माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
10 Sep 2020 - 9:24 am

प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित. अशा अंनिसच्या हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख अंनिस वार्तापत्राच्या त्यावेळच्या संपादक मंडळाने नाकारला. असे समजले की त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होत होते म्हणून नाकारला गेला. नंतर मी तो लेख मनोगत या जालीय दिवाळी अंकात प्रसिद्ध केला. तसेच तो माझ्या ब्लॉगवर ही आहे. शिवाय तो अन्य संकेतस्थळांवर पण टाकला आहे. मिपावर मात्र टाकायचा राहिला असे लक्षात आल्याने तो आत्ता टाकतो आहे. अनेकांनी तो लेख आवडल्याचे आवर्जून कळवले होते. अंनिस वार्तापत्रात नंतर व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होणारे असंख्य लेख येउन गेले. असो. कदाचित त्यामुळेच त्यानंतर रिसबूडांविषयी असलेला आदर अनेक ठिकाणी व्यक्त करण्याची संधी मी सोडली नाही. 2005 मधे मला वार्तापत्र लेखक पुरस्कार मिळाला. तो घ्यायला आयुष्यात एकदाच सांगलीला गेलो होतो. तेव्हा एक त्यांची आठवण झाली कारण त्या पुरस्काराचे खर्‍या अर्थाने असलेले मानकरी हे माधव रिसबुड हेच आहेत. त्यांची आठवण येत नाही असा दिवस जात नाही.

माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'.
किंमत तीन रुपये. पुण्यात आल्यावर मी ते पुस्तक विकत घेतलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं. परदेशात एखादा जवळचा मित्र अचानक भेटावा तसा आनंद मला झाला. पुस्तकावर लेखकाचा पत्ता नव्हता. मग मी मुद्रकाच्या पत्त्यावर गेलो. त्यांना रिसबुडांचा पत्ता विचारला. त्यांनाही तो माहीत नव्हता. पण त्यांनी मला ज्यांनी छापायला दिलं त्यांचा अपुरा पत्ता दिला. त्या लोकमान्य नगर मधल्या अपुऱ्या पत्त्यावर काही उत्साही रहिवाशांच्या मदतीने पोहोचलो. तेथून मला रिसबूडांचा पत्ता मिळाला. लगेचच मी रिसबुडांचा घरी दाखल झालो. बेल वाजवली, एका निवृत्त गृहस्थाने स्वागत केले," मीच माधव रिसबूड." त्या नंतर जे ऋणानुबंध निर्माण झाले त्यातून मला एक ज्योतिष प्रवासात जोडीदार मिळाला.
डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन नुकतेच पुण्यात ते स्थायिक झाले होते. मी नुकताच नोकरीला लागून मुंबईला बदलून गेलो होतो आणि ते पुण्यात आले होते. श्रावणी ते चंपाषष्ठी असे पंचगव्य खाऊन, जानवं बदलत सोवळ्याची अर्धी चड्डी घालून कर्मकांड करीत गेलेले माझे खेड्यातील बालपण आणि त्यांचं त्याच प्रकारचं शहरातील बालपण हे समकालीन वाटावं इतकं साधर्म्य त्यात होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी फलज्योतिष हा विषय आपल्या पोतडीतून बाहेर काढला. आमची या विषयावर देवाण घेवाण होत राहिली. व्यक्तिगत आयुष्यात नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत, अनेक कौटुंबिक दुःखाचे आघात सहन करीत खचून न जाता विवेकाच्या आधारे त्यावर मात करीत त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला. आपल्या आयुष्यातील दुःखद घटनांचा उपयोग सुद्धा त्यांनी फलज्योतिषचिकित्सेसाठी केला.त्यांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. मी नकळत त्यांचा कुटुंबातील एक सदस्य बनलो.ज्योतिषाबरोबरच इतरही विषयावरील त्यांच्या गप्पा मला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जात. इतक्या की मी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांचा,बालपणीच्या घटनांचा, गोड गुपितांचा न कळत साक्षीदार बनत असे. एक दिवस त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेविषयी माहिती दिली आणि तेथे जाण्यास सुचविले होते. त्यानंतर माझी बदली पुण्यात झाल्यावर मी अंनिसच्या मीटिंगला दाखल झालो.मी पुण्यात आल्यावर रिसबुडांचा उत्साह वृद्धिंगत झाला. लोकांना फलज्योतिष हा विषय आपण समजावून दिला तर त्या विषयाचा भ्रामकपणा लोकांच्या लक्षात येईल या कल्पनेने त्यांनी 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?" हे पुस्तक लिहायला घेतले.
"राष्ट्रपती स्वतःचे शपथग्रहण योग्य मुहूर्तावर होईल याची काळजी घेतात. इस्त्रोच्या अग्निबाण प्रक्षेपणात अनेक वेळा अपयश येण्याचे कारण म्हणजे त्यांनी अशुभवेळी प्रक्षेपण केले असे बंगलोरच्या ज्योतिषाने दावा केला होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी "शस्त्रक्रियेचे वेळी रुग्णाची कुंडली पाहिली पाहिजे," असे म्हटले होते. १९४७ साली युनियन जॅक खाली उतरवला व तिरंगा वर चढवला ती वेळ अशुभ होती त्या चुकीचे फळ आज आपण भोगतो आहोत. हेच जर शुभ मुहूर्तावर झाले असते तर आज आपण जपान जर्मनीच्याही पुढे गेलो असतो," अशा रंगतदार चर्चा ज्योतिष वर्तुळात होत. उच्च माध्यमिक शिक्षणात फलज्योतिष विषयाचा समावेश अवश्य करावा, ही बाब राज्य शिक्षण मंडळाच्या एका आयोगाने उचलून धरली होती. त्यातच 'गोकेलीन'च्या संशोधनामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे, असा समज फोफावू लागला होता. अशा या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना फलज्योतिष या विषयाचे अंतरंग समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटे. या विषयावरील वेगवेगळ्या संकल्पनांचा समाचार घेताना तसेच ज्योतिष समर्थकांच्या पत्रद्वंद्वात ते प्रहसन व कठोर शब्द वापरत, तसेच शालजोडीतून फटकवण्याची कला त्यांना अवगत होती. इतकी की कॉलेजकट्ट्यावरील तरुणाला लाजवेल इतक्या सूचकतेने ते शब्द वापरीत. ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात," कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे."
फलज्योतिषातील गृहीतके वादापुरती का होईना मान्य करून मगच त्याचा प्रतिवाद करण्यावर त्यांचा भर होता. चिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत. अंनिस वार्तापत्रात व इतर नियतकालिकांत त्यांनी वेळोवेळी फलज्योतिषावर टीका करणारे लेख लिहिले.'थोतांड आहे म्हणता, पण का, ते एकदा सांगाल का? ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही' आणि 'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 'जडवाद'चा आधार घेत. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' या त्यांच्या १९९१ सालच्या पुस्तकात त्यांनी वरील प्रकारचे विचार मांडले आहेत. पुढील काळात डॉली मेंढी च्या क्लोनिंगने विज्ञानजगतात खळबळ माजून दिली. स्मृती आणि जाणीव याचे नवे अर्थ वैज्ञानिकांना क्लोनिंग आणि डीएनए च्या संशोधनातून मिळू लागले. फलज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात लेखन केले. त्यातूनच अनेक ज्योतिषांशी त्यांचे पत्रव्यवहारातून वादविवाद झाले. खंडनमंडनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. त्यांचे घर हे आमचे अभ्यासकेंद्रच बनले होते आलेल्या प्रत्येक पत्रावर आमची चर्चा होत असे. चर्चा झाल्यावर त्यातील महत्वाचे मुद्दे ते नंतर लिहून काढीत असत. पत्रव्यवहारातील सातत्य व गतिमानता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमचे पत्रव्यवहार कधी संयुक्त तर कधी स्वतंत्र्यरीत्या होत असत. त्यामुळे ज्योतिष समर्थकांचा कधी कधी गोंधळ उडत असे. त्यावर उपाय म्हणून ते प्रति माधव रिसबूड / प्रकाश घाटपांडे अशी पत्रे पाठवीत. पुढे संगणक लोकप्रिय होऊ लागल्यावर मी त्यांना संगणक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो मान्य केला. संगणक त्यांनी झटकन आत्मसात केला. त्यांना मी देवनागरी फाँट लोड करुन दिले. की बोर्ड तर त्यांचा इतक्या झटकन पाठ झाला की स्टिकर वा की बोर्ड आराखड्याची त्यांना गरजच नसे. पुढील लेखन संगणकामुळे त्यांच्या व माझ्या सोयी साठी खूपच सुलभ झाले. नंतर इंटरनेटद्वारे तर माहितीचे मायाजालच हाताशी आले. परदेशी फलज्योतिषचिकित्सकांशी संपर्क त्यामुळे सुलभ झाला. प्रो.इव्हाव केली हे अमेरिकेतील "कमिटी फॉर द सायंटिफिक इन्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल"च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विशेषतः चंद्राचा मनावरील परिणाम या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिऑन विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी "कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऍस्ट्रॉलजी- ए क्रिटीक" हा "सायकलॉजिकल रिपोर्टस १९९७" मध्ये प्रकाशित केलेला शोध निबंध महत्त्वाचा ठरला आहे त्यांचेशी ई-मेल वरुन लेख व माहितीची देवाणघेवाण होत असे. भारतीय ज्योतिषाच्या संकल्पना व त्याचा समर्थपणे केलेला प्रतिवाद हा केली यांना आवडला.
रुडॉल्फ एच. स्मिट "प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटी"चे सचिव आहेत. "ऍस्ट्रॉलजी अंडर स्क्रुटिनी'चे संपादक, १९९२ ते १९९९ या काळातील "कोरिलेशन' या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलँडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात रिसबूड म्हणतात, की संख्याशास्रीय चाचण्यांनी फार तर फलज्योतिष हे विश्वासार्ह नाही, हे सिद्ध होईल. पण त्यामुळे ते खोटे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही. त्यासाठी मुळावर हल्ला करणे व त्यातील विसंगती दाखवणे गरजेचे आहे. जेफ्री डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादक आहेत. ते माजी ज्योतिषी व चिकित्सक ज्योतिष संशोधक आहेत. त्यांचेशी मात्र रिसबुडांचे फारसे जमले नाही. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे? हा प्रश्न त्यांना वारंवार पडे. यासाठी मूलभूत थिअरीवर असा आक्षेप घेतला पाहिजे की ज्याचे खंडन ज्योतिषांना करता येणे अवघड ठरेल. त्यातूनच पुढे 'फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड' असे पुस्तक जुलै १९९७ मध्ये लिहिले.
नाडी भविष्य आणि रिसबूड
त्या काळात नाडी भविष्याचा ढोंगाचा प्रचार कर्नाटकातले एक प्राचार्य आणि वायुदलातील एक अधिकारी मोठ्या हिरिरीने आणि धूमधडाक्याने करीत होते. चेन्नईच्या आसपास कूटलिपीच्या बुरख्याखाली नाडीभविष्याचा धंदा जोरात चालत असतो. आतातर तो पुण्यातही पसरला आहे.परिहार विधीच्या नावाखाली हजारो रुपये भोळ्याभाबड्या लोकांच्याकडून उकळण्यात येतात. या धंद्याचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. अंनिसच्या बाजूने रिसबुडांनी नाडी ज्योतिषाचा भंडाफोड केला होता. या नाडी पट्ट्या हजारो वर्षांपूर्वी तयार झाल्या की फक्त दोन चारशे वर्षांपूर्वी तयार झाल्या हा मुद्दा आमच्या मते गौण आहे. त्यात लिहिलेले भूत-भविष्य अचूक ठरते किंवा नाही हा प्रश्नही प्रस्तुत चर्चेत गौण आहे. ही नाडी भाकिते अंतर्ज्ञानी महर्षींनी लिहून ठेवली आहेत म्हणून त्यांना आगळेवेगळे महत्त्व आहे असे म्हणणाऱ्यालोकांना आम्ही एक साधा प्रश्न विचारतो.' ज्या महर्षींना सर्व भविष्यकाल जाणता येत होता त्यांना भाकिते वर्तवण्यासाठी कुंडलीच्या कुबड्यांची गरजच काय होती? गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता! प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता! हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नाडीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्धीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे? फलज्योतिषाबाबत परंपराभिमानी सुशिक्षित वर्गात विशेष आदर दिसून येतो. या शास्त्रात काहीतरी गूढ तथ्य असलेच पाहिजे, त्यामुळेच भाकिते खरी ठरतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांना एक वेडी आशा वाटत असते की कुणी तरी खोल संशोधन करून ते तथ्य कधी ना कधी तरी शोधून काढतीलच. त्यांच्या पूर्वजांच्या दैवी ज्ञानापुढे आजचे विज्ञान क्षुद्र आहे अशी त्यांची समजूत असते, म्हणून या शास्त्रावर टीका करणारे लोक पाश्चात्यांच्या नादाने त्यांच्या थोर पूर्वजांची टवाळी करतात असे म्हटल्यावर मग टीकाकारांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना स्वतःला जरी या शास्त्रातले कळत नसले तरी त्याचा गौरव करण्यात मात्र ते पुढे असतात. सामान्य लोकांनाही तेच आवडते. आपल्या पूर्वजांत काही लुच्चे किंवा पोटार्थी ज्योतिर्विदही होऊन गेले असण्याची कल्पना त्यांना सहन होत नाही. दुसरे एक चमत्कारिक कारण म्हणजे, अनेक शास्त्रज्ञांची या विषयावरील गुळमुळीत भूमिका. ते असे म्हणतात की फलज्योतिषाचा खरेखोटेपणा फक्त सांख्यिकी संशोधनाच्या मार्गानेच ठरला तर ठरेल, फर्मान काढून तो ठरणार नाही. १९७५ साली १८६ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा खोल अभ्यास न करता एक ज्योतिष विरोधी पत्रक प्रसिद्ध करून आपले हसे करून घेतले होते. म्हणूनच आता ते स्पष्ट बोलायला बिचकतात. वास्तविक पाहता फलज्योतिषाचा विज्ञानाशी काही एक संबंध नाही, ते थोतांड आहे, असे त्यांना वाटत असले तरी आपले मत ठामपणे ते कधी मांडणार नाहीत.फलज्योतिषावर सांख्यिकी संशोधन करून वादरहित निष्कर्ष कधीकाळी निघतील, ही त्यांची आशा व्यर्थ आहे. इतकेच सांगतो की संगणक युग येऊन पाव शतक उलटल्यावरही अद्याप निर्णायक निष्कर्ष काढता आलेले नाहीत.
शास्त्रज्ञांच्या या गुळमुळीत भूमिकेमुळे फलज्योतिष विरोधाची धार बोथट होते. या शास्त्रावर बालिश आणि गैर लागू आक्षेप घेऊन कित्येक बुद्धिवादी लोक आपले अज्ञान प्रकट करून ज्योतिषांचीच बाजू बळकट करतात! सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे? आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून? आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत? जर फलज्योतिष या एवढ्याच श्रद्धेवर आधारलेले असेल तर त्याला थोतांड म्हणण्याचे काही कारण दिसत नाही.ज्योतिष प्रवक्तेही लोकांना असे भासवतात की एवढ्याच एका श्रद्धेवर आधारावर त्यांचे सर्व शास्त्र उभे आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बुद्धिवादी लोकांना ही श्रद्धा जरी भ्रामक वाटत असली तरी तिचा भ्रामकपणा सर्वसामान्य लोकांना पटवून देणे कठीण आहे कारण त्यांना गूढ तत्त्वावर श्रद्धा ठेवणे मनापासून आवडते. ज्योतिष प्रवक्तेही लोकांना सांगतात की आज ना उद्या या श्रद्धेला वैज्ञानिक प्रतिष्ठा मिळेल यात संशय नाही. पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे?
श्रद्धेचा दुसरा भाग
श्रद्धेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे: - ग्रहांना माणसासारखी बुद्धी व जाणीव असते,त्यांना अनेक डोळे व अनेक दृष्ट्या असतात,त्यांना दूर अंतरावर त्यांच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, म्हणजे रिमोट कंट्रोल असतो? इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात! श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते जाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही! टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही! श्रद्धेचा हा दुसरा भाग म्हणजे ठार अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावरच तर या शास्त्रातल्या सिद्धान्तांची सगळी भिस्त आहे हे सत्य आजवर कोणी चव्हाट्यावर आणलेच नव्हते त्यामुळे या शास्त्राचा बडेजाव चालू राहिला.
पाश्चात्य संशोधनाविषयी रिसबुडांची भूमिका
अनेक पाश्चात्य स्केप्टिक लोकांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणतात की फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही. फार थोड्या प्रमाणात येतात, एवढेच त्यांना त्यांच्या संशोधनातून सिद्ध करायचे आहे. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिषाचे म्हणणे असे की त्यांचे संशोधनाच चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या संशोधनामुळे फार तर ज्योतिषाची परीक्षा होते, शास्त्राची परीक्षा होत नाही आपले ज्योतिषी तेच म्हणतात. फलज्योतिष खोटे आहे हे सांगण्याची निकड स्केप्टिक लोकांना वाटत नाही. किंवा तसे सांगण्याचा धीटपणा त्यांच्याकडे नाही. नारळीकरांचे तेच होते. माझ्या लेखात जर काही तांत्रिक उणीवा दिसत असतील तर मला सांगा असे मी डीन व केली या दोघांनाही ई मेलवर विचारले पण ते उत्तरच देत नाहीत. नारळीकरही या बाबत माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या शॉर्ट कट पद्धतीने हे शास्त्र खोटे ठरवता येते हेच त्यांना आवडत नसावे! आता आपण तरी स्पष्टपणे सांगू या की फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक किंवा खोटे शास्त्र आहे आणि हितसंबंधी लोकांनी त्याचे थोतांड माजवले आहे. असे रिसबूड रोखठोक.
शेवटचा लेख
फलज्योतिषाच्या विरोधात एक कॅम्पेनच उभारली पाहिजे. पण पुरोगामी चळवळीतील लोक म्हणावी तशी साथ देत नाहीत, असे त्यांना वाटे. प्रत्येक वेळी लेख लिहून झाला की म्हणत 'हा मात्र आता शेवटचा लेख, आता लिहिणे बसा. कुणासाठी लिहायचं?' त्या लेखाला लास्ट, फायनल अशी नावे देत. मग त्याचे पुनर्लेखन होत असे. काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, "दादा रात्रीच गेले." आणि मी बधिर झालो.
( पुर्वप्रकाशित मनोगत दिवाळी २००७)

समाजफलज्योतिषविचारलेख

प्रतिक्रिया

डॅनी ओशन's picture

13 Sep 2020 - 10:15 pm | डॅनी ओशन

उपरोक्त प्रतिसादाचा अर्थ "जर हा धागा 'काळ' या संज्ञेमुळे हायजॅक झाला असेल तर संजय क्षीरसागर या आयडीने मोलाचा वाटा उचलला असला तरी तुमचे (पक्षी, कोहंसोहं१० आणि सहकारी) यांचा वाटा सुद्धा दुर्लक्षण्याजोगा नाही." असा होता.
उप्सी डेझी !

