सद्यपरीस्थितीत परीक्षा घेणं योग्य की अयोग्य

urenamashi's picture
urenamashi in काथ्याकूट
4 Jun 2020 - 3:24 pm
गाभा: 

सध्या परीक्षेवरून राजकारण चालू आहे. या परिस्थिती मध्ये परीक्षा घेणं ही अवघड गोष्ट आहे. मी एक संस्थेत काम करते. माझ्या संस्थेत किंवा इतर कोणत्याही संस्थेत सोशल डीसस्टिंग पाळुन परीक्षा घेणं केवळ अशक्यप्राय आहे.

तसेच एक पालक म्हणून ही मी माझ्या मुलांना अशा वातावरणात बाहेर सोडू शकत नाही. परिक्षे साठी पण नाही की शाळा चालू झाल्यावरही नाही. जर कोव्हीड 19 वर लस निघाली तरच ठीक अन्यथा नाही. भलेही त्यांचे एक वर्ष वाया गेलं तरीही मला चालेल.

तर मला वाटतं की एक वर्ष वाया गेलं तर भविष्यात त्यांचे काही नुकसान तर होणार नाही ना?

पालकांना आपली मुले प्रिय असतात त्यांना काहीही त्रास झाला तर सहन होत नाही.

तसेच सध्या ऑनलाईन शिक्षण नावाचा जो भयानक प्रकार चालू आहे त्या बद्दल तर भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती झाली आहे. कळत तर काहीच नाही आणि होमवर्क मात्र ढीगभर देतात.

मंत्री शिक्षकांवर ऑनलाईन शिकविण्यावर जोर देत आहेत, त्यांच्याकडून रोजच्या रोज अहवाल मागविला जातो. की काय प्रगती झाली या बद्दल.

कृपया मार्गदर्शन करावे

प्रतिक्रिया

दोन महिने झाले बातम्या पाहत नाही मी.. राजकारण पहिल्यांदा बाजुला ठेवलय अलिकडच्या काळात..
तरी त्रयस्त पणे बोलतो.. राजकारण कश्यावरुन चालु आहे माहित नाही..
-----------------------------------------------------------------------------------------

परिक्षा घेऊच नये असे माझे स्पष्ट मत आहे.. मागे ऐकले होते १० वी चा एक पेपर राहिलाय.
तेंव्हा पासुन माझे म्हणणे आहे, दिलेल्या विषयातील मार्कांपैकी, टॉप चे तीन मार्क घेवून त्याचे अ‍ॅवरेज मार्क राहिलेल्या पेपर ला द्यावे..
----------
शाळेत मुलांना सोडुच नये.. असे माझे स्पष्ट मत आहे.. यात राजकारण काही नाहीच..
आणि मग अनलॉक करायचेच आहे सगळे.. तर मग सुरुवात शाळेपासुन का? साधे चहाचे दुकान उघडले गेले नाहिये.. घरचा बेचव चहा पिऊन वैताग आलाय..
मजेचा भाग सोडा.. शाळेत मी माझ्या मुलीला पाठवणार नाही लगेच.. काय होईल जास्तीत जास्त.. ?

-------------------------

ऑनलाईन शिक्षणाबद्दल माझे मत --

खरे तर लहान मुलांना ही पद्धत चुकीची आहेच .. पण
शाळेंना मुलांच्या फी हव्यात.. शिक्षकांना शाळेकडुन पगार हवा.. आणि मुलांच्या पालकांना फी भरतो तर शाळेचा अभ्यास हवा...
ह्या मुळे हे ऑनलाईन शिक्षण या काळात आपली पाठ सोडणार नाही..

पण याला दूसरा पर्याय काय आहे ? मला तर काहीच दूसरा पर्याय दिसत नाही..

चौथा कोनाडा's picture

4 Jun 2020 - 5:31 pm | चौथा कोनाडा

तुमचं हे कथन अनुभवातून आलेलं स्पष्ट दिसतंय ! अशी मते फार महत्वाची असतात !

सोशल डीसस्टिंग पाळुन परीक्षा घेणं केवळ अशक्यप्राय आहे.

याच्याशी बहुतांशी सहमत आहे, कारण ही कुलुपउघड होताना जे काही आजुबाजूला पाहतोय ते नियम पाळण्याच्या दृष्टीकोनातून फारसं आशादायक नाहीय.

