शरीरातला भ्रष्टाचार आणि तब्येतीवरचा अत्याचार

संन्यस्त खड्ग's picture
संन्यस्त खड्ग in काथ्याकूट
2 Jun 2020 - 10:31 am
गाभा: 

आपण काही खाल्लं तरी शरीराला 'ए.टि.पी.' म्हणजेच 'अडिनोसिन ट्राय फॉस्पेट' हे ऊर्जेच्या स्वरूपात लागते. 'एटीपी' याला आपल्या शरीराची "एनर्जी करंसी" असे संबोधले गेले आहे. ह्याला मी 'खरी कमाई' म्हणतो अथवा "व्हाईट मनी". वाचत रहा तुमच्या लक्षात येईल कि घामाचा पैसा म्हणजे काय. तुम्ही काही खा, शरीराचा प्रयत्न असतो कि त्याला 'ग्लुकोज'च्या पातळीवर आणून रक्तात मिसळुन देणे, व त्यापासून 'एटिपी' तयार करणे. गहू, ज्वारी, भाकरी, तांदुळ, भात काही खाल्लं जिच्यामध्ये 'स्टार्च' आहे त्याचा 'ग्लुकोज' होणारच. सोबत प्रथिने (प्रोटिन्स) महत्वाचे म्हणून कडधान्य, पालेभाज्या सोबत खाव्या लागतात . जास्त ग्लुकोजला नियंत्रित ठेवण्यासाठी शरिरातील दुसरे रसायन म्हणजे 'इन्सुलिन'. शरीरच तसे बनलेले आहे आणि रक्तातलं 'ग्लुकोज'च आपण डायबिटीज कंडिशनमध्ये तपासतो.

जास्त खाल्ल्यावर जास्त ग्लूकोज तयार होणार, व आवश्यकतेपेक्षा जास्त जमा झालेले ग्लुकोज हे तुमच्याच शरिरातली तुमचाच "ब्लॅक मनी". त्याच वेळेला 'पॅन्क्रियाज' ह्या अवयवातुन इन्सुलिन हे रसायन तयार होऊन जास्तीच्या ग्लुकोजला इन्सुलिन 'लिवर' नावाच्या 'कोऑपरेटिव बँकेत' पाठवायला सुरुवात करते. इथे खरी मजा आहे. इन्सुलिन, "ब्लॅक मनी" साठवण्यासाठी फक्त 'लिवर' च्या बँकेवरच अवलंबुन न राहता, शरीरातले वेगळे वेगळे अवयव (वेगवेगळ्या बँकेत खाते) आणि महत्त्वाचे म्हणजे, आपली पहिल्यापासून सुलभरित्या उपलब्ध व प्रिय 'स्विस बँक' म्हणजे 'अडीपोज टिश्यु' इथे आपल्या शरीराचे 'ब्लॅक मनी' साठवतो. एखाद्या अतिजाड माणसाला बघितला तर जिथे जिथे जाडी आहे तिथे तिथे त्याच्या 'ब्लॅकमनी' साठलेल्या बँका दिसतात.

गुगलमुळे आज कोणीही जास्त शुगर म्हटंल कि लगेच इन्सुलिनशी इतक्या सहजरित्या जोड्या लावतात जसेकी मोझार्ट आणि संगीत. पण इन्सुलीनचे काम इतक्या सोप्या आणि सहज रित्या शरीरात असले असते तर मेडिकल सायन्सला काही कामच राहिले नस्ते व मोजार्ट सगळ्यांनाच कळाले असते. इन्सुलिन जेव्हा आपले 'ब्लॅक मनी' म्हणजे शुगर ~ 'लीवर' कडे पाठवतो तेव्हा लिव्हर ते कोलेस्ट्रॉलच्या स्वरूपात साठवून ठेवतो, व शरीराला जेव्हा उपवासाचे वेळेला शक्ति लागते तेव्हा हेच 'एस्ट्रा शुगर' रक्ताला परत करतो, पण त्याची सुद्धा एक क्षमता आहे. जास्त उपवास केल्याने व बेशिस्त आणि अनियमित खाल्ल्याने जास्त ब्लॅक मनी साठवून जाड होण्याची दाट शक्यता आहे ते मी पुढे सांगणारच.