कोहंसोहं१०'s picture

13 Sep 2020 - 10:33 pm | कोहंसोहं१०

सुरुवातीला मी गप्प होतो पण एक आयडी नेहमीप्रमाणे अनुभव आणि ज्ञान दोन्ही नसताना त्या विषयातले स्वतःचे मत पुढे रेटत भ्रम पसरवत फिरतो तेंव्हा त्याला प्रतिसाद देणे गरजेचे ठरते.
बाकी धाग्याला अनुसरून काही व्यवहार्य प्रतिसाद आहेतच की माझे. तुम्ही तेही वाचले असतील अशी आशा करतो. त्यात उगाच वेळ, काळ, ज्योतिष भ्रम म्हणत अव्यवहारिकता दाखवलेली नाही. ;-)

डॅनी ओशन's picture

13 Sep 2020 - 10:41 pm | डॅनी ओशन

>>>>>धाग्याला अनुसरून काही व्यवहार्य प्रतिसाद आहेतच की माझे. तुम्ही तेही वाचले असतील अशी आशा करतो।
नक्कीच. ते तर आहेतच.

संजय क्षीरसागर's picture

13 Sep 2020 - 11:39 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला कशाचा प्रतिवाद करायचा आहे आणि तुम्ही काय लिहितायं यात शून्य सुसंगती आहे. वाचा :

१. ज्योतिषाचा एकमेव आधार जातकाची जन्म वेळ आहे. मुळात काल ही मानवी कल्पना आहे, त्यामुळे जन्मवेळेला काहीही अर्थ नाही.

तुमचा प्रतिवाद :

या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात केवळ ५-७ फूट उंचीच्या एका शरीरावर जे विश्वाच्या मानाने अत्यंत नगण्य आहे आणि ज्याच्या असण्याने आणि नसण्याने काहीच फरक पडत नाही इतक्या फालतू गोष्टींवर मेडिकल सायन्स चा डोलारा उभा आहे.

शरीर विज्ञान सर्व शरीरांच्या समस्या निवारणाचं शास्त्र आहे. ज्योतिष ही जातक बेस्ड फेकंफाक आहे. तुम्ही कशाला काय जोडतायं याचं तारतम्य बाळगा.

जन्मवेळेला फालतू गोष्ट म्हणताय मग आत्तापर्यंत तुम्ही तुमचा स्वतःचा, तुमच्या मुलाचा, पत्नीचा किंवा परिवारातील कोणाचाही वाढदिवस साजरा केला नाही, त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा पार्टीला गेला नाहीत हे प्रामाणिकपणे सांगा

महान निर्बुद्धपणा ! वाढदिवस हा सामाजिक रिवाज आहे, तिथे लोक पार्टीला जातात. तुम्ही स्वतः तिथे काय कुंडली मांडून भविष्य वर्तवायला बसता का ? जन्मवेळ हा ज्योतिषाचा आधार आहे आणि त्यावरनं भविष्यकालीन अंदाज फेकले जातात.

२. ज्योतिष ही जातक केंद्रित अंदाजपंचे केलेली फेकंफाक आहे. जातक हटवला तर ज्योतिषाशास्त्रावरचे जगातले सर्व ग्रंथ कचर्‍याच्या भावात सुद्धा जाणार नाहीत .

तुमचा प्रतिवाद :

पेशंट ला हटवा मग मेडिकल सायन्स किंवा डॉक्टरला ला काय अर्थ राहतो ते सांगा म्हणण्यासारखे आहे. असे काय करून काय होणार ?

ही तर बावळट युक्तीवादाची परिसिमा आहे ! मेडिकल सायन्स व्यक्तीनिरपेक्ष आहे आणि ज्योतिष केवळ व्यक्तीसापेक्ष आहे.
एकच औषध जवळजवळ सर्व पेशंटसवर, सारखंच काम करेल. तुमच्या ज्योतिषाचा फालतू बेस ठराविक जातकाची जन्म वेळ आहे. सेम जातकाची जन्म वेळ बदलली तर सगळे अंदाज कोलमडतील (तसे ही ते अंदाजपंचे फेकलेले असतात !)

३. सर्व घटना कालनिरपेक्ष असल्यानं, जन्मवेळ हा काल्पनिक कालबिंदू घेऊन, त्या सापेक्ष केलेले घटनांचे कालाधारित अंदाज ही मूर्खपणाची परमावधी आहे.

तुमचा प्रतिवाद :

पुन्हा वेळेतच अडकलात

वेळेवर तर ज्योतिषाचा सर्व खेळ आहे ! अमक्या वेळी जन्मलेल्या जातकाला तमक्या वेळी फलाणा ग्रह साडेसाती लावेल यापलिकडे ज्योतिषाची काय अक्कल आहे ?

ग्रह-तारे जातकाला त्याच्या जन्मवेळेप्रमाणे फॉलो करतात इतकं निर्बुद्ध शास्त्र या जगात फक्त तुमच्यासारखेच मानू शकतात.

ग्रह-तार्‍यांच्या भ्रमणाचा पॅटर्न, काल या मानव निर्मीत परिमाणानं मापून त्याचं आकाशस्थ स्थान निश्चित केलं याचा अर्थ : ग्रह-तारे ठराविक वेळी जन्मलेल्या जातकाला विविक्षित प्रकारे फॉलो करुन त्याचं जीवन घडवतात असा होत नाही.

तुमचा जातक खपला तरी ग्रह-तार्‍यांचा पॅटर्न बदलत नाही आणि त्यांचा पॅटर्न बदलला म्हणून जातक खपत नाही.

सर्व ग्रह-तारे आणि सर्व जातक एकाच अस्तित्वागत प्रोसेसचा भाग आहेत कारण अस्तित्व एक आहे. त्यातल्या ' विविक्षित जातकाला त्याच्या जन्मवेळे प्रमाणे वेगळा काढून त्यावर अस्तित्वाच्या समग्र प्रोसेसचा काय परिणाम होईल ?' हे शोधण्याचा परम मूर्खपणा इतकाच ज्योतिषाचा अर्थ आहे.

चौकस२१२'s picture

15 Sep 2020 - 5:29 pm | चौकस२१२

बाकी आपण मोजतो तसा सरकणारा काळ असं काही आपल्या मनाबाहेर अस्तित्वात नाही याची कुठेतरी जाणीव हवी.

असेल नसेल .. वेळेप्रमाणे ( कशीही मोजा) बदल दिसतो हे स्पष्ट दिसतंय ना ? मग काळ असा आहे कि तसा यावर कसली चर्चा? वेळ ( नो पन इंटेंडेड ) नाही का वाया जात? ..अरे हो पन काळ हा भ्रम आहे नाही का ...
च्यामारी आमचा टर्निंग ब्रेन झाला राव
बस कि आता
उद्या तुम्ही एक दिवसाने म्हातारे होणार आणि मी पन.. ( मानाने नाही तरी शरीराने तरी ) का ते पन पटत नाही कोणाला?

सोत्रि's picture

11 Sep 2020 - 6:46 pm | सोत्रि

गवि,

आपण भौतिक जगात वावरतो त्यामुळे भौतिक शास्त्राचे नियम समजून घ्यावेच लागतात कारण भौतिक जगातला वावर सुकर करायचा आहे.
आइन्स्टाइन आणि सगळ्याच शास्त्रज्ञांनी मानवी विचार क्षमतेच्या आवाक्यातल्या मितींमधे विचार करून विविध थीयरीज मांडून त्या सिद्ध केल्या.

जिथे आइन्स्टाइनची स्पेस-टाइम थियरी हीच सामान्य मानवी विचार क्षमतेच्या आवाक्यापलीकडे तिथे बाकी मितींचे आकलन अशक्यच आहे. (स्ट्रींग थियरीमधे १० मितींची कल्पना मांडली आहे) त्यांचे आकलन आहे अशक्य कारण त्या आकलनाचा मार्ग आधुनिक विज्ञानालाच अजून अज्ञात आहे. पण म्हणून त्यांचे अस्तित्व नाकारण्याचेही काही कारण नाही.

त्यांच्या आकलनचा मार्ग तत्वज्ञानात विवीध थियरींनी आणि साधनामार्गांनी विषद केलेला आहे. ज्याला खरोखरीच त्याची आवश्यकता वाटेल तो त्या मार्गावर जाउन त्याची चाचणी घेतोच. पण ज्यांनी त्याची आवश्यकता वाटत नाही त्यांना तसे वाटण्याचे 'फ्री वील' आहेच, कारण हा जबरदस्तीचा मामला नाही. :)

- (काळ व्यवहारापुरता मानणारा) सोकाजी

हेच म्हणणं आहे. व्यवहारासाठी मानावा लागतोच आणि ते ठीक आहे.

सुबोध खरे's picture

11 Sep 2020 - 11:49 am | सुबोध खरे

मानवी जीवनात अस्थिरता आहे.

जितकी अस्थिरता जास्त तितके मनाला दिलासा देणाऱ्याच्या मागे जाणारे जास्त.

( मन नाहीच हे मानणार्यांनी वाचले नाही तरी चालेल)

शेवटी आपल्या संकटाच्या वेळेस कुणी तरी आपल्या पाठीशी उभे असणे आवश्यक असते. त्यामुळे प्रत्यक्ष काही होत नसले तरी संकटाचा सामना करण्यास मानसिक बळ मिळते हि वस्तुस्थिती.

मग एखाद्या ज्योतिषाने सांगितले कि एवढे तीन महिने जाऊ द्या तुमचे ग्रह बदलतील कि त्या माणसाला तीन महिने तरी मानसिक समाधान असते कि हा काळ गेला कि सगळे उत्तम होणार आहे. ( आम्हाला लषकरी प्रशिक्षणाच्या वेळेस सांगत असत कि हे दोन महिने कसे तरी जाऊ द्या मग बघा.
मग काय होईल? विचारले तर सांगत कि गेलेले दोन महिने बरे होते असे वाटेल )

हीच मानसिक शांतता कुणाला कर्मकांडाने मिळते. कुणाला एखाद्या सद्गुरुंच्या चरणी मिळते.

कुणाला "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे" असे सांगणारी सद्गुरूंची तसबीर सांगत असते.

मी पाहिलेल्या एका भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्याच्या( अभियंता आहे) घरात जमिनीवर छतावर किंवा भिंतीवर १० फूट जागा नसेल जेथे कोणती तसबीर फेंगशुई वास्तूचं काही चिकटवलेलं नाही. आपण पकडले जाऊ या भीतीने ते सर्व कर्मकांड तो कायम करत असतो. हि भीती जोवर आहे तोवर तो जे कुणी काही सांगेल ते करत राहतो.

मानवी जीवनातील अस्थिरता हि जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे.

त्यामुळे कितीही कण्ठशोष करा बाबा, महाराज, ज्योतिषी, वास्तू, फेंगशुई, कर्मकांडे यासाठी लोक जातच राहणार आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Sep 2020 - 12:30 pm | प्रकाश घाटपांडे

अगदी सहमत आहे

आनन्दा's picture

11 Sep 2020 - 5:03 pm | आनन्दा

बऱ्याच वेळेस ते केवळ त्यापुरतेच मर्यादित नसते...
सगुण (किंवा निर्गुण) उपासना हा अनेक लोकांसाठी मेडिटेशन चा भाग देखील असतो.
त्राटक किंवा भावातीत ध्यान किंवा अन्य मार्ग जसे की नामस्मरण या सर्व प्रकारांमध्ये चित्ताची जी एकाग्रता होते, विशेषतः मेंदूचे काही विशिष्ट भाग उद्देएपित होतात, ज्यामुळे overall मानसिक आणि शारीरिक आरोग्यवरती देखील चांगले परिणाम होतात असे काहीसे संशोधन निरंजन घाटे यांच्या संभव असंभव पुस्तकात वाचल्याचे आठवते.

याव्यतिरिक्त चमत्कार, फलज्योतिष, भुते वगैरे हा स्वतंत्र विषय आहे.
मला व्यक्तिशः फलज्योतिष आणि technical analysis हे साधारणपणे सारखे ह आहे असे वाटते.. बऱ्याच लोकांना आपल्याला technical कळायला लागले असे वाटते, पण प्रत्यक्षात ते येत नसते.. जगात फार थोड्या लोकांना मार्केट चे सखोल ज्ञान असते.. आणि तरी देखील मार्केट predictable नसतेच..

फलज्योतिष हे केवळ आडाखे आहेत, ग्रह माणसाचे आयुष्य घडवत नाहीत, केवळ दाखवतात. अर्थात काही गोष्टी सिद्ध करण्याइतके आपले विज्ञान अजून प्रगत झालेले नाही, त्यामुळे त्या नाकारण्यात काही अर्थ नाही असे मी मानतो.

सोत्रि's picture

11 Sep 2020 - 6:17 pm | सोत्रि

सुपर्ब!

संतुलीत आणि सर्वसमावेशक.

- (technical analyst) सोकाजी

मूकवाचक's picture

11 Sep 2020 - 7:52 pm | मूकवाचक

+१
('दोन अधिक दोन बरोबर चार' इतकी सुस्पष्टता ज्या विषयांच्या बाबतीत नसते किंवा संभवतच नाही त्या बाबतीत अधिकारवाणीने बोलणे हा निव्वळ दुराग्रह/ दूषित पूर्वग्रह/ आकस असण्याचीच शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. असो.)

त्यामुळे कितीही कण्ठशोष करा बाबा, महाराज, ज्योतिषी, वास्तू, फेंगशुई, कर्मकांडे यासाठी लोक जातच राहणार आहेत.
बरं डॉक्टर पण
- यातील भोंदूगिरी आणि फसवेगिरी यावर बोलायचं नाही का?
- आणि अति झालं तर देशाचे कायदे याला प्रतिबंध करण्यासाठी करायचे नाहीत का?
आणि शेवटचे
-भारतात हे जास्त प्रमाणात का?

गामा पैलवान's picture

11 Sep 2020 - 7:17 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

अस्तित्वातली हरेक प्रक्रिया कालरहित आहे; प्रक्रियेच्या मापनासठी काल ही मानव निर्मित सोय आहे.

प्रक्रियेच्या मापनासाठी काल ही सोय जरी असली तरी ती मानवनिर्मित नाही. किंबहुना काल अस्तित्वात आहे म्हणून प्रक्रिया 'चालू' आहे. अस्तित्वातली प्रक्रिया 'बघण्या'साठी काल हवाच. मापणे नंतर. पहिले फक्त बघणे. काल नाकारला तर बघणंच नाहीसं होतं.

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

11 Sep 2020 - 7:53 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही डोळे बंद केल्यानं प्रक्रिया थांबत नाही ! तुम्ही झोपता तेंव्हा पृथ्वी फिरायची थांबते का ?

प्रक्रियेसाठी काल नाही > एंप्टीनेस (स्पेस) लागते. सर्व ग्रह -तारे, चंद्र -सूर्य, पृथ्वी या शून्यात फिरतायंत > त्याच्याशी कालाचा काहीएक संबंध नाही

शा वि कु's picture

11 Sep 2020 - 8:09 pm | शा वि कु

पण काळ सिद्धंतामध्ये डोळे बंद करून/झोपून काळ तरी कुठे थांबतो ?
;)

संजय क्षीरसागर's picture

11 Sep 2020 - 8:20 pm | संजय क्षीरसागर

त्याचा काहीही सिद्धांत नाही > जे नाहीच ते थांबू किंवा चालू शकत नाही.

कोहंसोहं१०'s picture

11 Sep 2020 - 8:21 pm | कोहंसोहं१०

जोतिष व्यर्थ आहे कारण ते कालाधारित आहे, जो केवळ (व्यावहारिक उपयोग निर्विवादपणे असला तरी) भ्रम आहे >>>>>>>>>
संक्षी, इथे थोडंसं चुकतंय. ज्योतिष नक्की काय आहे याचा अभ्यास नसल्यामुळे तुमचा संकल्पनेतच (फंडामेंटल) घोळ झालाय.
ज्योतिष कालाधारित नसून ते कार्यकारणभावाधारित आहे. तो कार्यकारणभाव दर्शवण्यासाठी सोयीचा वापर म्हणून काळाचा वापर केला आहे (जसे आपण रोजच्या व्यवहारात अनेक गोष्टींसाठी करतो तसेच) त्यामुळे तुमच्या सोयीसाठी काळ ही संज्ञा बाजूला काढून ठेवली तरीही ज्योतिष चुकीचे/व्यर्थ ठरणार नाही. कसे ते सांगतो पण त्याआधी एक उदाहरण घेऊ.
समजा तुम्ही एका मोकळ्या जागी उभे आहात. बाजूला पूर्ण अंधार आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्या परिवलन आणि परिभ्रमण या प्रक्रियेमुळे (या प्रक्रियेला आपण सोयीसाठी क्ष म्हणूयात) अंधार नाहीसा होत उजेड येईल..क्ष मुळे तुम्हाला उजेडाची तीव्रता कमी जास्त जाणवेल. याच क्ष मुळे पुन्हा उजेड संपूर्ण नाहीसा होईल आणि सुरुवातीच्या स्थितीसारखा अंधार होईल. तुम्ही तिथेच उभे असाल तर हीच प्रक्रिया सतत सुरु राहील.
यामध्ये काय आढळले की क्ष मुळे प्रकाशाची तीव्रता कमी जास्त होत आहे आणि तो बदल तुम्हाला समजून येत आहे. जेंव्हा क्ष मुळे तीव्रता खूप जास्त असेल (कडक ऊन) तर शारीरिक प्रक्रियेमुळे तुम्हाला त्रासही वाटेल आणि क्ष मुळे जेंव्हा पुन्हा तीव्रता कमी होत जाऊन प्रकाश नाहीसा होईल तेंव्हा कदाचित तुमचा त्रास कमी होऊन याच शारीरिक प्रक्रियेमुळे तुम्हाला थोडे बरेही वाटेल. समजा प्रकाशाची तीव्रता अधिक असताना एखादा ढग तुमच्या डोक्यावर आला तर त्या स्थितीतही कदाचित तुम्हाला तीव्रता कमी भासून शारीरिक प्रक्रियेमुळे बरे वाटेल.

