मि.पा. पुणे-बँगलोर संयुक्त आघाडी
धम्याला माझ्या घरी घेऊन आलो. आत आल्यावर कपडे बदलण्यासाठी धम्या बेडरूम मधे गेला. बराच वेळ झाला तरी साहेब बाहेर आले नाहित म्हणून मी डोकावून बघितलं तर धम्या चक्क कपाट आवरत होता. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो". असं म्हणून धम्या फ्रेश व्हायला बाथरूम मधे गेला.
यथेच्छ जेऊन वगरे आम्ही झोपलो. मधेच मला अचानक वारं लागल्यासारखं वाटून जाग आली. बघतो तर धम्या झोपेतल्या झोपेत शेजारी बसून मला पेपर हलवून वारा घालत होता. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो".
धम्याला सकाळी ७ ला उठायचं होतं. गजर लावला होता. मी उठलो पण साहेब उठले नाहीत. शेवटी मी जोरात ओरडलो, धम्या ऊठ अरे तास भर उशीर झाला. अचानक धम्या ताडकन उठला आणि अंगठे धरून कोपर्यात ओणवा उभा राहिला. मी उडालोच "धम्या धम्या, अरे काय करतोयस? काय करतोयस?" माझा आवाज ऐकून धम्या भानावर आला. चेहेर्यावर ओशाळवाणं हास्य आणत म्हणाला "अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो".
असो असो. आता खरा व्रुत्तांत 
धम्या बँगलोरला येतोय ह्याची चर्चा मागचे कितीतरी दिवस ख.व. मधून सुरु होती. शेवटी प्रत्यक्ष धम्याकडून खरड येऊन पडली आणि त्या बातमी वर शिक्का मोर्तब झालं. "बँगलोरला येतोयस तर माझ्याच घरी उतरायचंय. दुसरी कडे राहिल्याचं कळलं तर रात्री पोत्यात घालून अपहरण करण्यात येईल" ह्या माझ्या प्रेमळ आमंत्रणाचा मान ठेऊन धम्याने माझ्याकडे रहायचं ठरवलं.
दरम्यान बँगलोर मधल्या इतर मि.पा. कर्यांशी संपर्क साधणं सुरू होतं. धमाल साहेब फार कमी वेळ, म्हणजे रविवार रात्र ते सोमवार पहाट, इथे असल्याने प्लॅन एकदम काटेकोर पणे मिनीटाच्या हिशोबात बनवण्यात आला. यशो, धम्या, अभिरत आणि मी अशा चौघांनी भेटायचं ठरवलं. मोठ्या मनाने यशोने आम्हाला तिच्या घरी डिनरचं आमंत्रण दिलं. वर कुणाला काय आवडतं ह्याची शौकशीही केली. विमानतळावरून बस मधे नी बशीतून माझ्या घरी अशी स्वारी आल्यावर आम्ही यशोच्या घराकडे प्रयाण केलं. अभिरत तोवर येऊन पोचला होता. यशो तिच्याच घरी असल्याने तिला उशीर होण्याची शक्यता नव्हती.
तर, धम्या आणि मी यशोकडे पोचल्यापोचल्या आम्हाला जेवणाची जय्यत तयारी झाल्याचं लक्षात आलं. सुरुवातीला बराच वेळ गप्पा टप्पा झाल्यावर शेवटी जेवणाकडे मोर्चा वळवला. ह्या दरम्यान सतत पि.जे. मारणं सुरुच होतं.
मेथीचे पराठे, दही, हरबर्याची उसळ, चिकन, श्रीखंड, मट्ठा, मसाले भात अशा फर्मास जेवणावर ताव मारता मारता आम्ही एकमेकांची यथेच्छ खेचत होतो. सोबत तोंडी लावायला अर्थातच मि.पा. वरच्या घडामोडी होत्याच.
मधेच मिपा बँगलोर कट्ट्याचे मुख्य आयोजक, मिपा बँगलोर ओसरी चे प्रचारक, मिपा बँगलोर ढोसरी चा खंदा "खंबा" आणि बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समितीचे संस्थापक व उरलेले एकमेव सभासद श्री श्री डॉन बाबा बंगाली (सद्ध्या वास्तव्य जर्मनी) ह्यांनी फोन करून आमच्याशी यथेच्छ गप्पा मारल्या.
अभिरत ने आपली विनोदबुद्धी काय जबराट आहे ह्याच्या पुरावा म्हणून "ऍड्याच्या हातात चक्क पाण्याचा ग्लास" असं म्हणून माझा फोटो काढला.