सहजासहजी जेव्हा पेशींपासून लिव्हरमध्ये हा ब्लॅक मनी जातो, तेव्हा त्याला नेणारे कुरिअर कंपनीचे नाव अाहे "एच.डी.एल", साहजिकच त्यांना "गुड कोलेस्ट्रॉल" असे आपण म्हणतो. पण लिव्हरची एक मर्यादा आहे आणि त्याच्या पलीकडे तो सुद्धा ओव्हर झालेली ब्लॅक मनी परत पाठवण्यासाठी स्वत:ची एक हवाला कुरिअर कंपनी चालवतो ज्याचे नाव आहे "एल.डि.ल". काळा पैसा रक्तात परत आला की त्याला आपण म्हणतो "बॅड कोलेस्ट्रॉल". डायबिटीज वाल्यांनी जेव्हा कोलेस्ट्रॉल तपासणी केली तेव्हा या दोन्ही कुरिअर कंपनीचे रिपोर्टवर नाव, गाव, पत्ता व काम छापुन येतेच, तपासुन बघा जरा. ट्रान्झॅक्शन लिमिट्स ठरलेले आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे.

आता इन्सुलीन, चोर बाजारी करणा-या सारखे, फक्त एकाच कंपनीवर अवलंबून राहत नाही. जे जास्त अतिश्रीमंत असतात म्हणजे जास्त 'कचरा' खातात, रागवू नका "कचराच" म्हणतोय मी कारण, मागच्या १५ दिवसांपासुन बेंगळुरु विद्यापिठात, इथल्या शास्त्रज्ञांना व संशोधकांनां मी ऐकत बसलो आहे, फार तळमळीनं सांगताहेत ते आणि मी जेव्हा त्यांना विचारले की चांगल्या आरोग्य व आहाराचा मंत्र काय? तर त्यांनी फक्त एका ओळीमध्ये सांगितलं ~ "ईट लेस लिव मोर". बात कु समझो बांगडु. तर जे जास्त 'कचरा' खातात व जास्त "ब्लॅक मनी" जमा करण्याच्या नादात जगतात, ते काय त्यांचे सिद्धांत कि "एक दिन सबकु मरनेकाच है" ~ बरोबरच अाहे, कारण त्यांच्याकडे स्विस बँकचे 'लाईफ मेंबरशिप असतो आणि त्याच्यात कोलेसटेरॉल भरुन "अडीपोस टिश्यु" तैयार करित राहतात. आता प्रश्न आहे कि हा "अडीपोस टिश्यु" शरीरात कुठे कुठे आहे ~ हा शरीराच्या त्या प्रत्येक भागामध्ये आहे जिथे तुमची चरबी कमी होत नाहीये. स्वतःला चिमटे घेऊन बघा जरा.

छोटी चाचणी सांगतो करून बघा. दोन्ही हातांच्या बोटांचा चिमटा करा व आपल्या कमरेचा नंतर सामोरुन पोटाचा चिमटा घ्या. चाळीशीनंतर कितीही 'सिक्स पॅक' 'एटपंँक' वाला असला तरी चिमट्यात काहीतरी बसतच आणि जे आणि जितकं बसतंय ते आहे तुमच्या शरीराचा 'ब्लॅक मनी' म्हणजे 'अडिपोज टिश्यु', आणि हो बायकासुद्धा आले बरं का ह्या धंद्यात. गम्मत सांगू का बापहो, तुम्ही मेले तरी ही 'अडिपोज टिश्यु' जात नाही कारण ते तुमच्या शरीराचा एक अवयव बनून गेला आहे. चाळीशीनंतर अतिव्यायामाने फक्त ह्या ब्लॅक मनीला छोटासा आकार देता येतो पण काढता येत नाही. तांत्रिक दृष्ट्या कुतर्क करायचेच असले तर हो ते काढता येईल, त्याला मरणाचा उपवास करावा लागेल, ज्याला मी "अण्णा हजारे मॉडेल ऑफ फ़ास्टिंग" असं म्हणतो जिथे शेवटी हा "अडिपोज टिश्यु' व माणूस दोन्ही मरून जातात. चाळीशी नंतर काहिपण केल्याने ढेरी कमी होत नाहि (अन होणार बी नाय~माईंड ईट) ह्याचे कारण हेच "अडिपोज टिश्यु". भरोसा नाय तो गुग्गल करो ना!