एक वर्ष वाया गेलं तर भविष्यात त्यांचे काही नुकसान तर होणार नाही ना?

ही भीती सध्याच्या अतिस्पर्धात्मक वातावरणातून तयार झालेली आहे, खरंतर काही नुकसान होऊ नये पण समाजात आजकाल वेगाने पळणारे खुप झालेत, त्यांच्याबरोअबर आपल्यालाही पळावे लागते. तुम्ही सारासार विचार करून हा वर्षी शाळेला/परिक्षेला सुट्टी घेऊ शकता !

ऑनलाईन शिक्षण नावाचा जो भयानक प्रकार चालू आहे त्या बद्दल तर भीक नको पण कुत्रा आवर

याचे आता पर्यंत फायदेच पाहिले जात आहेत, तोटे अजून दृष्टी पथात आलेले नाहीत किंवा चर्चले गेले नाहीत.

खरंय सद्यपरीस्थितीत परीक्षा घेणं योग्य की अयोग्य हा फार महत्वाच्गा प्रश्न आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2020 - 5:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाविद्यालयीन परिक्षासंदर्भातला माझा प्रतिसाद :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन परिक्षांबाबत युजीसीने एक तज्ञ समितीला याबाबत आपला अहवाल द्यायला सांगितला होता त्या अहवालानंतर युजीसीने सविस्तर असे एक  पत्र सर्वच विद्यापीठांना पाठवलं होतं आणि परिक्षांबाबत विद्यापीठांनी परिक्षा कशा घ्यायच्या हे ठरवावे असे सांगितले होते. (पाहा युजीसीचं पत्र) आता विद्यापीठांनी पहिल्या आणि दुसर्‍या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या एका सत्रासाठी मागील सत्राच्या गुणांच्या आधारे त्यांना प्रमोट केलेलं होतं. अंतिम परिक्षांच्या बाबतीत परिक्षा विद्यापीठ घेणार होतं म्हणजे त्यांनी दोन तासांची परिक्षा पन्नास गुण वगैरे याबाबतीत वेळापत्रक करायचं होतं की मा.मंत्रीमहोदयांनी युजीसीला पत्र लिहिलं की सध्याची परिस्थिती पाहता अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे कठीण आहे, त्याबाबतीतही आपण त्यांना प्रमोट करावे व त्याबाबत मार्गदर्शन करावे असे पत्र लिहिले. नंतर महाराष्ट्र शासनाने अशा विद्यार्थ्यांना मागील सर्व सत्रांच्या प्रॅक्टीकल आणि  इतर सत्रांच्या आधारे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या आधारे पास करुन त्यांना पास करायचा निर्णय घेतला. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत असे वाटते त्यांच्यासाठी पुन्हा भविष्यात परिक्षा देता येईल असाही पर्याय होता. असा निर्णय झाल्यावर राज्यपालांनी असा निर्णय घेतला तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होईल म्हणून मा.मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं.
खरं तर, एकदा युजीसीने विद्यापीठांना पत्र लिहिलं की परिक्षा घ्या, तर त्याबाबतीत पुन्हा पत्रव्यवहारामुळे गोंधळ उडाला पण त्याला कारणही तसेच आहे की आत्ता परिक्षा घेण्यासारखी परिस्थिती नाही. माझ्या स्वतःच्या महाविद्यालयात नुसते शहरातीलच विद्यार्थी-विद्यार्थीनी नाही तर अगदी मुंबई पासून विद्यार्थी आहेत. केवळ अंतिम वर्ष शाखेच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घ्यायच्या तरी फिजीकल डिस्टेंन्स, परिक्षा, बेंचेस, सुविधा, काळजी, त्यांच्या चाचण्या घेणे. (थर्मल स्क्रीनींग) आणि मग विद्यार्थ्यांना परिक्षेला बसविणे हा सर्व प्रवास सध्याच्या काळात जिथे माझ्या जिल्ह्यात आज एकूण रुग्ण संख्या सतराशेच्या जवळपास आहे त्यातले  तितकेच बरेही होत आहेत तरीही संसर्गाचा धोका तितकाच आहे, हे सत्य आहे. त्यामुळे सध्याच्या काळात परिक्षा घेणे शक्य नाही या मताचा मी आहे.
विद्यापीठांनी परिक्षा घेतांना ऑनलाइन परिक्षा घ्यावी असे वाटले होते. ऑब्जेक्टीव्ह वगैरे देऊन  कमी तासाची आणि लगेच गुण विद्यार्थ्यांना कळावे अशी व्यवस्था करायला हवी असे वाटते परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे पुन्हा सुविधांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे वाटते.  आता जेव्हा कॉलेजेस सुरु होतील तेव्हा त्यांनाटाचन, अभ्यासक्रम ऑनलाईन देता येईल काय याची चाचपणी सुरु आहे.
शाळेतल्या  बाबतीतही ऑनलाईन शिकविणे वगैरेच्या चर्चा वाचत आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी तेही पर्याय चाळून पाहात आहे. आपल्याकडे दुरस्थ शिक्षण पूर्वी होतेच. काही दिवस कोरोनाचा कहर कमी होईपर्यंत तरी ऑनलाईन शिकविणे हाच पर्याय दिसतो. आता ऑनलाईन शिकणे, शिकविणे  सुरु आहे.  विद्यार्थ्यांना सध्या शाळांमधून पालकांच्या वाट्सॅपवर पाल्यांना अभ्यासक्रम पाठविला जात आहे. आणि शंकाही ऑनलाइन विचारणे सुरु आहे. एक पालक असल्यामुळे हेही माहिती आहे. परिक्षा न घेता आमचाही पाल्य पुढील वर्गात ढकलला गेला आहे. पाल्य सांगितलेला अभ्यास करीत आहे.
आम्हीही झुम अ‍ॅपद्वारे मिटींग्स अटेंड करीत आहोत. वर्गातले शिकविणे आणि ऑनलाईन शिकविणे हा पुन्हा नवा विषय. सध्या तरी वर्क फ्रॉम होम आहे, पुढे  जे काही घडेल ते धाग्यात येऊन सांगूच.
-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

