नाभिका रे केस वाढले रे, धैर्याने उघड जरा आज सलून रे

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
5 Apr 2020 - 9:38 am

केस वाढलेत, कापायचे आहेत परंतु ह्या लॉक डाऊन मुळे नाभिक बंधूंची दुकाने बंद आहेत.
त्यामुळे वैतागून "नाविका रे, वारा वाहे रे" चे विडंबन करायला घेतले.

मूळ गीत :
नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज नाव रे

कवी : अशोकजी परांजपे
प्रकार : कोळीगीत

विडंबन :

नाभिका रे, केस वाढले रे
धैर्याने उघड जरा आज सलून रे
जटाधारी झालो आता, काप माझे केस रे

क्वारेंटीनचे दिस गेले, घरकैदेचा मास चाले, कोरोना आला
माझिया केसा गुंता होऊनि गेला,
धाव घेई तुजकडे माझे मन, नाही तुला ठाव रे

नाभिका रे, केस वाढले रे
धैर्याने उघड जरा आज सलून रे

पोनी स्टाईल ल्यायलो मी, झिपऱ्यावाणी सजलो मी, केसजाळी ल्यालो
माझे कुंतल डोक्यावरी फुलुनी आले,
नाचती रे बघ माझे केस, सांग तुझा भाव रे

नाभिका रे, केस वाढले रे
धैर्याने उघड जरा आज सलून रे

कविता माझीमुक्त कविताविडंबन

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

5 Apr 2020 - 11:39 am | चौथा कोनाडा

व्वा, धम्माल विडंबन !

केसांचा गुंता, पोनी स्टाईल, झिपऱ्या ही सगळी चित्रं डोळ्यापुढं नाचायला लागली.
(सध्या मी पण याच अवस्थेत आहे)

मस्त, मजा आली चामुंडाराय !

कविता चांगली, पण 'नाभिक' नसून 'नापित' हा शब्द 'न्हावी' या अर्थाचा आहे.
नाभिक म्हणजे Nucleus आणि नाभिकीय म्हणजे Nuclear
.

शशिकांत ओक's picture

6 Apr 2020 - 10:42 am | शशिकांत ओक

'भ' चा भयंकर प्रताप आहे. प बरा हे वाचून वाटले कि दर वाढीचे नाभिक समाजातून प्रसिद्ध होणारे परिपत्रक वाचत नाही वाटतं ? त्यांनी निषेध व्यक्त करायच्या आधीच पडते घेऊन हेयर कट मारून बसा...

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2020 - 9:26 pm | चौथा कोनाडा

न्हावी म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन, श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली (महाला), हजाम असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत.

मुंबईस पहिला न्हावीखाना (हेअर कटिंग सलून) लोणकर व बडनेरकर यांनीं काढला असे म्हणतात. नंदन कालेकर हा लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात पुण्यात सलून काढणारा पहिला 'न्हावी' होय.

गुजराथमध्ये आणि महाराष्ट्रातही हे लोक लग्न जुळविण्यांत मध्यस्थ असतात.गावभर फिरून ते लग्नाची बोलावणी करतात. ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच काम न्हावी करतात.

सनई-चौघड्याच्या आणि संबळीच्या आवाजात तुळजापूरच्या तुळजाभवानी या देवीपर्यंत नैवेद्य पोचविण्याची जबाबदारी ब्राह्मणांकडे असते. सनई-चौघडा न्हावी वाजवतात आणि गोंधळी संबळ. या सर्वांना कोल्हापूर संस्थानच्या वतीने मानधन सुरू असते.

गणपतराव पिराजी वसईकर हे व्यवसायाने न्हावी होते. त्यांनी सनईवादनावर पुस्तकें लिहिली आहेत.

न्हावी हे पूर्वी शस्त्रक्रिया करून तुंबड्या लावीत. यांच्या बायका सुइणीचा धंदा करतात. ही माणसे जावळ काढणे, जखमा साफ करणे, नारू रोगाचे उपचार करणे हीही कामे करतात.

बऱ्याच ठिकाणी लग्नघरातील स्वयंपाकाची व्यवस्था लावणे हे काम न्हावी करतात. काही ठिकाणीं तथाकथित उच्च वर्णीयांच्या जेवणावळीत न्हावी हा पाणी वाढतो

एकंदरीत नाभिक (नापित) मल्टीस्किल्ड व्यक्तिमत्व आहे असे दिसते !

मास्त्रो : https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4...