आता या स्थितीचे अवलोकन केल्यास ढोबळमानाने काय आढळेल की 'क्ष'मुळे अवकाशात पृथ्वी आणि सूर्य यांचे एक विशिष्ट स्थान आले (क्ष हे कारण आणि त्यामुळे मिळालेले स्थान हे कार्य). ते स्थान आल्यामुळे प्रकाशाची तीव्रता कमी जास्त झाली (इथे स्थान हे कारण आणि तीव्रता हे त्यामुळे झालेले कार्य). त्या तीव्रतेमुळे तुम्हाला आजूबाजूला तसेच स्वतःच्या शरीरातही बदल जाणवले जे सुखावह किंवा त्रासदायक होते. अश्या तीव्रतेतही तुम्हाला समजा काही साहाय्य मिळाले (जसे की ढग, छत्री) तर त्याच कार्यकारणभावामुळे तुम्हाला जाणवलेल्या बदलात फरक पडला.
यावरून मी हे अनुमान काढले की पृथ्वीवर एका विशिष्ट स्थानी असताना आणि अवकाशात सूर्य आणि पृथ्वी यांचे एक विशिष्ट स्थान असताना प्रकाशाची एक तीव्रता असेल जी सुखावेल किंवा त्रास देईल. त्यात काही गोष्टींचे साहाय्य मिळाले तर मिळणाऱ्या परिणामात बदल होतील (सुखाची किंवा दुःखाची तीव्रता कमी जास्त होईल).

यात आपण कोठेही काळ की संकल्पना गृहीत धरलेली नाही. फक्त कार्यकारणभाव गृहीत धरला आहे.

आता ज्योतिषसुद्धा नेमके तसेच आहे. वर जसे पृथ्वीवर एका विशिष्ट स्थानी असताना आणि अवकाशात सूर्य आणि पृथ्वी यांचे एक विशिष्ट स्थान असताना प्रकाशाची तीव्रता कशी कमी किंवा जास्त असू शकते आणि त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्यावर कसा झाला हे नोंदवून पुन्हा तशी स्थिती आल्यास परिणाम कसे असू शकतील हे अनुमान काढले अगदी तसेच असंख्यविध निरीक्षणातून अभ्यासकांना हे दिसले की जीव जन्मला (इथे जन्म ही एक शारीरिक प्रक्रिया आहे किंवा स्थिती आहे) असताना अवकाशस्थ ग्रह आणि तारे यांची जी विशिष्ट स्थिती होती/स्थान होते त्यावरून त्यांचा विशिष्ट प्रभाव मनुष्यावर पडतो आणि हा प्रभाव तुमच्या जन्मस्थानानुसार आणि ग्रह ताऱ्यांच्या स्थानानुसार बदलतो ज्यायोगे मनुष्याला येणाऱ्या सुखद आणि दुःखद अनुभवांचे आणि घटनांचे आराखडे बांधता येतात. त्यालाच त्यांनी ज्योतिष नाव दिले. थोडक्यात बहुसंख्य निरीक्षणातून मनुष्य आणि ग्रहांच्या स्थितीचा कार्यकारणभाव अभ्यासून त्याविषयीचे आराखडे बांधणे हे ज्योतिष.
इथे काळ ही संकल्पना घेतलीच नाहीये. फक्त एक विशिष्ठ प्रक्रिया (उदा जन्म), स्थिती (ग्रह ताऱ्यांचे स्थान) आणि त्यांचा कार्यकारणभाव एवढेच पुरेसे आहे. तस्मात काळ अस्तित्वात नाही असे म्हणून ज्योतिष संपत नाही.
आता हे आराखडे किती चुकीचे आणि बरोबर हा वेगळा मुद्दा झाला. पण काळ संकल्पना भ्रम म्हणून ज्योतिषही भ्रम या भ्रमाचा निरास करण्यासाठी हा प्रपंच.

शा वि कु's picture

11 Sep 2020 - 9:03 pm | शा वि कु

१) जीवन आणि मृत्यू दरम्यानचा प्रवास, मग तो काळामध्ये असो बा शुध्द केमिकल प्रक्रियांमध्ये असो, मोजमाप होणे अत्यंत आवश्यक आहे.हे अंतर कोणतेही भ्रम नाही, अत्यंत खरे अंतर आहे. जर काळ नसेल तर पर्याय काय हे मोजण्याचा ?

२) जोपर्यंत मला आधीची स्थिती आहे तशी पुनः पुनर्निर्मित करता येत नाही, तोपर्यंत क्षण ही संज्ञा मला मानवी लागेल. पर्याय नाही. आणि क्षण आला की आपोआपच क्षणाच्या आधीचा, पुढचा आणि चालू भाग आले.

(लेख वाचला. विदेहत्वावर जोर आहे. त्याशिवाय काळाला पळवणे अवघड.)

तसेही केवळ काळ नाही या एका वाक्याने ज्योतिषशास्त्र फोल ठरून त्यावरचा विश्वास संपून जाणे अवघड वाटते. अवकाशातील कल्पनातीत खागोलांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो व आपण तो विविध मार्गांनी दूर करू शकतो यातले तार्किक मुसळ दिसत नाहीये, तर काळ हा भ्रम आहे यातले तार्किक कुसळ कसे दिसणार ? :)

संजय क्षीरसागर's picture

11 Sep 2020 - 9:28 pm | संजय क्षीरसागर

१) जीवन आणि मृत्यू दरम्यानचा प्रवास, मग तो काळामध्ये असो बा शुध्द केमिकल प्रक्रियांमध्ये असो, मोजमाप होणे अत्यंत आवश्यक आहे.हे अंतर कोणतेही भ्रम नाही, अत्यंत खरे अंतर आहे. जर काळ नसेल तर पर्याय काय हे मोजण्याचा ?

सगळ्या प्रक्रिया केवळ आणि केवळ वर्तमानातच घडतात, त्यामुळे मापन ही केवळ सोय आहे; अनिवार्यता नाही.

२) जोपर्यंत मला आधीची स्थिती आहे तशी पुनः पुनर्निर्मित करता येत नाही, तोपर्यंत क्षण ही संज्ञा मला मानवी लागेल. पर्याय नाही. आणि क्षण आला की आपोआपच क्षणाच्या आधीचा, पुढचा आणि चालू भाग आले.

पुन्हा वरचं उत्तर वाचा !

३. अवकाशातील कल्पनातीत खागोलांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो व आपण तो विविध मार्गांनी दूर करू शकतो यातले तार्किक मुसळ दिसत नाहीये, तर काळ हा भ्रम आहे यातले तार्किक कुसळ कसे दिसणार ? :)

अवकाशातील कल्पनातीत खागोलांचा परिणाम होणं ही समग्रात होणारी वर्तमान कालीन प्रक्रिया आहे > त्यातून जातक नांवाचा एक नगण्य बिंदू वेगळा काढून त्याच्या जीवनातली, अखिलाच्या परिणामाची अनुमानं काढणं हा सर्वात मोठा ज्योक आहे.

आधीची स्थिती आहे तशी सिम्युलेट करण्याच्या अक्षमतेमुळे आधीची आणि सद्य यात काहितरी फरक हवाच. तो म्हणजे क्षण.
पुढेमागे जमेलही. आत्तातरी नाही जमत.

रच्याकने, वर्तमान म्हणजे काय मग?

संजय क्षीरसागर's picture

11 Sep 2020 - 9:51 pm | संजय क्षीरसागर

१.

आधीची स्थिती आहे तशी सिम्युलेट करण्याच्या अक्षमतेमुळे आधीची आणि सद्य यात काहितरी फरक हवाच. तो म्हणजे क्षण.पुढेमागे जमेलही. आत्तातरी नाही जमत.

वर्तमान म्हणजे ज्यात हा मागचं पुढे नेण्याचा प्रयत्न चालला आहे तो काळ !

२. रच्याकने, वर्तमान म्हणजे काय मग?

एक अथांग, सर्ववव्यापी मोकळीक ज्यात सर्व प्रक्रिया घडतायंत ! वर्तमान ही प्रक्रिया नाही, ती एक कायम स्थिती आहे. त्यामुळे प्रक्रियेसाठी ती अनिवार्य आहे.प्रत्येक प्रक्रिया वर्तमानात घडते, कालात नाही.

शा वि कु's picture

11 Sep 2020 - 9:29 pm | शा वि कु

माझ्यासाठी आधीची स्थिती आहे तशी पुनः न बनवता येण्याची असमर्थतेमुळे मला सद्य आणि पूर्व स्थितीत करावा लागलेला फरक म्हणजे काळ.

क्रॉस झाला आहे. तो वाचला की समजेल.

निराधार अनुमान आहे.

१. ज्योतिष कालाधारित नसून ते कार्यकारणभावाधारित आहे.

ज्योतिष हे जातक केंद्रस्थानी धरुन केलेलं अनुमान आहे. त्याचा कार्य-कारणभावाशी संबंध नाही. विज्ञान हा कार्य-कारणभावाचा शोध आहे.

२.

यावरून मी हे अनुमान काढले की पृथ्वीवर एका विशिष्ट स्थानी असताना आणि अवकाशात सूर्य आणि पृथ्वी यांचे एक विशिष्ट स्थान असताना प्रकाशाची एक तीव्रता असेल जी सुखावेल किंवा त्रास देईल. त्यात काही गोष्टींचे साहाय्य मिळाले तर मिळणाऱ्या परिणामात बदल होतील (सुखाची किंवा दुःखाची तीव्रता कमी जास्त होईल).

यात जो स्थिर घटक धरला आहे (जातक), तो तसा कधीही नसतो. परिणामी जातक स्थिर कल्पून केलेलं कोणतही अनुमान चूक आहे. किंवा जातकाला ग्रह-तारे फॉलो करतात हे सुद्धा काल्पनिक आणि हास्यास्पद आहे.

३.

जीव जन्मला (इथे जन्म ही एक शारीरिक प्रक्रिया आहे किंवा स्थिती आहे) असताना अवकाशस्थ ग्रह आणि तारे यांची जी विशिष्ट स्थिती होती/स्थान होते त्यावरून त्यांचा विशिष्ट प्रभाव मनुष्यावर पडतो आणि हा प्रभाव तुमच्या जन्मस्थानानुसार आणि ग्रह ताऱ्यांच्या स्थानानुसार बदलतो ज्यायोगे मनुष्याला येणाऱ्या सुखद आणि दुःखद अनुभवांचे आणि घटनांचे आराखडे बांधता येतात.

ग्रह-तार्‍यांची स्थिती आणि जातकाचा वावर हा कायम डायनॅमिक आहे. तस्मात, जन्म वेळी असलेली स्थिती जातकाच्या जीवनावर सतत प्रेडीक्टेबल परिणाम करेल हे निराधार आहे.

३.

काळ संकल्पना भ्रम म्हणून ज्योतिषही भ्रम या भ्रमाचा निरास करण्यासाठी हा प्रपंच.

ज्योतिष कालविभाजनावर आधारित आहे.

तुमचा प्रतिसाद वाचा : ग्रह-तार्‍यांचे जन्म काल (पास्ट), सांप्रतात (वर्तमान) आणि भविष्यात होणारे परिणाम.

जर कालच काढून टाकला तर जन्म, वावर आणि मृत्यू या सर्व घटना केवळ वर्तमानात घडतात. जन्म ही वर्तमान काळात उद्भवलेली स्मृती आहे, वावर वर्तमानात चालू आहे आणि मृत्यू ही वर्तमानात केली कल्पना आहे.

ज्योतिष हे भूतकाळातल्या घटनेवरुन, वर्तमानात केलेलं, भविष्यकालाचं अनुमान आहे, तस्मात, ज्योतिष व्यर्थ आहे.

मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या.
असं ढळढळीतपणे लिहीणार्‍या आयडीने काल नाही असं म्हणत हा धागा हायजॅक केला आहे.

कोहंसोहं१०'s picture

12 Sep 2020 - 12:51 am | कोहंसोहं१०

ह्या आयडी चा वैचारिक गोंधळ आणि विधानातील परस्परविरोधीपणा मिपाकरांना ठाऊक आहेच. पण असा तो वेळोवेळी दर्शविण्याची गरज सुद्धा आहे. यासाठी +१

पण यामुळे आयडी च्या विचारांमध्ये सुसूत्रता येईल ही अपेक्षा मात्र फोल आहे.

कोहंसोहं१०'s picture

11 Sep 2020 - 10:01 pm | कोहंसोहं१०

ज्योतिष हे जातक केंद्रस्थानी कल्पून केलेलं निराधार अनुमान आहे. त्याचा कार्य-कारणभावाशी संबंध नाही >>>>>>>>> तुम्हाला मुद्दा समजण्यात घोळ होतोय बहुतेक. कोण केंद्रस्थानी आहे यावरून ज्योतिष खरे की खोटे ठरवणे हास्यास्पद आहे. शेवटी कार्याचा परिणाम हा असतोच. त्या परिणामांचे अनुमान कार्यकारणभावपद्धतीवरून करणे हे ज्योतिष आहे. तुम्ही सूर्य डोक्यावर असताना कडक उन्हात बसलात तर तुम्हाला चटके बसतील आणि क्षितिजावर असताना ते तसे बसणार नाहीत हेच सिम्पल लॉजिक त्यात आहे. आता चटके 'तुम्हाला' बसले म्हणजे इथे तुम्ही केंद्रस्थानी आहेत म्हणून उन्हात बसण्याचा आणि चटके बसण्याचा कार्यकारणभाव नाही असे म्हणणे निव्वळ वेडेपणा ठरेल.

तस्मात, जन्म वेळी असलेली स्थिती जातकाच्या जीवनावर सतत प्रेडीक्टेबल परिणाम करेल हे निराधार आहे. >>>>>>>> पुन्हा चुकलात. असे म्हणणे म्हणजे आज शरीरावर खोलवर झालेली जखम उद्या त्रास देणार नाही असे म्हणण्यासारखे आहे. जखम होण्यावेळची स्थिती बदलली पण परिणाम जाणवत राहिलाच. तस्मात कार्य कारण बदलले तरी परिणाम पुढे राहू शकतातच. मागचेच उदा घेऊ. कडक उन्हात बसून तुम्हाला ताप आला तर ऊन सरूनही ताप राहीलच. स्थिती बदलली पण परिणाम राहिला.

ज्योतिष कालविभाजनावर आधारित आहे. तुमचा प्रतिसाद वाचा : ग्रह-तार्‍यांचे जन्म काल (पास्ट), सांप्रतात (वर्तमान) आणि भविष्यात होणारे परिणाम >>>>>>>>>>>> ज्योतिष कार्यकारणावर आधारित आहे हे मी समजावून सांगितले आहेच. कालविभाजन हे व्यवहारातील सोयीसाठी केलेले आहे. मूळ संकल्पना कार्यकारणभाव आणि त्याचा पडणारा प्रभाव यावर आधारित आहे. काळ स्थितीबद्दलचा निर्देशक आहे त्यामुळे तुम्हाला काळ नाही असे मानायचे असल्यास जरूर माना पण त्यामुळे ज्योतिष संकल्पना डळमळीत होत नाही. कारण ती तुमच्या आणि ग्रहांच्या स्थान आणि स्थितीवरती अवलंबून आहे.

असो. इथे थांबतो. धाग्याचा विषय वेगळा आहे.

कोहंसोहं१०'s picture

11 Sep 2020 - 10:03 pm | कोहंसोहं१०

ज्योतिष हे जातक केंद्रस्थानी कल्पून केलेलं निराधार अनुमान आहे. त्याचा कार्य-कारणभावाशी संबंध नाही >>>>>>>>> तुम्हाला मुद्दा समजण्यात घोळ होतोय बहुतेक. कोण केंद्रस्थानी आहे यावरून ज्योतिष खरे की खोटे ठरवणे हास्यास्पद आहे. शेवटी कार्याचा परिणाम हा असतोच. त्या परिणामांचे अनुमान कार्यकारणभावपद्धतीवरून करणे हे ज्योतिष आहे. तुम्ही सूर्य डोक्यावर असताना कडक उन्हात बसलात तर तुम्हाला चटके बसतील आणि क्षितिजावर असताना ते तसे बसणार नाहीत हेच सिम्पल लॉजिक त्यात आहे. आता चटके 'तुम्हाला' बसले म्हणजे इथे तुम्ही केंद्रस्थानी आहेत म्हणून उन्हात बसण्याचा आणि चटके बसण्याचा कार्यकारणभाव नाही असे म्हणणे निव्वळ वेडेपणा ठरेल.