4 Jun 2020 - 7:29 pm | सुबोध खरे

तसेच एक पालक म्हणून ही मी माझ्या मुलांना अशा वातावरणात बाहेर सोडू शकत नाही. परिक्षे साठी पण नाही की शाळा चालू झाल्यावरही नाही. जर कोव्हीड 19 वर लस निघाली तरच ठीक अन्यथा नाही. भलेही त्यांचे एक वर्ष वाया गेलं तरीही मला चालेल.

हा भयगंड (FEAR PSYCHOSIS) आहे.

या वर्षी कोव्हीड आहे, पुढच्या वर्षी असाच दुसरा विषाणू असेल, अजून दोन वर्षांनी तिसरा.

आयुष्यभर आपण मुलांना घरी बसवून ठेवणारा का?

मुलांना इतर व्याधी नसल्यामुळे काहीही होत नाही. लॉकडाऊन संपल्यावर मुलांना शांतपणे बाहेर जाऊ द्या. त्यांना कुठून तरी कोव्हीड चा संसर्ग होईल एक दोन दिवस ताप सर्दी खोकला होईल आणि ते आयुष्यभरा साठी त्यातून मुक्त होतील.

माझ्या दोन मुलांना मी आता सुद्धा बाहेर पाठवतो आहे.

मधल्या वर्षाच्या परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात पाठवणे ठीक आहे

परंतु शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेतल्या नाही आणि अगोदरच्या गुणांवरून सरासरी गुण दिले तर अभियांत्रिकी/ गणित/ तंत्रज्ञान या विषयातील मुलांचे अपरिमित नुकसान होईल. शेवटच्या दोन सत्रात त्यांना सर्वात जास्त गुण मिळतात. या गुणांवर जगभरातील विद्यापीठात प्रवेश दिला जातो.

इथेच मार खाल्ला तर फक्त महाराष्ट्रातील मुलांचे नुकसान होईल. कारण असा परीक्षा सरसकट रद्द करण्याच्या निर्णय बऱ्याच राज्यात घेतलेला नाही.

राज्यकर्त्यांनी सुज्ञपणे विचार करावा असे वाटते.

मुलांना इतर व्याधी नसल्यामुळे काहीही होत नाही. लॉकडाऊन संपल्यावर मुलांना शांतपणे बाहेर जाऊ द्या. त्यांना कुठून तरी कोव्हीड चा संसर्ग होईल एक दोन दिवस ताप सर्दी खोकला होईल आणि ते आयुष्यभरा साठी त्यातून मुक्त होतील.