पाषाणभेद's picture

7 Apr 2020 - 8:37 am | पाषाणभेद

वा वा खूपच माहीती समजली.

धर्मराजमुटके's picture

5 Apr 2020 - 6:20 pm | धर्मराजमुटके

पण आता कोरोनामुळे आमच्या नेहमीच्या नापिताकडे जावा की नाही असा प्रश्न पडलाय. नाक नेहमी गळत असतं त्याचं !

मलाही वाढलेल्या केसांचा लईच कंटाळा आला आहे ! तसही मला मिलेटरी कट किंवा झिरो कट प्रिय असल्याने वाढलेले केस नकोसे वाटतात ! त्यात उन्हाळा असल्याने घामाने केस भिजतात.
बाकी नाभिक हा शब्द योग्य असुन ज्यांना हा शब्द माहित नाही त्यांनी केशकर्तनालयात कधीही भिंतीवर लावलेले दर पत्रक वाचले नसावे ! ज्यात बर्‍याच वेळा नाभिक संघटना किंवा नाभिक महामंडळ असा उल्लेख असतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye

पाषाणभेद's picture

7 Apr 2020 - 8:39 am | पाषाणभेद

मी देखील दर एप्रील मध्ये टक्कल करतो. आता पंधरा एप्रीलला ड्यू आहेत.

कंजूस's picture

7 Apr 2020 - 2:41 am | कंजूस

कविता जमली आहे.
कंगवा आणि कात्री घेऊन दोन आरशांमध्ये ( एक मोठा आणि एक छोटा)बसल्यास केस कापणेही जमेल. रेडिओ चालू ठेवणे.

चामुंडराय's picture

7 Apr 2020 - 4:45 am | चामुंडराय

मला हे दोन्हीही शब्द माहित होते. परंतु माझ्या मते नाभिक हा शब्द जास्त प्रचलित आहे.
समाजाचे महामंडळ, संघटना, वेब-साईट, वधुवर सूचक मंडळ, फेसबुक पेज इत्यादी "नाभिक" या नावाने आहेत.

नापित हा संस्कृत शब्द आहे आणि तो मराठीत संस्कृतोद्भव आहे.

न्यूक्लिअस ला नाभिक हा शब्द शास्त्रीय संज्ञांचे भाषांतर असावे.

कदाचित नापित चा अपभ्रंश नाभिक असावा.

परंतु नाभिक ची व्युत्पत्ती काय आहे हे कुठेतरी वाचल्याचे किंवा ऐकल्याचे स्मरते.
बहुधा रामनगरी मध्ये ऐकले असावे.

बिपीन सुरेश सांगळे's picture

7 Apr 2020 - 9:16 am | बिपीन सुरेश सांगळे

अगदी मनातलं दुःख व्यक्त केलत राव
तेही हसू येईलसं
आवडलं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2020 - 12:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिशा आणि डोक्यावरचे केस आता लोंबू लागले आहेत.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2020 - 12:42 pm | चौथा कोनाडा

वाढू द्या, लोंबू द्या, कापू नकात एवढ्यात,
लॉकडाऊन नंतर मिपा सलूनकट्टा करू !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2020 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकवीस तारखेचा धागा नुसता वाढलेली दाढी, मिशा आणि डोक्यावरचे केस.
यांचे फोटो, आणि सर्वात बेक्कार दिसत असेल तो वीजेता.

त्याला शे पाश्शे बक्षीस देऊ.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2020 - 1:08 pm | चौथा कोनाडा

दिलीप बिरुटे साहेब _/\_ दंडवत घ्यावा !

बेहद्द खूष झालो विडंबन वाचून.मस्त.

आता इतर ज्ञान पाजळण्यांनो,तुमची भंकस दुसरीकडे करा. इथे विषय का आहे तर हे मस्त विडंबन,त्यावर बोला.
काही लोकांचं हे असतं,
स्वत:ला काहि सुचत नाही, दुस-यांचं कौतुकही करता येत नाही, व्यूतपत्तीशास्त्रासाठी स्वतंत्र धागा काढा.

नूतन's picture

15 Apr 2020 - 9:44 am | नूतन

मस्त जमलंय

एक व्हॉट्स अप फॉरवर्ड, ह्या धाग्यासाठी अगदी समयोचित

आज जर तुम्ही 50 तोळ्याची चेन घालुन फिरला तरी कोणीही विचारणार नाही कोठे बनवली.

पण जर तुम्ही केस कापून रस्त्यावर फिराल तर पन्नास जण विचारतील कोठे कापले बाबा.