गुलाबी कागद निळी शाई....5 चंद्रवेळ

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
2 Jul 2020 - 8:22 am

गुलाबी कागद निळी शाई..4 अलवार

Hi
दोन दिवस झाले अजून तुझं उत्तर नाही. काय झालं? तू काल ऑफिसला पण नाही आलास? Is everything ok??? सारखं वाटतंय फोन करावा किंवा निदान मेसेज तरी. तुझ्याकडे माझा नंबर जरी नसला तरी माझ्याकडे तुझा आहे. (कसा मिळवला विचारू नकोस.:))
पण असंही वाटतंय मला टाळत तर नाहीस ना? काही चुकीचं लिहिलं होतं का मी पत्रात? आठवत नाहीये. दुखावलं का मी तुला? If so then sorry. मेल किंवा मेसेज असता तर मी काय लिहिलं ते वाचता तरी आलं असतं. पण पत्र एकदा पाठवलं की गेलंच....
Sorry तरीसुद्धा.

(तुझं पत्र मिळेपर्यंत मी लिहायला घेतलंच होतं बघ. आता ते तिथंच सोडून पुढे लिहितेय...)

प्रियांसी... खरंच??? खूप आवडलं. पण क्षणभर थबकायला झालं. म्हणजे असं अचानक कुठल्या तरी नवीन जगात आलेय असं वाटलं. सुरुवात तर मारे केली मी धीटपणे पण जमेल का आपल्याला हे नवीन नातं निभावणं ? भिती वाटली एकदम.
म्हणजे माझं अगदी तुझ्या उलट बघ. आवडीचं rhythmचं गाण लागलंय , डान्स फ्लोअरवर उभी आहे पण जमेल का नाचायला?
कुणी काय म्हणेल त्याची भिती नाही पण माझ्या वेड्यावाकड्या moves मुळे तू दुखावला तर जाणार नाही ना??

अजूनही ती भिती पूर्ण गेली नाहीच आहे.
पण ...
अमीत सरांबरोबर काम करणं काही कमी भितीदायक नाही. :) माझं आणि त्यांचं मुळीच पटत नाही. दोष कुणाचाच नाही. दोघंही attitude वाले आहोत इतकंच. आणि ते सारखं एकाला दुस-याशी compare करत असतात. त्यावरून आठवलं, "तुलना करून मला जी आवडते..." म्हणजे कोण रे ती नक्की????;)
अजून आपण एकमेकांना ओळखत नाही फार. म्हणून माझे दोष आधीच सांगून ठेवते तुला. मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच impulsive निर्णय घेते. आणि पटकन चिडते. रडते सुद्धा. बघं आत्ताच काय तो विचार कर.. आवडेन का मी तुला? तू तर मला एकदम संयमी शांत वाटतोस.
अचल स्तब्ध शांत तू जाणत्या तळ्यापरी
चांदण्यात मी अधीर थांबले तुझ्या तिरी..

तुझं पत्र वाचल्यापासून डोळे मिटले की ती तुझी चद्रवेळ अवतरते. आपण दोघं आणि निशब्द भवताल....
कधी घडेल रे ते?
बाकी मी असले की निशब्दता फार वेळ तग धरू शकत नाही हे कळेलच तुला लवकरच. :)
तुझी..

गुलाबी कागद निळी शाई..5 चंद्रवेळ

मुक्तकप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jul 2020 - 9:28 am | ज्ञानोबाचे पैजार

जेव्हा दात होते तेव्हा चणे नव्हते
आता चणे आहेत पण दात नाहीत

त्यामूळे पत्र वाचून लैच जळजळ होते आहे

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

6 Jul 2020 - 7:47 am | प्राची अश्विनी

:):)

कुमार१'s picture

2 Jul 2020 - 10:18 am | कुमार१

छान चालू आहे....

प्राची अश्विनी's picture

6 Jul 2020 - 7:48 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!

शा वि कु's picture

2 Jul 2020 - 11:20 am | शा वि कु

हा भाग रिलेट होतोय.

प्राची अश्विनी's picture

6 Jul 2020 - 7:48 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!

श्रीकांतहरणे's picture

12 Jul 2020 - 2:35 pm | श्रीकांतहरणे

छान.

प्राची अश्विनी's picture

17 Jul 2020 - 8:01 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!