भाग १ मराठ्यांच्या लढायांचा इतिहास - प्रास्ताविक

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
1 Apr 2020 - 3:37 pm
गाभा: 

२

2
कै. शिवराम महादेव परांजपे (२७ जून महाड - २७ सप्टेंबर १९२९,
पत्रकार, साहित्यिक - काळ, मराठ्यांच्या लढायांचा इतिहास, )

2

1

मराठा साम्राज्याच्या परिसीमा सन १७६०

2

पेशवे आणि इस्ट इंडिया कंपनी समोरा समोर - अफूची तस्करीचा व्यापार?

{“चित्रमय जगत” नियतकालिकात कै. शि.म. परांजपे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ऑगस्ट १९१५ ते मे १९२८ पर्यंत लेख प्रकाशित होत गेले. वरद प्रकाशनाने ते पुस्तक नंतर सन १९ मधे प्रसिद्ध केले. मजकूर मुळ लेखकाचा ठेवला आहे. लढाईच्या वर्णनाशिवाय त्यांचे भाष्य शक्यतो गाळले आहे. मजकुरात संलग्नपण येण्या इतपत संकलन माझे आहे. जिथे मला काही विचार व्यक्त करावेसे वाटतील तिथे कंसात किंवा टीप देऊन ते साधावे असे आत्ता विचार आहे.
लेखातील मजकुराच्या संदर्भातील लढाईचे चित्र सध्याचे प्रचलित नकाशे बनवून सादर करणे या उद्देशाने ही मालिका हाती घेतली आहे.
(लढाईच्या १८१८ पर्यंतच्या घटनापासून कै. शि. म. परांजपे साधारण १०० वर्षे दूर होते. आजच्या संदर्भात १०० वर्षे जवळ होते. अशा मध्यभागी राहून त्यांनी दिलेले १९२०च्या सुमारातील गावे, शहरातील वाडे, गड, मंदिरांच्या नावांचे आधार, मिळाल्याने आपल्याला आजही जवळचे वाटतात.}

प्रस्तावना

“महाराष्ट्रीय मनुष्याची पहिली जिज्ञासा स्वाभाविकपणे कोणत्या लढाईबद्दल बरे असणार ? आपण महाराष्ट्रीय, आपण महाराष्ट्रात राहातो. पुणे हे त्या महाराष्ट्रातील मुख्य शहर. त्या पुणे शहरात मोच्या वर्षांच्या पूर्वीपर्यंत पेशव्यांचे राज्य होते. ते राज्य आज कोठे आहे ? …
दुसऱ्या बाजीरावसाहेबांचे वेळी आपल्या स्वातंत्र्यविनाशाचा हा जो हृदयद्रावक परिणाम घडून आला, त्याला पूर्वकालीन कारणे काय-काय झाली असली पाहिजेत, याचा विचार मनात आला असता ते विचार करणारे मन साहजिकपणे बाजीरावसाहेबांनी 1802 साली वसई मुक्कामी इंग्रजांशी जो तह केला, त्या आद्य कारणाकडे वळते. तो वसईला इंग्रजांनी केलेला तह म्हणजे देशात आपल्या स्वातंत्र्याच्या संरक्षणाकरता मराठ्यांनी त्या वेळी बनविलेल्या मराठा कॉन्फिडरसीच्या किल्ल्याला लाविलेला एक गुप्त सुरुंगच होय. तेव्हा त्या संकटाच्या निवारणासाठी शिंदे, भोसले, होळकर यांनी इंग्लिशांच्या विरुध्द लढाई पुकारणे हे त्या वेळी त्यांना अगदी अपरिहार्यच होते आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये शिंदे, भोसले, होळकर, यांनी ज्या लढाया केल्या, त्यांचीही वर्णने यापुढे क्रमाक्रमाने देण्यात आलेली आहेत व अशा कारणांमुळे या लढायांचा क्रम येथे उलटासुलटा झालेला आहे.
… या दृष्टीने पाहाता हे प्रस्तुत बाबतीतील लेखकाच्या मन:स्थितीचे स्वरूप असून हे काही या क्रमाचे समर्थन नव्हे, हे कोणाही वाचकाच्या लक्षात येण्यासारखे आहे….
.... आपल्यापाशी चांगली हत्यारे नव्हती, किंवा आपण कवायती कंपू तयार करून लढू लागलो म्हणून आपले हे पराजय झाले, ही कारणमीमांसा बिलकुल चुकीची आहे. हे आपले पराभव आपल्या नैतिक अध:पाताने घडवून आणलेले आहेत. या पुस्तकात पुढे ज्या लढाया दिलेल्या आहेत, त्यापैकी कितीतरी ठिकाणी निव्वळ फितुरीमुळे आपले पराजय झाले असल्याचे आपल्याला आढळून येते. आणि ज्या लोकांच्या मनावर आपल्या धर्माच्या किंवा देशाच्या बंधनाचा मुळीच दाब उरलेला नसतो, आणि ज्यांना केवळ स्वार्थाशिवाय दुसरे काही दिसतच नसते, असेच नीच आणि निमकहराम लोक असली ही, फितुरीची कामे करण्याला उद्युक्त होतात. असले लोक पेशवाईच्या शेवटच्या दिवसात आपल्याकडे फार झालेले होते.

