चित्रपट परिचय : दी झोया फॅक्टर

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
2 Apr 2020 - 4:41 pm

माझ्या मते लगान चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये एक नवे पर्व निर्माण झाले. या पुर्वी प्रेमकथा, प्रेम त्रिकोण , गुन्हेगारी, लॉस्ट अ‍ॅन्ड फाउन्ड ई मोजक्याच विषयांत अडकलेला व्यावसायिक चित्रपट अनेक विषयांना स्पर्श करु लागला. लगान प्रमाणेच काही चित्रपटांचा विषय एखादा खेळ होता.
दी झोया फॅक्टर हा पण क्रिकेटवर बेतलेला चित्रपट आहे. क्रिकेट या खेळात खूपशी अनिश्चितता आहे. त्यामुळे गुणवत्तेबरोबरच "नशिबाची साथ" मिळणेही गरजेचे असे क्रिकेट रसिकांना व खेळाडुंना वाटू शकणे खूप स्वाभाविक आहे. तर या आत्मविश्वास विरुद्ध "नशिबाची साथ" या संघर्षावर हा चित्रपट बेतलेला आहे.
चित्रपटाचा नायक निखिल हा भारतीय टीमचा कप्तान आहे. गेली एक वर्ष त्याला यश हुलकावणी देत आहे. संघ सतत सामने हारत आला आहे. अशा स्थितीत स्वतःचा आणि संघाचा आत्मविश्वास कायम ठेवत विश्वचषकाला सामोरे जाण्याचे आव्हान त्याचासमोर आहे.
तर नायिका झोया एका जाहिरात बनविणार्‍या कंपनीत काम करते. झोयाचे आयुष्यही विचित्र आहे. अनेकदा गोष्टी तिच्या मनाविपरीत घडत असतात. पण ती काहीशी अपरिपक्व बिनधास्त आणि बेफिकीर आहे. क्रिकेटचे वेडे असलेले वडील आणि भाऊ यांच्यासोबत रहात असली तरी झोयाला क्रिकेटबद्दल राग आहे, पण असं असलं तरी तिचं क्रिकेटशी एक विचित्र नातं आहे.
झोयाचं आणि निखीलचं क्रिकेटशी असलेलं नातं अगदी निराळं आहे, त्यातून झोया आणि निखीलमध्येही एक नातं निर्माण होतं. या सगळ्यातून होणारा काहीसा संघर्ष चित्रपटातून समोर येतो. संघातील इतर खेळाडूंनाही कथेत महत्वाचं स्थान आहे. क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष, झोयाचा भाऊ जोरावर यांच्या भूमिकाही चांगल्या रंगवल्या आहेत.
सोनम कपूर ही फारशी यशस्वी नायिका नाही. पण झोयाची व्यक्तिरेखा तिच्या इमेजला आणि एकंदरीत व्यक्तिमत्वाला अगदी चपखल बसली आहे.. हा चित्रपट पुर्णत: सोनमचाच आहे. दुसरी कोणतीही नायिका इथे योग्य ठरली नसती.
चित्रपट वेगाने पुढे सरकतो आणि कुठेही कंटाळवाणा वाटत नाही, ज्यांना वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बघायला आवडतात त्यांना हा चित्रपट आवडू शकतो.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

2 Apr 2020 - 7:58 pm | श्रीरंग_जोशी

हा लेख वाचून हा चित्रपट पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे.

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2020 - 12:35 pm | चौथा कोनाडा

छान लिहिलंय. वेगळा विषय, त्यामुळं वाढलीय उत्सुकता.
सूनम कपूर आवडत नाही, पण तिचा निरजा पाहिल्यापासून मत थोडं बदललंय !
आता हा ही सिनेमा पहायला हवा.

मराठी कथालेखक's picture

6 Apr 2020 - 3:39 pm | मराठी कथालेखक

सूनम कपूर आवडत नाही

सोनम कपूर आवडते असं म्हणणारा तसंही कुणी आजवर भेटला नाही मला :)

शशिकांत ओक's picture

8 Apr 2020 - 12:09 pm | शशिकांत ओक

लिहिलेले आहे.