तस्मात, जन्म वेळी असलेली स्थिती जातकाच्या जीवनावर सतत प्रेडीक्टेबल परिणाम करेल हे निराधार आहे. >>>>>>>> पुन्हा चुकलात. असे म्हणणे म्हणजे आज शरीरावर खोलवर झालेली जखम उद्या त्रास देणार नाही असे म्हणण्यासारखे आहे. जखम होण्यावेळची स्थिती बदलली पण परिणाम जाणवत राहिलाच. तस्मात कार्य कारण बदलले तरी परिणाम पुढे राहू शकतातच. मागचेच उदा घेऊ. कडक उन्हात बसून तुम्हाला ताप आला तर ऊन सरूनही ताप राहीलच. स्थिती बदलली पण परिणाम राहिला.

ज्योतिष कालविभाजनावर आधारित आहे. तुमचा प्रतिसाद वाचा : ग्रह-तार्‍यांचे जन्म काल (पास्ट), सांप्रतात (वर्तमान) आणि भविष्यात होणारे परिणाम >>>>>>>>>>>> ज्योतिष कार्यकारणावर आधारित आहे हे मी समजावून सांगितले आहेच. कालविभाजन हे व्यवहारातील सोयीसाठी केलेले आहे. मूळ संकल्पना कार्यकारणभाव आणि त्याचा पडणारा प्रभाव यावर आधारित आहे. काळ स्थितीबद्दलचा निर्देशक आहे त्यामुळे तुम्हाला काळ नाही असे मानायचे असल्यास जरूर माना पण त्यामुळे ज्योतिष संकल्पना डळमळीत होत नाही. कारण ती तुमच्या आणि ग्रहांच्या स्थान आणि स्थितीवरती अवलंबून आहे.

असो. इथे थांबतो. धाग्याचा विषय वेगळा आहे.

संजय क्षीरसागर's picture

11 Sep 2020 - 11:34 pm | संजय क्षीरसागर

जातकाचं भविष्य जाणण्याशिवाय काय आहे ?

तुमचं विधान : ज्योतिष कार्यकारणाचा वेध घेतं, म्हणजे ताकाला जाऊन भांडं लपवणं आहे. कारण सगळ्याचा उद्देश जातकाच्या भविष्याचं अनुमान हाच आहे. जर कार्यकारणाचा उद्देश `अस्तित्वातला एक बिंदू वेगळा काढून त्यावर खास वेगळा परिणाम होतो ' असा असेल तर तो व्यर्थ आहे कारण समग्रात असा खटाटोप निरर्थक आहे. आणि ते असंभव ही आहे.

१.

तुम्ही सूर्य डोक्यावर असताना कडक उन्हात बसलात तर तुम्हाला चटके बसतील आणि क्षितिजावर असताना ते तसे बसणार नाहीत हेच सिम्पल लॉजिक त्यात आहे. आता चटके 'तुम्हाला' बसले म्हणजे इथे तुम्ही केंद्रस्थानी आहेत म्हणून उन्हात बसण्याचा आणि चटके बसण्याचा कार्यकारणभाव नाही असे म्हणणे निव्वळ वेडेपणा ठरेल.

चटका कुणाला बसतो हाच प्रश्ण आहे ! सावलीत मीच जाईन, सूर्य नाही. उन्हात असलेल्या प्रत्येकाला चटका बसेल, त्यात अमका अमक्या वेळी जन्मला म्हणून फरक पडणार नाही.

२.

तस्मात कार्य कारण बदलले तरी परिणाम पुढे राहू शकतातच. मागचेच उदा घेऊ. कडक उन्हात बसून तुम्हाला ताप आला तर ऊन सरूनही ताप राहीलच. स्थिती बदलली पण परिणाम राहिला.

पुन्हा चुकीचं लॉजिक ! सूर्य मला फॉलो करत नाही, तो सर्वांवर एकसारखा परिणाम करतो. परिणाम सतत चालू ठेवण्यासाठी ग्रह-तार्‍यांनी कायम जातकाला फॉलो करायला हवं आणि ते हास्यास्पद आहे.

३.

काळ स्थितीबद्दलचा निर्देशक आहे त्यामुळे तुम्हाला काळ नाही असे मानायचे असल्यास जरूर माना पण त्यामुळे ज्योतिष संकल्पना डळमळीत होत नाही. कारण ती तुमच्या आणि ग्रहांच्या स्थान आणि स्थितीवरती अवलंबून आहे

काय बोल्ता ? काळ अस्तित्वातच नाही. तुम्ही घरुन ऑफिसला जाता हा स्थितीबदल नाही, ती प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया एकाच कालात घडते आणि तो वर्तमान काळ आहे.

______________________________________

एक काम करा, हा जातक हटवा आणि ज्योतिषाला काय अर्थ राहतो ते सांगा.

आणि या समग्रातून एक जातक वेगळा करुन दाखवा; ते असंभव आहे.

आता तुम्हाला कळेल या अस्तित्वाच्या कायम वर्तमानात घडणार्‍या विश्वव्यापी प्रक्रियेत एक छदाम बिंदू वेगळा काढून; एका तितक्याच छदाम मेंदूतून, त्या नेमक्या बिंदूवर, समग्र अस्तित्वाच्या प्रक्रियेचा काय परिणाम होतो हे शोधणं म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. या वेडेपणाला ज्योतिष म्हणतात.

कोहंसोहं१०'s picture

12 Sep 2020 - 12:47 am | कोहंसोहं१०

ज्योतिष कार्यकारणाचा वेध घेतं, म्हणजे ताकाला जाऊन भांडं लपवणं आहे. कारण सगळ्याचा उद्देश जातकाच्या भविष्याचं अनुमान हाच आहे----------> म्हणजे भविष्यकाळ असतो हे तुम्ही मानलेत. चला जवळ आलात.

सावलीत मीच जाईन, सूर्य नाही. उन्हात असलेल्या प्रत्येकाला चटका बसेल, त्यात अमका अमक्या वेळी जन्मला म्हणून फरक पडणार नाही >>>> इथे जन्मणे म्हणजेच उन्हात असणे असा संदर्भ आहे. तुम्ही संध्याकाळी (सूर्य मावळतीला असताना) जन्मलात (उन्हात गेलात) तर चटका बसणार नाही इतके साधे लॉजिक आहे. हाच तो कार्यकारण आणि परिणाम भाव आणि तेच तर ज्योतिष सांगत आहे.

पुन्हा चुकीचं लॉजिक ! सूर्य मला फॉलो करत नाही, तो सर्वांवर एकसारखा परिणाम करतो. परिणाम सतत चालू ठेवण्यासाठी ग्रह-तार्‍यांनी कायम जातकाला फॉलो करायला हवं आणि ते हास्यास्पद आहे. >>>>>>> परिणाम सतत चालू ठेवण्यासाठी ग्रह-तार्‍यांनी कायम जातकाला फॉलो करायला हवं हेच तुमचा लॉजिक हास्यास्पद आहे. परिणाम हा मूळ कार्यकारण भाव सम्पल्यावरदेखील चालू राहू शकतो. पुन्हा वाचा: "तस्मात कार्य कारण बदलले तरी परिणाम पुढे राहू शकतातच. मागचेच उदा घेऊ. कडक उन्हात बसून तुम्हाला ताप आला तर ऊन सरूनही ताप राहीलच. स्थिती बदलली पण परिणाम राहिला".
आणि इथे फॉलो करणे असं काही नसतं. तुम्ही जोपर्यंत पृथ्वीवर आहात आणि ग्रह तारे जोपर्यंत त्यांच्या कक्षेत आहेत तोपर्यंत त्याचा परिणाम जाणवत राहील.
बायदवे, अभ्यास आणि अनुभव नसलेल्या गोंष्टीविषयी मत मांडणे हा आपला स्वभाव आहे म्हणून सांगतो. ज्योतिषात गोचर नावाची संकल्पना आहे ज्यात सद्य परिस्थितीतल्या ग्रह-ताऱ्याच्या स्थानावरून कार्यकारणभाव आणि परिणाम यांचे भाकीत मांडले जाते.

काळ अस्तित्वातच नाही. तुम्ही घरुन ऑफिसला जाता हा स्थितीबदल नाही, ती प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया एकाच कालात घडते आणि तो वर्तमान काळ आहे>>>>>> नेहमीप्रमाणे वैचारिक गोंधळ आणि वाक्यात परस्परविरोधीपणा. एकीकडे म्हणायचे काळ अस्तित्वातच नाही आणि पुन्हा म्हणायचे एकच काळ आहे वर्तमानकाळ.
ज्योतिष काळावर अवलंबून नाही हे मी वर सांगितलेच आहे. तुमच्या जन्मस्थानानुसार ग्रह ताऱ्यांची अवकाशस्थ स्थिती आणि कार्यकारण भावाने त्याचे होणारे परिणाम यांवर ते अवलंबून आहे.
ज्योतिष्यात काळ हा मनुष्याच्या सोयीसाठी वापरण्यात येणार निर्देशक आहे. पण त्यावर अवलंबत्व नाही.

एक काम करा, हा जातक हटवा आणि ज्योतिषाला काय अर्थ राहतो ते सांगा >>>>> अतिशय बालिश विधान. हे म्हणजे पेशंट ला हटवा मग मेडिकल सायन्स किंवा डॉक्टरला ला काय अर्थ राहतो ते सांगा म्हणण्यासारखे आहे. असे काय करून काय होणार?

कोहंसोहं१०'s picture

11 Sep 2020 - 10:20 pm | कोहंसोहं१०

ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. >>>>>>>>>>

शेवटी श्रद्धा हि काही प्रमाणात अनुभवावर पण आधारित आहे. ज्योतिषावर संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे. कृष्णमूर्तींनी संशोधन करून केपी पद्धती विकसित केली जी बऱ्याच अंशी अचूक आहे. केपी आधारित प्रश्नकुंडलीवरून सांगितलेले आराखडे बऱ्याच प्रमाणात बिनचूक असतात याचा अनुभव मी स्वतः सुद्धा घेतला आहे. हाच अनुभव असंख्य जणांना आला आहे त्यामुळे केपी सिस्टम (खास करून प्रश्नकुंडलीसाठी) फेमस आहे.
मग याला श्रद्धा म्हणा किंवा शास्त्र. वस्तुस्थिती बदलणार नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Sep 2020 - 6:07 pm | प्रकाश घाटपांडे

शेवटी श्रद्धा हि काही प्रमाणात अनुभवावर पण आधारित आहे. ज्योतिषावर संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे. कृष्णमूर्तींनी संशोधन करून केपी पद्धती विकसित केली जी बऱ्याच अंशी अचूक आहे. केपी आधारित प्रश्नकुंडलीवरून सांगितलेले आराखडे बऱ्याच प्रमाणात बिनचूक असतात याचा अनुभव मी स्वतः सुद्धा घेतला आहे. हाच अनुभव असंख्य जणांना आला आहे त्यामुळे केपी सिस्टम (खास करून प्रश्नकुंडलीसाठी) फेमस आहे.
मग याला श्रद्धा म्हणा किंवा शास्त्र. वस्तुस्थिती बदलणार नाही. >>> http://mr.upakram.org/node/806 यातील प्रश्न क्रं ६ वाचा.

कोहंसोहं१०'s picture

13 Sep 2020 - 7:51 pm | कोहंसोहं१०

तुमचा प्रतिसाद आणि प्रश्नउत्तर वाचले. परंतु केवळ एका घटनेवरून संपूर्ण प्रश्नशास्त्र निरुपयोगी आहे असे म्हणता येणार नाही. आपल्याकडे प्रॉब्लेम ज्योतिषशास्त्रचा नाही तर त्याला अर्धवट ज्ञानाने बाजारू बनवणाऱ्या ज्योतिषांचा आहे. ज्योतिष शास्त्र एवढे प्रचंड आहे की अर्धे जीवनही खर्ची घालून पूर्ण ज्ञान होणे असंभव. पण कुडमुडे ज्योतिषी काही महिन्यांच्या अभ्यासावर भविष्य कथन सुरु करतात. कंपौंडरच्या गोळ्यांनी बरे नाही झाल्यास वैद्यकीय क्षेत्राला दोष देऊन काय होणार?

बाकी प्रश्नशात्राचे म्हणाल तर पाहुणे कधी येणार लाईट कधी येणार असल्या सहज जाता जाता विचारलेल्या प्रश्नांसाठी प्रश्नशात्र मुळीच नाही. तो त्याचा दुरुपयोग झाला. त्यात प्रश्न विचारताना जातकाची तळमळ पण महत्वाची.
मी स्वतः त्याचा अनुभव एकापेक्षा जास्त वेळा घेतला आहे आणि त्याचा फायदाही झालेला आहे. जर खरंच जेनुइन प्रश्न तळमळीने आणि एकाग्रचित्ताने योग्य ज्योतिषास विचारल्यास अचूक मार्गदर्शन मिळते ह्याचा अनुभव घेतला आहे.
ही तळमळ आणि प्रश्नाचे योग्य स्वरूप प्रश्नकुंडलीतला चंद्र नेमका दाखवतो आणि निष्णात ज्योतिषाने योग्य आकडेमोड करून योग्य मार्गदर्शन करणे अथवा त्याने सांगितले तसेच/त्याच कालावधीत घडून येणे हा केवळ योगायोग असू शकत नाही हे तुमच्यासारख्या ज्योतिषास ठाऊक आहेच.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Sep 2020 - 11:30 am | प्रकाश घाटपांडे

आता हा तुमच्या मित्राचा प्रश्न घेतला तर त्याची प्रश्नकुंडली मांडून उत्तर कसे देणार? अगदी तळमळीने विचारला असला तरी?
मी स्वतः त्याचा अनुभव एकापेक्षा जास्त वेळा घेतला आहे आणि त्याचा फायदाही झालेला आहे. जर खरंच जेनुइन प्रश्न तळमळीने आणि एकाग्रचित्ताने योग्य ज्योतिषास विचारल्यास अचूक मार्गदर्शन मिळते ह्याचा अनुभव घेतला आहे.>>>>>>>> या विषयी जरुर लिहा!

संजय क्षीरसागर's picture

15 Sep 2020 - 2:29 pm | संजय क्षीरसागर

१.

लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे लागतील ? आता हा तुमच्या मित्राचा प्रश्न घेतला तर त्याची प्रश्नकुंडली मांडून उत्तर कसे देणार? अगदी तळमळीने विचारला असला तरी ?

जगातले सर्व ज्योतिषी आणि जातक या बेसिक प्रष्णानं ग्रासलेले असतील पण प्रष्णाचं उत्तर मात्र कोणत्याही ज्योतिषाला, बापाजन्मात देता येणार नाही.

२. तळमळ आणि प्रश्नाचे योग्य स्वरूप प्रश्नकुंडलीतला चंद्र नेमका दाखवतो आणि निष्णात ज्योतिषाने योग्य आकडेमोड करून योग्य मार्गदर्शन करणे अथवा त्याने सांगितले तसेच/त्याच कालावधीत घडून येणे हा केवळ योगायोग असू शकत नाही.

इतका भंपक विचार सुशिक्षित व्यक्ती करत असेल तर अशिक्षितांना काय म्हणणार ?

असा प्रतिसाद लिहिणार्‍याला मी खुलं आवाहन देतो की त्यानी न लाजता अत्यंत तळमळीनं (ती आपसूकच येईल) वरील प्रश्ण त्याला प्रचिती आलेल्या कोणत्याही ज्योतिषाला विचारावा आणि नक्की आकडा इथे सादर करावा ! आणि तो आकडा जातक कोणत्या कर्तबगारीवर आणि केंव्हा गाठेल हे पण सांगावं ! एका मिनीटात सगळ्या धारणांचा धुव्वा उडेल.

कोहंसोहं१०'s picture

16 Sep 2020 - 12:00 am | कोहंसोहं१०

प्रकाशजी,
ज्योतिषशास्त्राबद्दल तुम्ही थोडेबहुत जाणता असा माझा समज आहे त्यामुळे आपल्याकडून अश्या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. अजूनपर्यंत कोणत्याही ज्योतिषाने असा दावा केलेला नाही की कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ज्योतिषशास्त्राने देता येते. इतर क्षेत्राप्रमाणेच यालाही मर्यादा आहेत. आणि प्रश्नही तारतम्य बाळगूनच विचारावा लागेल.
आणि तरीही तुम्ही विचारलात तर प्रश्नातील फोलपणा प्रश्नकुंडलीतील चंद्र दाखवून देईलच हे तुम्हाला सांगायची गरज आहे का?

राहिला प्रश्न माझ्या एका धाग्याविषयीच्या प्रश्नाचा तर तो प्रश्नकुंडलीच्या आधारे सोडवणे शक्य नाही कारण प्रश्नकुंडली किंवा जन्मकुंडली तुम्हाला गणिती आकडा देऊ शकत नाही. हा पण हे जरूर सांगू शकते की तुमच्याकडे असलेला पैसा जिवंत राहण्यासाठी पुरेल की नाही किंवा आयुष्याच्या अंतापर्यंत पैसे येत राहतील किंवा नाही ते (कारण माणसाची हाव एवढी आहे की कितीही पैसा मिळाला तरी कमीच वाटेल)

समजा एक सिरीयस रुग्ण दवाखान्यात ऍडमिट झाला तर शरीररचनेचे ज्ञान असणारे डॉक्टर सुद्धा रुग्णाबद्दल सर्व काही सांगू शकत नाहीत कारण त्या शास्त्राला मर्यादा आहेत. अजुनपर्यंत असे अनेक रोग आहेत ज्याला इलाज नाही. पण म्हणून त्या आधारावर कोणी वैद्यकीय शास्त्राला खोटे ठरवू लागला तर ते मूर्खपणाचे ठरेल.

राहिला प्रश्न माझ्या अनुभवाचा- तर तो खूपच खाजगी असल्यामुळे इथे देता येणार नाही परंतु आपल्याला जर अनुभवच जाणून घ्यायाचे असतील तर खालील वेबसाईट वर भरपूर सापडतील तेही अगदी सूक्ष्म डिटेलसह.
अनुभवांविषयी शंका असल्यास तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्याविषयी जाणून घेऊ शकता.