धम्याला दुसर्या दिवशी लवकर उठायचे असल्याने आम्ही शेवटी ११ वाजता यशोच्या घरून निघायचं ठरवलं. धम्या आणि अभिरत ला रिक्षा मधे घलून मी त्यांच्या मागून बाईक घेऊन माझ्या घरी पोचलो.
घरी पोचल्या पोचल्या नेहेमी प्रमाणे तातडीने माझ्या बैठकीच्या खोलीचं "बैठकीच्या खोलीत" रुपांतर करण्यात आलं.
धम्याच्या आवडी प्रमाणे सिंगल मॉल्ट ची व्यवस्था करण्यात आली होती.(तात्यानूं, तुमची लय आठवण आली. तुम्हाला उचक्या लागल्या असतीलच)
किचन मधे ग्लास आणायला गेलेला अभिरत तिथे मांडून ठेवलेले काचेचे शो-पिस बघून भिरभिरला.
असो. सगळी व्यवस्था चोख झाल्याची पावती देत धमाल रावांनी आता होऊन जाऊ द्या सुरुवात अशी आज्ञा केली आणि आम्ही सुरुवात केली. मधेच धम्याने मी त्याच्या ग्लासात ओततोय असा फोटो काढून घेतला. म्हणजे 'तू आग्रह केलास म्हणून मला नाईलाजाने घ्यावी लगली' असं कारण देता येइल म्हणाला.
ह्या नंतर पुढचे बरेच तास आम्ही वसंतराव, अण्णा, बाबुजी ह्यांची एकाहून एक सरस गाणी ऐकत घालवले. नॉन-स्टॉप गप्पाही सुरू होत्या. माझ्या शोकेस मधली घड्याळं बघून अभिरत खूश झाला. त्यात लवकरच अजून एकाची भर पडणार असल्याचं सांगितलं. डॉण बाबा बँगलोरी जर्मनीहून येताना व्हाया लंडन येणारेत आणि माझ्यासाठी बिग बेन मधलं घड्याळ उचलून आणणार आहेत हे कळल्यावर त्याला अजूनच आनंद झाला.
मधेच धम्याने मला व्याकूळ होऊन "खरंच का रे तुझ्या नाटकातले साने काका काल्पनीक आहेत?" अशा प्रश्न विचारला. धम्याला इतका कमी वेळासाठी आल्याने दर १० मिनीटानी एक अशा शिव्या पडत होत्या. शेवटी पुढल्या वेळी जास्त वेळ काढून येइन असं आश्वासन त्याच्याकडून घेण्यात आलं.
असं करता करता किती तास कसे गेले ह्याचा हिशोबच राहिला नाही. प्रचंड एंजॉय केलं. शेवटी रात्री झोपायची वेळ आणि सकाळी उठायची वेळ ह्यात किमान १ तास असावा ह्यावर सर्वांचं एकमत झाल्याने आम्ही आमची ढोसरी थांबवायचं ठरवलं.
सकाळी अभिरत कधी तरी गायब झाला. धम्याही ८ च्या दरम्यान अंघोळ करून कामावर गेला. जाताना मला उठवलं "लय भारी मजा आली रे भावा" असं म्हणून माझा निरोप घेताला. मी दार लावलं आणि पुन्हा झोपलो.
(धमाल राव आज रात्रीच्या विमानाने प्रस्थान करत आहेत. त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा.)
बराच प्रयत्न करूनही फोटो चढवता न आल्याने लिंक देत आहे. सोबतची कॅप्शन्स पण वाचावीत - http://www.flickr.com/photos/24440094@N02/sets/72157609254815561/
प्रतिक्रिया
जगर लावला
जगर लावला होता.
असो असो सगळ्या भावना पोहचल्या बरं का ! आणि फोटू जबरा हायत राव...
काय रावं २ पेग जास्त झालेले दिसतायत...
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
मदनबाण.....
जलतरंग :- रंजना प्रधान {मी आत्ता पर्यंत ऐकलेले सर्वात सुंदर जलतरंग वादन }
असेच म्हणतो
मस्त रे ऍडी भाव ... चक्क पाण्याचा ग्लास तुझ्या हातात ? ... हाहाहा ... जबरी ... च्यायला ... आम्हि अजुन कट्टा नाय अनुभवला ..
