[शशक] अॅन फ्रँकच्या डायरीतील एक पान २०२०

SaurabhD's picture
SaurabhD in जनातलं, मनातलं
29 Apr 2020 - 3:23 pm

आज आम्हाला कळतं आहे की त्यांना तेव्हा काय वाटत असेल.

त्यांच्यावरही अशीच जिवाच्या भीतीने घरांमध्ये लपून बसण्याची वेळ आली होती. "आपलाही नंबर कधीही येऊ शकतो ..." हा फार भयंकर विचार आहे. कोणामार्फत ते आपल्यापर्यंत पोहोचतील काही सांगू शकत नाही. बाहेरून दिसताना सगळे चांगलेच दिसतात ... पण कोण 'आतून' त्यांचे झाले असतील ते कसं सांगावं.

सततचं मानसिक दडपण की आपली एक चूक, निष्काळजीपणा ... आपल्या संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात घालेल.

तेव्हा काही जण शत्रूच्या पकडी बाहेर निसटले आणि वाचले ... पण आमचा शत्रू तर आधीच जगज्जेता आहे.

...

थॅनोसची टिचकी इतक्या लवकर खरी होण्याची वेळ येईल असं त्याच्या निर्मात्यांना स्वप्नातही वाटलं असेल का !!!

कथा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

29 Apr 2020 - 4:03 pm | जव्हेरगंज

ब्रिलियंट कथा!! आवडली!!

Prajakta२१'s picture

29 Apr 2020 - 4:05 pm | Prajakta२१

+१

केंट's picture

30 Apr 2020 - 12:59 pm | केंट

+१