बाकी जे ज्योतिषशास्त्राबद्दल माहिती मिळवण्याऐवजी उगाच तो भ्रम म्हणत फिरत असतात त्यांनी थोडा वेळ ज्योतिषशास्त्र नेमके काय आहे किंवा इतरांना काय अनुभव आलेत याचा शोध घेऊन माहिती करून घेतली तर जास्त बरे होईल. उगाच फडतूस तर्क देऊन ज्योतिषाला भ्रम म्हणणारे आणि आकांडतांडव करणारे पढतमूर्ख.

लिंक: https://www.mblog.suhasgokhale.com/
वरील लिंक वर जाऊन केस स्टडीज वर क्लिक केल्यास ढिगाने अनुभव वाचायला मिळतील.

हे डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही लिंक केवळ माहिती करता देत आहे. यात कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्याचा हेतू नाही अथवा त्या ज्योतिष्यकारापासून मला कोणताही आर्थिक फायदा नाही (उलट सल्ला घेतल्यामुळे यांची फी द्यावी लागली होती हाहा) याद्वारे मी सूचित करू इच्छित नाही की लोकांनी यांचे किंवा इतरांचे सल्ले घ्यावेत. निर्णय सद्सद्विवेकबुद्धीनेच घ्यावा.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Sep 2020 - 6:54 pm | प्रकाश घाटपांडे

सुहास गोखलेंशी माझे मायबोलीवर वाद संवाद झाले आहेत. ते चांगले ज्योतिषी आहेत. अनुभवातील काही भाग अनुभूतीचा ही असतो. त्यामुळे त्याचे मूल्यमापन व्यक्तिसापेक्ष असते. तुमचे व्यक्तिगत व खाजगी अनुभव असल्याने ते विश्लेषणा अभावी गुढ्च राहतात.
तसेच कुंडलीवरुन असलेले ज्योतिषाचे जातकाविषयी आकलन ही असेच काहीसे असते.

ज्योतिषशास्त्राबद्दल तुम्ही थोडेबहुत जाणता असा माझा समज आहे त्यामुळे आपल्याकडून अश्या प्रश्नाची अपेक्षा नव्हती.

पण अशा प्रश्नातूनच संवादाचे नवे आयाम खुले होतात. मी असे गृहीत धरतो की आपण उपक्रमावरील ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी ... ही लेखमाला व चर्चा दोन्ही वाचले आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Sep 2020 - 7:12 pm | प्रकाश घाटपांडे

मला प्रश्न कुंडली या प्रकाराच्या मर्यादा व तारतम्य या बाबत भाष्य करायचे होते म्हणून मी तो रिटायरमेंटचा प्रश्न घेतला. दुसरे असे की लिंकवर जे महादेवशास्त्री जोशी यांचे उदाहरण आहे ते आत्मपुराण हे पुस्तक मूळातून वाचण्यासारखे आहे .
सुज्ञ ज्योतिषी व आमच्यात खालील साम्य आहे. धोंडोपंत, सुहास गोखले यांची आठवण आहे
१) ज्योतिष या विषयावर प्रेम
२) ज्योतिष हे या ना त्या स्वरुपात टिकणारच. अज्ञाताचा शोध ही मानवी प्रवृत्ति आहे. यावर एकमत
३) ज्योतिषातील अपप्रवृत्तींना आता सुज्ञ ज्योतिषांनीच पायबंद घातला पाहिजे यावर एकमत.
४) ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे. सिद्धांत, संहिता आणि होरा. यातील पहिले दोन भागावर सहमती होरा अर्थात फलज्योतिष यावर मतभिन्नता असुन परस्परांविषयी आदर.
५) मतभिन्नता ही विषय समृद्धच करत असते यावर एकमत
६) ज्योतिषाव्यतिरिक्त अन्य विषयांवर समरुपता

कोहंसोहं१०'s picture

17 Sep 2020 - 1:37 am | कोहंसोहं१०

तुमच्या १-६ पॉईंट्स शी सहमत.
धोंडोपंत, सुहास गोखले यांच्या ब्लॉगवरच्या जवळपास सर्वच केस स्टडीज मी मध्ये वाचून काढल्या होत्या. धोंडोपंतांनी ब्लॉग बंद केला मध्ये. परंतु त्याआधीच सर्व वाचले होते. त्यांच्या केस स्टडीज डिटेल मध्ये नसल्या तरी बर्याच जास्त होत्या. सुहास गोखले यांच्या केस स्टडीज कमी आहेत पण खूप डिटेल मध्ये लिहिलेले आहे.
अर्थात जेवढे त्यांनी लिहिले आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त केस स्टडीज त्यांनी सोडवल्या असणार.
त्यावरून दोघेही सुज्ञ ज्योतिषी आहेत असे मला वाटते. त्यामुळे दोघांचा अनुभवही घेतला.
काही वर्षांपूर्वी ज्योतिष शिकायची खूप इच्छा झाली होती. केस स्टडीज वाचून बरेच शिकायलाही मिळाले.

यांच्याबरोबर बरेच माहित नसलेले निष्णात ज्योतिषी सुद्धा असतील ज्यांची अनेक भाकिते बरोबर आली असणार. सारांश, असे हजारोंनी लोक/केस स्टडीज असतील ज्यात नोंदवलेले प्रेडिक्शन हे तारीख आणि वेळेसकट बरोबर आलेले असणार. हे सर्व फक्त योगायोग असू शकत नाहीत.

"अनुभवातील काही भाग अनुभूतीचा ही असतो. त्यामुळे त्याचे मूल्यमापन व्यक्तिसापेक्ष असते. तुमचे व्यक्तिगत व खाजगी अनुभव असल्याने ते विश्लेषणा अभावी गुढ्च राहतात">>>>>>> असू शकते. परंतु ज्यांनी त्यांचे अनुभव नाव, गाव, पत्ता न देता सार्वजनिक करायची परवानगी दिली अश्या अनेकांचे अनुभव जे पंत आणि सुहासजी यांनी (आणि इतर अनेकांनी जे आपल्याला ठाऊक नाहीत) ब्लॉगद्वारे मांडले ते, तसेच आलेले वैयक्तिक अनुभव ज्योतिष संकल्पनेत काहीतरी तथ्य नक्कीच असले पाहिजे यावर विचार करायला भाग पाडतात.

म्हणूनच मी लिहिले होते की एकतर स्वतः अभ्यास करून किंवा एखाद्या निष्णात ज्योतिषाचा सल्ला घेऊन तारतम्याद्वारे तथ्य जाणण्याचा प्रयत्न करावा.

पण काहींना ज्ञान ही नाही आणि अनुभवही नाही तरीही फुटकळ लॉजिक आणि समजुतीच्या आधारावर ज्योतिष भ्रम म्हणत, आणि स्वतःच स्वतःला सर्वज्ञ म्हणत अहंकार कुरुवाळण्यातच धन्यता वाटते त्याला काय करणार.

बाकी तुम्ही धाग्याची आठवण करून दिली त्यावरून आठवले. मित्र भारतात नवीन नोकरीच्या शोधात आहे म्हणाला होता. जुनी आहे परंतु अस्थिरतेमुळे केंव्हाही जाऊ शकते बोललेला २ महिन्याखाली.
ज्योतिष सल्ला घेण्याचे सुचवून पाहतो. ठाऊक नाही त्याचा कितपत विश्वास आहे पण.

तुम्हाला अजून एखादा निष्णात ज्योतिषी ठाऊक असल्यास इथे किंवा व्यनीतून नक्की कळवा. तेवढेच तुम्हाला आणि मला कोणाला तरी मदत केल्याचे समाधान :)

ते काय जगातला कुणीही दिग्गज आणला तरी मी सिद्ध करु शकतो. मूळ उद्देश सदस्यांना वर्तमान काल म्हणजे नेमकं काय हे कळावं हा आहे.

पोस्टच्या अनुषंगानं, ते जर तुम्हाला कळलं तर भविष्याची चिंता संपेल. थोडक्यात, भविष्य या थोतांडाची तुम्हाला काहीही गरज उरणार नाही.

तस्मात, माझ्याशी वाद घालण्यापेक्षा काल हा दृष्टीभ्रम आहे हे समजून घेतलं तर तुमचं जगणं वर्तमानात येईल आणि ते आनंदाचं होईल. तुम्ही काल या मानवी कल्पनेचा उपयोग करु शकाल आणि त्याचा धसका कायमचा संपेल.

अ) फलज्योतिष हे धर्मातीत नाही असं बर्‍याचजणांना वाटतं पण तसं नाहीये. फलज्योतिष हे धर्मातीत आहे.मुळातच खाल्डियन/इजिप्त/बॅबिलोनिया या हिंदू धर्मीय नसलेल्या भूभागात जन्मलेलं फलज्योतिष हे केवळ हिंदू धर्माशीच निगडीत असेलंच कसं? फलज्योतिष हे मुस्लिम,ख्रिश्चन धर्मातील लोकही पाहतात. त्यांच्या पद्धती कदाचित वेगळ्या असतील पण ग्रहांची फलज्योतिषात वापरली जाणारी तत्वे मात्र सर्व धर्मांत समान आहेत.त्यात 'फारसा' फरक नाहीये.

संगीतकार ए. आर रहमान या हिंदू धर्मात जन्मलेल्या व्यक्तीला त्याची बिकट परिस्थिती बदलावी यासाठी मुस्लिम होण्याचा सल्ला एका हिंदू ज्योतिषानेच दिला आहे.
https://hindi.news18.com/news/entertainment/why-singer-a-r-rahman-conver...

ब) फलज्योतिषामुळे जातकाला मानसिक समाधान आणि व्यावसायिक फलज्योतिषाला किंवा पौरोहित्य करणार्‍यांना आर्थिक प्राप्ती होण्याव्यतिरिक्त अजूनही काही फायदे फलज्योतिषामुळे होत आहेत.

उदा. मंगळ असलेल्या व्यक्तीला विवाहासाठी मंगळ असलेला जोडीदारच शोधण्याचा सल्ला फलज्योतिषी देतात.सध्याच्या मुलींच्या नवर्‍याबद्दलच्या अतिअपेक्षा पाहता लग्नाचे वय लांबत जात असलेले आपण पाहतो.पण तेच जर मंगळ असलेली विवाहेच्छूक मुलगी असेल तर तिच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या मंगळ असलेल्या मोजक्या मुलांपैकीच कोणातरी एकाला होकार देऊन पूर्ण होणार आहेत.म्हणजेच मंगळ नसलेल्या मुलांना जितक्या प्रमाणात मुलींचा नकार ऐकावा लागतो तितके जास्त प्रमाण मंगळ असलेल्या मुलांमधे नसणार आहे.स्थळासाठी शोधाशोध कमी होईल.

फलज्योतिषशास्त्रानुसार आश्लेषा नक्षत्राची मुलगी असेल तर तिच्या सासूचे आणि तिचे सतत वाद होण्याची किंवा शक्यता असते.हे वाद पराकोटीला जाऊ शकतात.अशा स्थितीत फक्त आई हयात नसलेल्या मुलांची स्थळेच तिला येण्याची शक्यता असते.वरच्या उदाहरणाप्रमाणे इथेही अशा मुलीला निवडीसाठी पर्याय कमी असणारेत.त्यामुळेच कोणातरी मुलाला कमी शोधाशोध करुन जोडीदार मिळू शकतो.

ए. आर रहमान या हिंदू धर्मात जन्मलेल्या व्यक्तीला त्याची बिकट परिस्थिती बदलावी यासाठी मुस्लिम होण्याचा सल्ला एका हिंदू ज्योतिषानेच दिला आहे.

हा संदर्भ देऊन सादर केलेली लिंक पाहिली. त्यात हिंदू ज्योतिषी कोण? ते नेमके सांगितलेले नाही. ते होते ईरटै नाडीग्रंथ वाचक डॉ ॐ उलगनाथ. त्यांनीच हे कथन ते पुण्यात आले असता सांगितले होते...! असो.

कोहंसोहं१०'s picture

12 Sep 2020 - 1:58 am | कोहंसोहं१०

स्मूथ रस्त्यावरून जाणाऱ्यांना पुढे खड्डा आहे त्यामुळे सांभाळून जा किंवा आडरस्त्याचा वापर करा असे सांगणारा, तसेच खडबडीत रस्त्यामुळे हैराण झालेल्यांना योग्य रस्ता कधी कुठे भेटेल किंवा योग्य रस्त्यावर येण्यासाठी काय करावे लागेल याचे योग्य मार्गदर्शन करणारा भेटला तर उत्तमच असते. अश्यावेळी मी केवळ वर्तमानातच जगणार मग पुढे जाऊन खड्ड्यात पडले तरी बेहत्तर किंवा खडबडीत रस्त्यावरून त्रास भोगत असेच जात राहणार असे म्हणत बसले तर नुकसान आपलेच आहे. कारण निर्णयाचे परिणाम दूरगामी असू मग तो चुकीचा असो की बरोबर.
योग्य तारतम्य आणि चांगला ज्योतिषकार ह्या कॉम्बिनेशन ने एकंदरीत आयुष्यात बराच फायदा होऊ शकतो. खुबीने वापर करून घेता आला पाहिजे.
उगाच काळ भ्रम आहे, ज्योतिष भ्रम आहे, वर्तमानात जगा असले पुस्तकी ज्ञान पुस्तकातच शोभून दिसते.

गामा पैलवान's picture

12 Sep 2020 - 6:39 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुम्ही डोळे बंद केल्यानं प्रक्रिया थांबत नाही !

पण पूर्ण झालेली किंवा अर्धवट राहिलेली मूळ प्रक्रिया (उदा. सूर्य उगवणे) लक्षात यायला डोळे उघडायला हवेत ना? ही 'माझे डोळे उघडायची प्रक्रिया' जर अस्तित्वात नसेल तर मूळ प्रक्रियेचा अन्वयार्थ काय लावायचा?

आ.न.,
-गा.पै.

अन्नपचन डोळ्यांनी बघितल्याशिवाय होत नाही का ?

गामा पैलवान's picture

14 Sep 2020 - 1:08 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

न दिसलेल्या गोष्टी अस्तित्वात असतात, तर मग मन आणि काळ का अस्तित्वात नसतात? हेच दोघे भ्रम का?

आंबा जरी मस्तपैकी खाता येत असला तरी 'हापूस आंबा' हे ही भ्रामक विवेचनच ना? कारण की हापूस नामे काहीही अस्तित्वात नाही...?

आ.न.,
-गा.पै.

Rajesh188's picture

13 Sep 2020 - 1:47 am | Rajesh188

काळ भ्रम असेल तर गती पण भ्रम आहे.
अवकाशाच्या निर्वात पोकळीत गती सुद्धा भ्रम च वाटते तुम्ही गती मध्ये नसता तर स्थिर असता.
पण तुम्ही गती मध्ये आहात हे समजण्यासाठी काळ हे परिणाम वापरावे लागते .
आणि काळ हे परिणाम वापरल्या वर तुम्ही गती मध्ये आहात हे समजते आणि जे समजते तो भ्रम नसतो ते सत्य असते.

Rajesh188's picture

13 Sep 2020 - 12:10 pm | Rajesh188

फल ज्योतिष शास्त्राचे जे जनक होते त्यांनी हे शास्त्र शोधले आणि विकसित केले त्यांचे पण काही तरी मत असतील.
ग्रहांचे स्थान आणि व्यक्तीचे भविष्य ह्याची सांगड त्यांनी काही तरी अभ्यास करून घातला असेल.
निरीक्षण केली असतील,परिणाम बघितले असतील.
अनेक घटनांचा अभ्यास केला असेल आणि नंतर एक सू सुत्रित पद्धत निर्माण केली असेल.
आपण एका मिनिटात त्याला थोतांड म्हणणे योग्य नाही.
ज्योतिष शास्त्र कसे विकसित झाले,त्या विकासाची प्रक्रियेत कोण व्यक्ती होत्या त्यांचे काय विचार होते हे वाचायला आवडेल .
कोणाचा अभ्यास असेल तर ती बाजू सुद्धा वाचायला आवडेल.
Aug मध्ये ज्या मुलाचा जन्म झाला असेल त्याचे 1 वर्ष शिक्षण चे वाया जाईल .1 वर्ष उशिरा त्याला 1 st मध्ये प्रवेश मिळेल असे भविष्य मी जन्म वरून वर्तवू शकतो.

या प्रमेयाला नाडीग्रंथ भविष्य तडा पाडते. व्यक्ति जन्माला आली ती वेळ आणि स्थळ याशिवाय कुंडली मांडली जाऊ शकत नाही. पण नाडीग्रंथ भविष्यातील कथन व्यक्ति जन्माच्या आधीच लिहून तयार असेल तर? योगी अरविंद सावित्री महाकाव्यात तेच म्हणतात.
प्रा अद्वयानंद गळतगे ही हेच प्रतिपादन करतात कि ग्रह तारे हे एक व्यवस्थेचा भाग आहेत. अमुकतमुक ग्रह अमुक ठिकाणी असेल तर इतर ग्रहांची स्थाने अशी अशी असतील तर अशा योगायोगाने तमुक तमुक फळ मिळते. या अडाखे तयार करून भविष्यातील घटनांचा वेध घेतला गेला आहे!

संजय क्षीरसागर,

तुम्ही केलेल्या दोन विधानांवर निरीक्षणं नोंदवावीशी वाटली.

१.

१ सप्टेंबर २०२० ते १३ सप्टेंबर २०२० या गणनेला कालावधी म्हणतात.

अवधी म्हणजे फरक, बरोबर? म्हणजे सुरुवातीचा बिंदू आणि अखेरचा बिंदू हे दोन्ही अस्तित्वात असले पाहिजेत. यावरून अवधी हे सापेक्ष अस्तित्व आहे. याचाच अर्थ कुठेतरी निरपेक्ष अस्तित्व असणार. त्यालाच काळ का म्हणू नये?

२.

सर्व ग्रह-तारे आणि सर्व जातक एकाच अस्तित्वागत प्रोसेसचा भाग आहेत कारण अस्तित्व एक आहे. त्यातल्या ' विविक्षित जातकाला त्याच्या जन्मवेळे प्रमाणे वेगळा काढून त्यावर अस्तित्वाच्या समग्र प्रोसेसचा काय परिणाम होईल ?' हे शोधण्याचा परम मूर्खपणा इतकाच ज्योतिषाचा अर्थ आहे.