चालू द्या .. कट्ट्यावर कट्टे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा
खुपच छान वृतांत
फोटो पण मस्त...कुठल्यातरी मिपा कट्ट्याला आता हजेरी लावलीच पाहिजे. म्हणजे संत तात्याबा मिपाकट्टेकरी महाराजांचे शिष्यत्व घेता येईल.
वेताळ
वेताळ
कुठल्यातर
कुठल्यातरी मिपा कट्ट्याला आता हजेरी लावलीच पाहिजे. म्हणजे संत तात्याबा मिपाकट्टेकरी महाराजांचे शिष्यत्व घेता येईल.
अवश्य..!
आम्हीही वेताळाच्या दर्शनाकरता उत्सुक आहोत...
तात्या.
-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!
लै लै भारी
लै लै भारी वृत्तांत रे .. अगदी वृत्तांत शोभावा असा वृत्तांत !! ह ह पु वा.
बाकी परवा आम्ही पण धमुच्या घरी गेल्यावर .. आमच्या नजरेत येउ नये असे पटकन पोते गुंडाळुन ठेवत होता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तकवेडे आहात ? मग जरुर भेट द्या पुस्तकविश्व डॉट कॉमला
सहजच
म्हणजे तुला म्हणायचय तरी काय?
काही नाही
काही नाही .. काही नाही .. चुकीच्या ठिकाणी प्रतिसाद टंकला गेला. धमुबद्दल मी मुळी बोलतच नव्हतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तकवेडे आहात ? मग जरुर भेट द्या पुस्तकविश्व डॉट कॉमला
नेहमी प्रमाणे मस्त ....
नेहमी प्रमाणे मस्त ऍडी स्टाइल कथन ....
नवीनच
कट्टा खुपच जोरात झालेला दिसतोय. फोटो मस्त आले आहेत, पूढ च्या कट्ट्याला आम्हाला पण निमंत्रण द्या.
"अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो".
"अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो".
"अरे अरे, मी विसरलोच की, मी तुझ्या घरी आहे नाही का? असो असो". म्हणजे काय ते कळाले नाही
म्हणजे म्हणजे
म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे ...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तकवेडे आहात ? मग जरुर भेट द्या पुस्तकविश्व डॉट कॉमला
>>पूढ च्या
>>पूढ च्या कट्ट्याला आम्हाला पण निमंत्रण द्या
अगं धमी, तुझच घर आहे, कधीही येउन रहा गं माझ्याकडे.
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
.
अगं धमी, तुझच घर आहे,
रेंट घे गं हिच्या कडून. पण तू पुण्याला रहात असल्यानी मी करत जईन कलेक्ट
>>रेंट घे गं
>>रेंट घे गं हिच्या कडून.
कोणाला रे सांगतोयस ऍड्या?? :W
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
अरे
अशीच थोडी चम्मतग गं, तू लोड नको घेऊस. मी जेवायला आलो पुन्हा की बोलुच
>>मी
>>मी जेवायला आलो पुन्हा की बोलुच
ये, ये, कधीही ये बरं
वाट बघ आता!!
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
फु ट लो ....
भंजाळलो, फुटलो, बहिसटलो, हसुन हसुन पडलो, खुळा झालो ....
च्यायला काय भारी वृत्तांत लिहला आहेस बे ऍड्या, लै भारी ...
तु आता खरेतर "घाऊक भावात वृत्तांत " लिहुन देण्याचे दुकान उघड, लै चालेल ...
एकंदरीत लै भारी कट्टा आणि वॄत्तांत तर लै लै लै भारी ....
( आता वरचीच लेखातील वाक्ये "कॉपी पेस्ट" करुन त्यावर प्रतिक्रीया देण्यात काही अर्थ नाही, प्रत्येक वाक्यच भारी ...
जिओ यार .... )
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ही हा हा
ही हा हा.... मस्तच रे ऍड्या!
ही हा हा.... मस्तच
ही हा हा.... मस्तच ग मनस्वी
-टारस्वी
वा!
यशो ने बनविलेले पदार्थ मस्त दिसत आहेत.

कट्टा एकदम मस्त झालेल दिसत आहे.
वृत्त्तांत ही मस्त लिहिला आहे.
वा
झक्कास वृत्तांत लिहीला आहे फोटो पण लय भारी आहेत
आजतागायत एकही कट्टा न अनुभवलेला व्यंकु
हसरा वृत्तांत.
कट्टा छान जमवलात.