आता जरा मोजार्टचा संगीत बघूया. इन्सुलिनला फक्त शुगर डाऊन करणे एवढेच काम नाही, त्यो फार कलाकार हाय. अरे हो ते "डाऊन करणं" हे सुद्धा चुकीचं आहे बरंका. ते 'डाऊन' किंवा 'अप' असं काही करतच नाही तर, फक्त वेगळ्या वेगळ्या जागी ते साठवून ठेवत असते. जास्त झालेला शुगर पाहिले 'लिवर'कडे नंतर सर्व "अडिपोज टिश्युं" मध्ये आणि नंतर वेगळ्या वेगळ्या अवयवात आणि नसलंच तर रक्तातच, and then! ऑल फिनिश.

इन्सुलीनची दुसरी बदमाशी म्हणजे लिव्हरला शुगरचे चरबीमध्ये रूपांतर करण्यासाठी लाच देणे, आणि लिव्हरच तसं करणे, अन तुम्ही फ़क्त खात जा, आई मिन बघत जा. इन्सुलिनची तिसरी महत्त्वाची बदमाशी म्हणजे 'अडीपोज टिश्यू' मधल्या चरबीचा रूपांतरण परत ग्लुकोजमध्ये न होऊ देणे, म्हणजे वाढलेली चरबीला मरेपर्यंत वाढलेलीच ठेवणे. अौर खाओ ठाकुर, खुब खाओ, आखिर जीना किसलिये?

आता शेवटचा भाग ~ जर तुम्ही व्यवस्थित आणि नियमित खाल्लं, तर इन्सुलीन हा रसायन हिरो 'विजय' अमिताभ बच्चन सारखा आहे. अन जंक फूड, अनियमित अथवा अति जास्त खाल्लं तर तो अचानक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद सारखा होतो. तुम्ही खाल्लेल्या व न खाल्लेल्या प्रत्येक आहाराचा हिशोब तो ठेवतो. जास्त उपवास व अनियमित खाल्ल्यावर अता खरी बदमाशी 'लिव्हर' करतो. हो "बंबई का डॉन कोण तो भिकू म्हात्रे" असा म्हणतो आणि तो अचानक 'इन्सुलिन'चं ऐकणं बंद करतो व स्वतः 'एलडीएल' सगळीकडं पाठवायला सुरुवात करतो. मग काय अपली नुसती बोंबा बोंब, स्वत:ला चकरा, नंतर डॉक्टरकडे चकरा, स्वत:ला सोडुन डॉक्टरला शिव्या, हा डॉक्टर बरोबर नाही, ते डॉक्टर बरोबर नाही इत्यादी इत्यादी. डॉक्टरला काय बोडकं कळणार आहे कि आपण किती खाल्लं अन काय खाल्लं, पिलं ते. हे तर आपण सांगतही नाही डॉक्टरांना.

असेच पस्तीशी चाळीशी गाठली कि बीपी शुगर च्या गोळ्या, हार्टच्या गोळ्या घेत बसून आपण फार्मास्युटीकल कॅपिटल, डायबिटीक कॅपिटल होऊन सांगत फिरू की हम है इंडिया, दुनिया में नंबर वन. अन न मरता उरलेच तर पारितोषिके द्यायला युनेस्को आहेच की. अरे मी म्हणतो शारीरिक काम करा व घाम काढा आणि हे सर्व दूर करा. घाम गाळल्याने ग्लुकोजचा एटीपी होतो जी आपली खरी ऐनर्जी करंसी आहे. घामाचा पैसा म्हणजे हेच ....!

हरी ओम !

( आधारित )

विषय: आरोग्य , ऍलोपथी

प्रतिक्रिया

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

2 Jun 2020 - 12:34 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

अभ्यासपूर्ण लेख

चौकटराजा's picture

2 Jun 2020 - 2:26 pm | चौकटराजा

उत्तम लेख पण हा लेख तर पाककृती,पुण्यात कोठे अन लिमिटेड जेवण मिळते. एका ठिकाणी तर म्हणे मिसळ म्ह्ण्जे जणू राईस प्लेट .या सर्व धाग्याना मारक ठरतोय हो ! असं डोक्यात प्रकाश पडेल असं इथे काही लिहित जाउन नका !!! ))))))

शाम भागवत's picture

2 Jun 2020 - 3:01 pm | शाम भागवत

'एलडीएल' एक अंधश्रध्दा, असं नाव द्यायला सुचवायचं का?
;)

चौकटराजा's picture

2 Jun 2020 - 4:23 pm | चौकटराजा

म्हणजे धागा १५० सहज गाठेल !! हा का ना का !!!