पुढील भागात

खडकीची लढाई

खडकीच्या एका लढाईने पुण्यातील हिंदुपदपातशाहीचे सगळे राज्यवैभव एकदम लयाला गेले असेल तरी कसे, असे त्या वेळी झाले असेल तरी काय, त्या वेळच्या स्वदेशाभिमानी आणि स्वराज्यप्रेमी लोकांनी आपल्या स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी काहीच प्रयत्न केले नसतील काय, आणि त्यांनी अनेक प्रयत्न केले असतानाही त्यांच्या त्या प्रयत्नांना यश येऊ नये'(?) …

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

1 Apr 2020 - 10:11 pm | दुर्गविहारी

उत्तम सुरवात ! पुढे वाचायची उत्सुकता लागली आहे.

शशिकांत ओक's picture

1 Apr 2020 - 10:32 pm | शशिकांत ओक

काम चालू आहे...

धाग्यावर काम करता असताना इंग्रजांकडून कोण नेटिव्ह शिपाई लढत असावेत? असे मनात येत होते...
याचे उत्तर उदय कुलकर्णींच्या एका अभ्यासपुर्ण लेखात ईसंस्कृती या ठिकाणी वाचायला मिळाले.

भाग १ खडकी ते कोरेगाव

The British also raised new troops. Raising the Poona Auxiliary Horse in July 1817 it was advertised that,
‘The men to be Sunnis, Sheikhs, Moguls, Pathans, Scindeans (Sind), Baloochis, Shias, Hindustanis, Brahmins, Rajputs and Mahratta spearsmen – men of low caste not to be admitted – Mussulmans specially Syeds, Sheikhs and Hindustanees to be preferred..’

.... आपल्यापाशी चांगली हत्यारे नव्हती, किंवा आपण कवायती कंपू तयार करून लढू लागलो म्हणून आपले हे पराजय झाले, ही कारणमीमांसा बिलकुल चुकीची आहे. हे आपले पराभव आपल्या नैतिक अध:पाताने घडवून आणलेले आहेत. या पुस्तकात पुढे ज्या लढाया दिलेल्या आहेत, त्यापैकी कितीतरी ठिकाणी निव्वळ फितुरीमुळे आपले पराजय झाले असल्याचे आपल्याला आढळून येते. आणि ज्या लोकांच्या मनावर आपल्या धर्माच्या किंवा देशाच्या बंधनाचा मुळीच दाब उरलेला नसतो, आणि ज्यांना केवळ स्वार्थाशिवाय दुसरे काही दिसतच नसते, असेच नीच आणि निमकहराम लोक असली ही, फितुरीची कामे करण्याला उद्युक्त होतात. असले लोक पेशवाईच्या शेवटच्या दिवसात आपल्याकडे फार झालेले होते.

हे तर १००% सत्य आहे याबद्दल कुणाचे दुमत नसावे परन्तु दुर्दैवाने असेच नीच आणि निमकहराम लोक ज्यांना केवळ स्वार्थाशिवाय दुसरे काही दिसतच नसते, अशी माणसे आजही तुमच्या माझ्या अवतीभवती समाजात, राजकारणात अनेक आहेत.

यथावकाश असल्या लोकान्च्या बुडाला हादरे बसायला आता सुरवात झाली आहे एव्ह्ढीच त्यातल्यात्यात समाधानाची बाब.

बाकी आपले लिखाण नेहमीप्रमाणेच छान.

नेतृत्व कणखर असेल तर...
महाराजांच्या काळात किती जणांनी मुघलांच्या सेनेत प्रवेश केला? नेतोजी पालकर यांचेही परतणे महत्वपूर्ण होते. तेच मराठा सरदार संभाजी महाराजांच्या काळात दगाबाज़ होऊ लागले...
इंग्रजांना लाच देऊन त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यात का यश आले नाही?
डलहौसी, वेलेस्ली,एल्फिन्स्टन वगैरेंनी आपल्या नंतर आपल्या मुलांना त्यांच्या जागी का नियुक्त केले नाही?
घराणेशाही मुगल, पेशवे आणि अन्य भारतीय रियासतीत का बंद झाली नाही?
रणांगणात जाऊन पराक्रम गाजवला तर सेनेवर वचक राहतो... पैसे चारून नाही! हे कोणी सांगितले नाही का?
आपले विचार जाणून घ्यायला आवडेल.