जातकाने घरून निघण्याच्या कुठल्याशा क्षणावर बेतलेलं अनुमानधपक्यांचं कोष्टक विकायला ठेवतात ठिकठिकाणी. रेल्वेचं वेळापत्रक म्हणतात त्याला.

आ.न.,
-गा.पै.

२. जातकाने घरून निघण्याच्या कुठल्याशा क्षणावर बेतलेलं अनुमानधपक्यांचं कोष्टक विकायला ठेवतात ठिकठिकाणी. रेल्वेचं वेळापत्रक म्हणतात त्याला.

सर्व प्रवाशांनी ठराविक वेळी स्टेशनवर असावं यासाठी वेळापत्रक आहे. ती एक सर्वोपयोगी सोय आहे पण त्याचा अर्थ अस्तिवात तितके वाजले असा होत नाही. कारण अस्तित्व ही अविरत चाललेली प्रक्रिया आहे; तीचं विभाजन होऊ शकत नाही. ज्योतिष मात्र विभाजनावर आधारित आहे : जन्म वेळ (भूतकाळ), कुंडली पहाणं (वर्तमान काळ) आणि फेकंफाक (भविष्य काळ); त्यामुळे ते व्यर्थ आहे.

१. अवधी म्हणजे फरक, बरोबर? म्हणजे सुरुवातीचा बिंदू आणि अखेरचा बिंदू हे दोन्ही अस्तित्वात असले पाहिजेत. यावरून अवधी हे सापेक्ष अस्तित्व आहे. याचाच अर्थ कुठेतरी निरपेक्ष अस्तित्व असणार. त्यालाच काळ का म्हणू नये ?

हे निरपेक्ष अस्तित्वंच सनातन वर्तमान आहे; तोच कालावधी जाणतो (अन्यथा तो फरक कोण जाणणार ?), त्यालाच एंप्टीनेस म्हटलंय आणि त्यातच सर्व घटना घडतात. हा एंप्टीनेस कालाबाधित आहे; घडणार्‍या घटना आणि त्यांची कालबद्धता याच्याशी त्याचा काहीएक संबंध नाही; त्यामुळे त्याला काल म्हणता येत नाही.

पेप्रात नवीन सिनेमावर टीका आली, चिकित्सा आली तरी थेटरात मात्र सिनेमा गल्ला गोळा करतोच धुमधडाक्यात तसं ज्योतिष चिकित्सेचं असतं..

प्रकाश घाटपांडे's picture

14 Sep 2020 - 10:16 am | प्रकाश घाटपांडे

वरील अर्थाने काल आपण घेतला तर भूत वर्तमान व भविष्य असे ढोबळमानाने प्रकार सोयीसाठी घेउ. यातील मनुष्याच्या भविष्यातील ऐहिक जीवनातील घटना उदा. विवाह, घटस्फोट ,व्यवसाय, नोकरी ,अर्थार्जन, पदोन्नती ,आजार ,अपघात वगैरे.... सांगता येतात का? मूळात त्या चित्रपटाच्या रिळप्रमाणे ठरलेल्या असतात का? दैव हा भाग एक पंचमांश मानला तरी या प्रातांत कोणत्या घटना येतात? प्रचलीत फलज्योतिषाचे साधन कुंडली वरुन स्त्री कि पुरुष, जिवंत कि मृत या गोष्टी सांगता येतात का? आत्ताचा वर्तमान हा जन्मवेळच्या कुंडली नुसार हा भविष्यच असणार ना!

अनुप ढेरे's picture

14 Sep 2020 - 12:40 pm | अनुप ढेरे

वेळ या संकल्पनेबद्द्ल खालील व्हिडो चांगला आहे. वेळ,एन्ट्रोपि आणि बिग बँग हे कसे रिलेटेड आहेत याबद्दल. वक्ता फिसिसिस्ट आहे. केवळ शाब्दिक जिलब्या पाडणारा भोन्दु नाही.

उगीच विडीओ पेस्ट करुन वर काही तरी फालतू रिमार्क मारायची सवय सोडा.

१. अस्तित्वातल्या प्रक्रियेत रिवर्सल नाही त्यामुळे त्याला वाटतंय टाइम हा अ‍ॅरोसारखा आहे. त्याच्या उदाहरणानुसार अंडं फोडलं आणि त्याचं ऑम्लेट केलं की पुन्हा अंडं तयार होत नाही > हा टाइम अ‍ॅरो !

याचं स्पष्टीकरण मी गामांना रेल्वे सिग्नलच्या प्रतिसादात दिलं आहे ते वाचा.

२. नंतर तो एंट्रपीबद्दल बोलतो आणि प्रोसेसचा स्पीड कसा कमी जास्त होतो याबद्दल सांगतो; पण त्यानं काहीही फरक पडत नाही. सगळ्या प्रोसेसेस एकसमावयच्छेद करुन वर्तमानातच घडतात. बिग बँग ही वर्तमानातच घडला आणि युनिवर्सल एक्स्पांशन (किंवा काँट्रॅक्शन) वर्तमानातच घडतंय, सगळं जेंव्हा ब्लॅक होलमधे जाईल तो सुद्धा वर्तमानच असेल.

तुम्ही वर्तमानानाकडे काळ म्हणून बघतायं आणि घटनांकडे कालातून बघतायं ( बिग बँग > भूतकाळ, युनिवर्सल एक्स्पांशन (किंवा काँट्रॅक्शन) > वर्तमान काळ आणि ब्लॅक होल > भविष्य काळ) म्हणून तुमचा घोळ होतोयं.

वर्तमान हा काळ नाही, तो अमर्याद एंप्टीनेस आहे आणि अस्तित्वातल्या एकूणएक प्रक्रिया त्यातच घडतायंत.

संजय क्षीरसागर,

१.

ज्योतिष मात्र विभाजनावर आधारित आहे : जन्म वेळ (भूतकाळ), कुंडली पहाणं (वर्तमान काळ) आणि फेकंफाक (भविष्य काळ); त्यामुळे ते व्यर्थ आहे.

रेल्वेचे सिग्नल पण भूत, वर्तमान आणि अस्तित्वात नसलेलं भविष्य याच्या आधारे चालतात ना? आत्ता सिग्नल पाळल्याने नंतर टळणारे अपघात ही वर्तमानातली फेकाफेकच असते ना?

२.

@ गामा पैलवान : आधी मन कुठे तरी फिट करत होतात आणि आता काल !

माझ्या प्रकृतीनुसार यालाच समग्र अभ्यास म्हणतात. पण तुमचं मत वेगळं असू शकतं.

आ.न.,
-गा.पै.

१.

माझ्या प्रकृतीनुसार यालाच समग्र अभ्यास म्हणतात. पण तुमचं मत वेगळं असू शकतं.

समग्र अभ्यास म्हणजे एखादा शब्द कुठे तरी फिट करण्याचा प्रयास नव्हे. ते एकूण विषयाचं यथार्थ आकलन आहे. कसं ते पहा :

२.

रेल्वेचे सिग्नल पण भूत, वर्तमान आणि अस्तित्वात नसलेलं भविष्य याच्या आधारे चालतात ना? आत्ता सिग्नल पाळल्याने नंतर टळणारे अपघात ही वर्तमानातली फेकाफेकच असते ना ?

रेल्वेच्या सिग्नलच्या तीन्ही अवस्था वर्तमान काळातच घडतात. तो न्यूट्रल असतो तेंव्हाही वर्तमानात असतो, त्याचं रेड होणं हा सुद्धा वर्तमान असतो आणि तो ग्रीनही वर्तमानातच होतो.

तुम्ही त्या अवस्था कालाधारित पद्धतीनं बघता त्यामुळे तसा दृष्टीविभ्रम होतो. न्यूट्र्ल आणि रेड ही तुमची स्मृती असते; ग्रीन हा तुमचा वर्तमान असतो आणि सिग्नल पुन्हा रेड होईल हा तुमचा भविष्यकाळ असतो.

थोडक्यात, एकावेळी सिग्नलची एकच स्थिती असते आणि तो कायम वर्तमान काळच असतो.

कोहंसोहं१०'s picture

14 Sep 2020 - 9:08 pm | कोहंसोहं१०

एका वेळी एक स्थिती असली तरीही स्थितीमध्ये बदल आहे आणि तो बदल एक वेगळी घटना आहे (कधी ग्रीन तर कधी रेड). हा स्थितीमध्ये बदल जर पुढे होणार असेल तर आधीच्या चालू स्थितीसाठी तो त्याचा भविष्यकाळ, बदल होऊन गेला असेल तर झालेला बदल हा चालू स्थितीसाठी भूतकाळ आणि ज्या क्षणी तो बदल होईल तो त्या बदलासाठीचा वर्तमानकाळ. आणि हा बदल कधी होणार असेल हे सांगता येत असेल तर चालू स्थितीसाठी ते झाले स्थितीबदलाचे प्रेडिक्शन. इतकं सोपं आहे.

काळ स्वतः जरी अनंत असला तरी घडणाऱ्या घटना आणि स्थितीबदल मर्यादित आहेत. त्या घटना आणि स्थितीबदलाचे परिमाण दर्शवण्यासाठी काळाचा वापर आहे. आणि जिथे बदल आहे तिथे तो केंव्हा होऊ शकेल हेही प्रेडिक्ट करणे संभव आहे.
आता हेच लॉजिक ज्योतिषाला लावून पहा. सर्व आरशासारखं स्वच्छ दिसेल.

तुम्ही काळ आणि बदलाची स्थिती यात वैचारिक गोंधळ करत बसला आहेत.

आणि ती अध्यात्मिक साधनेतली पहिली पायरी आहे.

१.

एका वेळी एक स्थिती असली तरीही स्थितीमध्ये बदल आहे आणि तो बदल एक वेगळी घटना आहे (कधी ग्रीन तर कधी रेड).

समोर असलेली स्थिती स्पष्ट दिसत नाही, त्यात स्मृती आणि कल्पना आड येते असा याचा अर्थ आहे. जर समोर ग्रीन असेल तर ग्रीनच दिसायला हवा आणि रेड असेल तर फक्त रेडच.

२.

हा स्थितीमध्ये बदल जर पुढे होणार असेल तर आधीच्या चालू स्थितीसाठी तो त्याचा भविष्यकाळ, बदल होऊन गेला असेल तर झालेला बदल हा चालू स्थितीसाठी भूतकाळ आणि ज्या क्षणी तो बदल होईल तो त्या बदलासाठीचा वर्तमानकाळ. आणि हा बदल कधी होणार असेल हे सांगता येत असेल तर चालू स्थितीसाठी ते झाले स्थितीबदलाचे प्रेडिक्शन

समोर जे आहे ते कायम स्मृती आणि कल्पनेच्या धुराळ्यात मिसळत असणं हे अज्ञानी व्यक्तीचं प्राथमिक लक्षण आहे. तुम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

सजगता याचा अर्थ जे समोर आहे ते स्पष्ट दिसतंय. तुम्हाला अजून सजगता आणि विभ्रम यातला फरक कळलेला नाही. एकदा समोरचं स्पष्ट दिसायला लागलं की वास्तव आणि विभ्रम (मेंटल अ‍ॅक्टीविटी) यात तुम्ही फरक करु शकाल.

सजगता परमावस्थेला पोहोचल्यावर तुम्हाला समोरचा ग्रीन स्पष्ट दिसेल आणि रेड ही स्मृती किंवा कल्पना आहे (ते मनाचं प्रोजेक्शन आहे हे सुद्धा स्पष्ट दिसेल). तुमच्या स्मृती आणि कल्पनेचा प्रवाह जो तुमच्या मेंदूत अविरत चालू आहे तो तुम्हाला स्पष्ट डोळ्यासमोर दिसेल. तो तुम्हाला गरजेप्रमाणे अ‍ॅक्टीव करता येईल (काही आठवायचं असेल तर) किंवा गरज नसेल तेंव्हा थांबवता येईल. याला मनावर हुकूमत येणं म्हणतात.

सजगता म्हणजे काय हेच माहित नसेल तर, चुकीचं अध्यात्मिक वाचन, अवास्तव कल्पना विलास, अवैज्ञानिक विचारसरणी आणि तर्कशून्य बुद्धी; यामुळे सगळा अध्यात्मिक प्रवास हुकला आहे.

३.

काळ स्वतः जरी अनंत असला तरी घडणाऱ्या घटना आणि स्थितीबदल मर्यादित आहेत. त्या घटना आणि स्थितीबदलाचे परिमाण दर्शवण्यासाठी काळाचा वापर आहे. आणि जिथे बदल आहे तिथे तो केंव्हा होऊ शकेल हेही प्रेडिक्ट करणे संभव आहे.
आता हेच लॉजिक ज्योतिषाला लावून पहा. सर्व आरशासारखं स्वच्छ दिसेल.

इथे सगळंच कसं हुकलं आहे ते स्पष्ट दिसेल.

स्थिती बदल काय किंवा घटना काय एकाच काळात सर्व घडतयं आणि तो वर्तमान काळ आहे. कृष्ण याचं वर्णन सनातन वर्तमान असं करतो. याचा अर्थ कृष्ण व्यक्ती म्हणून अजून अस्तित्वात आहे असा होत नाही, तर वर्तमान या स्वरुपात तो सर्व अस्तित्व घेरुन आहे असा होतो. आणि तेच आपलं स्वरुप आहे त्यामुळे कृष्ण आणि आपण यात रत्तीभर सुद्धा फरक नाही. पण इतकी लेवल यायला आणि ते समजायला तुम्हाला कदाचित कैक वर्ष लागतील. त्यात भर म्हणजे तुमचे इतके फंडामेंटल गोंधळ आहेत आणि ते तुम्ही असे काही रेटतायं की बोलता सोय नाही. हे अज्ञान आधी दूर झाल्यावर मग थोडीथोडी दृष्टी स्वच्छ होईल, तदनंतर तुम्हाला मी काय म्हणतोयं ते कळेल >

थोडक्यात तुम्हाला फक्त रेड दिसेल, स्मृतीतला ग्रीनमधे येणार नाही आणि कल्पनेतला ऑरेंज तो धूसर करणार नाही.

कोहंसोहं१०'s picture

15 Sep 2020 - 2:56 am | कोहंसोहं१०

मुद्दा अध्यात्मिक नाहीच आहे. मी आधीच सांगितलंय, अध्यात्माच्या त्या उंचीवरून काळ काय सरसकट प्रकृतीच भास आहे. अगदी विज्ञान सुद्धा कारण विज्ञान हे केवळ प्रकृतीबद्दल आहे.

परंतु इथे चर्चा अध्यात्माची नाहीच आहे.

जोपर्यंत तुम्ही प्रकृतीमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही प्रकृतीच्या नियमांशी बांधील आहात आणि त्यात काळ, ज्योतिष, भविष्यकालीन घटनांचा वेध हे सर्व वैध आहे आणि चर्चा ही त्या अंगाने सुरु आहे.

याआधीही सांगितलंय की तुमचे सोयीस्कर अध्यात्म इथे आणू नका. सत्य केवळ एकच आहे आणि तिथे विज्ञान चालत नाही कारण निर्गुण, निराकार, अचल सत्याला काय विज्ञान लावणार? हिम्मत असेल तर हेच अध्यात्म सर्व विज्ञानाच्या धाग्यावर पण जाऊन ओका. आणि ती हिम्मत नसेल तर इथेही त्या सत्याचा दाखला देत ज्योतिष खोटे म्हणत बसू नका.

सोयिस्करपणा बास झाला तुमचा.

आता मी वरच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे स्थितीबदल/घटना बदल झाला की आपोआप सापेक्ष काळ येतोच. आणि योग्य नियम लावून पुढील स्थितीबदलाचे प्रेडिक्शन पण करता येते. उदा २ स्थानांमधील अंतर १०० किमी असेल आणि गाडीचा वेग ५० किमी/तास असेल तर गाडी एका स्थानातून दुसऱ्या स्थानी २ तासाने पोहोचेल असे प्रेडिक्ट करता येते. हे प्रेडिक्शन स्थितीबदलाचे आहे. अखंड चालणाऱ्या काळाचे नाही. हेच ज्योतिषशास्त्राच्या बाबतीतही लागू आहे.

तसेही बदल होत असेल आणि तो जाणवत असेल तर सामान्य जाणिवेच्या पातळीवर काळ अखंड आहे म्हणून काही उपयोग नाही.
भूक लागली की खाण्यातच शहाणपणा असतो तेंव्हा शरीर भ्रम आहे असले फालतू वक्तव्य तिथे करून चालत नाही.
अगदी तसेच जे प्रकृतीशी बांधील आहेत त्यांना मार्गदर्शन म्हणून ज्योतिषाचा उपयोग नक्की होईल.

बाकी एकंदर तुमचा मिथ्या अहंकार, वाक्यातील परस्परविरोध, चुका न स्वीकारण्याची वृत्ती, शब्दबंबाळपणा पाहता तुम्ही सत्यापासून प्रचंड दूर आहात आणि प्रकृतीशी बांधील आहात हे चटकन कोणीही सांगू शकेल. पुस्तकी ज्ञानातून शब्दांच्या गोल गोल जिलब्या पडून सत्य गवसत नाही.
अध्यात्मातील सर्वात मोठा अडसर-अहंकार दूर करण्याचा प्रांजळ सल्ला मी याआधीही तुम्हाला दिलेला...पुन्हा देईन.
करा जमले तर प्रयत्न.

संजय क्षीरसागर's picture

15 Sep 2020 - 3:11 pm | संजय क्षीरसागर

१.

परंतु इथे चर्चा अध्यात्माची नाहीच आहे.

गहन अज्ञान ! सनातन वर्तमान हा अध्यात्माचा विषय आहे आणि कालविभाजन हा ज्योतिषाचा. एकतर अध्यात्म खरं आहे किंवा मग थोतांड ज्योतिष. तुम्हाला एक धड ठरवता येत नाही.

२.

