेकांना नीट भेटलो देखील नव्हतो.भेट व्हायची ती फक्त काॅलेजात,अगदी तुरळकच.आणि मग फक्त एकमेकांकडे बघून स्मितहास्य.ती क्लासला जायची तेव्हा मी वाटेत कुठेतरी लपून वाट बघायचो,तिच्या येण्याची,फक्त तिला बघण्यासाठी.आणि तिला बघून मन खूश व्हायचं.पण आज कुठलीच बंधनं मला थांबवू शकली नाहीत,तिल‍ा गाडीवर बसवलं मागे अमृता तिला आधार देण्यासाठी बसलेली.गाडी चालवताना तिची मान माझ्या पाठीवर होती,मध्येच एखाद्या खड्डयामुळे ती मागेपुढे होऊन माझ्याच पाठीवर रेलायची.त्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळीच आपुलकी होती,मागची कित्येक वर्ष मी त्या स्पर्शासाठी थांबलो होतो,त्या स्पर्शात एक वेगळाच रोमांच होता.खरतर कधी बोलण्याची हिंमत दाखवली नव्हती,पण आयुष्यात आलेल्या मुलींमध्ये आकर्षण आणि आवड यांच्यापलीकडे काहीतरी वाटलेली ती एकटीच होती,माझी प्रेयसी.मला तरी असंच वाटत हे एकतर्फी असावं.त्या प्रत्येक क्षणात एक वेगळीच जादू होती.एवढे दिवस फक्त लांबूनच चाललेला संवाद,कधी फक्त डोळ्यांतून.पण आज तिचा स्पर्श माझ्याशी काहीतरी वेगळच हितगुज करत होता,कधी वाटलही नव्हतं तिचा स्पर्श मला अश्या पद्धतीने होईल.आज ती शुद्धित नाही,पण जर शुद्धीत असती आणि तिचा स्पर्श झाला असता तर,काय झालं असतं?मनात कित्येक प्रश्न चालू होते,आज जणू मी तिला त्या मुर्च्छित अवस्थेत सांगत होतो,हो अंकिता तूच माझं प्रेम आहेस,आजवर अनेक मुली आयुष्यात आल्या,मला त्यांच्याबद्दल आकर्षण देखील वाटलं आणि आजही वाटतं,पण तू माझं आकर्षण नाहीस,तू माझं प्रेम आहेस.
मनात विचारांचा गोंधळ चालूच होता,जवळच्या दवाखान्यात तिला नेलं,काहीवेळाने तिला शुद्ध आली,ताप थोडासा उतरला,आम्ही तिथेच होतो,अमृताला ठाऊक होतं मला अंकिता आवडते,अंकिता बाहेर आली,तशी तिची नजर माझ्यावर पडली,तिचा चेहरा अजूनही थोड‍ा सुकलेला होता,डोळ्यांची उघडझाप चालूच होती,माझ्याकडे बघून तिने स्मितहास्य केलं,मी ही जवळ जाऊन तिची विचारपूस केली,आता तिला घरी घेऊन जायचं होतं,दवाखान्यात येताना रस्ता तसा मोकळाच होता,पण आता घरी न्यायचं म्हणजे अवघडच,एक मुलगा एक मुलगी सोबत म्हणल्यावर लोकांची तोंडं उघडणार,अमृता तशी माझी मानलेली बहिनच,हे अगदी घरीदेखील ठाऊक होतं,म्हणून मग मी माझी गाडी तिला दिली,अंकिता तिच्यासोबत जात होती,माझी पावलं अडखळली मी जागेवरच थांबलो,काही पावलं पुढं जाऊन अंकिताने मागे वळून पाहिलं,मी जागेवरच उभा होतो,तिने तिच्या उतरलेल्या आवाजातच मला हाक मारली,ऋषी.मी पुढे गेलो,माझा हात हातात घेतं ती माझ्या डोळ्यात बघून बोलली थँक्यू!पण मला वेगळच काही ऐकायच होतं,पण तो थँक्यू हा शब्द देखील मला माझ्याच मनातला वाटला,तिच्या डोक्यावरुन हात फिरवत मी तिला बोललो काळजी घे,पुन्हा एकदा ती हसली,त्या हसण्याने मात्र मी पुर्ण वेडा झालो, अमृता तिला घेऊन पुढे गेली,मी तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहतच राहिलो,आता ती आकृती दिसेनाशी झाली,माझ्या मनाभोवती तिच्या विचारांचा वेढा पडला,त्यातून बाहेर पडणं मला जमेचना,क्षणाक्षणाला तो वेढा अजूनच तीव्र होत होता,शेवटी नकळत एक उद्गार बाहेर पडला अंकिता.

कथाप्रकटनलेखअनुभव

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

12 Sep 2020 - 12:10 pm | दुर्गविहारी

उत्तम लिखाण !

rushikapse165's picture

12 Sep 2020 - 12:14 pm | rushikapse165

धन्यवाद!

Ajit Gunjal's picture

14 Sep 2020 - 7:52 pm | Ajit Gunjal

Thanks

Nice Written
Rahuri News

rushikapse165's picture

16 Sep 2020 - 9:24 pm | rushikapse165

धन्यवाद!

Ajit Gunjal's picture

29 Sep 2020 - 4:25 pm | Ajit Gunjal

Manatale

मनातल्या भावनांचा घेतलेला हळुवार कानोसा,
मनातल्या येणाऱ्या प्रत्येक ज्वलंत ,उस्फुर्त ,सामाजिक ,प्रेमळ ,मिखळ भावनांचा घेतलेला हळुवार कानोसा.
Latest Kopargaon News in Marathi

rushikapse165's picture

14 Oct 2020 - 8:23 pm | rushikapse165

धन्यवाद! खरतर उशिराने प्रतिसाद देतोय.आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतो आहे.