शाम भागवत's picture

2 Jun 2020 - 2:58 pm | शाम भागवत

छान माहिती.

सर्वच डाॅक्टरांना हे माहित असणार. पण वेळे अभावी रूग्णाला हे सगळे सांगणे शक्य होत नसावे.

तो अचानक 'इन्सुलिन'चं ऐकणं बंद करतो व स्वतः 'एलडीएल' सगळीकडं पाठवायला सुरुवात करतो

कोलॅस्टेराॅल वाढलंय म्हणून डाॅक्टर लोकं गोळ्या सुरवात करायला सांगतात ते ह्याचसाठी का? मित्राला ५८ व्या वर्षी “जुपिरोस १० एमजी” गोळ्या सुरू झाल्या. या कायमच्या घ्यावा लागतील असंही डाॅक्टर म्हणाले. ( 'एलडीएल' चे प्रमाण वाढले होते. ट्रायग्लिसेराॅलचेही वाढले होते)

मित्राला एकंदरित शारीरिक कष्टाचा कंटाळा, व्यायामाचा अभाव व बैठ्या कामकाजाची नोकरी. शिवाय तो फार गोड खात असे. पण तरीही पठ्या नेहमी अंडरवेटच असे. त्याचे आम्हालाही आश्चर्य वाटे. “तू जे खातो, ते जाते कुठे?” असं आम्ही त्याला नेहमी चिडवायचो. त्याला कोलॅस्टेराॅल निघाल्यावर हे आश्चर्य आणखी वाढलं होतं.

मी असं वाचलं की, 'एलडीएल' तयार करायचे प्रमाण लिव्हरने कमी करावे यासाठी डाॅक्टर लोकं गोळ्या देतात. तुमचा हा लेख वाचल्यावर असे विचारावेसे वाटले की, शारीरिक कष्ट/व्यायाम वगैरेंनी हे चक्र उलटं फिरवून मित्राची गोळ्यांतून सुटका होऊ शकेल का?

अर्थात असं काही करता येत असेल तर त्याला त्याच्या डाॅक्टरांच्या सल्याने असा काही उपाय करण्याचे सुचवू शकेन. जे काही करायचं ते तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हे निश्चीत.

वामन देशमुख's picture

2 Jun 2020 - 3:55 pm | वामन देशमुख

लेखणशैली आवडली.... अर्थात, विषय गंभीर आहे.

अल्पिनिस्ते's picture

2 Jun 2020 - 5:52 pm | अल्पिनिस्ते

मजा आली वाचायला आणि समजायला सुध्दा सोप्पे झाले आहे :)

लेखन शैली अतिशय उत्तम.
तुमच्या सारखं डॉक्टर रुग्णाला समजून सांगायला शिकले तर भारत हा स्वस्थ भारत होईल.
सर्व रोगापासून मुक्त.

शेखरमोघे's picture

2 Jun 2020 - 7:06 pm | शेखरमोघे

काय छान शैलीत वर्णन केलय!!

तुमच्या "जर तुम्ही व्यवस्थित आणि नियमित खाल्लं, तर इन्सुलीन हा रसायन हिरो 'विजय' अमिताभ बच्चन सारखा आहे" या वाक्यातल्या "जर" करता ठळक आणि मोठी अक्षरे वापरायला हवीत, कारण सगली गोची या "जर" मध्येच आहे. शिवाय प्रत्येक हीरो हा जसा त्याच्या हातात दिले गेलेल्या "स्क्रिप्ट" प्रमाणे अभिनय करतो तसेच इथे होते, फक्त ""स्क्रिप्ट"चे लेखक तुम्हीच असता त्यामुळे "इष्टोरि" सुखान्त की रडकी हे तुमच्याच हातात आहे.

रागो's picture

3 Jun 2020 - 9:14 am | रागो

उत्तम अभ्यासपूर्ण लेख . आभार !!

