मिपाकर चला बना कास्टिंग डायरेक्टर

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
22 May 2020 - 5:50 am

अगदी .. आवर्जून बघण्यासारखी मालिका म्हणजेऍमेझॉन प्राईम "पंचायत ..(हिंदी ) " अजून जास्त भाग पाहिजे होते पंचायत चे....
असो असेच होते चुटपुट लागून राहते अशी एक जगभर गाजलेली ब्रिटिश मालिका म्हणजे फॉल्टी टॉवर्स .. फक्त १३ भाग !

मी विचार करतोय जर हि मराठीत काढली तर कोणाला घेईन..
टीम १) सरपंच = भारत गणेशॊपुरे, उप सरपंच आनंद इंगळे , तरुण = संतोष जुवेकर! खऱ्या सरपंच बाई = सुहास जोशी किव ती कलाकार जिने भाई मध्ये पुलंच्या आईची भूमिका केली होत अश्विनी गिरी ,
ग्राम सहायक = कुशल बद्रिके
टीम २) सरपंच = अशोक सराफ ,उप सरपंच = (कै ) सतीश तारे , खऱ्या सरपंच बाई = चिन्मयी सुमित,
टीम 3) सरपंच = दिलीप प्रभावळकर , बस पुढे काही सुचलंच नाही...
अनि यात विद्यधार जोशी , सागर कारंडे यांना पण अधे मध्ये भूमिका देता येतील
यावरून मनात येत कि चला हवा येडू द्या मधील सर्व कलाकार घेऊन एखादी वाळू किंवा देऊळ सारखी कलाकृती का कोणी काढत नाहीये ( विनोदी + रहस्य किंवा विनोदी चोर पोलीस , )

सहज सुचले म्हणून मला राहून राहून वाटायचे कि बाजीराव मस्तानी आणि पानिपत मध्ये दिग्दर्शकाने सुहास जोशींना घ्याला पाहिजे होते.. तनवी आझमी ने किंवा पद्मिनी कोल्हापुरे चांगले काम केलं असले तरी सुहास जोशी जास्त शोभला असत्या ...

मिपाकर चला बना कास्टिंग डायरेक्टर आणि सुचवा तुम्ही यादी ) माझ्याकडे कोटी चिंचोके आहेत तेव्ह सर्वत उत्तम यदि ल घेउन चित्रपट बनवून टाकू म्हणतो

प्रतिक्रिया