पदार्थही मस्त दिसतायत(पण ती सुगरण कुठे गेली?)
ऍडीभौ मला वृत्तांत वाचताना मधेच चि. वि. जोशी यांची आठवण येत होती.
खासकरून यशो तिच्याच घरी असल्याने तिला उशीर होण्याची शक्यता नव्हती.
या वाक्याला.
रेवती
धन्यवाद
जोशी लोक फार पूर्वी पासून विनोदी
जोशी लोक
जोशी लोक फार पूर्वी पासून विनोदी
अगदी अगदी!
लय भारी रे जोश्या! लगे रहो ...
अदिती (डब्बल बॅरल जोशी)
अदिती
Belle de jour - स्त्रीच्या लैंगिकतेचा शोध
-- स्वाक्षरी सल्लागार कार्यकर्ते यांच्याकडून प्रीअप्रूव्ह्ड
हो तर!
जोशी लोक फार पूर्वीपासून विनोदी!!
तर काय
पुलंचंही खरं आडनाव 'जोशीच' होतं नंतर त्यांनी बरेच जोशी बर्याच काळपासून 'विनोदी आहेत' हे समजल्यावर फरक कळावा म्हणून बदलून घेतले, अशीही एक वदंता ऐकून आहे!!
चतुरंग
>>पुलंचंही
>>पुलंचंही खरं आडनाव 'जोशीच' होतं नंतर त्यांनी .....
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
झकासच कि
मित्रहो,
कट्टा छान जमवलात. पुण्यात कधि ते कळवा.....
(कट्टा प्रेमि)
सचिन
वा..
कट्टा मस्त झालेला दिसतो. यशोने भरपूर पदार्थ केलेले दिसतात आणि फोटोही छान.. पण रेवती म्हणते तसे सुगरणीचा फोटू कुठे आहे?
स्वाती
अरेवा..
बंगळूरात सुद्धा कट्टा झाला म्हणायचा! मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
.
असं काय करताय प्राजू ताई. अहो डझनानी कट्टे झालेत बँगलोर मधे आता पर्यंत.
परंतु यासम हा....
अरे पण ऍडी भौ , एकाच दिवशी एकाच गावात ओसरी बी न ढोसरी बी आतापर्यंत झाली नव्हती कधी.....
पोटात
पोटात दुखणार आता तुमच्या सगळ्यांच्या.
>
[( X(
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते
निषेध.
पोटात दुखणार आता तुमच्या सगळ्यांच्या.



अगदि हेच म्हणतो.
सर्वप्रथम
मागच्या कटट्याला येते म्हणून सांगून ऐनवेळी आमचा म्हणजे बिपीन कार्यकर्तेंसह माझा व ऍडिचा कात्रज करणा-या यशोधराताई ह्यांचा जाहिर निषेध.
सबब, फोटोत दाखवलेले खाद्य पदार्थ हे विकतचे वाटतात.(कामत मधे जेवायची मजा काहि औरच आहे महाराजा)
नेहमीप्रमाणेच ऍडिचा रिपोर्ट जबरि झाला आहे. लगे रहो.
ऍड्या लेका ,धम्या काम करतोय ते पाहून तुझ्या चादरि तरि त्याच्याकडून धुवून घ्यायच्यास कि रे
असो,
कट्टा वर्णन वाचून मजा आली.
पहिल्यांदाच बंगलोर कट्टा मिस झाला.
हरकत नाहि.डॉन्या परत आल्यावर खास कट्टा करण्या करिता आम्हि बंगलोरात येउ.
अभिज्ञ.
(मध्यपुर्व)
सही
वर्णन (काल्पनिक आणि खरे) आणि फोटोज - दोन्ही झकास.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
ऐसाच बोलेश...
पयला कट्टा .. लई झकास
कट्ट्याला जायचे म्हणुन आपुन सकाळपासनं तयार होतो.
धम्या ६ ला येणार अस ऍडी म्हणाला व्हता.
दुसर्या फोन मधी सकाळी न्हाई संध्याकाळी सहा असे करेक्ट समजले.
आपुन राहतो ते बंगलोरचे उत्तर टोक आणि कट्टा पूर्व भागात. उशिर व्हायला नको म्हणुन दोन तास लौकर निघालो.
आणि बसमधल्या पब्लिकच्या (मिस) इन्फ्अर्मेशन मुळे चुकीच्या बशित बसलो. बसमधन यशोताईला फोन केला तेव्हा म्हटली; गधड्या कट्टा सोमेश्वरी आणि तु रामेश्वरीला का जातोयेस ?
