उद्योगासाठी फंड कसा मिळवावा?

विनिता००२'s picture
विनिता००२ in काथ्याकूट
10 Aug 2020 - 3:13 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

आम्ही एक स्पोर्टस व आर्ट्स ट्रेनिंग इंन्स्टीट्युट काढत आहोत. तयारी सुरु झाली आहे.
सध्या स्टार्ट अप साठी शासनाच्या काही योजना आहेत असे लक्षात आले. पण नेमके कुठे व कसे अप्रोच करावे ते कळत नाहीये. आमचे प्रोजेक्ट बरेच मोठे असल्याने फंड बराच लागेल.
तर...
स्टार्ट अप साठी फंड 'शासन किंवा संस्था' यांकडून कसा मिळवता येईल. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
धन्यवाद!!

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

10 Aug 2020 - 5:23 pm | संजय क्षीरसागर

१. प्रोजेक्ट वायेबिलीटी आणि अत्यंत लॉजिकल व अचूक फायनॅन्शीअल प्रोजेक्शन्स
२. प्रवर्तकांचा अनुभव, त्यांची क्रेडेंशियल्स आणि सांपत्तिक स्थिती
३. प्रवर्तकांचा भांडवली सहभाग
४. इतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता (एमेसएमइ रजिस्ट्रेशन, फॉर्म ऑफ ऑरगनायझेशनचं रजिस्ट्रेशन (फर्म. एलएलपी, कंपनी), या व्यावसायासाठी लागणार्‍या इतर शासकीय मान्यता (उदा. सेफ्टी मेजरस, वॉशरुम्स, फायर फायटींग, इक्विपमेंटस स्टँडर्डस)

_______________________________________

थोडक्यात, तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला फायनान्सरला सेल करता आला पाहिजे.

तुमची एकूण आवश्यकता (टर्म लोन + वर्कींग कॅपिटल) किती याविषयी तुम्ही काही लिहिलेलं नाही, तरीही

कोणत्याही प्रोजेक्ट फायनान्ससाठी बँका सर्वात उत्तम

चौकस२१२'s picture

11 Aug 2020 - 9:20 am | चौकस२१२

स्टार्ट अप धनराशी मिळण्यासाठी त्या उद्योगाच्या कल्पनेत काहीतरी नावीन्य असावे लागते+ ती कल्पना सहज वाढवता आली पाहिजे ( स्केलेबल ) ...
साधारण यामुळे ला फिनटेक, मेडिटेक , रेग्युलेटरी टेक अश्या क्षेत्रातील कल्पनाना प्राधान्य दिलेले दिसते , प्रथमदर्शनी तरी आपली कल्पना हि "पारंपरिक " वाटत आहे
त्यामुळं कदाचित स्टार्ट उप पेक्षा पारंपरिक पद्धतीचा फिनान्स याकडे बघावे (संक्षी यांनी अगदी व्यवहारी सल्ला दिला आहेच )

व आर्ट्स ट्रेनिंग इंन्स्टीट्युट" त्यात "उद्योगाची जागा" हा एक फार मोठा खर्चाचा भाग ( मालकी / भाड्याने घेणे " आहे असे आपल्या वर्णावरून वाटते ...
अजून एक प्रकारे पैसे उभं करण्याची कल्पना मी बघितलेली आहे ती म्हणजे
भागीदार,
- समजा तुमचं कडे जागा मालकीची असेल तर भागीदार इतर पैसे
किंवा
- मचं कडे पैसे आणि या उद्योगाचा अनुभव असेल तर असा भागीदार बघणे कि ज्याकडे जागा आहे !

उअद्योग कल्पेन्पचा विस्तार किती आहे ती माहिती दिली नहियेत त्यामुळे सल्ला देणे हि अवघड आहे , असो खाजगी बाब असले तर व्यनि करा ..नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट असले तर ते पाठवा

चौकस२१२'s picture

11 Aug 2020 - 9:23 am | चौकस२१२

वर्णावरून !
टंकलेखन बद्दल क्षमा "वर्णनावरून " असे म्हणायचे होते

विनिता००२'s picture

12 Aug 2020 - 10:58 am | विनिता००२

सल्ल्यांबद्दल धन्यवाद!