चिगो's picture

3 Jun 2020 - 12:47 pm | चिगो

आपली लेखन-शैली आवडली. पुढेही लिहीत रहा, ही विनंती..

एक प्रश्न आहे.

चाळीशी नंतर काहिपण केल्याने ढेरी कमी होत नाहि (अन होणार बी नाय~माईंड ईट) ह्याचे कारण हेच "अडिपोज टिश्यु".

इथे 'ढेरी' म्हणजे नेमकं काय अभिप्रेत आहे? माझ्या समजूतीप्रमाणे, 'सुटलेलं पोट' म्हणजे ढेरी. आणि चाळीशीनंतरही पोट सपाट, न सुटलेलं, अगदी 'अ‍ॅब्ज'वालं ठेवता येतं, असं बघितलेलं आहे. ('गजनी'तला किंवा अगदी 'दंगल'मधला आमिरखान हे त्याचं सिलेब्रीटी उदाहरण)
स्पष्ट केल्यास 'फिटनेस गोल्स' नेमकेपणाने ठरवता येतील, म्हणून विचारतोय..

(चाळीशीकडे चाललेला) चिगो

मराठी_माणूस's picture

4 Jun 2020 - 11:12 am | मराठी_माणूस

हाच प्रश्न मलाही पडला.
उतारवयात सपाट पोट झालेले लोक पाहीले आहेत.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

3 Jun 2020 - 8:55 pm | सौ मृदुला धनंजय...

अभ्यासपूर्ण लेख ..लेखन शैली अप्रतिम!!!

संन्यस्त खड्ग's picture

9 Jun 2020 - 11:06 pm | संन्यस्त खड्ग

२५ मार्च २०२०, नरेंद्र मोदींनी देशव्यापी ‘ लाॅकडाऊन’ जाहीर केला. अख्खा देश आहे त्या ठिकाणी थांबला.
कामानिमित्त, शिक्षणानिमित्त आपल्या घरच्यांपासून लांब असलेल्यांची घरी परतण्यासाठी चाललेली धडपड, त्यांच्या अडचणी आपण रोज पाहतोय.
आज परदेशात अडकलेले लाखो भारतीय ॲापरेशन ‘राहत’ मध्ये भारतात परतत आहेत. आपल्या बांधवांना परत आणणारं हे जगातील सर्वात मोठ मिशन भारत सरकार करत आहे.

अगदी योगायोगाने आत्ता वाचनात आलेलं ‘भास्करायण’ हे पुस्तक देखील अशीच एक गोष्ट आहे ती एका तरूणाने आपल्या घरी परतण्यासाठी केलेल्या धडपडीची! हा काळ होता दुसऱ्या महायुध्दाचा. या तरूणाच नाव होतं भास्कर करंदीकर. आणी त्याला पल्ला गाठायचा होता लंडन ते सांगली!!

स्वातंत्र्यवीर सावरकरांना गुरू मानणारा भास्कर साधारण १९३५ साली वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी ॲाक्सफर्डला रवाना झाला. भास्करने वकिलीचे शिक्षण पूर्ण केलं आणी नेमकी सप्टेबर १९३९ मध्ये दुसऱ्या महायुध्दाची ठिणगी पडली.
जर्मन विमाने इंग्लंडवर रोज आग ओकत होती. अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा होता. रेशनच्या लाईनमध्ये गोरे लोक काळ्या कातडीच्या लोकांचा सतत व्देष करत, मारहाण करत. या अशा वातावरणात राहणं कठीण होतं. भास्करकडे अत्यंत तुटपुंजे पैसे होते. युध्दामुळे हिंदुस्थानात जाणाऱ्या बोटी बंद झाल्याने परतीचे मार्ग बंद झाले होते. भास्करला मातृभूमीची ओढ लागली होती. एका संध्याकाळी त्याचे डोळे पाणावले, सावरकरांचे शब्द त्याच्या ओठांवर आले- ‘ ने मजसी ने, परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’.......पण त्याने मनाशी निर्धार केला काहीही करून मातृभूमीकडे परतण्याचा.