"होगुत्ते होगुत्ते" (जाते जाते) म्हणून आम्हाला चुकीच्या बसमधे बसवणार्या पब्लिकला "निन अम्मनगे" (जाणकारांना अर्थ समझला असेलच
) या शब्दात धन्यवाद म्हणून आम्ही करेक्ट बशि बदलुन (आणि टाईमात
> ) पोचलो.
जेवण झकास होते आणि श्रीखंड व दही वगळता सारे घरी बनवले होते. सुग्रास जेवणाबद्दल यशोताईचे आभार ( ही फुडच्या वेळची बेगमी हो
) आणि हो इतके सगळे एकटीने करु नकोस आम्हाल मदतीला बोलवत जा 
सुक्ष्मदेहाने (मराठीत Virtually ) आपली उपस्थिती दाखवणार्या डॉन साहेबांना असलेल्या ( व काही नसलेल्या ) पदार्थांची यादी सांगून जेवणाची सुरुवात केली
फुढचा वृतांत ऍडीने लिहला आहेच.
दोन अवलिया व्यक्तीमत्वांशी ( का त्यांच्या फक्त काही पैलूची ) ओळख झाल्याने आम्ही धन्य पावलो.
"वरती" पोचल्यावर इश्क मोहब्बत च्या नावाने गळे काढणारे बरेच जण मी आधी पाहिले होते.
ही मंडळी चक्क भीमसेन जोशी, वामनराच जोशी अशा एक से एक बढकर एक व्यक्तीमत्वांच्या गळ्यांना व तानांना दात देत होती. व्वा
क्या बात है|
(आमचे स्वगतः शिक गधड्या काहितरी!)
माझ्या मराठी रुममेटला ओसरी आणि ढोसरी हे दोन्ही प्रकार बेक्कार आवडले आहेत. बिचारा नुकताच पुण्याहुन आल्याने दमुन घरी झोपला होता.
अभिरत
आभार..धन्यवाद...आणि शुभेच्छा!!!
मला बंगळुर जहागीरीतला इतका झकास कट्टा अनुभवण्याची संधी दिली त्याबद्दल मिपाचे, ऍड्याचे, अभ्याचे आणि प्रेमाने खाऊ घालणार्या यशोताईचे आभार आणि धन्यवाद!
ऍड्याऽऽऽ, साल्या, हे लिहु नकोस असं बजावलं होतं ना???? लोकांना काय वाटेल आता? 'हा धम्या इथे मारे यंव करु अन त्यंव करु अशा गप्पा मारतो आणि घरी बायकुला घाबरतो!' अरे अज्ञानात सुख असतं रे, आता ही गोष्ट कळल्यावर कोण माझं बोलणं सिरीयसली घेईल रे?
बाकी, यशोताई, देव तुझं कल्याण करो गं बाई! इतकं झक्कास चिकन मी कित्ती कित्ती दिवसात खाल्लं नव्हतं! आत्माराम कसा एकदम शांत शांत होऊन गेला माझा
कितीच्या काय वेळ तो नुसता गप्पच बसुन होता. त्याला बहुतेक शोपीस पाहुनच 'अंमळ झाली असावी'
ओसरी झकास झाली ह्यात शंका नाहीच्च, पण ढोसरीला ही लै लैच्च मजा आली
बाकी ऍड्या, लेका खरंच मजा आली लेका. तुझी 'ग्लेन ड्रम्मॉन्ड' काय काटा चीज आहे यार! आपण साला एकदम फिदा झालो.
अभ्या, येड्या शब्द जरा नीट वापर. मी आणि डान्या हे नॉर्मलीही सुक्ष्मदेहानेच वावरतो...मुळातच आमचे देह सुक्ष्म आहेत. इथे 'अतिसुक्ष्मदेहाने' असं म्हण
मंडळी, ह्या अभ्यासारखा सज्जन, सरळमार्गी मित्र मला मिळाला त्याबद्दल मिपाचे आभार!
ऍड्यासारख्या अवलिया प्राण्याला सदेह भेटलो आणि खरंच धन्य झालो. काय साला माणूस आहे हा! आमची ही पहिलीच भेट होती, पण असं मुळीच वाटलं नाही
आणि यशोताईबद्दल काय बोलावं, आमची एव्हढी लायकी नाही बॉ इतक्या चांगल्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्याची.