जोपर्यंत तुम्ही प्रकृतीमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही प्रकृतीच्या नियमांशी बांधील आहात आणि त्यात काळ, ज्योतिष, भविष्यकालीन घटनांचा वेध हे सर्व वैध आहे आणि चर्चा ही त्या अंगाने सुरु आहे

पुन्हा अज्ञान ! अध्यात्म आणि ज्योतिष हे जगण्याचे दोन मार्ग आहेत. अध्यात्म प्रकृती नाकारतं हे कुठल्या पुस्तकात वाचलं ?

३.

याआधीही सांगितलंय की तुमचे सोयीस्कर अध्यात्म इथे आणू नका. सत्य केवळ एकच आहे आणि तिथे विज्ञान चालत नाही कारण निर्गुण, निराकार, अचल सत्याला काय विज्ञान लावणार? हिम्मत असेल तर हेच अध्यात्म सर्व विज्ञानाच्या धाग्यावर पण जाऊन ओका. आणि ती हिम्मत नसेल तर इथेही त्या सत्याचा दाखला देत ज्योतिष खोटे म्हणत बसू नका.

अत्यंत भंपक विधान ! सत्यातच सर्व प्राकृतिक नियमानुसार घडतंय (ज्या प्राकृतिक नियमांचा उलगडा झाला आहे त्यातून विज्ञान निर्माण झालं आहे) ; तुमच्या ज्योतिषाच्या फेकंफाकी नुसार नाही. न तुम्हाला सत्य काय याची माहिती, न ज्योतिषाच्या फालतूगिरीची.

४.

उदा २ स्थानांमधील अंतर १०० किमी असेल आणि गाडीचा वेग ५० किमी/तास असेल तर गाडी एका स्थानातून दुसऱ्या स्थानी २ तासाने पोहोचेल असे प्रेडिक्ट करता येते.

हे फिजिक्समधे येतं, ज्योतिषात नाही. फारच फंडामेंटल घोळ आहेत !

५.

भूक लागली की खाण्यातच शहाणपणा असतो तेंव्हा शरीर भ्रम आहे असले फालतू वक्तव्य तिथे करून चालत नाही.

हे तुमचे भंपक संत शिकवतात ! सूज्ञ माणूस जेवतो.

६.

बाकी एकंदर तुमचा मिथ्या अहंकार, वाक्यातील परस्परविरोध, चुका न स्वीकारण्याची वृत्ती, शब्दबंबाळपणा पाहता तुम्ही सत्यापासून प्रचंड दूर आहात आणि प्रकृतीशी बांधील आहात हे चटकन कोणीही सांगू शकेल. पुस्तकी ज्ञानातून शब्दांच्या गोल गोल जिलब्या पडून सत्य गवसत नाही.
अध्यात्मातील सर्वात मोठा अडसर-अहंकार दूर करण्याचा प्रांजळ सल्ला मी याआधीही तुम्हाला दिलेला...पुन्हा देईन.करा जमले तर प्रयत्न.

वरच्या प्रतिसादात तुमच्या आकलनाचं पूर्ण पितळ उघडं पाडलंय ! आता तुमच्याकडे काहीही मुद्दा नाही म्हणून व्यक्तिगत पातळीवर निर्बुद्धपणा रेटतांय.

शिवाय ते काय कमी होतं तर तुम्हाला ही अवदसा आठवली : लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे लागतील ? आता करा सूंबाल्या या धाग्यावरुन.

गामा पैलवान's picture

15 Sep 2020 - 12:09 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

१.

समग्र अभ्यास म्हणजे एखादा शब्द कुठे तरी फिट करण्याचा प्रयास नव्हे.

माझा मार्ग मुंगीचा आहे. मला याच मार्गाने जावं लागणार. माझ्याकडे पंख नाहीत.

२,

तुम्ही त्या अवस्था कालाधारित पद्धतीनं बघता त्यामुळे तसा दृष्टीविभ्रम होतो.

सगळंच जर वर्तमान आहे तर बदल कशात होतोय?

किंवा मग सगळाच जर भ्रम आहे तर, सगळ्यांना एकाच प्रकारचा भ्रम कसा होतो? उदा. : चालकासकट सगळ्यांना लाल सिग्नल दिसणे, आणि त्याचा सगळ्यांना एकाच प्रकारचा अर्थबोध होणे. सांगायचा मुद्दा असा की याच्या मुळाशी जाणून घ्यायची इच्छाशक्ती आहे.

आ.न.,
-गा.पै.

१.

सगळंच जर वर्तमान आहे तर बदल कशात होतोय ?

बदल वस्तू (म्हणजे आकारातच) होतो; पण तो प्रकृती नियमानुसार (किंवा मानवी कृत्यानुसार, उदा. युद्ध) होतो; बदलाचा आणि कालाचा काहीएक संबंध नाही.

२.

किंवा मग सगळाच जर भ्रम आहे तर, सगळ्यांना एकाच प्रकारचा भ्रम कसा होतो? उदा. : चालकासकट सगळ्यांना लाल सिग्नल दिसणे, आणि त्याचा सगळ्यांना एकाच प्रकारचा अर्थबोध होणे.

सगळंच भ्रम आहे असा घोषा इथल्या एका निर्बुद्ध आयडीनं लावला आहे.

माझं विधान इतकंच आहे की काल हा भास आहे कारण अस्तित्वात दिवस-रात्र असा प्रकारच नाही. आणि त्या अनुषंगानं ज्योतिष हा कालाधारित फेकाफेकीचा सर्वत्र चाललेला प्रोग्राम बोगस आहे.

विचार करु शकणार्‍या सुशिक्षित लोकात विज्ञाननिष्ठ आणि तर्कपूर्ण दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणून मी लिहितो आहे.

३.

चालकासकट सगळ्यांना लाल सिग्नल दिसणे, आणि त्याचा सगळ्यांना एकाच प्रकारचा अर्थबोध होणे

ही वर्तमानात घडणारी वस्तुस्थिती आहे, भ्रम नव्हे.

हे तर सगळं आपल्या डोक्यावरून जाणारं आहे.. कारण सकाळची कामे दुपारची आणि रात्रीची कामे हे करून एक दिवस मरायचं ... हे स्पष्ट आहे मग हे सगळं कशाला...
तरी पण एक प्रतिक्रीय द्यावीशी वटते
कोणीतरी या धाग्यात आधी म्हणाले कि " काळ हा भ्रम आहे आणि तो मनमानी सोयीसाठी निर्माण केलं आहे"
मानवाने जरी त्याची व्याख्या केली असेल तरी तो भ्रम कसा?
आज दुपारी संद्याकाळी कधी तरी मला तहान भूक लागणार हे सत्य नाही का ( म्हणजे असा गृहीत धरू ) ? अस्तित्व नाही का?
उगवणे /जन्मने आणि मरणे हे तर सगळीकडे आणि त्यातील अंतर तोच काळ ना

आता दुपार याची वयख्या पाहिजे तर कोणी नवीन करू शकेल पण त्यात मग भ्रम कसला...
सर्वसामान्यांना समजेल अससी कोणी सांगणार असेल तर सांगा नाहीतर उगाच डोकेफोड नको

चौकस२१२'s picture

15 Sep 2020 - 7:47 am | चौकस२१२

मनमानी सोयीसाठी ?
नाही तर मानवाने असे वाचावे

चौकस२१२'s picture

15 Sep 2020 - 7:53 am | चौकस२१२

आत्ता सापडलं ..
"वेळ हाच भ्रम आहे म्हटल्यावर सगळं जोतिष निरर्थक आणि निराधार ठरतं !"
इति संक्षी....
माझी प्रतिक्रिया त्यावर बेतलेली होती ( यातील ज्योतिष याबद्दल च्या संक्षींच्या प्रतिक्रियेवर आपण ९९% सहमत पण ते "वेळ हाच भ्रम आहे" हे काय बुवा !

कोहंसोहं१०'s picture

15 Sep 2020 - 8:29 am | कोहंसोहं१०

वेळ किंवा काळ हा भ्रम त्यांच्यासाठी जे प्रकृतीच्या किंवा मायेच्या नियमांपलीकडे गेलेले आहेत आणि ज्यांना निखळ सत्य एकमेव अस्तित्व यांचा बोध झाला आहे. त्यांच्यासाठी जोतिष काय, निखळ अस्तित्व सोडून सर्वच भ्रम. याला आदी शंकराचार्यांनी आध्यात्मिक सत्य म्हणले आहे जे अंतिम सत्य आहे.

पण मुळातच ज्योतिष हे त्या लोकांसाठी आहे जे प्रकृतीने मायेने बांधले गेले आहेत आणि त्यामुळेच सृष्टीच्या नियमांना बांधील आहेत (जसे की पृथीवरचे जवळपास सर्वच लोक). त्या सर्वांसाठी काळ, वेळ, स्थान सर्व सत्य कारण आपण मितीमध्ये बांधलो गेलेलो आहोत. त्यातून जोपर्यंत सुटून जात नाही तोपर्यंत मायेच्या नियमांना बांधील म्हणजे जन्म, मृत्यू, तहान, भूक, आनंद, दुःख, भय, निद्रा, स्थितीबदल इत्यादी इत्यादी.
यालाच आदी शंकराचार्यांनी व्यावहारिक सत्य म्हणले आहे. ज्योतिष याच व्यावहारिक सत्याचा एक भाग आहे.

दुर्दैवाने संक्षींना ज्योतिषशास्त्रविषयी फारशी माहिती नाही किंवा त्यांनी त्याचा अनुभवही घेतलेला नाही. परंतु स्वतःला सर्वज्ञ घोषित केल्यामुळे स्वतःचे ज्योतिषशास्त्राबद्दलचे अज्ञान झाकण्यासाठी ते सोयीस्करपणे आध्यात्मिक सत्याचा वापर करत ज्योतिष भ्रम हा मुद्दा रेटत आहेत.

कोहंसोहं१०'s picture

15 Sep 2020 - 8:40 am | कोहंसोहं१०

कोणत्याही चर्चेत व्यावहारिक सत्यामधील एखाद्या गोष्टीची अव्यवहार्यता दर्शवण्यासाठी व्यावहारिक सत्यामधील गोष्टींचाच वापर करावा आणि चर्चा उच्च अध्यात्मिक पातळीची असेल तर आध्यात्मिक आणि व्यावहारिक अश्या दोन्ही सत्याचा वापर करावा हा एक साधा प्रघात त्या (आदी शंकराचार्यांच्या) काळी रूढ होता जो आजही तितकाच व्हॅलिड आणि अप्लिकेबल आहे.
पण सर्वज्ञ आणि अध्यात्मातील उच्च ज्ञानी असा (गैर)समज असणाऱ्यांना एवढी साधी गोष्ट माहित नाही याचेच आश्चर्य वाटते.

हे नेमकं आव्हान स्वीकारा :

लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे लागतील ?

नाही तर तुमच्या कुडबुड्या ज्योतिषाला इतक्या वास्तविक आणि व्यावहारिक प्रश्णाचं उत्तर सांगता येत नाही हे कबूल करा.

कोहंसोहं१०'s picture

16 Sep 2020 - 2:27 am | कोहंसोहं१०

हा प्रश्न ज्योतिशास्त्राचा नसून गणिततज्ञांचा आहे हे न समजण्याइतकी निर्बुद्धता आणि अज्ञानता दाखवण्यापेक्षा आधी ज्योतिष काय आहे त्याचा अभ्यास करा मग बोला.

संजय क्षीरसागर's picture

16 Sep 2020 - 2:53 pm | संजय क्षीरसागर

धनलाभ आणि आर्थिक समृद्धी हा ज्योतिषाचा विषय नाही असं फक्त मूर्खच म्हणेल. जे अंबानी किंवा अडानी नाहीत त्यांची मुख्य विवंचना अर्थप्राप्तीच आहे.

निर्बुद्ध जातक कुडबुड्याला विचारतो तसा प्रष्ण विचारा :

माझ्या जीवनात धनसंपन्न निवृतीचा योग कधी आहे ?

आणि आता कुडबुड्या काय सांगतो ते सकारण इथे लिहा (म्हणजे सगळी पोल खुलेल)

कोहंसोहं१०'s picture

17 Sep 2020 - 1:49 am | कोहंसोहं१०

निर्बुद्ध जातक कुडबुड्याला विचारतो तसा प्रष्ण विचारा : माझ्या जीवनात धनसंपन्न निवृतीचा योग कधी आहे ? आणि आता कुडबुड्या काय सांगतो ते सकारण इथे लिहा
>>>>>>>>>>>
हा प्रश्न विचारायला सांगून तुम्ही खरे निर्बुद्ध आहात हेच सिद्ध केले. कारण रिटायरमेंट हि संकल्पनाच खूपच सापेक्ष आहे. प्रश्न कसा/कोणता/किती तारतम्य ठेऊन विचारावा हाही खुबीचा भाग आहे.
म्हणून म्हणालो होतो तुम्ही एकतर अभ्यास करा किंवा स्वतः अनुभव घ्या मग बोला. त्याऐवजी केलेली सगळी बडबड फक्त तुमचे अज्ञान दर्शवते. बाकी काही नाही.

याची तुम्हाला खात्री आहे का ? असल्यास ती कशामुळे आणि कुणी दिली ?

ज्योतिषाच्या भरवश्यावर तुमचा श्वास चालू आहे का ? ज्या ग्रह-तार्‍यांच्या जोरावर हे भंपक शास्त्र तुम्ही रेटतांय, ते ज्योतिष शास्त्र ग्रह-तारे चालवतं का ?

कशाच्या जोरावर तुमचे बिनडोक ज्योतिषी भविष्याची ठोकाठोकी करतात ? काय आधार आहे त्या शास्त्राला ? काय भरवसा आहे तुम्हाला पुढच्या क्षणाचा ?

ज्या जातकाला उल्लू बनवायचं काम चाललंय त्याच्या पुढच्या श्वासाची गॅरेंटी नाही. जातक येड्यासारखा मनोभावे ऐकतोयं आणि ज्योतिषी ठोकतोयं यापलिकडे त्या शास्त्राला काहीएक अर्थ नाही.

एकसोएक निर्बुद्ध प्रतिसाद देऊन ज्ञानाची व्यर्थ भाषा कशाला करता ?

कोहंसोहं१०'s picture

17 Sep 2020 - 2:54 am | कोहंसोहं१०

आणि राहिला प्रश्न पोल खोलण्याचा तर मी वर एका ब्लॉग ची लिंक दिलेली (पुन्हा देतो- https://www.mblog.suhasgokhale.com/ ) तिथे जाऊन लोकांच्या केस स्टडीज वाचा. त्यातून कोणत्या प्रकारचे प्रश्न कसे सोडवले आणि कोणत्या पातळीपर्यंत अचूक उत्तरे मिळाली, जातकाचे प्रतिसाद काय होते हे सर्व काही दिले आहे.
अगदी वाटलेच तर ब्लॉगर ना फोन करून खात्री करून घ्या सगळ्याची. आपल्या प्रकाश सरांच्या ओळखीचे आहेत ते.

अगदीच वाटले तर गेलाबाजार सरळ अनुभव घेऊन पहा...हा का ना का.

याव्यतिरिक्त ही बरेच काही मिळेल आंतरजालावर. पण तुमच्यासाठी वरचे पुरे.

फक्त एक करा - वाचताना मात्र तुमचा पूर्वग्रहदूषितपणा बाजूला काढून ठेवा. एका वेगळ्या ज्ञानाची कवाडे खुलतील तुमच्यासाठी. आपोआप कळून येईल कोणाची पोल खोलली जाते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजची स्वाक्षरी: अभ्यासोनि (अन अनुभवानि) प्रकटावे, ना तरी झाकोनि असावे| प्रकटोनि नासावे, हे बरे नोहे ||
~समर्थ रामदास (थोडेसे बदलून)

चौकस२१२'s picture

15 Sep 2020 - 5:37 pm | चौकस२१२

ज्योतिष याच व्यावहारिक सत्याचा एक भाग आहे.!
जगातील कोट्यवधी लोकांचं खिजगणतीत हि ते नाही आणि ती लोक "ज्योतिष मानणाऱ्या" लोकांएवढेच सुख आणि दुःख भोगत आहेत

अगतिक आणि अशक्य झाल्यावर लवकर मरण यावं हीच इच्छा .. त्यावेळी असल्या गोष्टीवर अवलंबून राहायची काडीभर हि इच्छा नाही आणि ती इच्छा पाळली जाईल अशी आशा करत जगणारा एक सर्वसामान्य म्हणून म्हणून हे दोन शब्द

परंतु केवळ एका घटनेवरून संपूर्ण प्रश्नशास्त्र निरुपयोगी आहे असे म्हणता येणार नाही. आपल्याकडे प्रॉब्लेम ज्योतिषशास्त्रचा नाही तर त्याला अर्धवट ज्ञानाने बाजारू बनवणाऱ्या ज्योतिषांचा आहे. ज्योतिष शास्त्र एवढे प्रचंड आहे की अर्धे जीवनही खर्ची घालून पूर्ण ज्ञान होणे असंभव. पण कुडमुडे ज्योतिषी काही महिन्यांच्या अभ्यासावर भविष्य कथन सुरु करतात.

संपूर्ण आभ्यास केलेले ज्योतिषी तुमच्या पाहण्यात आले आहेत का ?

जर नसेल तर या मुद्द्यावरून कोणतेही अंधविश्वास पुढे रेटणे सहजशक्य आहे. व्हूडू,चेटूक,रेकी इत्यादी इत्यादी.

इतकेच काय, ज्योतिष ही काही अशी एकमेव शाखा नाही. अश्या इतरही गूढ आणि सुप्त शाखा आहेत, ज्यांचे पुरेपूर ज्ञान कोणालाच नाही (कारण मुळात अशी गरजच कुणाला वाटली नाही.) उदा- रसायनशास्त्रामध्ये परिवर्तित होण्याआधी अल्केमी चा आभ्यास होई. आजच्या रसायनशास्त्र आभ्यासपद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न पद्धत होती ती. त्यात परीस बनवण्याचा आभ्यास केला जाई. न्यूटन सुद्धा यात खेळत असे. आज त्या शाखेचा पूर्ण आभ्यास असलेला व्यक्ती नाही. तरी अल्केमीमधले असे घटक ज्यांचा रसायनशास्त्रात उल्लेखच नाही, त्यांमध्ये काही तथ्य होते असे मानावे काय ?