बरोबर, असेच मत माझे आहे, पण मी स्वतः सायकल ला निघतो बाहेर.. पण मुलीला पाठवायला मन मात्र मानत नाही..

ती आता 2.5 month झाले गावी आहे..शेतात घर..
म्हणुन हे प्रश्न प्रत्येक्षात आले नाही..
पण ती इकडे आल्यावर बाप म्हणुन मन मानत नाही..

------

बाकी exam न घ्याव्यात ह्याच मताचा मी आहे..
पुढचे पुढे... हे माझे वयक्तिक मत.. चूक वाटू शकते..

झम्प्या दामले's picture

4 Jun 2020 - 9:54 pm | झम्प्या दामले

त्यांना कुठून तरी कोव्हीड चा संसर्ग होईल एक दोन दिवस ताप सर्दी खोकला होईल आणि ते आयुष्यभरा साठी त्यातून मुक्त होतील.
एकदम चुकीचे वाक्य. एकदा कोरोना झाला की परत होत नाही ह्याला काही संदर्भ आहे का??

संपादित

प्रमोद देर्देकर's picture

4 Jun 2020 - 8:14 pm | प्रमोद देर्देकर

एक दोन दिवस ताप सर्दी खोकला होईल आणि ते आयुष्यभरा साठी त्यातून मुक्त होतील.>>>>>

डॉ ते करोना तुन मुक्त होतील असे लिहा नाहीतर लोक वेगळा अर्थ काढतील.

कानडाऊ योगेशु's picture

4 Jun 2020 - 8:58 pm | कानडाऊ योगेशु

ते आयुष्यभरा साठी त्यातून मुक्त होतील.

ह्याबद्दल संभ्रम आहे. कांजण्या गोवर सारखा हा रोग ही आयुष्यात एकदाच होणारा आहे असा आहे का?
मी जितके वाचले आहे (व्हाट्सप ज्ञान!) त्यानुसार हा रोग परत परत होऊ शकतो.

सुबोध खरे's picture

4 Jun 2020 - 11:00 pm | सुबोध खरे

I don't justify anything.

Those who love me don't need it

and

those who hate me will anyway not accept it.

सुबोध खरे's picture

4 Jun 2020 - 11:02 pm | सुबोध खरे

हा प्रतिसाद प्रमोद देर्दकरना होता

सुबोध खरे's picture

4 Jun 2020 - 11:11 pm | सुबोध खरे

हा प्रतिसाद प्रमोद देर्दकरना होता

सुबोध खरे's picture

4 Jun 2020 - 10:58 pm | सुबोध खरे

https://youtu.be/uATMbGK__Tg

कोरोना परत होण्याची शक्यता नाही.

गोवर परत होत नाही.

कांजिण्या परत होत नाहीत पण जर आपली प्रतिकारशक्ती कमी झाली तर नागीण हा एका नसेला((localised) रोग उद्भवू शकतो.

सुबोध खरे's picture

4 Jun 2020 - 10:58 pm | सुबोध खरे

https://youtu.be/uATMbGK__Tg

कोरोना परत होण्याची शक्यता नाही.

गोवर परत होत नाही.

कांजिण्या परत होत नाहीत पण जर आपली प्रतिकारशक्ती कमी झाली तर नागीण हा एका नसेला((localised) रोग उद्भवू शकतो.

झम्प्या दामले's picture

4 Jun 2020 - 11:34 pm | झम्प्या दामले

मिसळपावकरांनो ह्या वैदू वर जास्त विश्वास ठेवू नका. त्याचा ह्या आधीचा कोरोना वरचा लेख वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा किती विश्वासार्ह आहे..
http://misalpav.com/node/46182

"कोविड पुन्हा होत नाही" हे एका युट्यूब विडिओ वरुन मान्य करण्याएवढा शूर आणि वेबकूफ मी नक्की नाही , ऑफिशियल काही असेल तर दाखवा.

उदाहरणार्थ : सगळे सेलिब्रिटी जे कोविड मधून बरे झालेत ते आता सार्वजनिक जीवनात मास्क घालणे , सोशल डिस्टनसिंग पाळणे हे पूर्वीपेक्षा जास्त पाळत आहेत.