हे एक वेडं धाडस आहे हे भास्करला समजत होतं, पण तरीही हिंदूस्थानात परतण्यासाठी त्याने काथ्याकूट सुरू केला.
जगाच्या नकाशावरून त्याने बोट फिरवलं आणी त्याच्या लक्षात आलं की हजारो वर्षांपूर्वी हिंदूस्थानावर परकीय आक्रमण झाली. सिकंदर, मोगल, शक हे खुष्कीच्या मार्गाने हिंदूस्थानात आले. आर्य सुद्धा खुष्कीच्या मार्गानेच आले म्हणजे युराेपातून हिंदूस्थानात खुष्कीच्या मार्गाने प्रवेश करता येतो.इंग्लिश खाडी मात्र पार करावी लागते मग पुढे चालत खुष्कीच्या मार्गाने जाणे शक्य आहे. हा मार्ग भास्करसाठी अवघड नक्कीच होता पण अशक्य मात्र नाही! कमीतकमी धोक्याचा आणी भाषेची कमी अडचड होईल असा मार्ग त्याने निवडला- लंडन,फ्रान्स, इटली, ग्रीस, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत हा.

लंडनमधून आपण घरी परतत असल्याच पत्र भास्करने सांगलीला पाठवल आणी गजाननाचं नाव घेऊन त्याने या खडतर प्रवासाला सुरवात केली. इंग्लिश खाडी पार करून भास्कर फ्रान्सच्या कॅले बंदरावर उतरला पण फ्रान्सवर देखील जर्मनीचा हल्ला चालूच होता. पुढे येणाऱ्या इटलीवर तर पूर्णपणे मुसोलिनीची सत्ता होती, तो पूर्णपणे हिटलरच्या बाजूने होता. या सगळ्या राजकीय अस्थिरते सोबतच पैशांचा देखील प्रश्न होताच. आता मिळेल ते काम करायच आणी थोडे थोडे पैसे जमले की प्रवास करायचा अस भास्कर करू लागला. या सगळ्यामध्ये त्याला जर्मन सैनिकांच्या संशयाला सामोर जाव लागले, ब्रिटिश सरकाराचा गुप्तहेर असल्याच्या संशयाने अटक झाली, मारहाण झाली.

भास्करला लंडन सोडून जवळजवळ वर्ष होऊन गेल होतं, कधी चालत, कधी रेल्वे, बस अस करत करत त्याने इटलीतून पुढे ग्रीस, तुर्कस्तान ओलांडल आणी तो इराण मध्ये पोहोचला. इराण दुसऱ्या महायुध्दात सुरवातीला तटस्थ होता, पण नंतर इंग्लिश आणी रशियन फाैजांनी कारवाई करून तिथे आपल वर्चस्व प्रस्थापित केल होते. हिंदूस्थानातील मराठा आणी शीख बटालियन इथे ब्रिटिशांना मदत करत होत्या. इराणच्या सिमेवर भारतीय सैनिक पाहून भास्करला गहिवरून आले. त्यामूळे तुलनेनं इराण मधून आफगाणिस्तान कडे जायला कमी त्रास झाला आणी तो आफगाणिस्तानाच्या बाॅर्डरवर येऊन ठेपला. पुढे काबुलच्या वाटेवर आता वाहतूकीचे साधन होते गाढव! आता प्रवासाचा शेवटचा टप्पा राहिला होता..खैबर खिंड ओलांडून कराची. खैबर खिंड ओलांडल्यावर मात्र भास्करचा संयम सुटला, तो जोरजोरात “ जय हिंद, वंदे मातरम्” म्हणत रडू लागला. आज त्याने तब्बल पावणे दोन वर्ष प्रवास करून हिंदूस्थानाच्या भूमीवर पाऊल टाकलं होत.कराचीहून बोटीने मुंबईला उतरल्यावर पुढे भास्कर सांगलीला घरी पोहोचला तेव्हा रात्र झाली होती.त्या दिवशी योगायोगाने संकष्टी चतु्र्थी होती. संकष्टी चतुर्थीच्या चंद्राेदयाची तोफ उडली तेव्हा घराच्या दरवाज्या समोर भास्कर उभा होता. आखिर त्या गजाननाच्या कृपेने सात समुद्र पार करून हे ‘भास्करायण’ संपले!
भास्करायण

Book (बुकगंगा वर उपलब्ध )

आधारित

बाप रे. कसला खतरनाक प्रवास केलाय.