दुसरा प्रश्न.
जर कुण्या एके काळी ज्योतिषशास्त्राचा संपूर्ण आभ्यास असलेले महारथी अस्तित्वात होते, आणि शास्त्राच्या संपूर्ण ज्ञानामुळे त्यांनी केलेली भाकिते खरी होतं, तर हे असे अत्यंत उपयोगी शास्त्र आज का बरे इतके दुर्लक्षित झाले ? इतके प्रचंड उपयुक्त शास्त्र आज कोणी जाणत नाहीत हे कसे ? (धर्माधारीत शास्त्रांचे अभ्यासक अजूनही असतातच, तर असे ज्योतिषी आज का नाहीत ?)

प्रकाश घाटपांडे's picture

15 Sep 2020 - 8:17 pm | प्रकाश घाटपांडे

इतकेच काय, ज्योतिष ही काही अशी एकमेव शाखा नाही. अश्या इतरही गूढ आणि सुप्त शाखा आहेत, ज्यांचे पुरेपूर ज्ञान कोणालाच नाही>>>> अगदी बरोबर! शिवाय भविष्यकाळातील घटना जाणण्याचे फलज्योतिषाव्यतिरिक्त अन्यही पारंपारिक शाखा आहे जसे हस्त सामुद्रिक फेस रिडिंग शकुन अंकशास्त्र वगैरे...

कोहंसोहं१०'s picture

16 Sep 2020 - 3:10 am | कोहंसोहं१०

१. कोणत्याही विषयाचा पुरेपूर अभ्यास असणारी व्यक्ती सापडणे कठीण आहे (मिपावरचा एक सर्वज्ञानी आयडी सोडल्यास ज्यांना अभ्यासाची गरजही नाही).

परंतु एवढे सांगू शकतो की माझ्या माहितीत असे ज्योतिषी आहेत ज्यांच्या सल्ल्याचा मला उपयोग झाला. मला ते अभ्यासक देखील वाटले (बाकीच्या कुडमुड्या ज्योतिषांऐवजी तरी).
तसेही ज्योतिष विषयांवरचे मराठी ब्लॉग/साईट तश्या कमीच आहेत परंतु काही वाचायचेच असल्यास (खास करून लोकांचे अनुभव/केस स्टडीज) मला हा ब्लॉग विशेष आवडला आणि लेखक सुद्धा अभ्यासक वाटले. त्यावरून मी एकदा सल्ला घेतला होता त्यांचा ज्याचा फायदा झाला. याशिवाय आणखी ज्योतिषी आहेत जे मला ठाऊक आहेत आणि त्यांच्या सल्ल्याचा उपयोगदेखील झाला होता.
लिंक वर एका प्रतिसादात दिली होती पुन्हा देतो-
लिंक: https://www.mblog.suhasgokhale.com/

वेळ मिळाल्यास केस स्टडीज वाचा. भरपूर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. थोडाफार अंदाज येईल की कोणत्या प्रकारच्या प्रश्नाचे कितपत अचूक उत्तर मिळू शकते ते.

'अश्या इतरही गूढ आणि सुप्त शाखा आहेत, ज्यांचे पुरेपूर ज्ञान कोणालाच नाही >>>>> खरे आहे. कालौघात बर्याचश्या विद्या नष्ट पावल्या. ज्योतिषविद्या कदाचित उपयुक्ततेमुळे पुढे सुरु राहिली. परंतु आता त्यात अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. मी एका प्रतिसाद म्हणल्याप्रमाणे ५०-६० वर्षांपूर्वी कृष्णमूर्तींनी संशोधन करून एक पद्धत विकसित केली ज्यावर आधारित प्रेडीक्शन्स मध्ये अनेकांना अचूक रिजल्ट मिळाले आणि ती पद्धत केपी पद्धत म्हणून प्रचलित झाली.

२. 'अत्यंत उपयोगी शास्त्र आज का बरे इतके दुर्लक्षित झाले ? इतके प्रचंड उपयुक्त शास्त्र आज कोणी जाणत नाहीत हे कसे ?'>>>> काळाचा महिमा म्हणू शकतो. परकीय आक्रमणात सुद्धा आपण बरेचसे ज्ञान गमावले. जेवढे उरले त्याचे बाजारीकरण होत गेले. त्यात अनुभव आणि अभ्यास दोहोंच्या अभावात जुन्या ज्ञानाकडे तुच्छतेने पाहून त्याला नावं ठेवली की आम्ही आधुनिक विचारसरणीचे पुरोगामी ही मानसिकता रूढ झाली आणि अजूनही आहे (इथेही पाहताच आहात की).

बाकी अभ्यास आणि अनुभव नसताना फडतूस लॉजिक वर स्वतःचे मत रेटणाऱ्या निर्बुद्ध आयडींपेक्षा तुमच्यासारखी जिज्ञासूवृत्ती केंव्हाही चांगलीच.

गामा पैलवान's picture

16 Sep 2020 - 1:54 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगेन म्हणतो.

१.

बदलाचा आणि कालाचा काहीएक संबंध नाही.

माझ्या मते आहे. बदल होतो कारण काल अस्तित्वात आहे. एव्हढंच नव्हे तर तो बदल टिपणारं मनही अस्तित्वात आहे. तुम्ही वर म्हणंत होतात ना की मी मन कुठे तरी फिट करत होतो आणि आता काल, त्यामागचं कारण असं की काल आणि मन परस्परांवर अवलंबून आहेत.

तुम्ही ज्या दोन गोष्टी नाकारता आहात, त्या परस्परांशी संबंधित आहेत. हे माझ्या बाबतीतही होऊ शकतं. उदा. : माझ्या दृष्टीने साम्यवाद व समाजवाद या टाकाऊ विचारसरण्या आहेत. मात्र त्या एकमेकींशी घनिष्ट रीतीने संबंधित असू शकतात.

२.

काल हा भास आहे कारण अस्तित्वात दिवस-रात्र असा प्रकारच नाही.

अस्तित्व कालातीत असतं, हे मान्य. पण त्यासाठी काळाला नाकारण्याची गरज नाही (माझ्या मते).

३.

ही वर्तमानात घडणारी वस्तुस्थिती आहे, भ्रम नव्हे.

ही वस्तुस्थिती आहे तर ती बदलतेय कशीकाय? ती बदलणारा एजंट कोणतरी असला पाहिजे. तो एजंट म्हणजे काल. आणि ती बदलती वस्तुस्थिती टिपणारा एजंट म्हणजे माझं मन.

आ.न.,
-गा.पै.

ही वस्तुस्थिती आहे तर ती बदलतेय कशीकाय? ती बदलणारा एजंट कोणतरी असला पाहिजे. तो एजंट म्हणजे काल. आणि ती बदलती वस्तुस्थिती टिपणारा एजंट म्हणजे माझं मन.

वस्तुस्थिती बदलत नाही असं कोण म्हणतंय ? वर्तमान बदलत नाही आणि सारे बदल वर्तमानातच होतात असा दावा आहे.

वस्तू किंवा आकारातला बदल प्रकृती किंवा मानवी कृत्यान्वये होतो, कालामुळे नाही हे वर सांगितलं आहेच.

स्थितीबदल जाणणारा एलिमेंट जाणीव आहे, मन नाही.

गामा पैलवान's picture

17 Sep 2020 - 2:42 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

चर्चा निष्कारण लांबत असली तरी तत्त्वबोध होऊ शकतो. :-)

माझ्या मते जाणीव ही इच्छेसकट सर्वांचं मूळ आहे. तुम्ही ज्याला वर्तमान म्हणता तो जाणीवेचा पट आहे.

तुम्ही ज्याला वस्तुस्थिती म्हणता ती माझ्या मते मनाने जाणीवेकडे निवेदन केलेलं ( = रिपोर्ट केलेलं ) आकलन आहे.

तुम्ही काल नाही म्हणता ते विधान जाणीवेच्या पटावर यथोचित रीतीने शोभून दिसतं. व्यवहारात काल मानावा लागतोच. काल व मन परस्परपूरक पद्धतीने वापरले तर जाणीवेचा पट समृद्ध करता येतो.

काळाचं आकलन करायचं तंत्र याअर्थी ज्योतिषाकडे पाहायला हवं. अर्थात, तशी इच्छा असेल तरंच.

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

बाकी कितीही चर्चा करुन काही उपयोग नाही.

१. माझ्या मते जाणीव ही इच्छेसकट सर्वांचं मूळ आहे. तुम्ही ज्याला वर्तमान म्हणता तो जाणीवेचा पट आहे.

वर्तमान ही निर्वस्तू आहे, त्याला जाणीवेची यत्किंचीतही गरज नाही. देहाला जगण्यासाठी आणि जाणण्यासाठी जाणीवेची गरज आहे. जाणीव वर्तमानात होते पण वर्तमान जाणीवेनं बाधित होत नाही.

२. तुम्ही ज्याला वस्तुस्थिती म्हणता ती माझ्या मते मनाने जाणीवेकडे निवेदन केलेलं ( = रिपोर्ट केलेलं ) आकलन आहे

वस्तुस्थिती हे आपल्याला जाणीवे मार्फत झालेलं आकलन आहे.

३. तुम्ही काल नाही म्हणता ते विधान जाणीवेच्या पटावर यथोचित रीतीने शोभून दिसतं. व्यवहारात काल मानावा लागतोच. काल व मन परस्परपूरक पद्धतीने वापरले तर जाणीवेचा पट समृद्ध करता येतो.

काल नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. काल या मानवी कल्पनेचा जगण्यासाठी बेहद्द उपयोग आहे हे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे. जाणीवेनं जगतांना कालबोध आणि स्मृती आवश्यक आहेत > त्यामुळे जाणीव प्रायमरी आहे; काल आणि मन दुय्यम आहेत.

४. काळाचं आकलन करायचं तंत्र याअर्थी ज्योतिषाकडे पाहायला हवं

जे नाहीच त्याचं आकलन करुन घेणं हा व्यर्थ खटाटोप आहे.

___________________________

नाऊ आय एम डन !

गामा पैलवान's picture

18 Sep 2020 - 1:37 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

नाऊ यू आर डन ! तर तुमच्या इच्छेचा मान राखून मी ही थांबतो. फक्त आपल्या चर्चेतले असहमतीचे प्रमुख मुद्दे नोंदवतो.

१. तुम्ही काल व मन अस्तित्वात नसतं म्हणता, जे मला मान्य नाही.
२. तुम्ही निर्वस्तू असते असं म्हणता, ते ही मला मान्य नाही.

चर्चेबद्दल धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

उपयोजक's picture

16 Sep 2020 - 9:35 am | उपयोजक

मिपाकर तुर्रमखान यांनी त्यांना इथला पासवर्ड आठवत नसल्याने प्रतिसाद पेस्टवायला सांगितला आहे.तुर्रमखान यांचा प्रतिसाद

हा खूप जुनाच शब्दच्छल आहे.

स्ट्रींग थिअरी, क्वांटम फिजिक्स वगैरे पर्यंत जायचं कारण नै. बहुतेकांना समजणार्‍या विज्ञानातल्या अगदी साध्या नियमांपासून सुरवात करू. साधी भाषा, संदर्भ चौकटीची सुस्पष्टता, प्रयोग, निरिक्षण, गणितीय सिद्धता या पैकी फलज्योतिष्यात कशाचाच पत्ता नै आणि बहुतेकांना कळत नै म्हणून एकदम क्वांटम फिजिक्सचं उदाहरण का? हे म्हणजे साध्या आजारांवर औषधे, बर्‍याच रोगांवरच्या लशी, भूल देण्यापासून शल्यकर्म चिकित्से पर्यंत, रक्तगटा पासून इसीजी पर्यंतच्या चाचण्या हे सगळं सोडून तंबूत बसणार्‍या आयुर्वेदाचार्‍याने मॉडर्न मेडिसीनने देखिल हात टेकायला लावणार्‍या एड्स आणि कँन्सरवर उपचार करण्यासारखं आहे.

काही आयडी च्या हट्ट मुळे धागा एकाच ठिकाणी अडकला आहे.
बुद्ध धर्माच्या शिकवणीत कुठे तरी फक्त वर्तमान काळ च असतो बाकी काही नसते असे लिहलेले आहे तेच सत्य समजून त्या साठी बिनडोक प्रतिवाद केला जात आहे.
ज्योतिष शास्त्र ची समीक्षा आधुनिक युगात कशी केली गेली हुशार लोकांनी ते पण कमेंट मध्ये आले तर नवीन माहीत मिळेल.
सर्व बाजू चा विचार नक्कीच केला जावा.
फक्त काळ ह्याच भोवती फिरू नये ते पण एक धर्म शिकवणीत त्याचा उल्लेख आहे म्हणून.
Practically te 1000 % महाचुक आहे.

कोहंसोहं१०'s picture

17 Sep 2020 - 2:13 am | कोहंसोहं१०

ज्योतिष शास्त्र ची समीक्षा आधुनिक युगात कशी केली गेली हुशार लोकांनी ते पण कमेंट मध्ये आले तर नवीन माहीत मिळेल >>>>>>
मी वर एका प्रतिसादात कृष्णमूर्तीबद्दल लिहिले आहे. नेटवर त्यांच्या संशोधनांची बरीच माहिती मिळेल. दुर्दैवाने आपल्याकडे अनुभव घेणारे आणि जिज्ञासूवृत्तीने संशोधन करणारे कमी आणि स्वतःचे मत रेटणारे महाभाग, तसेच अंधश्रद्धाळू आणि त्यांचा फायदा घेणारे फसवे लोक हेच जास्त सापडतात.
म्हणून भारतात म्हणावे तसे संशोधन असे झालेले नाही. याबाबतीत पाश्चात्त्य लोक जास्त चौकस. अभ्यास आणि अनुभवाविना नाकारण्यापेक्षा संशोधन करून त्यांनी खरे खोटे जाणण्याचा प्रयत्न केला आणि बरीचशी प्रगती केली. आपल्याकडे मात्र आयटी इंडस्ट्री प्रमाणे क्लायंट सर्विस वर जास्त भर दिला गेला वैदिक ज्योतिषाचा आधार घेऊन. कृष्णमूर्ती मात्र अपवाद ज्यांनी संशोधन करून नक्षत्रांवर आधारित प्रेडिक्शन देण्याची स्वतःची पद्धत विकसित केली.
असे वाचले होते की पूर्वी रामायण (बहुतेक महाभारत सुद्धा) वगैरे काळात नक्षत्रांवर आधारित प्रेडिक्शन द्यायचे. राशींचा प्रवेश नंतर झाला.
इथे थोडेसे वाचायला मिळेल: http://www.vedic-astrology-prediction.com/indian-astrology.html#:~:text=....

जगात फक्त दोनच टाइपचे लोक आहेत, काल नाही हा बोध झालेले आणि तो न झालेले. या दोन्हीच्या सीमारेषेवर एखादा असतो, पण बोध न झालेल्यांचा रेटाच इतका प्रचंड असतो की ते त्याला पार भंजाळवून टाकतात !

बोध न झालेले जन्मभर टाइम-लाईनवर जगतात. जड झालेला भूतकाळ, विषेश काहीही प्रयोजन नसलेला वर्तमान आणि गाढवाच्या डोळ्यांसमोर धरलेल्या गाजरासारखा भविष्य काळ अशी त्यांच्या जीवनाची रुपरेषा असते. वर्तमान हा त्यांच्यासाठी भूतकाळाकडून भविष्यकाळाकडे नेणारा एक अनिवार्य (पण व्यर्थ) पूल असतो. अशा लोकांचं आयुष्य कायम हॉरिझाँटलच राहतं. थोडक्यात, वर्तमान हेच जगण्याचं सर्वस्व आहे हा बोध कादाचित त्यांना शेवटच्या क्षणाला होत असावा.

काल नाही हा बोध झालेला संपूर्ण वर्तमानात जगतो, त्याचं जगणं वर्टीकल होतं. त्याला भविष्याची (म्हणजे ज्योतिषाची) फिकीर नसते आणि त्याच्यासाठी भूतकाळ हा संपलेला विषय असतो. आयुष्यात काहीही घडण्यासाठी (किंवा घडवण्यासाठी) वर्तमान हा एकमेव काळच आहे इतकी साधी गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. त्याच्याकडे स्मृती आणि कल्पना यापासून वास्तव वेगळं करण्याची जबरदस्त जागरुकता येते. सतत वर्तमानात असल्यानं तो अस्तित्वाशी समरुप असतो कारण समग्र अस्तित्व कालरहित वर्तमान आहे.

मी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केला.

या पोस्टवर अनाकलानाची इतकी परिसीमा झाली आहे की यापलिकडे मी वेळ घालवू इच्छित नाही.

डॅनी ओशन's picture

17 Sep 2020 - 3:04 pm | डॅनी ओशन

तुमच्या सारखे मत असलेले सोडून इतर सर्व बिनडोक या निष्कर्षाला पोहोचला ! बरे झाले हो.

मी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केला. या पोस्टवर अनाकलानाची इतकी परिसीमा झाली आहे की यापलिकडे मी वेळ घालवू इच्छित नाही.

ऑइन्क ?
हे तर तुम्ही कित्येक युगांपासून सांगत आहात...
"निर्बुद्धपणाचा कळस, गंडलेलं लॉजिक, आता मात्र हद्द झाली, काय बोलता !"इत्यादी इत्यादी.
आज नवीन युरेका युरेका काय झालं वं ? अचानकच अनाकलनाची परिसीमा कश्शी काय ब्रे दिसली ?

अगदी मोह आवरला नाही म्हणून जाता जाता :

या पोस्टवर अनाकलानाची इतकी परिसीमा झाली आहे की यापलिकडे मी वेळ घालवू इच्छित नाही.

&#128524

डॅनी ओशन's picture

17 Sep 2020 - 3:13 pm | डॅनी ओशन

काळाचा धसका अजून संपला नाही वाट्टे ! &#128518