मूळ मुद्दा :

राज्यपालांनी योग्यच केलेले आहे , आत्ता पास करून मोकळं केलं आणि उद्या कोर्टात केस हरल्यावर मुलांना वाली कोणी नसेल - कायद्याप्रमाणे जे होईल ते सर्व मान्य

आणि मी पण टरकूच - अजिबात पोरांना आणि वयोवृद्धांना घराबाहेर परवनगी नाही .

सुबोध खरे's picture

5 Jun 2020 - 12:04 am | सुबोध खरे

वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे.

हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे.
त्यात माझे कर्तृत्व काही नाही.

हे त्या 4 मार्च रोजी प्रकाशित केलेल्या लेखाच्या शेवटी स्वच्छ शब्दात लिहिलेले आहे.
If you are not in an area where COVID-19 is spreading, or have not travelled from an area where COVID-19 is
spreading, or have not been in contact with an infected patient, your risk of infection is low.

https://www.google.com/search?client=ms-unknown&sxsrf=ALeKk03mLJnE8w1XbB...

या जागतिक आरोग्य संघटनेच्या1 मार्चच्या पत्रकात लिहिलेले आहे ते ही वाचा.

त्या वेळेस भारतात कोरोनाचे 03 रुग्ण होते.

सुबोध खरे's picture

5 Jun 2020 - 12:04 am | सुबोध खरे

वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे.

हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे.
त्यात माझे कर्तृत्व काही नाही.

हे त्या 4 मार्च रोजी प्रकाशित केलेल्या लेखाच्या शेवटी स्वच्छ शब्दात लिहिलेले आहे.
If you are not in an area where COVID-19 is spreading, or have not travelled from an area where COVID-19 is
spreading, or have not been in contact with an infected patient, your risk of infection is low.

https://www.google.com/search?client=ms-unknown&sxsrf=ALeKk03mLJnE8w1XbB...

या जागतिक आरोग्य संघटनेच्या1 मार्चच्या पत्रकात लिहिलेले आहे ते ही वाचा.

त्या वेळेस भारतात कोरोनाचे 03 रुग्ण होते.

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2020 - 2:56 pm | संजय क्षीरसागर

अहवालांचा डेटाच बोगस असल्याचं आता उघड झालंय.

ही सविस्तर बातमी > ८ मिनीटांनंतरचा विडिओ पाहा
सर्जी स्फिअर बोगस कंपनी !

यावर काही प्रकाश टाकू शकाल का ?

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2020 - 4:01 pm | संजय क्षीरसागर

भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

हा निष्कर्श कशावरनं काढला होता ?

सुबोध खरे's picture

5 Jun 2020 - 6:45 pm | सुबोध खरे

हा निष्कर्श कशावरनं काढला होता ?

Coronavirus: The virus remains active and stable when temperatures are around 4-6 degree Celsius and loses potency in warmer environment

https://www.businesstoday.in/latest/trends/novel-coronavirus-rising-temp...

Temperature of over 35 degrees C, humidity cut virus half-life from 18 hrs to minutes
“Our most striking observation to date is the powerful effect that solar light appears to have on killing the virus both on surfaces and in the air. We have seen a similar effect with both temperature and humidity as well where increasing the temperature and humidity or both is generally less favourable to the virus,” Bryan said.

https://www.theweek.in/news/health/2020/04/24/coronavirus-dies-more-rapi...

Will Indian summer be the answer to slowing down the coronavirus pandemic?

https://www.theweek.in/news/world/2020/03/27/will-summer-be-the-answer-t...

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2020 - 6:50 pm | संजय क्षीरसागर

तुमचा लेख या तारखेचा आहे > 4 Mar 2020

आणि तुम्ही इथे पेस्ट केलेलं हे कन्क्लुजन >

Temperature of over 35 degrees C, humidity cut virus half-life from 18 hrs to minutes
“Our most striking observation to date is the powerful effect that solar light appears to have on killing the virus both on surfaces and in the air. We have seen a similar effect with both temperature and humidity as well where increasing the temperature and humidity or both is generally less favourable to the virus,” Bryan said.

April 24, 2020 या तारखेच्या "द विक" मधलं आहे

म्हणजे (कन्क्लुजन चुकीचं असलं तरी) वरचा डेटा, लेख लिहितांना तुम्हाला उपलब्ध नव्हता.

त्याचप्रमाणे शेवटची लिंक सुद्धा March 27, 2020 या तारखेच्या "द विक" मधली आहे (Will Indian summer be the answer to slowing down the coronavirus pandemic ?)

