<<म्हण दादा दादा खोटे>>

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
20 Jul 2020 - 8:56 pm

To whomsoever it may concern
अगदी हात जोडुन माफी मागुन...
प्रेरणा

गोरज मुहुर्ता वेळी..
मज देत ते वादा होते?
हा घोळ मनात चाले..
म्हण दादा दादा खोटे..

साहवे मला ना जेव्हा
सत्ता अन पदाचा विरह..
घेऊन येतो म्हणाला..
दणदणीत पाठिंब्यासह..

घेताना शपथ मी मजला.
मग चिमटा हळुच घेतो..
रोज मला उठवाया..
हा प्रसंग स्वप्नी येतो..

पावसात भिजला कोणी..
बदलले कथेचे सार...
मी स्वतःशीच आता पुटपुटतो..
मी केव्हा पुन्हा येणार?

(हा पाठिंबा मिपावरच्या खास सत्यशोधकांसाठी)

विडंबन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

20 Jul 2020 - 10:41 pm | प्रचेतस

अगगागागा ==))

mrcoolguynice's picture

21 Jul 2020 - 12:07 am | mrcoolguynice

"जाते" फिरवायला लावतो "त्यांना",
नेहमीच बोंबलत हिंडत होते,
पहाटेच्या अंधारात गुपचूप,
नंतर उकीरडे फुंकत होते.

आधा-आधा म्हणत आधी,
नंतर टोपी फिरवत होते,
मागुन टोचन लागल्यावर,
मात्र ऊर बडवत होते.

आरशासमोर उभं राहून नेहमीच,
प्रतिमेत चाणक्य बघत होते.
बैल गेल्यावर ध्यानी आले,
"यांना" सगळेच गंडवत होते.

जव्हेरगंज's picture

21 Jul 2020 - 7:47 am | जव्हेरगंज

मस्तच!!

गोंधळी's picture

21 Jul 2020 - 10:17 am | गोंधळी

मस्तच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Jul 2020 - 10:58 am | ज्ञानोबाचे पैजार

एकाच दगडात अनेक पक्षी उडवलेत,

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

5 Aug 2020 - 5:25 pm | प्राची अश्विनी

:):)