कल्पना नवीन नसली (तशा बर्‍याच कल्पना जुन्याच असतात :) ) तरी जिथे सुरु करतोय ती जागा / शहर पूरक आहे.
तिथे अशा प्रकारच्या अ‍ॅकेडमीची गरज पण आहे. माहीती काढून मगच हा निर्णय घेतला आहे.

भागीदार घेण्याचे टाळणार आहे, कारण त्यातून पुढे बरेच वाद निर्माण होतात. स्टार्टटप साठी फंड देणार्‍या योजना अभ्यासते आहे. धन्यवाद!
बँकांना प्रथम प्राधान्य आहे. :)

कारण त्यातून पुढे बरेच वाद निर्माण होतात.

एकदम पर्फेक्ट निर्णय ! पण तुमच्याकडे स्वतःचं भांडवल हवं (ओनर्स इक्विटी) किंवा मग पर्सनल लोन घ्यावं लागेल. तो तुमचा व्यक्तीगत व्यावहार असेल.

तुमच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना दिसत नाही (जी स्टार्ट-अपची कन्सेप्ट आहे) त्यामुळे बहुदा तुम्हाला ट्रॅडीशनल पद्धतीनं जावं लागेल असं दिसतंय.

सध्या या १० योजना आहेत बघा.

गुड लक !

विनिता००२'s picture

14 Aug 2020 - 9:32 am | विनिता००२

धन्यवाद सर __/\__

चौकस२१२'s picture

14 Aug 2020 - 9:30 am | चौकस२१२

विनिता००२ , आपण मांडलेली कल्पना आणि निवडलेली जागा वगैरे सगळं योग्य असेलच, मला शंका घ्याचे काही कारण नाही .. माझया म्हणण्याचा अर्थ वेगळा होता, स्टार्ट अप सध्या ज्या पद्धतीचे दिसतात आणि फंड केले जातात त्यादृष्टीने म्हणत होतो एवढेच (अर्थात हे हि खरे कि प्रत्येक उद्योग हा स्टार्ट अप असतो ...)

असो तर व्हेंचर कॅपिटल किंवा नेहमीचे बँक हे + तुमचे स्वतःचे काय योगदान आहे ( % एकूण खर्च ) हाच मार्ग यौग्य दिसतो.. आपण फार कमी माहिती दिली आहेत त्यामुळे कसे कोण सविस्तर सांगू शकेल?
उदाहरणार्थ एकूण निधी च्या किती टक्के आपले स्वतःचे आहेत? , आधीचा अनुभ इत्यादी .
शुभेच्छा

विनिता००२'s picture

14 Aug 2020 - 9:34 am | विनिता००२

रागवू नका हो, मी फक्त शंका निरसन केले.
मी पण अजून अभ्यास करतेच आहे :)

सल्याबद्दल धन्यवाद __/\__

कंजूस's picture

13 Aug 2020 - 6:00 pm | कंजूस

Balaji trust, satya sai trust यांचेकडे फंड असतात आणि योग्य ठिकाणी देतातही. आन्ध्रा तेलुगु सिनेमा इंडस्ट्रीवाल्यांकडेही पैसा आहे.

विनिता००२'s picture

14 Aug 2020 - 9:34 am | विनिता००२

हे सिरियसली लिहीले आहे ना ??

धन्यवाद __/\__

विनिता००२'s picture

14 Aug 2020 - 9:34 am | विनिता००२

हे सिरियसली लिहीले आहे ना ??

धन्यवाद __/\__

संजय क्षीरसागर's picture

14 Aug 2020 - 10:11 am | संजय क्षीरसागर

प्रायवेट फायनान्स घेऊ नका. हप्ते चुकले तर बॉरोअरच्या किडनीला धोका असतो !

विनिता००२'s picture

14 Aug 2020 - 2:30 pm | विनिता००२

नको नको, मी नाही देणार माझी किडनी :)

देणग्यांचा ओघ सतत चालू असतो. त्यांना ते पैसे इन्वेस्ट करून आणखी कमवायची इच्छा नसते. पण त्यातून सामाजिक काम करणारे हवे असतात. त्यांच्या भागात त्यांनी हॉस्पिटलं, आश्रम काढले आहेतच. दूर कुठे, दुसऱ्या राज्यात नक्कीच मदत करतील.

विनिता००२'s picture

14 Aug 2020 - 3:19 pm | विनिता००२

अच्छा! आधी बँका बघते, शक्यतो असे भांडवलदार रिस्की वाटतात.
माहीतीबद्द्ल धन्यवाद!