म्हणजे तो ही डेटा लेख लिहितांना तुम्हाला उपलब्ध नव्हता.

सुबोध खरे's picture

6 Jun 2020 - 7:43 pm | सुबोध खरे

वैद्यकीय ज्ञान हे काही केवळ डेटा मध्येच असते असं नव्हे. वैद्यकीय पुस्तके असतात जर्नल असतात. स्वतःचा अनेक दशकांचा अभ्यास आणि अनुभव असू शकतो.

आपल्या वर्गात/ संपर्कात असलेले आपण काम केले असलेले डॉक्टर मोठ्या पदावर असू शकतात.

त्यांच्यात चर्चा आणि माहितीची देवाण घेवाण असू शकते हे आपण गृहीत धरत नाही असे दिसते.

केवळ विदा मागितला होता म्हणून तो दिला आहे.

बाकी आपल्याला या गोष्टी पटत नसतील आणि इतर काही दळभद्री लोकांबरोबर चिखलफेकच करायची असेल तर खुशाल करा.

मी येथेच थांबतो

धन्यवाद

१. तुम्ही दिलेल्या लिंक्स या लेखानंतरच्या तारखांच्या आहेत हे सांगण्यात काय चूक आहे ?

२. जिएसटीमुळे किंमती कमी झाल्या हे दर्शवण्यासाठी तुम्ही २ जुलै २०१७ ची लिंक दिली होती.
१ जुलैला जर जिएसटी अस्तित्वात आला तर दुसर्‍या दिवशी वस्तुंच्या किंमती कशा कमी होतील ?
आज त्या लिस्टमधल्या नक्की कोणत्या वस्तुंच्या किंमती कमी झाल्यात असं विचारल्यावर तुम्ही उघड मुद्दा मान्य केला नाही.

३. तुमच्या लेखात तुम्ही म्हटलंय :

भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

आणि शेवटी लिहिलंय > पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल.

तुम्ही दिलखुलासपणे चूक मान्य केली तर ती डिफेंड करण्यासाठी असे प्रतिसाद येणार नाहीत.

तुम्ही नक्की विचारल कराल अशी अपेक्षा आहे.

शाळा चालू करणे अन तो ऑनलाईनचा अभ्यासक्रम तयार करणे ही देखील शिक्षकांसाठी एक परिक्षा आहे.
अत्यंत चुकीच्या पद्धतीने शाळामालक शिक्षकांकडून ऑनलाईन डॉक्यूमेंटस, असाईनमेंट्स होमवर्क तयार करवून घेत आहेत. ना त्यात शिक्षकांची मानसीकता लक्षात घेत ना मुलांची ना पालकांची.

हे शाळाचालक अगदी दररोज जसे वर्ग होत असतात तसलेच प्रकार करायला धजावत आहेत.

ज्या काही परिक्षा होवू घातल्यात त्यात मल्टीपल चॉईसचेच प्रश्न जास्त आहेत. यात मुलांच्या मनाचा, लिखाणाचा, त्यांच्या प्रश्नावर विचार करण्याच्या प्रवृत्तीचा कस कसा लागणार?

अशा स्थितीत शालेय अभ्यासक्रम राबवणे अन परिक्षा घेणे अयोग्य आहे. तुर्तास शासनाने अध्यादेश काढून शाळा या बंद किंवा ऑनलाईन जरी केल्या तरी त्यात भरपूर सूट देणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांचे एखादे वर्ष वाया गेले तरी हरकत नाही.
ऑन लाईन शिकवणे आणि शिकणे ही एक मोठी सर्कस आहे.
शिकणे किती वेळ होते देव जाणे. मुले मात्र दिवसभर साखळीला बांधल्यासारखी रहातात.
शाळा नसेल आणि त्या ऐवजी मुलाम्ना हवी ती शैक्षणीक स्कील्स ( उदा : सुतारकाम . मातीकाम , बागकाम संगीत , लेखन , चित्रकला ) वगैरे शिकता आली तरी ते वर्ष बरेच काही देऊन गेले असे समजता येईल. शैक्षणीक ढाचा सगळा बदलून तरी जाईल.
करोना मुळे त्या दहावी बारावी सी ई टी / जे ई ई चे भय ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मुलांचे आणि पालकांचे जग भयमुक्त झालेले असेल.

urenamashi's picture

5 Jun 2020 - 11:50 pm | urenamashi

राजकारण म्हणजे शाळा मालक फी गोळा करण्यासाठी सरकार वर दबाव आणत आहेत. त्यांना फक्त फी मिळविणे हा एकच उद्देश आहे, बाकी शिक्षक , विदयार्थी यांना काय त्रास होतो याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाही.

@ खरे सर तुम्ही म्हणता तसे न घाबरता सगळ्यांनी बाहेर पडायला पाहिजे....
पण कोरोना त्या एकाच व्यक्ती ला होईल का?
घरातील इतर मधुमेह, च्ह्दयरोग, उच्च रक्तदाब, दमा असणाऱ्या सदस्यांचा विचार करावा लागेल भीती त्याचीच जास्त आहे.
आणि कोरोना बरे झालेल्या व्यक्तींचे अवस्था ( कोव्हीड19 मुळे शरीराची प्रचंड हानी होते, शरीर आतून पोखरून टाकतो) पाहून तर भीती वाटणारच ना.....

आपली मुले ही देशाचे उद्याचे भवितव्य आहे त्यामुळे लस येईपर्यंत शाळा, महाविद्यालये चालू करू नयेत असे मनापासून वाटते....

urenamashi's picture

5 Jun 2020 - 11:50 pm | urenamashi

राजकारण म्हणजे शाळा मालक फी गोळा करण्यासाठी सरकार वर दबाव आणत आहेत. त्यांना फक्त फी मिळविणे हा एकच उद्देश आहे, बाकी शिक्षक , विदयार्थी यांना काय त्रास होतो याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाही.

@ खरे सर तुम्ही म्हणता तसे न घाबरता सगळ्यांनी बाहेर पडायला पाहिजे....
पण कोरोना त्या एकाच व्यक्ती ला होईल का?
घरातील इतर मधुमेह, च्ह्दयरोग, उच्च रक्तदाब, दमा असणाऱ्या सदस्यांचा विचार करावा लागेल भीती त्याचीच जास्त आहे.
आणि कोरोना बरे झालेल्या व्यक्तींचे अवस्था ( कोव्हीड19 मुळे शरीराची प्रचंड हानी होते, शरीर आतून पोखरून टाकतो) पाहून तर भीती वाटणारच ना.....

आपली मुले ही देशाचे उद्याचे भवितव्य आहे त्यामुळे लस येईपर्यंत शाळा, महाविद्यालये चालू करू नयेत असे मनापासून वाटते....

सुबोध खरे's picture

6 Jun 2020 - 11:00 am | सुबोध खरे

घरातील इतर मधुमेह, च्ह्दयरोग, उच्च रक्तदाब, दमा असणाऱ्या सदस्यांचा विचार करावा लागेल भीती त्याचीच जास्त आहे.

बरोबर आहे.

याच साठी लॉक डाऊन काढल्यावर सुद्धा शाळकरी मुले/तरुण माणसांनीच बाहेर पडावे.त्यांना करोना झाला तयारी तो सौम्य स्वरूपाचा होऊन ते पटकन बरे सुद्धा होतील.

घरात असलेल्या वृद्ध व्यक्ती किंवा मधुमेह रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीं पासून अशा तरुण माणसांनी/ लहान मुलांनी लांब राहणे आवश्यक आहे.

हा कालावधी ३-६ महिने असू शकतो.

कारण तेवढ्या कालावधीत लस किंवा करोनावर गुणकारी औषध उपलब्ध होण्याची शक्यता बरीच आहे.

लस उपलब्ध झाली कि प्रथम अशा व्यक्तींनाच ती टोचून त्यांना करोना पासून सुरक्षित केल्यावर समाजात मिसळता येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2020 - 12:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. परिक्षा घेतल्या पाहिजेत. तारीख आणि बाकी तपशील युजीसी आणि महाराष्ट्र सरकारने ठरवावे. बाकी, निर्णयात काय आहे, तपशीलवार समजेल. पण सध्या अंतिम वर्ष शाखेच्या सर्व परिक्षा होतील.

MT: पदवी परीक्षा होणारच, त्या कशा घ्यायच्या हे राज्यांनी ठरवावे: SC
http://mtonline.in/ji0SJZ?daa via @mataonline: http://app.mtmobile.in

-दिलीप बिरुटे